संत एकनाथ मराठी निबंध 10 ओळी 10 Lines on | Sant Eknath Nibandh in Marathi

 संत एकनाथ मराठी निबंध 10 ओळी  10 Lines on | Sant Eknath Nibandh in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण संत एकनाथ मराठी निबंध बघणार आहोत. सर्व महाराष्ट्रभर ईश्वर भक्ती, एकागवृत्ती व भूतदयेचा मंगल प्रकाश पसरविणारा संत एकनाथ हा तेजस्वी हीराच. 


हा भक्तीचा प्रकाश त्यांनी सर्व जातीतल्या, सर्व धर्मातल्या व सर्व स्तरातल्या लोकांपर्यंत नेऊन पोहचविला. एकनाथांचे घराणे मुळ पैठणचे. लहानपणापासून त्यांचा ईश्वराकडे ओढा. 


ईश्वर प्राप्तीकरिता गुरूकृपेशिवाय मार्ग नाही असे त्यांना एका संत पुरूषाने सांगितले. कोणत्याही शिष्याने केली नसेल एवढी अभूतपूर्व सेवा एकनाथांनी गुरूची केली.


एकदा हिशोबात एक अधेली कमी पडली. रात्रभर त्यांना झोप आली नाही. पुन्हा पुन्हा हिशोब तपासले तेव्हा चूक आढळली. त्यांना चूक सापडली ती त्यांच्या एकाग्र वृत्तीमुळे . एकाग्रवृत्ती ही फार उपयोगी शक्ती आहे.


एकनाथांनी चरित्रातून निःस्वार्थ, निर्मळ करूणेचा प्रवाह सतत वाहत होता. भगवंताच्या करूणेचा नाथांवर सतत वर्षाव होत होता. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद