ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Christmas in Marathi

 ख्रिसमस नाताळ निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Christmas in Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  ख्रिसमस नाताळ मराठी निबंध बघणार आहोत.  नाताळ हा खिश्चन लोकांचा सर्वात मोठा सण आहे. येशू खिस्ताचा जन्मदिवस म्हणून हा सण साजरा करतात.


खिस्ती धर्म संस्थापक येशू खिस्ताचा जन्म २५ डिसेंबरला झाला. त्या दिवशी येशू खिस्ताची जयंती साजरी करतात. या सणाला खिसमस असे म्हणतात. या दिवशी सर्व खिश्चन लोक चर्चमधे जातात.


या सणाला लोक आपली घरे सुशोभित करतात. खिसमस' ट्री उभी करतात. खिसमस केक बनवतात. २४ डिसेंबरच्या मध्यरात्री चर्चमध्ये येशूचा जन्म सोहळा साजरा करतात. ताऱ्यांच्या आकाराचा दिवा घरावर लावतात.


चर्चमध्ये बायबलचे पठण, प्रवचन व प्रार्थना होते. बायबल हा खिश्चनांचा पवित्र ग्रंथ आहे. लहान मुलांना सकाळी भेटवस्तू पाहून आनंद होतो. या वस्तू सांता क्लॉजने दिल्या असे त्यांना वाटते.


लोक परस्परांना भेटून नाताळाच्या शुभेच्छा देतात. मित्रमंडळीना घरी जेवायला बोलवितात. खिसमस केक बनवितात. अशाप्रकारे लोक नाताळ आनंदाने साजरा करतात. जगभर हा सण आनंदाने साजरा केला जातो . मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद