गणेशोत्सव मराठी निबंध 10 ओळी | 10 lines on Ganesh Chaturthi Essay in Marathi

 गणेशोत्सव मराठी निबंध 10 ओळी | 10 lines on Ganesh Chaturthi Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  गणेशोत्सव मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण  गणेशोत्सव शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत भाद्रपद शुध्द चतुर्थीपासून दहा दिवसपर्यंत गणेशोत्सव चालतो. सार्वजनिक गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला.


सर्व देवतांमध्ये पूजेचा पहिला मान गजाननाला असतो. त्याची पूजा करूनच कोणत्याही कामाला सुरुवात करतात. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवही साजरे करतात. तेथील गणेशमूर्ती मोठया असतात.


उत्सवाच्या सुरुवातीच्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मातीची मूर्ती आणून सुंदर सजविलेल्या जागी तिची स्थापना करतात. 


दररोज पूजा आरती करून प्रसाद वाटतात. दररोज संध्याकाळी वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी होतात. सार्वजनिक गणेशोत्सव दहा दिवस चालतो.


अनंत चतुर्दशीला वाजतगाजत गणपतीच्या मूर्तीची मिरवणूक काढतात. संध्याकाळी नदी किंवा तलावामध्ये मूर्तीचे विसर्जन करतात. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2

 
गणेशोत्सव मराठी निबंध 10 ओळी | 10 lines on Ganesh Chaturthi Essay in Marathi

भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी होय. श्री गणेश हे आपले आराध्य दैवत मानले जाते. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती पूजन केले जाते.


गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी वाजत-गाजत बाप्पांचे आगमन होते. सजविलेल्या मखरामध्येगणपतीची स्थापना केली जाते. गणपतीला लालफुले, केवड्याची पात, दुर्वा, तसेच जाई - जुई - अबोलीइ.सोळा प्रकारची पत्री वहातात.


 गणपतीला मोदकांचा नैवेद्य तर फारच आवडतो. आम्ही मुले मोठमोठ्याने गणपतीच्या आरत्या म्हणतो. नातेवाईक व मित्रांकडे आम्ही गणपती पहायला जातो. 


काहींच्या घरी दीड दिवसांनी तर काहींच्या घरी पाच किंवा सात दिवसांनी गणपतीचे विसर्जन करतात.
सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मोठमोठ्या मूर्त्या स्थापन करतात. 


वेगवेगळे भव्य देखावे व सुंदर सजावट करतात. शेवटच्या दिवशी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या' असा जल्लोष करीत गणरायाचे विसर्जन केले जाते. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद