विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध मराठी | Vidhyarthyanche Manogat Essay In Marathi

 विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध मराठी | Vidhyarthyanche Manogat Essay In Marathi 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  विद्यार्थ्यांचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण  विद्यार्थ्यांचे मनोगत असलेले दोन निबंध बघणार आहोत  निबंधात का होईना, पण बोलायची संधी आम्हा विद्यार्थ्यांना मिळते हे काही कमी भाग्याचे नाही. नाहीतर ज्याने त्याने यायचे आणि 'आधी गप्प बसा' असे जोरात ठणकवायचे. मग आम्ही कितीही बोलायचे असले तरी मूक व्हायचे.


सकाळ होते तोच आई म्हणते, 'अरे राजू, सहा वाजले, उठतोयस ना? उशीर होईल क्लासला.' क्लास म्हटलं की झालंच झोपेचं खोबरं. उठावंच लागतं. स्वत:चे सर्व आवरून, आई देईल ते खाऊनपिऊन, पायात चप्पल सरकवून, वह्या-पुस्तके घेऊन सायकलवर स्वार व्हायचे आणि क्लासची वाट चालायची.


क्लासमध्ये जे कानावर पडेल ते ऐकायचे. लिहून देतील ते लिहायचे. साडेदहा वाजता घरी यायचे. घाईत कसेबसे जेवायचे. वह्या-पुस्तकांची धोपटी पाठीला लावायची नि शाळेत पोहोचायचे. सायकल स्टँडला लावून कोण मित्र कोठे आहे हे शोधून जरा गप्पा होतात तोच घंटा घणघणते. प्रार्थना, प्रतिज्ञा संपते. हजेरी होते की झालीच तासांना सुरुवात.


जो तो येतो आणि आपापला विषय शिकवत सुटतो. आम्हाला समजतंय की नाही, आमची आत्ता शिकण्याची इच्छा आहे की नाही, याचा विचार एखादाच शिक्षक करतो. एखाददुसरे शिक्षक चांगले शिकवतात. त्यांचे तास म्हणजे शालेय वाळवंटातील ओएसीस' वाटतात.


मधली सुटी असते म्हणून शाळा जरा सुसह्य होते. मित्रांशी बोलण्यात, मैदानावर भटकण्यात मन जरा ताजेतवाने होते. पण शाळेच्या फाटकात शिपाई उभा असतो. तो जरा सुद्धा बाहेर पाठवत नाही. पुन्हा सुट्टी संपल्याची घंटा होते. वर्गाकडे यायला लागते.


जरा रेंगाळले की पर्यवेक्षक, मुख्याध्यापक यांचा प्रसाद मिळतो. शिक्षकांच्या नंतर वर्गात पोहोचले तर शिक्षक वर्गाबाहेरच ठेवतात. त्यामुळे हे सगळे चुकवायचे तर पळत पळत वर्गात जावे लागते. पुन्हा दुपारचे चार तास. चित्रकला, पी. टी. असे तास असले म्हणजे जरा बरे वाटते. पी.टी. चा तास तर फारच आवडतो. 


त्या निमित्ताने वर्गातून सुटका होते. खेळता येते. येता-जाता पाणी पिता येते. शाळा ५.३० ला सुटली की ६.३० पर्यंत घरी. खाऊन जरा गप्पा. घराजवळच कोपऱ्यापर्यंत जाऊन येतोय तोच ८ वाजतात. जेवण. टी. व्ही. वरचे कार्यक्रम. मग गृहपाठांची आठवण होते. 


भराभरा दप्तर ओतायचे, वेळापत्रक बघायचे. त्याप्रमाणे आधी हवे असलेले गृहपाठ लिहायचे की झोपायचे. त्यावेळी रात्रीचे ११ वाजलेले असतात. आतापर्यंत कथन केलेला प्रकार खूपच सरळ आहे. पण या सर्वांच्या मध्ये विविध स्पर्धा, परीक्षा यांचा नुसता खच असतो. 


त्यातच आपले सण, उत्सव सगळे काही साजरे करायचे. शाळेचे स्नेहसंमेलन, सहलीसुद्धा. भरल्या गाड्याला सुपाचं काय ओझं म्हणून झाडून सर्व जयंत्या, पुण्यतिथ्या, सत्कार-समारंभ हे सोहळे करायचे. यात सुद्धा आमचीच धांदल, बाके लावा. 


टेबल, खुर्त्या न्या. फोटो लावा, हार आणा. गुच्छ आणा. फुलदाणी सजवा. एक ना दोन, अनेक कामे करावी लागतात. घरी जरा रिकामा दिसलो की आई, बाबा त्यांची कामे सांगतात. दळण आण, इस्त्रीचे कपडे, भाजी आण, इ. कामे झाली न झाली तोच अभ्यास नाही का आज? १० वी चे वर्ष आहे. 


सायन्सला अॅडमिशन हवीय ना? मग आता खूपच घासलं पाहिजे. आपल्याला नाही हं ते डोनेशन झेपायचे. वेळ वाया घालवू नकोस. उगीच इकडे तिकडे उनाडक्या करू नकोस.' हे घरचे. शाळेत 'सर्वांनी सर्व विषयांत पास झाले पाहिजे. प्रत्येक विषयाच्या दहा दहा प्रश्नपत्रिका सोडवा. 


ऑफ तास विसरा आता. अभ्यासक्रम डिसेंबरपर्यंत संपवायचाय. शिक्षकांनी सांगितलेले सर्व काम पूर्ण झाले नाही तर रिसीट मिळणार नाही.' अशी तंबीवजा बोलणी ऐकावी लागतात. आम्हाला मन आहे, संवेदना आहेत, याचा जराही विचार केला जात नाही. 


तसेच शालेय शिक्षणात सर्व विषय सक्तीचे. आवडीनिवडीला वाव नाही. शालान्त परीक्षेला तर फार महत्त्व दिलंय. विद्यार्थ्यांच्या भावी भवितव्याचा पाया म्हणजे ही परीक्षा. त्यामुळे आम्ही व आमचे पालक कायम दडपणाखाली असतो.


निकाल लागायच्या आधीच आपण पास होऊ का? किती गुण मिळतील? पढे काय? इ. चिंता सतत भेडसावत असतात. अरेरे! चहाटात फारच वेळ गेला. अभ्यास करायचाय अजून. काय समजलं? दहावीत आहे मी! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

 मराठी |

. विद्यार्थ्यांचे मनोगत निबंध मराठी | Vidhyarthyanche Manogat Essay In Marathi

'आज गृहपाठ का नाही केलास? भूगोलाची वही देव्हाऱ्यात ठेवून आलास वाटतं: तिची पूजा केलीस का? तुझा गहपाठ तझा देव करणार आहे वाटतं? आज युनिफॉर्म का घातला नाहीस? जरा ती झुलपं मागे सार आणि दोन तास वर्गाबाहेर ओणवा उभा रहा.' पंतोजींचा आवाज!

'ए पोरा! आरं, रस्त्यानं नीट चाल की! तंद्रीतच चाललाय वाटतं! फुकट जीव गमावशील बाबा!' रिक्शावाल्याची दमदाटी! 'चिमे, आज घरी यायला उशीर का झाला? आज आई बाहेर जाणार हे माहीत होतं ना तुला? स्वयंपाक कोण करणार?' दादानं दिलेली तंबी!


अशा असंख्य प्रश्नाच्या चक्रव्यूहात सापडलेला आजचा विद्यार्थी, गरीब बिचारा कुणीही हाका! ज्याने उठावं त्याने दम द्यावा. आम्हालाही मन असतं याचा कुणी विचारच करत नाही. पूर्वीच्या काळी काय शाळा-गुरुकुलं नव्हती? विद्यार्थी गुरुगृही जाऊन १२-१२ वर्षे अध्ययन करीत. 


निसर्गाच्या सान्निध्यात गुरूंच्या प्रेमळ सहवासात दिवस कसे अगदी आनंदात जात. पण आज शाळा, कॉलेज हे जणू प्रॉडक्शन काढणारे कारखाने झाले आहेत. एकेका वर्गात शेकडोंनी मुले नुसती कोंबून खच्चून भरलेली असतात. विद्यार्थ्यांनाही काही शंका असतात हे कुणी लक्षातच घेत नाही.


रेल्वेगाड्या जशा अनेक स्टेशनं घेऊन धडाधडा निघून जातात, तसं शिक्षक वर्गात येऊन भडाभडा' काय काय बोलून, आमच्या डोक्यात न बसणारं ज्ञान कोंबून तरातरा दुसऱ्या वर्गात निघून जातात. वर्षभरात वर्गातील मुलांशी


महात्मा फुले आणि कोठे हे भ्रष्टाचारी पुढारी! कोठे ते मातृभूमीसाठी प्राणार्पण करणारे भगतसिंग, राजगुरु, कान्हेरे, नेताजी सुभाषचंद्र, सावरकर इ. क्रांतिकारक आणि कोठे हे निरपराध जनतेचे खून पाडणारे अतिरेकी! __ मानवताधर्म, सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा इ. अनेक नैतिक मूल्यांची आज गळचेपी होत आहे. आणि सत्ता, खुर्ची, पैसा यांची मात्र आज चलती आहे.


यातील कोणते आदर्श आम्ही स्वीकारावेत? माणसं बोलतात एक आणि वागतात वेगळंच! 'मुँहमे राम और बगल में छूरी! अशांच्या र झुंडीत आम्हीही सामील व्हावं? नाही, नाही ! त्रिवार नाही!! आजचं चित्र जरी निराशाजनक असलं तरी आम्ही पूर्वसूरींचा मागोवा घेऊ. 


आमची भारतीय संस्कृती प्राचीन असून उच्च दर्जाची आहे. आम्ही इतिहासाचा धांडोळा घेऊ. संतांचे जीवन अभ्यासू क्रांतिकारांचे उज्ज्वल मृत्युंजयी, तेजस्वी जीवन पाहू, महात्मा फुले, बाबा आमटे, आगरकर, विवेकानंद, म. गांधी यांच्या जीवनात डोकावू. 


माणसातल्या माणुसकीचा शोध घेऊ, त्यांचीच परंपरा पुढे चालवू व आमचे जीवन धन्य करून मानवतेची मंदिरे बांधू, माणुसकीचे गौरीशंकर गाठू. हीच आमची प्रतिज्ञा! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद