शारदोत्सव मराठी निबंध | shardoutsav essay in marathi

 शारदोत्सव  मराठी निबंध


शारदा ही विद्येची देवता आहे. शारदेला नमन करूनच विद्या शिकण्यास सुरूवात करतात. शारदादेवी शुभ्र कमळात बसलेली असून तिने शुभ वस्त्र परिधान केले आहे.

अश्विन शुध्द प्रतिपदेला शारदेची स्थापना करतात. हा उत्सव साधारण पाच दिवस चालतो. नृत्य, नाटके, संगीत असे अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम होतात ह्यात स्त्रिया मोठ्या उत्साहाने भाग घेतात. स्त्रियांच्या अनेक प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतात त्यांना बक्षीसेही दिली जातात.

शारदेची रोज पूजा व आरती करतात. अश्विन शुध्द पोर्णिमेला देवीचे विसर्जन करतात. या उत्सवामुळे स्त्रिया एकत्र येतात. प्रेमभाव वाढतो. कलेला वाव मिळतो.