दसरा निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Dussehra Nibandh in Marathi

 दसरा निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Dussehra Nibandh in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण दसरा मराठी निबंध बघणार आहोत.  आश्विन महिन्याच्या शुध्द दशमीला हा सण असतो. 


रामाने ह्याच दिवशी दशमुखी रावणाला ठार मारले होते म्हणुन विजयादशमी असेही म्हणतात. या दिवशी शस्त्रे आणि यंत्रांची पूजा करतात. घरी गोड पदार्थ केले जातात. 


संध्याकाळी मुले व पुरूष गावाबाहेर जाऊन शमी व आपट्याची पाने घरी आणतात. नंतर याला सोने मानून नातलग, मित्रांच्या घरी जाऊन देतात. एकमेकांना भेटतात. नमस्कार करतात.


दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानतात. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद