कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

my pet cat essay in marathi  | माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध बघणार आहोत. माझ्या घरी मनीमाऊ नावाची छोटीशी गोंडस मांजर आहे या निबंधाच्‍या मदतीने आज  आपण तिच्‍याबद्दलच माहीती करून घेऊया  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


my-pet-cat-essay-in-marathi
my-pet-cat-essay-in-marathiपशू-पक्षी, मनुष्याचे जीवन साथी आहेत. गाय, म्हैस, शेळी, मेंढीपासून आपणांस दूध मिळते. कुत्रे आपल्या शेताची आणि घराची राखण करतात. पोपट, कबुतर, ससे, मांजर, पाळल्याने आपल्याला आनंद मिळतो. आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार लोक पशू पक्षी पाळतात. माझ्या बऱ्याच मित्रांजवळ कोणता ना कोणता पाळीव प्राणी आहे.


मी पण एक छोटीशी सुंदर मांजर पाळली आहे. आम्‍ही लाडाने तिला  मनीमाऊ म्‍हणतो तिचा रंग पांढरा व काळा आहे. तिचे डोळे चमकदार निळ्या रंगाचे आहेत. आम्ही सगळे तिला 'मनीमाऊ' म्हणतो. मनीमाऊ म्हणून हाक मारताच ती धावत माझ्याजवळ येऊन बसते. मी तीला रोज दूध, ब्रेड, बिस्किट खाऊ घालतो. साबण लावून तिला आंघोळ घालतो. 


माझी मनीमाऊ मांजर पूर्णपणे शाकाहारी आहे. ती आज्ञाधारक आहे. घरात अजिबात घाण करीत नाही. त्यासाठी मी तिला बाहेर घेऊन जातो. संध्याकाळी तिला घेऊन मी बागेत फिरावयास जातो. तिथे मी तिच्याबरोबर खेळतो, धावतो तेव्हा ती शेपटी फुगवून म्याऊँ-म्याऊँ करून आपला आनंद व्यक्त करते.


मनीमाऊ घरात मुक्तपणे फिरते. परंतु खाण्याचे पदार्थ खराब करीत नाही. दारावरची घंटी वाजली की तिचे कान उभे राहतात. मग लगेच ती दाराकडे धावत जाते. जणु  आमचे स्वागतच करते. कधी-कधी ती एखादा उंदीर पकडून बाहेर पळून जाते. कुत्रा मांजरीचा शत्रू असतो. पण तीच कुत्र्यावर धावून जाते. थंडीच्या दिवसांत ती  गच्चीवर जाऊन उन्हात बसते. उन्हाळ्यात सोफ्याखाली नाही तर पलंगाखाली जाऊन बसते. मनीमाऊ मला खूप आवडते. मी कुठे बाहेर गेलो तर मला तिची खूप आठवण येते.


मित्रांनो my favourite animal cat in marathi  तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व तुमच्‍या घरी कोणताही पाळीव प्राणी असल्‍यास त्‍याचे नाव  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

my pet cat essay in marathi | माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध

 jangal tod ek samasya marathi nibandh | जंगलतोड  एक समस्या मराठी निंबध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जंगलतोड  एक समस्या मराठी निंबध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये मानवाने स्‍वताची प्रगती करण्‍यासाठी कश्‍याप्रकारे जंगलतोड करून पर्यावरणाची हानी केली आहे व याचे कोणकोणते विपरीत परीणाम होत आहेत याबद्दल सविस्‍तर निबंध दिला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


jangal-tod-ek-samasya-marathi-nibandh
jangal-tod-ek-samasya-marathi-nibandhनिसर्गाचे चिकित्सक अभ्यासक सांगतात की, मुंगीपासून गरुडापर्यंत सर्व मानवेतर प्राणी धरतीची प्रकृती सांभाळून आपली जीवनयात्रा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात; पण माणसाची बुद्धिमत्ता आणि त्याची कार्यशक्ती निसर्गाला शाप ठरली आहे. जंगलात लागणारा वणवा ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. पण काही वेळेला माणसाच्या हलगर्जीपणामुळेही जंगलात आगी लागतात आणि अफाट जंगलसंपत्ती नष्ट होते.माणसाने जास्तीत जास्त जंगलसंपत्ती नष्ट केली आहे. जंगले तोडून माणसाने नगरे वसवली. त्या नगरांतील आपल्या घरांसाठी, घरे सजवण्यासाठी माणसाने वारेमाप झाडे तोडली.


आज भारतातील जंगलांचा झपाट्याने होणारा नाश ही चिंतेची बाब ठरली आहे. वनक्षेत्र कमी झाल्यामुळे मातीची धूप व पुराचे प्रमाण वाढले आहे. अधिकाधिक भूप्रदेश ओसाड बनले आहेत. पर्जन्याचे प्रमाण कमी झाले आहे. पर्यावरणाच्या संतुलनाची समस्या निर्माण झाली आहे.


लाकडाचा उपयोग कागदाचा लगदा तयार करण्यासाठी केला जातो. यासाठीही अनेक जंगले तोडली जातात. जंगलतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. वन उत्पादनामध्ये लाख, राळ, डिंक, औषधी वनस्पती, मध, मोह, विविध प्रकारचे गवत, रेशीम, वेत, बांबू इत्यादी असंख्य वस्तूंचा समावेश होतो. वनातील वृक्षावरील एक प्रकारच्या किड्यापासून लाख मिळते. 


बाभळीची साल कातडी कमावण्यासाठी व औषधासाठी उपयोगी असते. शेतकऱ्यांची अवजारे, क्रीडासाहित्य, काडेपेटीतील काड्या यांसाठी ही जंगलतोड होते. जंगलनाशाबरोबर जंगलातील प्राणी-पक्षीही कमी होत आहेत. वाघ व मोर यांची हौसेखातर प्रचंड हत्या होते, हे थांबायला हवे आहे. वृक्ष-संरक्षण कायदा केला गेला आहे. पण सर्व गोष्टी केवळ कायदयाने होत नाहीत. त्यासाठी सर्वसामान्य जनतेचे त्याला हार्दिक व विधायक सहकार्य हवे. 


जंगले नष्ट झाली की तेथील आदिवासींचेही प्रश्न उभे राहतात. 'मेळघाट प्रकल्प'सारख्या अनेक संस्था निर्माण झाल्या पाहिजेत आणि वनाच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाला आपली वाटली पाहिजे. नाहीतर पुढील काळात एखादया भल्यामोठ्या ओसाड जागेवर पाटी लावावी लागेल - 'येथे जंगल होते.' 


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व जंगलतोड थांबवण्‍यासाठी कोणते उपाय केले पाहीजेत  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


jangal tod ek samasya marathi nibandh | जंगलतोड एक समस्या मराठी निंबध

 diwali nibandh in marathi | दिवाळी मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण diwali nibandh in marathi | दिवाळी मराठी निबंध बघणार आहोत. प्रत्‍येकजण सण व उत्‍सवाच्‍या माध्‍यमातुन एकत्र येऊन आपला आनंद प्रकट करत असतो. या निबंधात आपण दिवाळीचा इतीहास, त्‍यांचे महत्‍व काय आहे व दिवाळी या सणाविषयी संपुर्ण माहीती दोन वेगवेगळ्या निबंधात बघणार आहोत.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.  

diwali-nibandh-in-marathi
diwali-nibandh-in-marathiनिबंध 1 (350 शब्‍दात)


भारत हा सण व उत्‍सवांचा देश आहे आणि प्रत्येक समाज सण व उत्‍सवांच्‍या  निमित्‍ताने एकत्र येऊन  आपला आनंद व्यक्त करतो असतो. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी हा शब्‍द संस्‍कृत भाषेतुन घेतला गेला आहे.  ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दीपावली साजरी केली जाते दसऱ्यापासुनच दिवाळीची तयारी घराघरात सुरू होऊन जाते. दिवाळी संपूर्ण भारतभर मोठ्या थाटामाटात आणि उत्‍साहाने  साजरी केली जाते. पण दिवाळी केवळ भारतातच साजरी केली जात नाही तर भारताबाहेर राहणारे भारतीय आणि इतर लोकही ती उत्‍साहाने साजरी करतात. लहान मुलांनांही हा सण खुप आवडतो. दिवाळी हा भारतातील सर्वात महत्‍वपुर्ण व प्रसिद्ध सण आहे. हा सण अमावस्‍येचा दिवशी साजरा केला जातो. अमावस्‍येच्‍या काळ्या रात्री लोक मातीच्‍या दिव्‍यांनी व आजकाल इलेक्‍ट्रीक दिव्यांनी रोशनाई करून दीवाळी साजरी करतात.  रावणाला युध्‍दात हरवल्‍यावर जेव्‍हा भगवान राम १४ वर्षानी आपल्या राज्‍यात परतले तेव्हा अयोध्‍देतील लोंकानी भगवान राम यांच्‍या स्‍वागतासाठी घरे व रस्‍ते दिवे लावुन प्रकाशित केले होते. याच दिवशी भगवान श्रीकृष्‍णांनी नरकासुर नावाच्‍या भयानक राक्षसाचा वध केला होता व हा दिवस भगवान महाविर स्‍वामी  यांचा  निर्वान दिवसही आहे . या सर्व कारणांमुळे लोक दिवाळी साजरी करतात.  हा एक पवित्र हिंदु सण आहे जो वाईटावर चांगल्‍याच्‍या विजयाचे प्रतिक आहे. देवी देवता व राक्षसांव्‍दारे समुद्र मंथन करताना माता लक्ष्‍मी यांचा जन्‍म झाला होता असे मानले जाते. हा सण पाच दिवस साजरा केला जातो. नरक चतुदशीला सुर्यदयापुर्वी अंघोळ करणे अतिशय शुभ मानले जाते . अमावस्‍येला देवीची पुजा केली जाते व बत्‍तास्‍याचा प्रसाद देवीला अर्पण केला जातो. लहान मुले  फटाके फोडण्‍यात व छान छान मिठाईचे पदार्थ खाऊन त्‍यांचा आनंद व्‍यक्त करतात. या दिवसात लोक एकमेंकांना भेटुन शुभेच्‍छा व फराळ देऊन त्‍यांचे स्‍वागत करीत असतात. दिवाळीला लोक आपल्‍या नातेवाईकांना भेटुन नविन वर्ष सुखाचे जावो ही सदीच्‍छा व्‍यक्‍त करतात व आपआपसातील असलेले मतभेद विसरून लोक हा सण साजरा करतात.  दिवाळीच्या दिवसात  बाजारपेठेत लोक मिठाई व नविन कपडे घेण्‍यासाठी गर्दी करतात. आणि आपल्‍या घराला दिव्‍यांनी सजवतात. लोक सुयास्‍तानंतर  सूर्यास्तानंतर माता लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात  आणि आरोग्‍य, धन,संपत्‍ती व सोनेरी भविष्‍यासाठी देवीला प्राथना करतात. दिवाळी हा सण प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यामध्‍ये आनंदाची लहर आणत असतो. हाच आनंद आपल्‍याला नविन जिवन जगण्‍यासाठी प्रोत्‍साहन देत असतो. फटाके फोडताना अतिशय सावधगिरी बाळ‍गिली पाहीजे . आपल्‍या वागण्‍यामुळे कुणालाही दु:ख पोहचता कामा नये तरच दिवाळी सण साजरा करणे अर्थपुर्ण  ठरू शकेल .  

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता व खालील दुसरा निबंध वाचायला विसरू नका . धन्‍यवादनिबंध 2 (430 शब्‍दात) 

diwali essay in marathi

दिव्यांच्या साक्षीने दीपावलीचे आगमन होते. प्रकाशाने घरे दारे-मने उजळतात. असा 'दिवाळी' हा सण मला खूप खूप आवडतो. आश्विन अमावस्येला 'लक्ष्मीपूजन' केले जाते. आश्विन कृ.१३ तिथीला धनत्रयोदशी, आश्विन कृ.१४ या तिथीला नरक चतुर्दशी नंतर अमावस्येला लक्ष्मीपूजन, कार्तिक शु.१ तिथीला बलिप्रतिपदा (पाडवा) आणि कार्तिक शु.२ या तिथीला भाऊबीज. अशा पाच दिवसांचा हा सण असतो.


 हिंदू संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दसऱ्याला रावण वध करून विजयी झाल्यानंतर प्रभू श्रीराम अयोध्येस परतले. त्यांनतर त्यांना राज्याभिषेक करण्यात आला. तो दिवस म्हणजे दिवाळीचा सण होय. घरांची स्वच्छता व सजावट, रांगोळ्यांनी सुशोभित अंगणे, झेंडू शेवंतीसारख्या फुलांची मंगलतोरणे, घरांची रंगरंगोटी, आकाशकंदील, दीपमाला या साऱ्यांमुळे वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता येते.


 आनंदोत्सवाचा प्रत्यय प्रत्येक कणांकणातून येतो. फटाके , मिठाया यातच  मुले सुटीचा व सणाचा आनंद लुटतात. नवीन कपडे, नवीन भेटी त्यांना मिळतात. अभ्यंगस्नान, उटणे, अत्तरे यांनी वातावरण दरवळते. मंदिरे आरत्या व घंटांनी निनादतात. लवकर उठून पूजा व देवदर्शन यात सर्वांना ओढ वाटते. समृध्दी व पैसा देणाऱ्या लक्ष्मीदेवतेचे मनोभावे पूजन केले जाते. या सर्वांच्या आनंदात गरीब बिचारे दुरून मूकपणे नेत्रसुख घेतात . गरीब मुले फटाके मिळाली नाहीत दुरून तर फटाक्यांची रोषणाई, आतीषबाजी बघून आनंद मानतात ही गोष्ट अनेकांच्या हृदयाला घरे पाडते. काही सहृदयी मात्र आपल्या आनंदात या गरिबांना, त्यांच्या छकुल्यांना समाविष्ट करून घेतात. त्यांना मिठाई, नवे कपडे, फटाके देतात . दिव्यापेक्षाही उज्वलता माणुसकीत आहे. खरे हृदय तेच जे दुसऱ्याचे दुःख समजते. भारतात अजूनही अठराविश्व दारिद्र्यात अनेक जीव खितपत आहेत.


त्यांची 'दिवाळी' कधीही उजाडत नाही तर ‘दिवाळे' अन् .... दारिद्र्याची पकड त्यांना नीट जगू देत नाही. असे विचार आले की माझे मन दिवाळीच्या आतषबाजीने जे फुललेले असते, क्षणात विझते. माझ्यातला 'मी' जागा होतो. स्वतःचे फटाकडे, मिठाई, कपडे घेऊन मी कामवाल्या मावशीचे घर गाठतो . त्यांच्या मुलाला मिठाई देतो. त्यांच्या डोळ्यात चमकणारे स्मित पाहिले की माझी खरी दिवाळी साजरी झाली, हे मनाला पटते. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे मला वाटते. परिस्थितीने लाचार असणाऱ्यांना कधी विनाकारण दुःख नशिबी येतात , तिथे मदत करावीच .


नातेवाईकांना नववर्षाची भेट म्हणून शुभेच्छा कार्ड व इतर भेटी पाठविण्याबरोबरच हे छोटे पण 'खूप मोठे' सत्कृत्य केल्यास दिवाळीचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल. वर्षातल्या येणाऱ्या सर्व सणांमध्ये दिवाळीचे महत्त्व आगळे नि वेगळे आहे. तो सण प्रत्येक घरात साजरा झाला पाहिजे. दिव्यांच्या साक्षीने मने प्रकाशायला हवीत जळायला नको, चटके सोसायला नकोत.


फटाके उडवितांना आवश्यक खबरदारी घेऊन अपघातापासून बचाव करायला हवा , ही पण महत्त्वाची बाब आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी आतीषबाजीत कानठळ्या बसणारे फटाके उडवू नयेत. तसेच फटाके बनविणाऱ्या कंपन्यांत ७० ते ८०% बालश्रमिक काम करतात. श्वसन व फुप्फुसासंबंधीच्या विकारांना बळी पडतात हे सत्य न विसरता फटाक्‍यांचा  अतिरेक टाळावा. वाचलेले पैसे गरीबाला देऊन दिवाळीचा आनंद द्यावा , हे मला वाटते.


सण कोणताही असो तो आनंद , एकी, समभाव, बंधुत्व व सुख देणारा असावा. जीवन क्षणभंगुर आहे. 'जगा अन् जगू दया' या तत्त्वावर चालायचे आहे.

diwali nibandh in marathi | दिवाळी मराठी निबंध

maza avadta kavi marathi nibandh | माझा आवडता कवी मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता कवी मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्ये आपण कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती दिली आहे. त्या पुढील निबंधात तुकाराम महाराज यांच्याबद्दल निबंध सादर केला आहे  तर मग सुरूवात करूया निबंधाला


 मुद्दे : 


  • अनेक लेखक आवडीचे 
  • त्यांपैकी एक - वैशिष्ट्ये 
  • इतर समकालीन लेखकांची तुलना
  • त्यांनी लिहिलेले विविध साहित्य
  • विविध साहित्यांमधील काही वैशिष्ट्यपूर्ण वाक्ये किंवा पंक्ती
  • एखादे विशेष पुस्तक - का आवडते त्याचे कारण
  • व्यक्तिरेखा - व्यक्ती व साहित्यिक म्हणून त्यांच्याविषयी वाटणारा आदर


विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे कवी तर होतेच त्याचप्रमाणे नाटककार,  कथाकार व वृत्तपत्रलेखकही होते. पण त्यांच्या या सर्व साहित्यिक कलाकृतीतून लक्षात राहतो तो त्यांच्यातला कवीच! मग 'नटसम्राट' नाटकातील बेलवलकर असो, 'कौन्तेया'तील कर्ण असो वा 'स्वप्नांचा सौदागर' या लेखातील चंद्राची जगाशी ओळख करून देणारा ललितलेखक असो; या सर्वांतून कुसुमाग्रजांचा काव्यात्म पिंड कधीच लपून राहत नाही.

maza-avadta-kavi-marathi-nibandh
maza-avadta-kavi-marathi-nibandh'जीवनलहरी' हा कुसुमाग्रजांचा पहिला लहानसा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर 'विशाखा', 'किनारा', 'मराठी माती', 'स्वगत', 'हिमरेषा', 'वादळवेल', 'छंदोमयी' अशा आपल्या काव्यसंग्रहांतून या कविश्रेष्ठाने रसिकांना काव्यामृताचा आस्वाद सातत्याने दिला आहे.


कुसुमाग्रजांच्या कवितेची विशेष खासियत म्हणजे त्यांची कविता श्रेष्ठ टीकाकारांना जशी आवडली, तशी अगदी सामान्य रसिकांनाही आवडली आहे. आपल्या या कवितांना कुसुमाग्रज स्वतः समिधा' म्हणतात -समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा 

कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा

तव आन्तर अग्नी क्षणभर तरी फुलवावा.


या काव्यपंक्तीतून कुसुमाग्रजांची विनम्रता प्रत्ययाला येते. त्याचप्रमाणे त्यांच्या काव्यरचनेमागील हेतूही स्पष्ट होतो. सामाजिक विषमतेतील संघर्ष या कवीला सतत अस्वस्थ करतो व तो संघर्ष वेगवेगळ्या प्रतीकांतून प्रभावीपणे व्यक्त होतो. कधी तो संघर्ष उद्दाम' आगगाडी आणि तिच्याखाली चिरडली जाणारी जमीन यांमधील असतो; तर कधी तो उफाळणारा सागर व त्याला आव्हान देणारा कोलंबस यांच्यातील असतो.कुसुमाग्रजांच्या प्रतिभाशक्तीला अजोड अशा तरल कल्पकतेची जोड लाभली आहे. मग ती कधी 'पृथ्वीचे प्रेमगीत' गाऊ लागते; तर कधी 'अहि-नकुलाच्या' रूपकातून भिन्न प्रवृत्तींचा संघर्ष मांडते. कुसुमाग्रजांची काव्यवृत्ती भव्यतेला गवसणी घालू पाहणारी आहे. लोकमान्यांच्या पुतळ्याच्या सान्निध्यात त्यांचे मन म्हणते, "ते होते जीवित अन् हा जीवितभास.' कुसुमाग्रजांच्या मनाला दिव्यत्वाचा, उदात्ततेचा, मृत्युंजयाच्या शोधाचा ध्यास लागलेला होता.


असा हा 'ज्ञानपीठ पुरस्कार' विजेता माझा आवडता कवी अनंतात विलीन झाला. त्यांच्या काव्याचा दीपस्तंभ भविष्यातील हजारो मराठी कवींना प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून अनंतकाळ प्रकाश पुरवत राहील.

निबंध 2

majha avadta kavi essay in marathi 


भागवत धर्माचा प्रसार करणारे एकनाथ समाधिस्थ झाले व तुकारामांच्या रूपाने भक्तीचा अधिकच तेजस्वी तारा उदयास आला. तुकाराम महाराज साधे वाणी, अडाणी, मराठा कुलात जन्मले. त्यांच्या घरात विठ्ठलभक्तीची परंपरा होती. लहानपणीच त्यांच्यावर व्यवसायाची जबाबदारी येऊन पडली होती व ती ते यशस्वीपणे पार पाडत होते. लहान वयातच त्यांचे लग्नही झाले होते. परंतु अचानक पडलेल्या दुष्काळच्या तडाख्याने ते हवालदिल झाले. त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली.


संसाराच्या काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ झाल्यावर त्यांच्या मनाला परमार्थाची ओढ लागली. मग मन परमार्थात रम लागले. मग असे वाटू लागले बरे झाले देवा निघाले दिवाळे। बरी या दुष्काळे पीडा केली। समाजापासून, संसारापासून दूर डोंगरावर जाऊन त्यांनी भक्तीचा साधना केली. बाबाजी चैतन्य या गुरूंपासून ‘रामकृष्ण हरी' या मंत्राचा त्यांना लाभ झाला.

शिवाजीमहाराज त्यांच्या कीर्तनाला गेले होते. त्यांनी तुकारामांना नजराणा पाठवला होता. तुकारामांनी तो नाकारला. या 'वैभवाच्या धन्याला' समाजकंटकांकडून खूप त्रास भोगावा लागला होता. परंतु त्यांनी या दांभिकांवर शब्दाचा आसूड मारला होता. संस्कृतमधील ज्ञान मराठीत आणलं म्हणून पंडितांचा राग. म्हणून रामेश्वरभटाने त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले. पांडुरंगाने अभंग तारले.


सर्वसामान्य माणसांना तुकारामांविषयी जिव्हाळा वाटत असे. त्यांच्या कीर्तनाला त्याची खूप गर्दी होत असे. आपल्यासारखाच चुकणारा, विव्हळणारा जीव आता शांती-सुख-आनंदात डुंबत आहे, तुकाराम ज्या पायऱ्या चढून उंच मोकळ्या जागी, स्वच्छ मोकळ्या वातावरणात जाऊन बसले होते, तेथे आपण जावे असे त्यांना वाटे.


संत तुकारामांचे जीवन म्हणजे 'गरुडाचे उड्डाण.' त्यांच्या झेपेकडे पाहून माणूस अवाक् होतो. त्यांच्याबद्दल त्याला विस्मय वाटतो. परंतु साध्या, सोप्या, सरळ भाषेत त्यांनी पिटलेल्या भक्तीच्या डांगोयानं तो तुकारामांचा नकळत अनुयायी बनतो

खरोखर हे कवी तुकाराम ‘आकाशाएवढे' होते. भागवत धर्ममंदिराचा कळस होते. मराठी सारस्वताचे शिखर होते. त्यांच्या अभंगातील आर्तता, खंबीरपणा, निस्सीम भक्ती, मनातील संघर्ष, आध्यत्मिक उंची माझ्या मनाचा ठाव सोडत नाही.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

maza avadta kavi marathi nibandh | माझा आवडता कवी मराठी निबंध

 Mahavidyalaya cha nirop ghetana marathi nibandh | महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध बघणार आहोत. आपल्‍या आयुष्‍यातील आपल्‍याला परत हवेहवेसे वाटणारे क्षण असतात. सर्वात सोनेरी क्षण असतात महाविद्यालयातील आणि ,महाविद्यालय म्‍हटले की सर्वाना आठवण झाल्‍याशिवाय राहत नाही ते म्‍हणजे  तेथे झालेल्‍या गंमती जमती, शिक्षकांनी आपल्‍या केलेल्‍या तक्रारी, आपण केलेली मौजमजा , हा काळ कोणीही विसरू शकत नाही .  कितीही सोनेरी असले प्रत्‍येक क्षण हा निघुन जात असतो आणि हा महाविद्यालयातील शेवटचा  क्षण असतो महाविद्यालयाचा निरोप समारंभाचा दिवस त्‍याच अनुशंगाने आपण सविस्‍तर निंबध लेखन करणार आहोत चला तर मग निबंधाला सुरूवात करूया.


Mahavidyalaya-cha-nirop-ghetana-marathi-nibandh


नुकताच मी बँकेतुन संध्याकाळी घरी परतलो, तर घराच्या दारात एक माझा  महाविद्यालयातील मित्र माझी वाट पाहत उभा होता. तो पुण्याला एका नोकरीच्या संदर्भात इंटरव्ह्यु देण्यासाठी आला होता. त्‍यापुर्वी माझ्या आईने त्‍याचे  स्वागत, चहा-पाणी वगैरे केले होतेच. मीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिलो जवळजवळ ६ ते ७ वर्षांनी भेटत होतो आम्ही. आमच्या गप्पा रंगल्या आणि एकदम त्यांनी त्यांच्या बॅगमधुन एक फोटो काढला. 


तो फोटो पाहुन मी एकदम भारावून गेलो. तो फोटो होता महाविद्यालयाच्‍या निरोप समारंभाच्या दिवसाचा. त्यामध्ये माझा मित्र आणि मी आम्हा दोघांचा सत्कार त्यावेळचे मा. शिक्षणसंचालक यांच्या हस्ते झाला होता. आम्ही दोघेही जवळजवळ समान गुण घेऊन गुणवत्ता यादीत तेरा आणि चौदा क्रमांकांनी उत्तीर्ण झालो होतो. तो फोटो पाहिला आणि त्या दिवसामध्ये एकाएकी हरवून गेलो.

 

ज्या महाविद्यालयात  मी शिकत होतो, त्या महाविद्यालयाचा 'निरोप समारंभ' माझ्या डोळ्यासमोरून जाऊ लागला. गेली ५ वर्षे  ते महाविद्यालय माझे आराध्य दैवत होते. माझा मित्र अन मी नेहमी पहिल्या पाच क्रमांकात येत होतो. चांगली चढाओढ होती आमची. ती शेवटपर्यंत गाजवली. अर्थातच विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष - ग्रंथालयाचा प्रमुख – क्रीडा प्रमुख  - सहलप्रमुख ही सगळी पदे आम्ही भूषवली होती. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आम्हांला चांगले ओळखत. 


सर्वजण 'सिनियर्स' म्हणून मान देत. स्पर्धा झाल्या. परीक्षा झाल्या आणि बघता बघता शैक्षणिक वर्ष कधी संपले हैं समजलेच नाही... परीक्षांचा रिझल्ट आला, तोही आमच्या दोघांच्या नावांनी मोठे यश घेऊन. निरोप आणि सत्कार समारंभाची सूचना फळ्यावर लावली गेली. आणि गेलेले सर्व दिवस शांत बसू देईनात. महाविद्यालयाच्‍या सहलीतील झालेल्‍या गमती जमती  , त्या वक्तृत्व स्पर्धा, ग्रंथालयातील पुस्तके मिळविण्यासाठी धडपड, मित्रांशी झालेली भांडणे, त्या मारामाऱ्या. काही काही म्हणून डोळ्यासमोरून दूर होईना. मन भरून आले... नको, नको तो निरोप समारंभ असे वाटू लागले.


अखेरीस ती सकाळ उजाडली. ठीक १० वाजता महाविद्यालयाच्या हॉलमध्ये आम्ही सर्वजण जमलो. मी, माझा मित्र आणि काही विद्यार्थी स्टेजवर बसणार होतो. माननीय अध्यक्ष, मा. मुख्याध्यापक, इतर सर्व मा. अध्यापक मंडळी व्यासपीठावर आले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. व्यासपीठावर उजव्या बाजूस बसण्याची खास व्यवस्था आमची केली होती. संकोच वाटत होता... तसा हा समारंभ सत्काराचा-आनंदाचा होता. परंतु एकप्रकारची हुरहुर त्यात होती. कारण 'निरोप' ही घ्यायचा होता. 


नेहमीचे उपक्रम झाल्यावर मा. मुख्याध्यापक बोलण्यास उभे राहिले, तुम्ही हुशार, बुद्धिमान विद्यार्थी, देशाचे भावी नागरिक आणि देशाचे भवितव्य घडविणारे. उद्या तुम्ही वैभवाच्या शिखरावर असाल, उच्च शिक्षण घेऊन परदेशी जाल. खूप मोठे व्हाल. पण बाळांनो, आपल्या देशाला विसरू नका... आपल्या महाविद्यालयाचे स्मरण ठेवा. जिथे प्रथम तुम्हांला अंकुर फुटले, छोटी छोटी पाने, फुले आली त्या जमिनीला विसरू नका.


आपले, आपल्या महाविद्यालयाचे, देशाचे नाव, उज्ज्वल करा. जीवनात सर्वजण यशस्वी होतातच असे नाही, पण अपयशाने खचून जाऊ नका. प्रयत्नशील रहा. आमचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहेत. त्यानंतर आमचा खरोखरीच धीर सुटत चालला होता. आम्ही सुन्न होऊन बसलो होतो. त्यानंतर एक एक शिक्षकही उठले आणि त्यांनी आम्हांला भरभरून आशीर्वाद दिले. 'महाविद्यालय ही यशाची खरी पायरी आहे, असे सांगून तुमच्या पाठीशी महाविद्यालय सदैव राहील' असे विचार व्यक्त केले. 

मा. शिक्षणाधिकाऱ्यांनी ही आमचे कौतुक केले. सर्वांकडून आम्हांला फुलांचे हार, गुच्छ, ग्रंथ असे पुरस्कार मिळत होते. आणि अखेरीस सत्कारास उत्तर देण्याची वेळ आली आणि सर्वांनी माझ्याकडे बोट दाखविले. सर्वांच्या वतीने मी बोलणार होतो. घसा दाटून आला होता. अनेक प्रसंग आठवत होते आणि त्याप्रसंगी वेळोवेळी शिक्षक मित्र आणि मुख्याध्यापकांनी दिलेला आधार आठवत होता, 'क्षमाशील वृत्तीनेच आज आम्ही इथे पोहोचलो,


सर्वांच्या आधाराने आज आम्ही यशस्वी झालो. आम्ही आपले सदैव ऋणी आहोत.' असे म्हणून दाटलेल्या कंठानेच आम्ही सर्वजण पुढे येऊन नतमस्तक झालो. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर झाला आणि अश्रृंना वाट मिळाली. चहापान झाले पण कोणीच कोणाशी बोलत नव्हते... खिन्न मनाने आम्ही घरी परतलो. या प्रसंगाला किती वर्षे लोटली. आम्‍ही दोघे खूप खूप बोललो, हसलो आणि महाविद्यालयाच्या त्या हरवलेल्या क्षणांमध्‍ये परत जाण्याचा परत परत प्रयत्न करीत राहिलो.

मित्रांनो तुम्‍हाला college farewell essay in marathi हा निबंध कसा वाटला हे  व तुम्‍ही अनुभवलेला महाविद्यालयातील निरोप समारंभाचा दिवस कसा होता कमेंट करून सांगु शकता.  धन्‍यवाद

Mahavidyalaya cha nirop ghetana marathi nibandh | महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध