गौतम बुद्ध मराठी निबंध | Gautam Buddha Marathi Nibandh

 गौतम बुद्ध मराठी निबंध | Gautam Buddha Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  गौतम बुद्ध मराठी निबंध बघणार आहोत. पाखरांचा किलकिलाट त्यात सकाळचे आगमन झाले. सूर्य गुलाबी, तांबुस जसं हसरं बाळ रांगत रांगत वर यावं तसा चेहरा घेऊन डोंगराअडून वर आला तेवढ्यात वर्तमानपत्र हाती आले. अमेरिकेने अफगाणिस्तानकडून इराककडे मोर्चा वळविला. मानव शांततेच्या शोधात


असताना मागील शतकात दोन महायुद्धे आणि अनेक अंतर्गत युद्धे घडली. नवीन शतक सुखाचे जाईल अशी आशा असताना ११ सप्टेंबरची घटना आणि दहशतवाद्यांचा नाश करण्याच्या गोंडस नावाखाली अमेरिकेने सुरू केलेला संहार म्हणजे या सगळ्यावर कब्जा. 


दोन वर्षात हजारो प्राणे गेली. 'नेमेचि येतो पावसाळा' या प्रमाणे प्रत्येकवर्षी शांततेचे नोबेल पारितोषिक दिले जाते. मात्र मानवी रक्ताची चटक लागलेला नरभक्षक वाघांप्रमाणे दहशतवादी निरपराध जीवांना यमसदनी पाठवू लागले आहेत. 


अमेरिकेने अफगानिस्तानातील तालिबान सरकार नष्ट केले पण लादेन सापडला नाही. तो कसा सापडणार? आपलेच दात अन् आपलेच ओठ! हा प्रसंग अतिशय बोलका आहे. जगाची स्थिती उत्तरोत्तर कठीण होत आहे. जगाच्या मातीत अनेक शांततेचे उपासक जन्माला आले. 


या शांततेचा साक्षात भगवान म्हणजे गौतमबदुध! त्यांनी लावलेली अहिंसेची रोपं नंतर तरारली नाहीतच सगळं वाया गेलं बुद्धासारखा दुसरा कोणी लोकांच्या कल्याणासाठी जन्मला तर....त्यापेक्षा बुद्धच पुन्हा अवतरले तर.....तर हिंसेच्या माऱ्याने झालेल्या बेशुद्ध अहिंसेला येईल शुद्ध.


“जर अवतरले बुद्ध

तर समाज बनेल समृद्ध

हिंसा व अमानुष गोष्टी होतील निषिद्ध

जर अवतरले बुद्ध

तर थांबतील महायुद्ध

होतील शांत हे क्रुद्ध

जर अवतरले बुद्ध

तर शांततेसाठी होईल जग सिद्ध"


साऱ्या पृथ्वीचा स्वर्ग बनेल. माणूस स्वर्गात जाण्याऐवजी इथेच राहणे पसंत करेल. संत एकनाथांच्या शब्दांत सांगावयाचे झाले तर.....

“तैसे यांगियासी खालुते येणे ।

जे इहलोकी जन्म पावणे । जन निववी श्रवणकीर्तने

निजज्ञान उद्धरी ।। "


त्याप्रमाणे बुद्धच पृथ्वीवर अवतरतील आणि साऱ्या रंजलेल्या, गांजलेल्या, भुकेजलेल्या, तहानलेल्यांना पाणी पाजतील त्यांचा उद्धार करतील.


बुद्ध पृथ्वीवर अवतरले तर ते सर्वप्रथम सप्तचिरंजवीच्या रांगेल स्वतःचा आठवा क्रमांक लावतील. म्हणजेच ते देवांकडून अमरत्व घेऊन येतील. कारण कलीयुगातील वातावरण इतके


दूषित झाले आहे की, ते पुन्हा शुद्ध करण्यास काही दशके पुरणारच नाहीत. त्यासाठी जगाच्या आंतापर्यंत नवनवीन तयार होणाऱ्या पिंढ्यांवर शांतता व अहिंसा यांचे तत्त्वज्ञान बिंबवण्यासाठी त्यांना अमरत्वाचीच आवश्यकता आहे.



जगातील सर्व वाईट गोष्टी बघून दुःखी बनलेले बुद्ध दुःखाची कारणे शोधतील. बुद्धांना केवळ या सरपटणाऱ्या दुःखाचा 'मणका' माहीत होता असे म्हणतात. पण आधुनिक जगाची आधुनिक दुःखे त्यांची दुःखेही आधुनिकच असणार! मानवी दुःखाना मुळापासून उखडण्याचा प्रयत्न करतील ज्याप्रमाणे 'स्टॉरफिश' पाय मोडला असता तो पुन्हा तयार होतो. 


जसे वरून तोडलेला वृक्षाचे मूळ शाबूत असल्याने ते पुन्हा उगवते. पण बुद्ध सारी दुःखे नष्ट करणार नाहीत कारण जगात दुःख आहे म्हणून सुखाची किंमत आहे. दुःखच नसेल तर सुखाची किंमत काय कळणार? 'अतिपरिचयात अवज्ञा' या प्रमाणे सुखांना किंमतच राहणार नाही. सुख प्राप्तीसाठी लागणारे कष्ट कोणीच घेणार नाहीत.


'सुख पाहता जवापाडे

दुःख पर्वताएवढे'


असे संत तुकाराम म्हणतात. मोठाल्या दुःखामुळे तर सुखाची खरी किंमत कळते! बुद्धांचा मोर्चा वळेल तो हिंसेकडे या हिंसेचे चक्क तुकडे तुकडे करून जगाचे कल्याण साधणारी अहिंसा जगात प्रस्थापित करतील. 


बुद्ध म्हणजे शांततेसाठी आयुष्यभर युद्ध करणारे महामानव ते या जगात शांतता प्रस्थापित करतील आणि युद्ध विरोधी निदर्शने करणाऱ्यांमध्ये अग्रस्थान पटकावतील अथवा त्यांच्या दैवी सामर्थ्याने मानवरूप राक्षसांना नमवतील.


पुन्हा कोफी अन्नान, गांधी, मदर तेरेसाच्या शांतता विषयक कार्याची प्रशंसा करून ते कार्य जोमाने चालू करतील. या जगात पुन्हा शांततेची रोपे लावतील आणि त्यांचे अथांग पसरलेल्या वटवृक्षात रूपांतर करतील असा वटवृक्ष की ज्यावर आधुनिक शस्त्रास्त्रांचे तीव्र आघात केले तरी काहीच परिणाम होणार नाहीत.


'क्षमाशस्त्र जया नराचिया हाती

दुष्ट तयाप्रति काय करी?'



याप्रमाणे त्यांच्या कार्याला कोणीच धक्काही लावू शकणार नाही. त्यांच्यामुळे जगात शांतता, प्रामाणिकता, सत्य, या गोष्टींना पुन्हा मूल्य प्राप्त होईल. पण हे केव्हा शक्य आहे? बुद्ध अवतरले तरच..... मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद