माझा पहिला रेल्वे प्रवास मराठी निबंध | Majha Pahila Railway Pravas Marathi Nibandh

 माझा पहिला रेल्वे प्रवास मराठी निबंध | Majha Pahila Railway Pravas Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा पहिला रेल्वे प्रवास मराठी निबंध बघणार आहोत. रेल्वेचा प्रवास हा सर्वात मजेदार व आरामदायक प्रवास असतो. यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रांतातील समाजातील लोकांशी जवळून संबंध येतो व वेगवेगळी ठिकाणे पहाता येतात. यामुळे रेल्वेने प्रवास करणे मला अतिशय आवडते. माझा पहिला रेल्वे प्रवास तर मी कधीही विसरु शकणार नाही. 


वडिलांच्या मित्राच्या मुलाचे लग्न दिल्लीला असल्याने आम्ही मुंबईहून दिल्लीला गेलो होतो. मी तेव्हा सहावीत होते. आमचा प्रवास जवळ-जवळ वीस तासांचा होता. आम्ही राजधानी एक्स्प्रेसने तेथे गेलो. ही पूर्णपणे वातानुकुलित प्रवासी गाडी आहे व त्यात सर्व सुखसोयी आहेत.


माझ्या वडिलांनी मला सांगितले की सर्वप्रथम आपल्याला तिकीटे आरक्षित करावी लागतील. मी ही त्यांच्यासोबत स्टेशनवर गेले. तिकीट खिडकीसमोर मोठी रांग होती. पाच तासांनतर आम्हाला आमची तिकीटे मिळाली. आम्हाला आणखी दोन महिन्यांनी निघायचे होते. मला तर कधी एकदाचे ट्रेनमध्ये बसेन असे झाले होते. 


मी आमच्या प्रवासाच्या तारखेच्या आठवडाभर आधीच माझे सामान तयार ठेवले होते. अखेर तो दिवस उगवला. आम्ही गाडीच्या वेळेच्या एक तास आधी स्टेशनवर पोहोचलो. मला खूपच उत्सुकता होती. ट्रेन आल्याबरोबर मी आत चढलो. 


आम्ही आमच्या सीट शोधल्या व आमचे सर्व सामान बाकांखाली रचले. काही वेळातच आम्हाला वर्तमानपत्र व पेयं देण्यात आले. मी खिडकीजवळची जागा बळकावली. पंधरा मिनीटांनी गाडीने एक शिटी दिली व गाडी सुरु झाली. सुरुवातीला ती खूप हळू चालत होती पण काही वेळातच तिची गति वाढली. 


आम्ही मुंबई सोडले आणि त्यापुढे खरी मजा सुरु झाली मी बाहेरचे दृश्य पहाण्यात मग्न झाले. दूर पर्यंत पसरलेली शेत, मधेच एखादी नदी, त्यावरून जाणारा पुल, दूर-दूरपर्यंत पसरलेल्या पर्वतरांगा आणि आकाश पहाण्याची मजा काही वेगळीच होती. शेतकरी त्यांच्या शेतात कामे करीत होते. 


काही मुले त्यांच्या बैल किंवा गायींना चरायला घेऊन निघाले होते. आमच्याकडे पाहून हात हलवित होते. मध्येच एखादे छोटे गाव, शहरावरुन गाडी पुढे जाई. थोड्या वेळातच काळा कोट घातलेला एक माणूस आमच्या डब्यात आला त्याने सर्वांची तिकीटे तपासली.


प्रवासात आम्हाला बरेच पदार्थ, चहा देण्यात आले. त्यामुळे खाण्या-पिण्याची चंगळ होती. आमची गाडी सर्व लहानमोठी स्टेशनांवर थांबत नव्हती. आम्हाला बडोदा, अहमदाबाद, कोटा अशी मोठी स्टेशनं लागली. या मोठ्या स्टेशनांवर बरीच गर्दी होती. प्लॅटफॉर्मवर बरीच धावपळ चाललेली असे. 


सगळीकडे गोंगाट, कोलाहल होता. मात्र काही स्टेशन अतिशय शांत व नीटस होते. गाडीत बरेच फिरते विक्रेते आपल्या जवळच्या वस्तू विकत फिरत होते. आमच्या सोबतचे इतर प्रवासीही चांगले होते. एका बाजूला एक


वृद्ध तमिळ जोडपे होते. आम्हाला एकमेकांची भाषा समजत नसल्याने त्यांच्याशी फारसे बोलता आले नाही. दुसऱ्या बाजूला असलेला एक तरुण मात्र खूपच बोलका व हसतमुख होत. तो मुळचा दिल्लीचा पण मुंबईला शिकायला होता. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्लीला पोहोचलो. 


काका आम्हाला घ्यायला स्टेशनवर आले होते. तासाभरातच आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. लग्नात आम्ही सर्वांनीच खूप मजा केली. माझा हा पहिला रेल्वे प्रवास मी कधीही विसरणार नाही. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद