फुलांचा राजा गुलाब मराठी निबंध 10 ओळी | 10 lines on Fulancha raja gulab Marathi Nibandh.

फुलांचा राजा गुलाब मराठी निबंध 10 ओळी | 10 lines on Fulancha raja gulab Marathi Nibandh.


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण फुलांचा राजा गुलाब मराठी निबंध बघणार आहोत.  भारतामध्ये गुलाबाच्या फुलाला फुलांचा राजाच मानले गेले आहे. 


काश्मीरमध्ये या गुलाब फुलांच्या मोठमोठ्या बागा आहेत. गुलाबाच्या फुलांच्या अनेक रंगांच्या जाती आहेत. लाल-पिवळागुलाबी अशी अनेक रंगांची गुलाबाची फुले असतात. हल्ली तर काळा, निळा, हिरवा अशा रंगांच्याही जातींचा शोध लागला आहे.


गुलाबाच्या झाडाची पानेबारीक असतातवझाडाला अतिशय काटे असतात. समारंभामध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सत्कार करण्यासाठी किंवा लग्नसमारंभासाठी गुलाबाच्या फुलांचे गुच्छ व हार बनविले जातात.


गुलाबी रंगाच्या कलमी गुलाबांपासून औषधी गुलकंद तयार करतात. तसेच गुलाबाच्या फुलांपासून अत्तरे, सेंट, सरबते इ. गोष्टी तयार करतात. ही अत्तरे, सेंटवसरबतेपरदेशामध्येही पाठवली जातात.


चाचा नेहरुंना गुलाबाची फुले फारच आवडत असत. त्यांच्या कोटावर नेहमी लाल गुलाबाचे फूल लावलेले असे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद