माझा धाकटा भाऊ मराठी निबंध | Maza Dhakta Bhau Essay In Marathi

 माझा धाकटा भाऊ मराठी निबंध | Maza Dhakta Bhau Essay In Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा धाकटा भाऊ  मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण माझा धाकटा भाऊ  असलेले दोन निबंध बघणार आहोत  रत्नहाराचे तेजस्वी सौंदर्य कुणाला समजावून सांगावे लागत नाही. डोळ्यांना ते आपोआपच जाणवते. रातराणीच्या सुगंधाची कुणी चर्चा करीत बसत नाही. 


वाऱ्याच्या झुळकेबरोबर तो आला की मन क्षणार्धात प्रसन्न होऊन जाते. लहान मुलाच्या गोड पाप्याची अवीट गोडी कळायला पुस्तकी पांडित्याची आवश्यकता नाही, एकाच स्पर्शात ओठांना त्या स्पर्शाची माधुरी कळते. माझ्या सुंदर आणि मोहक भावाचेही असेच आहे. त्याला परिचय • हवा कशाला?


या माझ्या धाकट्या भावाचे व्यक्तिमत्त्व रुबाबदार आहे. उंच, तेजस्वी, गौर वर्ण आणि प्रसन्न चेहरा. त्यामुळे ज्यांनी एकदा त्याला पाहिले ते त्याला कधीच विसरू शकत नाहीत. त्याचे नाव आहे अभय. अभय असूनही लहानपणी तो फार भित्रा होता. पण आता चांगलाच निर्भय बनला आहे. 


ही बटुमूर्ती आहे नववीत. त्याचे कपडे इतके स्वच्छ आणि टापटिपीचे असतात की पाहणाऱ्याला केवळ ह्या बाह्यांगावरूनच त्याच्या निर्मळ अंत:करणाची त्वरित साक्ष पटावी. त्याची उंची कमी असली तरी विचारांची पातळी फार उच्च आहे. 


अभय म्हणजे कर्तव्याची परिसीमा! वर्षातून एकही दिवस गैरहजर न राहता सतत प्रयत्न करीत राहण्याची त्याची वृत्ती! पुस्तकातील धडा काय किंवा व्याकरण काय तो तितक्याच समरसतेने शिकतो. त्याच्या चेहऱ्यावर उत्साह अन् प्रसन्नता सदैव ओसंडत असते.  शिक्षकांविषयी त्याला अपार प्रेम व सहानुभूती वाटते. आपणामुळे वातावरण गढूळ न करता खेळीमेळीचे, हसतमुख ठेवण्याचा प्रयत्न करतो.


'दिसामाजी काही तरी ते करावे।

प्रसंगी अखंडित वाचीत जावे।'


हे त्याचे तत्त्व. शास्त्र आणि गणित हे त्याचे हातखंडा विषय. त्या विषयातील अद्ययावत माहिती जाणून घेण्यास तो नेहमीच उत्सुक असतो. बाबांनी दिलेल्या पैशांत काटकसर करून तो शास्त्रविषयक अनेक नियतकालिके व पुस्तके विकत घेत असतो. नित्य काही ना काही नवे करावे ही अभयची ओढ. आपल्या मित्रांशी त्याचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. 


सत्यप्रियता, शांतताप्रिय वृत्ती, निर्णय घेण्याची क्षमता इ. गुण .. त्याच्या अंगी आहेत व ते त्याच्या भावी आयुष्यातही उद्बोधक ठरतील. शरीर आणि मन बळकट ठेवण्यासाठी तो नित्य व्यायाम आणि खेळ खेळतो. आपल्या कुवतीनुसार तो खेळात रस घेतो. 


त्याने शाळेतील अनेक कला आत्मसात केल्या आहेत. उदा. वक्तृत्वकला, निबंधकला, पाठांतरकला, हस्ताक्षरकला, अभिनयकौशल्य वगैरे. अशा उपक्रमात हौसेने भाग घेऊन यश संपादन करतो. आपल्या ज्ञानाची कक्षा वाढविण्यासाठी इतर (अवांतर) वाचनावर तो भर देतो. 


बौद्धिक क्षमता वाढावी यासाठी तो विविध स्पर्धात्मक परीक्षांना बसतो. म्हणूनच अभयने चौथीच्या व सातवीच्या स्कॉलरशिप' परीक्षेत यश संपादन केले आहे. त्याला सदैव वेळेचे महत्त्व पटते.

क्षणश: कश्चैव विद्यामर्थं च साधयेत्।

क्षणत्यागे कुतो विद्या कणत्यागे कुतो धनम् ॥ 


या वचनाप्रमाणे तो 'Time is money' हे जाणून अभ्यास करतो. समाजकार्य हा त्याचा आवडता छंद! उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात त्याचा नेहमी सहभाग असतो. वर्तमानपत्र-वाचन आणि क्रिकेट-समालोचन ऐकणे ह्या त्याच्या फार आवडीच्या बाबी! 


असा आहे माझा कष्टाळू, परोपकारी वृत्ती, आदबशीरपणा, नम्रता यांसारख्या श्रेष्ठ गुणांनी युक्त असा भाऊ- अभय! त्याला त्याच्या पुढील जीवनात यश लाभो अशी ईश्वराला प्रार्थना करते.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2

 माझा धाकटा भाऊ मराठी निबंध | Maza Dhakta Bhau Essay In Marathi 


संध्याकाळचे सहा वाजलेत. तो दारातून धावतच आत शिरतो. दप्तर टेबलावर पडते. चपला चप्पल-स्टँडमध्ये फेकल्या जातात; आई भूऽऽक' म्हणून जोरानं पुकारा होतो. आई म्हणते, 'अरे, हो हो. हात पाय तर धू.' हात-पाय कसेबसे धुवून (खरे म्हणजे ओले करून) तो


टेबलाशी बसतो. आई खायची बशी पुढे करते. निम्मीअधिक बशी रिकामी झाली की त्याला कंठ फुटतो. मग दिवसभर शाळेत घडलेल्या हकीकतींचा पाढा वाचला जातो, हसत हसत आणि साहित


असा हा माझा धाकटा भाऊ मोहन. आता सहावीत गेला आहे. शाळा फारशी लांब नाही. पलीकडच्या बिल्डिंगमध्ये त्याचाच वर्गमित्र सतीश राहतो. दोघे शाळेत बरोबर जातात, बरोबर येतात. सतीश फार वक्तशीर, तर आमचा मोहन धांदरट. काही गोष्टी फार घाईत करतो, तर काही गोष्टींना फार वेळ लावतो.


सकाळी पाच-दहा हाका मारल्याशिवाय उठणारच नाही. मग तोंड • वगैरे धुवून दूध प्यायला बसणार. नुसते दूध चालत नाही. त्याच्याबरोबर ब्रेड, खारी, बिस्किटे, काहीतरी लागतेच. ते नसले तर दूध त्याच्या घशात उतरणार नाही.


अंघोळ वगैरे झाली की गॅलरीत चेंडू खेळणे, रेडिओ ऐकणे हे उद्योग सुरू होतात. बाबा जरा ओरडले की त्याला गृहपाठाची आठवण होते. मग सगळे दप्तर उपसले जाते. गृहपाठ कोणत्या विषयाचा, किती, हे शोधण्यात बराच वेळ जातो. मग गृहपाठ कसाबसा सुरू होतो, तोच जेवणासाठी आई हाक मारते. 


मग काय, आनंदच. ताडकन उठतो. अभ्यासातून सुटका झाल्याचा आनंद असतो. नंतर शाळेची तयारी, कपडे करताकरता अकरा वाजून जातात. खालून सतीशची हाक येते. 'आलो रे' म्हणत दहा-पंधरा मिनिटांत सारा जामानिमा उरकून स्वारी निघते. आई सुटकेचा नि:श्वास टाकते.


फूटबॉलची त्याला फार आवड. शाळा सुटल्याबरोबर थोडा वेळ खेळूनच मग घरी येतो. घरातही जातायेता पायाने चेंडू उडवायचा चाळा चालू असतो. पतंगाच्या दिवसात पतंग उडवायचे वेड फार. कागद आणून पतंग बनवण्यात तो मलाच वेठीला धरतो. 


नाही म्हटले की रुसून बसतो. मग काय! माझा अभ्यास दूर सारून त्याला मदत करावी लागते. मग चेहरा कसा छान खुलतो. मोहनचे 'कृष्णाशी' एकाच बाबतीत साम्य आहे. ते म्हणजे खोड्या काढणे आणि दुसऱ्याला चिडवणे. मित्रांना त्याने टकल्या, बगळ्या, झिपऱ्या अशी नावे ठेवली आहेत.


अभ्यासात खूप पुढे नाही, पण चांगल्या गुणांनी पास होतो. शाळेच्या खेळांच्या स्पर्धांत न चुकता भाग घेतो. मग बक्षीस मिळो वा न मिळो. खेळणे त्याला मनापासून आवडते. घरात सर्वात लहान असल्यामुळे तो सगळ्यांचा लाडका आहे. सुटीत तो बाहेरगावी चार-आठ दिवस काकांकडे जातो. 


तिथे तो चागला रमतो पण आम्हाला फार चुकल्याचुकल्यासारखे वाटते. असा माझा धाकटा भाऊ मोहन- नावाप्रमाणेच लाघवी.नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हत्ती मराठी निबंध बघणार आहोत.