घोडा निबंध 10 ओळी | 10 Lines On Horse in Marathi

 घोडा निबंध 10 ओळी | 10 Lines On Horse in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण घोडा मराठी निबंध बघणार आहोत.  घोडा एक पाळीव प्राणी आहे. घोडा हा अतिशय उमदा प्राणी आहे. त्याचे शेपूट केसाळ असते. 


त्याचे डोळे टपोरे व पाणीदार असतात. त्याच्या पायांना खूर असतात. त्याला पोलादी नाल ठोकलेली असते. त्याच्या धावण्याचा आवाज टपटप असा येतो.


घोड्याला तबेल्यात बांधून ठेवतात. त्याचे मुख्य खाणे चणा असते. घोडा खूप जलद धावतो. हा अतिशय इमानी असतो. त्याचे त्याच्या मालकावर प्रेम असते. 


मालकासाठी प्रसंगी तो प्राण देखील देतो. सर्कस मधील घोड्यांची कामे याध्यागण्याजोगी असतात. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद