आरसा नसता तर मराठी निबंध | Aarsa Nasta Tar Essay In Marathi

 आरसा नसता तर मराठी निबंध | Aarsa Nasta Tar Essay In Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  आरसा नसता तर मराठी निबंध बघणार आहोत.  रावसाहेबांचे नवे गोदरेज कपाट पाहताना मी विचारले. "रावसाहेब. तुम्ही आरसा असलेले कपाट का नाही आणलेत?" "अरे आरसा असता तर आणखी दोन-चारशे रुपयांचा भूर्दंड. आरसा हवाय कशाला?" रावसाहेबांनी उत्तर दिले.


रावसाहेबांच्या त्या प्रश्नावर त्यावेळी मी नुसता हसलो होतो. पण तो संवाद आठवला की अजून हसू येते ! आणि मग मनात येते, खरोखरच आरसा नसता तर आरसा नसता तर शाळेत किंवा फिरायला जाणाऱ्या (आणि नाटक-सिनेमाला जाणा-या) मुलामुलींनी आपला चेहरा कशात पाहिला असता ? 


दोन्ही बाजूंना भिंतीवर प्रचंड बिलोरी आरसे लावणारी केशकर्तनालये आरशावाचून कशी चालली असती ? मुलांनी आरशांशिवाय कवडसे कसे पाडले असते? आरसा काही आजच आलेला । रामायण काळापासून आहे.


गजाननराव वाटवे यांचे एक भावगीत होते.... .....ऐकलात का हट्ट नवा ? रामाला ग चंद्र हवा !' आरशात चंद्र दाखवून सुमंताने रामाचा हट्ट पुरवला. पण आरसा नसता तरआरसा हा स्त्रियांच्या सौंदर्याचा बोलविता धनी । ते प्रसाधनगृह पहा. ती काजळाची डबी.


ते पावडरचे डबे, त्या कुंकवाच्या रंगीबेरंगी टिकल्या. त्या नेल पॉलिशच्या बाटल्या, ते स्प्रे... फेस फौंडेशन क्रीमस, त-हेत-हेची फेशिअल्स-लोशन्स, ते केसांचे नाना रंग, आरशासमोर उभे राहून ते पुन्हा पाहणे, केस, कपडे परत परत सारखे करणे, पावडर जास्त झाली की काय ते आरशात....


आरशात....? आरसा नसता तर पाहिले असते कशात ? कसली केशभूषा न कुठली वेशभूषा ? स्त्रियांची केवढी अडचण....? 'या साडीवर हा ब्लाऊझ बरोबर मॅचिंग आहे का हो ?' या सारख्या प्रश्नांना उत्तरे देताना पतिराज रडकुंडीला आले असते आणि घरोघर दाराशी तलाव.


तलाव ! पाणी ! आले लक्षात....आरसा नसता तर-सांगितले असते सरोवरात पाहून करा काय ती वेशभूषा व केशभूषा ! आम्हाला शिंची कटकट नको. पाण्यात पाहून अर्जुनाने छताला टांगलेल्या फिरत्या माशाचा डोळा फोडला....तुम्हाला साधी पावडर लावता येऊ नये ? 


काजळ घालता येऊ नये ? पण.... पण.... तलाव काय जागोजाग थोडेच आहेत ? मुंबईकरांनी काय करावे ? उसळत्या फेसाळत्या समुद्रात चेहरा कसा पाहणार ? डोळे फाडून पाहिले तरी ....? डोळे ! डोळेसुद्धा आरसा होऊ शकतील नाही का ? आरसा नसता तर....डोळ्यांचा आरसा झाला असता. किती धुंदमधुर कल्पना !


कविराज ग.दि. माडगूळकरांनी एका गाण्यात लिहिलेयडोळ्यात वाच माझ्या, तू गीत भावनांचे डोळ्यात वाचण्यापेक्षा डोळ्यात पाहणे सोपे नाही का ? प्रियकराच्या नेत्रात पाहून प्रेयसी आपला मेकअप करीत आहे व प्रेयसीच्या लोचनात पाहून प्रियकर आपल्या कपाळावर केसांचा कोंबडा बनवतो आहे ! किती रम्य आहे ही कल्पना !


कल्पना सुंदर खरी पण अवास्तवच की ! तरुण स्त्रियांचे डोळे स्थिर असतात का ? पाऱ्यासारख्या चंचल डोळ्यात आपण प्रतिमा कशी पाहणार ? प्रतिमा पाहायला आरसाच हवा. नाही पटत ? __-तर मग दोन दिवस जगातले सारे आरसे कडीकुलुपांत टाकून प्रयोग करून पहा ना!....हातच्या काकणाला आरसा कशाला? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद