वाचाल तर वाचाल निबंध मराठी | Vachal Tar Vachal Marathi Nibandh

  वाचाल तर वाचाल निबंध मराठी | Vachal Tar Vachal Marathi Nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वाचाल तर वाचाल मराठी निबंध बघणार आहोत. निरक्षरता हा आपल्या देशाला लागलेला एक मोठा कलंक आहे. आपण स्वतंत्र झालो तेव्हा देशातील साक्षरतेचे प्रमाण खूपच कमी होते. हळूहळू हे प्रमाण वाढत असले तरीही ते पुरेसे नाही. निरक्षरता कमी करण्यासाठी आपण वेळोवेळी अनेक प्रकल्प/योजना आंखल्या आहेत. 


त्याचे दृश्य परिणाम मात्र अजून जाणवत नाही. आज फक्त ६५% भारतीयांनाच अक्षर ओळख आहे. आपल्या देशातील बहुसंख्य जनता ग्रामीण भागात वसलेली आहे. त्यांच्यात निरक्षरतेचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांची अनेकदा फसवणूक होते.


विद्या हे सवश्रेष्ठ धन आहे. विद्येमुळे विनय, विनयामुळे योग्यता आणि योग्यतेमुळे यश मिळते. निरक्षर माणूस अज्ञानी रहातो व जीवनातील अनेक सुखांना मुकतो. तो रोजचे वर्तमानपत्र, चांगली पुस्तके, एवढेच काय पण पत्रही वाचू शकत नाही. त्यांची इतरांकडून फसवणूक होते. 


विकास होते नाही. सरकारने त्यांना उपलब्ध करुन दिलेल्या सोयी, योजना, सुधारणा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. अशिक्षितपणा मुळे अंधश्रद्धा वाढतात. याउलट शिक्षणमुळे संपूर्ण जगाशी संपर्क साधता येतो. ज्ञान मिळवून मनुष्य प्रगती करतो. त्याच्या व्यक्तिमत्वास झळाळी येते.


शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. तो चांगल्या व वाईटाची निवड करु शकतो. सुसंस्कृत माणसाजवळ योग्य विचारक्षमता व निर्णयक्षमता असतो. ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, त्याचप्रमाणे शिक्षणही अत्यावश्यक आहे. 


आपल्या देशात लोकशाही आहे. देशाच्या सत्तेची जबाबदारी घेणारा नेता जनता मतदान करुन निवडते. पण मतदार जर शिक्षित असेल तर नेतृत्वही तितकेच जबाबदार असते. म्हणूनच सरकार शिक्षणासाठी जे उपक्रम राबवते आहे त्यात आपणही हातभार लावला पाहिजे. 


प्रत्येक मूल शाळेत जाईल याची काळजी घेतली पाहिजे. स्त्रियांच्या शिक्षणालाही तितकेच महत्त्व दिले गेले पाहिजे. कारण महात्मा फुल्यांच्या मते 'पुरुष शिकला तर तो एकटाच शहाणा तोतो, पण स्त्री शिकली तर पूर्ण कुटुंब शहाणे होते.'


तेव्हा आपण सर्वजण मिळून निरक्षरतेच्या या शापाला दूर करु या. भारताला जर प्रगतीशील करायचे असेल तर आपल्याला निरक्षरतेवर मात करावी लागते. प्रत्येकाने मनात ठरविले पाहिजे की, “एका तरी निरक्षराला मी साक्षर करीन. " मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद