लोकसंख्या-शिक्षण : एक गरज मराठी निबंध | Lokshnkhya-Shikshn : Ak Garaj Marathi Nibandh

 लोकसंख्या-शिक्षण : एक गरज मराठी निबंध | Lokshnkhya-Shikshn : Ak Garaj Marathi Nibandh   


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण लोकसंख्या-शिक्षण : एक गरज मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण  लोकसंख्या-शिक्षण : एक गरज असलेले दोन निबंध बघणार आहोत  आज आपण  लोकसंख्या-शिक्षण : एक गरज असलेले दोन निबंध बघणार आहोत आपला भारत देश 'गरीब लोकांचा श्रीमंत देश आहे; कारण जगाची लोकसंख्या आज ५०० कोटींच्या वर गेली आहे आणि आपण ८५ कोटी ही मर्यादा ओलांडली आहे; 


त्यामुळे आपल्या देशापुढे असणाऱ्या अनेक गंभीर समस्यांपैकी 'लोकसंख्येची बेसुमार वाढ' ही एक गंभीर समस्या आहे. सुमारे २०० वर्षांपूर्वी माल्थसने लोकसंख्यावाढीचा अभ्यास करून जे विचार मांडले होते, ते किती यथार्थ होते, याचा प्रत्यय आम्हाला येऊ लागला आहे. 


माल्थसने म्हटले होते की, 'कोणत्याही देशाची लोकसंख्या ही साधारणत: दर पंचवीस वर्षांनी दुप्पट होते. मात्र अन्नधान्य व इतर सोयी त्या प्रमाणात वाढत नाहीत. त्यामुळे महागाई व उपासमारीला तोंड द्यावे लागते. म्हणून लोकसंख्या मर्यादित ठेवण्यावर भर दिला पाहिजे.' 


'आम्ही भारतीय मात्र २१ व्या शतकांत प्रवेश करताना एक शतक कोटी लोकसंख्यां घेऊन प्रवेश करणार असे भविष्य दिसते. या झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येवर निर्बंध घालणे अत्यावश्यक आहे. म्हणून 'लोकसंख्या-शिक्षण' ही एक गरज निर्माण झाली आहे. 


लोकसंख्या-शिक्षणाची व्याख्या साधारणपणे अशी करता येईल की, "प्रजोत्पादनक्षम गटात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार करून त्यांच्यामध्ये आपल्या सुखी व समृद्ध जीवनासाठी तसेच राष्ट्राच्या प्रगतीसाठी स्वत:च्या कुटुबांच्या योग्य त्या आकाराविषयी विचार करण्याची क्षमता निर्माण करणे म्हणजे लोकसंख्या-शिक्षण होय."


अर्थात या महान देशाच्या समस्याही महान आहेत. परंतु वाढती लोकसंख्या व देशातील परिस्थिती यांचा समन्वय साधल्यास व आजची , लोकसंख्या देखील देशाला वरदानच ठरू शकेल. उदा. केवळ लोकसंख्या कमी करून आपल्या सर्व समस्या सुटणार नाहीत, म्हणून असलेल्या लोकसंख्येस उत्तम जीवनमानाकडे कसे नेता येईल 


या  दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. 'सर्वेऽत्र सुखिन: सन्तु' सुखी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे व सुखी जीवन जगण्यासाठी कोणकोणते अडसर आहेत याची जाणीव करून देण्यासाठी लोकसंख्या शिक्षण आवश्यक आहे. 


कुटुंबात जास्त मुले असली म्हणजे सर्वांच्या मूलभूत गरजा देखील भागविणे ' कसे अवघड जाते, वाढत्या लोकसंख्येमुळे साधनसंपत्ती कशी अपुरी पडते, देश किंवा समाज गुणवान नागरिकांमुळे कसा मोठा होतो, त्यासाठी चारित्र्यसंपन्न नागरिक निर्माण केले पाहिजेत, 


या गोष्टींचे शिक्षण देणे म्हणजे लोकसंख्या-शिक्षण! मुलांना केवळ जन्म देणे हे आई-वडिलांचे कर्तव्य नाही, तर त्यांचे उत्तम पोषण करणे, चांगले शिक्षण देणे, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे हे मातापित्यांचे कर्तव्य आहे, याची जाणीव मुलांमध्ये विकसित केली पाहिजे. 


प्रदूषणाचे तोटे त्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजेत. त्यासाठी वृक्षारोपणाची व वृक्षसंवर्धनाची कशी गरज आहे हे पटवून दिले पाहिजे, अंधश्रध्दा व गैरसमजुतीचे निर्मूलन करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास केला पाहिजे.
सुखाच्या शोधात निघालेल्या मानवाच्या गरजा अव्याहतपणे वाढत गेल्या. 


वाढत्या गरजांच्या पूर्तीसाठी विकासाची चक्रे फिरू लागली. औद्योगिक प्रगती झपाट्याने होऊ लागली, त्याबरोबरच माणूस व्यवहारी बनत चालला. पैशामागे धावत सुटला. पैशाला महत्त्व आले. परंतु केवळ भौतिक सुख मिळाले म्हणजे माणूस सुखी होत नसतो. 


भौतिक सुख हे मानसिक सुखासाठी पूरक होईल. मानसिक सुखासाठी सांस्कृतिक प्रगती झाली पाहिजे. भारताची प्राचीन संस्कृती जगविख्यात आहे. पण आज तिला ग्रहण लागलेले आहे. माणुसकीहीन समाज निर्माण होत आहे. भ्रष्टाचाराने थैमान मांडले आहे. 


म्हणून चारित्र्यसंपन्न नागरिक निर्माण होण्यासाठी लोकसंख्या-शिक्षणाच्या कक्षा वाढविणे गरजेचे आहे. भौतिक व सांस्कृतिक प्रगतीमुळेच मानवाचे जीवनमान उंचावणार आहे. म्हणून लोकसंख्या-शिक्षण आवश्यक आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


 निबंध 2
 

लोकसंख्या-शिक्षण : एक गरज मराठी निबंध | Lokshnkhya-Shikshn : Ak Garaj Marathi Nibandh   



११ जुलै हा दिवस 'जागतिक लोकसंख्या विस्फोट इशारा दिन' म्हणून सर्वत्र विविध कार्यक्रम करून साजरा करतात. अशाच एका कार्यक्रमातील रोडग्याच्या ओळींनी मला विचारप्रवृत्त केले. त्या ओळी होत्या, सत्त्वर पाव ग मला भारतमाते रोडगा वाहिन तुला। मुलांची संख्या भरमसाठ वाढते दर दीड सेकंदास एक मूल जन्मते। दारिद्रय बेकारीत गुन्हेगारी वाढते


यावर काढ ग तोडगा। भारत माते... आपल्यावरील संकट दूर व्हावे, आपले दारिद्रय जावे, एखादा मोठा आजार बरा व्हावा म्हणून देवदेवतांना रोडगा वाहण्याचे प्रकार आपण सर्वांनी अनेकदा ऐकले आहेत. पण लोकसंख्या वाढते म्हणून भारतमातेला रोडगा वाहण्याची पाळी आम्हा भारतीयांवर यावी यापरते दुर्दैव ते कोणते ! 


खरेच, भारतात लोकसंख्येचा इतका विस्फोट झाला आहे की जिकडे तिकडे माणसेच माणसे दिसतात. एकदा मी मुंबईला दादर स्टेशनवर बाजूला उभी होते, माझे बाबा परतीचे तिकीट काढण्यासाठी उभे होते. तिकिटाची रांग मारुतीच्या शेपटासारखी वाढत होती व जिन्यावरून माणसांचा अखंड प्रवाह चालू होता. 


मी वाट पाहत होते, आता माणसे कमी होतील. पण छे! माणसांचे थवे घसरतच होते. बसला रांग, रेशनला रांग. परवा तर आमच्या शेजारचा एक मुलगा वारला. बाबा त्याच्या अंत्ययात्रेला गेले. आई पाणी तापवून वाट पाहत बसली. 


रात्री ९ ला गेलेले बाबा रात्री दोनला आले. इतका उशीर का? असे विचारता म्हणाले, 'आज बरेच मेंबर्स होते.' मी कपाळाला हात लावला. प्रचंड लोकसंख्येमुळे नैसर्गिक साधनसंपत्तीचा तुटवडा पडत आहे. राहायला जागा नाही. तोड झाड! त्यामुळे पक्षी, प्राणी यांच्यावरही निराश्रित होण्याची वेळ आली. पाणी, रस्ते, अन्नधान्य सर्वच अपुरे पडू लागले. शाळेत वर्गखोल्या जुन्या, 


पण मुले ७०-८०. एकेका बाकावर ३-३ मुले, त्यामुळे गोंगाट नि बेशिस्त.खरी संख्यावाढ झोपडपट्टीत जास्त दिसून येते. या लोकांना चार चार पोरं म्हणजे देवाची लेकरं वाटतात. मग त्यांना धड भाकरी नाही, कपडा नाही, शिक्षण नाही याचा जरा सुद्धा हे लोक विचार करत नाहीत. 


मुलींची कोवळ्या वयात लग्नं करतात. पण हीच विवाहित कन्या भारताच्या लोकसंख्येत लवकरच भर घालते याचा विचारच कुणी करीत नाही, पोटची पोर त्यांना गळ्यातील धोंड वाटते. अज्ञान-बेकारी-गुन्हेगारी यांना ऊत येतो. महागाई, काळाबाजार डोके वर काढतात.


आपल्या देशापुढची सर्वात मोठी समस्या म्हणजे प्रचंड वाढती लोकसंख्या' असे आपले माजी पंतप्रधान राजीव गांधी म्हणाले होते. आणि ते खरेच आहे. लोकसंख्येमुळे अन्न, वस्त्र, निवारा, इंधन या सर्वच गोष्टींच्या टंचाईला आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. ही वाढ , 


थोपवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर लोकशिक्षणाची गरज आहे. विवाह-वयोमर्यादेचे कटाक्षाने पालन झाले पाहिजे. मुलगा-मुलगी समान मानले पाहिजेत. सर्वांनी श्रम करा. 'कुटुंब लहान, सुख महान' 'घरी दोनच मुले, दारी सौख्य फुले' अशी जाहिरात न करता, नोकरीत बढती, शाळेत प्रवेश इ. 


बाबतीत छोट्या कुटुंबाचा निकष लावा. कुटुंबनियोजनाची सक्ती हवी. 'स्त्री-शिक्षणावर जास्त भर हवा. बचतीचे फायदे लोकांना कळले पाहिजेत. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, शिस्त यावर भर द्यायला हवा.
वरील सर्व उपाय जर सर्वांनी केले तर लोकसंख्येला निश्चितच आळा बसेल. 



आता श्रावणात लेकुरवाळ्या जिवतीची पूजा करण्यापेक्षा एकाच; ते देखील कन्येवर, आपल्या कुटुंबाचा विस्तार रोखलेल्या माता-पित्यांचा सत्कार करा! आजच्या काळाची ही हाक आहे! टाहो आहे! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.