आत्मकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आत्मकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक| Eka Putlyache Manogat Essay In Marathi

एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : 'पुण्याचे रूपांतर लवकरच पुतळ्यांच्या शहरात होईल' पुण्याच्या 'दैनिक सकाळ'मध्ये कुणीतरी वर्तविलेले हे भविष्य. त्यामागचा उपरोध बराच काळ मनात रेंगाळत राहिला. टीकाकाराने पुण्यातील एका रस्त्यावरच्या पुतळयाची मोजदाद केली होती आणि मग असे हे पुतळे जागोजागी असावेत की नसावेत याबद्दलची उलटसुलट मते वाचकांनी मांडली होती. मनात आले या वादविषयात त्या पुतळ्यांचे कोणी मत घेतले आहे का?


"किती वेडी आहेस ग! अग पुतळयांच मत कोण घेणार? पुतळयांना आपलं मत मांडता आलं असतं तर मग त्यांना पूतळे म्हणता आले असते का?" आता मात्र त्या पुतळ्याने आपले पुतळेपण काही काळ बाजूला ठेवले होते आणि तो स्वतःचे मन उघडे करीत होता

"अरे माणसा, आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच. कारण आम्हांला रस्त्यांवर उभे करणारे लोक, त्यातून आपला काही ना काही स्वार्थच साधत असतात; आणि गप्पा मात्र स्वार्थत्यागाच्या करतात. केवढी विसंगती आहे ही! पण तेही आम्ही निमूटपणे सहन करतो. एखादी थोर व्यक्ती विशिष्ट ध्येयासाठी जीवनभर अखंड झिजते. प्रसंगी त्या ध्येयासाठी प्राणही ठेवते आणि मग तिच्या मृत्यूनंतर तिच्या ध्येयतत्त्वांना हरताळ फासला जाऊन तिचा पुतळा उभारला जातो. भांडवलशाहीला विरोध करणाऱ्या नेत्याच्या पुतळ्यासाठी भांडवलदारांकडून चंदा गोळा केला जातो. केवढा हा दैवदुर्विलास!



“मग सांगा, आवश्यकता आहे का अशा पुतळयांची? पुतळे उभारले जातात ते उभारणाऱ्या व्यक्तींचा वा संस्थेचा दानशूरपणा, मोठेपणा सिद्ध व्हावा म्हणूनच. थोरांची ही थोर स्मारके इतरांना स्फूर्तिदायक होतात ही एक फसवी, लोणकढी थाप आहे. लोकांना आपल्या दैनंदिन व्यवहारात त्यांची आठवणही होत नाही.
Eka Putlyache Manogat Essay In Marathi
Eka Putlyache Manogat Essay In Marathi


"माझा जन्मही अशाच काही धनवंतांच्या गर्वातून झाला आहे. ज्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व मी करीत आहे तिच्या पासंगालाही उभं राहण्याची या धनवंतांची योग्यता नाही. आपण विचारवतांना मानतो, याचे भव्य प्रदर्शन हा या पुतळानिमितीमागचा त्याचा हेतू आहे. त्या महान व्यक्तीचा गौरव करण्याच्या निमित्ताने त्यांनी स्वतःचीच नावे लिहून, स्वतःचाच गौरव करून घेतला आहे. खरं सांगू, माझ्या अनावरणाचा तो दिवस माझ्या जीवनातील सर्वांत आनंदाचा दिवस असावयास हवा होता, पण तोच माझ्या दुःखाचा दिवस ठरला. कारण तेव्हापासूनच माझी ही विटंबना सुरू झाली आहे.”

"उन्हापावसात मी येथे तटस्थपणे उभा आहे. माझ्याभोवती अनेक थोर व्यक्तीही माझ्यासारख्याच पुतळ्यांच्या रूपांत उभ्या आहेत. अंगावर कावळे, चिमण्या व इतर पाखरे घाण करीत आहेत. पण याहूनही मला उबग आला आहे तो काही लोकांच्या हीन वृत्तीचा. या लोकांच्या विघातक गोष्टींपूढे पक्ष्यांनी केलेल्या घाणीचे काहीच वाटत नाही. समाजकंटक लोकांची ही कुटिल कृत्ये पाहून मन बेचैन होते, पण मी काय करणार? बोलूनचालून मी एक पुतळा!" एवढं बोलून तो आवाज बंद झाला आणि तो बोलणारा पुतळा पुनश्च मूक पुतळा झाला.

वरील निबंध एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद



एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Eka Putlyache Manogat Essay In Marathi

दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Darveshache Manogat Essay In Marathi


दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : “मी आहे एक दरवेशी. दारोदार हिंडणारा. बरोबर आहे माझा सारा कुटुंबकबिला. त्यांत मुख्य आहे भालू-म्हणजे हे माझे काळे अस्वल. नंतर माझी पत्नी आणि माझी दोन चिल्लीपिल्ली. सध्या तरी हा भालूच आम्हां सर्वांचा पोशिंदा आहे.


"माझ्या वाडवडिलांकडून हा व्यवसाय माझ्याकडे आला. माझा बापही दरवेशीच होता. त्याच्याबरोबर मी लहानपणी गावोगाव हिंडत असे. मी केव्हा मोठा झालो आणि ही अस्वलाची दोरी माझ्या हातात कशी आली हे मला उमगलेच नाही. बाप थकला होता, तरीही आमच्याबरोबरच हिंडत होता. कारण आम्हांला कायमचं असं घरच नाही. अशाच भटकंतीत कुठेतरी बापाला मरण आलं. तिथेच त्याला अग्नी दिला.

“लोकहो, हेच माझे दुःख आहे. कसले हे जगणे! पाय दुखेस्तोवर आम्ही चालत राहतो. गाव लागला की खेळ करतो. कधी कुठे बरी मिळकत होते तेव्हा आम्ही भालूला प्रथम पोटभर खायला घालतो. भालूला सर्व भाजीपाला आवडतो. पण मांस खायला मिळाले की स्वारी खूष. भालूला सर्वांत प्रिय म्हणजे 'मध.' मी त्याला सणावारी भरपूर मध खायला घालतो. आमची चार माणसांची गूजराण बहधा होते ती वडापावांवर. जेव्हा एखादया गावात आमचा मुक्काम असतो तेव्हाच आम्ही तीन दगडांची चूल पेटवितो आणि त्याच वेळी पोरांना भाकरी मिळते.



darveshache manogat essay in marathi
darveshache manogat essay in marathi


“लोकहो, आता मला या भटक्या जीवनाचा कंटाळा आला आहे. पण मी दुसरे कोणतेच काम करू शकत नाही. मी पूर्णपणे अडाणी आहे. मला कधी शिकायला मिळाले नाही. या अस्वलाबरोबरच मी मोठा झालो. म्हणून त्याच्याबरोबर नाचणे, उड्या मारणे एवढेच मला जमते. आज त्याचीच शिक्षा मी भोगत आहे. वर्षातील एकही दिवस मला पोटभर जेवण मिळत नाही. लोक खेळ बघायला गर्दी करतात, 


अस्वलाचे काम पाहून टाळ्या पिटतात. पण पैशासाठी थाळी फिरविली की मात्र पळ काढतात. काही खेड़त लोक अस्वलाच्या केसांचा ताईत विकत घेऊन आपल्या लेकरांच्या गळ्यात घालतात. खरं सांगू का! माझा काही या ताईतांवर विश्वास नाही, तरी पण मी ताईत तयार करून विकतो. कारण त्यांतच मला मिळकत होते. चार आणे खर्च येणारा ताईत मी दोन रुपयांना विकतो.

“मायबाप लोकहो! माझं तुमच्याकडे एकच मागणे आहे. आता मी असं ऐकतो की भटक्या लोकांच्या  मुलांसाठी सरकार शाळा काढणार आहे. मला माझ्या या दोन्ही मुलांना शिकवायचे आहे. त्यांच्या तरी नशिबी हा दरवेशीपणा नको. निघाली आहे का अशी शाळा? तिथं माझी ही कोकरं राहतील! मग त्यांच्यासाठी कितीही कष्ट करायला लागले तरी मी व माझा भालू करू. अगदी शेवटपर्यंत मी आणि भालू एकमेकांना सोडणार नाही.

वरील निबंध दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Darveshache Manogat Essay In Marathi


भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध  आत्‍मकथनात्‍मक

Autobiography of An Old temple in Marathi essay

भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध  आत्‍मकथनात्‍मक : सुट्टी लागली म्हणून आम्ही काही मित्र आमच्या एका मित्राच्या गावी गेलो. शहरापासून दूर अशा त्या शांत गावात आम्हांला खूपच बरे वाटत होते. मोकळ्या वातावरणात दूरदूर फिरताना एक आगळा आनंद मिळत होता. अशाच भटकंतीत एका गर्द वनराईत एक देऊळ आढळले. कुतुहलाने देवळात शिरलो आणि मन विषण्ण झाले. कारण ते देऊळ भंगलेले होते. केवळ देवळाचीच पडझड झालेली नव्हती, तर आतील मूर्तीही भग्न झाली होती. हे कोणातरी मूर्तिभंजकाचे काम असावे, हे सहज लक्षात येत होते. माझ्याबरोबरचे सर्वच मित्र खिन्न झाले. हे कोणाचे कृत्य असावे बरे? सारेजण विचारात पडले. तेवढ्यात एक गंभीर आवाज निनादला.

Autobiography of An Old temple in Marathi essay
Autobiography of An Old temple in Marathi essay
"ऐका युवकांनो, तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देते. मी कोण? तुमची श्रद्धा असलेला 'राम' हा देव आहे ना, त्याची मी प्रतिमा. खूप वर्षांपूर्वी एका भाविकाने माझी येथे प्रतिष्ठापना केली. मोठ्या भाविकतेने त्याने राजस्थानातून मला येथे आणले. दूरवरून कारागीर आणून हे सुंदर मंदिर उभारले. सभोवताली गर्द वनराजी लावली. गावातील लोक भक्तिभावाने माझी पूजा करीत. सर्व मंडळी गुण्यागोविंदाने नांदत होती तोवर मी वैभवात होते. धर्म, जात, पंथ येथे आड येत नव्हते. सर्व माणसे देवाला सारखीच, तसा सर्वांचा ईश्वरही एकच. केवढी थोर भावना.

“गावात कुणी बाहेरचे लोक येऊ लागले. त्यांच्याबरोबर अनेक नवे विचार गावात येत गेले, कुरबूरी सुरू झाल्या. भांडणे होऊ लागली, ती वाढली आणि विकोपाला गेली. माझा धर्म इतरांच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ असे प्रत्येकाला वाटू लागले. मग कुणी वेड्यापीराने माझी अशी दुर्दशा केली. येथे रणकंदन माजले. अनेकांचे बळी पडले आणि या मंदिराचीही मोडतोड झाली. तेव्हापासून लोक येथे फिरकत नाहीत. तुम्ही येथे आलात म्हणून मी मन मोकळे केले.
वरील निबंध भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Autobiography of An Old temple in Marathi essay

स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक


स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : “अरे अज्ञ मुलांनो, जरा इकडे लक्ष दया. मला बोलू दया. माझे डोळे तुमचे हे सहस्र अपराध पाहन आता थकले आहेत. ओळखलंत ना मला! मी आहे तुमची 'स्वातंत्र्यदेवता.' आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत असे तुम्ही केवढे अभिमानाने सांगता. तेव्हा क्षणभर मी रोमांचित होते, पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या तुम्हांला पाहिले ना की, मी व्यथित होते.



 मला प्राप्त करण्यासाठी तुमच्या काही बांधवांनी प्राणांची बाजी लावली. आठवा त्यांचा त्याग! केवळ 'हुतात्मे' म्हणून वर्षातून एक दिवस त्यांचे स्मरण करून तुमचे त्यांच्याविषयीचे कर्तव्य संपत नाही. माझी प्राप्ती करून घेण्यासाठी ज्या माझ्या एका सपत्राने प्राण दिले त्याची दुर्दैवी पत्नी आज चार घरची भांडीधुणी करून आपले व आपल्या चार मुलांचे कसेबसे पोट भरीत आहे. तरी का तुम्हांला याची जाण? आयुष्यभर महात्माजी कष्टले, ते कशासाठी? आपल्या संसाराचा सारिपाट उधळून स्वातंत्र्यवीर झिजले ते कशासाठी? आपल्या साऱ्या वैभवाचा त्याग करून पंडितजींनी कारावासातील कष्टप्रद जीवन पत्करले, ते कशासाठी? माझ्यासाठीच ना?



swatantratechi kaifiyat essay in marathi
swatantratechi kaifiyat essay in marathi
आजचे माझे पुत्र-पुत्र कसले कुपूत्र. तुम्ही माझा-स्वतंत्रतेचा लिलाव करायलाच उदयुक्त झाला आहात का? प्रत्यक्ष आपल्या मातेची अशी विटंबना करणारे साऱ्या पृथ्वीवर कूणी नसतील. नाहीतर मूठभर पैशासाठी आपल्या देशाची रहस्ये विकायला माझेच हे सुज्ञ पुत्र कसे तयार झाले असते? कुणीतरी भडकविले म्हणून माझेच तुकडे करायला हे माझे दिवटे पुत्र कसे तयार झाले असते?


स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रयींचा सदैव जप करणारे तुम्ही दुसऱ्याला गुलामीत कसे ठेवता? घरातील स्त्रीला तुम्ही स्वातंत्र्य देत नाही. कुणाला तरी आपला ऋणको समजून त्याला पिढ्यान्पिढयाचा गुलाम करता, कूणाला तरी जन्माने दलित मानून त्याला बंधनात टाकता, स्वतःची हौस म्हणून स्वच्छंदी पक्ष्यांना, माशांना पिंजऱ्यांत टाकता. हे कसे? हीच माझी तुमच्याविरुद्ध कैफियत आहे.
वरील निबंध स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक

सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक 


सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : "माझ्या काठावर जमलेल्या मुशाफिरांनो, क्षणभर येथे थांबा आणि माझे मनोगत ऐकून घ्या. आजवर अनेकदा मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत. शेवटी मलाही मर्यादा आहेतच ना!


“मानवा, महासागर म्हणून तू माझे कौतुक करतोस. रत्नाकर' म्हणून मला संबोधून माझ्या वैभवाचा गौरव करतोस तरीपण हे मानवा, माझ्या उणिवा मी जाणतो. माझ्या काठी आलेल्या तुझी तहान मी भागवू शकत नाही. माझे पाणी खारट आहे म्हणून तुम्ही सर्वजण मला नावे ठेवता. पण हा खारटपणा माझ्यात का उतरला माहीत आहे तुम्हांला? 


साऱ्या जगाची सारी घाण, सारे क्षार मी सामावून घेतो. धर्म, जात, पंथ, वर्ण इत्यादी कारणांवरून तुम्ही झगडता; पण तसा भेदभाव माझ्याकडे नाही. तुमच्या श्रीगजाननांच्या मूर्तीना मी माझ्यात सामावून घेतो, त्याचप्रमाणे इस्लाम बांधवांचे ताबूतही माझ्यातच समर्पित होतात!


sagarache manogat marathi nibandh
sagarache manogat marathi nibandh


“मनुपुत्रांनो, तुम्ही मला कितीही नावे ठेवलीत ना, तरी तुम्ही माझे लाडके आहात! म्हणूनच तुमच्या साऱ्या लीला मी आजवर सहन केल्या. तुमच्यातल्या एका कवीने माझी निदानालस्ती करताना म्हटले आहे की, हा पयोधर पाणी साठवून ठेवतो म्हणून त्याचे स्थान खाली आहे आणि पयोद पाणी देतो म्हणून त्याचे स्थान उंचावर, आकाशात आहे. पण या मूर्ख कवीला हे माहीत नसावे की, पयोधर आहे म्हणूनच पयोद आहे. बरे असू दे ते. मला आज तुमच्याशी बोलायचे आहे ते वेगळेच. 


मानवा, आजवर तू समुद्रमंथनाची कथा केवळ कौतुकाने सांगत होतास. पण आज मात्र तु खरोखरच माझे मंथन चालविले आहेस. देवकथेतील चौदा रत्नांपेक्षाही अधिक अमूल्य, या औदयोगिक युगाला आवश्यक असे इंधन तुम्ही माझ्या अंतःकरणातून बाहेर काढले. तुमच्या बुद्धिवैभवाचे मला सदैव कौतुक वाटते. म्हणूनच यंत्रांकडून घुसळले जाण्याचे सर्व दुःख मी सहन करतो. तुमच्या साहसाने मी दिङ्मूढ होतो. तुमच्यातील काहीजण वर्षानुवर्षे माझ्या उदरात दडलेल्या अंटाक्टिकावरही पोहोचले आहेत.

"अभिमानास्पद वाटणाऱ्या या घटना घडतानाच पुढच्या काही अशुभ घटनांची मला चाहूल लागत आहे. अंटाक्टिका खंडावरील अधिवासाबाबतचे झगडे आताच सुरू होऊ लागले आहेत. हिंदी महासागरावरील तुमची ही सशस्त्र आरमारी जहाजे पाहून माझे अथांग मनही व्यथित होते. मानवांनो, हे थांबवा. आपापसांत भांडू नका. अरे या महासागराजवळ अमाप संपत्ती आहे, त्याचा उपभोग सर्वांनी घ्या."
टीप : वरील निबंध सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

  • सागराचे मनोगत निबंध मराठी
  • समुद्राचे मनोगत मराठी निबंध
  • सागराचे आत्मकथन मराठी
  • समुद्राचे आत्मवृत्त निबंध
  • sagarache manogat marathi nibandh
  • samudrache manogat marathi nibandh

सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | sagarache manogat marathi nibandh

एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | shetkari manogat in marathi essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध shetkari manogat in marathi essay आत्‍मकथनात्‍मक या विषयावर निबंध  बघणार आहोत . शेतकरी हा जगाचा पोशींदा आहे तो स्‍वता अहोरात्र मेहनत करून पिक घेत्‍याचा प्रयत्‍न करतो पण सरतेशेवटी त्‍याचे हे प्रयत्‍न अस्‍मानी किंवा सुलतानी संकटांनी प्रयत्‍न वाया जातात , 

सरकार शेतकऱ्याची करू इच्‍छीते पण ती मदत खरच शेतकरऱ्यापर्यंत पोहचते का ? या सर्वांचा परीणाम म्‍हणुन शेतकरी कश्‍याप्रकारे आपले मत व्‍यक्त करतो याचे वर्णन याचे वर्णन एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध या निबंधात केले आहे. चला तर मग  निबंधाला सुरुवात करुया. 

निबंध लिहीताना लक्षात घ्‍यावयाचे मुद्दे  

  • बिकट अवस्था 
  • अवर्षणाची किंवा अतिवृष्टीची टांगती तलवार 
  • कृषिप्रधान देश 
  • शासनाची तुटपुंजी मदत
  • संरक्षण नाही
  • पुरेशा साधनसामग्रीचा अभाव 
  • बाजारात अनेक अडचणी
  • उत्पादनास योग्य भाव मिळत नाही
  • परिणामी शेतकरी गरीब, कर्जबाजारी
  • आत्महत्येसारख्या घटना
  • शेतकरी सुखी, तर देश सुखी


"लोकहो, मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी या भूमीचा पुत्र आहे. ही माती माझी आई आहे. वर्षानुवर्षे शेतात खपून, घाम गाळून मी धान्य पिकवतो. मी तुम्हां सर्वांचा नम्र सेवक आहे. आज मी तुमच्यापाशी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. "आपला हा देश कृषिप्रधान आहे. 'कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला. हेतू हा की, शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा खऱ्या अर्थाने मालक व्हावा. 

शेतकऱ्यांची सावकाराकडून होणारी पिळवणूक बंद करण्यात आली व बँकांमार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली. या साऱ्या गोष्टींचा गाजावाजा भरपूर झाला. पण सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना खरोखरीच पोहोचल्या आहेत का, याची कुणी कधी खात्री करून घेतली आहे का? त्यातच निसर्गाचा लहरीपणा, कधी अवर्षण तर कधी अतिवर्षाव..



shetkari manogat in marathi essay
shetkari manogat in marathi essay

 "हल्ली खेडेगावांतून धनदांडग्यांचा, म्हणजेच सधन शेतकऱ्यांचा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. सारे फायदे हा वर्ग गिळंकृत करीत आहे. हेच लोक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून सरकारी सोयीसुविधा मिळवतात, मानसन्मान पटकावतात आणि गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करतात. त्यामुळे धनिक शेतकरी अधिक श्रीमंत होत आहेत; तर गरीब शेतकरी हा अधिकच कंगाल जीवन जगत आहे.

 गरीब शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाला काही वेळा योग्य भाव येत नाही. मग तो त्या च्या  गरजा भागवण्यासाठी कर्ज घेतो व कर्जबाजारी होतो. मग कर्जफेड कशी करणार? हप्त्यांचा तगादा लागतो. जेव्हा  शेतकरी दुष्काळग्रस्त (dushkal grast ) होतों तेव्हा् त्याच्यावरील संकट अधिकच मोठे होते. शेवटी काहीजण आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात, कर्जबळी ठरतात.

"स्वतःचे शेत नसलेल्या मजुराचे हाल तर विचारूच नका. त्याला धड मजुरीदेखील दिली जात नाही. त्याला वेठबिगारासारखे राबवून घेतले जाते. पावसाळ्यात हे शेतमजूर कसे जगतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे? सारे राष्ट्र ज्यांच्या कष्टावर जगते तो गरीब शेतकरी उपाशी आहे, याची देशवासीयांना कल्पनाही नसेल.


"या सामान्य शेतकऱ्यांकडे व शेतमजुरांकडे सरकारने तसेच शहरी नागरिकांनी देखील लक्ष देणे आवश्यक आहे. खरे भूमिपुत्र असलेले आम्ही गरीब आहोत. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हांलाही मानाने जगू दया. 'जय जवान, जय किसान' ही घोषणा सार्थ होण्यासाठी योग्य असे जीवन आम्हा सामान्य किसानांना लाभू दया, एवढीच आमची मागणी आहे." 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. खालील निबंंध नं 2 पण वाचु शकता धन्‍यवाद .



Essay no 2 

निबंध क्रमांक २

एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | shetkari manogat in marathi essay


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध क्रमांक २  Shetkari Manogat in Marathi Nibandh no 2 ३५० शब्दात  या विषयावर निबंध  बघणार आहोत . वरील निबंधापेक्षा या निबंधात वेगळी माहीती दिलेली आहे . चला तर मग सुरू करूया निबंधाला.  


 “लोकहो, आज तुम्ही येथे जमला आहात ते देशाचा प्रजासत्ताकदिन साजरा करण्यासाठी, हे मला माहीत आहे. मलाही या दिवसाचा, आपल्या राष्ट्राचा पुरेपूर अभिमान आहे. पण आज मी येथे उभा आहे तो वेगळ्या उद्देशाने. माननीय मुख्यमंत्री यांच्याकडून मी मुद्दाम ही परवानगी मिळविली आहे. मी हाच दिवस, हाच समारंभ निवडला त्यांतही माझा खास हेतू आहे. आज येथे जमलेले लोक देशाचे-पर्यायाने देशवासीयांचे हितचिंतक आहेत. 

आज येथे देशातील कानाकोपऱ्यातून वृत्तपत्रांची मंडळी उपस्थित राहिली आहेत. त्या सर्वांपुढे आपले मनोगत व्यक्त केले की, ते देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल अशी मला खात्री आहे, आणि म्हणूनच माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी मी येथे उभा आहे.

“आपला देश हा कृषिप्रधान देश आहे, असा तूम्ही थोरमंडळी वारंवार उल्लेख करीत असता. स्वातंत्र्योत्तर काळात औदयोगिक क्षेत्रात देशाचा विकास करण्याचे योजनापूर्वक प्रयत्न झाले. त्याचवेळी शेतकऱ्यालाही काही सवलती देण्यात आल्या. कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला. हेतु हा की, शेतात राबणारा शेतकरी जमिनीचा मालक व्हावा. कर्जमाफी देण्यात आली, सावकारी बंद करण्यात आली व बँकांमार्फत शेतकऱ्यांना मदत देऊ करण्यात आली. या साऱ्या गोष्टी केल्याचा गाजावाजा भरपूर झाला. पण खरोखरीच सामान्य शेतकऱ्यांपर्यंत या साऱ्या योजना पोहोचल्या आहेत का? याची शासनाने वा कुणी नेत्याने कधी खात्री करून घेतली आहे का?

"काही वर्षांपासून आमचे महाराष्ट्र सरकार हरितक्रांती झाल्याचे आनंदाने जाहीर करीत आहे. पण ही हरितक्रांती आणि तिच्यातून आलेले वैभव कोणाकडे गेले? हल्ली खेडेगावांतून एक नवा वर्ग निर्माण झाला आहे आणि तो म्हणजे 'धनिक शेतकरीवर्ग.' सारे फायदे हा वर्ग स्वतःसाठी उचलत आहे. वेगवेगळया नावांखाली ते सरकारी मदती मिळवितात, मानसन्मान पटकवितात, आमदार-खासदार बनतात आणि गरीब शेतकऱ्यांना चिरडून टाकतात. त्यामुळे धनिक शेतकरी अधिक धनिक होत आहेत तर गरीब शेतकरी या धनिक शेतकऱ्यांचे गुलाम होत आहेत, नष्ट होत आहेत.

“या सामान्य शेतकऱ्याकडे सरकारने, शहरी नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच हे आत्मवृत्त जाणुन घेऊन सरकारणे त्‍यावर उपाय शोधने आवश्‍यक आहे. आमचे हे मनोगत मी आपल्यापर्यंत पोहोचविले आहे. स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आम्हांलाही मानाने जगु दया, एवढीच आमची मागणी आहे."

Essay no 3 

निबंध क्रमांक 3

eka shetkaryache atmavrutta


 वर्तमानपत्र उघडले की शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी हल्ली रोजच आढळते. मन सुन्न होते . भारत हा कृषीप्रधान देश . शेत आणि शेतकरी यातून 'सुजलाम् सुफलाम्' ची वाटचाल सुरू असतांना धडाधड शेतकरी आत्महत्या का करीत आहेत? प्रश्नांची आवर्तनं हृदयाला घरे करू लागली . एक शेतकरी आपली व्यथा सांगतोय असं वाटलं अन् आवाज आला


“मी एक सामान्य शेतकरी. एक भूमिपुत्र. भूमी ही माझी माता. तिच्यावर माझे अगाध प्रेम आहे. तिच्याच कुशीत जन्मलो, खेळलो, बागडलो, मोठा झालो. तिनेच अन्न दिले , पाणी दिले. पण दिवसेंदिवस स्थिती बिकट होत चालली आहे. वरुणराजा लहरी झाला आहे. लहरी पावसाने दगा दिला आहे. अवर्षणाचे सावट पसरले आहे. 


आभाळाबरोबर डोळ्यातले ही पाणी आता आटले आहे. दुष्काळाची भीषणता गिळून टाकत आहे. कर्जाचा डोंगर मुद्दलापेक्षा दुप्पट व्याजाने जीवघेणा झाला आहे. उपाशी बायका-पोरांना बघवत नाही. हाडं हाडं झालेली जनावरं मुक्यानंही खूप काही सांगत असतात. सणासुदीला नवा कपडा तर सोडाच पण अंगभर कपडाही नशिबी नाही. घराच्या भिंतीला ठिगळं, कपड्यांना ठिगळं असं भिकार जीवन...खर सांगू? सारं सारं असहय झालं.... अगदी जीव पार गुदमरून गेलाय.... आता सांगा, आत्महत्या करावीशी वाटणार नाही तर काय करायचे?


वर्षानुवर्षे दिवस उजाडल्यापासून ते मावळेपर्यंत कष्ट करूनही अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण होत नाहीत. गरीबी पाचवीला पुजलेली तशीच आजन्म बरोबर ..... यासारखं दुर्दैव ते कोणतं?''
"स्वातंत्र्याची पहाट झाली पण आमच्या जीवनातला काळोख दूर झाला का? शेतकऱ्यांना सवलती दिल्या गेल्या. कर्जमाफी देण्यात आली . बँकामार्फत शेतकऱ्यांना कर्ज मिळू लागले. 'कसेल त्याची जमीन' असा कायदा झाला.

हरितक्रांती कोणाला समृद्ध करून गेली? या साऱ्या योजना सामान्य व गरीब शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचल्याच नाहीत. सधन शेतकऱ्यांनीच या योजनांचा लाभ उठवला. बिचारा खरा कष्टकरी शेतकरी घाम गाळत कर्जाच्या विळख्यात अडकतच गेला. धनिक शेतकऱ्यांचा तो गुलाम झाला. अर्धवस्त्र व अर्धी भाकरी देणारं हे जीवन अर्धवट सोडायला तो तयार झाला; यात नवल काय? "भ्रष्टाचार, अज्ञान व महागाई यामुळे आम्हा शेतकऱ्यांचे जिणे कठीण झाले .


कर्ज ' वाढत चाललंय.... खूप सहनशक्तीनं सगळं रेटलं चतकोर कोरडी भाकरही पाण्याबरोबर गिळली. ओठांवर विठूचं नाव अन् शेतात अहोरात्र काम . पण.... सारं सारं करूनही माझी झोळी रितीच... निसर्गाचा कोप, तुटपुंजा पैसा, कर्जबाजारीपणा, कुटुंबाचे हाल या साऱ्यांना आता कोणतंच उत्तर राहीलं नाही म्हणून मीच संपलो....."


"एक भयाण सत्य... चिरंजीव शेतीत मरणारा मी शेतकरी...शेतकरी सुखी तर देश सुखी असं म्हणताना माझ्यासारख्या शेतकऱ्यांचे हाल तुमच्या मनाला का दिसत नाहीत? माझ्यासारखे असंख्य बांधव आहेत. त्यांना तरी वाचवा! शेतकरी अर्थव्यवस्थचा कणा आहे. मग त्याच शेतकऱ्याच जीवन जर समाधानी नसेल तर अर्थव्यवस्थेचे कोणते नगारे तुम्ही बडवणार आहात?


जुने तंत्रज्ञान व पारंपारिक शेतीपध्दती बरोबर आज नवतंत्रज्ञान आहे, हरितक्रांतीकडून जैव क्रांतीकडे वाटचाल होत आहे. कृषि-विस्तार, उत्पादन क्षमतावाढीचे प्रयत्न होत आहेत . मूठभर शेतकऱ्यांचा फायदा होतो तो ही सधन असणाऱ्यांचा माझ्यासारखे उपेक्षित राहतात.'

मृत्यूच्या दारातही दारिद्र्य माझ्यासोबत होते.... माझी व्यथा माझ्याबरोबर संपलेली नाही....माझ्या बांधवांच्या अश्रूतून ती झिरपते आहे. भारतमातेच्या पुत्रांनो , अजूनही जागे व्हा . विचार करा- डोळसपणे! शासनाची मदत व तुमची धडपड खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचू द्या . त्यांचे अज्ञान दूर करा. शिक्षण द्या. शेतीबरोबर पशुपालन , मत्स्यशेती , कुटिरोद्योग , जलसिंचन सुविधा यांची माहिती द्या . 

दारिद्रय , उपासमार व कर्ज यांनी थकलेला शेतकरी दारूच्या व्यसनात जीवन बरबाद करतो. वाया जातो , यापासून त्याला परावृत्त करा . त्याला जगू द्या . मरणाच्या खाईत ढकलू नका . 'जय जवान जय किसान'चा खरा मान त्याला द्या. तरच देश समृध्द होईल . समृध्दता मातीतून उगवते . त्या मातीच्या लाडक्या पुत्रास समाधानी जीवनही प्राप्त होऊ नये ही एक शोकांतिका आहे .''

टीप : वरील निबंध एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते. 
  • marathi composition on shetkaryachi atmakatha

एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | shetkari manogat in marathi essay

बहिष्कृत व्यक्तीची आत्मकथा मराठी निबंध किंवा बहिष्कार? छे! कसोटी मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक


बहिष्कृत व्यक्तीची आत्मकथा मराठी निबंध किंवा बहिष्कार? छे! कसोटी मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक" : आजचा दिवस आपल्या जीवनात कधी उजाडेल असं मला वाटलंच नव्हतं! आज या गावाचा सरपंच म्हणून माझी एकमताने निवड झाली. केवढा मोठा हा विश्वास गावकऱ्यांनी माझ्यावर टाकला आहे! आज मी साठीच्या उंबरठ्यावर आहे. चाळीस वर्षांपूर्वीचा गाव आजही माझ्या नजरेसमोर स्पष्ट दिसत आहे. पण गावाने त्यावेळी मला दिलेली कटू वागणूक मात्र मी आता पूर्णपणे विसरून गेलो आहे.


"त्यासाठी मी माझ्या गावकऱ्यांना दोष देणार नाही. तो काळच तसा विचित्र होता. थांबा! मी तुम्हांला माझी कर्मकहाणीच सांगतो. मी या गावातील एक श्रीमंत जमीनदार घराण्यात जन्मलो. समाजातील श्रेष्ठ वर्ग म्हणून स्वतःला गौरवून घेणाऱ्या जातीत जन्मल्यामुळे मला उच्च शिक्षण मिळाले. शहरात शिकत असताना माझी मैत्री झाली, ती समाजाने अस्पृश्य मानलेल्या वर्गातील एका दोस्ताशी. त्यामुळे त्या वर्गातील अभागी लोकांच्या जवळ मी जाऊ शकलो, त्यांची दुःखे जाणू शकलो. आणि शिक्षण पूर्ण करून परत आलो ते निश्चित ध्येय ठरवूनच.


bahiskar essay in marathi
bahiskar essay in marathi

"मी गावातील अस्पृश्य वस्तीत काम करू लागलो. तेथे जाऊ-येऊ लागलो. त्यांच्याबरोबर जेवु लागलो. हे माझ्या घरातील, माझ्या जातीतील लोकांना कसे रुचणार? त्यांनी मला साम, . दाम, दंड सर्व मार्गांनी वळविण्याचा यत्न केला. पण मी एकच जात मानत होतो, ती म्हणजे 'मानव जात.' शेवटी माझ्या घराची दारे मला बंद झाली. माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या मागासवर्गातील एक मुलगीच मी माझी सहधर्मचारिणी म्हणून निवडली. त्यामुळे गावानेही मला बहिष्कृत केले.



"त्या काळातील माझे जीवन ही माझी कसोटीच होती. आगीत उजळून निघणाऱ्या सोन्याचे अग्निदिव्य मी अनुभवीत होतो. घर ना दार, खाली जमीन वर आकाश. खिशात फारसे पैसे नसत. जवळ एकच गोष्ट होती 'दुर्दम्य आशावाद' आणि सतत साथ देणारी पत्नी व दोन-चार सच्चे दोस्त. न कंटाळता सर्व छळ सहन करीत मी माझे कार्य करीत राहिलो. वर्षा हीन जीवन जगणाऱ्या या माणसांच्यातील माणूस जागा करण्याचा यत्न केला. हळूहळू यश येत होते. गावकुसाबाहेरच्या त्या माणसांनीही जेव्हा काही भरीव कामगिरी केली, तेव्हा गावाचे लक्षही गावकुसाबाहेरील त्या लोकांकडे जाऊ लागले. निवडणूक न होता आज जेव्हा माझी सरपंच म्हणून निवड झाली, तेव्हा मनात आले, याच गावाने मला बहिष्कृत केले होते ना! नाही, गाव माझी कसोटी घेत होता, हेच खरे!"

वरील बहिष्कृत व्यक्तीची आत्मकथा मराठी निबंध किंवा बहिष्कार? छे! कसोटी मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

बहिष्कृत व्यक्तीची आत्मकथा मराठी निबंध किंवा बहिष्कार? छे! कसोटी मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक


जुन्या वटवृक्षाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक


जुन्या वटवृक्षाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक: आमचे खेडेगाव जेव्हा कात टाकू लागले, म्हणजे ते जेव्हा शहर बनू लागले तेव्हाची ही गोष्ट. आमच्या या खेडेगावाच्या आसपास कारखाने निघाले, गावात शाळा-कॉलेज निघाली आणि माणसांची गर्दी वाढू लागली. त्यामुळे मोठ्या रस्त्यांची आवश्यकता निर्माण झाली आणि मग गावातील हिरव्या संपत्तीची तोड सुरू झाली. नवनिर्माणाचा दावा करणारे ते लोक एका वटवृक्षाजवळ आले आणि काय नवल! त्या वृक्षातून गर्जना झाली-“दूर व्हा, कृतघ्न ग्रामस्थांनो, निर्दय उपन्यांनो!' क्षणात वृक्षतोडीचे ते काम थबकले. आश्चर्याने सर्वांनी कान टवकारले. पुन्हा तो गंभीर आवाज येऊ लागला

“लोकहो, मी या गावचा पुराणपुरुष आहे. हे गाव वसले आहे माझ्या दृष्टीसमोर. मी येथे केव्हा आलो, कसा आलो ते येथील गावकऱ्यांना देखील माहीत नाही. हे गाव वसण्यापूर्वी योगायोगाने एक संत येथे आला होता, तेव्हा येथे ओसाड माळरान होते. पण ही निर्जन जागा त्याला आपल्या तपश्चर्येसाठी योग्य वाटली. तपाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी माझे बाळरूप येथे आणले आणि या भूमीत मला येथे स्थानापन्न केले.


 तेव्हापासून आजपर्यंत जवळजवळ शेकडो पावसाळे मी पाहिले. परमेश्वराच्या या जलदानाशी मी कृतज्ञ राहिलो. भूमातेकडून मिळणारे पोषण आणि वरुणदेवतेचा आशीर्वाद यामुळे मी अंगोपांगातून बहरत राहिलो. आता तर माझ्या या लोंबणाऱ्या जटा माझ्या वृद्धत्वाच्या पताका फडकवीत आहेत. मी पुराणपुरुष असलो तरी कमकूवत नाही. माझे सामर्थ्य तसूभरही कमी झालेले नाही.

zadache manogat essay in marathi
zadache manogat essay in marathi


“लोकहो, आपलेच कौतुक आपल्या तोंडून सांगणे योग्य नाही हे मला माहीत आहे; पण माझ्या उच्चाटनासाठी येथे गोळा झालेल्या तुम्हा अविचारी लोकांना मला जागे केलेच पाहिजे. मित्रांनो, मी केवळ एक जुना वृक्ष नाही, तर मी या गावाचा संरक्षक आहे. हितकर्ता आहे. या गावाचा जन्म, या गावाचा विकास, या गावाचे आजचे स्वरूप सारे माझ्या साक्षीने झाले आहे. सुरुवातीला दोन-चार गरीब कुटुंबांनी येथे वास्तव्य केले. 


पण गावात त्यांनी प्रवेश केला तो माझे पूजन करून व आपल्या कुटुंबातील पुराणपुरुष असेच ते मला मानीत. कोणतेही नवीन कार्य करण्यापूर्वी ते माझा आशीर्वाद घेत आणि मग ही प्रथा पिढ्यान्पिढ्या चालू राहिली. कोणतीही नवीन गोष्ट करताना गावकरी प्रथम माझ्याजवळ येत व माझा कौल घेत.

"मी आयुष्यभर गावासाठी खपलो. सर्व गावकऱ्यांना आणि गावात येणाऱ्या पाहण्यांना सावली दिली. केवळ माणसेच नाही, हजारो पक्षी नित्यनियमाने माझ्या अंगाखांदयावर आश्रय घेतात. दूरवरच्या वार्ता मला ऐकवितात. गावातील सारी मुले माझ्यावर सुरपारंब्या खेळत मोठी झाली. दरवर्षी कित्येक सुवासिनी वटपौर्णिमेला माझी पूजा करून अखंड सौभाग्याची मागणी करतात.



“लोकहो, याहून एक मोठे काम मी या गावासाठी करीत असतो. माझ्या उंच उंच गेलेल्या आणि दूरवर पसरलेल्या फांदयांनी मी वरुणराजाला आवाहन करतो. त्यामुळे या गावाला दुष्काळाचे संकट भेडसावत नाही. लोकहो, मला तुम्हांला हीच जाणीव करून दयायची आहे की तुम्ही गावाला नवे रूप देताना असलेल्या जुन्या वृक्षांची तोड करून एक प्रकारे अवर्षणालाच आमंत्रण देत आहात. त्यापेक्षा सुंदर गावाच्या निर्मितीसाठी अधिकाधिक झाडे लावा.” इतके बोलून तो धीरगंभीर आवाज बंद झाला आणि झाडाभोवती जमलेले लोक दूर झाले ते अधिक झाडे लावण्याच्या निश्चयानेच!"

टीप : वरील जुन्या वटवृक्षाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • vruksha che manogat essay in marathi language
  • zadache manogat essay in marathi
  • vruksha che manogat marathi nibandh
  • eka zadachi atmakatha essay in marathi
  • trees atmakatha in marathi
  • vruksha che atmavrutta nibandh in marathi
  • mi vruksha boltoy marathi nibandh
  • mi jhad boltoy essay in marathi
  • mi zad boltoy marathi nibandh
  • वृक्षाची आत्मकथा निबंध
  • वटवृक्षाची आत्मकहाणी निबंध लेखन
  • वट वृक्षाची आत्मकथा मराठी
  • झाडाचे आत्मवृत्त निबंध मराठी
  • मी वृक्ष बोलतोय आत्मकथन



जुन्या वटवृक्षाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक

वृक्षारोपणात लावलेल्या रोपट्याचे आत्मवृत्त मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक

vruksharopanat lavlelya ropatyache atmavrutta essay in marathi



वृक्षारोपणात लावलेल्या रोपट्याचे आत्मवृत्त मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक: “शुक् शुक्, शुक् शुक्. अरे मुलांनो, जरा इकडे या. अरे तुम्ही कोणत्या कामासाठी निघाला आहात ते मला माहीत आहे. यंदाच्या वनमहोत्सवात झाडे लावण्यासाठी तुम्ही निघाला आहात, हे तुमच्या हातांतील त्या कोवळ्या रोपांवरून आणि तुमच्या उत्साहावरून मी जाणते. मला पण येथे तुमच्यासारख्या मुलांनीच चार वर्षांपूर्वी लावले होते.


“आजही तो दिवस मला चांगला आठवतो. वनसप्ताह चालू होता. तेव्हा विदयमान काळात वृक्ष लावणे किती आवश्यक आहे हे तुमच्या गुरुजींनी तुम्हांला पटवून दिले होते. मग तुमच्या कोवळ्या हातांनी माझे येथे रोपण झाले होते. त्यावेळी मी पण अतिशय नाजूक होते. एका छोटया 'नर्सरीत' मोठ्या काळजीपूर्वक माझा जन्म झाला होता व संगोपनही केले गेले होते. तुम्ही जेव्हा मला व माझ्या भाईबंदांना या मोकळ्या माळावर स्थानापन्न केले होते त्याक्षणी मला विशेष आनंद झाला होता. वाऱ्यावर हलून मी माझा आनंद व्यक्त करीत होते.


“केवढ्या आशा फूलल्या होत्या, तेव्हा माझ्या मनात! आज नैसर्गिक मानवी जीवनाचे संतुलन बिघडले आहे ते आपण काही अंशाने तरी दुरुस्त करू. या ओसाड माळरानावर काही वर्षांत वृक्षराजी फुलेल. त्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होईल. पावसाच्या धारांना आम्ही आमच्या उंच बाहूंनी बोलावून घेऊ अशी आशाही तेव्हा माझ्या मनात फुलली होती. पण त्यावेळी मी खूप छोटे होते. मला खूप मोठे व्हायचे होते. पण अरेरे“माझ्या या सर्व आकांक्षांवर निराशेचे पाणी पडले. कारण तुम्ही आम्हांला या माळावर लावून गेलात आणि पुन्हा फिरकलातही नाहीत. पगारी माळ्याने काही दिवस काळजी घेतली, पण नंतर तोही इकडे येईनासा झाला.



vruksharopanat lavlelya ropatyache atmavrutta essay in marathi
vruksharopanat lavlelya ropatyache atmavrutta essay in marathi


“पावसाचा पत्ता नव्हता, जमिनीच्या पोटातले पाणी पुरेसे नव्हते. मोकाट सुटलेली गुरे, तुमच्यापैकी काही नाठाळ मुले आमच्या जिवावर उठलेली होती. माझे कितीतरी दोस्त या संकटात नामशेष झाले, कित्येकांची वाढ खुंटली. मनातील जगण्याच्या चिवट ओढीमुळेच मी जिवंत राहिलो आहे. जशी वाढ व्हावी तशी झाली नाही, म्हणूनच मुलांनो, मी तुम्हांला आता हटकले. 


तुम्ही झाडे लावता तशी ती दत्तक घ्या, वाढवा. मित्रांनो, मला जगायचे आहे. मला मोठे व्हायचे आहे. मोठ्या वृक्षाच्या रूपात मी स्वतःला पाहू इच्छिते. इतरांना मी फुले, फळे व सावली देऊ इच्छिते. मानवाच्या कल्याणातच आमच्या जीवनाचे सार्थक आहे."

आवाज बंद झाला. पण आम्हांला आमच्या कामातील त्रुटी जाणवली व आपण लावलेल्या रोपटयांची आपण काळजी घ्यायची असा आम्ही निश्चय केला. 'झाडे लावा व ती जगवा' असाच संदेश त्या रोपाने आम्हांला दिला होता.


वरील निबंध वृक्षारोपणात लावलेल्या रोपट्याचे आत्मवृत्त मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

वृक्षारोपणात लावलेल्या रोपट्याचे आत्मवृत्त मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक

एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक

eka hutatma che manogat essay in marathi


एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक : या लेखामध्ये ऐकून 3 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. देशभक्ताचे आत्मवृत्त “माझ्या देशबांधवांनो! आज तुम्ही केवळ औपचारिकरीत्या 'हुतात्मा दिन' साजरा केलात, हे माझ्या पूर्णपणे लक्षात आले आहे. 


अकरा वाजता भोंगा वाजला आणि मिनिटभर तुम्ही आमचे स्मरण केलेत. काही जणांनी तेही केले नाही. कारण त्यांना हे भोंगे कशासाठी वाजले हेच मुळी उमगले नाही. माझ्या देशबांधवांनो,.


तुम्ही एवढे निष्ठुर का झालात? अरे, हया देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले, आपल्या आत्म्यांची आहुती दिली त्यांची आठवणही तुम्ही विसरून गेला आहात, इतके कृतघ्न तुम्ही का झालात?


“सध्याच्या युगाला नाव दयायचे असेल तर त्याला स्वार्थी युग' म्हणावे लागेल, असे मला वाटते. आजचा माणूस विचार करतो तो फक्त स्वतःचा, फक्त 'मी'चा. आमच्या युगात हा 'मी' अस्तित्वातही नव्हता. सारेजण भारावले होते ते एकाच विचाराने आणि तो विचार म्हणजे 'देशाचे स्वराज्य' मिळविणे, गुलामगिरीचे पाश तोडणे. 'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार'अशी सर्वांची मनःस्थिती होती.


 स्वातंत्र्यसंघर्षाचा मार्ग हा अतिशय अवघड होता याची आम्हां सर्व देशभक्तांना कल्पना होती. हे 'सतीचे वाण' कोणी आमच्यावर लादले नव्हते, तर ते आम्ही स्वतःहूनच स्वीकारले होते. त्यावेळी पुढे वाढून ठेवलेल्या सर्व दुःखांची, संकटांची आम्हाला पूर्ण कल्पना होती. तरी पण आम्ही या मार्गाने निघालो. कारण- 'आम्हा बांधू न शकले, कीर्तीचे वा प्रीतीचे धागे.


eka hutatma che manogat essay in marathi
eka hutatma che manogat essay in marathi


“देशभक्तीचे हे व्रत आम्हाला दिले होते लोकमान्यांनी. या व्रताचा मार्ग दाखविला होता महात्माजींनी. अहिंसेचे व्रत स्वीकारून आम्ही हा वसा उचलला. परक्या क्रूर सरकारने गोळ्यांच्या फैरी झाडल्या तरी आम्ही आमच्या छातीचा कोट त्यासाठी उघडा केला. 'चले जाव'चा आदेश परक्या सरकारला फार झोंबला, त्यांनी जुलूम-जबरदस्तीचा कळस गाठला; साऱ्या नेत्यांना अटक केली. 


सरकारला वाटले की नेतेमंडळी तुरुंगात पडली की चळवळ आपोआप शमेल. पण परिणाम उलटा झाला. सारा देश पेटून उठला. लहानमोठे, स्त्रीपुरुष सर्वच स्वातंत्र्यलढयात हिरीरीने उतरले. स्वतःला सुचेल तो मार्ग प्रत्येकाने अनुसरला. त्यामुळे अहिंसक मार्गाने चाललेली चळवळ कुठे कुठे हिंसकही बनली. सरकार तर अगदी पिसाळले होते. पण प्राणांची बाजी लावणाऱ्या देशभक्तांपुढे सरकारचे काही चालले नाही.


“भारतीयांनो, काय सांगू तुम्हांला! त्यापुढची सात वर्षे नुसती मंतरलेली होती. देशभक्तीची भावना देशात सर्वत्र पसरली होती. श्रीमंत-गरीब, श्रेष्ठ-कनिष्ठ, धर्म, पंथ, जाती, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेदभाव उरला नव्हता.



सर्वजण एकच गोष्ट जाणत होते की, आम्ही भारतीय आहोत आणि आमचा देश स्वतंत्र करणे हेच आमचे पहिले कर्तव्य आहे. त्यासाठी हजारोंनी 'सश्रम कारावास' स्वीकारला. कठोर शिक्षा साहिल्या. पण हूं की चूं केले नाही. म्हणून  तर 'स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी सर्वांना आपले जीवन कृतार्थ झाल्याचा आनंद झाला. 


सर्वजण स्वराज्याचे सुराज्य होण्याचे स्वप्न उरी बाळगून होते. पण.....आता चाळीस वर्षांनंतर ते स्वप्न भंग पावलेले दिसत आहे. सत्तास्पर्धेपुढे आज देशनिष्ठा, प्रामाणिकपणा उरला नाही. स्वार्थासाठी माणूस वाटेल ते पाप करीत आहे. 


भ्रष्टाचाराचा भस्मासूर मातला आहे हे पाहून आम्हा देशभक्तांचे, हुतात्म्यांचे अंतःकरण फाटत आहे. म्हणून आम्ही तुम्हांला आवाहन करीत आहोत. उठा, जागे व्हा आणि आपल्या स्वातंत्र्याचे सुराज्य करण्यास कटिबदध व्हा!" वरील निबंध एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



 निबंध 2


एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध | Eka Hutatma Che Manogat Essay In Marathi


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. तुम्ही मला हुतात्म्याची आई म्हणालात, बरं वाटलं. आधी आई म्हटल्यावरच आईचं मन उचंबळून येतं. त्यात हुतात्म्याची आई, कुणी मला 'वीरमाता' म्हणतात. 


पण मला 'वीरमाता' नका म्हणू 'धीरमाता' म्हणा. कारण मी काही वीर्य - शौर्य नाही गाजवलं. पण धैर्य दाखवलं. माझ्या मुलाला मी मोठ्या धीराने सैन्यात पाठवलं. माहिती आहे ना, सैनिकाचं जीवन किती खडतर असतं ! लष्करी दुनिया निराळीच असते. तिथे मरण हा नियम असतो आणि जिवंत राहणं हा अपवाद असतो. 



हे ठाऊक असूनही मी माझ्या मुलाला सैन्यात पाठवलं. 'हुतात्म्याची आई' हे शब्द कानी पडताच, आनंद, अभिमान, कर्तव्यपूर्ती, देशाभिमान, त्यांग अशा भावनांचा सागरच मनात उसळून येतो आणि कसं धन्य - धन्य वाटतं. सुंगंधी पाण्याने सचैल स्नान झाल्यासारखं वाटतं. 



जणू स्वर्गातल्या कल्पवृक्षांच्या फुलांची अंगावर बरसात झाल्यासारखं वाटतं. पण तुम्ही जाणू शकता का ? पुष्कळ वेळा फोमच्या गादीवर लोळत असताना मधेच सुईचे अग्र टोचावे तसं वाटतं. एक खंत टोचत असते. 


ज्या माझ्या लाडक्याला मांडीचा पाळणा करून जोजावताना मांडीचं हाड त्याला टोचू नये याची काळजी वाहिली, त्याला न्हाऊ, मांखू घालताना हाताचं नख लागता कामा नये याची खबरदारी घेतली, त्याच्या चिमण्या तोंडात चिमणे घास अगदी नाजूकपणे भरवले, डोळ्यांची निरांजने करून मायेची पाखर घातली; 


तो माझा बाळ अंत्यसमयी रक्ताळलेल्या शरीराने आणि घायाळलेल्या मनाने, कुठेतरी दगडा - धोंड्यांच्या राशीवर पडला असेल, रणरणत्या उन्हात कुठल्या तरी मरुभूमीत पोळला असेल, नाहीतर कुठेतरी बर्फात गोठून गेला असेल. 


मी त्याचं अंत्यदर्शन घेतलं नाही आणि घेतलंही नसतं. कदाचित त्या दर्शनाने माझ्या डोळ्यांच्या खाचा झाल्या असत्या. देहमनाचं काष्ठ झालं असतं.पुष्कळ वेळा तुम्ही जेव्हा माझ्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव करीत असता, तेव्हा अनेक शल्यं माझ्या मनात सलत असतात. 


त्यातला वरपांगीपणा मनाला झोंबत असतो. निवडणूक जवळ आली की जसा लोकांना निवडणूकज्वर भरतो, तसा प्रसंगवशात तुम्हांला कौतुकाचा, सहानुभूतीचा ज्वर भरतो. बेभानपणे, तोंड फाटेपर्यंत आमची स्तुती करता, पण दुपारी आमच्याकडे चूल पेटते का ? अशी चौकशी करायला येता कोणी ? फाटके का होईनात, 


पण आमच्या पोरांच्या अंगावर कपडे आहेत की नाहीत, हे पहायला येता कोणी ? आमच्या डोक्यावर छप्पर आहे की नाही याची काळजी वहातंय कुणी ? लाखालाखांच्या देणग्या जाहीर करता, पण त्यातले पाच - दहा रुपये तरी आमच्यापर्यंत पोहोचलेत की नाही, केलाय याचा कुणी तपास ? तुमच्या सहानुभूतीने माझ्या मनाला कोरड पडते.


जाऊ दे, मी माझ्या मनाला आवर घालते. मला समजतंय यालाच म्हणतात जनरीती, यालाच म्हणतात माणुसकीचा उमाळा, यालाच म्हणतात जनमानसात सतत घोघावणारा दयासागर.पण माझं भान सुटत नाही. 


माझं मन खुरटत नाही. उलट अभिमानाने, कृतकृत्यतेच्या. तृप्तीच्या भावनेने काठोकाठ भरून येतं. तुम्हाला सुखाची झोप यावी म्हणून, माझा मुलगा सीमेवर जागत होता. तुम्ही जखमी होऊ नये म्हणून शत्रूच्या शस्त्रांचे घाव आपल्या अंगावर झेलत होता. 


या विचाराने माझं मन आकाशाएवढं अनंत आणि असीम बनतं. सागरासारखं विस्तीर्ण बनतं. वाटतं मी एकाच मुलाची नाही, तर जे जे जखमी झाले, जे जे हुतात्मा झाले, त्या साऱ्यांची मी आई आहे. मी कंसाची माता नाहीये, मी कृष्णमाता आहे. मी कुंती आहे. 


जिथे आपल्या मुलाला युध्दाच्या खाईत लोटायला अगणित माता कचरल्या, तिथे मी आपण होऊन माझ्या मुलाला धगधगत्या रणकुंडात लोटलं. पवित्र स्थंडिलावर बळी दिला. देव जर कधी मला भेटला तर एकच मागणं मी त्याच्याजवळ मागेन, 'हे परमेश्वरा, पुढच्या जन्मी माझ्या पोटी असाच पुत्र जन्मू दे, आणि असाच मरू दे.


पाथेयातीलं पौष्टिक अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त । स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात ।। जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान सफल जाहले तुझेच हे रे, तुझेच बलिदान ।। काळोखातुन विजयाचा ये पहाटचा तारा | प्रणाम माझा पहिला तुजला, मृत्युंजय वीरा ||


कुसुमाग्रज एक दिवस, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मोर्चा काढला होता. मोर्चा फ्लोरा फाउंटन येथे अडवण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते. पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला. 


पोलिसांनी बेछूट गोळीबार केला. त्यात १०५ कार्यकर्ते हुतात्मा झाले. आता फ्लोरा फाउंटनला हुतात्मा चौक असे नामाभिधान मिळाले आहे. त्यातल्या एका हुतात्म्याला उद्देशून विंदा करंदीकरांनी 'हे सारे श्रेय तुझेच आहे नावाची उत्कृष्ट जाज्वल्य अशी कविता रचली. त्यातला काही भाग खाली देत आहे. 


सर्व कविता कठस्य करण्यासारखी आहे. सुरुवात - 'मस्तीच्या मातीवर रक्ताची गुळणी थुकून तू, मातीत विलीन झालास' - अशी आहे. यांतल्या कल्पना, उपमा अत्युत्कृष्ट आहेत. 'त्याचे तोंड बंद करू नका असं पैशाच्या पिशवीसारखं ! 


'त्याची मांडी मोडू नका, कारण ती ताठ होती शेवटपर्यंत, बुडणाऱ्या गलबताच्या डोलकाठी सारखी! संयुक्त महाराष्ट्राच्या शत्रूनी, त्यांच्याबद्दल खेद न बाळगता; ते मवाली होते - त्यांचे कसलं कौतुक - असे म्हणणारे दुवाचार्य, प्रत्यक्ष विंदांच्या अवती - भोवती होते. त्यांना उद्देशून विंदांनी लिहिले जवळ जाऊ नका - फटकन शिवी घालील - मवाली आहे !


त्यात एक ओळ आहे 'ही माती तुला कधी विसरणार नाही !' ही ओळ आली की विंदा कविता वाचन थांबवतात आणि म्हणतात. 'इतकी गाढवपणाची ओळ मी कधी लिहिली नाही. व्यंग्यार्थ आला ना लक्षात ?. प्रेताची कवटी फुटली की प्रेत संपूर्ण जळलं असं मानतात. 


म्हणून पोचवायला आलेली मंडळी कवटीचा फाट् असा आवाज होईपर्यंत थांबतात, त्या संबंधी विंदांनी लिहिलं,आणि कवटी फुटेपर्यंत थांबू ही नका, कारण ती अगोदरच फुटली आहे.' मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3

एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध | Eka Hutatma Che Manogat Essay In Marathi

आमच्या गावच्या हुतात्मा चौकातून मी चाललो होतो. चौकात हुतात्मा स्मारक मोठ्या दिमाखात उभे केलेले आहे. जाता जाता माझ्या कानावर आवाज आला आज तुम्ही हुतात्मा दिन साजरा केला, तो केवळ उपचार म्हणून! अकरा वाजता भोंगा वाजला अन तम्ही १ मिनिट साऱ्या हतात्म्यांचे स्मरण केलेत. बस! झाले तुमचे कर्तव्य! 



आता वर्षभर पुनः माझी आठवण करायची गरज नाही! तुमचे हे वागणे पाहून माझ्या मनाला अतिशय यातना होतात. अरे, हुतात्म्यांनी आपले प्राण पणाला लावले. स्वत:चा संसार सोडून देऊन देशाचा संसार केला. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन या हुतात्म्यांनी, क्रांतिकारकांनी सतीचे वाण घेतले होते. 


या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी सर्वस्वाचा होम केला. या साऱ्याबद्दल कृतज्ञता म्हणून येथे हुतात्मा स्मारक बांधण्यात आले. या साऱ्या क्रांतिकारकांना देशभक्तीचे व्रत लोकमान्यांनी दिले होते, बापूजींनी दिले होते. इंग्रज सरकारने या क्रांतिकारकांना तुरुंगात टाकले, फाशी दिले. 


पण ते सारे न डगमगता 'जय भारतमाता', 'वंदे मातरम्' असे म्हणत वधस्तंभाकडे हसत हसत गेले आणि हुतात्मा झाले. अशा अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले. त्या दिवशी साऱ्यांना आपले जीवन कृतार्थ झाले असे वाटले. 

सर्व हुतात्म्यांच्या आत्म्याला अतिशय मोठे समाधान लाभले असेल. समाजानेही त्या हुतात्म्यांची आठवण सतत जागती ठेवावी म्हणून हे स्मारक येथे उभे केले. परंतु त्या हुतात्म्यांच्या मनातील देशाबद्दलची उज्ज्वल प्रतिमा आज डागाळून गेली आहे. स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाली. पण आज देशात सत्तास्पर्धा चाललेली दिसते. 


भ्रष्टाचाराच्या अनेक घटना आजकाल उजेडात येत आहेत. देशनिष्ठा, प्रामाणिकपणा असे गुण आजकाल फारसे कोठे आढळत नाहीत. देशात अराजक, हिंसाचार हे मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. त्यामुळे त्या हुतात्म्यांच्या अंत:करणाच्या शतश: चिंधड्या होत आहेत.

हतात्म्यांचे स्मारक म्हणून मला येथे उभे केले आहे. पण कोणाचेही माझ्याकडे लक्षसुद्धा नसते. वर्षभर माझी अवस्था अतिशय दयनीय असते. अंगावर धूळ साठते, ऊनपावसाचे तडाखे सहन करावे लागतात. ज्या हुतात्म्यांच्या आठवणीसाठी हे स्मारक आहे, त्या हुतात्म्यांना लोक पार विसरले आहेत हे पाहून मला वैफल्य येते.


माझा उपयोग येथे प्रेमिकांच्या भेटीचे संकेत स्थळ म्हणून केला जातो, भिकारी येथे बसून जेवणखाण करतात, कावळे कबुतरे माझ्यावर घाण करतात. वास्तविक स्मारक करतात ते त्या हुतात्म्यांचे स्मरण ठेवण्यासाठी, त्यांचे कार्य नजरेपुढे ठेवण्यासाठी! परंतु हा हेतू नजरेआड झाला आहे. स्मारक हे प्रेरक ठरले पाहिजे. 


प्रेरणा देण्यास स्मारक जर यशस्वी होत नसेल तर अशी स्मारके उभारून त्या थोर हतात्म्यांचा अपमान तरी करू नका!! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

एका हुतात्म्याचे मनोगत मराठी निंबध आत्‍मकथनात्‍मक

हुंडाबळी तरुणीची आत्मकथा मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक

hunda bali tarunichi atamkatha essay in marathi

हुंडाबळी तरुणीची आत्मकथा मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : “थांबा, आतापर्यंत तुम्ही सर्वांनी खूप चर्चा केली. आता मला बोलू दया. कारण आता मी फारच थोड्या तासांची सोबतीण आहे. तेव्हा या सुंदर जगातून जाण्यापूर्वी मला माझे मनोगत व्यक्त करू दया. मला माहीत आहे, मी खूपच भाजले आहे; आणि या शेवटच्या क्षणीही मला जाणवत आहे की, हे जग सुंदर आहे. 

मग सांगा बरे, अशा या सुंदर जगाचा निरोप घेण्याचा प्रयत्न मी कशी करणार पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न' अशी माझ्यासंबंधी आपल्या अहवालात नोंद केली आहे; आणि वार्ताहरांनी त्यावरून वृत्तपत्रात तशाच प्रकारची बातमी दिली आहे. पण मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ओरडून सांगेन की, 'मी आत्महत्येचा प्रयत्न केला नाही. मला पेटवून दिले आहे. मी झोपेतून जागी झाले तेव्हा माझे कपडे पेटलेले होते. घरात सर्व माणसे हजर होती, पण कोणीही मला वाचविण्याचा यत्न केला नाही. कारण त्यांना मी नकोच होते. त्यांच्या डोळ्यांसमोर चमकत होते 'चकचकीत रुपये'.



“अतिलोभी आहेत ती माणसे! पण खरंच, त्यांना माणसे तरी कसे म्हणायचे? राक्षसालाही लाजवील अशी त्यांची वृत्ती आहे. मी या घरात आले तेव्हा भरपूर सोने, चांदी, रुपये घेऊन आले होते. घरच्या लक्ष्मीत मी भरपूर भर घातली होती. माझ्या पूर्वी आलेल्या माझ्या तीन जावांनीही आपापल्या माहेराहून भरपूर धनदौलत आणली होती. पण माझ्या सासरच्या मंडळींचे एवढयावर समाधान नव्हते. 


सूना या संपत्ती मिळविण्याची साधनेच असे ही मंडळी मानतात. या सर्व गोष्टींचा परिणाम माझ्या मोठ्या जावेच्या मनावर झाला आहे आणि ती आता वेड्यांच्या इस्पितळात आहे. तिचे पती म्हणजे माझे मोठे भाऊजी मात्र दुसरे लग्न करण्याच्या तयारीत आहेत. कारण त्यांना माहीत आहे की येणारी नवी बायको आपल्याबरोबर रुपयांच्या राशी घेऊन येईल.


hunda bali tarunichi atamkatha essay in marathi
hunda bali tarunichi atamkatha essay in marathi


“काय म्हणता? या माणसाला मुलगी कोण देईल? अहो मुलगी म्हणजे उरावरचे ओझे मानणारे वधुपिते काय कमी आहेत? ही माणसे आपल्या मुलीचे एकदाचे लग्न करून टाकून मुक्त होण्यास उतावीळ झालेली असतात. कारण त्यांना आपल्या मुलीचे वय वाढत असल्याचीच भीती वाटत असते. 

मला आठवते ना, माझे पूर्वजीवन ! शाळा-कॉलेजातील ते दिवस किती रम्य होते! फुलपाखरासारखी मी भिरभिरत होते. अभ्यास, पुस्तके, खेळ, नृत्य, नाट्य, वक्तृत्व यांत मी रमलेली असताना शालेय शिक्षण संपून महाविदयालयात केव्हा गेले तेही कळले नाही. मैत्रिणींच्या सहवासात महाविदयालयातील मखमली दिवसही केव्हा भुर्रकन उडून गेले तेही लक्षात आले नाही. आवळयाजावळया आपल्या दोन मुलींना म्हणजे आम्हा दोघी-बहिणींना आईवडिलांनी फुलासारखे जपले. गूलाबाच्या सुगंधाने भरून गेलेल्या मार्गाने मी पाकळयांवर पावले टाकत सासरी आले पण येथे वाट्याला आले केवळ काटेच!

"खरं पाहता, माझ्या सासरी काहीच कमी नव्हते. लक्ष्मी व सरस्वती दोघींचा वरदहस्त या कुटुंबावर आहे. पण माझ्या सासूच्या रूपाने ‘आक्काबाईचा' घरात प्रवेश झाला आहे. एक स्त्रीच इतर स्त्रियांच्या दुःखाला कारण होत आहे. स्त्री-मुक्तीच्या वातावरणात वाढलेली मी सासुबाईंना निर्धाराने तोंड देत होते. पण दुर्दैवाने मला माझ्या पतीची साथ मिळाली नाही. शेवटी हे फळ माझ्या वाट्याला आले. या क्षणी वाईट वाटते माझ्या छोटया राणीसाठी. तिच्या वाटयाला हेच दुःख येणार का? कारण ती पण एक स्त्री आहे. स्त्रीवरील हा अन्याय केव्हा मिटणार, याचे कोणीतरी उत्तर देणार आहे का?"


वरील निबंध हुंडाबळी तरुणीची आत्मकथा मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवादपुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


टीप : या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते



  • hunda ek samajik samasya marathi essay
  • hunda bali nibandh in marathi

हुंडाबळी तरुणीची आत्मकथा मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक
hunda bali tarunichi atamkatha essay in marathi



'स्त्री जन्मा तुझी कहाणी

हृदयी अमृत नयनी पाणी ।

तुझीया पोटी अवतरती नर

अन्यायच ते करिती तुजवर

दशा तुझी ही केविलवाणी ।।'


बाबा, डॉक्टर, आई वाचवा । वाचवा हो ।। वाचवा ।।। मी खूपच भाजले. मी थोड्याच वेळाची सोबतीन आहे. माझी कहाणी ऐका. ऋषीमुनींच्या काळापासून भारतीय स्त्रियांना म्हणे मानाचे स्थान आहे. 'मातेपेक्षा श्रेष्ठ दैवत दुसरे कोणतेच नाही' असे सांगितले जाते हे सारे खोटे आहे. खरेच स्त्रियांना एवढे सन्मानाने वागविले जाते का! हाच प्रश्न माझ्या मनात आहे.


मला मागचा प्रसंग आठवतो आहे आई एकदा रागाच्या भरात म्हणाली होती तुला भाकरीच्या तुकड्यावर विकत घेतले आहे. या प्रसंगातला माझा राग 'विकत घेणे' या शब्दांवर आहे. ज्या माणसांचा जीव जडला, त्याच माणसाची विक्री मग ते झाड असेल घर असेल म्हणजे हुंडा देणे-घेणे आलेच!


आज तर सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाजात मोठ्या हुशारीने 'मुले-मुली' विकली जात आहेत त्यातलीच मी एक अभागी आहे. माझ्या बाबांनी जवळ असलेलं ते देऊन मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिलं. लग्न होऊन चार-दोन महिने जातात न जातात तोच सासरच्या मंडळीकडून सुरू झाले. 


नवी गाडी घेणे, कारखाना उभा करावयाचा आहे. अशी एक नाही अनेक सम्सया उभ्या करून छळाला सुरूवात झाली. कितीही ओरडून सांगितले तर ऐकणार कोण? सारे एकाच जातीचे, एकाच पक्षाचे. लग्नात म्हणे 'वर दक्षिणा' कमी मिळाला. 


त्याची भरपाई झाली पाहिजे. सासूबाईंचे म्हणणे पुन्हा पुन्हा कानावर येऊ लागले, मग मी ऐकत नाही असे पाहून इलेक्ट्रिक शॉक देणे, कमानंतर कामात गुंतवून ठेवणे, वेगवेगळ्या वाईट शब्दांचे उच्चार होऊ लागले. त्यांच्या दृष्टीने मुलगी म्हणजे मिळकतीचे साधन आहे. 


माझ्या सारख्या स्त्रियांनी माहेर सोडायचे, तिथले नाव सोडायचे आणि दोन घराण्यात मिसळायचं. प्रत्यक्षात गृह लक्ष्मी पण आज ती दासी बनल्यासारखी गत झाली आहे. सासरच्या दृष्टीने, अंगावर दागिने, सोने, नाणे, जडजवाहीर वगैरे म्हणजे सुख! परंतु स्त्रीला एक मानवी मन आहे, भाव-भावना आहेत याचा विचार इथे कोठे होतो? 


मला अखेरच्या वेळी पुष्कळ बोलून मन मोकळे करायचे आहे. दुसऱ्यांना सांगायचे आहे. मी फसले, तुम्ही फसू नका. 'पुढच्यास ठेच मागचा शहाणा' या न्यायाने मला माझे मन मोकळे करावयाचे आहे. माझे पती तेही आईच्या शब्दांच्या बाहेर नाहीत या सर्व मानसिक छळाला कंटाळून मीच सर्वांच्या समोर पेटवून घेतले. साऱ्यांना हेच हवे होते. 


सारे जळताना पाहत होते. पण सगळेच निर्दयी, अमानवी, पशू वृत्तीचेच सगळे! आरडा-ओरड झाल्यामुळे शेजारी धावत आले आणि घरातल्या मंडळींनी छान नाटक केले. आग विझवणे काय ? रडणे काय ? मी सांगते आहे. या घरात कोणत्याही मुलीने पुन्हा येऊ नये. 


हे सारे जनावरांच्या जातीचे आहेत. यांना भावना, मानवी मन नाहीच. पैशाची लोभी माणसे आहेत. सांगता सांगता आवाज थांबला! आणलं गेलं. माझे आई-वडील सुद्धा मला आता निटसे आठवत नाहीत. कधी-कधी मला आईची खूप आठवण येते. तेंव्हा माझे काळीज विदीर्ण होऊन जातं. 


मला माणसाच्या दुटप्पीपणाबद्दल त्याची चीड येते. स्वतःच्या आईचं वर्णन करताना तो म्हणता मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


हुंडाबळी तरुणीची आत्मकथा मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक