आत्मकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आत्मकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बहिष्कृत व्यक्तीची आत्मकथा मराठी निबंध किंवा बहिष्कार? छे! कसोटी मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक


बहिष्कृत व्यक्तीची आत्मकथा मराठी निबंध किंवा बहिष्कार? छे! कसोटी मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक" : आजचा दिवस आपल्या जीवनात कधी उजाडेल असं मला वाटलंच नव्हतं! आज या गावाचा सरपंच म्हणून माझी एकमताने निवड झाली. केवढा मोठा हा विश्वास गावकऱ्यांनी माझ्यावर टाकला आहे! आज मी साठीच्या उंबरठ्यावर आहे. चाळीस वर्षांपूर्वीचा गाव आजही माझ्या नजरेसमोर स्पष्ट दिसत आहे. पण गावाने त्यावेळी मला दिलेली कटू वागणूक मात्र मी आता पूर्णपणे विसरून गेलो आहे.


"त्यासाठी मी माझ्या गावकऱ्यांना दोष देणार नाही. तो काळच तसा विचित्र होता. थांबा! मी तुम्हांला माझी कर्मकहाणीच सांगतो. मी या गावातील एक श्रीमंत जमीनदार घराण्यात जन्मलो. समाजातील श्रेष्ठ वर्ग म्हणून स्वतःला गौरवून घेणाऱ्या जातीत जन्मल्यामुळे मला उच्च शिक्षण मिळाले. शहरात शिकत असताना माझी मैत्री झाली, ती समाजाने अस्पृश्य मानलेल्या वर्गातील एका दोस्ताशी. त्यामुळे त्या वर्गातील अभागी लोकांच्या जवळ मी जाऊ शकलो, त्यांची दुःखे जाणू शकलो. आणि शिक्षण पूर्ण करून परत आलो ते निश्चित ध्येय ठरवूनच.


bahiskar essay in marathi
bahiskar essay in marathi

"मी गावातील अस्पृश्य वस्तीत काम करू लागलो. तेथे जाऊ-येऊ लागलो. त्यांच्याबरोबर जेवु लागलो. हे माझ्या घरातील, माझ्या जातीतील लोकांना कसे रुचणार? त्यांनी मला साम, . दाम, दंड सर्व मार्गांनी वळविण्याचा यत्न केला. पण मी एकच जात मानत होतो, ती म्हणजे 'मानव जात.' शेवटी माझ्या घराची दारे मला बंद झाली. माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या मागासवर्गातील एक मुलगीच मी माझी सहधर्मचारिणी म्हणून निवडली. त्यामुळे गावानेही मला बहिष्कृत केले.



"त्या काळातील माझे जीवन ही माझी कसोटीच होती. आगीत उजळून निघणाऱ्या सोन्याचे अग्निदिव्य मी अनुभवीत होतो. घर ना दार, खाली जमीन वर आकाश. खिशात फारसे पैसे नसत. जवळ एकच गोष्ट होती 'दुर्दम्य आशावाद' आणि सतत साथ देणारी पत्नी व दोन-चार सच्चे दोस्त. न कंटाळता सर्व छळ सहन करीत मी माझे कार्य करीत राहिलो. वर्षा हीन जीवन जगणाऱ्या या माणसांच्यातील माणूस जागा करण्याचा यत्न केला. हळूहळू यश येत होते. गावकुसाबाहेरच्या त्या माणसांनीही जेव्हा काही भरीव कामगिरी केली, तेव्हा गावाचे लक्षही गावकुसाबाहेरील त्या लोकांकडे जाऊ लागले. निवडणूक न होता आज जेव्हा माझी सरपंच म्हणून निवड झाली, तेव्हा मनात आले, याच गावाने मला बहिष्कृत केले होते ना! नाही, गाव माझी कसोटी घेत होता, हेच खरे!"

वरील बहिष्कृत व्यक्तीची आत्मकथा मराठी निबंध किंवा बहिष्कार? छे! कसोटी मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

बहिष्कृत व्यक्तीची आत्मकथा मराठी निबंध किंवा बहिष्कार? छे! कसोटी मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक


जुन्या वटवृक्षाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक


जुन्या वटवृक्षाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक: आमचे खेडेगाव जेव्हा कात टाकू लागले, म्हणजे ते जेव्हा शहर बनू लागले तेव्हाची ही गोष्ट. आमच्या या खेडेगावाच्या आसपास कारखाने निघाले, गावात शाळा-कॉलेज निघाली आणि माणसांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे मोठ्या रस्त्यांची आवश्यकता निर्माण झाली आणि मग गावातील हिरव्या संपत्तीची तोड सुरू झाली. नवनिर्माणाचा दावा करणारे ते लोक एका वटवृक्षाजवळ आले आणि काय नवल! त्या वृक्षातून गर्जना झाली-“दूर व्हा, कृतघ्न ग्रामस्थांनो, निर्दय उपन्यांनो!' क्षणात वृक्षतोडीचे ते काम थबकले. आश्चर्याने सर्वांनी कान टवकारले. पुन्हा तो गंभीर आवाज येऊ लागला

“लोकहो, मी या गावचा पुराणपुरुष आहे. हे गाव वसले आहे माझ्या दृष्टीसमोर. मी येथे केव्हा आलो, कसा आलो ते येथील गावकऱ्यांना देखील माहीत नाही. हे गाव वसण्यापूर्वी योगायोगाने एक संत येथे आला होता, तेव्हा येथे ओसाड माळरान होते. पण ही निर्जन जागा त्याला आपल्या तपश्चर्येसाठी योग्य वाटली. तपाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी माझे बाळरूप येथे आणले आणि या भूमीत मला येथे स्थानापन्न केले.


 तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ शेकडो पावसाळे मी पाहिले. परमेश्वराच्या या जलदानाशी मी कृतज्ञ राहिलो. भूमातेकडून मिळणारे पोषण आणि वरुणदेवतेचा आशीर्वाद यामुळे मी अंगोपांगातून बहरत राहिलो. आता तर माझ्या या लोंबणाऱ्या जटा माझ्या वृद्धत्वाच्या पताका फडकवीत आहेत. मी पुराणपुरुष असलो तरी कमकूवत नाही. माझे सामर्थ्य तसूभरही कमी झालेले नाही.

zadache manogat essay in marathi
zadache manogat essay in marathi


“लोकहो, आपलेच कौतुक आपल्या तोंडून सांगणे योग्य नाही हे मला माहीत आहे; पण माझ्या उच्चाटनासाठी येथे गोळा झालेल्या तुम्हा अविचारी लोकांना मला जागे केलेच पाहिजे. मित्रांनो, मी केवळ एक जुना वृक्ष नाही, तर मी या गावाचा संरक्षक आहे. हितकर्ता आहे. या गावाचा जन्म, या गावाचा विकास, या गावाचे आजचे स्वरूप सारे माझ्या साक्षीने झाले आहे. सुरुवातीला दोन-चार गरीब कुटुंबांनी येथे वास्तव्य केले. 


पण गावात त्यांनी प्रवेश केला तो माझे पूजन करून व आपल्या कुटुंबातील पुराणपुरुष असेच ते मला मानीत. कोणतेही नवीन कार्य करण्यापूर्वी ते माझा आशीर्वाद घेत आणि मग ही प्रथा पिढ्यान्पिढ्या चालू राहिली. कोणतीही नवीन गोष्ट करताना गावकरी प्रथम माझ्याजवळ येत व माझा कौल घेत.

"मी आयुष्यभर गावासाठी खपलो. सर्व गावकऱ्यांना आणि गावात येणाऱ्या पाहण्यांना सावली दिली. केवळ माणसेच नाही, हजारो पक्षी नित्यनियमाने माझ्या अंगाखांदयावर आश्रय घेतात. दूरवरच्या वार्ता मला ऐकवितात. गावातील सारी मुले माझ्यावर सुरपारंब्या खेळत मोठी झाली. दरवर्षी कित्येक सुवासिनी वटपौर्णिमेला माझी पूजा करून अखंड सौभाग्याची मागणी करतात.



“लोकहो, याहून एक मोठे काम मी या गावासाठी करीत असतो. माझ्या उंच उंच गेलेल्या आणि दूरवर पसरलेल्या फांदयांनी मी वरुणराजाला आवाहन करतो. त्यामुळे या गावाला दुष्काळाचे संकट भेडसावत नाही. लोकहो, मला तुम्हांला हीच जाणीव करून दयायची आहे की तुम्ही गावाला नवे रूप देताना असलेल्या जुन्या वृक्षांची तोड करून एक प्रकारे अवर्षणालाच आमंत्रण देत आहात. त्यापेक्षा सुंदर गावाच्या निर्मितीसाठी अधिकाधिक झाडे लावा.” इतके बोलून तो धीरगंभीर आवाज बंद झाला आणि झाडाभोवती जमलेले लोक दूर झाले ते अधिक झाडे लावण्याच्या निश्चयानेच!"

टीप : वरील जुन्या वटवृक्षाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • vruksha che manogat essay in marathi language
  • zadache manogat essay in marathi
  • vruksha che manogat marathi nibandh
  • eka zadachi atmakatha essay in marathi
  • trees atmakatha in marathi
  • vruksha che atmavrutta nibandh in marathi
  • mi vruksha boltoy marathi nibandh
  • mi jhad boltoy essay in marathi
  • mi zad boltoy marathi nibandh
  • वृक्षाची आत्मकथा निबंध
  • वटवृक्षाची आत्मकहाणी निबंध लेखन
  • वट वृक्षाची आत्मकथा मराठी
  • झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी
  • मी वृक्ष बोलतोय आत्मकथन



जुन्या वटवृक्षाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक

वृक्षारोपणात लावलेल्या रोपट्याचे आत्मवृत्त मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक

vruksharopanat lavlelya ropatyache atmavrutta essay in marathi



वृक्षारोपणात लावलेल्या रोपट्याचे आत्मवृत्त मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक: “शुक् शुक्, शुक् शुक्. अरे मुलांनो, जरा इकडे या. अरे तुम्ही कोणत्या कामासाठी निघाला आहात ते मला माहीत आहे. यंदाच्या वनमहोत्सवात झाडे लावण्यासाठी तुम्ही निघाला आहात, हे तुमच्या हातांतील त्या कोवळ्या रोपांवरून आणि तुमच्या उत्साहावरून मी जाणते. मला पण येथे तुमच्यासारख्या मुलांनीच चार वर्षांपूर्वी लावले होते.


“आजही तो दिवस मला चांगला आठवतो. वनसप्ताह चालू होता. तेव्हा विदयमान काळात वृक्ष लावणे किती आवश्यक आहे हे तुमच्या गुरुजींनी तुम्हांला पटवून दिले होते. मग तुमच्या कोवळ्या हातांनी माझे येथे रोपण झाले होते. त्यावेळी मी पण अतिशय नाजूक होते. एका छोटया 'नर्सरीत' मोठ्या काळजीपूर्वक माझा जन्म झाला होता व संगोपनही केले गेले होते. तुम्ही जेव्हा मला व माझ्या भाईबंदांना या मोकळ्या माळावर स्थानापन्न केले होते त्याक्षणी मला विशेष आनंद झाला होता. वाऱ्यावर हलून मी माझा आनंद व्यक्त करीत होते.


“केवढ्या आशा फूलल्या होत्या, तेव्हा माझ्या मनात! आज नैसर्गिक मानवी जीवनाचे संतुलन बिघडले आहे ते आपण काही अंशाने तरी दुरुस्त करू. या ओसाड माळरानावर काही वर्षांत वृक्षराजी फुलेल. त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होईल. पावसाच्या धारांना आम्ही आमच्या उंच बाहूंनी बोलावून घेऊ अशी आशाही तेव्हा माझ्या मनात फुलली होती. पण त्यावेळी मी खूप छोटे होते. मला खूप मोठे व्हायचे होते. पण अरेरे“माझ्या या सर्व आकांक्षांवर निराशेचे पाणी पडले. कारण तुम्ही आम्हांला या माळावर लावून गेलात आणि पुन्हा फिरकलातही नाहीत. पगारी माळ्याने काही दिवस काळजी घेतली, पण नंतर तोही इकडे येईनासा झाला.



vruksharopanat lavlelya ropatyache atmavrutta essay in marathi
vruksharopanat lavlelya ropatyache atmavrutta essay in marathi


“पावसाचा पत्ता नव्हता, जमिनीच्या पोटातले पाणी पुरेसे नव्हते. मोकाट सुटलेली गुरे, तुमच्यापैकी काही नाठाळ मुले आमच्या जिवावर उठलेली होती. माझे कितीतरी दोस्त या संकटात नामशेष झाले, कित्येकांची वाढ खुंटली. मनातील जगण्याच्या चिवट ओढीमुळेच मी जिवंत राहिलो आहे. जशी वाढ व्हावी तशी झाली नाही, म्हणूनच मुलांनो, मी तुम्हांला आता हटकले. 


तुम्ही झाडे लावता तशी ती दत्तक घ्या, वाढवा. मित्रांनो, मला जगायचे आहे. मला मोठे व्हायचे आहे. मोठ्या वृक्षाच्या रूपात मी स्वतःला पाहू इच्छिते. इतरांना मी फुले, फळे व सावली देऊ इच्छिते. मानवाच्या कल्याणातच आमच्या जीवनाचे सार्थक आहे."

आवाज बंद झाला. पण आम्हांला आमच्या कामातील त्रुटी जाणवली व आपण लावलेल्या रोपटयांची आपण काळजी घ्यायची असा आम्ही निश्चय केला. 'झाडे लावा व ती जगवा' असाच संदेश त्या रोपाने आम्हांला दिला होता.


वरील निबंध वृक्षारोपणात लावलेल्या रोपट्याचे आत्मवृत्त मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

वृक्षारोपणात लावलेल्या रोपट्याचे आत्मवृत्त मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक

एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक

eka hutatma che manogat essay in marathi


एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक : या लेखामध्ये ऐकून 3 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. देशभक्ताचे आत्मवृत्त “माझ्या देशबांधवांनो! आज तुम्ही केवळ औपचारिकरीत्या 'हुतात्मा दिन' साजरा केलात, हे माझ्या पूर्णपणे लक्षात आले आहे. 


अकरा वाजता भोंगा वाजला आणि मिनिटभर तुम्ही आमचे स्मरण केलेत. काही जणांनी तेही केले नाही. कारण त्यांना हे भोंगे कशासाठी वाजले हेच मुळी उमगले नाही. माझ्या देशबांधवांनो,.


तुम्ही एवढे निष्ठुर का झालात? अरे, हया देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले, आपल्या आत्म्यांची आहुती दिली त्यांची आठवणही तुम्ही विसरून गेला आहात, इतके कृतघ्न तुम्ही का झालात?


“सध्याच्या युगाला नाव दयायचे असेल तर त्याला स्वार्थी युग' म्हणावे लागेल, असे मला वाटते. आजचा माणूस विचार करतो तो फक्त स्वतःचा, फक्त 'मी'चा. आमच्या युगात हा 'मी' अस्तित्वातही नव्हता. सारेजण भारावले होते ते एकाच विचाराने आणि तो विचार म्हणजे 'देशाचे स्वराज्य' मिळविणे, गुलामगिरीचे पाश तोडणे. 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार'अशी सर्वांची मनःस्थिती होती.


 स्वातंत्र्यसंघर्षाचा मार्ग हा अतिशय अवघड होता याची आम्हां सर्व देशभक्तांना कल्पना होती. हे 'सतीचे वाण' कोणी आमच्यावर लादले नव्हते, तर ते आम्ही स्वतःहूनच स्वीकारले होते. त्यावेळी पुढे वाढून ठेवलेल्या सर्व दुःखांची, संकटांची आम्हाला पूर्ण कल्पना होती. तरी पण आम्ही या मार्गाने निघालो. कारण- 'आम्हा बांधू न शकले, कीर्तीचे वा प्रीतीचे धागे.


eka hutatma che manogat essay in marathi
eka hutatma che manogat essay in marathi


“देशभक्तीचे हे व्रत आम्हाला दिले होते लोकमान्यांनी. या व्रताचा मार्ग दाखविला होता महात्माजींनी. अहिंसेचे व्रत स्वीकारून आम्ही हा वसा उचलला. परक्या क्रूर सरकारने गोळ्यांच्या फैरी झाडल्या तरी आम्ही आमच्या छातीचा कोट त्यासाठी उघडा केला. 'चले जाव'चा आदेश परक्या सरकारला फार झोंबला, त्यांनी जुलूम-जबरदस्तीचा कळस गाठला; साऱ्या नेत्यांना अटक केली. 


सरकारला वाटले की नेतेमंडळी तुरुंगात पडली की चळवळ आपोआप शमेल. पण परिणाम उलटा झाला. सारा देश पेटून उठला. लहानमोठे, स्त्रीपुरुष सर्वच स्वातंत्र्यलढयात हिरीरीने उतरले. स्वतःला सुचेल तो मार्ग प्रत्येकाने अनुसरला. त्यामुळे अहिंसक मार्गाने चाललेली चळवळ कुठे कुठे हिंसकही बनली. सरकार तर अगदी पिसाळले होते. पण प्राणांची बाजी लावणाऱ्या देशभक्तांपुढे सरकारचे काही चालले नाही.


“भारतीयांनो, काय सांगू तुम्हांला! त्यापुढची सात वर्षे नुसती मंतरलेली होती. देशभक्तीची भावना देशात सर्वत्र पसरली होती. श्रीमंत-गरीब, श्रेष्ठ-कनिष्ठ, धर्म, पंथ, जाती, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेदभाव उरला नव्हता.



सर्वजण एकच गोष्ट जाणत होते की, आम्ही भारतीय आहोत आणि आमचा देश स्वतंत्र करणे हेच आमचे पहिले कर्तव्य आहे. त्यासाठी हजारोंनी 'सश्रम कारावास' स्वीकारला. कठोर शिक्षा साहिल्या. पण हूं की चूं केले नाही. म्हणून  तर 'स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी सर्वांना आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद झाला. 


सर्वजण स्वराज्याचे सुराज्य होण्याचे स्वप्न उरी बाळगून होते. पण.....आता चाळीस वर्षांनंतर ते स्वप्न भंग पावलेले दिसत आहे. सत्तास्पर्धेपुढे आज देशनिष्ठा, प्रामाणिकपणा उरला नाही. स्वार्थासाठी माणूस वाटेल ते पाप करीत आहे. 


भ्रष्टाचाराचा भस्मासूर मातला आहे हे पाहून आम्हा देशभक्तांचे, हुतात्म्यांचे अंतःकरण फाटत आहे. म्हणून आम्ही तुम्हांला आवाहन करीत आहोत. उठा, जागे व्हा आणि आपल्या स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यास कटिबदध व्हा!" वरील निबंध एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



 निबंध 2


एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध | Eka Hutatma Che Manogat Essay In Marathi


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. तुम्ही मला हुतात्म्याची आई म्हणालात, बरं वाटलं. आधी आई म्हटल्यावरच आईचं मन उचंबळून येतं. त्यात हुतात्म्याची आई, कुणी मला 'वीरमाता' म्हणतात. 


पण मला 'वीरमाता' नका म्हणू 'धीरमाता' म्हणा. कारण मी काही वीर्य - शौर्य नाही गाजवलं. पण धैर्य दाखवलं. माझ्या मुलाला मी मोठ्या धीराने सैन्यात पाठवलं. माहिती आहे ना, सैनिकाचं जीवन किती खडतर असतं ! लष्करी दुनिया निराळीच असते. तिथे मरण हा नियम असतो आणि जिवंत राहणं हा अपवाद असतो. 



हे ठाऊक असूनही मी माझ्या मुलाला सैन्यात पाठवलं. 'हुतात्म्याची आई' हे शब्द कानी पडताच, आनंद, अभिमान, कर्तव्यपूर्ती, देशाभिमान, त्यांग अशा भावनांचा सागरच मनात उसळून येतो आणि कसं धन्य - धन्य वाटतं. सुंगंधी पाण्याने सचैल स्नान झाल्यासारखं वाटतं. 



जणू स्वर्गातल्या कल्पवृक्षांच्या फुलांची अंगावर बरसात झाल्यासारखं वाटतं. पण तुम्ही जाणू शकता का ? पुष्कळ वेळा फोमच्या गादीवर लोळत असताना मधेच सुईचे अग्र टोचावे तसं वाटतं. एक खंत टोचत असते. 


ज्या माझ्या लाडक्याला मांडीचा पाळणा करून जोजावताना मांडीचं हाड त्याला टोचू नये याची काळजी वाहिली, त्याला न्हाऊ, मांखू घालताना हाताचं नख लागता कामा नये याची खबरदारी घेतली, त्याच्या चिमण्या तोंडात चिमणे घास अगदी नाजूकपणे भरवले, डोळ्यांची निरांजने करून मायेची पाखर घातली; 


तो माझा बाळ अंत्यसमयी रक्ताळलेल्या शरीराने आणि घायाळलेल्या मनाने, कुठेतरी दगडा - धोंड्यांच्या राशीवर पडला असेल, रणरणत्या उन्हात कुठल्या तरी मरुभूमीत पोळला असेल, नाहीतर कुठेतरी बर्फात गोठून गेला असेल. 


मी त्याचं अंत्यदर्शन घेतलं नाही आणि घेतलंही नसतं. कदाचित त्या दर्शनाने माझ्या डोळ्यांच्या खाचा झाल्या असत्या. देहमनाचं काष्ठ झालं असतं.पुष्कळ वेळा तुम्ही जेव्हा माझ्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करीत असता, तेव्हा अनेक शल्यं माझ्या मनात सलत असतात. 


त्यातला वरपांगीपणा मनाला झोंबत असतो. निवडणूक जवळ आली की जसा लोकांना निवडणूकज्वर भरतो, तसा प्रसंगवशात तुम्हांला कौतुकाचा, सहानुभूतीचा ज्वर भरतो. बेभानपणे, तोंड फाटेपर्यंत आमची स्तुती करता, पण दुपारी आमच्याकडे चूल पेटते का ? अशी चौकशी करायला येता कोणी ? फाटके का होईनात, 


पण आमच्या पोरांच्या अंगावर कपडे आहेत की नाहीत, हे पहायला येता कोणी ? आमच्या डोक्यावर छप्पर आहे की नाही याची काळजी वहातंय कुणी ? लाखालाखांच्या देणग्या जाहीर करता, पण त्यातले पाच - दहा रुपये तरी आमच्यापर्यंत पोहोचलेत की नाही, केलाय याचा कुणी तपास ? तुमच्या सहानुभूतीने माझ्या मनाला कोरड पडते.


जाऊ दे, मी माझ्या मनाला आवर घालते. मला समजतंय यालाच म्हणतात जनरीती, यालाच म्हणतात माणुसकीचा उमाळा, यालाच म्हणतात जनमानसात सतत घोघावणारा दयासागर.पण माझं भान सुटत नाही. 


माझं मन खुरटत नाही. उलट अभिमानाने, कृतकृत्यतेच्या. तृप्तीच्या भावनेने काठोकाठ भरून येतं. तुम्हाला सुखाची झोप यावी म्हणून, माझा मुलगा सीमेवर जागत होता. तुम्ही जखमी होऊ नये म्हणून शत्रूच्या शस्त्रांचे घाव आपल्या अंगावर झेलत होता. 


या विचाराने माझं मन आकाशाएवढं अनंत आणि असीम बनतं. सागरासारखं विस्तीर्ण बनतं. वाटतं मी एकाच मुलाची नाही, तर जे जे जखमी झाले, जे जे हुतात्मा झाले, त्या साऱ्यांची मी आई आहे. मी कंसाची माता नाहीये, मी कृष्णमाता आहे. मी कुंती आहे. 


जिथे आपल्या मुलाला युध्दाच्या खाईत लोटायला अगणित माता कचरल्या, तिथे मी आपण होऊन माझ्या मुलाला धगधगत्या रणकुंडात लोटलं. पवित्र स्थंडिलावर बळी दिला. देव जर कधी मला भेटला तर एकच मागणं मी त्याच्याजवळ मागेन, 'हे परमेश्वरा, पुढच्या जन्मी माझ्या पोटी असाच पुत्र जन्मू दे, आणि असाच मरू दे.


पाथेयातीलं पौष्टिक अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त । स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात ।। जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान ।। काळोखातुन विजयाचा ये पहाटचा तारा | प्रणाम माझा पहिला तुजला, मृत्युंजय वीरा ||


कुसुमाग्रज एक दिवस, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोर्चा काढला होता. मोर्चा फ्लोरा फाउंटन येथे अडवण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते. पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला. 


पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्यात १०५ कार्यकर्ते हुतात्मा झाले. आता फ्लोरा फाउंटनला हुतात्मा चौक असे नामाभिधान मिळाले आहे. त्यातल्या एका हुतात्म्याला उद्देशून विंदा करंदीकरांनी 'हे सारे श्रेय तुझेच आहे नावाची उत्कृष्ट जाज्वल्य अशी कविता रचली. त्यातला काही भाग खाली देत आहे. 


सर्व कविता कठस्य करण्यासारखी आहे. सुरुवात - 'मस्तीच्या मातीवर रक्ताची गुळणी थुकून तू, मातीत विलीन झालास' - अशी आहे. यांतल्या कल्पना, उपमा अत्युत्कृष्ट आहेत. 'त्याचे तोंड बंद करू नका असं पैशाच्या पिशवीसारखं ! 


'त्याची मांडी मोडू नका, कारण ती ताठ होती शेवटपर्यंत, बुडणाऱ्या गलबताच्या डोलकाठी सारखी! संयुक्त महाराष्ट्राच्या शत्रूनी, त्यांच्याबद्दल खेद न बाळगता; ते मवाली होते - त्यांचे कसलं कौतुक - असे म्हणणारे दुवाचार्य, प्रत्यक्ष विंदांच्या अवती - भोवती होते. त्यांना उद्देशून विंदांनी लिहिले जवळ जाऊ नका - फटकन शिवी घालील - मवाली आहे !


त्यात एक ओळ आहे 'ही माती तुला कधी विसरणार नाही !' ही ओळ आली की विंदा कविता वाचन थांबवतात आणि म्हणतात. 'इतकी गाढवपणाची ओळ मी कधी लिहिली नाही. व्यंग्यार्थ आला ना लक्षात ?. प्रेताची कवटी फुटली की प्रेत संपूर्ण जळलं असं मानतात. 


म्हणून पोचवायला आलेली मंडळी कवटीचा फाट् असा आवाज होईपर्यंत थांबतात, त्या संबंधी विंदांनी लिहिलं,आणि कवटी फुटेपर्यंत थांबू ही नका, कारण ती अगोदरच फुटली आहे.' मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3

एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध | Eka Hutatma Che Manogat Essay In Marathi

आमच्या गावच्या हुतात्मा चौकातून मी चाललो होतो. चौकात हुतात्मा स्मारक मोठ्या दिमाखात उभे केलेले आहे. जाता जाता माझ्या कानावर आवाज आला आज तुम्ही हुतात्मा दिन साजरा केला, तो केवळ उपचार म्हणून! अकरा वाजता भोंगा वाजला अन तम्ही १ मिनिट साऱ्या हतात्म्यांचे स्मरण केलेत. बस! झाले तुमचे कर्तव्य! 



आता वर्षभर पुनः माझी आठवण करायची गरज नाही! तुमचे हे वागणे पाहून माझ्या मनाला अतिशय यातना होतात. अरे, हुतात्म्यांनी आपले प्राण पणाला लावले. स्वत:चा संसार सोडून देऊन देशाचा संसार केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन या हुतात्म्यांनी, क्रांतिकारकांनी सतीचे वाण घेतले होते. 


या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा होम केला. या साऱ्याबद्दल कृतज्ञता म्हणून येथे हुतात्मा स्मारक बांधण्यात आले. या साऱ्या क्रांतिकारकांना देशभक्तीचे व्रत लोकमान्यांनी दिले होते, बापूजींनी दिले होते. इंग्रज सरकारने या क्रांतिकारकांना तुरुंगात टाकले, फाशी दिले. 


पण ते सारे न डगमगता 'जय भारतमाता', 'वंदे मातरम्' असे म्हणत वधस्तंभाकडे हसत हसत गेले आणि हुतात्मा झाले. अशा अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्या दिवशी साऱ्यांना आपले जीवन कृतार्थ झाले असे वाटले. 

सर्व हुतात्म्यांच्या आत्म्याला अतिशय मोठे समाधान लाभले असेल. समाजानेही त्या हुतात्म्यांची आठवण सतत जागती ठेवावी म्हणून हे स्मारक येथे उभे केले. परंतु त्या हुतात्म्यांच्या मनातील देशाबद्दलची उज्ज्वल प्रतिमा आज डागाळून गेली आहे. स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाली. पण आज देशात सत्तास्पर्धा चाललेली दिसते. 


भ्रष्टाचाराच्या अनेक घटना आजकाल उजेडात येत आहेत. देशनिष्ठा, प्रामाणिकपणा असे गुण आजकाल फारसे कोठे आढळत नाहीत. देशात अराजक, हिंसाचार हे मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्यामुळे त्या हुतात्म्यांच्या अंत:करणाच्या शतश: चिंधड्या होत आहेत.

हतात्म्यांचे स्मारक म्हणून मला येथे उभे केले आहे. पण कोणाचेही माझ्याकडे लक्षसुद्धा नसते. वर्षभर माझी अवस्था अतिशय दयनीय असते. अंगावर धूळ साठते, ऊनपावसाचे तडाखे सहन करावे लागतात. ज्या हुतात्म्यांच्या आठवणीसाठी हे स्मारक आहे, त्या हुतात्म्यांना लोक पार विसरले आहेत हे पाहून मला वैफल्य येते.


माझा उपयोग येथे प्रेमिकांच्या भेटीचे संकेत स्थळ म्हणून केला जातो, भिकारी येथे बसून जेवणखाण करतात, कावळे कबुतरे माझ्यावर घाण करतात. वास्तविक स्मारक करतात ते त्या हुतात्म्यांचे स्मरण ठेवण्यासाठी, त्यांचे कार्य नजरेपुढे ठेवण्यासाठी! परंतु हा हेतू नजरेआड झाला आहे. स्मारक हे प्रेरक ठरले पाहिजे. 


प्रेरणा देण्यास स्मारक जर यशस्वी होत नसेल तर अशी स्मारके उभारून त्या थोर हतात्म्यांचा अपमान तरी करू नका!! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक

हुंडाबळी तरुणीची आत्मकथा मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक

hunda bali tarunichi atamkatha essay in marathi

हुंडाबळी तरुणीची आत्मकथा मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : “थांबा, आतापर्यंत तुम्ही सर्वांनी खूप चर्चा केली. आता मला बोलू दया. कारण आता मी फारच थोड्या तासांची सोबतीण आहे. तेव्हा या सुंदर जगातून जाण्यापूर्वी मला माझे मनोगत व्यक्त करू दया. मला माहीत आहे, मी खूपच भाजले आहे; आणि या शेवटच्या क्षणीही मला जाणवत आहे की, हे जग सुंदर आहे. 

मग सांगा बरे, अशा या सुंदर जगाचा निरोप घेण्याचा प्रयत्न मी कशी करणार पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न' अशी माझ्यासंबंधी आपल्या अहवालात नोंद केली आहे; आणि वार्ताहरांनी त्यावरून वृत्तपत्रात तशाच प्रकारची बातमी दिली आहे. पण मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ओरडून सांगेन की, 'मी आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. मला पेटवून दिले आहे. मी झोपेतून जागी झाले तेव्हा माझे कपडे पेटलेले होते. घरात सर्व माणसे हजर होती, पण कोणीही मला वाचविण्याचा यत्न केला नाही. कारण त्यांना मी नकोच होते. त्यांच्या डोळ्यांसमोर चमकत होते 'चकचकीत रुपये'.



“अतिलोभी आहेत ती माणसे! पण खरंच, त्यांना माणसे तरी कसे म्हणायचे? राक्षसालाही लाजवील अशी त्यांची वृत्ती आहे. मी या घरात आले तेव्हा भरपूर सोने, चांदी, रुपये घेऊन आले होते. घरच्या लक्ष्मीत मी भरपूर भर घातली होती. माझ्या पूर्वी आलेल्या माझ्या तीन जावांनीही आपापल्या माहेराहून भरपूर धनदौलत आणली होती. पण माझ्या सासरच्या मंडळींचे एवढयावर समाधान नव्हते. 


सूना या संपत्ती मिळविण्याची साधनेच असे ही मंडळी मानतात. या सर्व गोष्टींचा परिणाम माझ्या मोठ्या जावेच्या मनावर झाला आहे आणि ती आता वेड्यांच्या इस्पितळात आहे. तिचे पती म्हणजे माझे मोठे भाऊजी मात्र दुसरे लग्न करण्याच्या तयारीत आहेत. कारण त्यांना माहीत आहे की येणारी नवी बायको आपल्याबरोबर रुपयांच्या राशी घेऊन येईल.


hunda bali tarunichi atamkatha essay in marathi
hunda bali tarunichi atamkatha essay in marathi


“काय म्हणता? या माणसाला मुलगी कोण देईल? अहो मुलगी म्हणजे उरावरचे ओझे मानणारे वधुपिते काय कमी आहेत? ही माणसे आपल्या मुलीचे एकदाचे लग्न करून टाकून मुक्त होण्यास उतावीळ झालेली असतात. कारण त्यांना आपल्या मुलीचे वय वाढत असल्याचीच भीती वाटत असते. 

मला आठवते ना, माझे पूर्वजीवन ! शाळा-कॉलेजातील ते दिवस किती रम्य होते! फुलपाखरासारखी मी भिरभिरत होते. अभ्यास, पुस्तके, खेळ, नृत्य, नाट्य, वक्तृत्व यांत मी रमलेली असताना शालेय शिक्षण संपून महाविदयालयात केव्हा गेले तेही कळले नाही. मैत्रिणींच्या सहवासात महाविदयालयातील मखमली दिवसही केव्हा भुर्रकन उडून गेले तेही लक्षात आले नाही. आवळयाजावळया आपल्या दोन मुलींना म्हणजे आम्हा दोघी-बहिणींना आईवडिलांनी फुलासारखे जपले. गूलाबाच्या सुगंधाने भरून गेलेल्या मार्गाने मी पाकळयांवर पावले टाकत सासरी आले पण येथे वाट्याला आले केवळ काटेच!

"खरं पाहता, माझ्या सासरी काहीच कमी नव्हते. लक्ष्मी व सरस्वती दोघींचा वरदहस्त या कुटुंबावर आहे. पण माझ्या सासूच्या रूपाने ‘आक्काबाईचा' घरात प्रवेश झाला आहे. एक स्त्रीच इतर स्त्रियांच्या दुःखाला कारण होत आहे. स्त्री-मुक्तीच्या वातावरणात वाढलेली मी सासुबाईंना निर्धाराने तोंड देत होते. पण दुर्दैवाने मला माझ्या पतीची साथ मिळाली नाही. शेवटी हे फळ माझ्या वाट्याला आले. या क्षणी वाईट वाटते माझ्या छोटया राणीसाठी. तिच्या वाटयाला हेच दुःख येणार का? कारण ती पण एक स्त्री आहे. स्त्रीवरील हा अन्याय केव्हा मिटणार, याचे कोणीतरी उत्तर देणार आहे का?"


वरील निबंध हुंडाबळी तरुणीची आत्मकथा मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवादपुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


टीप : या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते



  • hunda ek samajik samasya marathi essay
  • hunda bali nibandh in marathi

हुंडाबळी तरुणीची आत्मकथा मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक
hunda bali tarunichi atamkatha essay in marathi



'स्त्री जन्मा तुझी कहाणी

हृदयी अमृत नयनी पाणी ।

तुझीया पोटी अवतरती नर

अन्यायच ते करिती तुजवर

दशा तुझी ही केविलवाणी ।।'


बाबा, डॉक्टर, आई वाचवा । वाचवा हो ।। वाचवा ।।। मी खूपच भाजले. मी थोड्याच वेळाची सोबतीन आहे. माझी कहाणी ऐका. ऋषीमुनींच्या काळापासून भारतीय स्त्रियांना म्हणे मानाचे स्थान आहे. 'मातेपेक्षा श्रेष्ठ दैवत दुसरे कोणतेच नाही' असे सांगितले जाते हे सारे खोटे आहे. खरेच स्त्रियांना एवढे सन्मानाने वागविले जाते का! हाच प्रश्न माझ्या मनात आहे.


मला मागचा प्रसंग आठवतो आहे आई एकदा रागाच्या भरात म्हणाली होती तुला भाकरीच्या तुकड्यावर विकत घेतले आहे. या प्रसंगातला माझा राग 'विकत घेणे' या शब्दांवर आहे. ज्या माणसांचा जीव जडला, त्याच माणसाची विक्री मग ते झाड असेल घर असेल म्हणजे हुंडा देणे-घेणे आलेच!


आज तर सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजात मोठ्या हुशारीने 'मुले-मुली' विकली जात आहेत त्यातलीच मी एक अभागी आहे. माझ्या बाबांनी जवळ असलेलं ते देऊन मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं. लग्न होऊन चार-दोन महिने जातात न जातात तोच सासरच्या मंडळीकडून सुरू झाले. 


नवी गाडी घेणे, कारखाना उभा करावयाचा आहे. अशी एक नाही अनेक सम्सया उभ्या करून छळाला सुरूवात झाली. कितीही ओरडून सांगितले तर ऐकणार कोण? सारे एकाच जातीचे, एकाच पक्षाचे. लग्नात म्हणे 'वर दक्षिणा' कमी मिळाला. 


त्याची भरपाई झाली पाहिजे. सासूबाईंचे म्हणणे पुन्हा पुन्हा कानावर येऊ लागले, मग मी ऐकत नाही असे पाहून इलेक्ट्रिक शॉक देणे, कमानंतर कामात गुंतवून ठेवणे, वेगवेगळ्या वाईट शब्दांचे उच्चार होऊ लागले. त्यांच्या दृष्टीने मुलगी म्हणजे मिळकतीचे साधन आहे. 


माझ्या सारख्या स्त्रियांनी माहेर सोडायचे, तिथले नाव सोडायचे आणि दोन घराण्यात मिसळायचं. प्रत्यक्षात गृह लक्ष्मी पण आज ती दासी बनल्यासारखी गत झाली आहे. सासरच्या दृष्टीने, अंगावर दागिने, सोने, नाणे, जडजवाहीर वगैरे म्हणजे सुख! परंतु स्त्रीला एक मानवी मन आहे, भाव-भावना आहेत याचा विचार इथे कोठे होतो? 


मला अखेरच्या वेळी पुष्कळ बोलून मन मोकळे करायचे आहे. दुसऱ्यांना सांगायचे आहे. मी फसले, तुम्ही फसू नका. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या न्यायाने मला माझे मन मोकळे करावयाचे आहे. माझे पती तेही आईच्या शब्दांच्या बाहेर नाहीत या सर्व मानसिक छळाला कंटाळून मीच सर्वांच्या समोर पेटवून घेतले. साऱ्यांना हेच हवे होते. 


सारे जळताना पाहत होते. पण सगळेच निर्दयी, अमानवी, पशू वृत्तीचेच सगळे! आरडा-ओरड झाल्यामुळे शेजारी धावत आले आणि घरातल्या मंडळींनी छान नाटक केले. आग विझवणे काय ? रडणे काय ? मी सांगते आहे. या घरात कोणत्याही मुलीने पुन्हा येऊ नये. 


हे सारे जनावरांच्या जातीचे आहेत. यांना भावना, मानवी मन नाहीच. पैशाची लोभी माणसे आहेत. सांगता सांगता आवाज थांबला! आणलं गेलं. माझे आई-वडील सुद्धा मला आता निटसे आठवत नाहीत. कधी-कधी मला आईची खूप आठवण येते. तेंव्हा माझे काळीज विदीर्ण होऊन जातं. 


मला माणसाच्या दुटप्पीपणाबद्दल त्याची चीड येते. स्वतःच्या आईचं वर्णन करताना तो म्हणता मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


हुंडाबळी तरुणीची आत्मकथा मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक

मातीचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक

matiche manogat essay in marathi


मातीचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : "तुमची माझी ओळख फार जुनी आहे. माझ्याशी खेळताना तुमचे शैशव, बालपण केव्हा हरविले हे सुद्धा तुम्हांला उमगले नाही. आताच जरा या कुमारवयात आल्यावर तुम्ही माझ्याशी फटकून वागायला लागला आहात. म्हणून तर मला तुम्हांला आपली जुनी आठवण करून दयावी लागत आहे. हं ओळखलंत ना! माझ्या स्वागताला तो रुमाल काढू नका. हो, हो! मी माती आहे. मी माती, म्हणजेच आज तुम्हांला नकोशी झालेली धूळ आहे. 


पण आठवा पाहू बालपणातील ते दिवस!  "लहानपणी माझ्याशी खेळताना तुम्हांला किती मजा वाटायची! माझ्या अंगावर पाणी ओतून वाडे बांधणे, चूलबोळकी तयार करणे, छोटे छोटे शिपाई तयार करणे आणि दिवाळीत किल्ला तयार करणे हे तर तुमचे आवडते खेळ. आज तुम्हांला आठवत नसेल, पण तुमच्यापैकी कित्येकजण रांगत असताना माझी चवदेखील घेत होता. त्यामुळे मग तुम्हांला घरातल्या मोठ्या माणसांचा फटका खावा लागे. पण या आठवणीने लाजू नका. अहो, प्रत्यक्ष परमेश्वरही कृष्णावतारात माझ्याशी खेळताना रंगून जात असे. म्हणून तर पंडित कवी मोरोपंत त्याला आठवण देतात

'तुलाचि धरी पोटिशी कशी तदा यशोदा बरे


जरी मळविशी रजोमलिन तू काय अंबरे!!' "मुलांनो, मी फार पुरातन आहे. या पृथ्वीतलावर तुम्ही मानव नव्हता, इतकेच काय कोणीही प्राणिमात्र नव्हते. अशा एकाकी अवस्थेतही मी वावरत होते. मला कुणी ‘रज' म्हणत, कुणी 'मृत्तिका' म्हणून हाक मारीत. त्यातूनच मला ‘माती' हे नाव मिळाले. मुलांनो, मला फार आवडते हे माझे नाव. का ते सांग? या नावाचे 'मातेशी' साम्य आहे, जवळीक आहे. 'माता' किती मंगल शब्द; किती पवित्र नाते. या मातेशी माझेही नाते आहे हं.

matiche manogat essay in marathi
matiche manogat essay in marathi


“तुमचे प्रसिद्ध लेखक अनंत काणेकर मला मोठी माता' म्हणतात. नाहीतरी मानवाशी, या मनूच्या पूत्राशी माझा घनिष्ठ संबंध आहे. कारण मानवप्राणी माझ्यापासूनच घडतो आणि शेवटी तो मलाच येऊन मिळतो. 'मानवा, तु माती असशी मातित मिसळशी' अशी ही कूणा कवीने जाणीव करून दिली आहे. पण त्या अर्थाने मी म्हणत नाही. मानवाशी मला अभिप्रेत असलेली जवळीक वेगळी आहे. माणूस माझ्या अंगाखांदयावर मोठा होतो, उन्हापावसापासून त्याचे रक्षण करण्यासाठी मी शांतसे घरकुल त्याला देते.


 त्याच्या वस्त्रासाठी लागणारा कापूस मी निर्माण करते. त्याची भूक भागविण्यासाठी मी 'सस्यश्यामला' होते. षड्रसांनी युक्त असे भोजनाचे ताट प्रत्यही देण्यासाठी मी झटते. विविध चवींची फळे त्याचे जिव्हालौल्य भागवितात. माझ्या उदरी फुलणारी रंगीबेरंगी फुले त्याला नेत्रानंद देतात. माझ्या अंगावर पाय रोवून जेव्हा तो उभा राहतो तेव्हा तो सुरक्षित असतो. ही सुरक्षितता त्याला सागरात वा गगनात मिळत नाही. एकंदरीत अन्न, वस्त्र, निवारा या साऱ्या गोष्टी मी मानवाला देते.

"हे मी स्वतः सांगते म्हणून तुम्ही मला अहंकारी म्हणाल, ही मातीची दर्पोक्ती आहे म्हणून मला दोष दयाल ; पण हा गर्व नाही. आज हे सर्व काही बोलण्याची वेळ तुम्हीच माझ्यावर आणली आहे. या आजच्या विज्ञानयुगात तुम्ही माझ्यापासून दूर जात आहात. पण एक लक्षात ठेवा; सोन्याचांदीच्या खाणीही माझ्याच उदरात आहेत. 


आजच्या या कृत्रिम धाग्याच्या जगात तुम्हांला माझी आवश्यकता वाटणार नाही. 'मातीविना शेती' अशा आकर्षक घोषणा तुम्हांला आकर्षित करतील. पण लक्षात ठेवा, या कृत्रिमतेला मर्यादा आहेत. शेवटी खरी आहे ती मी, मीच माती! कारण माझ्याजवळ आहे सर्जनशीलता, माझ्याजवळ आहे क्षमाशीलता."
वरील मातीचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

मातीचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक

एका अपंगाचे आत्मवृत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक


एका अपंगाचे आत्मवृत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक :
"माझे कथन सुरू करण्यापूर्वी प्रथम मीया लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. दूरचित्रवाणीच्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो. कारण त्यांनीच मला तुम्हा सर्वांसमोर उभं राहण्याची ही संधी दिली आहे. मी आता 'उभं राहण्याची' असा उल्लेख केला, पण तो वास्तव नाही; कारण मी आता तुमच्याशी बोलत आहे ते बसूनच. कारण मी कधीच उभा राहू शकलो नाही. त्याचं कारण म्हणजे मी जन्मतः अपंग आहे. तुम्हा सर्वांसारखा मी स्वतःच्या पायांवर कधीच उभा राहिलो नाही.






“मी वर्षाचा झालो. तेव्हाच माझ्या आईच्या हे लक्षात आलं.
ती माऊली निश्चित हबकली असणार, पण माझी आई मोठी धीराची होती आणि आईमुळेच मी आज तुमच्यासमोर निराळ्या अर्थाने उभा आहे. अपंग असूनही स्वावलंबी आहे. मला उभं राहता येत नाही हे लक्षात आल्यावर आईवडिलांनी सर्व उपाय योजिले. डॉक्टरी इलाजांबरोबर इतरही सर्व उपाय योजिले गेले. पण मी उभा राहू शकणार नाही असं निश्चित झाल्यावर माझ्या आईने मला वेगळ्या अर्थाने उभे केले.


"माझे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. माझ्यासाठी चाके लावलेला
एक पाट तयार करण्यात आला. या पाटावर बसून मी सर्वत्र हिंडत असे. इतर मुले धावाधावी, छपाछपी खेळत ते पाहून माझ्या या अवस्थेबद्दल मला वाईट वाटे. पण ही उणीव माझी आई भरून काढीत असे. ती माझ्याशी त-हेतहेचे खेळ खेळत असे.




कथा, कविता व इतर माहिती सांगत असे. आज माझ्या लक्षात येते की, त्यावेळी आईने मला ज्या कथा सांगितल्या त्या सर्व कथा संकटांवर मात करणाऱ्या शूरांच्या असत. त्यांतील सूर्यसारथी अरुणाची कथा मला अधिक जवळची वाटे. त्या कथांनी माझे मन उभारले गेले. आपल्यातील उणिवेची मला कधी खंत वाटली नाही. आपण आपल्या व्यंगावर मात केली पाहिजे असे वाटू लागले.






eka apangache atamkathan essay marathi




“घरी प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर बाबांनी माझ्यासाठी तीन चाकांची खुर्ची तयार केली.
तीत बसून मी शाळेत जाऊ लागलो आणि खरं सांगतो, तेथे मला एक विलक्षण आनंद गवसला. खुर्चीवर बसून प्रवास करताना अनेक अडचणी येत. पण माझे दोस्त मला मदत करीत. शाळेत ते जेव्हा कोणताही खेळ खेळत तेव्हा मी पंचाचे काम करीत असे; आणि त्यांच्याइतकाच खेळाचा आनंद लुटत असे.

माझ्या अपंगत्वाचा त्यांनी कधीच उपहास केला नाही.
मला आठवतं, एकदा शाळेत एका मुलानं माझा उल्लेख 'पांगळा' असा केला, तर माझ्या एका मित्राने त्याच्या खाडकन मुस्कटात दिली. एकंदरीत दोस्तांच्या बाबतीत तर मी अतिशय भाग्यवान ठरलो आहे. आपण केलेल्या चुकीची भरपाई करण्यासाठी परमेश्वराने मला बुद्धिमत्ता बरी दिली असावी म्हणूनच की काय शालेय व महाविदयालयीन शिक्षण मी विशेष गुणवत्ता मिळवून पार पाडू शकलो.


“एम्. एस्सी. झाल्यावर मी स्वतःचा छोटासा रासायनिक कारखाना काढला.
त्यावेळी अनेकांचे मदतीचे हात मला मिळाले. आज माझा हा कारखाना नावारूपाला आला आहे; त्याचे कारण हे सारे सहकाऱ्यांचे हात! माझ्या कारखान्यात मी नेहमी अपंगांचीच नेमणुक करतो. माझ्या आईने जे रोपटं माझ्या मनात फुलविलं तेच इतरांच्या मनांत फुलविण्याचा मी यत्न करतो. त्यासाठीच हा मुलाखतीचा प्रपंच. माझ्या दोस्तांनो, तुमच्यातील उणीव विसरून जा. तिचे भांडवल करू नका. प्रयत्नाच्या मार्गावर तुम्ही धावू लागा आणि मग तुम्हांला आढळेल की, असे कितीतरी जण तुमच्याबरोबर धावत आहेत."

टीप : वरील निबंध एका अपंगाचे आत्मवृत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


apang vyakti chi atmakatha in essay in marathi



निबंध

एका अपंगाचे आत्मवृत मराठी निबंध 



शाळेतून एका कारखान्याला भेट दयायला आम्ही गेलो होतो. तेथे काम करणारे सर्वजण अपंग होते. पण आपण अपंग असल्याची त्यांना जाणीवच नव्हती. एकमेकांना मदत करून ते आपली कामे करीत होते. त्यांची ती कामसू वृत्ती पाहून मला त्यांचा अभिमान वाटला.


दुपारी जेवायची सुट्टी झाली तेव्हा त्या कारखान्यातील सर्व मंडळी एकत्र जमली आणि गप्पागोष्टी सुरू झाल्या. त्यांतील एका मुलीने आपली कहाणी आम्हांला ऐकवली. तिचे नाव होते सुनेत्रा. खरोखरच तिचे डोळे फार सुरेख होते. पण तिचा उजवा हात आणि उजवा पाय यांत काहीच बळ नव्हते.


सुनेत्रा म्हणाली, " मी दोन वर्षांची असताना मला ताप आला आणि त्या तापातच मी हातापायांचे बळ हरवून बसले. माझ्या आईवडिलांसाठी हा मोठा धक्काच होता. खूप उपाय केले त्यांनी. पण पोलिओने माझ्या अर्ध्या अंगाचा ताबा घेतला होता. त्या धक्क्यातून प्रथम सावरली ती माझी आई. स्वतःच्या कष्टांची पर्वा न करता तिने मला घडवले.


"एका सामाजिक संस्थेने मला चाकांची खुर्ची दिली आणि मग मी आईच्या मदतीने रोज शाळेत जाऊ लागले. शालान्त परीक्षा मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. माझ्या आईला या तंत्रशिक्षण शाळेची माहिती कळली होती. प्रसिद्ध समाजसेविका नसीमा हुरजुक यांनीच ही संस्था काढली आहे. तेथे आवश्यक ते शिक्षण घेऊन आता मी या कारखान्यात काम करते. आता मी पूर्ण स्वतंत्र आहे.


"आम्ही अपंग असलो तरी आम्ही दुसऱ्यांवर अवलंबून नाही. आम्हांला कुणाचीही दया नको. आम्हीच एकमेकांना मदत करतो. हा कारखाना अपंग चालवत असले, तरी याचे उत्पादन इतर कोणत्याही कारखान्यातील उत्पादनापेक्षा सरसच आहे, याचा मला अभिमान आहे." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . 


[शब्दार्थ : अपंग-a disabled person. अपं. विकलांग। सावरलीrecovered (from shock). माघातमाथी बा२ ॥वी. उबर सकी, धैर्य धारण किया। तंत्रशिक्षण शाळा- technical school. तउनीही स्टूस.. तकनीकी स्कूल। सरस- superior. याउयातु. अधिक, अच्छा, बेहतर।]


एका अपंगाचे आत्मवृत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक

सर्कशीतील सिंहाचे आत्मवृत्त किंवा पिंजऱ्यातील सिंहाचे आत्मवृत्त मराठी निबंध  Autobiography of Lion in Marathi Essay


सर्कशीतील सिंहाचे आत्मवृत्त किंवा पिंजऱ्यातील सिंहाचे आत्मवृत्त मराठी निबंधआत्‍मकथनात्‍मक :
या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.परवा मोठी गंमतच झाली. आम्ही सर्कस पाहावयास गेलो होतो. सर्कशीतील प्राण्यांचे कार्यक्रम मला विशेष आवडतात.


सिंहांचे कार्यक्रम सुरू होते. सारे प्रेक्षक श्वास रोखून पाहत होते. एकापाठोपाठ एक सिंहाचे पिंजरे रिंगणात येऊन उघडले जात होते. पिवळ्या सोनेरी वर्णाचे, भरपूर आयाळ असलेले ते वनराज मोठ्या डौलात फिरत होते. फिरताना आपली पुच्छे ते अशी झोकात फिरवीत होते की पाहतच राहावे.


एकेक सिंह रिंगणात उतरत होता व आपापल्या स्टुलावर स्थानापन्न होत होता. एवढयात एक नवल घडले. त्या सर्वांतील जो वयाने मोठा होता त्याने एक स्‍टुल सरकवत सरकवत तेथील टेबलाजवळ ठेवले. रिंगमास्तरही पाहत राहिला की हा आता काय करणार? 

आपले पुढचे दोन्ही पाय टेबलावर टेकून तो सिंह अगदी व्याख्यात्याच्या रुबाबात उभा राहिला. जणू तो भाषणच करीत होता.


मित्रांनो, हे युग भाषणांचे आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची संधी असते. म्हणूनच ती संधी मी आज घेणार आहे. माझ्या मनीची व्यथा मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे. मला माहीत आहे की आज तुम्ही येथे माझा खेळ पाहावयास आला आहात, 



पण तरीही मी तुम्हांला माझे भाषण ऐकविणार आहे.” सर्कशीचा सारा तंबू अगदी शांत होता. सर्कस चालू असताना नेहमी वाजणारा बँडही ऐकू येत नव्हता. रिंगमास्तरही चाबूक हातात असूनही पुतळयाप्रमाणे स्तब्ध उभा होता.

sarkashitil shinhache atmrutta essay marathi
sarkashitil shinhache atmrutta essay marathi

“दोस्तांनो, तुम्ही मला वनराज म्हणून संबोधता,” सिंह सांगत होता, “पण ज्याने वन पाहिलेही नाही तो वनराज कसा? अरे, माझा जन्म झाला या सर्कसच्या तंबूतच. माझे आईबाबाही येथेच सर्कसमध्ये होते. आयुष्यभर त्यांनी सर्कसमध्ये तीच तीच कामे केली, त्यासाठी धोकेही पत्करले, चाबकाचे फटकारे खाल्ले. 



माझा जन्म भारताबाहेर कुठेतरी झाला. लहानपण मोठ्या कौतुकात गेले. सर्कसचे मालक आणि त्यांचा मुलगा दोघेही माझे खूप लाड करीत. खूप खायलाप्यायला व झोपायला मऊ अंथरूण देत. 


त्यावेळी मला त्यांनी चाबकाची भीती कधी दाखविली नव्हती. त्यामुळे जीवन अतिशय रम्य होते, असे वाटत होते पण "बालपण सरले आणि त्याचबरोबर ती खुषीही हरवली. मी मोठा झाल्यावर माझा अध्ययन काळ सुरू झाला आणि मग अंगावर सपासप चाबकाचे फटकारे बसू लागले. 


काम करण्याचा कंटाळा येऊ लागला. स्वच्छंदपणे धावावे, हिंडावे असे वाटू लागले; पण भोवताली होता पिंजरा, त्याला भलेभक्कम कूलप. आता मला स्वातंत्र्याची जाणीव होऊ लागली होती, स्वतःची गुलामी उमगली होती. 


झाडावर स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या कावळा-चिमणीचेही भाग्य आपल्या भाळी नाही, मग कसले आपण पशूनाथ? असा एकसारखा विचार येऊन मन विदीर्ण होत होते. जेव्हा लहान मुले सर्कशीचा शिकारखाना पाहावयास येतात ना, तेव्हा मी पाठ फिरवून बसतो. कारण मी 'केसरी' असलो तरी तेथे गुलाम आहे.


“या सर्कशीच्या मालकाबरोबर मी गावोगाव हिंडलो, सारे जग पाहिले. मला येथे भरपूर खावयास मिळते तरी मी येथे दुःखी आहे. का सांगू? माझे भवितव्य मला भेडसावते. एका प्रसंगाचा मोठा परिणाम माझ्या मनावर झाला आहे. तो म्हणजे माझ्या आईबाबांचा शेवट. 



माझे आईबाबा म्हातारे झाल्यावर रिंगणातील कामे करण्यास लागणारी चपळाई त्यांच्यात राहिली नव्हती. तेव्हा या सर्कसमालकाने त्यांना सुखाची भाकरी दिली नाही, तर त्यांना विकन टाकले. कुठे गेले असतील बरे ते? काय झाला असेल शेवट त्यांचा कोण जाणे? पण ते त्या वयात बनात तर नक्कीच जाऊ शकले नसतील.



“आयुष्यभर आम्ही इतरांचे मनोरंजन करतो, या सर्कसवाल्यांसाठी राबतो, मग आमचे भवितव्य निश्चित नको का? स्वातंत्र्य, स्वच्छंदता ही कधी आम्हांला गवसेल का?"
असा रोकडा सवाल टाकून सिंह आपल्या जागेवर गेला. सर्कसचे पुढचे खेळ सुरू झाले. पण आज त्यांत रंग भरला नाही.

वरील निबंध सर्कशीतील सिंहाचे आत्मवृत्त किंवा पिंजऱ्यातील सिंहाचे आत्मवृत्त मराठी निबंधआत्‍मकथनात्‍मक निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद
    


निबंध 2

सिंहाचे आत्मवृत्त मराठी निबंध  Autobiography of Lion in Marathi Essay

 वनराज आणि तोही पिंजऱ्यात? आश्र्चयाची गोष्ट नाही. सर्कशीतल्या सिंहाबाबत तर ही ठरलेली गोष्ट आहे. जंगलावर हुकूमत गाजविणारा हा राजा येथे मात्र असहायतेने पिंजऱ्यात इकडून तिकडे फिरत होता. 


मी पिंजऱ्याजवळ गेलो. मला पाहून जणू तो बोलू लागला."मित्रा! आज सर्कस पाहायला आलास. माझेही खेळ बघितलेस.छान मनोरंजन झाले असेल तुझे नाही? तू हसलास! अगदी मनसोक्त अन् खळखळून! पण त्याच वेळी माझ्या डोळ्यांतून घरंगळलेले दोन अश्रू कोणाच्याही नजरेने टिपले नाहीत. 


तुमची करमणूक करण्यासाठी मी येथे आहे. माझं खरं खूप वेगळं असं अस्तित्व जंगलातच मागे सोडून मी आलोय. पिंजऱ्यातला हा 'मी' जणू 'मी' नाहीच मुळी! कोणी तरी दुसरा बहुरूपी आहे. खरं तर जंगलाचा मी राजा... जंगलातले ते दिवस... सारं काही रम्य... त्या आठवणी ताज्या आहेत. 


प्रत्येक क्षणी त्या माझ्याबरोबर आहेत. स्वच्छंद प्राणी व पक्षी, मोकळं आकाश, किर्र झाडी, जंगली सारी श्वापदं, कधी वाट चुकलेले वाटसरू, कधी येणारे शिकारी, जंगलात बेसावध हरिणांची शिकार , शिकार मिळविण्याची ती धडपड अन या साऱ्यांवर मात करणारा माझा रूबाब , माझा देखणा पराक्रम , माझी गर्जना.... हे सारं सारं या पिंजऱ्यात नाही रे!....''


"मित्रा ! आज तू माझ्यासमोर उभा आहेस. समजा येथूनच तुला कोणी पकडून नेले व कैद केले तर काय होईल? नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटे उभे राहिलेत ना? मग माझी तर ही वास्तव कहाणी तुझ्यासमोर आहे. सांग मला , माझं खर अस्तित्व कोठे शोधू? परत ‘जंगलाचा राजा' कसा बरे बनू? मुक्या प्राण्यांनाही भावना असतात. 


हे तुम्हा ‘भावनाशून्य' माणसांना का बरे कळू नये? दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणताना तुमचे मन का शहारत नाही? चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक सुंदर मनोहर छावा म्हणून माझी छबी होती. माझ्या मातेसह मी वनात विहार करीत होतो. 


अन् अचानक बेसावधपणे एका खड्डयात पडलो. तेथूनच मला पिंजऱ्यात अडकविले गेले अन् या सर्कशीत आणले. आज एक 'शो पीस' सारखी माझी अवस्था आहे. माझे मित्र, आप्तेष्ट , माझे घर या साऱ्यांना मी मुकलो आहे, मन थिजले आहे, हृदय रक्तबंबाळ झाले आहे. माझी करुण याचना कुणाच्या लक्षातही येत नाही. 


माझ्याजवळ येणाऱ्यांना अजूनही माझी देखणी नजर , सुंदर आयाळ , मदहोश चाल यांचा मोह पडतो. सर्वजण खुश होतात . पण माझं स्वातंत्र्य माझ्याकडे नाही या गोष्टीची कोणालाही पुसटशी जाणीवसुद्धा होत नाही.'


"खायला-प्यायला भरपूर मिळत असले तरी चाबकाच्या फटकाऱ्यांनी ही मेजवानी मला पचवावी लागते. पुढे माझ्या भवितव्याचं काय? पिंजरा अन् त्यात आयुष्य कैद, हीच कां माझी जीवनाची प्रतिमा? मित्रा,


पारतंत्र्याच्या या पिंजऱ्यात वनराज मी बंदिस्त मुक्यांच्या व्यथा बोलक्या.... मिळेल का मज वरदहस्त? 'अस्तित्व' गहाण पडले माझे सर्कशीच्या रिंगणात पा. समजेल कां कुणी काय दुःख दाटले मम मनात कधी फिरूनि येतील ते स्वातंत्र्याचे दिवस? अजूनही आशा आहे 


मला माझी ही गुलामी मला खरंच रे आवडत नाही निसर्गानं बहाल केललं माझं जंगलच मला प्रिय आहे. या लोखंडी गजाच्या दुनियेत माझ्या मनाला गंज चढत आहे. माझं आयुष्य विनाशाच्या खाईत ढकलले जात आहे. जंगलात माझी गरज जास्त आहे.


मित्रा, सांग रे माझी ही व्यथा साऱ्या जगाला ओरडून सांग दुसऱ्यांच्या अश्रुत आपली करमणूक शोधू नका म्हणून आणि कोणत्याही मुक्या प्राण्याला वा पक्ष्याला कैद करू नका" आवाज बंद झाला. मनाची कवाडे खाड़कन उघडी झाली. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


सर्कशीतील सिंहाचे आत्मवृत्त किंवा पिंजऱ्यातील सिंहाचे आत्मवृत्त मराठी निबंधआत्‍मकथनात्‍मक Autobiography of Lion in Marathi Essay

टिळकांचा पुतळा बोलू लागला मराठी निबंध तर आत्‍मकथनात्‍मक


टिळकांचा पुतळा बोलू लागला मराठी निबंध तर आत्‍मकथनात्‍मक :आज आपण टिळकांचा पुतळा बोलू लागला शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत
टिळक स्मारक मंदिरातून 'टिळक-आगरकर' हे नाटक पाहून मी बाहेर पडत होतो. नाटकातील मित्रप्रेमाची ती उदात्त दृश्ये मनःपटलावरून हलत नव्हती; त्यामुळे नाटकाला आलेल्या मंडळींची गर्दी ओसरली तरी मी तेथेच रेंगाळत राहिलो. तेथील कट्ट्यावर थोडा वेळ टेकलो. अचानक एक धीरगंभीर आवाज कानांवर आला. मी चमकून पाहिले. तर काय...... प्रत्यक्ष लोकमान्यांचा पुतळाच माझ्याशी बोलत होता. मी कान देऊन ऐक लागलो. त्या आवाजात खंत होती.


“अरे बाळा, तू येथे का रेंगाळत आहेस ते मला माहीत आहे. रंगमंचावरील नाटकाने तुझ्या मनाची पकड घेतली आहे याची मला कल्पना आहे. खरोखरच नाटककाराने आमच्या दोघांच्या जीवनातील वास्तवतेशी बरीच जवळीक साधली आहे. परंतु खरे तर आमच्या जीवनातील एकदशांश भाग देखील नाटकात दाखविला गेलेला नाही पण त्यात नाटककाराचा दोष नाही.


तो तरी काय करणार? त्याला स्थलकालाच्या मर्यादा आहेतच. पण मुला, मी आज तुझ्याशी बोलू इच्छित आहे ते नाटकाविषयी नाही, तर देशाच्या सदयःस्थितीविषयी मला तुझ्याशी बोलायचंय.

tilakancha putala bolu lagla tar essay marathi
tilakancha putala bolu lagla tar essay marathi


“अरे, मी येथे या चबुतऱ्यावर उभा आहे. भोवताली घडत आहे ते सर्व पाहत आहे. या टिळक रस्त्यावरून सकाळ-संध्याकाळ शाळा-कॉलेजला जाणारे अनेक विदयार्थी मला दिसतात ना, तेव्हा मन आनंदाने बहरून जाते बघ. या विदयार्थ्यांना पाहून, आम्ही शाळा सुरू केली तेव्हाचे दिवस आठवतात. शाळा सारवण्यापासून सर्व कामे आम्ही केली होती. केवढी स्वप्ने आम्ही तेव्हा पाहिली होती. पण आज मी जेव्हा या मुलांच्या गप्पा ऐकतो, तेव्हा मन खंतावते.


अरे, आपण भारत देशात राहतो याची त्यांना आठवणही. नसते! या देशाला स्वराज्य मिळावे म्हणून त्यांच्या पूर्वजांनी जिवाचे रान केले; त्यावेळी कित्येकांनी आपल्या सुखांचा होम केला. त्यावेळी अनेकांनी अखंड छळ, कारावास सोसला तो कशासाठी?


तर हे स्वराज्य मिळविण्यासाठी. आज त्यांची नातवंडे आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्वराज्याचा लिलावही करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत, असे भीषण चित्र दिसत आहे. या स्वराज्याचे आपण काही देणे लागतो याची त्यांना जाणीवही नाही. स्वदेशी, स्वभाषा यांचा त्यांना विसर पडला आहे. परदेशी वस्तूंचा हव्यास, इंग्रजी भाषेची गुलामगिरी पाहिली की वाटते- 'याचसाठी का आम्ही अट्टाहास केला होता?'


“या तरुणांची कृश शरीरयष्टी पाहून वाटते की, वर्षभर शाळा-कॉलेजांना कुलुपे घालावी आणि यांना व्यायामशाळेत न्यावे. मंडईच्या आसपास रेंगाळलो तरी हेच आढळते. जोर-बैठका काढणारे पहिलवान आता दिसत नाहीत. चित्रपटांच्या गप्पांत रंगलेले 'हीरो'च सर्वत्र आढळतात. रस्त्यावरून हिंडताना विविध जातिजमातींच्या संस्था आढळतात. म्हणजे विषमता एवढी फोफावली आहे तर!


दलित हा शब्दही आमच्या काळात अस्तित्वात नव्हता. जात-धर्मभेद विसरून सगळे एकाच ध्येयाने प्रेरित झाले होते. 'तेल्यातांबोळ्यांचे पुढारी' म्हणवून घेण्यात कधी शरम वाटत नव्हती. तेव्हा एकच ध्येय होते आणि ते म्हणजे परक्या सरकारला हाकलणे. पण आजचे जीवन ध्येयहीन झाले.



"केवढ्या उमेदीने आम्ही 'केसरी' सुरू केला आणि वाढविला. पण आजच्या वर्तमानपत्रांमध्ये तो स्वाभिमानी बाणाच आढळत नाही. आजची वर्तमानपत्रे चाळली तर निम्म्याहून अधिक भाग जाहिरातींनी भरलेला दिसतो. अरेरे, हे सारे पाहिले की गपकन् डोळे मिटावेसे वाटतात." आवाज थांबला, मी पुतळयाकडे पाहिले, तर पुतळ्याचे डोळे खरंच मिटलेले होते.
वरील निबंध टिळकांचा पुतळा बोलू लागला मराठी निबंध  हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध   2

टिळकांचा पुतळा बोलू लागला मराठी निबंध 


 आकाशात ढगांचा गडगडाट होत होता. मुसळधार पाऊस कोसळत होता. तरीही हजारो विद्यार्थी अत्यंत शिस्तीने ऑपेरा हाऊसवरून टिळकांच्या पुतळ्याकडे चालले होते. आर्यन, हिंद विद्यालय यासारख्या शाळांचे विद्यार्थी आणि शिवाय हिंद महिला समाजसारख्या संस्थांतर्फे येणारा भगिनी समाज चौपाटीवर जमत होता.  लो. टिळक पुण्यतिथीच्या दिवशी टिळकांच्या पुतळ्याच्या अंगावर हारावर हार पडत होते. 'लो. टिळक की जय,' असा जयजयकार होत होता...


"कशाला जयजयकार करता मुलांनो ! मोठ्या माणसांना काही चाड आहे का?" एकदम आवाज आला...कोण बोलले हे ?...टिळकांचा पुतळा बोलत होता... "होय ! मीच तो...बाळ गंगाधर टिळक, या पुतळ्याच्या मुखातून बोलतोय...दरवर्षी तुम्ही १ ऑगस्टला इथे जमता. मला पुष्पहार घालता...माझी आठवण ठेवता याबद्दल मला फार आनंद होतो. 


तुम्ही शाळकरी मुले. या महिला...हे महापौर...सारे आठवण ठेवता माझी. निदान या दिवसाची...
पण ही मोठी माणसे ?...राज्यकारभार करणारी ! कार्यालयात हवाबंद खोलीत बसून काम करणारी मंडळी...यांना काही जाण आहे का ?


हे स्वराज्य मिळविण्यासाठी किती जणांनी आपल्या पंचप्राणांचे बलिदान केले, कित्येकांनी कारावास भोगला. कित्येकांनी आजन्म दारिद्र्य व दुःख भोगले...त्याचे हेच का फळ ? डोंगरीच्या तुरुंगातले आगरकरांबरोबरचे दिवस मला अजून आठवत आहेत. चहा प्रकरण, डोळ्यासमोर येतेय...


केसरीत लिहिलेल्या लेखांवरून पुनः पुन्हा खटले भरले जायचे,...अरे बाबा महाराज...ताईमहाराज प्रकरणांत मी आयुष्यभर झुंज दिली. त्या तात्या सावरकराने परदेशी कापडाची होळी पेटवली म्हणून रँग्लर परांजप्यांनी त्याला कॉलेजमधून काढून टाकले तेव्हा 'प्रिन्सिपाल की पशुपाल ?' हा लेख मी लिहिला...दुसरेही लेख आठवतात


‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?' 'पुनश्व हरिः ॐ !' तसेच मंडालेच्या तुरुंगातले 'गीतारहस्य' आणि 'चिरोल' वरचा खटला ! बाळांनो, जुन्या आठवणींनी मन भरून आले म्हणून सांगितले...माझ्याबरोबर आणि माझ्यानंतरसुद्धा फार मोठी देशभक्तांची परंपरा होती. 



माझे सहकारी नरसोपंत केळकर, शिवरामपंत परांजपे, काकासाहेब खाडिलकर...सगळी एकापेक्षा एक कर्तबगार व ध्येयनिष्ठ माणसे...देशासाठी व समाजासाठी सर्वस्व देण्याची तयारी असणारी ! सावरकर, सेनापती बापट, धोंडो केशव कर्वे ही पुढची पिढी...राजकारणात महात्मा गांधी माझ्याही पुढे गेले म्हटले तरी चालेल. अरे यांच्या कर्तबगारीवर या देशात स्वराज्य आले...आणि भारतात 'राष्ट्राभिमान' जिवंत राहिला. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद



"सध्या मात्र सर्वत्र भ्रष्टाचार दिसतोय ! अनाचार, अत्याचार, लुटालूट, द्वेष, चोरटा व्यापार, काळाबाजार, काळा पैसा हेच शब्द माझ्या कानावर सारखे आदळत असतात. इथे चौपाटीवर भाषणे होतात ना !...सारखे तेच आरोप...तीच उत्तरे, सगळेच लबाड आणि ढोंगी...कुणाला निंदायचे कुणाला वंदायचे ! सगळेच नेते वाईट नाहीत. काही सज्जन व कर्तबगार आहेत, 


पण त्यांचे यांच्या कोंडाळ्यापुढे काही चालत नाही. __“मुलांनो ! आता जास्त बोलवत नाही आणि हे अमंगळ अधिक पाहवत नाही. तुम्ही आलांत...आठवण ठेवलीत...बरे वाटले ! जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले...


राष्ट्राचा, राष्ट्रीय नेत्याचा आणि राष्ट्रीय चारित्र्याचा असाच अभिमान ठेवा...म्हणा जय भारत ! जयहिंद" यात उल्लेख नसलेले त्यांचे बालपण, शिक्षण, कॉलेज जीवन व काही सभांतील प्रसंग यांचे चित्रण करून पहा.

टिळकांचा पुतळा बोलू लागला मराठी निबंध तर आत्‍मकथनात्‍मक