सर. सी. व्ही. रामन. मराठी निबंध | Sir C V Raman Essay In Marathi

 सर. सी. व्ही. रामन. मराठी निबंध | Sir C V Raman Essay In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  सर. सी. व्ही. रामन. मराठी निबंध बघणार आहोत. सर रामन एक महान शास्त्रज्ञ होते. १९३० साली विज्ञान क्षेत्रात नोबल पारितोषिकाने सन्मानित झालेले ते पहिले भारतीय शास्त्रज्ञ आहेत. हा सन्मान त्यांना त्यांच्या 'रामन प्रभाव' या महत्त्वाच्या शोधासाठी दिला गेला होता. रामन यांनी कठोर परिश्रम आणि सतत प्रयोगातून असा निष्कर्ष काढला की, प्रकाश किरणे नव्या पदार्थातून गेली तर स्पेक्ट्रम मध्ये काही नवीन रेषा मिळतात. 


हाच रामन प्रभावाचा आधार होता. त्यांच्या या शोधाच्या अविष्कारामुळे पदार्थांची आण्विक संरचना समजण्यास मदत झाली. याच्या मदतीने आता पर्यंत हजारो पदार्थांची संरचना समजली आहे. लेसरच्या शोधमुळे रामन प्रभावाचे महत्त्व आणखी वाढले आहे. 


प्रकाशकिरण पारदर्शक माध्यमातून पाठविल्यावर प्रकाशाच्या गुणधर्मांमध्ये होणारे बदल हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. सर रामन यांनी चुंबक आणि संगीताच्या क्षेत्रातही संशोधन केले. त्यांचे संपूर्ण नाव चंद्रखेर वेंकट रामन होते. त्यांचा जन्म त्रिचनापल्ली येथे ७ नोव्हेंबर १८८८ ला झाला. 


लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाची आवड होती. त्यांचे वडील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक होते. आपल्या पित्याकडून रामन यांना प्रेरणा व मदत मिळाली. रामन यांनी १९०४ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेज चेन्नई येथून बी. ए. ची डिग्री मिळविली तर १९०७ मध्ये भौतिक शास्त्रात एम. ए. ची डिग्री मिळविली. 


बी. ए. झाल्यावर उच्च शिक्षणाठी ते परदेशी जाऊ इच्छित होते. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे जावू शकले नाहीत. विद्यार्थी जीवनातच रामन यांनी भौतिक विज्ञानात नवनवीन संशोधन केले. प्रकाश विवरणवरील त्यांचा पहिला शोधप्रबंध १९०६ मध्ये प्रकाशित झाला.


१९०७ मध्ये डेप्युटी अकाऊंटटच्या पदावर कलकत्ता येथे नियुक्त झाल्यावरही ते शास्त्रीय अध्ययन व संशोधन करीत राहिले. ते तेथील विज्ञान प्रयोगशाळेत रिकाम्या वेळात काम करीत. तिथे ते भौतिक शास्त्रज्ञ आशुतोष मुखर्जीच्या संपर्कात आले. 


१९१७ मध्ये रामन यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला व कलकत्ता विद्यापीठात भौतिक शास्त्राचे प्राध्यापक झाले. याचे मुख्य कारण त्यांना असलेली पदार्थ विज्ञानाची आवड. १९२१ मध्ये ते यूरोपच्या दौऱ्यावर गेले. तिथून परत आल्यावर पुन्हा प्रयोग करण्यात मग्न झाले व कित्येक महत्त्वाचे निष्कर्ष त्यातून काढले. 


१९२७ मधे रामन यांना 'रॉयल सोसायटी ऑफ लंडनचे' सदस्य करण्यात आले. हा एक फार मोठा सन्मान होता. त्यानी १९४३ मध्ये बेंगलोरच्या जवळ "रामन रिसर्च इन्स्टीटयूट" ची स्थापना केली. याच संस्थेत ते मरेपर्यंत प्रयोग करीत राहिले. १९७० मध्ये या महान भारतीय शास्त्रज्ञाचे निधन झाले आम्हास रामन यांच्या कार्याचा अभिमान आहे.


 व्यक्ती म्हणूनही ते मोठे होते. तरूण, विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना १९५८ मध्ये भारतरत्न प्रदान करण्यात आले होते. रामन यांचे आयुष्य म्हणजे ज्ञानप्राप्तिसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या व भारतात शास्त्र व संशोधन क्षेत्रात अथक प्रयत्न करणाऱ्या योग्याचे आयुष्य होय.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद