श्रीकृष्ण जन्माष्टमी निबंध मराठी माहिती 10 ओळी | 10 lines on shri krishna janmashtami essay marathi


श्रीकृष्ण जन्माष्टमी निबंध मराठी माहिती 10 ओळी | 10 lines on shri krishna janmashtami essay marathi


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी  मराठी निबंध बघणार आहोत. श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमी या दिवशी झाला. वसुदेव व देवकी यांचा हा मुलगा मथुरेत नंदाच्या घरीच वाढला. 


आपल्या देशामध्ये सर्व प्रांतामध्ये जन्माष्टमीचा उत्सव फार धामधुमीत साजरा केला जातो. मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माचे आख्यान असते व रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतात.


दुसरे दिवशी दहीहंडीचा सण असतो. गावामध्ये देवळात व शहरामध्येचौकाचौकातून मोठमोठ्या दहीहंड्या बांधल्या जातात. लांब लांबन 'गोविंदा पथके हंडी फोडण्यासाठी येतात. 


काही वेळा तर आठ-नऊ थर लावून मोठ्या कौशल्याने दहीहंडी फोडली जाते. काही मुलेगोल करुन उभीरहातात. त्यांच्याडोक्यावर आणखी काहीमाणसे, 


त्यांच्या डोक्यावर आणखी काहीजण असे एकावर एकथर लावतात. अनेकवेळा ही माणसेखाली पडतात परंतु पुन्हा उत्साहानेवर चढून हंडी फोडतात.


'गोविंदा रे गोपाळा' असा गजर करीत लोक नाचत गात मिरवणूक काढतात. या दिवशी सर्वांना दही-पोह्यांचा प्रसाद वाटतात. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद