कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

my pet cat essay in marathi  | माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध बघणार आहोत. माझ्या घरी मनीमाऊ नावाची छोटीशी गोंडस मांजर आहे या निबंधाच्‍या मदतीने आज  आपण तिच्‍याबद्दलच माहीती करून घेऊया  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


my-pet-cat-essay-in-marathi
my-pet-cat-essay-in-marathiपशू-पक्षी, मनुष्याचे जीवन साथी आहेत. गाय, म्हैस, शेळी, मेंढीपासून आपणांस दूध मिळते. कुत्रे आपल्या शेताची आणि घराची राखण करतात. पोपट, कबुतर, ससे, मांजर, पाळल्याने आपल्याला आनंद मिळतो. आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार लोक पशू पक्षी पाळतात. माझ्या बऱ्याच मित्रांजवळ कोणता ना कोणता पाळीव प्राणी आहे.


मी पण एक छोटीशी सुंदर मांजर पाळली आहे. आम्‍ही लाडाने तिला  मनीमाऊ म्‍हणतो तिचा रंग पांढरा व काळा आहे. तिचे डोळे चमकदार निळ्या रंगाचे आहेत. आम्ही सगळे तिला 'मनीमाऊ' म्हणतो. मनीमाऊ म्हणून हाक मारताच ती धावत माझ्याजवळ येऊन बसते. मी तीला रोज दूध, ब्रेड, बिस्किट खाऊ घालतो. साबण लावून तिला आंघोळ घालतो. 


माझी मनीमाऊ मांजर पूर्णपणे शाकाहारी आहे. ती आज्ञाधारक आहे. घरात अजिबात घाण करीत नाही. त्यासाठी मी तिला बाहेर घेऊन जातो. संध्याकाळी तिला घेऊन मी बागेत फिरावयास जातो. तिथे मी तिच्याबरोबर खेळतो, धावतो तेव्हा ती शेपटी फुगवून म्याऊँ-म्याऊँ करून आपला आनंद व्यक्त करते.


मनीमाऊ घरात मुक्तपणे फिरते. परंतु खाण्याचे पदार्थ खराब करीत नाही. दारावरची घंटी वाजली की तिचे कान उभे राहतात. मग लगेच ती दाराकडे धावत जाते. जणु  आमचे स्वागतच करते. कधी-कधी ती एखादा उंदीर पकडून बाहेर पळून जाते. कुत्रा मांजरीचा शत्रू असतो. पण तीच कुत्र्यावर धावून जाते. थंडीच्या दिवसांत ती  गच्चीवर जाऊन उन्हात बसते. उन्हाळ्यात सोफ्याखाली नाही तर पलंगाखाली जाऊन बसते. मनीमाऊ मला खूप आवडते. मी कुठे बाहेर गेलो तर मला तिची खूप आठवण येते.


मित्रांनो my favourite animal cat in marathi  तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व तुमच्‍या घरी कोणताही पाळीव प्राणी असल्‍यास त्‍याचे नाव  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

my pet cat essay in marathi | माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध

 jangal tod ek samasya marathi nibandh | जंगलतोड  एक समस्या मराठी निंबध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जंगलतोड  एक समस्या मराठी निंबध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये मानवाने स्‍वताची प्रगती करण्‍यासाठी कश्‍याप्रकारे जंगलतोड करून पर्यावरणाची हानी केली आहे व याचे कोणकोणते विपरीत परीणाम होत आहेत याबद्दल सविस्‍तर निबंध दिला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


jangal-tod-ek-samasya-marathi-nibandh
jangal-tod-ek-samasya-marathi-nibandhनिसर्गाचे चिकित्सक अभ्यासक सांगतात की, मुंगीपासून गरुडापर्यंत सर्व मानवेतर प्राणी धरतीची प्रकृती सांभाळून आपली जीवनयात्रा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात; पण माणसाची बुद्धिमत्ता आणि त्याची कार्यशक्ती निसर्गाला शाप ठरली आहे. जंगलात लागणारा वणवा ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. पण काही वेळेला माणसाच्या हलगर्जीपणामुळेही जंगलात आगी लागतात आणि अफाट जंगलसंपत्ती नष्ट होते.माणसाने जास्तीत जास्त जंगलसंपत्ती नष्ट केली आहे. जंगले तोडून माणसाने नगरे वसवली. त्या नगरांतील आपल्या घरांसाठी, घरे सजवण्यासाठी माणसाने वारेमाप झाडे तोडली.


आज भारतातील जंगलांचा झपाट्याने होणारा नाश ही चिंतेची बाब ठरली आहे. वनक्षेत्र कमी झाल्यामुळे मातीची धूप व पुराचे प्रमाण वाढले आहे. अधिकाधिक भूप्रदेश ओसाड बनले आहेत. पर्जन्याचे प्रमाण कमी झाले आहे. पर्यावरणाच्या संतुलनाची समस्या निर्माण झाली आहे.


लाकडाचा उपयोग कागदाचा लगदा तयार करण्यासाठी केला जातो. यासाठीही अनेक जंगले तोडली जातात. जंगलतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. वन उत्पादनामध्ये लाख, राळ, डिंक, औषधी वनस्पती, मध, मोह, विविध प्रकारचे गवत, रेशीम, वेत, बांबू इत्यादी असंख्य वस्तूंचा समावेश होतो. वनातील वृक्षावरील एक प्रकारच्या किड्यापासून लाख मिळते. 


बाभळीची साल कातडी कमावण्यासाठी व औषधासाठी उपयोगी असते. शेतकऱ्यांची अवजारे, क्रीडासाहित्य, काडेपेटीतील काड्या यांसाठी ही जंगलतोड होते. जंगलनाशाबरोबर जंगलातील प्राणी-पक्षीही कमी होत आहेत. वाघ व मोर यांची हौसेखातर प्रचंड हत्या होते, हे थांबायला हवे आहे. वृक्ष-संरक्षण कायदा केला गेला आहे. पण सर्व गोष्टी केवळ कायदयाने होत नाहीत. त्यासाठी सर्वसामान्य जनतेचे त्याला हार्दिक व विधायक सहकार्य हवे. 


जंगले नष्ट झाली की तेथील आदिवासींचेही प्रश्न उभे राहतात. 'मेळघाट प्रकल्प'सारख्या अनेक संस्था निर्माण झाल्या पाहिजेत आणि वनाच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाला आपली वाटली पाहिजे. नाहीतर पुढील काळात एखादया भल्यामोठ्या ओसाड जागेवर पाटी लावावी लागेल - 'येथे जंगल होते.' 


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व जंगलतोड थांबवण्‍यासाठी कोणते उपाय केले पाहीजेत  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


jangal tod ek samasya marathi nibandh | जंगलतोड एक समस्या मराठी निंबध

 diwali nibandh in marathi | दिवाळी मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण diwali nibandh in marathi | दिवाळी मराठी निबंध बघणार आहोत. प्रत्‍येकजण सण व उत्‍सवाच्‍या माध्‍यमातुन एकत्र येऊन आपला आनंद प्रकट करत असतो. या निबंधात आपण दिवाळीचा इतीहास, त्‍यांचे महत्‍व काय आहे व दिवाळी या सणाविषयी संपुर्ण माहीती दोन वेगवेगळ्या निबंधात बघणार आहोत.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.  

diwali-nibandh-in-marathi
diwali-nibandh-in-marathiनिबंध 1 (350 शब्‍दात)


भारत हा सण व उत्‍सवांचा देश आहे आणि प्रत्येक समाज सण व उत्‍सवांच्‍या  निमित्‍ताने एकत्र येऊन  आपला आनंद व्यक्त करतो असतो. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळी हा शब्‍द संस्‍कृत भाषेतुन घेतला गेला आहे.  ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात दीपावली साजरी केली जाते दसऱ्यापासुनच दिवाळीची तयारी घराघरात सुरू होऊन जाते. दिवाळी संपूर्ण भारतभर मोठ्या थाटामाटात आणि उत्‍साहाने  साजरी केली जाते. पण दिवाळी केवळ भारतातच साजरी केली जात नाही तर भारताबाहेर राहणारे भारतीय आणि इतर लोकही ती उत्‍साहाने साजरी करतात. लहान मुलांनांही हा सण खुप आवडतो. दिवाळी हा भारतातील सर्वात महत्‍वपुर्ण व प्रसिद्ध सण आहे. हा सण अमावस्‍येचा दिवशी साजरा केला जातो. अमावस्‍येच्‍या काळ्या रात्री लोक मातीच्‍या दिव्‍यांनी व आजकाल इलेक्‍ट्रीक दिव्यांनी रोशनाई करून दीवाळी साजरी करतात.  रावणाला युध्‍दात हरवल्‍यावर जेव्‍हा भगवान राम १४ वर्षानी आपल्या राज्‍यात परतले तेव्हा अयोध्‍देतील लोंकानी भगवान राम यांच्‍या स्‍वागतासाठी घरे व रस्‍ते दिवे लावुन प्रकाशित केले होते. याच दिवशी भगवान श्रीकृष्‍णांनी नरकासुर नावाच्‍या भयानक राक्षसाचा वध केला होता व हा दिवस भगवान महाविर स्‍वामी  यांचा  निर्वान दिवसही आहे . या सर्व कारणांमुळे लोक दिवाळी साजरी करतात.  हा एक पवित्र हिंदु सण आहे जो वाईटावर चांगल्‍याच्‍या विजयाचे प्रतिक आहे. देवी देवता व राक्षसांव्‍दारे समुद्र मंथन करताना माता लक्ष्‍मी यांचा जन्‍म झाला होता असे मानले जाते. हा सण पाच दिवस साजरा केला जातो. नरक चतुदशीला सुर्यदयापुर्वी अंघोळ करणे अतिशय शुभ मानले जाते . अमावस्‍येला देवीची पुजा केली जाते व बत्‍तास्‍याचा प्रसाद देवीला अर्पण केला जातो. लहान मुले  फटाके फोडण्‍यात व छान छान मिठाईचे पदार्थ खाऊन त्‍यांचा आनंद व्‍यक्त करतात. या दिवसात लोक एकमेंकांना भेटुन शुभेच्‍छा व फराळ देऊन त्‍यांचे स्‍वागत करीत असतात. दिवाळीला लोक आपल्‍या नातेवाईकांना भेटुन नविन वर्ष सुखाचे जावो ही सदीच्‍छा व्‍यक्‍त करतात व आपआपसातील असलेले मतभेद विसरून लोक हा सण साजरा करतात.  दिवाळीच्या दिवसात  बाजारपेठेत लोक मिठाई व नविन कपडे घेण्‍यासाठी गर्दी करतात. आणि आपल्‍या घराला दिव्‍यांनी सजवतात. लोक सुयास्‍तानंतर  सूर्यास्तानंतर माता लक्ष्मी आणि गणपतीची पूजा करतात  आणि आरोग्‍य, धन,संपत्‍ती व सोनेरी भविष्‍यासाठी देवीला प्राथना करतात. दिवाळी हा सण प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यामध्‍ये आनंदाची लहर आणत असतो. हाच आनंद आपल्‍याला नविन जिवन जगण्‍यासाठी प्रोत्‍साहन देत असतो. फटाके फोडताना अतिशय सावधगिरी बाळ‍गिली पाहीजे . आपल्‍या वागण्‍यामुळे कुणालाही दु:ख पोहचता कामा नये तरच दिवाळी सण साजरा करणे अर्थपुर्ण  ठरू शकेल .  

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता व खालील दुसरा निबंध वाचायला विसरू नका . धन्‍यवादनिबंध 2 (430 शब्‍दात) 

diwali essay in marathi

दिव्यांच्या साक्षीने दीपावलीचे आगमन होते. प्रकाशाने घरे दारे-मने उजळतात. असा 'दिवाळी' हा सण मला खूप खूप आवडतो. आश्विन अमावस्येला 'लक्ष्मीपूजन' केले जाते. आश्विन कृ.१३ तिथीला धनत्रयोदशी, आश्विन कृ.१४ या तिथीला नरक चतुर्दशी नंतर अमावस्येला लक्ष्मीपूजन, कार्तिक शु.१ तिथीला बलिप्रतिपदा (पाडवा) आणि कार्तिक शु.२ या तिथीला भाऊबीज. अशा पाच दिवसांचा हा सण असतो.


 हिंदू संस्कृतीत सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दसऱ्याला रावण वध करून विजयी झाल्यानंतर प्रभू श्रीराम अयोध्येस परतले. त्यांनतर त्यांना राज्याभिषेक करण्यात आला. तो दिवस म्हणजे दिवाळीचा सण होय. घरांची स्वच्छता व सजावट, रांगोळ्यांनी सुशोभित अंगणे, झेंडू शेवंतीसारख्या फुलांची मंगलतोरणे, घरांची रंगरंगोटी, आकाशकंदील, दीपमाला या साऱ्यांमुळे वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता येते.


 आनंदोत्सवाचा प्रत्यय प्रत्येक कणांकणातून येतो. फटाके , मिठाया यातच  मुले सुटीचा व सणाचा आनंद लुटतात. नवीन कपडे, नवीन भेटी त्यांना मिळतात. अभ्यंगस्नान, उटणे, अत्तरे यांनी वातावरण दरवळते. मंदिरे आरत्या व घंटांनी निनादतात. लवकर उठून पूजा व देवदर्शन यात सर्वांना ओढ वाटते. समृध्दी व पैसा देणाऱ्या लक्ष्मीदेवतेचे मनोभावे पूजन केले जाते. या सर्वांच्या आनंदात गरीब बिचारे दुरून मूकपणे नेत्रसुख घेतात . गरीब मुले फटाके मिळाली नाहीत दुरून तर फटाक्यांची रोषणाई, आतीषबाजी बघून आनंद मानतात ही गोष्ट अनेकांच्या हृदयाला घरे पाडते. काही सहृदयी मात्र आपल्या आनंदात या गरिबांना, त्यांच्या छकुल्यांना समाविष्ट करून घेतात. त्यांना मिठाई, नवे कपडे, फटाके देतात . दिव्यापेक्षाही उज्वलता माणुसकीत आहे. खरे हृदय तेच जे दुसऱ्याचे दुःख समजते. भारतात अजूनही अठराविश्व दारिद्र्यात अनेक जीव खितपत आहेत.


त्यांची 'दिवाळी' कधीही उजाडत नाही तर ‘दिवाळे' अन् .... दारिद्र्याची पकड त्यांना नीट जगू देत नाही. असे विचार आले की माझे मन दिवाळीच्या आतषबाजीने जे फुललेले असते, क्षणात विझते. माझ्यातला 'मी' जागा होतो. स्वतःचे फटाकडे, मिठाई, कपडे घेऊन मी कामवाल्या मावशीचे घर गाठतो . त्यांच्या मुलाला मिठाई देतो. त्यांच्या डोळ्यात चमकणारे स्मित पाहिले की माझी खरी दिवाळी साजरी झाली, हे मनाला पटते. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. असे मला वाटते. परिस्थितीने लाचार असणाऱ्यांना कधी विनाकारण दुःख नशिबी येतात , तिथे मदत करावीच .


नातेवाईकांना नववर्षाची भेट म्हणून शुभेच्छा कार्ड व इतर भेटी पाठविण्याबरोबरच हे छोटे पण 'खूप मोठे' सत्कृत्य केल्यास दिवाळीचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल. वर्षातल्या येणाऱ्या सर्व सणांमध्ये दिवाळीचे महत्त्व आगळे नि वेगळे आहे. तो सण प्रत्येक घरात साजरा झाला पाहिजे. दिव्यांच्या साक्षीने मने प्रकाशायला हवीत जळायला नको, चटके सोसायला नकोत.


फटाके उडवितांना आवश्यक खबरदारी घेऊन अपघातापासून बचाव करायला हवा , ही पण महत्त्वाची बाब आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी आतीषबाजीत कानठळ्या बसणारे फटाके उडवू नयेत. तसेच फटाके बनविणाऱ्या कंपन्यांत ७० ते ८०% बालश्रमिक काम करतात. श्वसन व फुप्फुसासंबंधीच्या विकारांना बळी पडतात हे सत्य न विसरता फटाक्‍यांचा  अतिरेक टाळावा. वाचलेले पैसे गरीबाला देऊन दिवाळीचा आनंद द्यावा , हे मला वाटते.


सण कोणताही असो तो आनंद , एकी, समभाव, बंधुत्व व सुख देणारा असावा. जीवन क्षणभंगुर आहे. 'जगा अन् जगू दया' या तत्त्वावर चालायचे आहे.

diwali nibandh in marathi | दिवाळी मराठी निबंध

maza avadta kavi marathi nibandh | माझा आवडता कवी मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता कवी मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्ये आपण कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती दिली आहे. त्या पुढील निबंधात तुकाराम महाराज यांच्याबद्दल निबंध सादर केला आहे  तर मग सुरूवात करूया निबंधाला


 मुद्दे : 


 • अनेक लेखक आवडीचे 
 • त्यांपैकी एक - वैशिष्ट्ये 
 • इतर समकालीन लेखकांची तुलना
 • त्यांनी लिहिलेले विविध साहित्य
 • विविध साहित्यांमधील काही वैशिष्ट्यपूर्ण वाक्ये किंवा पंक्ती
 • एखादे विशेष पुस्तक - का आवडते त्याचे कारण
 • व्यक्तिरेखा - व्यक्ती व साहित्यिक म्हणून त्यांच्याविषयी वाटणारा आदर


विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे कवी तर होतेच त्याचप्रमाणे नाटककार,  कथाकार व वृत्तपत्रलेखकही होते. पण त्यांच्या या सर्व साहित्यिक कलाकृतीतून लक्षात राहतो तो त्यांच्यातला कवीच! मग 'नटसम्राट' नाटकातील बेलवलकर असो, 'कौन्तेया'तील कर्ण असो वा 'स्वप्नांचा सौदागर' या लेखातील चंद्राची जगाशी ओळख करून देणारा ललितलेखक असो; या सर्वांतून कुसुमाग्रजांचा काव्यात्म पिंड कधीच लपून राहत नाही.

maza-avadta-kavi-marathi-nibandh
maza-avadta-kavi-marathi-nibandh'जीवनलहरी' हा कुसुमाग्रजांचा पहिला लहानसा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर 'विशाखा', 'किनारा', 'मराठी माती', 'स्वगत', 'हिमरेषा', 'वादळवेल', 'छंदोमयी' अशा आपल्या काव्यसंग्रहांतून या कविश्रेष्ठाने रसिकांना काव्यामृताचा आस्वाद सातत्याने दिला आहे.


कुसुमाग्रजांच्या कवितेची विशेष खासियत म्हणजे त्यांची कविता श्रेष्ठ टीकाकारांना जशी आवडली, तशी अगदी सामान्य रसिकांनाही आवडली आहे. आपल्या या कवितांना कुसुमाग्रज स्वतः समिधा' म्हणतात -समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा 

कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा

तव आन्तर अग्नी क्षणभर तरी फुलवावा.


या काव्यपंक्तीतून कुसुमाग्रजांची विनम्रता प्रत्ययाला येते. त्याचप्रमाणे त्यांच्या काव्यरचनेमागील हेतूही स्पष्ट होतो. सामाजिक विषमतेतील संघर्ष या कवीला सतत अस्वस्थ करतो व तो संघर्ष वेगवेगळ्या प्रतीकांतून प्रभावीपणे व्यक्त होतो. कधी तो संघर्ष उद्दाम' आगगाडी आणि तिच्याखाली चिरडली जाणारी जमीन यांमधील असतो; तर कधी तो उफाळणारा सागर व त्याला आव्हान देणारा कोलंबस यांच्यातील असतो.कुसुमाग्रजांच्या प्रतिभाशक्तीला अजोड अशा तरल कल्पकतेची जोड लाभली आहे. मग ती कधी 'पृथ्वीचे प्रेमगीत' गाऊ लागते; तर कधी 'अहि-नकुलाच्या' रूपकातून भिन्न प्रवृत्तींचा संघर्ष मांडते. कुसुमाग्रजांची काव्यवृत्ती भव्यतेला गवसणी घालू पाहणारी आहे. लोकमान्यांच्या पुतळ्याच्या सान्निध्यात त्यांचे मन म्हणते, "ते होते जीवित अन् हा जीवितभास.' कुसुमाग्रजांच्या मनाला दिव्यत्वाचा, उदात्ततेचा, मृत्युंजयाच्या शोधाचा ध्यास लागलेला होता.


असा हा 'ज्ञानपीठ पुरस्कार' विजेता माझा आवडता कवी अनंतात विलीन झाला. त्यांच्या काव्याचा दीपस्तंभ भविष्यातील हजारो मराठी कवींना प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून अनंतकाळ प्रकाश पुरवत राहील.

निबंध 2

majha avadta kavi essay in marathi 


भागवत धर्माचा प्रसार करणारे एकनाथ समाधिस्थ झाले व तुकारामांच्या रूपाने भक्तीचा अधिकच तेजस्वी तारा उदयास आला. तुकाराम महाराज साधे वाणी, अडाणी, मराठा कुलात जन्मले. त्यांच्या घरात विठ्ठलभक्तीची परंपरा होती. लहानपणीच त्यांच्यावर व्यवसायाची जबाबदारी येऊन पडली होती व ती ते यशस्वीपणे पार पाडत होते. लहान वयातच त्यांचे लग्नही झाले होते. परंतु अचानक पडलेल्या दुष्काळच्या तडाख्याने ते हवालदिल झाले. त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली.


संसाराच्या काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ झाल्यावर त्यांच्या मनाला परमार्थाची ओढ लागली. मग मन परमार्थात रम लागले. मग असे वाटू लागले बरे झाले देवा निघाले दिवाळे। बरी या दुष्काळे पीडा केली। समाजापासून, संसारापासून दूर डोंगरावर जाऊन त्यांनी भक्तीचा साधना केली. बाबाजी चैतन्य या गुरूंपासून ‘रामकृष्ण हरी' या मंत्राचा त्यांना लाभ झाला.

शिवाजीमहाराज त्यांच्या कीर्तनाला गेले होते. त्यांनी तुकारामांना नजराणा पाठवला होता. तुकारामांनी तो नाकारला. या 'वैभवाच्या धन्याला' समाजकंटकांकडून खूप त्रास भोगावा लागला होता. परंतु त्यांनी या दांभिकांवर शब्दाचा आसूड मारला होता. संस्कृतमधील ज्ञान मराठीत आणलं म्हणून पंडितांचा राग. म्हणून रामेश्वरभटाने त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले. पांडुरंगाने अभंग तारले.


सर्वसामान्य माणसांना तुकारामांविषयी जिव्हाळा वाटत असे. त्यांच्या कीर्तनाला त्याची खूप गर्दी होत असे. आपल्यासारखाच चुकणारा, विव्हळणारा जीव आता शांती-सुख-आनंदात डुंबत आहे, तुकाराम ज्या पायऱ्या चढून उंच मोकळ्या जागी, स्वच्छ मोकळ्या वातावरणात जाऊन बसले होते, तेथे आपण जावे असे त्यांना वाटे.


संत तुकारामांचे जीवन म्हणजे 'गरुडाचे उड्डाण.' त्यांच्या झेपेकडे पाहून माणूस अवाक् होतो. त्यांच्याबद्दल त्याला विस्मय वाटतो. परंतु साध्या, सोप्या, सरळ भाषेत त्यांनी पिटलेल्या भक्तीच्या डांगोयानं तो तुकारामांचा नकळत अनुयायी बनतो

खरोखर हे कवी तुकाराम ‘आकाशाएवढे' होते. भागवत धर्ममंदिराचा कळस होते. मराठी सारस्वताचे शिखर होते. त्यांच्या अभंगातील आर्तता, खंबीरपणा, निस्सीम भक्ती, मनातील संघर्ष, आध्यत्मिक उंची माझ्या मनाचा ठाव सोडत नाही.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3माझा आवडता कवी - बालकवी

बालपणी शाळेत शिकत असताना मनावर मोहिनी घालणाऱ्या विविध कवींच्या ज्या कविता बालकांच्या जिभेवर नाचत असतात, त्यात बालकवींच्या दहा-बारा निसर्ग-कवितांचा अग्रक्रम लागतो. बालपणी मनावर मोहिनी पडते ती त्या ओळीत जाणवणाऱ्या नादमयतेची आणि तालाची १९९० हे वर्ष बालकवींचे जन्मशताब्दीचे वर्ष म्हणून साजरे झाले उत्कृष्ट आत्मनिष्ठ कविता लिहिणारे श्रेष्ठ कवी म्हणजे बालकवी.

 बालकवींनी निसर्ग कविता समृद्ध केली. त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९० या दिवशी खानदेशातील धरणगाव या गावी झाला. बालकवींवर शालेय जीवनातच घरी भक्ती,काव्य,रसिकता यांचे आई व आजीकडून संस्कार झाले परतुका गोडी त्यांना थोरली बहीण जिजी हिने लावली नाशिकच्या दूधभांडे शास्त्र्यांनी त्यांना कालिदास,भवभूती यांच्या काम परिचय करून दिला. 

तसेच रामायण, महाभारत, शांकरभाष्य यांचेही ज्ञान करून दिले. जुन्या काळी संस्कृतचा विषयाचा अभ्यास ज्या कवींनी केला होता, त्यांच्या मराठी काव्याला एक वेगळे, नवे, देखणे, काव्यात्मक, रंगतदार रूप कसे प्राप्त होते ते पहावयाचे असल्यास आपण बालकवींच्या कवितांचे पुर्नवालोकन करावयास हवे. 


बालकवींनी बागेचे वर्णन करणारी पहिली कविता १९०३ साली लिहिली आणि २८ वर्षांचे आयुष्य निसर्गकवी या बिरुदाने मिरवावे अशा दर्जाची नवी निसर्गकविता त्यांनी मराठी भाषेला दिली केशवसुत, गोविंदाग्रज विनायक आणि रे. टिळक यांच्या काळात बालकवी आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या कविता लिहीत होते त्यात प्रेमकविता, उदास व काव्यात्मक वृत्तीच्या कविता आहेत आणि समृद्ध निसर्गाचे मानवीरूप प्रत्ययाला आणून देणाऱ्या कविताही आहेत निसर्गाशी बालकवींचे बालपणीच नाते जडले. 


केशवसुतांनी जी एक असांकेतिक, बंधनरहीत, काव्यात्मक अशी नवी कविता लिहिली तिचा संस्कार बालकवींवर झाला एवढेच त्यांचे केशवसुतांच्या कवितेशी नाते सांगता येते रेव्ह. टिळकांच्या कवितांतील भक्तिपणाचाही थोडाफार संस्कार बालकवींच्या समृद्ध निसर्गकवितांत जाणवतो. पण त्यापेक्षा अधिक त्यांनी कोणाकडूनही काही संस्कार घेतले आहेत असे म्हणता येत नाही १९१० सालीच जळगाव येथील कविसंमेलनात त्यांचा उत्स्फूर्त सन्मान झाला होता -बालकवी म्हणून आधुनिक मराठीतील खरे स्वयंभू कवी असे बालकवींना म्हणायला काहीच हरकत नाही. 


कविता हे केवळ पद्यच नसते, काव्यात्म मनोवृत्तीची ती प्रतिमामय आविष्कृती असते हे आपल्याला बालकवींच्या कवितांवरूनच म्हणता येते. "भिंत खचली उलथून खांब गेला जुनी पडकी उध्वस्त धर्मशाळा तिच्या कोलारी बसुनि पारवा तो खिन्न निरस एकान्त गीत गातो" या ओळी वाचताना आपल्या डोळ्यासमोर पारवा तर उभा राहतोच त्याचबरोबर बालकवींची कविता गाणारी खिन्न मूर्तीही डोळ्यासमोर उभी राहते. "झाकाळुनी जल गोड कालिमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर' या ओळी वाचल्यावरही अवतीभवतीचे सुंदर निसर्गदृश्य पाहत औदुंबरच जलात उतरला आहे असे वाटते बालकवींचे व्यक्तित्व हे बालसुलभवृत्तीचे होते. 


सृष्टीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी बालसुलभ होती. फुलराणीच्या या ओळीतच पहा, "हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती" 'श्रावणमास' या कवितेत ते म्हणतात - "श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे" 'पाऊस' या कवितेतील पुढील ओळी 
- "थबथबली ओथंबून खाली आली जलदारी मज दिसली सायंकाळी" 
'अरुण' या कवितेतील - 

"पूर्वसमुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची कुणी उधळली मूठ नभी ही लाल गुलालाची"

 या ओळी पहा किती विविध दृश्य आहेत ही 
 "ते डोंगर सुंदर दूरदूरचे बाई, पाहीन गडे त्या हिरव्या हिरव्या राई त्या विमल जलासह वळणे वळणे घेत हिंडून झऱ्याच्या शीतल कुंजवनात"

 "फिकट निळीने रंगविलेला कापूस मेघांचा वरुनी कुणी गुलजारी फिरविला हात कुसुंब्याचा" 

अशा शेकडो निसर्गदृश्ये बालकवींच्या कवितांत विखुरली आहेत फुलराणी ,अरुण,संध्यारजनी,श्रावणास मेघांचा कापूस इ.सर्वच कवितेतील निसर्ग बालकवींनी आपल्या बालपणीच्या मुग्ध शैशवी डोळ्यांनी पाहिलेला वा पंचेंद्रियांनी अनुभवला होता त्यामुळे बालकवींची निसर्गकविता म्हणजे मानवी भावनांच्या आविष्काराचा सुंदर आरसा झाला आहे शब्द,स्पर्श,रूप,रस,गंध या पंचेंद्रियांच्या पाच अनुभूती व गती ही सहावी जाणीव त्यांच्या सर्व कवितात त्यांच्या कवितेतील "औदुंबर जलात पाय टाकून अवतीभवतीचे दृश्य शांतपणे न्याहाळतो आहे निसर्ग सर्वत्र क्रीडाच करतो आहे. 


त्या कवितेतील नाद,ताल वता चार अप्रातम मिश्रण जगातल्या कुठल्या दुसऱ्या भाषेत असू शकेल काय ? असा विचार मनात येतो व भाषत नसणारा एक नवाच शब्द फुलराणी हा मराठीत रुजला व फुलराणीचा विवाह ही घटनासुद्धा जगाच्या वाङ्मयात अमर झाली. "कुणी नाही ग कुणी नाही आम्हांला पाहत बाई शांती दाटली चोहीकडे या ग आता पुढेपुढे लाजत लाजत हळुच हासत खेळ गडे खेळू काही कोणीही पाहात नाही' या ओळीत कोणाचे वर्णन आहे? 


अंगणात खेळणाऱ्या लहान मुलींचे की आकाशात रात्री चमचमणाऱ्या चांदण्यांचे? बालकवींनी मराठी निसर्गकवितेला ही देणगी दिलेली आहे त्यांनी आपल्या तरल मनाच्या भावावस्था निसर्गातील विविध रूपांतून अनुभवत्या सौंदर्यग्रहणाची अतिशय कोमल व तरल शक्ती बालकवींच्या मनात होती तसा त्यांचा ध्यास होता. 

"
सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबनि घ्यावे चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे प्रीतिसारिका गीत तियेचे ऐकावे कानी बनवावे मग धुंद रंगुनी काव्यसुधा पानी" 

आणि हा ध्यास असणाऱ्या कवीच्या मनाला दुसरी पण बाजू होती त्यांच्या मनाचा पारवा कधीकधी कोलावर बसून खिन्न निरस एकांत गीत गातो एखाद्यावेळी तो म्हणतोच "कोठुनी येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतहृदयाला" "आनंदी आनंद गडे म्हणता म्हणता बालकवींच्या शून्य मनाच्या घुमटात कसले तरी घुमते गीत" अशाप्रकारे आनंदाच्या व दुःखाच्या अनेक परी वर्णन करून गाणारा बालविहग बालकवी अपघातात मृत्यू पावतो नि मराठी माणसाच्या मनात निसर्ग प्रेमाचे अमररूप घेतो.
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

maza avadta kavi marathi nibandh | माझा आवडता कवी मराठी निबंध

 Mahavidyalaya cha nirop ghetana marathi nibandh | महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध बघणार आहोत. आपल्‍या आयुष्‍यातील आपल्‍याला परत हवेहवेसे वाटणारे क्षण असतात. सर्वात सोनेरी क्षण असतात महाविद्यालयातील आणि ,महाविद्यालय म्‍हटले की सर्वाना आठवण झाल्‍याशिवाय राहत नाही ते म्‍हणजे  तेथे झालेल्‍या गंमती जमती, शिक्षकांनी आपल्‍या केलेल्‍या तक्रारी, आपण केलेली मौजमजा , हा काळ कोणीही विसरू शकत नाही .  कितीही सोनेरी असले प्रत्‍येक क्षण हा निघुन जात असतो आणि हा महाविद्यालयातील शेवटचा  क्षण असतो महाविद्यालयाचा निरोप समारंभाचा दिवस त्‍याच अनुशंगाने आपण सविस्‍तर निंबध लेखन करणार आहोत चला तर मग निबंधाला सुरूवात करूया.


Mahavidyalaya-cha-nirop-ghetana-marathi-nibandh


नुकताच मी बँकेतुन संध्याकाळी घरी परतलो, तर घराच्या दारात एक माझा  महाविद्यालयातील मित्र माझी वाट पाहत उभा होता. तो पुण्याला एका नोकरीच्या संदर्भात इंटरव्ह्यु देण्यासाठी आला होता. त्‍यापुर्वी माझ्या आईने त्‍याचे  स्वागत, चहा-पाणी वगैरे केले होतेच. मीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिलो जवळजवळ ६ ते ७ वर्षांनी भेटत होतो आम्ही. आमच्या गप्पा रंगल्या आणि एकदम त्यांनी त्यांच्या बॅगमधुन एक फोटो काढला. 


तो फोटो पाहुन मी एकदम भारावून गेलो. तो फोटो होता महाविद्यालयाच्‍या निरोप समारंभाच्या दिवसाचा. त्यामध्ये माझा मित्र आणि मी आम्हा दोघांचा सत्कार त्यावेळचे मा. शिक्षणसंचालक यांच्या हस्ते झाला होता. आम्ही दोघेही जवळजवळ समान गुण घेऊन गुणवत्ता यादीत तेरा आणि चौदा क्रमांकांनी उत्तीर्ण झालो होतो. तो फोटो पाहिला आणि त्या दिवसामध्ये एकाएकी हरवून गेलो.

 

ज्या महाविद्यालयात  मी शिकत होतो, त्या महाविद्यालयाचा 'निरोप समारंभ' माझ्या डोळ्यासमोरून जाऊ लागला. गेली ५ वर्षे  ते महाविद्यालय माझे आराध्य दैवत होते. माझा मित्र अन मी नेहमी पहिल्या पाच क्रमांकात येत होतो. चांगली चढाओढ होती आमची. ती शेवटपर्यंत गाजवली. अर्थातच विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष - ग्रंथालयाचा प्रमुख – क्रीडा प्रमुख  - सहलप्रमुख ही सगळी पदे आम्ही भूषवली होती. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आम्हांला चांगले ओळखत. 


सर्वजण 'सिनियर्स' म्हणून मान देत. स्पर्धा झाल्या. परीक्षा झाल्या आणि बघता बघता शैक्षणिक वर्ष कधी संपले हैं समजलेच नाही... परीक्षांचा रिझल्ट आला, तोही आमच्या दोघांच्या नावांनी मोठे यश घेऊन. निरोप आणि सत्कार समारंभाची सूचना फळ्यावर लावली गेली. आणि गेलेले सर्व दिवस शांत बसू देईनात. महाविद्यालयाच्‍या सहलीतील झालेल्‍या गमती जमती  , त्या वक्तृत्व स्पर्धा, ग्रंथालयातील पुस्तके मिळविण्यासाठी धडपड, मित्रांशी झालेली भांडणे, त्या मारामाऱ्या. काही काही म्हणून डोळ्यासमोरून दूर होईना. मन भरून आले... नको, नको तो निरोप समारंभ असे वाटू लागले.


अखेरीस ती सकाळ उजाडली. ठीक १० वाजता महाविद्यालयाच्या हॉलमध्ये आम्ही सर्वजण जमलो. मी, माझा मित्र आणि काही विद्यार्थी स्टेजवर बसणार होतो. माननीय अध्यक्ष, मा. मुख्याध्यापक, इतर सर्व मा. अध्यापक मंडळी व्यासपीठावर आले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. व्यासपीठावर उजव्या बाजूस बसण्याची खास व्यवस्था आमची केली होती. संकोच वाटत होता... तसा हा समारंभ सत्काराचा-आनंदाचा होता. परंतु एकप्रकारची हुरहुर त्यात होती. कारण 'निरोप' ही घ्यायचा होता. 


नेहमीचे उपक्रम झाल्यावर मा. मुख्याध्यापक बोलण्यास उभे राहिले, तुम्ही हुशार, बुद्धिमान विद्यार्थी, देशाचे भावी नागरिक आणि देशाचे भवितव्य घडविणारे. उद्या तुम्ही वैभवाच्या शिखरावर असाल, उच्च शिक्षण घेऊन परदेशी जाल. खूप मोठे व्हाल. पण बाळांनो, आपल्या देशाला विसरू नका... आपल्या महाविद्यालयाचे स्मरण ठेवा. जिथे प्रथम तुम्हांला अंकुर फुटले, छोटी छोटी पाने, फुले आली त्या जमिनीला विसरू नका.


आपले, आपल्या महाविद्यालयाचे, देशाचे नाव, उज्ज्वल करा. जीवनात सर्वजण यशस्वी होतातच असे नाही, पण अपयशाने खचून जाऊ नका. प्रयत्नशील रहा. आमचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहेत. त्यानंतर आमचा खरोखरीच धीर सुटत चालला होता. आम्ही सुन्न होऊन बसलो होतो. त्यानंतर एक एक शिक्षकही उठले आणि त्यांनी आम्हांला भरभरून आशीर्वाद दिले. 'महाविद्यालय ही यशाची खरी पायरी आहे, असे सांगून तुमच्या पाठीशी महाविद्यालय सदैव राहील' असे विचार व्यक्त केले. 

मा. शिक्षणाधिकाऱ्यांनी ही आमचे कौतुक केले. सर्वांकडून आम्हांला फुलांचे हार, गुच्छ, ग्रंथ असे पुरस्कार मिळत होते. आणि अखेरीस सत्कारास उत्तर देण्याची वेळ आली आणि सर्वांनी माझ्याकडे बोट दाखविले. सर्वांच्या वतीने मी बोलणार होतो. घसा दाटून आला होता. अनेक प्रसंग आठवत होते आणि त्याप्रसंगी वेळोवेळी शिक्षक मित्र आणि मुख्याध्यापकांनी दिलेला आधार आठवत होता, 'क्षमाशील वृत्तीनेच आज आम्ही इथे पोहोचलो,


सर्वांच्या आधाराने आज आम्ही यशस्वी झालो. आम्ही आपले सदैव ऋणी आहोत.' असे म्हणून दाटलेल्या कंठानेच आम्ही सर्वजण पुढे येऊन नतमस्तक झालो. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर झाला आणि अश्रृंना वाट मिळाली. चहापान झाले पण कोणीच कोणाशी बोलत नव्हते... खिन्न मनाने आम्ही घरी परतलो. या प्रसंगाला किती वर्षे लोटली. आम्‍ही दोघे खूप खूप बोललो, हसलो आणि महाविद्यालयाच्या त्या हरवलेल्या क्षणांमध्‍ये परत जाण्याचा परत परत प्रयत्न करीत राहिलो.

मित्रांनो तुम्‍हाला college farewell essay in marathi हा निबंध कसा वाटला हे  व तुम्‍ही अनुभवलेला महाविद्यालयातील निरोप समारंभाचा दिवस कसा होता कमेंट करून सांगु शकता.  धन्‍यवाद

Mahavidyalaya cha nirop ghetana marathi nibandh | महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध

maza avadta samaj sudharak essay in marathi | माझा आवडता समाजसुधारक मराठी निबंध समाजाच्या दु:खांशी नातं सांगणाऱ्यांना, शतकांची कुंपणं अडवत नाहीत. ते शब्द कुरवाळीत नाहीत अन् खाजगी व्यथाही गोंजारत नाहीत! सभोवतीच्या दुःखांना आव्हान देत येतात. या समाजातल्या दु:खभरल्या रात्री अन् अंधारलेली मने उजळून लख्ख करतात. अशी ही परमेश्वराप्रमाणे पूजनीय व्यक्तिमत्त्व म्हणजेच आपले समाजसुधारक होत. असाच एक वंदनीय समाजसुधारक मराठी मातीत जन्मलेला आहे, जो आज महाराष्ट्राचंच नव्हे तर जगाचं भूषण ठरला आहे आणि तो म्हणजे बाबा आमटे! मुरलीधर देवीदास आमटे हे त्यांचं खरं नाव. 

maza-avadta-samaj-sudharak-essay-in-marathi
maza-avadta-samaj-sudharak-essay-in-marathi


२६ डिसेंबर १९१४ रोजी हिंगणघाट येथे एका कर्मठ जमीनदाराच्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९४९ मध्ये ‘स्कूल ऑफ ट्रॉपिकल डिसीझेस्' इथे त्यांनी महारोग्यांवरील अभ्यासक्रम पूर्ण केला. १९५० मध्ये त्यांनी 'महारोगी सेवा समिती' स्थापन केली. बाबांना ज्या क्षणी 'क्षितीज नसलेले पंख' लाभले असल्याची जाणीव झाली, त्याच क्षणी नियतीने त्यांच्या पुढ्यात परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकेसारखा, तो गटारात रूतलेला महारोगी आणून टाकला, त्याचक्षणी महारोग्याच्या शरीराच्या जखमा आधुनिक उपचारांनी बऱ्या करणे सोपे असले तरी त्याच्या मनाला झालेल्या जखमा पूर्णपणे भरून यायला त्याचा पुरुषार्थ जागृत केला पाहिजे, हे बाबासाहेबांनी अचूक ओळखले. हे काम करताना आलेल्या अनुभवांतून आणि झालेल्या चिंतनातून चंद्रपूर जिल्ह्यातील 'आनंदवना'चा जन्म झाला.

 उद्ध्वस्त मानवातून पराक्रमी व्यक्तित्व निर्माण करण्याचा हा त्यांचा प्रयत्न पाहून परदेशातील जाणती मंडळी त्यांना मोठ्या आपुलकीने मदत करीत आहेत. आनंदवनासाठी सर्वप्रथम परदेशातून आलेली मदत नॉर्मा शिअर या अभिनेत्रीकडून होती! गांधीजींनी त्यांना अभय साधक' ही पदवी दिली. फक्त आनंदवनापाशीच ते थांबले नाहीत, तो त्यांचा मार्गावरचा एक टप्पा आहे. आज खलिस्तनवादी लोक 'भारत तोडो' म्हणत असतानाच त्यांनी देशाची एकता, अखंडता अबाधित राखण्यासाठी 'भारत जोडो' ही पदयात्रा काढली. समाजसुधारणेचा त्यांचा आणखी एक सुंदर प्रयत्न म्हणजे 'ज्वाला आणि फुले', 'करुणेचा कलाम' ह्या त्यांच्या कविता! त्यांच्या एकांतसाधनेचं ते फलित आहे. आजच्या युवापिढीला मारलेली ती अमूर्त हाक आहे. आळस, दैववाद, असामाजिकता, अल्पसंतुष्टता व संवेदनहीनता यांनी ग्रासलेल्या मनांना उद्देशून सोमनाथच्या आंतरभारती श्रमसंस्कार छावणीत बाबा म्हणाले, 'मन का कुष्ठ शरीर के कुष्ठसे अधिक भयंकर होता है।' हे जग व जीवन, फुलवण्याकरिता, उपभोग घेण्याकरिता आपल्याला दिले आहे, निसर्ग अनंत हस्तांनी आपणाला देऊ शकतो, पण त्याला संतुष्ट करण्याचे आव्हान भारतीयाने स्वीकारले पाहिजे, असा बाबांचा आग्रह आहे. यश यावे आणि या माझ्या आवडत्या समाजसुधारकाचे स्वप्न साकार व्हावे हीच माझ्यासारख्या त्यांच्या चाहतीची इच्छा ! म्हणून मला बाबांविषयी म्हणावंसं वाटतं 'जे का रंजले गांजले त्यांसि म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि

 निबंध  2

तुकाराम महाराज म्हणतात,
जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले
तोची साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा' 
देवाची अशी सुंदर परिभाषा तुकाराम महाराजांनी केली. खरे म्हणजे देव ह्या पेक्षा वेगळा असूच शकत नाही. देव हा माणसात आहे मूर्तीत नाही हे तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराजांच्या या अभंगानुसार मला अशा प्रकारचे गुण असलेला महापुरुष आढळून आला ते म्हणजे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
बी.ए.,बी.एससी.,डीएससी.,एम.ए.,पी.एच.डी. अशा अनेक पदव्या प्राप्त करुन ते उच्चविद्याविभुषीत झाले.


भरपुर संपत्ती कमावून आपल्या कुटूंबाचा फायदा करु शकले असते.परंतु समाजसेवेचे व्रत घेणा-या या महापुरुषाला संपत्ती कमविण्याचे ध्येय नव्हते.त्यांना वेड होत ते भारतीय समाजाला अंधारातुन प्रकाशाकडे नेण्याचे, अज्ञानातुन ज्ञानाकडे नेण्याचे,अधोगतीतुन प्रगतीकडे नेण्याचे. बुद्ध,कबीर व महात्मा फुले या महापुरुषांना त्यांनी आपले गुरु मानले.या तीनपैकी कुणाचाही त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आला नाही किंवा ते समकालीन सुद्धा नव्हते परंतु त्यांचे विचार व कार्य डॉ.आंबेडकरांना अतिशय महत्वाचे वाटले.त्यामुळे वरिल तिन्ही महापुरुषांना त्यांनी आपल्या गुरुस्थानी मानले.त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा प्रचंड आहे. प्रत्येक ग्रंथात अमूल्य विचार आहेत. २) ग्रंथ निर्मिती : शूद्रांना शतकानुशतके विद्या ग्रहण करण्यावर परंपरेने बंदी घातली होती त्यामुळे भारतीय बांधव आपला इतिहास विसरला. त्याला आपली ओळख राहिली नाही. तेंव्हा त्याला आपली ओळख व्हावी या उद्देशाने बाबासाहेबांनी त्यांच्या करिता “शुद्र पूर्वी कोण होत?' हा ग्रंथ लिहिला. 'हिंदू स्त्रियांची उन्नती व अधोगती', 'रीडल्स इन हिंदूइझम'इ. प्रत्येक भारतीयाने वाचावेत अशी ग्रंथसंपदा आहे.


बुद्ध आणि त्यांचा धम्म' हा ग्रंथ सुद्धा बाबासाहेबांनी सर्वच बहुजनासाठी लिहला. तो केवळ बौद्ध अनुयायांसाठीच लिहिला असे अजिबात नाही. हा ग्रंथ म्हणजे बुद्धाने केलेल्या क्रांतीचा इतिहास आहे. हा कुण्या एका जातीसाठी लिहिला नाही. कुण्या एका धर्मासाठी लिहिला नाही. ३) हिंदू कोड बिल : हिंदू स्त्रियांना आपले हक्क व अधिकार मिळावेत या करिता हिंदू कोड बिल तयार केले होते. परंतु त्या बिलात कोणत्या तरतुदी आहेत ह्याची पुसटशीही कल्पना नसलेल्या हिंदू स्त्रियांनी त्याचा प्रखर विरोध केला.


४) घटना निर्मिती : आज जगातील सर्वात मोठी लिखित घटना म्हणून महत्व आहे. जगातील एक महान घटनाकार म्हणून जग बाबासाहेबांना घटनेवरच आज भारतीय लोकशाही सुरु आहे.परंपरेने नाकारलेले मुलभूत अधिकार घटनेमुळे '. मिळाले.


स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्याय यावर अधारीत राष्ट्राच्या निर्मितीवर त्यांनी भर दिला व त्या प्रकारची कलमे संविधानात अंतर्भुत केली.शिका,संघटीत व्हा व अन्यायाविरुद्ध संघर्ष करा ही त्यांची त्रिसुत्री आहे.
म्हणूनच कवी म्हणतो, “उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे”. बहुजनांचे हित साधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माझे कोटी कोटी प्रणाम!


 निबंध 3


माझा आवडता समाजसुधारक महात्मा ज्योतिबांं फुलेमहत्‍वाचे मुद्दे : 

(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

 • माझा आवडता समाजसुधारक एकोणिसाव्या शतकातील महात्मा जोतीराव फुले
 • विदयेचे महत्त्व जाणणारा
 • बालपणापासून आईचा वियोग
 • वडिलांचे प्रेम मिळाले
 • समाजातील अनिष्ट प्रथांची जाणीव 
 • कार्याची आखणी 
 • पत्नीचे बहुमोल साहाय्य
 • ज्ञानदान
 • स्त्रियांसाठी शाळा
 • दलितांसाठी हौद
 • शेतकऱ्याचा असूड 
 • सत्यशोधक समाज

"विदयेविना मति गेली। 
मतीविना नीति गेली। 
नीतीविना गति गेली। 
गतीविना वित्त गेले।।
इतके अनर्थ एका अविदयेने केले."

किती मोजक्या शब्दांत जोतीरावांनी येथे विदयेचे महत्त्व सांगितले आहे ! कारण स्वतः त्यांना विदया मिळवायला खुप  कष्ट घ्यावे लागले होते. १८२७ मध्ये  त्यांचा जन्म झाला होता. बालवयातच त्यांची आई देवाघरी गेली आणि आईचे प्रेम त्यांना त्यांच्या वडलांनी, गोविंदरावांनीच दिले. शिकत असतानाच विविध अनुभवांतून जोतीरावांना भोवतालच्या समाजातील अनिष्ट प्रथा लक्षात आल्या.

 मोठ्या कष्टाने त्यांनी इंग्रजी विदया संपादन केली आणि भरपूर वाचन करून ते बहुश्रुत झाले. शिक्षणाचे महत्त्व पटलेल्या जोतीरावांनी १८४८ साली मुलींची पहिली शाळा स्थापन केली. त्यांनी प्रथम आपल्या पत्नीला-सावित्रीबाईंना शिकवले आणि त्यांच्याकडे विद्यार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले. सावित्रीबाईंची त्यांना जन्मभर साथ मिळाली. 


स्त्रियांच्या शिक्षणाला त्या काळात प्रखर विरोध होता. जोतीरावांना व सावित्रीबाईंना दगडगोटे, शेणमाती यांचा मारा सहन करावा लागला. पण १८४८ साली सुरू केलेले ज्ञानदानाचे कार्य त्यांनी सतत चालू ठेवले. जोतीराव फुले यांना जे वाटले, ते त्यांनी बोलून दाखवले, त्याप्रमाणे कृती केली म्हणून आचार्य अत्रे त्यांचा उल्लेख 'कर्ते सुधारक' असा करतात.जोतीरावांच्या काळात म्हणजे सुमारे दीडशे वर्षांपूर्वी स्त्रियांची स्थिती अत्यंत दयनीय होती. विशेषतः विधवा स्त्रियांना फार वाईट वागणूक दिली जात असे. त्यांचे केशवपन केले जाई. ही अनिष्ट रूढी बंद पडावी म्हणून जोतीरावांनी न्हाव्यांचाच संप घडवून आणला. त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाची चळवळ उभी केली. तसेच, त्यांनी बालहत्याप्रतिबंधकगृहाची देखील स्थापना केली.जोतीरावांनी दलित वर्गाचीही दुःखे हलकी करण्याचा यत्न केला. त्यांच्यासाठी आपल्या घरचा पाण्याचा हौद खुला केला. शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीचा अभ्यास करून त्यांची स्थिती सुधारावी म्हणून जोतीरावांनी शेतकऱ्याचा असूड' हे पुस्तक लिहून सरकारला अनेक उपाय सुचवले. 


१८७३ मध्ये फुले यांनी 'सत्यशोधक समाजा'ची स्थापना केली. सर्व धर्मांचे व जातींचे नागरिक या सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत, अशी त्यांनी योजना केली होती. आपले विचार मांडताना जोतीरावांनी 'अखंड रचले. त्यांत ते आपल्या देशबांधवांना मौलिक संदेश देतात -
जगाच्या कल्याणा। देह कष्टवावा। कारणी लावावा। सत्यासाठी।। असा हा कर्ता सुधारक माझा आवडता आणि आदर्श समाजसुधारक आहे. 

maza avadta samaj sudharak essay in marathi | माझा आवडता समाजसुधारक मराठी निबंध

essay on trees our best friend in marathi | वृक्ष आपले मित्र मराठी निबंधनमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वृक्ष आपले मित्र मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधात मानवाला जिवन जगण्‍यासाठी वृक्ष किती उपयोगी आहेत याचे महत्‍व पटवुन सांंगीतले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

वृक्षांची महती आपल्या भारतात प्राचीन काळापासून सांगीतली  गेली आहे. तुकाराम महाराजांना तर वृक्ष हे आपले सगेसोयरे वाटतात. असे हे वृक्ष आज या आधुनिक विज्ञानयुगातही- आपले जिवलग मित्र आहेत.

विज्ञानामुळे माणसाने खूप प्रगती केली पण या विकासासाठी माणसाने अविचाराने जंगलतोड केली. आपण आपल्या या वृक्षमित्राचा घात केल्याने स्वत:वरच दुष्काळाचे, प्रदूषणाचे संकट ओढवून घेत आहोत, याचा माणसाला विसर पडलेला आहे. वृक्ष ही निसर्गाची फुप्फुसे आहेत. हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि 'प्राणवायू' हवेत सोडून हवा शुद्ध करण्याचे काम करतात. यामुळे माणसाचे जगणे सुकर व सुखी झाले आहे.

essay-on-trees-our-best-friend-in-marathi
essay-on-trees-our-best-friend-in-marathi

वृक्ष आपल्याला सहस्र हातांनी मदत करतात. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा तर ते भागवतातच; शिवाय आपल्या पूजाविधीसाठी नानाविध साहित्य देऊन आपल्याला सुखावतात. आज वनस्पतींपासून मिळालेल्या अनेक औषधींचा उपयोग करून माणसाने असाध्य आजारांवर मात केली आहे.

स्वतः जळून हे वृक्ष इतरांच्या उपयोगी पडतात. वृक्षाचा प्रत्येक अवयव माणूस, प्राणी, पक्षी यांना उपयुक्त आहे. वृक्षांजवळ भेदभाव नसतो. ते सर्वांना समान वागणूक देतात. अगदी त्याच्या अंगावर घाव घालणाऱ्या कुन्हाडीचे पातेही तो सुगंधित करतो. मानवाच्या एकाकी जीवनातही वृक्ष साथसंगत देतात. माणूस आपल्या अनेक आठवणी या वृक्षांशी जपून ठेवतो. तो त्यांच्याशी हितगूज करतो. असे हे वृक्ष मानवाचे जिवलग मित्र आहेत.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व वृक्षारोपण करण्‍यासाठी आणखी काय उपाय योजना करायला पाहीजे हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

essay on trees our best friend in marathi | वृक्ष आपले मित्र मराठी निबंध

maza avadta kalakar marathi essay | माझा आवडता कलाकार मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण maza avadta kalakar marathi essay बघणार आहोत. प्रत्‍येकाला कोणत्‍यातरी कलेमध्‍ये रस असतो मला गायनात आहे त्‍यामुळे माझ्या आवडत्‍या कलाकार आहेत लता दीदी चला तर जाणुन घेऊया त्‍यांच्‍याविषयी माहीती.

ग्रीष्म ऋतूतील ती संध्याकाळ होती. सूर्यदेव अस्ताला गेले होते. तरीपण त्यांच्या कठोर कर्तबगारीची चुणूक अजून जाणवत होती. एक सभा गेले दोन तास रंगली होती. लतादीदी रंगमंचावर उपस्थित होत्या. सभा संपत आली तेव्हा सर्वांनी दीदींना गाणे म्हणण्याचा आग्रह केला. लोकाग्रहाखातर दीदींनी सूर लावला, कोणतेही वादय साथीला नसताना 'मोगरा फुलला' हा अभंग लतादीदी गाऊ लागल्या नि वातावरणातील दाहकता अचानक लुप्त झाली. सर्वत्र प्रसन्न समाधानी वातावरण निर्माण झाले आणि याच वातावरणात सभा संपली. हे सामर्थ्य असलेल्या कलावती लता मंगेशकर आज साऱ्या विश्वात विख्यात आहेत. त्याच लतादीदी माझ्या आवडत्या कलावंत आहेत.

maza-avadta-kalakar-marathi-essay
maza-avadta-kalakar-marathi-essay

भारत सरकारने लतादीदींना 'भारतरत्न' हा किताब दिला,
तेव्हा मनात आले की या उपाधीने त्यांचा गौरव झाला की त्यांच्यामुळे प्रत्यक्ष या उपाधीची झळाळी वाढली. लता मंगेशकर यांना आजवर राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर 'स्वरभारती', 'कलाप्रवीण', 'सूर श्री', 'स्वरलता' व 'डी. लिट.' असे अनेक बहुमान प्राप्त झाले आहेत. पण या यशामागे पर्वतासारखे परिश्रम आहेत. यशाचा मार्ग हा काट्याकुट्यांतून जातो. अनेक कसोट्यांतून उतरल्यावरच सुवर्णाचे तेज झळाळते.

 आज साऱ्या  मर्यादा ओलांडून लतादीदी या कोट्यवधी जनतेच्या मनावर अधिराज्य करत आहेत. संगीताच्या क्षेत्रात त्यांचे स्थान सर्वोत्कृष्ट व सर्वमान्य आहे.  अनेक ख्यातनाम संगीतकारांची १८०० च्या वर चित्रपटांतील विविध रंगढंगांची सुमारे बावीस भाषांतील गाणी लतादीदींनी गायली असून त्यांची संख्या सुमारे पंचवीस ते तीस हजारांच्या घरात सहज जाते.

लतादीदींच्या स्वर्गीय मधुर आवाजाने असंख्य गाणी चिरंजीव झाली आहेत. मराठी माणसाच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर दीदींच्या आवाजातील ओळी आपल्याला साथ देत असतात. 'आनंदघन' या नावाने त्यांनी संगीत-दिग्दर्शनही केले. त्यांनी गायलेले 'ए मेरे वतन के लोगों' हे गीत आजही भारतीयांचे डोळे ओले करते.

अगदी लहान वयात दीदींनी आपल्या बाबांबरोबर नारदाची भूमिका केली होती. 'सौभद्र', 'भावबंधन' अशा नाटकांतूनही त्यांनी कामे केली. 'गजाभाऊ' व 'पहिली मंगळागौर' अशा काही मराठी चित्रपटांतूनही छोट्या भूमिका केल्या. कारण साऱ्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

लतादीदींच्या  सुरेल, मुलायम व परिपूर्ण अशा स्वरांनी लक्षावधी श्रोत्यांना सुरांची माधुरी व सौंदर्य प्रत्ययास आणून दिले. त्यांच्या आवाजाच्या उंच खोलीमुळे, लवचिकतेमुळे, अलौकिक फिरतीमळे चित्रपट संगीतकारांना नवनवीन प्रयोग करणे शक्य झाले. 'तीन मिनिटांच्या तबकडीतून लोकांपर्यंत संगीत पोचवण्याचे अवघड काम लताने केले,' असा त्यांचा गौरव प्रत्यक्ष कुमार गंधर्वांनी केला आहे.

आपल्या भावंडांसाठी, आपल्या कुटुंबासाठी लतादीदींनी जे अतोनात श्रम केले, त्यांची आठवण आजही त्यांना, त्यांच्या भावंडांना व्यथित करते. अत्युच्च पदावर पोचूनही या थोर कलावतीने विनम्रपणा सोडला नाही. आपली सामाजिक जबाबदारीही ती विसरली नाही. पुण्याचे 'दीनानाथ मंगेशकर रुग्णालय' हे त्याचेच द्योतक आहे. या एवढ्या यशस्वी जीवनातही शास्त्रीय संगीताला आणि आपल्या इतर छंदांना आपण पुरेसा वेळ देऊ शकलो नाही, ही खंत दीदींना आहे. अशी ही गानकोकिळा भारतवर्षाचे अक्षय वैभव आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

maza avadta kalakar marathi essay | माझा आवडता कलाकार मराठी निबंध

maza avadta prani essay in marathi | माझा आवडता प्राणी मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण maza avadta prani essay in marathi निबंध बघणार आहोत. आपल्‍या अवतीभोवती आपल्‍याला गाय म्‍हैस, मांजर,कुत्रा यासारखे प्राणी दिसुन येतात, प्रत्‍येक लोकांना वेगवेगळे प्राणी आवडतात परंतु मला कुत्रा आवडतो. म्‍हणुन मी या विषयावर 2  सुंदर निबंध लिहीले आहेत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

माझ्या बाबांना कुत्रा हा प्राणी खूप प्रिय आहे. त्यामुळे आमच्या घरात नेहमी एक-दोन कुत्री पाळलेली असतात. त्यांपैकी एक म्हणजे आमची गोल्डी. मी दुसरीत असताना बाबांनी हे पिलू विकत आणले. त्यामुळे ते माझ्याबरोबरच मोठे झाले आणि माझी खास मैत्रीण बनले. ही कुत्री आहे आणि ती खास लॅब्रेडॉर जातीची आहे. तिला विकणाऱ्याने तिच्या घराण्याचा सर्व इतिहास व तिची माहिती दिली होती. आमच्या घरी आली, तेव्हा ती फक्त सहा आठवड्यांची होती. पांढरा, सोनेरी असा लोकरीचा गुबगुबीत गुंडा! आजीने तिच्या रंगावरून तिचे गोल्डी' नाव ठेवले.


maza-avadta-prani-essay-in-marathi
maza-avadta-prani-essay-in-marathi

पाहता पाहता गोल्डी मोठी झाली. आमच्याकडे येणारे लोक तिचा आकार पाहूनच घाबरतात. ती पूर्ण शाकाहारी आहे. टोमॅटो, काकडी, बटाटे तिला प्रिय. लपवलेली वस्तू शोधून काढण्याचा खेळ तिला आवडतो. ती सर्वांना 'शेक हॅन्ड' करते. गाडीत बसून फिरायला जाताना ती फार खूश असते. गोल्डी अतिशय स्वच्छताप्रिय आहे. ती अतिशय प्रेमळ आहे. त्यामुळे नंतर आमच्या घरी आणलेल्या इतर कुत्र्यांवरही ती प्रेम करते. आता ती वृद्ध झाली आहे, पण तिचा रुबाब तसाच टिकून आहे.

तर हा होता आमच्‍या लाडक्‍या गोल्‍डीचा निबंध हा तुम्‍हाला कसा वाटला ते तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . व खालील दुसरा निबंध वाचायला विसरू नका धन्‍यवाद .

निबंध 2

maza avadta prani marathi nibandh

माझा आवडता पाळीव प्राणी आम्ही आमच्या कुत्र्याला 'बॉबी' म्हणतो. कोणताही मानवी संरक्षक रक्षण करणार नाही, एवढे बॉबी आमच्या घराचे रक्षण करतो. हे घर आमचे नसून त्याचेच असावे अशा रुबाबात तो आपल्या गोंडेदार शेपटीसह साऱ्या बंगल्यात वावरत असतो. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा भाव जण सांगत असतो की, 'माझ्याच कृपेने तुम्ही या घरात वास्तव्य करत आहात हं!'

आठ वर्षांपूर्वी बॉबी आमच्या घरात आला तेव्हा तो इतका गुबगुबीत होता की, मऊ मऊ लोकरीचा एक गुंडाच भासत असे. छोटा बॉबी दुधाशिवाय दुसरे काहीही खात नसे आणि लुटूलुटू चालणाऱ्या त्याला धड जिनाही चढता येत नसे. तोच बॉबी आता अवाढव्य झाला आहे. त्याचा भव्य देह, काळेभोर पाणीदार डोळे आणि त्याचा प्रचंड आवाज यांमुळे कोणीही परका माणूस घरात शिरण्याचा चुकूनसुद्धा विचार करत नाही.

बॉबीचे नाक मोठे तिखट आहे. त्यामुळे घराच्या फाटकाशी आलेली व्यक्ती परिचित आहे की अपरिचित हे त्याला केवळ वासानेच कळते. बॉबीला बोलता येत नाही, पण आपण बोललेले सर्व त्याला कळते. त्याला काही हवे असल्यास तो विविध आवाज काढून तसे सुचवतो आणि जर का आपण दुर्लक्ष केले तर तो आपल्या अंगावर चढाई करतो. 'आंघोळ' असा शब्द नुसत्या बोलण्यातही आला. तरी तो लपतो. पण एकदा आंघोळीला सुरवात झाली की तो मनसोक्त आंघोळ करतो.

बॉबी खरा खेळकर आहे. चेंडू फेकाफेकीचा खेळ त्याला खूपच आवडतो. कुठेही दडलेला चेंडू तो बरोबर हुडकून काढतो. बॉबीची स्मरणशक्ती दांडगी आहे; म्हणून तर एकदा इंजेक्शन घेतलेला बॉबी आता सिरिंज पाहताच पळून जातो आणि पलंगाखाली दडून बसतो. असा बॉबी माझा अत्यंत लाडका व आवडता कुत्रा आहे.

maza avadta prani essay in marathi | माझा आवडता प्राणी मराठी निबंध

my best friend essay in Marathi | माझा आवडता मित्र मराठी निबंध

नमस्‍कार मित्रांनो आज आपण माझा आवडता मित्र मराठी निबंध बघणार आहोत,  मित्र हा शब्द बोलायला जेवढा सोपा आहे तेवढाच खरा मित्र मिळविणे कठीण काम आहे एक खरा मित्र तो आहे जो तुम्हाला संकटात मदत करतो आणि योग्य मार्गदर्शन करतो. आपल्‍या वागण्‍याबोलण्‍यातील उणीवा दाखवतो. 


इंग्रजीत एक म्हण आहे – “A friend in need is a friend indeed.” गरजेच्या, संकटाच्या वेळी जो कामी येतो तोच खरा मित्र. मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात तो एकटा राहू शकत नाही. त्याला समाजात सर्वांच्या बरोबर चालण्यासाठी, सुख दु:खात सहभागी होण्यासाठी, मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी एका विश्वसनीय मित्राची गरज असते. 


मैत्रीबाबत असे म्हटले जाते की, मैत्री केली जात नाही, मैत्री आपोआप होते. मने जुळल्यावर एकमेकांचे वागणे आवडल्यावर परिचयाचे रूपांतर गाढ मैत्रीत होते. भारतात कृष्ण-सुदामा, राम-सुग्रीव, कर्ण-दुर्योधन ही मैत्रीची उत्तम उदाहरणे दाखविता येतात.माझा पण असाच एक खरा मित्र आहे. त्याचे नाव अशोक आहे व तो माझा वर्गमित्र आहे. आम्ही दोघे नेहमी बरोबर असतो. आमचे कुटुंबीय दहा वर्षांपूर्वी महिनाभराच्या अंतराने या गावी आले. तेव्हापासूनच आमची मैत्री जमली. अशोकचे वडील शिक्षक आहेत आणि माझे वडील बँकेत काम करतात. अशोकचे वडीलच शाळेत प्रवेश घेताना आमच्याबरोबर आले होते. तेव्हापासून आमची ओळख व मग मैत्री झाली.अशोकची उंची ४.५" आहे. आम्ही ७ व्या वर्गात आहोत. अशोक खूप अभ्यास करतो. वर्गात शिकविणे चालू असताना तो एकाग्र होऊन शिक्षकांकडे लक्ष देतो. महत्त्वाचे मुद्दे वहीत लिहून घेतो. त्याचे अक्षर सुंदर आहे. त्याला नेहमीच चांगले गुण मिळतात. तो जसा चांगला विद्यार्थी आहे तितकाच चांगला खेळाडू आहे. तो फुटबॉल संघाचा कप्तान आहे. त्याचे वागणे नम्र आहे. शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये तो सारखाच लोकप्रिय आहे. तो नेहमी वेळेवर शाळेत येतो. त्याचे कपडे स्वच्छ असतात, बुटांना पॉलिश केलेले असते. त्यांचे दांत मोत्यांप्रमाणे चमकदार आहेत. नखे कापलेली असतात. आम्ही वर्गात एकाच बाकावर वसतो. गणित, विज्ञानाचे, प्रश्न आम्ही मिळून सोडवितो. मला इंग्रजी चांगले येते. अशा प्रकारे एकमेकांच्या सहकार्याने आम्ही चांगले गुण मिळविण्यात यशस्वी होतो.शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतही तो माझ्याबरोबर असतो. संध्याकाळी आम्ही एकत्रच खेळतो. कधी कधी एकमेकांच्या घरी जातो. एकदा माझे वडील आजारी असताना तो संध्याकाळी रोज-दवाखान्यात येत असे. त्याचे वडील पण तब्येतीची चौकशी करीत.

मला माझ्या मित्राचा अभिमान आहे. आमची मैत्री सदैव अशीच राहावी असे मला वाटते. मला खात्री व विश्वास आहे की आमची मैत्री कधीच तुटणार नाही.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवादनिबंध 2 

मी फार नशीबवान आहे की मला समीरसारखा मित्र मिळाला.समीर हा माझा एक जिवलग मित्र आहे. तो नेहमी खेळांच्याच गप्पा मारत असतो. तो खरा खेळगडी आहे. समीरला कुठल्याही एका विशिष्ट खेळाची आवड आहे, असे नाही हं ! सर्वच खेळांत तो रस घेतो. विशेष म्हणजे प्रत्येक खेळाविषयी त्याला तंत्रशुद्ध माहिती आहे. नाहीतर सदासर्वकाळ क्रिकेटमध्ये रंगणाऱ्या आमच्यापैकी कितीजणांना क्रिकेटच्या मैदानाची लांबीरुंदी माहीत असते बरे? 

my-best-friend-essay-in-Marathi
my-best-friend-essay-in-Marathi


समीर खेळांविषयीची केवळ माहिती गोळा करत नाही, तर तो सर्व खेळ उत्तम खेळतो. सहज एखादा निरोप सांगायला म्हणून तो घरी येतो, आणि कॅरमचा एक डाव जिंकून जातो. तितक्याच सफाईने तो शाळेच्या क्रिकेट संघात आपली कामगिरी बजावतो. रात्रीच्या वेळी रस्त्यावर  खेळणाऱ्या कामगारांतही त्याला भाव आहे. 'समीरदादा' आले की आपला संघ जिंकणार, अशी त्यांना खात्री असते.

कोणत्याही खेळाच्या जागतिक स्पर्धा सुरू झाल्या की, त्याची सर्व माहिती, अगदी आकडेवारीसह समीरला तोंडपाठ ! किती राष्ट्रे या स्पर्धेत उतरली आहेत? सामने कोठे कोठे आहेत? प्रत्येक संघातील उत्तम खेळाडू कोण? त्या खेळाडूंच्या खेळाचे वैशिष्ट्य काय? यांबाबतची सगळी माहिती समीर देत असतो. त्याने बांधलेले अंतिम निकालाबद्दलचे अंदाज सहसा चुकत नाहीत; कारण याबाबतचा समीरचा अभ्यास चोख आहे.

 खेळांविषयीच्या पुस्तकांचा मोठा संग्रह त्याच्याजवळ आहे. प्रत्येक वृत्तपत्रात येणाऱ्या क्रीडाविषयक बातम्या तो बारकाईने वाचतो. आवश्यक ती कात्रणे काढून ठेवतो. त्याने जमवलेला खेळाडूंचा आल्बम तर पाहण्यासारखा आहे. कुठेही कोणी खेळाडू येणार आहे, असे कळले की समीर धावलाच तेथे त्याला भेटायला.

समीरच्या या छंदाला त्याचे आईवडील केव्हाही विरोध करत नाहीत. उलट दोघेही त्याचे कौतुक करतात. त्याचे बाबा क्रीडाविषयक मासिके त्याला आणून देतात. कारण समीर छंद सांभाळून आपला अभ्यासही उत्तम ठेवतो. त्यामुळे माझा हा दोस्त घरात, शाळेत आणि सर्व मित्रांत विशेष आवडता आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

my best friend essay in Marathi | माझा आवडता मित्र मराठी निबंध

Maza avadta sant essay in Marathi | माझा आवडता संत मराठी निबंध


नमस्‍कार मित्रांनो आज आपण माझा आवडता संत मराठी निबंध बघणार आहोत.  भारत ही संताची भुमी आहे. संतानी आपल्‍या शिकवणी व ज्ञानातुन समाजाची प्रगतीच करण्‍याचे काम केले आहे. भारताला खुप मोठी संतपंरपरा लाभलेली आहे. याच संतपंरपरेतील संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज , संत गाडगेबाबा यांच्‍या विषयी अनुक्रमे ३ निबंध बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

maza-avadta-sant-essay-in-marathi
maza-avadta-sant-essay-in-marathi

 majha avadta sant tukaram nibandh | संत तुकाराम महाराज

मुद्दे : 
 • महाराष्ट्राला संतांची परंपरा 
 • संत तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ संतकवी 
 • आई-वडील, जन्म इ. 
 • प्रतिष्ठित घराणे
 • घरात विठ्ठलभक्तीची परंपरा 
 • लहान वयातच आध्यात्मिक विदयेचे संस्कार
 • कालांतराने अध्यात्माची ओढ 
 •  गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत वगैरे थोर ग्रंथांचा व्यासंग 
 • विरक्ती- स्वप्नात गुरूपदेश 
 • कवित्वाची स्फूर्ती 
 • अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेली अमृतवाणी 
 • भोंदू लोकांवर कोरडे ओढले
 • सामान्यांपासून प्रतिष्ठितांपर्यंत सर्व थरांतील लोक आकर्षित 
 • मत्सरी लोकांकडून छळ 
 • धर्मरक्षण हेच जीवितकार्य 
 • जातिभेद नाकारले 
 • 'संत तुकारामांची गाथा' हे मराठी भाषेचे श्रेष्ठ असे भूषण.

महाराष्ट्राला थोर संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेतील संत तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ संतकवी होत. त्यांचा जन्म १६०८ साली देहू येथे झाला.  संत तुकारामांचे घराणे हे त्या काळातील एक प्रतिष्ठित घराणे होते. त्यांचे शिक्षण त्या काळातील प्रतिष्ठित घराण्यांतील व्यक्तींप्रमाणे झाले.

संत तुकाराम महाराजांच्या घरात पिढ्यान्पिढ्यांची विठ्ठलभक्तीची परंपरा होती. त्यांचे एक पूर्वज विश्वंभर यांना शेतात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. त्यांनी नदीकाठावरील घरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या घराला 'देऊळवाडा' असे म्हणत. या देऊळवाड्यात चालणारी भजने, कीर्तने, पुराणे ऐकून लहान वयातच तुकाराम महाराजांच्या मनावर आध्यात्मिक विदयेचे खोलवर संस्कार झाले.

त्या काळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. असंख्य माणसे देशोधडीला लागली. कित्येक मृत्युमुखी पडली. तुकाराम महाराजांवर नातेवाइकांचेही  मृत्यू पाहण्याचे दुर्भाग्य ओढवले. त्या भीषण दुष्काळाने माणसांची केलेली दैना पाहून तुकाराम महाराजांच्या मनात विरक्ती दाटून आली. लहानपणापासून अध्यात्मविदयेचे संस्कार जागृत झाले. त्यांचे मन अध्यात्मचिंतनात गढू लागले. ते देहूजवळच्या भामनाथगडावर जाऊन अध्यात्मचिंतन करू लागले. 

गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेव गाथा वगैरे थोर ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. या दरम्यानच्या काळात संत तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरूपदेश झाला. संत नामदेव पांडुरंगासमवेत त्यांच्या स्वप्नात आले. त्यांनी त्यांना कवित्व करायला सांगितले आणि अलौकिक प्रतिभेतून स्फुरलेली त्यांची अमृतवाणी सिद्ध झाली.

संत तुकाराम महाराजांच्या  काव्याकडे सामान्य माणसापासून ते त्या काळातील प्रतिष्ठित लोकांपर्यंत सर्व थरांतील लोक आकर्षित झाले. गावागावांत त्यांची कीर्ती पसरली. संत तुकाराम महाराजांची लोकप्रियता पाहून काहीजणांना त्यांचा मत्सर वाटू लागला. हे मत्सरी लोक त्यांचा नाना प्रकारे छळ करू लागले. त्यांच्या अभंगांच्या वह्या  त्या दुष्ट लोकांनी इंद्रायणी नदीत बुडवायला लावल्या. परंतु विठ्ठलकृपेने त्या वह्या  तरंगून वर आल्या, ही कथा सगळ्यांना ठाऊकच आहे. यामुळे लोकांच्या मनात तुकाराम महाराजांविषयी अपार भक्तिभावच निर्माण झाला.

संत तुकाराम महाराजांनी धर्मरक्षण हेच जीवितकार्य मानले होते. त्यांनी जातपात, उच्चनीच हे भेद नाकारले. संत तुकाराम महाराजांच्या कार्याच्या रूपाने भागवत संप्रदायाने कळसच गाठला. त्यांचे काव्य सुभाषितांसारख्या वचनांनी नटलेले आहे

जे का रंजले गांजले। त्यांसि म्हणे जो आपुले।
 तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।

अशा हजारो प्रासादिक अभंगांतून आपले दिव्य तत्त्वज्ञान संत तुकाराम महाराजांनी जनतेसमोर मांडले आहे. जनसामान्यांच्या जिभेवर हे काव्य विराजमान झाले आहे. 'संत तुकारामांची गाथा' ही मराठी भाषेचे एक अलौकिक भूषण बनले आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला  हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता बाकीचे २ निबंध तुम्‍हाला खाली स्‍क्रोल केल्‍यावर दिसुन येतील. धन्‍यवाद   


maza avadta sant eknath marathi nibandh | संत एकनाथ मराठी निबंध


आजही जन्मावरून माणसांत उच्चनीचता मानली जाते. अशा वेळी मनात येते, स्वर्गातील एकनाथांच्या आत्म्याला काय वाटत असेल? चारशे वर्षांपूर्वी एकनाथांनी प्रत्यक्ष कृतीद्वारा समाजाला समानतेची व मानवतेची शिकवण दिली होती.

इ. स. १५३३ मध्ये सुविदय, भाविक अशा चक्रपाणींच्या घरात संत एकनाथांचा जन्म झाला. एकनाथांच्या घराण्यात विठ्ठलभक्ती फार पूर्वीपासून रुजलेली होती. त्यांच्या आजोबांनी म्हणजे संत भानुदासांनी कर्नाटकातून पांडुरंगाची मूर्ती पंढरीला आणली. एकनाथांना तर अगदी बालपणापासून परमेश्वरप्राप्तीचे वेड लागले होते. त्यासाठी त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षीच घराचा त्याग केला आणि ते देवगडला आपल्या गुरुगृही, जनार्दनस्वामींकडे आले. जनार्दनस्वामींनी एकनाथांची परीक्षा घेतली. ते त्या कसोटीला उत्तम प्रकारे उतरले. तेव्हा त्यांना गुरूंचा अनुग्रह मिळाला.

एकनाथ विद्वान होते, ज्ञानी होते; धर्म व रूढी यांतील फरक त्यांनी जाणला होता. सनातनीपणाचे पांघरूण पांघरणारे लोक माणुसकीपासून दूर जात आहेत, हे एकनाथांनी ओळखले. संस्कृत भाषेचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. तिची थोरवी ते जाणत होते; पण त्याचबरोबर मराठीची महत्ताही त्यांनी जाणली होती. त्यामुळे त्यांनी कर्मठ समाजाचा रोष पत्करूनही सामान्य जनांसाठी मराठीत प्रासादिक रचना केली.

त्यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेचे शुद्धीकरण केले व तिच्यातील पाठभेद काढून टाकून 'ज्ञानेश्वरी' सिद्ध केली. एकनाथांनी भागवताची रचना केली व भावार्थ रामायणातून रामकथा सांगितली. 'रुक्मिणी-स्वयंवर' हा त्यांच्या पंडिती काव्याचा उत्कृष्ट नमुना आहे. एकनाथांनी ही सर्व रचना मराठीत केली. एकनाथांच्या या मराठी रचनेला काशीच्या पंडितांनी प्रारंभी विरोध केला; पण ग्रंथ श्रवण केल्यावर त्याच पंडितांनी एकनाथांच्या ग्रंथाची काशीत मिरवणूक काढली.

एकनाथ संत होते, कवी होते, तसेच ते श्रेष्ठ समाजसुधारक होते. समाजातील चातुर्वर्ण्य पद्धत व त्यामुळे समाजातील विशिष्ट वर्गावर होणारा अन्याय त्यांना मान्य नव्हता. रणरणत्या वाळूत रडणाऱ्या हरिजन बालकाला त्यांनी उचलून घेतले व त्याला महारवाड्यात नेऊन पोचवले. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वत:च्या वडलांच्या श्राद्धाला महारांना आपल्या घरी पंक्तीला जेवायला बोलावले. काशीहून आणलेली गंगा तहानलेल्या गाढवाला पाजली. हे सारे एकनाथ करू शकले; कारण जनता हाच त्यांचा जनार्दन होता व जनसेवा हीच त्यांना ईश्वरपूजा वाटत होती.


sant gadge baba essay in marathi | संत गाडगेबाबा मराठी निबंध एक समाजसेवक संत

मुद्दे :
 • जन्म - बालपण
 • दारिद्र्याचे चटके
 • निरक्षरता, अंधश्रद्धा यांविरुद्ध प्रचार
 • 'गाडगेबाबा' हे नाव का पडले?
 • कष्ट करून भिक्षा घेणे
 • स्वच्छतेचा आग्रह
 • देणग्यांचा उपयोग जनतेसाठी
 • अनेक संस्था
 • निधन
संत गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यात झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी हे होते. वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे घरात कायमचे दारिद्र्य होते. वडील अकाली वारले. त्यामुळे त्यांच्या मामाने त्यांचा सांभाळ केला.
संत गाडगेबाबांनी मामासोबत शेतात खूप कष्ट केले, पण सावकाराने मामाच्या शेतावर जप्ती आणली. मामाच्या अशिक्षितपणामुळे सावकाराने मामाला फसवले. या घटनेचा गाडगेबाबांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळे 'व्यसन सोडा, शिक्षण घ्या. कर्ज घेऊ नका,' असा त्यांनी आयुष्यभर प्रचार केला.

सामाजिक प्रबोधनासाठी त्यांनी भजन, कीर्तन व प्रवचन हा मार्ग वापरला. ते नेहमी अंगावर फाटकी गोधडी घेत. त्यांच्या हातात नेहमी गाडगे असे. त्यामुळे त्यांना 'गाडगेबाबा' हे नाव पडले. गाडगेबाबा कधी एका जागी जास्त काळ राहत नसत. कष्ट करूनच भिक्षा घेत. त्यांच्या हातात नेहमी झाडू असे. ते स्वत: झाडण्याचे काम करत आणि लोकांना स्वच्छतेचा उपदेश करत.

लोकांकडून त्यांनी खूप देणग्या मिळवल्या. पण एकही पैसा स्वत:साठी खर्च केला नाही. त्यांनी धर्मशाळा बांधल्या, गोरक्षण संस्था उभारल्या. त्यांनी अनेक शाळा व महाविदयालये सुरू केली. आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांनी लोकजागृतीचे व लोकसेवेचे काम केले. १९५६ साली त्यांचे निधन झाले. ते एक महान सेवाभावी संत होते.

Maza avadta sant essay in Marathi | माझा आवडता संत मराठी निबंध