कल्पनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कल्पनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

 petrol sample tar marathi nibandh | पेट्रोल संपले तर मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पेट्रोल संपले तर मराठी निबंध बघणार आहोत.पेट्रोल व डिझल सारख्‍या खनिज तेलावर  मयार्देपेक्षा अवलंबुन राहील्‍यावर त्‍याचे काय परीणाम होत आहेत व ते संपल्‍यावर काय परीणाम होतील याबद्दल या निबंधात सविस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


petrol-sample-tar-marathi-nibandh
petrol-sample-tar-marathi-nibandh




भौतिक सुखाचा दिवा पेट्रोलवर  तेवतो' हे आजच्या युगातील सुभाषितच म्हणावे लागेल. आज आलेली जीवनाची गती हे पेट्रोलने दिलेलं वरदान आहे. आज ऑस्ट्रेलियात सकाळचा चहा घेऊन भारतात जेवण करून दुपारचा चहा इंग्लंडमध्ये घेऊन रात्री जेवून झोपायला अमेरिकेत जाणे हे यामुळेच शक्य आहे. आजचे युग हे प्लॅस्टिकचे युग मानले जाते त या पेट्रोलमुळेच ! 


निसर्गान आपल्या जादुइ पोतडीतून मानवाला पेट्रोल दिल आणि माणूस हरकुन गेला. त्याची चालच बदलली. तो धावू लागला सुसाट वेगाने ! शाब्दिक आणि लाक्षणिक अर्थानेही !  पण माणूस मुळातच हावरट. 'अजून' अजून' चा जप तो सोडत नाही. हव्यास ही जशी प्रगतीची निशाणी तशी अधोगतीचीही ! कुठे थांबावे ? हेच माणसाला कळत नाही.


 खनिज तेल निसर्गाने पृथ्वीच्या पोटात साठवले, ते मानवाने उकरून काढले... वापरले, वापरत आहे...पण किती अमर्याद ? त्यात माणूस हा प्राणी नंबर एकचा अप्पलपोटा, स्वार्थी, लबाड आणि भांडकुदळ. ' तुझे ते माझे आणि माझे तेही माझेच' ही त्याची वृत्ती ! त्यातूनच उद्भवले हे आखाती युद्ध.साऱ्या जगाला, विशेषत: भारतासारख्या विकसनशील देशांना वेठीला धरणारे. सद्दाम हुसेनने तर उद्दाम होऊन मुद्दाम तेल विहिरी पेटवून दिल्या, समुद्रात तेल सोडून दिले. त्यावर अमेरिका अणुयुद्धाची' बेजबाबदार भाषा बोलते आहे. त्यामुळे साऱ्या तेलविहिरी नष्ट वा निरुपयोगी होतील. मग पुढे ?... तर काय, भौतिक सुखांचा दिवा फडफडू लागेल अन् काही काळाने 'राम' म्हणेल आणि मग माणसाचे डोळे खाडकन् उघडतील.


 आपणच मांडून ठेवलेल्या पसाऱ्याचा अडथळा होऊ लागेल. दळणवळण कोलमडेल. स्कूटर्स, मोटारी आपापल्या जागीच थांबून राहतील. जणू पुतळेच. प्रवास खडतर होईल. संथ होईल. घोडागाडी, बैलगाडी, सायकली आणि स्वतःचे पाय वापरावे लागतील. वेगात चाललेल्या वाहनाला ब्रेक लागून गतिरोध व्हावा तसे जीवन होईल. व्यापार धोक्यात येईल. जिथे जे पिकत नाही तिथे ते पोहचविणे अडचणिचे होईल. महागाई आभाळाला टेकेल तर नश्वर पदार्थांचे अवमूल्यन होईल. द्राक्ष, आंबे यांना विदेश दिसणार नाही. परकीय चलन बुडेल. देशाच्या तिजोरीवर ताण पडेल. एखाद्या वटवृक्षाने स्वतःच 'बोनसाय' बनावे तसे मानवी जीवन खुरटलेलं होईल.


पण यातून काही फायदेही होतील. माणूस निसर्गाच्या जवळ जाईल. प्रदूषणाच्या छायेतुन  बाहेर पडेल, कारण कारखाने पक्षाघात झाल्यासारखे होतील. हातपाय वापरल्याने कात टाकलेल्या सापाप्रमाणे त्याच्यातील चैतन्य पुन्हा सळसळू लागेल...अज्ञात साठे-तेलाचे तो हुडकून काढेल, आणि नाहीच मिळाले तर पर्यायी इंधन तो शोधल-माणूस तसा हिकमती आहे ! 


सौरऊर्जा, समुद्राच्या लाटांपासून तसेच, अणुऊर्जा असे काही ना काही तो शोधेलच. 'गरज ही शोधाची जननी आहे.' माणसाजवळ तेवढी क्षमता नक्कीच आहे. चंद्रावर पाऊल उमटवणाऱ्या मानवी मेंदूला अशक्य काहीच नाही. खनिज तेल संपल्याने जीवनमान दोन पावलं मागे येईल ते पुढची मोठी उडी घेण्यासाठीच !

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

petrol sample tar marathi nibandh | पेट्रोल संपले तर मराठी निबंध

 aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध

निबंध 1 
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण aarsa nasta tar marathi nibandh बघणार आहोत. हा एक कल्‍पनात्‍मक निबंध आहेत त्‍यामुळे आरसा नसता तर काय झाले असते याचे वर्णन खालील 5 निबंधामध्‍ये तुम्‍हाला दिसुन येईल चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आजच्या युगात माणसाला ज्या गोष्टी अनिवार्य वाटतात; त्यांपैकी एक म्हणजे 'आरसा.' घरातून बाहेर पडताना लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकजण आरशात डोकावल्याशिवाय राहत नाही. शहरांमधून ऑफिसात  काम करणाऱ्या तसेच कॉलेजांत शिकणाऱ्या मुलींच्या पर्सेसमध्ये 'आरसा' आढळतोच. रस्त्यावरून जाणारा कॉलेज युवक एखादया मोटारच्या आरशात डोकावून आपले केस ठाकठीक असल्याची खातरजमा करून घेतो. सांगायचा हेतू काय की, प्रत्येकाला आपली छबी वारंवार पाहण्याची हौस असते आणि त्यामुळे आरसा ही आज आवश्यक गोष्ट झाली आहे.

aarsa-nasta-tar-marathi-nibandh
aarsa-nasta-tar-marathi-nibandh


आरसा नसता तर माणसाची मोठी गैरसोय झाली असती. स्वत:चे रंगरूप माणूस जाणू शकला नसता आणि मग स्वत:चीच तोंडओळख त्याला पटली नसती. परीक्षेत आपणाला लाभलेल्या यशाचा आनंद आपल्याला आरसा दाखवतो. आपल्या आवडत्या माणसाची दीर्घकालानंतर झालेली आतुरतेची भेट आरसा खुलवतो आणि एखादया दुःखद प्रसंगी सगळ्यांच्या नजरा चुकवून आपल्या डोळ्यांनी गाळलेले अश्रू हाच आरसा टिपून घेतो. आरसा हा माणसाचा फार जवळचा मित्र आहे.

आरशाला संस्कृतमध्ये आदर्श' म्हणतात. रूप जसे असेल तसेच आरसा दाखवतो. तो कुरूपाला सुंदर बनवू शकत नाही. म्हणजे आरसा हा 'प्रामाणिकपणाचा आदर्श' आहे. म्हणून तर आपण आरशाची उपमा देऊन म्हणतो, त्याचे मन आरशासारखे नितळ आहे. आरसा नसता तर सुंदर माणसांना आपल्या सौंदर्याची अवास्तव जाणीव झाली नसती आणि त्यामुळे कुरूप माणसांना वाईट वाटले नसते. 

केशकर्तनालये, फोटो स्टुडिओ  अशा अनेक ठिकाणी आरसे मोठी कामगिरी बजावतात. आरसा नसता तर अनेक ठिकाणी सजावटीचे काम अपूर्ण राहिले असते. अनेक वैज्ञानिक प्रयोगांत आरशाला स्थान असते. आरसा नसेल तर ते प्रयोग अपूर्ण राहतील. अंतर्गोल भिंग-बहिर्गोल भिंग असलेले आरसे माणसांना हसवतात व ते मोटारींनाही उपयोगी पडतात. गावातील जत्रांत आरशांना महत्त्वाचे स्थान असते. आरसा नसेल तर ही सारी गंमत हरवून जाईल. तेव्हा असा हा बहुगुणी आरसा हवा आणि हवाच!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

aarsa nasta tar essay in marathi language

निबंध 2
रोज आपण अशा अनेक गोष्टींचा वापर करत असतो की, त्यांचे अस्तित्वही आपण विसरलेले असतो. म्हणतात ना - अतिपरिचयात् अवज्ञा. (अति परिचयाच्या गोष्टीला किंमत न देणे ) तशी स्थिती आहे आपली आरशाच्या बाबतीत. अगदी सहजगत्या जातायेता आपण आरशात डोकावतो आणि आपण ठाकठीक आहोत ना याची खात्री करून घेतो. असा हा आरसा प्रत्येक घरात असतोच असतो. कधी तो एखादया भिंतीवर लटकत असतो, तर कधी एखादया मोठ्या कपाटाच्या दारावर, कधी एखादया सुंदरीच्या पर्समध्ये असतो, तर कधी एखादया मोठ्या दिवाणखान्याच्या दाराशी स्थानापन्न होऊन तो येणाऱ्या-जाणाऱ्याला त्याची छबी दाखवत असतो.

असा हा आरसा नसता तर - ? तर माणसाने आपली छबी कोठे पाहिली असती? एखादया मुलाखतीला जाताना, एखादया समारंभासाठी नटताना, माणूस पुनः पुन्हा आरशात डोकावतो आणि त्या आरशाला विचारतो- 'सांग दर्पणा, कसा मी दिसतो?' पण हा आरसा मात्र बेटा खरा प्रामाणिक ! उगाच नाही त्याला संस्कृतमध्ये 'आदर्श' म्हणतात. तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही आरशात दिसणार. आरसा तुम्हांला सुंदरही बनवत नाही वा तुमच्या कुरूपतेतही भर घालत नाही. म्हणून तर आरशाचा आदर्श व्यक्तीपुढे ठेवला जातो. कसे बना? कसे असा? - तर आरशासारखे स्वच्छ चारित्र्य असलेले.

आरसा हा माणसाला पुराणकालापासून परिचयाचा आहे. रामायणातील रडणाऱ्या रामाला आरशात चंद्र दाखवून मंत्री सुमंताने त्याची समजूत काढली होती. इतिहासकालातही हा आरसा आपल्याला भेटतो. चितोडच्या महाराणी पद्मिनीचे सौंदर्य अल्लाउद्दीनने आरशातच पाहिले होते. मोगल साम्राज्यातील 'आरसे-महाला'चे वर्णन आपण ऐकलेले आहे. त्या काळात घर, महाल, प्रासाद यांना सजवण्यात आरशांचे स्थान महत्त्वाचे होते.

आजच्या विज्ञानयुगातही माणसाला आरशाची मदत अनेक ठिकाणी घ्यावी लागते. भौतिकशास्त्रात प्रकाशाचे नियम हे आरशाच्या साहाय्यानेच समजून घेतले जातात. अनेक वस्तू निर्माण करताना आरशांचा उपयोग होतो. मग एखादया आरशात आपण गोलमटोल होतो, नाहीतर एखादया आरशात आपण उंचचउंच झालेलो असतो. ही गंमत सोडली तरी, वाहन चालवताना-- मग गाडी असो वा बाईक - आरसा आपल्याला आपल्यामागून येणाऱ्या वाहनाची कल्पना देत असतो. हा आरसा नसेल तर चालकाचा फार गोंधळ उडेल. अभिनय करणारे कलावंत आरशात पाहून सराव करतात म्हणे... !
असा हा आरसा नसेल तर माणसाची अशी अनेक प्रकारे गैरसोय होईल. मग तो आरशाची जागा कोण घेऊ शकेल याचा शोध घेऊ लागेल.

निबंध 3  

आरसा बाजूला सारून कधी पाहिलंय का कुणी? आपल्या रोजच्या जीवनात इतकी महत्त्वाची जागा अडवून बसलाय हा की आपण तो नसता तर! यावर विचारच करीत नाही. आपण आरशात पाहतो ते आपलं रूप बघण्यासाठी. आपल्या प्रसाधनात आरसा नाही म्हणजे जणू डोळ्याविना चेहरा! लोकांनी आपल्याकडे पहावं यासाठी स्वत:ला खुलविण्यासाठी आपण आरशात पाहतो. कारण आजच्या युगात माणूस अंतरंगापेक्षा बाह्यरंगाकडे अधिक लक्ष देतो.

ह्या आरशाचा शोध तरी केव्हा लागला? जेव्हा मानव उत्क्रांतीच्या पहिल्या पायरीवर उभा होता, तेव्हा त्याच्याजवळ अन्न होते, ना वस्त्र, ना निवारा, मग प्रसाधनाची तर बातच सोडा. पण एक मात्र निश्चित की प्रतिबिंब ही गोष्ट मानवाला पहिल्यांदा पाण्यामुळे माहिती झाली असणार. म्हणजेच पाण्यामुळे काचेचा व काचेतून आरसा जन्मला असणार ! 

या आरशानं काहीवेळा प्रताप घडवून आणलेत, तर कधी मदतही केली आहे. अहो, हा नसता तर, बाल श्रीरामाचा चंद्राचा हट्ट सुमंत पुरविता नाकीनऊ आले असते. हा नसता तर महाराणी पद्मिनीच्या सौंदर्याला कुणी वाचवलं असतं ? तिने आपलं प्रतिबिंब अल्लाऊद्दिनाला दाखवून स्वत:ची सुटका करून घेतली. हा नसता तर गॅलिलिओला ग्रीसची लढाई जिंकताच आली नसती! प्रत्यक्ष दर्शन न देता प्रतिबिंबाच्या रूपाने दर्शन घडवून संतुष्ट करणारा हा आरसा खूपच उपयोगी पडला.

असा हा आरसा नसता तर कुरूप लोकांच्या दृष्टीने फायदाच झाला असता. त्यांची दु:खे तरी कमी झाली असती. परंतु स्त्रिया, तरुण मुले, मुली, चित्रतारका यांची खूपच पंचाईत झाली असती. आरसाच नाही. मग नटणार कसे ? सतत दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागले असते. दिवसातून, दर पाच मिनिटांनी सांग दर्पणा, मी कशी दिसते?' असं गुणगुणत आरशात पाहणाऱ्या ललनांची खूपच पंचाईत झाली असती. आरसा नसता तर न्हाव्याच्या हातात डोकं देऊन हजामत करायला कुणाची छाती झाली असती?

आरसा नसता तर केवळ तरूण-तरूणींचीच नव्हे तर शास्त्रज्ञांचीही पंचाईत झाली असती. अहो, आरशामुळेच प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमांचा शोध लागला. आरसाच नसता तर गुणितप्रतिमा मिळाल्या असत्या का?
असो! आरसा नसता तर घडामोडी घडल्या असत्या. पण मग यावर उपायही शोधावा लागला असता. आरसा नसता तर प्रत्येकाने आपली छबी आपल्या आवडत्या माणसाच्या डोळ्यात पाहिली असती कारण 'डोळा हा माणसाच्या  मनाचा आरसा आहे!' पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 4 

aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध


काचेचा शोध म्हणजे मानवाच्या प्रगल्भ
बुद्धिमत्तेचा एक आविष्कार ! काचेच्या शोधामुळे सुधारणेची अनेक दालने खुली झाली. मूलभूत गरजांच्या शोधयात्रेत स्वत:च्या प्रतिबिंबाचाही शोध लागला. पाण्यात डोकावताना प्रतिबिंब दिसले व काचेच्या शोधातून आरशाचा जन्म झाला.


आरसा माणसाचा जीवनसाथी! घरात त्याचे स्थान अगदी महत्त्वाच्या जागी असते. स्वत:चे प्रतिबिंब पाहिल्याशिवाय माणसाची दैनंदिनी सुरूच होत नाही; आणि हा आरसाच नसता तर... 'डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे।' म्हणजे दुसऱ्यांच्या डोळ्यांत बघून आपले प्रतिबिंब शोधावे लागले असते.


प्राचीनकाळी राजेलोकांना
आपल्या रूपवती राण्यांसाठी 'आरसेमहाल' उभारताच आले नसते. सुमंतांना बाल प्रभुरामचंद्रांचा 'चंद्र' पाहण्याचा हट्ट पुरा करताच आला नसता. आरसा नसता तर अल्लाउद्दीन खिलजीला लावण्यवती पद्मिनीचे दर्शन झालेच नसते. 


शहाजहान बादशहा लाल किल्ल्यात कैदेत असताना 'ताजमहाल'चे प्रतिबिंब आरशात पाहून समाधान मानीत असे. आपल्या निर्मितीचे दर्शन तो आरशातून घेई; आरसा नसता तर त्याचे उर्वरित आयुष्य कंटाळवाणे झाले असते.


आधुनिक काळात सुंदर-सुंदर डिझाईनची ड्रेसिंग टेबले आणि आकर्षक गोदरेजची कपाटे, निरनिराळ्या आकाराचे आरसे घेण्याचा ललनांनी हट्ट केलाच नसता. आजकाल स्त्रियांच्या पर्समध्येसुद्धा आरशाने स्थान मिळविले आहे. मग 'सांग दर्पणा कशी मी दिसते?' असे आरशाशी हितगुज करणाऱ्या तरुणींच्या ओठी हे गाणे आलेच नसते. 


अहो, रामप्रहरी स्नान वैगेरे करून 'सौभाग्यलेणे - कुंकुमतिलक लावण्याचीदेखील पंचाईत झाली असती.
भिंग बिलोरी सहा बाजूंनी बांधून आरसेमहाल असला, उभे राहूनी मध्ये पहावे,
रूप आपुले छंद मनाला॥



हा छंद कसा पुरा करता आला असता? लमाणी बायकांना आपल्या काचोळ्यांना लावण्यासाठी आरसे मिळालेच नसते. अहो, पुरुषांचे तरी आरशावाचून कुठे चालते? रोजच्या दाढीची गैरसोय तर झालीच असती; पण न्हाव्याच्या मर्जीनुसार केस कापून घ्यावे लागले असते. 


वाहनचालकाच्या बाजूला बहिर्वक्र आरसा नसता तर मागून भरघाव वेगाने येणारी वाहने चालकांना दिसलीच नसती, मग अपघातांचे प्रमाण वाढले असते. हल्ली पंचतारांकित हॉटेल्स, मोठमोठ्या शोरूम्स, दुकाने जी काही आरशांनी सजवलेली असतात, त्यांना आरसे नसते तर अवकळा आली असती.



आरसा नसता तर शास्त्रज्ञांचे थोडे का अडले असते? आरसा नसता तर गुणित प्रतिमा मिळविता आल्या नसत्या. प्रयोगशाळेत तर आरशावाचून फारच अडले असते. नवीन नवीन उपकरणे निर्माण करताच आली नसती. पाणबुड्यांना पाण्यावरील शत्रूची जहाजे दिसलीच नसती.



आरसेच नसते तर दुर्बिणीचा शोध तरी कसा लागला असता? सोलर एनर्जीवर चालणारी उपकरणे तयार करता आली नसती. अर्थात आरसा नसता तर कुरूप व्यक्तींना आपल्या कुरूपतेची जाणीव झाली नसती, हा एक फायदाच झाला असता. पण माणूस काही स्वस्थ बसणारा प्राणी नाही. 


तो अंतर्मनाच्या आरशात डोकावून पाहील. अंतर्मुख होऊन आरशाला पर्याय शोधील. तो जीवनाचा (पाण्याचा) तळ शोधेल व तेथे आपले प्रतिबिंब स्थिर करता येईल का याचा विचार करील. अंधारातून चालताना तो आपल्या बुद्धीचा किरण पाडून प्रकाशाचा शोध घेईल.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 5

aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध

 

आरसा नसता तर रजपुतांच्या इतिहासातला प्रसंग. राणी पद्मिनीला पाहण्यासाठी अल्लाउद्दीन खिलजी वेडा झाला होता. त्याकाळी रजपूत रमणी परपुरुषापुढे येत नसे. त्यातून हा शत्रू. त्यावेळी आरसा त्याच्या मदतीला आला.
आरशात पधिनीची मोहक छबी पाहून तो परतला. 


त्यावेळी तरी आरशाने तिला कठीण प्रसंगातून निभावून नेले. दशरथाचा राजमहाल. चिमुकला राम आभाळातला चंद्र हवा असा हट्ट घेऊन बसला. सगळ्यांनी नानापरीने त्याची समजूत घातली. पण तो काही केल्या ऐकेना. 


शेवटी चतुर अशा सुमंताने आरसा आणला व त्या आरशात रामाला बंद दाखविला. इतका वेळ रडणारा तो बाळ श्रीराम खुदकन हसला. ही आरशाची किमया.. आरसा ही दैनंदिन जीवनात गरजेची वस्तू आहे. आरसा नसता तर लग्न-समारंभात आकर्षक वेषभूषा, केशभूषा करणाऱ्या वधूचे काय झाले असते? 


लग्नसमारंभात वधू ही उत्सवमूर्ती. तेव्हा तिचे प्रसाधन आरशावाचून होऊच शकले नसते. तिच्या जोडीला तिच्या मैत्रिणी, घरातील स्त्रिया आणि पुरुषसुद्धा आपला जामानिमा नीटनेटका आहे ना हे कसे पाह शकले असते?
घरात छोट्या बेबीचा किंवा बाळाचा वाढदिवस आहे. 


त्याला नवे सुंदर कपडे घातल्यावर आपण आधी आरशापुढे उभे करतो. त्यात स्वत:ची सजलेली प्रतिमा पाहून ते मूलही खूष होते. आरशाविना त्याचा हा आनंद पूर्ण झाला नसता. पूर्वी आरसा हा स्त्रिया, मुलींचाच लाडका सखा होता. आज मुलांनाही तो तितकाच प्रिय आहे.


शाळेत, घरात, स्टेशनवर, हॉटेलात, रेल्वेत सर्वत्र आरसे असतात. तसे नसते तर आरशात पाहून भांग पडणे, प्रसाधन करणे, नव्हे गाण्याच्या तालावर नाचणे कसे शक्य झाले असते ? त्यातून तारुण्यात नुकतेच पदार्पण केलेल्या युवक-युवतींचे विचारूच नका. 

घरातला आरसा त्यांना पुरत नाही. म्हणून बरेचदा खिशात, पर्समध्येसुद्धा छोटा आरसा बाळगला जातो. आरसा नसता तर त्यांच्या या आनंदात नक्कीच विरजण पडले असते. कुणी म्हणतील, पूर्वी कुठे आरसे होते? तलावाचे पाणी, नदीचे पाणी यात प्रतिबिंब पाहिले जात असे. पण सगळीकडेच कुठे तलाव,


नद्या असणार? शिवाय गढूळ
पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल? आजकाल घरात कपाट घेताना आरसा आधी पाहिला जातो. लग्नात, इतरप्रसंगी भेट देण्यासाठी आरसा वापरला जातो. 


तेव्हा आरशाचा उपयोग निर्विवाद आहे.सारांश, आरसा हा माणसांचा लाडका मित्र आहे. तो नसता तर बाळांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचे विविध प्रकारचे आनंद त्यांना उपभोगता आले नसते. म्हणून आरसा हवाच. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.  धन्‍यवाद


aarsa nasta tar marathi nibandh | आरसा नसता तर मराठी निबंध

मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | mi chandravar gelo tar essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध  बघणार आहोत. या निबंधामध्ये चंद्रावर गेल्यावर काय करता येईल व मानव चंद्रावर जाऊन कोणती स्वप्न पूर्ण करू इच्छितो याचे वर्णन केले आहे  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

चंद्राचे मानवी मनाला विलक्षण आकर्षण आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीही 'चंद्र हवा' म्हणून कौसल्यामातेकडे हट्ट धरला आणि मग आरशातून चंद्राचे प्रतिबिंब दिसताच तो छोटा राजकुमार हर्षभरित झाला, अशी कथा आहे. चंद्राविषयीच्या मानवाच्या या आकर्षणाची परिणती म्हणजे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांतून मानवाने चंद्रावर केलेले पदार्पण होय.
mi-chandravar-gelo-tar-essay-in-marathi
mi-chandravar-gelo-tar-essay-in-marathi


नील आर्मस्ट्राँग या अमेरिकन अवकाशयात्रीने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. मानवाचे चंद्रावरील चिमुकले पाऊल म्हणजे त्याची विज्ञानाच्या आधारे अवकाशातील प्रचंड झेप होती. या यशस्वी चांद्रमोहिमेनंतर चंद्रावर जाण्याची, तेथे सहली काढण्याची, तेथे कायमची वस्ती करण्याची स्वप्ने माणूस पाहू लागला. माझ्या मनात आले - अशाच एका मोहिमेतून मला चंद्रावर जायला मिळाले तर ! 

...तसे झाले तर ! फार दिवसांचे उराशी बाळगलेले माझे स्वप्न साकार होईल. चंद्रावर चालताना टुणटुण उड्या मारत जाण्याचा आनंद मला लुटता येईल. पृथ्वीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर दिसणारा 'ससा' धुंडाळण्याचा मी प्रयत्न करीन. चंद्रावरून माझी पृथ्वीमाता कशी दिसते. ते मी पाहीन.

चंद्रावरून पृथ्वीवरील माणसांशी संपर्क साधणारी संदेशवाहिनी असणारच ! त्या वाहिनीवरून मी चंद्रावरील सृष्टीचे, सभोवारच्या अथांग विश्वाचे, तेथून दिसणाऱ्या माझ्या पृथ्वीमातेचे धावते समालोचन माझ्या घरच्या माणसांना ऐकवीन. तेथेच कायमचे वास्तव्य करणे जमले तर तेथे एक भारतीय उपाहारगृह सुरू करीन. त्या उपाहारगृहात अस्सल मराठी पदार्थ मिळू शकतील. मोदक, थालीपीठ यांसारखे पदार्थ तसेच सोलकढी, मधुकोकम यांसारखी पेये मिळू शकतील. 

चंद्रावरील तरुण जोडपी कदाचित 'मधुचंद्रा'ऐवजी 'मधुवसुंधरा 'साठी पृथ्वीवर येण्यास आतुर होतील. अशा वेळी शक्य झाले  तर त्यांना पृथ्वीवरील प्रवासाची सोयही मी करीन. पण हे सारे केव्हा?- जर मला चंद्रावर जायला मिळाले तर !!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व  चंद्रावर जाण्यास तुम्हाला संधी मिळाल्यास तुम्ही काय करू इच्छिता ते  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • चंद्राचे आकर्षण
  • प्रभू रामाला चंद्र हवा
  • वैज्ञानिकांचे अथक प्रयत्न
  • चंद्रमोहिमेत सहभागी व्हावे
  • चंद्रावरचा ससा
  • चंद्रावरून पृथ्वी कशी दिसेल
  • संदेशवाहिनी
  • उपाहारगृह 
  • पृथ्वी, चंद्र ये-जा उत्सुकता.

मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | mi chandravar gelo tar essay in marathi

aai sampavar geli tar essay in marathi | आई संपावर गेली तर निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण aai sampavar geli tar marathi nibandh  बघणार आहोत. मानवाला कोणत्याही गोष्टीचे महत्व तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपल्या  जवळ असणारी एखादी गोष्टं आपल्यापासुन दुर निघुन जात नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास आईचे देता येईल, आपली आई संपुर्ण कुटुंबासाठी दिवस रात्र राबत असते. सर्वांची काळजी करत असते. पण हीच आई जर संपावर गेली तर काय होईल. हेच या निबंधात वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

'आई, माझं गणिताचे पुस्तक कोठे आहे?' 'आई, हा निबंध कसा लिहू ग? काही मुद्दे सांग ना.' 'आई, या रविवारी जिमखान्याची सहल आहे. काय देशील डबा?' 'आई, यंदा दिवाळीत फराळाचे पदार्थ भरपूर करायचे हं!' 'आई, मला बॅडमिंटनची रॅकेट हवी आहे. कधी घेशील सांग?' अशी आपली हर एक कामे आईशी निगडित असतात. पण समजा, आई संपावर गेली, तर ...

aai sampavar geli tar essay in marathi
aai sampavar geli tar essay in marathi



आई संपावर गेल्यास घराचे घरपणच हरवेल. सकाळी उठायला हमखास उशीर होईल; कारण नेहमीप्रमाणे लवकर जागे करण्यास आई नसेल. न्याहारीला टेबलावर केवळ कोरडा पाव असेल. लोणी स्वतः लावून घ्यायचे म्हणजे केवढे कठीण! जवळजवळ उपासमारच!  (हे पण वाचा माझी आई मराठी निबंध)


शाळेत जातानाही किती तरी गडबड झालेली असेल. कंपासपेटीच विसरल्यामुळे लिहायला पेन्सिल, पेन काहीच नसणार ! मग त्यासाठी शिक्षकांची बोलणी खावी लागणार. मधल्या सुट्टीसाठी डबाही नसणार, कारण न विसरता सुट्टीसाठी डबा देणारी आई संपावर गेलेली असणार.


शाळेतून दमून भागून घरी यावे, तर स्वयंपाकघरातील सारा पसारा आवरणार कोण? टेबलावर ब्रेड, लोणचे, चटणी ठेवलेली असणार आणि बरोबर एक चिठ्ठीही असणार. 'आई संपावर आहे.' या नुसत्या कल्पनेनेच माझे डोळे पाझरू लागले. आईच्या अपार वात्सल्याची ती जणू पावतीच होती!

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद .

निबंध 2

खरंच 'आई' म्हणजे आत्मा आणि ईश्वर आईची महती वर्णनासाठी घेतली तर शब्द अपुरे ठरतात. अशी सर्वांची लाडकी आई संपावर गेली तर?.... प्रत्यक्ष देवालाही आईच्या कुशीचा , तिच्या स्नेह - वात्सल्याचा मोह आवरता आला नाही, तिथे आम्हां माणसाचे  काय? आई संपावर गेली तर सकाळी लवकर अभ्यासाला कोण उठविणार? अन् तेही न रागावता..... केसात हलकीशी बोटे फिरवून ‘पिंटू , ऊठ' असं कोण म्हणणार? दूध, न्याहारी कोण देणार? सारे प्रश्नच प्रश्न ..... या सर्वांचे उत्तर तर 'आईच'! पण तिने संप पुकारला तर ..... बापरे कल्पनेनेच मला घाबरून सोडले.


आई दिवसरात्र आपल्यासाठी, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी किती कष्ट करत असते याची जाणीव झाली. तिच्याविना घर चालणार तरी कसे? बाबांना ऑफिसात वेळेवर जाता येईल का? स्वयंपाक कोण करणार? बाहेरचं जेवण रोज आवडेल का? घरात बहीण-भावंडाची भांडणे कितीतरी वाढतील आई असली की घर कसं प्रसन्न अन् शांत असतं. ती नसेल तर शिस्तच राहणार नाही. घरात अव्यवस्थितपणा वाढेल . घरात बहिण भावंडाची भांडणे किती तरी वाढतील.


संस्काराची शिदोरी कोण पुरवेल मग? आईच्या प्रत्येक कृतीतून , प्रत्येक शब्दातून , प्रत्येक नजरेतून प्रेमाचा निरंतर झरा खळखळत असतो. त्यामुळेच तर कुटूंबसंस्था टिकून राहते. तीच संपावर गेली तर सारचं बिघडेल. कुणाचाही कुणाशी मेळ बसणार नाही.

आईच्या सहनशक्तीला तर तोड नाही. तिचं शांत गंभीर अंस्तितव, मौन राहून ही अनेक प्रश्नांचं उत्तर देऊन जातं. तिच्यामुळे घरातला कलह टळतो. महत्त्वाचे निर्णय घेताना तिच्या अमोल विचारांचा हातभार लागतो. घरातल्या सर्वांना काय - काय लागते? सर्वांचे वेगवेगळे स्वभाव कसे आहेत? सर्वांच्या वेळा कशा सांभाळायच्या? सर्वांना वेळेवर सर्व कसे उपलब्ध करून द्यावे? सर्वांच्या अडचणी कशा सोडवाव्यात हे सारं 'आई' च करू शकते. तिला पर्याय होऊच शकत नाही . 

आदर्श माता एकटी पूर्ण मंत्रिमंडळ' सांभाळते. ते सारे एकटी घरात सांभाळत असते. कारण ज्या वेळी आई मुलाला सकाळी उठवून स्नान इत्यादी कामे करावयास लावते तेंव्हा ती आरोग्यमंत्री असते. दप्तर व्यवस्थित देऊन शाळेत पाठवते तेंव्हा ती शिक्षणमंत्री असते. घरी जेवण, न्याहरी देताना ती अन्नपुरवठामंत्री असते. घरकाम , इतर कामे , अभ्यास करावयास लावते तेंव्हा ती गृहमंत्री व औद्यागिकमंत्री असते. खेळ व व्यायाम यासाठी प्रवृत्त करते तेंव्हा ती क्रीडामंत्री असते. रात्री मच्छर . भीती यापासून जपते तेंव्हा ती संरक्षणमंत्री असते .,

आई संपावर गेली तर कुटुंबातील सर्वांचे आरोग्य धोक्यात सापडेल. पावसात भिजल्यास खराखरा डोके पुसून , तव्यावरच्या गरम कपड्याने कोण डोक्याला शेक देईल? हळूवार मायेच्या स्पर्शानेच अर्धे दुखणे नीट होते. मग तिच्यासारखी आमची काळजी कोण घेईल? कुटूंबातल्या सर्वांचा विकास ठप्प होईल. पर्यायाने समाजाचे व देशाचेही नुकसान होईल कारण, आईसारखा दुसरा कोणी गुरू नाही.


साने गुरुजी म्हणतात"खरी शिक्षणदात्री आईच होय, ती देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व
ज्ञान देणारी तीच" प्रत्येकाची काळजी घेणारी अशी आई. थोडा उशीर झाला तरी बाळाच्या वाटेकडे डोळे लावून दारात उभी राहणारी आई.... या माऊलीपुढे हे विश्व , स्वर्ग सारं काही फिक! आईची प्रेममय, त्यागमय मूर्ती ही जीवनाची स्फूर्ती आहे, जीवनाची खरीखुरी प्रेरणा आहे. तिच्याविना एकही क्षण मला करमत नाही. तिला माझी खूप खूप काळजी आहे. मी तिच्या हृदयाचा तुकडा आहे. '


विचारांची शृंखला या शेवटच्या वाक्यावर येऊन थांबली.... अरे, खरंच की! आई मुळी संपावर जाणारच नाही. इतकी कठोर ती माऊली होऊच शकत नाही. फुलासारखं कोमल तिचं हृदय असं वज्रासारखं कठीण होणारच नाही.....
'ए पिंटू  , आज रविवार . सुट्टीचा दिवस जेवायलाही सुट्टी आहे होय? चल लवकर!''..... आईच्या हाकेनं मी भानावर आलो.
एक भयानक स्वप्न बघून डोळे उघडल्यानंतर 'ते स्वप्न होते' हे कळले अन् तेंव्हा जसं मन सुटकेचा श्वास घेतं तशी अवस्था माझी झाली होती.... तरीही मी उद्गारलो


“आई, तू कधीही संपावर जाऊ नकोस....
तुझ्या तळहाताचा पाळणा तुझ्या नजरेची पखरण,
तुझ्या स्नेहाची बरसात तुझ्या संस्काराची काय बात?
अस्तित्व माझे तुझ्यात दुसरे काही नको या जगात...."



(हे पण वाचा माझी आई मराठी निबंध)

हा निबंध मराठी भाषेत (language) आहे.  शब्‍दमर्यादा 250

aai sampavar geli tar essay in marathi | आई संपावर गेली तर निबंध

me pantpradhan zalo tar marathi nibandh  | मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध

आयुष्याच्या प्रवासात जन्मापासून मरेपर्यंत केलेल्या चांगल्या वाईट कर्माची गोळाबेरीज हीच माणसाच्या आयुष्याची किंमत ! श्वसन, भोजन, शयन यातच गुरफटणे म्हणजे आयुष्य नव्हे. उच्च ध्ययासाठी जगणे आणि ध्येयपूर्ती करताना वा केल्यावर देह ठेवणे हे उच्चप्रतीचे आयुष्य होय. क्षणभंगुर आयुष्यातील ती सर्वोच्च कमाई आहे. आपण आपल्या समाजाचे, देशाचे काही देणे लागतो. या देशाला, समाजाला घडवायचे माझे स्वप्न एकाच घटनेने खऱ्या अर्थाने साकार होऊ शकेल-- मी पंतप्रधान झालो तर !


माझ्या देशाची उच्च सांस्कृतिक परंपरा, चमकदार इतिहास, त्यातील नररत्ने, सामर्थ्यशील शालीनता हे सारे मला या देशाचा पंतप्रधान होण्यास मोह पाडतात. हा काटेरी मुकुट म्हणूनच मी आनंदाने स्वीकारण्यास तयार आहे.

me pantpradhan zalo tar marathi nibandh 

आज देशातील राजकारण कसे आहे ? गटबाजी, भ्रष्टाचार, तोडाफोडाची नीती, सत्तेसाठी चाललेली लाजिरवाणी स्पर्धा...सारेच ओंगळ आहे. दारिद्र्य, अशिक्षितपणा, मागासलेपण देश खाईत नेत आहे....मी हे सारं बदलू इच्छितो. “ सोपे नाही' याची कल्पना आहे. कारण ' लोकशाही हे गाढवांचे राज्य असते' असे म्हटले जाते तिथे लाथांचा सुकाळ असणारच.

पण अब्राहम लिंकनने म्हटल्याप्रमाणे “लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही" हे मी बिंबविण्याचा व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करीन.
मी काही ' केंबिज' किंवा 'डून स्कूल'चा वारसदार नाही. मी याच मातीतला असल्याने या मातीचे प्रश्न मला चांगलेच माहीत आहेत म्हणूनच ते प्रश्न सोडवण्याच्या माझ्या प्रयत्नांना जास्त यश येईल.

आपला देश शेतीप्रधान असल्याने शेतकरी हा केंद्रबिंदू धरून सरकारी धोरणे राबवण्याचा माझा मानस आहे. त्याला सवलती कर्जे, आधुनिक तंत्रज्ञान, खते पुरवीन पण कर्जमाफी करून त्यांची क्रियाशीलता आणि देशाची तिजोरी दुबळी करणार नाही नाही. गंगा-कावरी प्रकल्पान सारा भारत पावसावर अवलंबून न राहता
होईल. तो मी करीन म्हणजे मुकलेली जमीन अन् सुकलेला शेतकऱ्याचा चेहरा भारतात कुणाला दिसणार नाही.

तळागाळाच्या साऱ्याच जनतेला अन्न, वर, निवारा मिळालाच पाहिजे याकडे माझा कटाक्ष राहील.
पांढरपेशा वर्गाचे हाल अधिकच आहेत. कर आणि महागाईच्या कैचीत तो सापडला आहे. मी कर आकारणी सुलभ करीन. बाजारभाव नियंत्रित करीन. समाजवाद आणि भांडवलशाही या दोन्हींची सांगड मी घालीन. समाजवादाने व्यक्तिगत कौशल्य मारले जाते तर भांडवलशाहीत पिळवणूक होते. राष्ट्राच्या प्रगतीसाठी त्या दोन्हींचा यथायोग्य वापर मी करीन. समाजातील उच्चभ्रूना या माझ्या धोरणाचा फायदा मिळेल.

लोकसंख्येचा विस्फोट ही आपली खरी समस्या. मर्यादित कुटुंबावर सवलतींचा वर्षाव करीन किंवा कायदाच संमत करून घेईन. माझी धोरण अंमलात आणण्यासाठी प्रामाणिक, नीतिमान् , कार्यक्षम, न्यायी मंत्र्यांची निवड करीन. कायदा व सुव्यवस्थेचे तंतोतंत पालन करीन. मी रामराज्य आणू शकेन असा दावा मी करत नाही. वाईट काही असेलच पण अल्प. आणि राष्ट्राच्या प्रगतीला आड येणार नाही इतपत ! ' लाल फिती'चा अडसर दूर करून वेगाने कामं करीन, कारण कामासाठी मला फक्त ५ वर्षच हाती असतील आणि मला तर खूप काही करायचंय..." Miles to go before I sleep, miles to go..."

निबंध 2 

भारताच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचा सोहळा पाहिला आणि मनात आले की. मी पंतप्रधान झालो, तर...
तर काय मजा येईल! पण खरेच मजा येईल का? पंतप्रधान म्हणजे मोठा बंगला, संदर मोटारो, भरपूर जगप्रवास, अनेक सभासमारंभांत प्रचंड स्वागत. सदा सभोवती रक्षक व सेवक.
पण ... पण खरे सांगू का ! मी पंतप्रधान झालो तर प्रथम सारा डामडौल कमी करीन. आपल्या भारतावर जागतिक बँकेचे केवढे कर्ज आहे ! मोठमोठ्या योजना पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसा हवा, आम्ही मंत्रिमंडळातील लोकांनी आपले खर्च कमी केले तर खूप बचत होईल.

मी पंतप्रधान झालो, तर... प्रथम सभांना व घोषणांना बंदी घालीन. प्रत्यक्ष 'कृतीवर' माझा भर असेल. गरिबी हटवण्याचा संकल्प आम्ही कित्येक वर्षांपूर्वी सोडला आहे; पण गरिबी तसूभरही हटलेली नाही. उलट वाढतच आहे. ती दूर करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन..

आज देशात अराजकता वाढत आहे. देशवासीयांत एकात्मता व ज्वलंत राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी मी अविरत झटेन. मी कोणा एका राज्याचा विचार करणार नाही, तर संपूर्ण भारताचाच सदैव विचार करीन. त्याच्या विकासासाठीच झटेन, पण त्यासाठी भी पंतप्रधान व्हायला पाहिजे ना?

me pantpradhan zalo tar marathi nibandh | मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध

मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi

मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevhaessay in marathi : विदयापीठाच्या वनस्पतिविभागाने भरविलेले ते एक प्रदर्शन होते. विश्वातील सर्व वृक्षवेलींची ओळख आपण या प्रदर्शनात करून दिली आहे, असा प्रदर्शन-नियोजकांचा दावा होता. म्हणून मी पुनः पुन्हा फिरून ते प्रदर्शन पाहत होतो. शेवटी एका संयोजकाचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्याने मला विचारले, “आपणाला काय हवे आहे?"


मी मुळातच गोंधळलेलो होतो त्यात या प्रश्नाने अधिकच भर पडली आणि मी त्याला सांगितले, “मला कल्पवृक्ष हवा आहे, मला कल्पवृक्षाखाली बसायचे आहे." क्षणभर तो व्यवस्थापक गोंधळला; पण तो बराच चलाख असावा. लगेच सावरून तो म्हणाला, "चला, मी तुम्हांला कल्पवृक्ष दाखवतो." मग आम्ही दोघेजण त्या प्रदर्शनाच्या दुसऱ्या टोकाला गेलो. तेथे लोकांची गर्दी मुळीच नव्हती. अगदी कडेला एक बुटकेसे डेरेदार झाड होते, त्याकडे बोट दाखवून तो म्हणाला, “हा पाहा कल्पवृक्ष. आता तुम्ही याचे निरीक्षण करा. मी येतो हं, मला दुसरे काम आहे."
mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi
mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi


त्या निर्जन भागात आता मी एकटाच होतो. दूरवर माणसांचे आवाज ऐकू येत होते; पण मी होतो त्या भागात माणसांचीच काय ; पण पक्ष्यांचीही चाहूल ऐकू येत नव्हती. त्या क्षणी मला हसू आले. या सर्वांना या कल्पवृक्षाची व त्याच्या सामर्थ्याची कल्पना नसावी बहुतेक. असे वाटले आणि मी विचार केला-चला, आपण तरी आपली अनेक वर्षांची मनीषा पूर्ण करून घ्यावी. झाड जरा खालच्या बाजूला होते, तेव्हा तेथे उतरून झाडाखाली बसावे असे मी ठरविले. म्हणून मी थोडे खाली उतरलो. पण तेवढ्यात मनात आले की प्रथम आपण हे निश्चित करू या, की कल्पवृक्षाखाली बसून काय मागायचे?


हो, उगाचच काही चुकीचे मागितले तर शेवटी आपल्यालाच पश्चात्ताप करायची वेळ यायची. तेव्हा आधी पूर्ण विचार करून ठरवावे आणि मगच मागणी करावी. काय मागावे बरे या कल्पवृक्षाकडे? खूप पैसा मागावा का? हो, कारण पैशाने सर्व गोष्टी साध्य होतात. कारण ‘सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ते', असे विद्वानांनी म्हटलेच आहे. तेव्हा ठरले, कल्पवृक्षाला सांगावे की, कधीही संपणार नाही इतकी संपत्ती दे. पण ही एवढी संपत्ती आपण घरी कशी नेणार? आणि घरी तरी कोठे ठेवणार?


एकदम एवढा पैसा आला की लोकांच्या डोळ्यांत भरणार. लोक समजतील की आपण काही तरी अनैतिक मार्गाने हा पैसा मिळविला. शिवाय 'इन्कम टॅक्स' वाले पिच्छा पूरवतील आणि सर्वांत मोठी भीती म्हणजे चोरांची. चोरांमूळे या पैशापायी प्राण गमवावे लागतील. मग काय मागावे बरे या कल्पवृक्षाकडे?

विदया मागावी का? कोणत्या शाखेतील पदवी मागावी? कला, शास्त्र की व्यापार? कोणती पदवी मागावी? एम्. ए., एम्. एस्सी., एम्. कॉम., पीएच्. डी., डॉक्टर की इंजिनीअर? पण कल्पवृक्षाकडून मिळविलेल्या या पदवीचा आपण उपयोग करू शकू का? लोक विश्वास ठेवतील का आपल्यावर? डॉक्टर झालो तर आपण रुग्णांवर औषधोपचार करू शकू का? असे एक ना अनेक प्रश्नांचे मनात काहूर माजले, पण त्याच क्षणी माझे सुसंस्कारित मन आक्रंदून उठले. छे, छे; हे बरोबर नाही. कष्टाविना विदया साध्य होणे शक्य नाही. ती विदया, विदया नव्हेच, ते ज्ञान, खरे ज्ञानच नव्हे. कल्पवृक्षाजवळ काय मागावे? हा प्रश्न अदयापि सुटलाच नव्हता.


यापूर्वी होऊन गेलेल्या मोठमोठ्या लोकांनी काय मागितले होते त्याची मला आठवण झाली. मोरोपंतांनी देवाला प्रार्थिले, 'सूसंगती सदा घडो.' ज्ञानदेवांनी पसायदान मागितले-'जो जे वांच्छील, तो ते लाहो प्राणिजात.' मग आपण काय मागावे? कशी कोण जाणे, मला भोवतालची जाणीव झाली. सर्वत्र अंधार पडला होता. दूरवर येणारा माणसांचा आवाजही बंद झाला होता. बहतेक प्रदर्शन बंद झाले असावे. किर्रऽऽ असा रातकिड्यांचा आवाज येत होता. मी घाबरून पटकन कल्पवृक्षाखाली गेलो आणि म्हटले, “मला आता घरी पोहोचव." दुसऱ्या क्षणी मी माझ्या घरी होतो.


वरील निबंध मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

मी कल्पवृक्षाखाली बसतो तेव्हा मराठी निबंध | mi kalpvrushakhali basto tevha essay in marathi


आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध

आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi : स्वार्थाने बरबटलेल्या आजच्या समाजावस्थेत जेव्हा एखादा अगतिक माणूस आदर्श शोधत हिंडायला लागतो तेव्हा वर्तमानकाळात तर त्याची पूर्ण निराशा होणे स्वाभाविकच आहे. परंतु जेव्हा का तो गेल्या शतकाचा वेध घेऊ लागतो, तेव्हा त्याला हिमालयासारखी उत्तुंग अशी अनेक व्यक्तिमत्त्वे भेटतात आणि मग अशा या अगतिक माणसाचे मन "रितेच जीवन सारे। ही तहान सांगा केव्हा संपायची?' या विचाराने आक्रंदू लागते.अशा मानसिक संभ्रमावस्थेत असताना मनात येते, आज जोतिबा अवतरले तर.


जोतिबा आज अवतरले तर ते आनंदित होतील की खंतावतील? असा प्रश्न पडतो. ज्या स्त्री-शिक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर अट्टाहास केला ती स्त्री सुशिक्षित झालेली पाहन त्यांना आनंद होईल; पण त्याचबरोबर त्यांच्या डोळ्यांत पाणीही येईल. कारण स्त्रीवरचे अन्याय आजही संपलेले नाहीत. कारणे बदलली असतील; पण छळ तसाच चालू आहे. त्या काळी विधवा स्त्रीची मानहानी करून तिला घरातील विहिरीचा मार्ग दाखविला जात असे; तर आज स्त्रीला जिवंत जाळण्याच्या घटना घडताहेत.

Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi
Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi


ज्या दलितांच्या उद्धारासाठी जोतिरावांनी समाजाचा रोष ओढवून घेतला तो दलित तरी सुखी आहे का? जोतिबांनी आपल्या घरातील आड मुक्त करून या अस्पृश्यांची तहान भागविली; पण आज गावोगावी 'एक गाव एक पाणवठा' हा कार्यक्रम योजूनही खेडोपाडी हा अस्पृश्य अजूनही एका व्यापक अर्थाने तहानलेला आहे. आजही त्याची वस्ती गावकुसाबाहेरच आहे. 


जोतिराव आजअवतरले तर त्यांना आढळेल की, त्यांच्या मागणीनुसार आज शासनाने या मागासलेल्या लोकांना अनेक सवलती दिल्या आहेत, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध केल्या आहेत; पण त्यांनी हा हरिजन सुखी झाला आहे का? सुशिक्षित झाला आहे का? नाही. फार थोड्या संख्येने तो साक्षर झाला आहे आणि जे शिकलेसवरले आहेत ते आपल्या समाजासाठी काही करीत आहेत का? याचा विचार केला तर निराशाच पदरी पडेल.बहुसंख्य दलित अजूनही जुन्या संस्कारांच्या, रूढींच्या पिंजऱ्यातच बंदिस्त आहेत.



जोतिबांना त्यांच्या 'शेतकऱ्याचा असूड' खेड्यातील भिंतीवर दिसेल. पण त्यांच्या कल्पनेतील खेडी तेथे आढळणार नाहीत. बहुतेक खेडी ओस पडलेली दिसतील. हा जमिनीचा पुत्र पोटार्थी होऊन शहरात गर्दी करताना त्यांना आढळेल. शेतकऱ्यांतही जोतिबांना एक नवा अपरिचित वर्ग आढळेल. तो म्हणजे 'सधन शेतकरी'. जोतिरावांच्या हयातीत या वर्गाचा उदय झाला नव्हता. शेतमजूर मात्र पूर्वीपेक्षाही अधिक दरिद्री झालेला त्यांना आढळेल पुण्याच्या बाजूला हिंडताना मात्र त्यांना आपल्या सावित्रीचे आगळे स्मारक दिसेल आणि ते म्हणजे 'सावित्रीबाई फुले दत्तक योजना'. 


गरीब घरांतील विदयार्थिनींच्या शिक्षणाची झालेली ती सोय पाहुन जोतिबांना गदगदून येईल. सावित्रीच्या श्रमाचे चीज झाले, या विचाराने ते आनंदित होतील आणि मग जोतिबा एक अर्ज लिहितील. कोणाला माहीत आहे? प्रत्यक्ष त्यांच्या निर्मिकाला-भगवंताला. कशासाठी? स्वर्गवासाची सुट्टी घेऊन ते भूलोकावर वास्तव्याला येतील आणि पुनश्च आपल्या कामाला लागतील.

वरील निबंध आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

आज जोतिबा अवतरले तर मराठी निबंध | Aaj Jyotiba Avtarle Tar Essay In Marathi

 माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक Manus Amar Zala Tar Essay In Marathi

निबंध 1 
माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक Manus Amar Zala Tar Essay In Marathi:  माझा छोटा भाऊ विचारीत होता, “दादा, देवांना 'त्रिदश' का म्हणतात?" मी म्हणालो, "अरे, त्यांना माणसांसारखी चौथी वार्धक्यावस्था नाही.देव कधी मरत नाहीत." म्हणजे देव अमर आहेत. “देवांप्रमाणेच माणसे अमर झाली तर " त्याने प्रश्न निर्माण केला.


 खरोखर, देवांना मिळालेली संजीवनीची कुपी माणसापर्यंत आली तर? नाहीतरी आज माणसाचे त्या दिशेने प्रयत्न चालू आहेतच. रक्तदान, मूत्रपिंडदान असे अवयव दान करून, अवघड शस्त्रक्रिया पार पाडून आणि प्रभावी औषधोपचार करून तो माणसाला मृत्यूच्या दारातून मागे फिरवितो. आज माणसाची आयुर्मर्यादा वाढली आहे आणि मृत्युसंख्या घटली आहे; तरीपण मानव मृत्यूवर पूर्णपणे मात करू शकलेला नाही. आजही माणूस मर्त्य आहे. अशा या मानवाला संजीवनी गवसली तर....


Manus Amar Zala Tar Essay In Marathi
Manus Amar Zala Tar Essay In Marathi

तर प्रथम ज्याच्या हातास ती संजीवनी-अमृत-गवसेल तो लक्षाधीश, कोट्याधीश होईल. मग या अमृताचा काळाबाजार' होईल. कारण कोणतीही गोष्ट अदृश्य करून तिचा काळाबाजार करण्यात माणस मोठा पटाईत आहे. मग या अमृतातही भेसळ होईल व थोड्याच दिवसांत या अमृताची नक्कल केलेले कृत्रिम अमृतही बाजारात अवतरेल.

विचार करण्याचा मुद्दा असा आहे की, माणसाला अमृत गवसल्याने तरी त्याचे दुःख संपेल का? तो सुखी होईल का? होईल, कारण त्याला त्यामुळे आपल्या प्रिय माणसांचा वियोग होणार नाही. एक-एक कुटुंब म्हणजे पारंब्या फुटलेला मोठा वटवृक्षच होईल. पण यामुळे मात्र समाजाला नको असलेली दुष्ट माणसे देखील अमर होतील की! असे घडले तर मात्र माणसे सुखी होण्याची शक्यता कमीच. 


शिवाय 'अतिपरिचयात् अवज्ञा' या उक्तीनूसार अमरत्व प्राप्त झालेली ही माणसे एकमेकांचा दुस्वास करू लागतील. शिवाय या अनुषंगाने विचार करता, दोन पिढयांतील विचारांचे अंतर हीसुद्धा एक चिंतेची बाब ठरेल. आज अनेक घरांतून, समाजांतून अनेक त-हेचे वाद निर्माण झाले आहेत. माणसे अमर झाली तर हे पिढीतील विचारांचे अंतर फारच वाढेल. कुटुंबात, समाजात तीन-चार पिढ्या आढळतील. मग वादांना काय तोटा?



माणसाला अमरत्व प्राप्त झाले की, लोकसंख्या बेसुमार वाढणार आणि वाढत्या बेकारीचा प्रश्न 'आ' वासून उभा राहणार. आजही आपल्या देशापुढे बेकारीची समस्या आहेच, त्यामुळे मग माणसे अमर झाली तर हाहाःकारच उडेल. अन्नधान्य, पाणी, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपल्याला आपल्या सवयी बदलाव्या लागतील. कदाचित या सर्व गरजा भागविण्यासाठी वैयक्तिक मालकी हक्काला राष्ट्रीय संपत्तीचे स्वरूप दयावे लागेल. प्रयोगशाळांना शरण जावे लागेल आणि निसर्गनिर्मित संपत्तीला मानवनिर्मितीची जोड दयावी लागेल.



 आपण अमर आहोत असे एकदा सिद्ध झाले की, माणसातील साहसी वृत्तीला उधाण येईल. चंद्राबरोबर इतर ग्रहांवर जाण्यासाठीही माणूस पुढे सरसावेल. धाडसी स्पर्धांना ऊत येईल. पण येथे एक धोकाही संभवतो. मरण नाही म्हटल्यावर पुनर्जन्माची कल्पना नष्ट होईल. त्याबरोबरच पापपुण्याचा निवाडा होण्याची कल्पनाही लोप पावेल. त्यामुळे माणूस दुष्कृत्ये करताना कचरणार नाही, ऐहिक जीवनात गुंतलेला असताना तो अध्यात्माचा विचार करणार नाही आणि मग मानवी जीवन क्षुद्र बनेल



या साऱ्या विचारांत एक धोका आपण विसरलो आणि तो म्हणजे माणूस अमर झाला तरी तो अजर होणार का? तसे नसेल तर माणसाला हे अमरत्व नकोसे होईल. जखमेची वेदना घेऊन शोकाकूल अवस्थेत फिरणारा चिरंजीव अश्वत्थामा आपल्या परिचयाचा आहेच. त्याला आपले चिरंजीवित्व नकोसे झाले होते. त्याप्रमाणेच माणसाची अवस्था होईल व तो देवाकडे गा-हाणे घालील, “देवा, सोडव रे बाबा आता या यातनांतून, लवकर मरण येऊ दे."

वरील निबंध माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद
धन्‍यवाद

निबंध 2  


पुराणकालीन कथांमध्ये देवदानवांनी अमृतमंथन केले आणि त्यातून अमृताचा कलश बाहेर काढला. त्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. अखेरीस देवांच्याच युक्तीने 'मोहिनी' रूपात आलेल्या श्रीविष्णूने ते देवांना मिळवून देण्याचा प्रयत्न केला तो यशस्वी झाला अन् सारे देव अमर झाले. ही कथा ऐकत असताना माझ्या दहा वर्षांच्या भावाने मला प्रश्न विचारला. "दादा तसे ते अमृत आपल्याला मिळाले तर ? आपले आजी-आजोबा, बाबा-आई, तू-मी सर्वजण अमर होऊन जा ना ! आपण अमर झाल्यावर काय मज्जा येईल नाही !"

भावाच्या या प्रश्नाने माझी मात्र झोप उडाली. अहो, खरोखरच जर हा 'अमृताचा कलश' या माणसांपर्यंत आला आणि माणसे अमर झाली तर ? आज आपण पाहतोय काळ बदलतोय... नवीन नवीन शोध लागताहेत. औषधे, इलाज, शस्त्रक्रिया या मोठ्या प्रमाणात होताहेत आणि त्या यशस्वी होताहेत. प्रभावी गुणकारी औषधोपचाराने माणूस आज मृत्यूच्या दारातून अनेकवेळा परत आला आहे. त्याची आयुर्मर्यादा वाढली आहे, तरी पण 'मृत्यू' कुणाला टळलेला नाही. माणूस हा मर्त्य आहेच. आणि मग अशा माणसाला ही 'संजीवनी' मिळाली तर...


प्रथम या 'अमृताचा'च काळाबाजार वाढेल, भ्रष्टाचार वाढेल. सर्वजण लक्षाधीश, कोट्यधीश होतील. अमृतातही भेसळ होईल आणि पुढे तर कृत्रिम अमृतही बनवले जाईल. पण माणसाला अमर झाल्यानंतर त्याची दुःखे संपतील का? एकमेकांतील भांडणतंटे-दुरावा-दुःस्वास-स्पर्धा या थांबतील का ? नाही ! उलट आयुष्यमान वाढल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अतिरेक होईल. अंदाधुंदी माजेल, बेबंदशाही आणि हाहाकार निर्माण होईल. प्रेम-भक्ती अशा भावनांचा अंत होईल.


दुसरीकडे अमृत गवसल्याने लोकसंख्या प्रचंड वाढेल त्याबरोबर खाणारी तोंडे... म्हणजेच पुन्हा बेकारीची समस्या, पृथ्वीतलावर असलेल्या 'अन्न-पाणी-हवा' या मूलभूत गरजा भागविता येणार नाहीत... त्यासाठी पुन्हा सुंदोपसुंदी वैयक्तिक संपत्ती म्हणून मानव ते जमा करू लागेल. आणि प्रिय माणसांचा वियोग होणार नाही, ही गोष्ट धरली तरी 'अति परिचयात् अवज्ञा' ही उक्ती खरी होईल. पिढ्या वाढत जातील. विचारांची रेलचेल होईल. एक घर, एक समाज, एक देश अशा मर्यादा न राहता अविचारांचाच धुमाकूळ सुरू होईल.

सध्या सुद्धा तीन-चार पिढ्या झाल्या तरी त्यांच्यात ऐक्य टिकणे कठीण आहे, तर मग ही अफाट नाती, या अनेक पिढ्या यांचे काय होणार ? महाभारतातील 'यादवी' आठवते ना? तशीच ती सुरू होईल. माणसे माणसांना मारतील. राहायला जागा राहणार नाही.


माणसांच्या साहसीवृत्तीचा-त्यांच्या बुद्धिमत्तेचा ही विचार करायला लागतो तर त्यांना हे ब्रह्मांड कमी पडेल. कल्पनांच्या भराऱ्या आकाशपाताळ एक करतील. त्यामुळे पुन्हा सर्व गोष्टी विनाशाकडेच वळतील. पुनर्जन्म-पापपुण्य, कल्याण, सुखदुःख या गोष्टींचा नामोनिशाण राहणार नाही. मानवी जीवनाचे महत्त्वच नाहीसे होईल, तो क्षद्र होऊन जाईल आणि अखेर पुन्हा त्या पुराणकथेतील अमरत्व प्राप्त झालेल्या अश्वत्थामा आठवू लागेल.


तोही त्याच्या चिरंजीवत्वाला कंटाळला. जखमेच्या वेदना घेऊन शोकाकूल होऊन अखंडपणे नाहक भटकत राहिला. हे सर्व आठवल्यावर वाटते, "नको रे बाबा ते अमरत्व, आणि त्या यातना, फक्त हे ईश्वरा, अमर असे कल्याणकारी काम मात्र आमच्याकडून करून घे. एवढेच मागणे." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

माणसे अमर झाली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Manus Amar Zala Tar Essay In Marathi

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh आज आपण पावलोपावली यंत्रांवर अवलंबून असतो. ही यंत्रे आता आपल्या नित्य व्यवहारात एवढी एकरूप झाली आहेत की ती यंत्रे आहेत व त्यांच्याविना आपले अडेल हे आपल्याला उमगतही नाही. कळले तरी वळत नाही. मग अनेकदा आपण त्या यंत्रांना अतिशय निष्काळजीपणे वागवतो. एकदा काय झाले, ही यंत्रे रागावली आणि त्यांनी आपली संघटना स्थापन केली. या संघटनेने संपाचा आदेश दिला. एका मध्यरात्री सारी यंत्रे संपावर गेली. मग जो गोंधळ उडाला तो काय वर्णावा!



सकाळी नेहमीप्रमाणे घड्याळाने आपला गजरच केला नाही. त्यामुळे सर्वांना जाग आली ती उन्हं वर आल्यावरच. धावत धावत आई नळाजवळ गेली; पण नळातून एक थेंबही पाणी येत नव्हते. घरातला फ्रीज बंद पडला होता. रेडिओ बोलत नव्हता. पंखा फिरत नव्हता. घराबाहेर आलो तर लिफ्टही चालत नव्हती. सगळेजण हवालदिल झाले. रोज सकाळी सकाळीच वृत्तपत्रे वाचायची सवय. सवय कसली, व्यसनच म्हणा ना! पण आज त्या वृत्तपत्रांचाही पत्ता नव्हता.



रस्त्यावर एकही गाडी धावत नव्हती. बस नाही, स्कूटर नाही, साधी सायकलही नाही. रस्त्यावर फक्त दिसत होती माणसेच माणसे. सारीच गोंधळून गेलेली. हे काय आहे? असे कशामुळे झाले? जरा चौकशी करा, वृत्तपत्रांकडे विचारा. पोलिसांना कळवा. कुणीतरी कल्पना काढली . फोन करा, फोन उचलला गेला, पण त्यातून कसलाच आवाज आला नाही. फोनही बंद. आता पायी चालण्याशिवाय पर्याय नव्हता. लोक हिंडू लागले, अदमास घेऊ लागले.

yantra sampavar geli tar marathi nibandh
yantra sampavar geli tar marathi nibandh


नेहमी यावेळी गजबजलेली स्टेशने आज शांत होती. म्हणजे माणसे जा-ये करीत होती; पण गाड्याच धावत नव्हत्या. 'पूतळ्याच्या' खेळातल्याप्रमाणे त्या जागच्या जागी उभ्या होत्या. बेकरीत ब्रेड नव्हता. मार्केटात भाजी नव्हती. शहरातील सारे जीवन विस्कळीत झाले होते. पाण्याच्या अभावामुळे लोकांच्या तोंडचे पाणी पळाले होते.
सहज एका रुग्णालयात डोकावलो, तेथे तर हाहाकार उडाला होता.


 यंत्रे थांबल्यामुळे शल्यविशारद शस्त्रक्रिया पार पाडू शकत नव्हते. त्यामुळे रोग्यांचे विलक्षण हाल होत होते. पंखे फिरत नव्हते. रक्त, सलाईन देता येत नव्हते. एका कमी वजनाच्या बाळाला दिवे लावून विशिष्ट उबेत ठेवले होते. पण तो दिवाच बंद पडला होता. त्यापेक्षा शोचनीय गोष्ट म्हणजे-एका हृदयविकाराच्या रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छ्वासाचे यंत्र लावून ठेवले होते, ते यंत्र बंद पडल्याने तो रोगी गतप्राण झाला होता!  



सारे वातावरण बेचैन, अस्वस्थ होते. यंत्रविशारद यंत्रांशी झगडत होते; पण यंत्रे चालूच होत नव्हती. अशा अस्वस्थ वातावरणात दिवस तर संपला. यंत्रे चालू होत नव्हती; पण आकाशातील सहस्ररश्मीचे यंत्र मात्र व्यवस्थित चालु होते. ठरलेल्या वेळी भास्कर अस्ताचलावर गेला आणि सर्वत्र काळोख पडला. नेहमी विजेच्या दिव्यांनी झगमगणारे ते शहर! पण त्या दिव्यांनीही असहकार पुकारला होता. त्यामुळे सर्वत्र पणत्या, मेणबत्त्या तेवत होत्या. या शहरातील लोकांचे आज प्रथम लक्ष गेले ते आकाशातील चंद्राकडे व चांदण्यांकडे. पण तरीसुद्धा पृथ्वीवरचा काळोख नकोसा झाला होता. शेवटी मानवी उपाय संपल्यावर सर्वांना आठवण झाली ती दैवी उपायांची.



सर्वधर्मीय मानवांनी शहरातील मोठ्या पटांगणावर येऊन यंत्रांची क्षमा मागितली यंत्रदेवाला विनविले, “या पामरांना माफ कर आणि यंत्रांची चक्रे सुरू कर. यंत्राविना माणूस अपूर्ण आहे." यंत्रजगतात खळबळ उडाली, विचारविनिमय झाला. दिली तेवढी शिक्षा बस झाली असा विचार एकमताने ठरला आणि यंत्रांनी संप मागे घेतला. कारण अखेरीस मानवच त्यांचा जन्मदाता होता. दिवे लागले, पंखे फिरू लागले, नळांना पाणी आले, सर्वत्र आनंदीआनंद झाला.


वरील निबंध यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

यंत्रे संपावर गेली तर मराठी निबंध कल्‍पनात्‍मक | Yantra Sampavar Geli Tar Marathi Nibandh

सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध 
Essay on sun in marathi
Surya Ugavala Nahi Tar Essay in Marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सूर्य उगवला नाही तर मराठी निबंधबघणार आहोतसुर्य उगवला नाही तर असा विचारही करणे आपल्‍यासाठी कठीण आहे. कारण जसे मानवाला अन्‍नवस्‍त्रनिवारा या मुलभुत गरजा आहेत त्‍यासोबतच सुर्याचीपण नितांत आवश्‍यकता आहे.ते खालील निबंधावरून समजुन घेता येईल.

 दहावी - बारावी इयत्तेतील विदयार्थ्यांचे जे काही हाल होतात, ते अन्य लोकांना समजणे अशक्यच आहे. ज्यांना हे समजून घ्यायचे असतील, त्यांनी या दहावीबारावीच्या परीक्षेला बसून बघावेच ! सुखाची झोप टाकून पहाटे पहाटे उठणे, पेंगुळणाऱ्या डोळ्यांनी अभ्यासाला बसणे, धावत-पळत क्लासला जाणे. पुन्‍हा घुऊन येऊन गृहपाठ . मग शाळेत जाणे,  

शाळेतून आल्यावर पुन्हा क्लासला जाणे, घरी आल्यावर पुन्हा अभ्यासाला बसणे व रात्री उशिरापर्यंत सराव प्रश्नपत्रिका सोडवायला बसणे या रहाटगाड्यात अक्षरशःआम्ही पिळून निघतो ! सकाळी जबरदस्तीने उठताना वाटते - हा सूर्य उगवला नाही तर किती बरे होईल ! सगळी पीडा नाहीशी होईल ! 

खरेच सांगतो, माझ्या मनात अनेकदा हा विचार येतो - सूर्य उगवला नाही तर ? तर... सगळी मज्जाच मज्जा ! मग सकाळी उठायची कटकट नसेल. हवे तितके मनसोक्त झोपता येईल ! उठल्यावरही कसली घाई नसेल. शाळेत जाण्याची धावाधाव नसेल. मनसोक्त टी. व्ही. पाहता येईल. पत्ते, कॅरम हे खेळ भरपूर खेळता येतील.

अमूक वाजले; आता हे करा; तमूक वाजले; आता ते करा. असल्या जाचातून मुक्तता होईल. सूर्यच नसल्याने घामाच्या धारा नसतील आणि कडाक्याच्या उन्हाळ्याने हैराण व्हावे लागणार नाही ! 

surya-ugawala-nahi-tar-essay-in-marathi
surya-ugawala-nahi-tar-essay-in-marathi
कडक उन्हाळाच नसल्याने नदी-नाले-विहिरी आटण्याचा प्रश्नच येणार नाही. मैल मैल अंतरावरून पाण्याचे हंडे वाहून आणण्याचे काबाडकष्ट करावे लागणार नाहीत. दिवसच नसल्याने सगळ्यांची कामाची ठिकाणे जवळच असतील. दूर दूर अंतराच्या प्रवासाची दगदग संपलेली असेल. आई-बाबा खूप वेळ घरी असतील... आणि आमच्या गावाकडची मजा तर काय विचारूच नका... सतत पांढरेशुभ्र चांदणे ! किती किती फायदे !

मी मात्र त्याच वेळी माझे दुसरे मन मला सावध करू लागले - खरेच का, सूर्य नसेल तर फक्त मजाच असेल? थोडा वेळ विचार करताच भविष्यातील एकेक बाब डोळ्यासमोर साकार होऊ लागली. भीतीदायक विचारांचे मोहोळच उठू लागले. सूर्य उगवलाच नाही, तर शाळा नसेल, हे वरवर ठीक वाटते. पण शाळेत मिळणारा केवढा आनंद आयुष्यातून वजा होईल ! 

मित्र नसतील, मग मित्रांबरोबर संध्याकाळचे भटकणे कसे घडेल? मित्रांबरोबरची सगळी धमालच नष्ट होईल ! मैदानावर कधी मनसोक्त खेळताच येणार नाही ! कायम घरात नि घरात ! टी. व्ही., पत्ते, कॅरम किती वेळ चालणार? अंथरुणात लोळत तरी किती वेळ राहणार? 

सूर्य उगवलाच नाही तर शाळा नसतील; म्हणून ज्ञानाचे मार्ग बंद होतील. मग मानवाने आजवर साधली तशी प्रगती कुठे असेल? विविध सेवा पुरवणारी कार्यालये नसतील; कारखाने व उदयोगधंदेही नसतील; म्हणजे नोकऱ्या नसतीलच. मग पैसे कुठून येतील? खाणार काय?

सूर्य नसल्यामुळे सगळीकडे काळोख असेल. फक्त काळा रंग ! मग वसंत ऋतूतील विविधरंगी फुलांच्या सौंदर्याचे वैभव व श्रावणातील लावण्यवती सृष्टी यांचा आस्वाद कसा घेणार? आयुष्यातून सगळे रंग हद्दपार होतील ! सूर्योदय व सूर्यास्त या क्षणांचे दर्शन घेण्याचे सुख कायमचे निघून जाईल !

एक वेळ सर्व ठीक मानता येईल. पण खाणार काय? ऊन नाही म्हणून पाऊस नाही. म्हणून शेती नसेल. मग अन्नधान्य कसे मिळेल? मुख्य म्हणजे सूर्यप्रकाश हा सर्व वनस्पतींचा जीवनाधार. सूर्य नसेल तर, म्हणूनच वनस्पती-सृष्टीही नसेल. अशा स्थितीत प्राणी, मानव इतकेच कशाला कोणताही सजीव कसा काय जगु शकेल ? म्ह णजे पृथ्वी  फक्ता मातीचा एक निर्जीव गोळा बनेल. आपण कोणीच अस्तित्वा‍त नसणार ! 

नको रे बाबा ! सूर्य न उगवण्यााची कल्पनाच नको. तो आपल्याप सर्व सजीवांचा जीवनदाता आहे. तो हवाच . ओम सूर्यनारायणाय नम : 

निबंध 2

सूर्य संतापला, तर... मराठी निबंध 

सूर्यसंतापला, तर... मराठी निबंध : जगात माणसाला नेहमी स्वत:च्या कर्तृत्वाचा फार गर्व असतो. 'हे मी केलं, ते मी केलं,' असे तो मोठमोठ्याने ओरडून सांगतो आणि त्यावेळी आपण खरोखरी किती परावलंबी आहोत, याचा त्याला विसर पडतो.

आता सूर्याचीच गोष्ट पाहा ना! भगवान सूर्यदेव आहेत म्हणून पृथ्वीतलावरील प्राणी जगू शकतात. सूर्यापासून आपल्याला प्रकाश व उष्णता मिळते. पण सूर्य आपल्याला देत असलेल्या सर्व गोष्टींची महती अतिपरिचयाने आपल्याला वाटेनाशी होते. समजा हाच सर्वदायी सूर्य आपल्यावर रागावला तर... आणि आकाशात उगवलाच नाही, तर ...

तर सर्वत्र काळोख पसरेल. चोवीस तास रात्रच रात्र. काही दिवसांनी वातावरणातील उष्णता संपेल आणि अतोनात थंडी वाजू लागेल. सूर्य उगवलाच नाही तर रोगराई वाढेल, झाडांची वाढ खुंटेल. सूर्य नाही तर, पाण्याची वाफ कशी होणार? वाफ नाही तर पाऊस कसा पडणार?

माणसांनो, तुमच्यास वागण्यातील भोंदूपणाचा आम्हांंला उबग येतो. इतर वेळी आमच्यााशी निष्ठुशरपणे वागणारे तुम्ही  वनमहोत्स‍वाच्या‍ निमित्तायने दोन-चार दिवस आमचे कौतुक करता. तुमच्याातील काही विद्वान कवी आमच्यामवर कविता करतात. पण तुमच्या दांभिक वागणुकीचा वीट येऊन आम्ही आता तुमच्या्शी बोलण्यावचे सोडुन देणार आहोत. असे सांगून झाडे कायमची गप्पद झाली. 

निबंध 3

 सूर्य उगवला नाही तर 

'राजू, ऊठ लवकर. शाळेत नाही जायच का?' आईने नेहमीप्रमाणे उठवायला सुरुवात केली. 'होय ग, उठतो पाच मिनीटांत' म्हणत मी परत पांघरुण ओढले, माझ्या मनात आले काय ही रोज सकाळी शाळेची कटकट आहे. त्याऐवजी सूर्य उगवलाच नाही तर? काय हरकत आहे? डॉक्टर संपावर जाऊ शकतात, कामगार संपावर जाऊ शकतात मग सूर्य संपावर गेला तर काय बिघडले?


काय मज्जा येईल नाही? रोज सकाळी आई उठवणार नाही. शाळेत जायला लागणार नाही. शाळा नाही म्हणजे परिक्षा नाही आणि परिक्षा नाहीत म्हणजे निबंध लेखनही नाही. दिवसभर, नव्हे रात्रभर गादीत लोळायला मिळेल. खेळायला मिळेल. उन्हाळ्यात उकाड्याने जीव हैराण होणार नाही. आपले सगळयांचे वेळापत्रक कोलमडेल. 


अरे! पण सूर्यच नसला तर पाऊस तरी कसा पडेल? कारण उष्णता नसल्याने पाण्याची वाफ होणारच नाही. झाडे आपले अन्न तयार करु शकणार नाही. मग आपल्याला अन्न कसे मिळेल? फळ नाहीत, धान्य नाही तर मग आपण खाणार काय? पृथ्वीचे तापमान एकदम खाली येईल. प्राणवायु  मिळणार नाही. सौर उर्जेवर चालणाऱ्या  यंत्रांचा उपयोग करता येणार नाही.


पृथ्वीवर नेहमीच अंधार असेल. प्रकाशासाठी आपल्याला कायम लाइट, बल्ब लावावे लागतील. मग इलेक्ट्रिसीटीचे बिल किती वाढेल! चोरांची तर मज्जाच होईल. काम व्यवसायानिमित्त लोक बाहेर कसे पडतील? काम नसल्यामुळे आपण आळशी होऊ. सूर्य नाही म्हणजे चंद्र नाही की चांदण्या नाही. मग चांदण्या रात्रीची, कोजागिरी पोर्णिमेची मजा कशी लुटणार? म्हणजे आपले जीवन अगदी निरुत्साही, निरस बनेल. नुसता विचार करुनही माझा थरकाप उडाला.

आपण सूर्याला देव का मानत आलो आहोत हे लक्षात आले. अशा या सूर्यदेवाने संपावर जाण्याचा विचारही करु नये म्हणून मी त्याचीच प्रार्थना करु लागलो.

टीप : वरील निबंध सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • autobiography of sun in marathi
  • atmakatha of sun in marathi
  • surya information in marathi
  • surya che mahatva in marathi
  • surya chi atmakatha in marathi
  • marathi nibandh surya
  • surya ugavala nahi tar short essay in marathi

सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध