मी पाहिलेली सर्कस 10 ओळी | 10 lines on Mi Pahileli Circus Marathi Nibandh

 मी पाहिलेली सर्कस 10 ओळी | 10 lines on Mi Pahileli Circus Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेली सर्कस मराठी निबंध बघणार आहोत. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये बाबांनी आम्हाला 'रॉयल सर्कस' नावाची सर्कस पहायला नेले होते.


मोकळ्या मैदानावर सर्कसचा मोठा तंबू लावलेला होता. बँड वाजू लागल्यावर चकचकित पोषाख केलेली मुले-मुली रांगेत येऊन प्रेक्षकांना अभिवादन करु लागली. 


रिंगमास्तरने मग वाघ, सिंह वगैरे प्राण्यांचे पिंजरे आणले. एकेक वाघ, सिंह रिंगमास्तरने सांगितल्याप्रमाणे स्टुलावर पाय ठेवून सलाम करु लागला.


रंगीबेरंगी पोषाख केलेले ठेगू विदुषक मधेच कोलांट्या उड्या मारीत एकमेकांच्या खोड्या करत होते. त्यांचे हावभाव पाहून सर्वजण खो-खो हसत होते. 


इतक्यात अस्वले सायकल चालवीत आली. मुंडावळ्या बांधलेल्या दोन हत्तीनी एकमेकांच्यागळ्यातफुलांच्यामाळा घातल्या.

उंच झुल्यावर सर्कससुंदरी सहजपणे कोलांट्या मारत या झूल्यावरुन त्या झूल्यावर जात होत्या. सर्व प्रेक्षक श्वास रोखून हा खेळ पहात होते.


सर्कस पहाता पहाता २-३ तास कधी संपले ते आम्हाला कळलेच नाही. घरी परतताना अजूनही माझ्या कानात वाघ-सिंहाच्या डरकाळ्या घुमत होत्या.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद