वक्तृत्व कला निबंध मराठी | Vaktrutva Kala Nibandh Marathi

 वक्तृत्व कला निबंध मराठी | Vaktrutva Kala Nibandh Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  वक्तृत्व कला मराठी निबंध बघणार आहोत.वक्तृत्व औपचारिक शिक्षणाचे एक महत्त्वाचे अंग आहे. शाळा व महाविद्यालयांत वेळोवेळी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाते. वक्तृत्व किंवा वाद-विवाद म्हणजे महत्त्वाच्या विषयांवर केलेली चर्चा किंवा वाद; असे विषय ज्यावर लोकांची वेगवेगळी मते असू शकतात. 


वाद-विवाद किंवा चर्चा हा आपली मते मांडण्याचा एक लोकशाही मार्ग आहे. संसद किंवा कायदेमंडळातही कोणतीही योजना लोकांसमोर मांडण्यापूर्वी किंवा त्यावर निर्णय घेण्यापूर्वी त्यावर सांगोपांग चर्चा केली जाते. कोणताही निर्णय किंवा कायदा लोकांना पूर्णपणे पटवून दिल्याशिवाय लादता येत नाही. 


लोकांचे मन वळविण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे मीडिया किंवा व्यासपीठावरून चर्चा घडवून आणणे होय. थोडक्यात, वाद-विवाद, चर्चा किंवा सार्वजनिक भाषणे लोकशाहीत अतिशय महत्त्वाची आहेत.


एक चांगला वक्ता सहजपणे जनतेचा आधार बनू शकतो व लोकप्रिय होऊ शकतो. वक्तृत्व व जाहीर भाषणे अधिक परिणामकारक व्हावीत यासाठी मात्र मेहनत व तयारी करणे आवश्यक आहे. ही कला विकसित करता यावी यासाठी आपल्याला अनेक संधी मिळू शकतात. उदाहरणार्थ, आपल्या मित्र-मैत्रीणींच्या गटात एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणणे, एखाद्या समारंभात सूत्रसंचालन करणे, गटवार चर्चा करणे 


किंवा सार्वजनिक कार्यक्रमांत आपल मतं मांडणे इत्यादी. आपले आई-वडील, मित्र किंवा अन्य लोकांसमवेत होणारी आपली चर्चा किंवा संवाद ही आपली वक्तृत्व कला सुधरविण्याची चांगली संधी म्हणता येईल. यासाठी मनाची तयारी, सराव व सातत्य असणे आवश्यक आहे.


एक चांगला वक्ता बनण्यासाठी ज्या विषयावर बोलाचे असेल त्या विषयाची सखोल माहिती करुन घेणे व त्यानुसार मुद्दे ठरविणे आवश्यक आहे. वाद-विवादात भाग घेण्यापूर्वी त्या विषयावर उपलब्ध असलेले सर्व लेख वाचावेत. यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो व हे वक्तृत्व कलेसाठी सर्वात आवश्यक आहे. 


आत्मविश्वास असेल तरच तो वक्ता लोकांचे मन जिंकून घेऊ शकतो व आपली मते ठामपणे मांडू शकतो. आपण आपली मते मांडतांना ती कशी मांडतो हे देखिल तितकेच महत्त्वाचे आहे. वाद-विवाद करतांना किंवा भाषणं देतांना ते प्रभावी, नैसर्गिक व उत्स्फूर्त वाटले पाहिजे.


जे विद्यार्थी-विद्यार्थिनी वक्तृत्व कलेत यशस्वी होतात ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतात. त्यांच्यात चांगला नेता, वक्ता व संसदपटू बनण्याची क्षमता असते. असे नेता किंवा संवादपटू आजच्या काळात अतिशय आवश्यक आहेत. सर्व प्रसिद्ध नेता किंवा वक्ते ओघवत्या वक्तृत्वकलेमुळेच यशस्वी ठरले. 


तसेच वक्तृत्व कला असणारे युवक-युवती यशस्वी व्यवस्थापक, वकील किंवा विक्रेता बनू शकतात. ते आपले म्हणणे योग्य प्रकारे


लोकांना पटवून देऊ शकतात. अशा प्रकारे वक्तृत्व शैली नेहमीच यश, प्रसिद्धि, लोकप्रियता व मान्यता मिळविण्याचे सर्वोत्तम साधन आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद