कल्पनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कल्पनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | mi chandravar gelo tar essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध  बघणार आहोत. या निबंधामध्ये चंद्रावर गेल्यावर काय करता येईल व मानव चंद्रावर जाऊन कोणती स्वप्न पूर्ण करू इच्छितो याचे वर्णन केले आहे  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

चंद्राचे मानवी मनाला विलक्षण आकर्षण आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीही 'चंद्र हवा' म्हणून कौसल्यामातेकडे हट्ट धरला आणि मग आरशातून चंद्राचे प्रतिबिंब दिसताच तो छोटा राजकुमार हर्षभरित झाला, अशी कथा आहे. चंद्राविषयीच्या मानवाच्या या आकर्षणाची परिणती म्हणजे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांतून मानवाने चंद्रावर केलेले पदार्पण होय.
mi-chandravar-gelo-tar-essay-in-marathi
mi-chandravar-gelo-tar-essay-in-marathi


नील आर्मस्ट्राँग या अमेरिकन अवकाशयात्रीने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. मानवाचे चंद्रावरील चिमुकले पाऊल म्हणजे त्याची विज्ञानाच्या आधारे अवकाशातील प्रचंड झेप होती. या यशस्वी चांद्रमोहिमेनंतर चंद्रावर जाण्याची, तेथे सहली काढण्याची, तेथे कायमची वस्ती करण्याची स्वप्ने माणूस पाहू लागला. माझ्या मनात आले - अशाच एका मोहिमेतून मला चंद्रावर जायला मिळाले तर ! 

...तसे झाले तर ! फार दिवसांचे उराशी बाळगलेले माझे स्वप्न साकार होईल. चंद्रावर चालताना टुणटुण उड्या मारत जाण्याचा आनंद मला लुटता येईल. पृथ्वीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर दिसणारा 'ससा' धुंडाळण्याचा मी प्रयत्न करीन. चंद्रावरून माझी पृथ्वीमाता कशी दिसते. ते मी पाहीन.

चंद्रावरून पृथ्वीवरील माणसांशी संपर्क साधणारी संदेशवाहिनी असणारच ! त्या वाहिनीवरून मी चंद्रावरील सृष्टीचे, सभोवारच्या अथांग विश्वाचे, तेथून दिसणाऱ्या माझ्या पृथ्वीमातेचे धावते समालोचन माझ्या घरच्या माणसांना ऐकवीन. तेथेच कायमचे वास्तव्य करणे जमले तर तेथे एक भारतीय उपाहारगृह सुरू करीन. त्या उपाहारगृहात अस्सल मराठी पदार्थ मिळू शकतील. मोदक, थालीपीठ यांसारखे पदार्थ तसेच सोलकढी, मधुकोकम यांसारखी पेये मिळू शकतील. 

चंद्रावरील तरुण जोडपी कदाचित 'मधुचंद्रा'ऐवजी 'मधुवसुंधरा 'साठी पृथ्वीवर येण्यास आतुर होतील. अशा वेळी शक्य झाले  तर त्यांना पृथ्वीवरील प्रवासाची सोयही मी करीन. पण हे सारे केव्हा?- जर मला चंद्रावर जायला मिळाले तर !!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व  चंद्रावर जाण्यास तुम्हाला संधी मिळाल्यास तुम्ही काय करू इच्छिता ते  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • चंद्राचे आकर्षण
  • प्रभू रामाला चंद्र हवा
  • वैज्ञानिकांचे अथक प्रयत्न
  • चंद्रमोहिमेत सहभागी व्हावे
  • चंद्रावरचा ससा
  • चंद्रावरून पृथ्वी कशी दिसेल
  • संदेशवाहिनी
  • उपाहारगृह 
  • पृथ्वी, चंद्र ये-जा उत्सुकता.

मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | mi chandravar gelo tar essay in marathi

aai sampavar geli tar essay in marathi | आई संपावर गेली तर निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण aai sampavar geli tar marathi nibandh  बघणार आहोत. मानवाला कोणत्याही गोष्टीचे महत्व तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपल्या  जवळ असणारी एखादी गोष्टं आपल्यापासुन दुर निघुन जात नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास आईचे देता येईल, आपली आई संपुर्ण कुटुंबासाठी दिवस रात्र राबत असते. सर्वांची काळजी करत असते. पण हीच आई जर संपावर गेली तर काय होईल. हेच या निबंधात वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

'आई, माझं गणिताचे पुस्तक कोठे आहे?' 'आई, हा निबंध कसा लिहू ग? काही मुद्दे सांग ना.' 'आई, या रविवारी जिमखान्याची सहल आहे. काय देशील डबा?' 'आई, यंदा दिवाळीत फराळाचे पदार्थ भरपूर करायचे हं!' 'आई, मला बॅडमिंटनची रॅकेट हवी आहे. कधी घेशील सांग?' अशी आपली हर एक कामे आईशी निगडित असतात. पण समजा, आई संपावर गेली, तर ...

aai sampavar geli tar essay in marathi
aai sampavar geli tar essay in marathiआई संपावर गेल्यास घराचे घरपणच हरवेल. सकाळी उठायला हमखास उशीर होईल; कारण नेहमीप्रमाणे लवकर जागे करण्यास आई नसेल. न्याहारीला टेबलावर केवळ कोरडा पाव असेल. लोणी स्वतः लावून घ्यायचे म्हणजे केवढे कठीण! जवळजवळ उपासमारच!  (हे पण वाचा माझी आई मराठी निबंध)


शाळेत जातानाही किती तरी गडबड झालेली असेल. कंपासपेटीच विसरल्यामुळे लिहायला पेन्सिल, पेन काहीच नसणार ! मग त्यासाठी शिक्षकांची बोलणी खावी लागणार. मधल्या सुट्टीसाठी डबाही नसणार, कारण न विसरता सुट्टीसाठी डबा देणारी आई संपावर गेलेली असणार.


शाळेतून दमून भागून घरी यावे, तर स्वयंपाकघरातील सारा पसारा आवरणार कोण? टेबलावर ब्रेड, लोणचे, चटणी ठेवलेली असणार आणि बरोबर एक चिठ्ठीही असणार. 'आई संपावर आहे.' या नुसत्या कल्पनेनेच माझे डोळे पाझरू लागले. आईच्या अपार वात्सल्याची ती जणू पावतीच होती!

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद .

निबंध 2

खरंच 'आई' म्हणजे आत्मा आणि ईश्वर आईची महती वर्णनासाठी घेतली तर शब्द अपुरे ठरतात. अशी सर्वांची लाडकी आई संपावर गेली तर?.... प्रत्यक्ष देवालाही आईच्या कुशीचा , तिच्या स्नेह - वात्सल्याचा मोह आवरता आला नाही, तिथे आम्हां माणसाचे  काय? आई संपावर गेली तर सकाळी लवकर अभ्यासाला कोण उठविणार? अन् तेही न रागावता..... केसात हलकीशी बोटे फिरवून ‘पिंटू , ऊठ' असं कोण म्हणणार? दूध, न्याहारी कोण देणार? सारे प्रश्नच प्रश्न ..... या सर्वांचे उत्तर तर 'आईच'! पण तिने संप पुकारला तर ..... बापरे कल्पनेनेच मला घाबरून सोडले.


आई दिवसरात्र आपल्यासाठी, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी किती कष्ट करत असते याची जाणीव झाली. तिच्याविना घर चालणार तरी कसे? बाबांना ऑफिसात वेळेवर जाता येईल का? स्वयंपाक कोण करणार? बाहेरचं जेवण रोज आवडेल का? घरात बहीण-भावंडाची भांडणे कितीतरी वाढतील आई असली की घर कसं प्रसन्न अन् शांत असतं. ती नसेल तर शिस्तच राहणार नाही. घरात अव्यवस्थितपणा वाढेल . घरात बहिण भावंडाची भांडणे किती तरी वाढतील.


संस्काराची शिदोरी कोण पुरवेल मग? आईच्या प्रत्येक कृतीतून , प्रत्येक शब्दातून , प्रत्येक नजरेतून प्रेमाचा निरंतर झरा खळखळत असतो. त्यामुळेच तर कुटूंबसंस्था टिकून राहते. तीच संपावर गेली तर सारचं बिघडेल. कुणाचाही कुणाशी मेळ बसणार नाही.

आईच्या सहनशक्तीला तर तोड नाही. तिचं शांत गंभीर अंस्तितव, मौन राहून ही अनेक प्रश्नांचं उत्तर देऊन जातं. तिच्यामुळे घरातला कलह टळतो. महत्त्वाचे निर्णय घेताना तिच्या अमोल विचारांचा हातभार लागतो. घरातल्या सर्वांना काय - काय लागते? सर्वांचे वेगवेगळे स्वभाव कसे आहेत? सर्वांच्या वेळा कशा सांभाळायच्या? सर्वांना वेळेवर सर्व कसे उपलब्ध करून द्यावे? सर्वांच्या अडचणी कशा सोडवाव्यात हे सारं 'आई' च करू शकते. तिला पर्याय होऊच शकत नाही . 

आदर्श माता एकटी पूर्ण मंत्रिमंडळ' सांभाळते. ते सारे एकटी घरात सांभाळत असते. कारण ज्या वेळी आई मुलाला सकाळी उठवून स्नान इत्यादी कामे करावयास लावते तेंव्हा ती आरोग्यमंत्री असते. दप्तर व्यवस्थित देऊन शाळेत पाठवते तेंव्हा ती शिक्षणमंत्री असते. घरी जेवण, न्याहरी देताना ती अन्नपुरवठामंत्री असते. घरकाम , इतर कामे , अभ्यास करावयास लावते तेंव्हा ती गृहमंत्री व औद्यागिकमंत्री असते. खेळ व व्यायाम यासाठी प्रवृत्त करते तेंव्हा ती क्रीडामंत्री असते. रात्री मच्छर . भीती यापासून जपते तेंव्हा ती संरक्षणमंत्री असते .,

आई संपावर गेली तर कुटुंबातील सर्वांचे आरोग्य धोक्यात सापडेल. पावसात भिजल्यास खराखरा डोके पुसून , तव्यावरच्या गरम कपड्याने कोण डोक्याला शेक देईल? हळूवार मायेच्या स्पर्शानेच अर्धे दुखणे नीट होते. मग तिच्यासारखी आमची काळजी कोण घेईल? कुटूंबातल्या सर्वांचा विकास ठप्प होईल. पर्यायाने समाजाचे व देशाचेही नुकसान होईल कारण, आईसारखा दुसरा कोणी गुरू नाही.


साने गुरुजी म्हणतात"खरी शिक्षणदात्री आईच होय, ती देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व
ज्ञान देणारी तीच" प्रत्येकाची काळजी घेणारी अशी आई. थोडा उशीर झाला तरी बाळाच्या वाटेकडे डोळे लावून दारात उभी राहणारी आई.... या माऊलीपुढे हे विश्व , स्वर्ग सारं काही फिक! आईची प्रेममय, त्यागमय मूर्ती ही जीवनाची स्फूर्ती आहे, जीवनाची खरीखुरी प्रेरणा आहे. तिच्याविना एकही क्षण मला करमत नाही. तिला माझी खूप खूप काळजी आहे. मी तिच्या हृदयाचा तुकडा आहे. '


विचारांची शृंखला या शेवटच्या वाक्यावर येऊन थांबली.... अरे, खरंच की! आई मुळी संपावर जाणारच नाही. इतकी कठोर ती माऊली होऊच शकत नाही. फुलासारखं कोमल तिचं हृदय असं वज्रासारखं कठीण होणारच नाही.....
'ए पिंटू  , आज रविवार . सुट्टीचा दिवस जेवायलाही सुट्टी आहे होय? चल लवकर!''..... आईच्या हाकेनं मी भानावर आलो.
एक भयानक स्वप्न बघून डोळे उघडल्यानंतर 'ते स्वप्न होते' हे कळले अन् तेंव्हा जसं मन सुटकेचा श्वास घेतं तशी अवस्था माझी झाली होती.... तरीही मी उद्गारलो


“आई, तू कधीही संपावर जाऊ नकोस....
तुझ्या तळहाताचा पाळणा तुझ्या नजरेची पखरण,
तुझ्या स्नेहाची बरसात तुझ्या संस्काराची काय बात?
अस्तित्व माझे तुझ्यात दुसरे काही नको या जगात...."(हे पण वाचा माझी आई मराठी निबंध)

हा निबंध मराठी भाषेत (language) आहे.  शब्‍दमर्यादा 250

aai sampavar geli tar essay in marathi | आई संपावर गेली तर निबंध

me pantpradhan zalo tar marathi nibandh  | मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध

आयुष्याच्या प्रवासात जन्मापासून मरेपर्यंत केलेल्या चांगल्या वाईट कर्माची गोळाबेरीज हीच माणसाच्या आयुष्याची किंमत ! श्वसन, भोजन, शयन यातच गुरफटणे म्हणजे आयुष्य नव्हे. उच्च ध्ययासाठी जगणे आणि ध्येयपूर्ती करताना वा केल्यावर देह ठेवणे हे उच्चप्रतीचे आयुष्य होय. क्षणभंगुर आयुष्यातील ती सर्वोच्च कमाई आहे. आपण आपल्या समाजाचे, देशाचे काही देणे लागतो. या देशाला, समाजाला घडवायचे माझे स्वप्न एकाच घटनेने खऱ्या अर्थाने साकार होऊ शकेल-- मी पंतप्रधान झालो तर !


माझ्या देशाची उच्च सांस्कृतिक परंपरा, चमकदार इतिहास, त्यातील नररत्ने, सामर्थ्यशील शालीनता हे सारे मला या देशाचा पंतप्रधान होण्यास मोह पाडतात. हा काटेरी मुकुट म्हणूनच मी आनंदाने स्वीकारण्यास तयार आहे.

me pantpradhan zalo tar marathi nibandh 

आज देशातील राजकारण कसे आहे ? गटबाजी, भ्रष्टाचार, तोडाफोडाची नीती, सत्तेसाठी चाललेली लाजिरवाणी स्पर्धा...सारेच ओंगळ आहे. दारिद्र्य, अशिक्षितपणा, मागासलेपण देश खाईत नेत आहे....मी हे सारं बदलू इच्छितो. “ सोपे नाही' याची कल्पना आहे. कारण ' लोकशाही हे गाढवांचे राज्य असते' असे म्हटले जाते तिथे लाथांचा सुकाळ असणारच.

पण अब्राहम लिंकनने म्हटल्याप्रमाणे “लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही" हे मी बिंबविण्याचा व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करीन.
मी काही ' केंबिज' किंवा 'डून स्कूल'चा वारसदार नाही. मी याच मातीतला असल्याने या मातीचे प्रश्न मला चांगलेच माहीत आहेत म्हणूनच ते प्रश्न सोडवण्याच्या माझ्या प्रयत्नांना जास्त यश येईल.

आपला देश शेतीप्रधान असल्याने शेतकरी हा केंद्रबिंदू धरून सरकारी धोरणे राबवण्याचा माझा मानस आहे. त्याला सवलती कर्जे, आधुनिक तंत्रज्ञान, खते पुरवीन पण कर्जमाफी करून त्यांची क्रियाशीलता आणि देशाची तिजोरी दुबळी करणार नाही नाही. गंगा-कावरी प्रकल्पान सारा भारत पावसावर अवलंबून न राहता
होईल. तो मी करीन म्हणजे मुकलेली जमीन अन् सुकलेला शेतकऱ्याचा चेहरा भारतात कुणाला दिसणार नाही.

तळागाळाच्या साऱ्याच जनतेला अन्न, वर, निवारा मिळालाच पाहिजे याकडे माझा कटाक्ष राहील.
पांढरपेशा वर्गाचे हाल अधिकच आहेत. कर आणि महागाईच्या कैचीत तो सापडला आहे. मी कर आकारणी सुलभ करीन. बाजारभाव नियंत्रित करीन. समाजवाद आणि भांडवलशाही या दोन्हींची सांगड मी घालीन. समाजवादाने व्यक्तिगत कौशल्य मारले जाते तर भांडवलशाहीत पिळवणूक होते. राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्या दोन्हींचा यथायोग्य वापर मी करीन. समाजातील उच्चभ्रूना या माझ्या धोरणाचा फायदा मिळेल.

लोकसंख्येचा विस्फोट ही आपली खरी समस्या. मर्यादित कुटुंबावर सवलतींचा वर्षाव करीन किंवा कायदाच संमत करून घेईन. माझी धोरण अंमलात आणण्यासाठी प्रामाणिक, नीतिमान् , कार्यक्षम, न्यायी मंत्र्यांची निवड करीन. कायदा व सुव्यवस्थेचे तंतोतंत पालन करीन. मी रामराज्य आणू शकेन असा दावा मी करत नाही. वाईट काही असेलच पण अल्प. आणि राष्ट्राच्या प्रगतीला आड येणार नाही इतपत ! ' लाल फिती'चा अडसर दूर करून वेगाने कामं करीन, कारण कामासाठी मला फक्त ५ वर्षच हाती असतील आणि मला तर खूप काही करायचंय..." Miles to go before I sleep, miles to go..."

निबंध 2 

भारताच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचा सोहळा पाहिला आणि मनात आले की. मी पंतप्रधान झालो, तर...
तर काय मजा येईल! पण खरेच मजा येईल का? पंतप्रधान म्हणजे मोठा बंगला, संदर मोटारो, भरपूर जगप्रवास, अनेक सभासमारंभांत प्रचंड स्वागत. सदा सभोवती रक्षक व सेवक.
पण ... पण खरे सांगू का ! मी पंतप्रधान झालो तर प्रथम सारा डामडौल कमी करीन. आपल्या भारतावर जागतिक बँकेचे केवढे कर्ज आहे ! मोठमोठ्या योजना पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसा हवा, आम्ही मंत्रिमंडळातील लोकांनी आपले खर्च कमी केले तर खूप बचत होईल.

मी पंतप्रधान झालो, तर... प्रथम सभांना व घोषणांना बंदी घालीन. प्रत्यक्ष 'कृतीवर' माझा भर असेल. गरिबी हटवण्याचा संकल्प आम्ही कित्येक वर्षांपूर्वी सोडला आहे; पण गरिबी तसूभरही हटलेली नाही. उलट वाढतच आहे. ती दूर करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन..

आज देशात अराजकता वाढत आहे. देशवासीयांत एकात्मता व ज्वलंत राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी मी अविरत झटेन. मी कोणा एका राज्याचा विचार करणार नाही, तर संपूर्ण भारताचाच सदैव विचार करीन. त्याच्या विकासासाठीच झटेन, पण त्यासाठी भी पंतप्रधान व्हायला पाहिजे ना?

me pantpradhan zalo tar marathi nibandh | मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध

मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi

मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevhaessay in marathi : विदयापीठाच्या वनस्पतिविभागाने भरविलेले ते एक प्रदर्शन होते. विश्वातील सर्व वृक्षवेलींची ओळख आपण या प्रदर्शनात करून दिली आहे, असा प्रदर्शन-नियोजकांचा दावा होता. म्हणून मी पुनः पुन्हा फिरून ते प्रदर्शन पाहत होतो. शेवटी एका संयोजकाचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्याने मला विचारले, “आपणाला काय हवे आहे?"


मी मुळातच गोंधळलेलो होतो त्यात या प्रश्नाने अधिकच भर पडली आणि मी त्याला सांगितले, “मला कल्पवृक्ष हवा आहे, मला कल्पवृक्षाखाली बसायचे आहे." क्षणभर तो व्यवस्थापक गोंधळला; पण तो बराच चलाख असावा. लगेच सावरून तो म्हणाला, "चला, मी तुम्हांला कल्पवृक्ष दाखवतो." मग आम्ही दोघेजण त्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या टोकाला गेलो. तेथे लोकांची गर्दी मुळीच नव्हती. अगदी कडेला एक बुटकेसे डेरेदार झाड होते, त्याकडे बोट दाखवून तो म्हणाला, “हा पाहा कल्पवृक्ष. आता तुम्ही याचे निरीक्षण करा. मी येतो हं, मला दुसरे काम आहे."
mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi
mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi


त्या निर्जन भागात आता मी एकटाच होतो. दूरवर माणसांचे आवाज ऐकू येत होते; पण मी होतो त्या भागात माणसांचीच काय ; पण पक्ष्यांचीही चाहूल ऐकू येत नव्हती. त्या क्षणी मला हसू आले. या सर्वांना या कल्पवृक्षाची व त्याच्या सामर्थ्याची कल्पना नसावी बहुतेक. असे वाटले आणि मी विचार केला-चला, आपण तरी आपली अनेक वर्षांची मनीषा पूर्ण करून घ्यावी. झाड जरा खालच्या बाजूला होते, तेव्हा तेथे उतरून झाडाखाली बसावे असे मी ठरविले. म्हणून मी थोडे खाली उतरलो. पण तेवढ्यात मनात आले की प्रथम आपण हे निश्चित करू या, की कल्पवृक्षाखाली बसून काय मागायचे?


हो, उगाचच काही चुकीचे मागितले तर शेवटी आपल्यालाच पश्चात्ताप करायची वेळ यायची. तेव्हा आधी पूर्ण विचार करून ठरवावे आणि मगच मागणी करावी. काय मागावे बरे या कल्पवृक्षाकडे? खूप पैसा मागावा का? हो, कारण पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात. कारण ‘सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते', असे विद्वानांनी म्हटलेच आहे. तेव्हा ठरले, कल्पवृक्षाला सांगावे की, कधीही संपणार नाही इतकी संपत्ती दे. पण ही एवढी संपत्ती आपण घरी कशी नेणार? आणि घरी तरी कोठे ठेवणार?


एकदम एवढा पैसा आला की लोकांच्या डोळ्यांत भरणार. लोक समजतील की आपण काही तरी अनैतिक मार्गाने हा पैसा मिळविला. शिवाय 'इन्कम टॅक्स' वाले पिच्छा पूरवतील आणि सर्वांत मोठी भीती म्हणजे चोरांची. चोरांमूळे या पैशापायी प्राण गमवावे लागतील. मग काय मागावे बरे या कल्पवृक्षाकडे?

विदया मागावी का? कोणत्या शाखेतील पदवी मागावी? कला, शास्त्र की व्यापार? कोणती पदवी मागावी? एम्. ए., एम्. एस्सी., एम्. कॉम., पीएच्. डी., डॉक्टर की इंजिनीअर? पण कल्पवृक्षाकडून मिळविलेल्या या पदवीचा आपण उपयोग करू शकू का? लोक विश्वास ठेवतील का आपल्यावर? डॉक्टर झालो तर आपण रुग्णांवर औषधोपचार करू शकू का? असे एक ना अनेक प्रश्नांचे मनात काहूर माजले, पण त्याच क्षणी माझे सुसंस्कारित मन आक्रंदून उठले. छे, छे; हे बरोबर नाही. कष्टाविना विदया साध्य होणे शक्य नाही. ती विदया, विदया नव्हेच, ते ज्ञान, खरे ज्ञानच नव्हे. कल्पवृक्षाजवळ काय मागावे? हा प्रश्न अदयापि सुटलाच नव्हता.


यापूर्वी होऊन गेलेल्या मोठमोठ्या लोकांनी काय मागितले होते त्याची मला आठवण झाली. मोरोपंतांनी देवाला प्रार्थिले, 'सूसंगती सदा घडो.' ज्ञानदेवांनी पसायदान मागितले-'जो जे वांच्छील, तो ते लाहो प्राणिजात.' मग आपण काय मागावे? कशी कोण जाणे, मला भोवतालची जाणीव झाली. सर्वत्र अंधार पडला होता. दूरवर येणारा माणसांचा आवाजही बंद झाला होता. बहतेक प्रदर्शन बंद झाले असावे. किर्रऽऽ असा रातकिड्यांचा आवाज येत होता. मी घाबरून पटकन कल्पवृक्षाखाली गेलो आणि म्हटले, “मला आता घरी पोहोचव." दुसऱ्या क्षणी मी माझ्या घरी होतो.


वरील निबंध मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi


आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध

आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi : स्वार्थाने बरबटलेल्या आजच्या समाजावस्थेत जेव्हा एखादा अगतिक माणूस आदर्श शोधत हिंडायला लागतो तेव्हा वर्तमानकाळात तर त्याची पूर्ण निराशा होणे स्वाभाविकच आहे. परंतु जेव्हा का तो गेल्या शतकाचा वेध घेऊ लागतो, तेव्हा त्याला हिमालयासारखी उत्तुंग अशी अनेक व्यक्तिमत्त्वे भेटतात आणि मग अशा या अगतिक माणसाचे मन "रितेच जीवन सारे। ही तहान सांगा केव्हा संपायची?' या विचाराने आक्रंदू लागते.अशा मानसिक संभ्रमावस्थेत असताना मनात येते, आज जोतिबा अवतरले तर.


जोतिबा आज अवतरले तर ते आनंदित होतील की खंतावतील? असा प्रश्न पडतो. ज्या स्त्री-शिक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर अट्टाहास केला ती स्त्री सुशिक्षित झालेली पाहन त्यांना आनंद होईल; पण त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यांत पाणीही येईल. कारण स्त्रीवरचे अन्याय आजही संपलेले नाहीत. कारणे बदलली असतील; पण छळ तसाच चालू आहे. त्या काळी विधवा स्त्रीची मानहानी करून तिला घरातील विहिरीचा मार्ग दाखविला जात असे; तर आज स्त्रीला जिवंत जाळण्याच्या घटना घडताहेत.

Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi
Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi


ज्या दलितांच्या उद्धारासाठी जोतिरावांनी समाजाचा रोष ओढवून घेतला तो दलित तरी सुखी आहे का? जोतिबांनी आपल्या घरातील आड मुक्त करून या अस्पृश्यांची तहान भागविली; पण आज गावोगावी 'एक गाव एक पाणवठा' हा कार्यक्रम योजूनही खेडोपाडी हा अस्पृश्य अजूनही एका व्यापक अर्थाने तहानलेला आहे. आजही त्याची वस्ती गावकुसाबाहेरच आहे. 


जोतिराव आजअवतरले तर त्यांना आढळेल की, त्यांच्या मागणीनुसार आज शासनाने या मागासलेल्या लोकांना अनेक सवलती दिल्या आहेत, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या आहेत; पण त्यांनी हा हरिजन सुखी झाला आहे का? सुशिक्षित झाला आहे का? नाही. फार थोड्या संख्येने तो साक्षर झाला आहे आणि जे शिकलेसवरले आहेत ते आपल्या समाजासाठी काही करीत आहेत का? याचा विचार केला तर निराशाच पदरी पडेल.बहुसंख्य दलित अजूनही जुन्या संस्कारांच्या, रूढींच्या पिंजऱ्यातच बंदिस्त आहेत.जोतिबांना त्यांच्या 'शेतकऱ्याचा असूड' खेड्यातील भिंतीवर दिसेल. पण त्यांच्या कल्पनेतील खेडी तेथे आढळणार नाहीत. बहुतेक खेडी ओस पडलेली दिसतील. हा जमिनीचा पुत्र पोटार्थी होऊन शहरात गर्दी करताना त्यांना आढळेल. शेतकऱ्यांतही जोतिबांना एक नवा अपरिचित वर्ग आढळेल. तो म्हणजे 'सधन शेतकरी'. जोतिरावांच्या हयातीत या वर्गाचा उदय झाला नव्हता. शेतमजूर मात्र पूर्वीपेक्षाही अधिक दरिद्री झालेला त्यांना आढळेल पुण्याच्या बाजूला हिंडताना मात्र त्यांना आपल्या सावित्रीचे आगळे स्मारक दिसेल आणि ते म्हणजे 'सावित्रीबाई फुले दत्तक योजना'. 


गरीब घरांतील विदयार्थिनींच्या शिक्षणाची झालेली ती सोय पाहुन जोतिबांना गदगदून येईल. सावित्रीच्या श्रमाचे चीज झाले, या विचाराने ते आनंदित होतील आणि मग जोतिबा एक अर्ज लिहितील. कोणाला माहीत आहे? प्रत्यक्ष त्यांच्या निर्मिकाला-भगवंताला. कशासाठी? स्वर्गवासाची सुट्टी घेऊन ते भूलोकावर वास्तव्याला येतील आणि पुनश्च आपल्या कामाला लागतील.

वरील निबंध आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध | Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi

 माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक Manus Amar Zala Tar Essay In Marathi


माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक Manus Amar Zala Tar Essay In Marathi:  माझा छोटा भाऊ विचारीत होता, “दादा, देवांना 'त्रिदश' का म्हणतात?" मी म्हणालो, "अरे, त्यांना माणसांसारखी चौथी वार्धक्यावस्था नाही.देव कधी मरत नाहीत." म्हणजे देव अमर आहेत. “देवांप्रमाणेच माणसे अमर झाली तर " त्याने प्रश्न निर्माण केला.


 खरोखर, देवांना मिळालेली संजीवनीची कुपी माणसापर्यंत आली तर? नाहीतरी आज माणसाचे त्या दिशेने प्रयत्न चालू आहेतच. रक्तदान, मूत्रपिंडदान असे अवयव दान करून, अवघड शस्त्रक्रिया पार पाडून आणि प्रभावी औषधोपचार करून तो माणसाला मृत्यूच्या दारातून मागे फिरवितो. आज माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे आणि मृत्युसंख्या घटली आहे; तरीपण मानव मृत्यूवर पूर्णपणे मात करू शकलेला नाही. आजही माणूस मर्त्य आहे. अशा या मानवाला संजीवनी गवसली तर....


Manus Amar Zala Tar Essay In Marathi
Manus Amar Zala Tar Essay In Marathi

तर प्रथम ज्याच्या हातास ती संजीवनी-अमृत-गवसेल तो लक्षाधीश, कोट्याधीश होईल. मग या अमृताचा काळाबाजार' होईल. कारण कोणतीही गोष्ट अदृश्य करून तिचा काळाबाजार करण्यात माणस मोठा पटाईत आहे. मग या अमृतातही भेसळ होईल व थोड्याच दिवसांत या अमृताची नक्कल केलेले कृत्रिम अमृतही बाजारात अवतरेल.

विचार करण्याचा मुद्दा असा आहे की, माणसाला अमृत गवसल्याने तरी त्याचे दुःख संपेल का? तो सुखी होईल का? होईल, कारण त्याला त्यामुळे आपल्या प्रिय माणसांचा वियोग होणार नाही. एक-एक कुटुंब म्हणजे पारंब्या फुटलेला मोठा वटवृक्षच होईल. पण यामुळे मात्र समाजाला नको असलेली दुष्ट माणसे देखील अमर होतील की! असे घडले तर मात्र माणसे सुखी होण्याची शक्यता कमीच. 


शिवाय 'अतिपरिचयात् अवज्ञा' या उक्तीनूसार अमरत्व प्राप्त झालेली ही माणसे एकमेकांचा दुस्वास करू लागतील. शिवाय या अनुषंगाने विचार करता, दोन पिढयांतील विचारांचे अंतर हीसुद्धा एक चिंतेची बाब ठरेल. आज अनेक घरांतून, समाजांतून अनेक त-हेचे वाद निर्माण झाले आहेत. माणसे अमर झाली तर हे पिढीतील विचारांचे अंतर फारच वाढेल. कुटुंबात, समाजात तीन-चार पिढ्या आढळतील. मग वादांना काय तोटा?माणसाला अमरत्व प्राप्त झाले की, लोकसंख्या बेसुमार वाढणार आणि वाढत्या बेकारीचा प्रश्न 'आ' वासून उभा राहणार. आजही आपल्या देशापुढे बेकारीची समस्या आहेच, त्यामुळे मग माणसे अमर झाली तर हाहाःकारच उडेल. अन्नधान्य, पाणी, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील. कदाचित या सर्व गरजा भागविण्यासाठी वैयक्तिक मालकी हक्काला राष्ट्रीय संपत्तीचे स्वरूप दयावे लागेल. प्रयोगशाळांना शरण जावे लागेल आणि निसर्गनिर्मित संपत्तीला मानवनिर्मितीची जोड दयावी लागेल. आपण अमर आहोत असे एकदा सिद्ध झाले की, माणसातील साहसी वृत्तीला उधाण येईल. चंद्राबरोबर इतर ग्रहांवर जाण्यासाठीही माणूस पुढे सरसावेल. धाडसी स्पर्धांना ऊत येईल. पण येथे एक धोकाही संभवतो. मरण नाही म्हटल्यावर पुनर्जन्माची कल्पना नष्ट होईल. त्याबरोबरच पापपुण्याचा निवाडा होण्याची कल्पनाही लोप पावेल. त्यामुळे माणूस दुष्कृत्ये करताना कचरणार नाही, ऐहिक जीवनात गुंतलेला असताना तो अध्यात्माचा विचार करणार नाही आणि मग मानवी जीवन क्षुद्र बनेलया साऱ्या विचारांत एक धोका आपण विसरलो आणि तो म्हणजे माणूस अमर झाला तरी तो अजर होणार का? तसे नसेल तर माणसाला हे अमरत्व नकोसे होईल. जखमेची वेदना घेऊन शोकाकूल अवस्थेत फिरणारा चिरंजीव अश्वत्थामा आपल्या परिचयाचा आहेच. त्याला आपले चिरंजीवित्व नकोसे झाले होते. त्याप्रमाणेच माणसाची अवस्था होईल व तो देवाकडे गा-हाणे घालील, “देवा, सोडव रे बाबा आता या यातनांतून, लवकर मरण येऊ दे."

वरील निबंध माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Manus Amar Zala Tar Essay In Marathi

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh आज आपण पावलोपावली यंत्रांवर अवलंबून असतो. ही यंत्रे आता आपल्या नित्य व्यवहारात एवढी एकरूप झाली आहेत की ती यंत्रे आहेत व त्यांच्याविना आपले अडेल हे आपल्याला उमगतही नाही. कळले तरी वळत नाही. मग अनेकदा आपण त्या यंत्रांना अतिशय निष्काळजीपणे वागवतो. एकदा काय झाले, ही यंत्रे रागावली आणि त्यांनी आपली संघटना स्थापन केली. या संघटनेने संपाचा आदेश दिला. एका मध्यरात्री सारी यंत्रे संपावर गेली. मग जो गोंधळ उडाला तो काय वर्णावा!सकाळी नेहमीप्रमाणे घड्याळाने आपला गजरच केला नाही. त्यामुळे सर्वांना जाग आली ती उन्हं वर आल्यावरच. धावत धावत आई नळाजवळ गेली; पण नळातून एक थेंबही पाणी येत नव्हते. घरातला फ्रीज बंद पडला होता. रेडिओ बोलत नव्हता. पंखा फिरत नव्हता. घराबाहेर आलो तर लिफ्टही चालत नव्हती. सगळेजण हवालदिल झाले. रोज सकाळी सकाळीच वृत्तपत्रे वाचायची सवय. सवय कसली, व्यसनच म्हणा ना! पण आज त्या वृत्तपत्रांचाही पत्ता नव्हता.रस्त्यावर एकही गाडी धावत नव्हती. बस नाही, स्कूटर नाही, साधी सायकलही नाही. रस्त्यावर फक्त दिसत होती माणसेच माणसे. सारीच गोंधळून गेलेली. हे काय आहे? असे कशामुळे झाले? जरा चौकशी करा, वृत्तपत्रांकडे विचारा. पोलिसांना कळवा. कुणीतरी कल्पना काढली . फोन करा, फोन उचलला गेला, पण त्यातून कसलाच आवाज आला नाही. फोनही बंद. आता पायी चालण्याशिवाय पर्याय नव्हता. लोक हिंडू लागले, अदमास घेऊ लागले.

yantra sampavar geli tar marathi nibandh
yantra sampavar geli tar marathi nibandh


नेहमी यावेळी गजबजलेली स्टेशने आज शांत होती. म्हणजे माणसे जा-ये करीत होती; पण गाड्याच धावत नव्हत्या. 'पूतळ्याच्या' खेळातल्याप्रमाणे त्या जागच्या जागी उभ्या होत्या. बेकरीत ब्रेड नव्हता. मार्केटात भाजी नव्हती. शहरातील सारे जीवन विस्कळीत झाले होते. पाण्याच्या अभावामुळे लोकांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
सहज एका रुग्णालयात डोकावलो, तेथे तर हाहाकार उडाला होता.


 यंत्रे थांबल्यामुळे शल्यविशारद शस्त्रक्रिया पार पाडू शकत नव्हते. त्यामुळे रोग्यांचे विलक्षण हाल होत होते. पंखे फिरत नव्हते. रक्त, सलाईन देता येत नव्हते. एका कमी वजनाच्या बाळाला दिवे लावून विशिष्ट उबेत ठेवले होते. पण तो दिवाच बंद पडला होता. त्यापेक्षा शोचनीय गोष्ट म्हणजे-एका हृदयविकाराच्या रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वासाचे यंत्र लावून ठेवले होते, ते यंत्र बंद पडल्याने तो रोगी गतप्राण झाला होता!  सारे वातावरण बेचैन, अस्वस्थ होते. यंत्रविशारद यंत्रांशी झगडत होते; पण यंत्रे चालूच होत नव्हती. अशा अस्वस्थ वातावरणात दिवस तर संपला. यंत्रे चालू होत नव्हती; पण आकाशातील सहस्ररश्मीचे यंत्र मात्र व्यवस्थित चालु होते. ठरलेल्या वेळी भास्कर अस्ताचलावर गेला आणि सर्वत्र काळोख पडला. नेहमी विजेच्या दिव्यांनी झगमगणारे ते शहर! पण त्या दिव्यांनीही असहकार पुकारला होता. त्यामुळे सर्वत्र पणत्या, मेणबत्त्या तेवत होत्या. या शहरातील लोकांचे आज प्रथम लक्ष गेले ते आकाशातील चंद्राकडे व चांदण्यांकडे. पण तरीसुद्धा पृथ्वीवरचा काळोख नकोसा झाला होता. शेवटी मानवी उपाय संपल्यावर सर्वांना आठवण झाली ती दैवी उपायांची.सर्वधर्मीय मानवांनी शहरातील मोठ्या पटांगणावर येऊन यंत्रांची क्षमा मागितली यंत्रदेवाला विनविले, “या पामरांना माफ कर आणि यंत्रांची चक्रे सुरू कर. यंत्राविना माणूस अपूर्ण आहे." यंत्रजगतात खळबळ उडाली, विचारविनिमय झाला. दिली तेवढी शिक्षा बस झाली असा विचार एकमताने ठरला आणि यंत्रांनी संप मागे घेतला. कारण अखेरीस मानवच त्यांचा जन्मदाता होता. दिवे लागले, पंखे फिरू लागले, नळांना पाणी आले, सर्वत्र आनंदीआनंद झाला.


वरील निबंध यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh