परीक्षा नसत्या तर... मराठी निबंध | Pariksha Nastya Tar Marathi Nibandh

 परीक्षा नसत्या तर... मराठी निबंध | Pariksha Nastya Tar Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  परीक्षा नसत्या तर...  मराठी निबंध बघणार आहोत. 'परिक्षा नसल्या तर'...ही कल्पनाच किती मजेशीर आहे नाही? हा परिक्षेचा राक्षस आम्हा मुलांच्या पाठी नसला तर आयुष्य किती सहज सोपे होऊन जाईल? खरे म्हणजे आम्हा मुलांना शाळेत जायला अतिशय आवडते. कारण शाळेतच जीवलग मित्र-मैत्रिणी मिळतात. 


त्यांच्याबरोबर खेळायला, गप्पा मारण्याची मजा इतरत्र कुठेच मिळत नाही. शाळेत शिकवले जाणारे वेगवेगळे विषय यामुळे ज्ञानात भर पडते. जगाची माहिती होते. पण परिक्षा म्हंटले की सर्वांच्याच कपाळावर आठी पडते. त्यामुळे आमचे विद्यार्थी जीवन अगदी कोमेजून जाते.


बैरे, या परिक्षांचे प्रकार तरी किती? कधी तिमाही, तर कधी सहामाही तर शेवटी वार्षिक परिक्षा, शिक्षकांनी अचानक घेतलेल्या परिक्षा, वेगवेगळया स्पर्धात्मक परिक्षा अबब! यादी संपता संपत नाही. या साऱ्या परिक्षा विद्यार्थ्यांचा आनंद नाहीसा होतो. घरातली मोठी माणसे येता जाता आठवण करुन देतात, 'वेळ का फुकट घालवतेस?"


परिक्षा जवळ आलीय, जरा अभ्यास करा'. दहावीचे वर्ष म्हणजे तर क्षणाक्षणाला परिक्षेची आठवण! असा राग येतो मग परिक्षांचा. शिवाय परिक्षा आल्या की किती बंधन पाळावी लागतात. टीव्ही लावायचा नाही, पुस्तकं वाचायची नाहीत, खेळण्याचा वेळ अगदी कमी होतो.


मैत्रिणींशी फोनवर गप्पा मारणे कमी करावे लागते, पिक्चर पहाणे बंद होते. सहली. हॉटेलचे खाणे सगळे बंद होते. अर्थात हे सगळे आमच्या भल्यासाठीच असले तरी सर्वांच्या मुळाशी कारण एकच, परिक्षा. म्हणूनच या परिक्षा नकोश्या वाटतात.


परिक्षा नको वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यानंतर लागणारे निकाल. हे निकाल म्हणजे बरेचदा खऱ्या अर्थाने निकाल असतात. अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून आई-बाबांची बोलणी खावी लागतात ते वेगळेच. नापास झाल्यास परत त्याच वर्गात बसावे लागणे तर फारच लाजीरवाणे.


अशा या परिक्षा नसत्या तर खूप खेळायला मिळाले असते, कोणतेही निर्बंध पाळावे लागणार नाहीत. पण मग परिक्षेनंतर मिळालेल्या सुट्यांचा आनंद कसा मिळेल? परिक्षेत चांगले गुण मिळाल्यावर मिळालेली बक्षिसे, शाबासकी यांचे काय? 


शाळेतील परिक्षा या एक प्रकार पुढच्या आयुष्यात द्याव्या लागणाऱ्या परिक्षांची तयारीच असते. यामुळेच आपल्याला नेहनत, परिश्रम करण्याची सवय लागते. तेव्हा परिक्षा नकोत असे म्हणणेही चुकीचेच, नाही का?मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद