संत ज्ञानेश्वर मराठी निबंध 10 ओळी | 10 lines on Sant Dnyaneshwar Nibandh Marathi

 संत ज्ञानेश्वर मराठी निबंध 10 ओळी | 10 lines on Sant Dnyaneshwar Nibandh Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संत ज्ञानेश्वर मराठी निबंध बघणार आहोत.   संताच्या मालिकेत ज्ञानेश्वरांचे नाव अग्रगण्य समजले जाते. इ. स.१२७५ मधे ज्ञानदेवांचा जन्म झाला. 


त्यांच्या वडिलांच्या वागणुकीमुळे लोक रागावले कारण त्यांनी घटकेत संन्यास घेतला आणि घटकेत गृहस्थाश्रम स्वीकारला. त्यामुळे लोकांनी त्यांना वाळीत टाकले. संन्याशाची मुले म्हणून लोक त्यांना हिणवू लागले.


एकदा ज्ञानदेव भिक्षेला निघाले. रोज पाच घरे-भिक्षा मागण्याचा त्यांचा नियम होता. एका माणसाने हाक मारून म्हटले, ही भिक्षा मुद्दाम तुझ्यासाठी आणली आहे घेऊन जा”. 


ज्ञानदेवांनी झोळी पुढे केली. त्याने त्यांच्या झोळीत वाटीभर माती टाकली. ज्ञानदेवांनी त्यांना वाकून नमस्कार केला आणि म्हटले, “आपणास पृथ्वी दानाचे पुण्य लाभो"


आशा या थोर संतानी “भावार्थ दिपीका” हा ग्रंथ रचला. त्यालाच सर्वजण “ज्ञानेश्वरी” म्हणतात. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद