चिंतनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चिंतनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 3निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. हुंडा पद्धती म्हणजे समाजातील लोभिष्ट् स्वभावाच्या  माणसाच्या  वाईट मनोवृत्तीचा आरसा  आहे. तसे तर हुंडाबळी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारा विषयीच्या बातम्या आपण वृत्तपत्र, टीव्ही व इंटरनेटच्या् माध्यमातून दररोज पाहतो. 


या निबंधामध्ये आपण याविषयी चर्चात्मक व चिंतनात्मक स्वरूपाने विश्लेषण करणार आहोत. हुंडा प्रथेबद्दल समाजाची असणारी मानसिकता व हुंडाबळी कायद्यात असलेल्या  कमतरता याविषयी सविस्तर वर्णन आपण करणार आहोत चला तर मग निबंध लेखनाला सुरुवात करुया. यामध्ये  एकूण दोन निबंध देण्यात आहे 

रस्त्यात एका घरासमोर बरीच गर्दी दिसली. आणि या गर्दीचे वैशिष्ट्य म्हणजे या गर्दीत सर्व स्त्रियाच होत्या. कुतूहलाने मी जवळ गेलो. एका प्रशस्त बंगल्यासमोर त्या निदर्शने करीत होत्या. कोणावर अन्याय घडला होता याची चौकशी करता कळले की, त्या घरातील गृहलक्ष्मीनवागत सून ही हुंडाबळी ठरली होती. त्यासाठी 'नारी समता मंचा'च्या त्या स्त्रिया त्या कुटुंबातील लोभी माणसांची छीःथू करीत होत्या. मनात विचार आला की, या आलिशान बंगल्यातील मंडळींना अधिक धनाची इतकी हाव का सूटावी? मोठया थाटामाटात विवाह करून सासरी आणलेल्या आपल्या सूनेचा बळी त्यांनी धनासाठी का घ्यावा?


आपल्या भारतात आर्थिक विषमता फार मोठ्या प्रमाणात आहे. एका बाजूला गडगंज संपत्ती असणारे भांडवलदार आहेत; तर दुसऱ्या बाजूला अन्नाची भ्रांत असणारे लक्षावधी गरीब आहेत. एका बाजूला उंच उंच आलिशान इमारती आहेत, तर दुसऱ्या बाजूला हीनदीन झोपडपट्ट्या आहेत. अशा या दोन परस्परविरोधी समाजांत एका बाबतीत मात्र साम्य आहे आणि ती बाब म्हणजे 'हुंडाबळी'.


श्रीमंतांकडे ज्याप्रमाणे हुंड्यासाठी बळी पडतात, त्याप्रमाणे गरिबांच्यातही हुंड्यामुळे खून केले जातात. हुंड्याचे हे जहर आज पिढ्यान्पिढ्या आपल्या समाजात भिनले आहे. त्यामुळे मुलगी झाली की आईवडिलांच्या काळजाचा ठोका चुकतो. मुलीला जन्म देणाऱ्या स्त्रीकडे उपेक्षेने पाहिले जाते. कित्येक गरीब घरांतून तर या हुंड्याच्या रूढीपायी कित्येक मुली अविवाहित राहतात.


Hunda Ek Samajik Samasya essay in marathi
Hunda Ek Samajik Samasya essay in marathi


आपल्याला असे वाटत होते की, जग जसे प्रगत होईल, शिक्षणाचा जसा प्रसार होईल तसा हा हुंड्याचा फास कमी होईल; पण आपली ही आशा फोल ठरलेली दिसत आहे. आज शहरांतून तरी शिक्षणाचा खूप प्रसार झाला आहे. मुली पदवीधर झाल्या आहेत. स्वतः नोकरी करून पैसे मिळवू लागल्या आहेत. तरी पण लोकांची हुंड्याची हाव काही सुटली नाही. उलट सध्या हुंडा वेगवेगळ्या स्वरूपांत समोर येतो. वरदक्षिणा, दागदागिने, मानपान, राहण्याची जागा, वाहन, टी व्ही., फ्रीज अशा विविध रूपांत हा हुंडारूपी भस्मासूर अवतरतो. जो ज्यांच्या अंगी संचारतो ते आपल्यातील माणूस हरवून बसतात आणि शेवटी त्यात नवपरिणित मुलीचा बळी घेतला जातो. 


या हुंडापद्धतीला आळा कसा घालायचा? वास्तविक १९६१ पासून आपल्याकडे हुंडाप्रतिबंधक कायदा लागू झाला आहे. पण हा कायदा अपुरा पडतो. त्यातून अनेक पळवाटा निघतात. हुंडा घेण्याचा गुन्हा करणाऱ्यांना त्या. फार सौम्य शासन आहे. म्हणून कायदयात सुधारणा करण्याचे खूप प्रयत्न चालू आहेत. पण येथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की, या गोष्टी कायदयाने अमलात येतील का? 


खरे म्हणजे त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन आवश्यक आहे. समाजपरिवर्तन व्हायला हवे, पण हे कोण करणार? काही महिला संघटना आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. पण या प्रश्नातले एक कटू सत्य असे की, बहुसंख्य हुंडाबळी प्रकरणांमध्ये सासू, नणंद अशा स्त्रियाच कारणीभूत ठरलेल्या दिसतात. मग सांगा आता काय करावे?


निबंध 2

महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • एखादया प्रसंगातून प्रस्तावना
  • या दुष्ट प्रथेची परंपरा
  • 'वरदक्षिणा' 
  • 'स्त्री'ला कमी लेखणे
  • आज स्त्रीने पुरुषाची बरोबरी केली. 
  • शिक्षण, अर्थार्जन सर्व बाबतींत स्त्री पुढे
  • हुंड्याचे दुष्परिणाम
  • विवाह म्हणजे मनोमीलन

आमच्या ताईचे लग्न जमले होते. खरे पाहता, ही किती आनंदाची गोष्ट; पण मला आईबाबांच्या चेहऱ्यावर काळजीच दिसत होती. असे का? मला पडलेला हा प्रश्न मी कोणाला विचारणार? हळूहळू मला अंदाज आला की, काहीतरी पैशांची अडचण असावी. ताईच्या सासरच्या लोकांची आमच्याकडून खूप मोठ्या रकमेची अपेक्षा होती आणि त्याचेच आईबाबांना ओझे झाले होते. या प्रसंगामुळेच प्रथम माझी 'हुंडा' या शब्दाशी ओळख झाली आणि मग वरचेवर तो भयसूचक शब्द माझ्या कानी पडू लागला, वाचनात येऊ लागला.


 'हुंडा' ही आपल्या समाजातील खरोखर एक दुष्ट प्रथा आहे. या प्रथेची मुळे पुरातन काळापासून आढळतात. बहुधा हुंडा हा वरपक्ष वधूपक्षाकडून हक्क म्हणून वसूल करतो. फारच थोड्या जातींत मुलाकडून मुलीला हुंडा दिला जातो. पूर्वी या हुंड्याला 'वरदक्षिणा' या गोंडस नावाने गौरवले जात असे. आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीला कमी लेखले जात असे आणि या कमीपणाची भरपाई हुंड्याने केली जात असे.


आज स्त्रीने हे सिद्ध केले आहे की, ती कोणत्याही बाबतीत पुरुषापेक्षा कमी नाही. आज मुली भरपूर शिकतात. कुठलाही सुविदय पुरुष सुशिक्षित स्त्रीचीच पत्नी म्हणून निवड करतो. म्हणजे शिक्षणाचा खर्च दोघांनीही केलेला असतो.


आज बहुतेक स्त्रिया अर्थार्जन करत असतात. म्हणजे आपल्या संसाराची आर्थिक जबाबदारीही त्या उचलत असतात. त्याशिवाय घर, कुटुंब आणि अपत्ये यांसाठीही घरातील स्त्री सतत कष्ट उपसत असते. अशा परिस्थितीत तिच्या जन्मदात्यांकडून धनाची वा इतर भेटींची अपेक्षा करणे हे फार दुष्टपणाचे लक्षण आहे.
आज 'हुंडा' या दुष्ट प्रथेचे अनेक दुष्परिणाम आपल्याला अधूनमधून दिसून येतात. मुलीच्या सासरच्या लोकांकडून वारंवार अनेक मागण्या झाल्यामुळे कित्येक विवाहित मुली आत्महत्या करतात. कित्येकदा हुंड्याच्या हव्यासासाठी सुनेला जाळण्यापर्यंत सासरच्या माणसांची मजल जाते.

वरपक्षाकडून होणाऱ्या हुंड्याच्या मागणीमुळे कित्येक गरीब घरातील मुलींचे विवाहच होत नाहीत. त्यामुळे मुलीचा जन्म हा मातापित्याला संकटच वाटू लागतो. काही समाजात मुलींना जन्मतःच मारले जाते, तर काही ठिकाणी मुलीचा जन्मच नाकारला जातो. हे खरोखरच दुःखदायक आहे. खरे तर स्त्री व पुरुष हे समाजाचे दोन आधारस्तंभ आहेत, दोन पाय आहेत. एक पाय आपण कमकुवत ठेवला, तर लुळापांगळा समाज प्रगती करू शकेल काय?

खरे पाहता, हुंड्याला कायदयाने बंदी आहे, पण आपल्या समाजात कायदा गुंडाळून ठेवून अनेक पळवाटा काढल्या जातात. तेव्हा ही दुष्ट प्रथा कायदयाने बंद होणार नाही. त्यासाठी समाजप्रबोधन व्हायला हवे. प्रत्येक मुलाने व प्रत्येक मुलीने 'मी हुंडा घेणार नाही' किंवा 'मी हुंडा देणार नाही' अशी प्रतिज्ञा केली पाहिजे आणि त्यानुसार आचरणही केले पाहिजे. तरच या अनिष्ट प्रथेला कायमचा पायबंद बसेल. तो सोन्याचा दिवस लवकर येवो.

मित्र-मैत्रिणींनो तुमच्याा मते समाजाची मानसिकता बदलण्यासाठी काय उपाययोजना केली पाहीजे व हुंडा बळी कायद्यात काय आवश्यक बदल केले गेले पाहीजेत ते तुम्ही कमेंट करून सांगु शकता. तुम्हाला  हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi हा निबंध कसा वाटला याबद्दल तुम्ही तुमचा प्रतिसाद देऊ शकता. धन्यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3


हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi



मुलींचा जन्म स्त्रीसुद्धा का नाकारते? स्त्री आणि पुरुष ही समाजरथाची दोन चाके. असे असताना स्त्रीचा जन्म का नको? एकीकडे 'मुलगा-मुलगी एक समान', अशा घोषण द्यायच्या आणि एकीकडे मुलीचा जन्म नाकारायचा. पुरुषाचा जन्म स्त्रीशिवाय संभवत नाही, 

हे सत्य समाज का नाकारत आहे? 'यत्र नार्यस्तु पूजन्ते, रमन्ते तत्र देवता।' असे म्हणायचे आणि स्त्रीचा अपमान करायचा, तिला गौण स्थान द्यायचे, अशी माणसाची वृत्ती का? या सगळ्यामागे सामाजिक अनिष्ट प्रथा आहे. ती म्हणजेच हुंडा. 

मुलीला लहानाचे मोठे करायचे, तिच्यावर उत्तम संस्कार करायचे, तिला शिक्षण द्यायचे आणि ती उपवर झाली, की तिचा बाजार मांडायचा. उत्तम स्थळ हवे? द्या हुंडा, करा खर्च. गरीब आईबाप नाही देऊ शकत हुंडा. हुंडा नाही, तर लग्न नाही. झालंच लग्न, तर सासरच्यांकडून छळ, लोभ, हव्यास यातूनच हुंड्याचा जन्म झाला. 

'माहेराहून पैसे आण. नाही आणलेस, तर तुझा जगण्याचा हक्कदेखील आम्ही नाकारू.' मग हुंडाबळी, जिवंत जाळणे किंवा आत्महत्येस प्रवृत्त करणे. अशी ही स्त्रीची विटंबना कधी थांबणार? शिक्षणाबरोबर समाजही प्रगत होईल, वैचारिक क्रांती होईल असे वाटले होते. 


हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा ठरविला. पण कायद्याचे पालन करतो कोण? कायद्याला पळवाटा असतातच ना? हुंडा नको? मग वरदक्षिणा द्या. मुलीचे सालंकृत कन्यादान करा. मानपान करा. मुलीला फ्लॅट देऊन घ्या. जावयाला गाडी घेऊन द्या. अशा अनेक मागण्या होऊ लागल्या. 

याशिवाय लग्नाचा दोन्ही बाजूंचा खर्च वधुपित्यानेच उचलायचा. आपली मुलगी सुखी राहावी, तिला सासरच्यांची उणी-दुणी ऐकायला लागू नयेत; म्हणून काही वधूचे माता-पिता आपण होऊन न झेपणारा खर्च करतात. मग आपापसांत चढाओढ लागते. 'अमक्याचा मुलगा एवढा काही शिकलेला नाही. 

पगारही बेताचाच; पण सासुरवाडी बघा केवढी मालदार मिळालीय!' यातून इतरांना चेवच चढतो. अशा वेळी वाटते, कायद्याची नाही; समाज-प्रबोधनाची गरज अधिक आहे. त्यासाठी मुलानीच ज्ञा केली पाहिजे   'मी हुंडा घेणार नाही.' मुलींनी प्रतिज्ञा केली पाहिजे  'हंडा घेणाऱ्या मुलाशी लग्न करणार नाही.' हुंडा या प्रकाराशी स्त्रीच संबंधित असते.

सासू, नणंद, जाऊ अशा मंडळींचे नाव हुंडाबळी प्रकरणात असते. १९६१ साली हुंडा प्रतिबंधक कायदा' झाला; पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. या गुन्ह्यासाठी शिक्षादेखील सौम्य आहे. याबाबत सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे. अशा गोष्टी कायद्यापेक्षा माणुसकीच्या नात्याने, परस्परांच्या सहकार्याने आणि समंजसपणाने सोडविला पाहिजे.

आज मुलीदेखील उच्चशिक्षित असतात, लठ्ठ पगाराची नोकरी करत असतात, तरीही त्यांना हुंडा द्यावा लागतो. पण जी मुलगी लग्नाआधी नोकरी करत नाही, तिने कुठून आणायचे हुंड्यासाठी पैसे? प्रत्येक स्त्री संसाररथ ओढताना मोलाचा हातभार लावतच असते. 


तरीही सासरच्या अडी-अडचणीच्या वेळी सुनेने माहेरहून पैसे आणावेत, ही अपेक्षा का? प्रश्न अनेक आहेत; पण त्यांवर उत्तरे नाहीत. ऐपत असो अथवा नसो, तुम्ही काय वाट्टेल ते करा; 

पण मुलगी उजवायचीय ना मग द्या हुंडा, कधी उघडणार समाजाचे डोळे ? कधी संपुष्टात येणार ही हुंड्याची अनिष्ट प्रथा? या समाजाला सुबुद्धी होईल तेव्हा.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 4


हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi


"चला रूढीवर आता घसरा टाकूनि सीमा मृतधर्माच्या दंभाच्या या अंधपणाच्या जुनेपणाच्या, अहंपणाच्यासीमोल्लंघनकालचि दसरा" कविवर्य गोविंदाग्रज यांनी घातक रूढींचे उल्लंघन हेच खरे सीमाउल्लंघन आहे. असे सूचित केले आहे. 


काही अनावश्यक व वाईट रूढींचा अस्त व्हायलाच हवा. तरच नवविचारांचा सूर्य उदयास येईल. हुंडा एक जीवघेणी प्रथा आहे.महात्मा फुले, राजाराम मोहनरॉय , महर्षी कर्वे यांनी अनिष्ट रूढींचा नाश होण्यासाठी प्रयत्न केले.



कारण विशिष्ट चौकटीत मानवाला बंदिस्त करणाऱ्या या रूढीमुळे संस्कृती संस्कृती, समजा-समाज यामध्ये तणाव सुरू झाले. समाजात एकेरीपणा आला आहे.प्रेमाचा, भावनेचा चुराडा होत आहे. हुंड्याने 'मी पण' हरवलेली व्यक्ती आक्रोश करतांना दिसते. 



माणुसकी हिरावून घेणाऱ्या या रूढीविरूद्ध प्रत्येक तरूणाने बंड पुकारले पाहिजे. या रूढीला नाकारण्याची शक्ती प्रत्येक तरूणात हवी. आर्थिक विषमतेने श्रीमंत व गरीब असे वर्ग निर्माण केले.या दोन्ही वर्गात. या दोन्ही वर्गात आर्थिक विषमता आहे पण 'हुंडाबळी' च्या बाबतीत या दोन्ही वर्गात समानता आहे.


श्रीमंत आणि गरीब दोघांच्याही घरी हुंडाबळीचा आक्रोश निनादत आहे. १९६१ पासून हुंडाप्रतिबंधक कायदा लागू झालेला आहे पण त्यातील शासन फार सौम्य आहे, त्यात अनेक पळवाटा आहेत. म्हणून हा कायदा अपुरा पडत आहे. 'मलगी नको या भावनेचा जन्म होत आहे.


गर्भपात , गर्भलिंगनिदान याचे प्रमाण वाढले आहे मलीचा गर्भ असेल तर जगात येण्यापूर्वीच तिला संपविले जात आहे. हुंड्याच्या यक्षप्रश्नाम अनेक मुली अविवाहित आहेत. अनेक मुली बळी पडल्या आहेत.


हा यक्षप्रश्न सोडविण्यासाठी समाजप्रबोधनाची आवश्यकता आहे.नुसता कायदा सुधारून हे काम होणारे नाही. समाजपरिवर्तन झालेच पाहिजे ही सर्वांची सामाजिक आवश्यकता आहे.तरच या रूढीचा अस्त व नवविचारांचा उदय शक्य आहे.शिक्षणाबरोबर हुंडा कमी होईल ही आशा फोल ठरली आहे.


मुली पदवीधर झाल्या, नोकरीस लागल्या, तरी हुंडा आहेच.मानपान, दागिने, टि.व्ही. गाडी या रूपाने हुंड्याने उग्र रूप धारण केले आहे. वर्तमानपत्रात हुंडाबळीच्या बातम्या रोजच वाचावयास मिळतात. हुंड्यामुळे खून , आत्महत्या असे प्रकार घडतात.


सृष्टीची धारणा स्त्रीमुळे होते. तिला प्रेम द्या, विश्वास द्या, तिच्या भावना समजवून घ्या. ती सबला आहे,शक्ती आहे, जन्मदात्री आहे. तिची कदर करा.पैशाच्या लोभापायी, हुंड्याच्या उच्च विचाराची, समजुतदार असेल तर संसाराचा गाडाच काय, समाज व देशाच्या कल्याणासाठी ती प्रयत्नांच्या रथाची उत्तम सारथी बनून दाखवील. 


हुंड्यामुळे ज्या स्त्रीचा बळी जातो, तिच्या लहान मुलांचे जीवनही उद्ध्वस्त होते. संस्कृतीला लागलेला हा कलंक घालविण्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. हुंडासमस्याप्रधान चित्रपटे व नाटके , युवामंच , नारीअत्याचार विरोधी मंच या सर्वांबरोबर 'मी हुंडा घेणार नाही' हा प्रत्येक तरुणाचा निर्धार महत्त्वाचा आहे. 



हुंड्याच्या मोजकाट्याने लग्नमंडपात वराने आपली प्रतिष्ठा का मोजून घ्यावी? वधूच्या गळ्यात मंगळसूत्र की गळफास बांधला जात आहे? या गोष्टी क्षुल्लक नाहीत . एक स्त्री हुंडाबळी ठरते त्यामागे दोन कुटुंबे, दोन परिवार, सर्व आप्तेष्ट, तिची अपत्ये या सर्वांची खूप हानी होते. 



एक दुष्ट चक्र सुरू होते.कोर्ट, कचेऱ्या, शिक्षा, मानहानी या चक्रव्यूहात मग बाकीचेही अडकले जातात.शेवटी माणसासाठी नियम हवेत, नियमासाठी माणूस नको'. जी कृत्ये उजेडात करायला लाज वाटते, ती अंधारातही करायला नकोत. 



समाजाला उन्नत करण्यासाठी घातक प्रथांची होळी करायलाच हवी.नाही तर रोज एक 'मंजुश्री सारडा' बळी जात राहील.हुंडा मानवाला गिळेल.

“ 'लक्ष्मी' साठी 'लक्ष्मी'ला मारलेस

हुंड्यासाठी काय रे केलेस? 

हा लोभ लागेल हात धुऊन तुझ्याच मागे

माणसा, माणसा का रे असे केलेस? 

सुंदर संसार फुलविण्याऐवजी संहार का केलास?

आज दूर गेल्या सुखाच्या वाटा अन्

तुझ्या गळा अटकला फास......." 

असे शब्द माझ्या अंतरंगातून उमटतात. मन खूप व्यथित होत.खरं तर एक चांगली सहचारिणी मिळणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे. योगायोगाने तसं मिळालं तर संसार फुलतो, खुलतो.पैसा काय आज आहे उद्या नाही.नसेल तर तो कमविता येतो.पण एकदा मोहापायी व्यक्ती गमावली तर ती परत मिळविता येत नाही. 


शिक्षण घेऊन जर तुमचे मन प्रगल्भ होत नसेल तर अशिक्षित राहिलेलेच बरे. प्रत्येक तरुणाने मनापासून ह्या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे. जन्मभर साथ देणारी चांगली सहचारिणी मिळावी म्हणून प्रयत्न केला पाहिजे . 


वीस वर्षे जपलेले माहेर सोडून सर्वस्व द्यायला जी लक्ष्मी तुमच्या दारी येते तिचे स्वागत करा , प्रेमाने तिला जिंका, मग बघा सुख कस दारी लोळण घेतं ते! पैशाचा , हुंड्याचा हव्यास सोडून समाधानी जगा. नुसत्या शपथा नकोत कृती करा. कविवर्य केशवसुतांच्या शब्दात


"जुने जाऊ द्या मरणालागूनि 

जाळूनि किंवा पुरूनि टाका

सडत न एका ठायी ठाका

सावध! ऐका पुढल्या हाका....

हल्ली महाराष्ट्रात हुंडा प्रतिबंधक अधिनियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना हुंडा न घेतल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.इंजिनिअर, डॉक्टर बनूनही लग्नाच्या वेळी हुंडा देण्याची वेळ येते. अशा मुलींनी वर पक्षाची हुंडा मागणी झुगारून दिली पाहिजे. 


जावयाचे सणवार, पहिलं बाळंतपण, येण्या-जाण्याचा खर्च या नावाखाली होणारी वधूपक्षाची लूट थांबविण्यासाठी प्रत्येक मुलीने हुंडाविरोधी क्रांती केलीच पाहिजे.आता ही वेळ आलेलीच आहे अन्यथा हे हुंड्याचे दुष्टचक्र संसारालाच गिळून टाकेल.युवक व युवतींचा हुंडाविरोधी निश्चय हाच प्रभावी उपाय आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi

विदयार्थी जीवन मराठी निबंध | Student Life Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आमच्‍या ब्लॉगवर तुमचे स्‍वागत आहे, आज आपण विदयार्थी जीवन मराठी निबंध | Student Life Essay In Marathi या विषयावर निबंध बघणार आहोत.आजच्‍या स्‍पधेच्‍या युगात विद्यार्थी जिवन फारच कठीण झाले आहे . आई वडीलांचे अपेक्षा पुर्ण करता करता तो किती भरडल्‍या जातो हे त्‍यालाच ठाऊक, आजची शिक्षण पध्‍दती विद्यार्थी बनविते की परीक्षार्थी, त्‍याच्‍या समोर येणाऱ्या समस्‍यांचे वर्णन या निबंधा मध्‍ये केले आहे. चला तर मग सुरू करूया निबंधाला. 



“आई, आता फक्त एवढ्याच प्रश्नाचे उत्तर सांग. अगदी शेवटचाच प्रश्न आहे बघ!" मिनू अगदी केविलवाण्या शब्दांत आईला सांगत होती. जवळजवळ दोन तास ती आईच्या मदतीने आपले प्रश्न सोडवीत होती. मिनूच्या उद्गाराने मी ही भानावर आलो. मी देखील खूप वेळ गणिते सोडवीत होतो, आणि अजून मला कितीतरी विषयांचे प्रश्न सोडवावयाचे होते. केव्हा संपायचे बरे हे प्रश्न? छे, आमची सारी विदयार्थिदशा या प्रश्नांच्या भेंडोळयातच अडकली आहे. या साऱ्या प्रश्नांची रूपे तरी किती आगळीवेगळी! त्यांच्या स्वरूपांप्रमाणे विदयार्थ्यांना त्यांना सामोरे जावे लागते. नाहीतर वस्तुनिष्ठ प्रश्नाला दीर्घ उत्तर दिले की बसलाच शून्याचा फटकारा.


student-life-essay-in-marathi
student-life-essay-in-marathi

आजचे विदयार्थिजीवन म्हणजे नानाविध प्रश्नांची सर्कसच! या सर्कशीतील तंत्र आणि मंत्र जो साध्य करतो तोच यशाचे शिखर गाठतो. पण एक गोष्ट मात्र नक्की की, असा विदयार्थी खरा ज्ञानार्थी न होता केवळ परीक्षार्थी बनतो. याचे एक कारण हेही आहे की, आजच्या विदयार्थ्यांवर विविध विषयांचा फार मोठा बोजा आहे. मर्यादित वेळेत अभ्यास कसा संपवायचा हे विदयार्थ्यांपुढील मोठे प्रश्नचिन्ह आहे.


तेवढ्याने काय संपते! विदयार्थी हा सर्वगुणसंपन्न असावा अशी सर्व पालकांची व शिक्षकांची अपेक्षा. आपण विदयार्थिदशेत जे करू शकलो नाही ते सारे आजच्या विदयार्थ्यांनी करावे असे त्यांना वाटते. अशा प्रसंगी विदयार्थ्यांचा मात्र कोंडमारा होतो. एखादया विदयार्थ्याला सुनील गावसकर व्हावेसे वाटते; तेवढयात जयंत नारळीकरांसारख्या थोर शास्त्रज्ञाचा आदर्श त्याच्यासमोर ठेवला जातो. मुलाने आपली प्रकृती उत्तम ठेवावी असे सांगणारे पालक, त्याच मुलाने व्यायामशाळेत जरा जास्त वेळ घालविला की, लगेच म्हणतात,


काय आखाड्यात उतरायचे काय!" त्यामुळे आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचे आहे, हयाबद्दल विदयार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.अभ्यासात यश मिळवून तरी आजच्या विदयार्थ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत का? उच्च शिक्षणासाठी त्याला हव्या त्या शिक्षणशाखेत प्रवेश घेता येतो का? तेथेही अनेक अडसर! जागा कमी, मागणी अधिक! या व्यस्त प्रमाणामुळे सर्वत्र झिम्मड. मग भ्रष्टाचार, वशिलेबाजी आलीच. 


विदयार्थ्याला आवडत असलेली शिक्षणशाखा तो निवड शकत नाही; मग तो अगतिक होतो वा भरकटतो.
अशा या विदयार्थिजीवनात अनेक मोह विदयार्थ्याला ग्रासावयास उभे असतात. कधी चुकून, तर कधी वैफल्याने तो त्यांकडे वळतो. अशा सर्व समस्यांवर मात करून विदयार्थ्याने उत्तम यश संपादन केले तरी त्याचे प्रश्न संपत नाहीत. शिक्षणानंतर नोकरीचा प्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकतो. बेकारीचा भस्मासूर त्याला वाकुल्या दाखवितो. स्वतःचा व्यवसाय हा बेकारीवरचा उपाय त्याला दाखविला जातो. पण तेथेही जीवघेणी स्पर्धा व गैरव्यवहार त्याला रोखतात.

प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! विचारवंतांच्या मते, माणूस हा आयुष्यभर विदयार्थीच असतो. मग प्रश्न पडतो की हे प्रश्न सुटणार तरी केव्हा? आणि हे प्रश्नही त्याला सतत साथ देत असतात.


मित्र-मैत्रिणींनो तुम्‍हाला विदयार्थी जीवन मराठी निबंध | Student Life Essay In Marathi हा निबंध कसा वाटला व विद्याथ्‍यांच्‍या या प्रश्‍नांवर तुम्‍हाला तुमचे मत प्रकट करावयाचे असेल तर तुम्ही कमेंट करून कळवु शकता, धन्‍यवाद 

विदयार्थी जीवन मराठी निबंध | Student Life Essay In Marathi

मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi


मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi आज आपण मराठी आमची मायबोली  शीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत 
मराठी असे आमुची मायबोली "मराठी असे आमुची मायबोली, जरी भिन्नधर्मानुयायी असू।हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी॥" अशा त-हेने आपल्या मायबोलीची गोडवी गाणारे आम्ही आज खरोखर तिचे पांग फेडीत आहोत का? 



प्रतिष्ठेच्या पोकळ व आकर्षक कल्पनांत गुरफटलेल्या आमच्या मनाला अजूनही इंग्रजीचे आकर्षण आहे. मराठी भाषिक चार सुशिक्षित माणसे एकत्र आली तर ती गप्पा मारण्यासाठी इंग्रजीला जवळ करतात. 
दीडशे वर्षांची राजकीय गुलामगिरी संपली तरी इंग्रजीची मानसिक गुलामगिरी सोडायला आम्ही तयार होत नाही.

 

कारण आमच्या मायबोलीची थोरवी आजही आम्हांला उमगली नाही; तिचे सामर्थ्य आजही आम्हांला कळले नाही असेच म्हणावे लागेल.


मराठी मायबोलीविषयी लिहिताना साने गुरुजी म्हणतात, “आमच्या मराठीचे भाग्य असे आहे की, तिचा पहिलाच कवी हिमालयाएवढा मोठा महाकवी होऊन गेला. त्याच्या काव्यशक्तीला स्पर्श करणारे सामर्थ्य अजून मराठीत निर्माण झालेले नाही.' 



अशी ही ज्ञानदेवांची मराठी अमृतालाही पैजेने जिंकणारी, हिची थोरवी वर्णिताना योगवासिष्ठ म्हणते

“परिमलांमध्ये कस्तुरी। 

का अंबरामध्ये शंबरारी।

तैसी महाटी सुंदरी।
 
भाषांमध्ये।" 

marathi aamachi mayboli essay in marathi
marathi aamachi mayboli essay in marathi


मराठी अशी भाग्यवान की तिला सदैव अनेक सुपुत्रांची सोबत लाभली. नामदेव, एकनाथ, तुकाराम अशा संतांच्या सहवासातून ती पंडितकवींच्या वाग्विलासात रमली आणि नंतर शाहिरांच्या शब्दांतून डफ-तुणतुण्याबरोबर नाचू लागली. आधुनिक काळात तर तिच्या वैभवाला आगळाच बहर आला. नव्या नव्या वाङ्मयप्रकारांनी ती सजू लागली आणि रसिकांना रमवू लागली.


या माझ्या मायबोलीवर अनेकदा अनेक आक्रमणे झाली, पण ती अशी ‘चिवट' की तिने ती सारी परतवून लावली. अग्निदिव्य केल्यावर सीतामाई जशी अधिक उजळून निघाली, त्याप्रमाणे यावनी आणि इंग्रजी भाषांच्या आक्रमणानंतर मराठी भाषा अधिक तेजस्विनी झाली. 



संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देताना तर तिने आपला नाजूकपणा झटकून देऊन शूर, करारी भवानी देवतेचे रूप धारण केले आणि आपली अस्मिता साऱ्या भारताला दाखवून दिली. या माझ्या मायबोलीच्या सामर्थ्याविषयी आता कोणालाही संभ्रम नाही. भारत देशाच्या सीमा ओलांडून परदेशांतही तिने आपले सामर्थ्य दाखविले आहे. 



शरदाच्या चांदण्याप्रमाणे सौख्य देणारी ती नाठाळांच्या माथ्यावर काठी हाणण्यास डरणार नाही; म्हणूनच कवी कुसुमाग्रज आत्मविश्वासाने म्हणतात.

"माझ्या मराठी मातीचा।
 
लावा ललाटास टिळा। 

हिच्या संगे जागतील। 

मायदेशातील शिळा॥" 


मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे.  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2

मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi



मराठी असे आमुची मायबोली. जरी भिन्न धर्मानुयायी असे, तरी आज ती राष्टभाषा नसे. आपण महाराष्ट्रीयन, आपली मन मराठी, भाषा अस्सल मराठी. या महाराष्ट्राला गोविंदाग्रज ‘बकुळ फुलांच्या प्राजक्ताच्या दळदारी देशा' असं संबोधतात. तर बा. भ. बोरकर म्हणतात, 'राकट कणखर दगडांच्या देशा! 


महाराष्ट्रातली मराठीही अशीच रांगडी. सह्याद्रीच्या कड्यांसारखी. कधी रेशीम सुतासारखी, लोण्याहूनी मऊ नी वज्राहून कठोर. गोदा, कृष्णा, भीमेसारखी निर्मळ, सरळ, साधी तर कधी कोकणातल्या नागमोडी घाटमाथ्यांसारखी वळणावळणाची. ज्ञानदेवाच्या स्पर्शाने पुनीत झालेली.


माझी मराठीची बोली । 

अमृतातेही पैजा जिंकी।

 ऐसी अक्षरे रसिके । 

मेळविन ।।


असे आव्हान स्वीकारून, ते लीलया पेलूनच ज्ञानदेवांनी संस्कृतातील भगवद्गीता प्राकृत भाषेत-मराठीत लिहिली, सांगितली व रसिक श्रोत्यांवर जणू मोहिनी घातली.'मराठी या माणसाला नको अमृताचा घट, ज्ञानेशाच्या ओवीतला पुरे त्याला एक घोट । अशी मराठीची अभिरूची माणसामाणसांत निर्माण केली. 


संत तुकाराम महाराजांची गाथा, समर्थ रामदासांचा दासबोध, मनाचे श्लोक, एकनाथांचे भागवत ह्या वाङ्मयाने शेकडो वर्षे मराठी ज्ञानगंगा प्रवाही ठेवली. मराठी लोकगीते, भूपाळ्या, पोवाडे, कवनं, आरत्या, जात्यावरच्या ओव्यांनी मराठी समृद्ध केली, वैभवशाली केली.


माळ्याच्या मळ्यात नुस्ती माळीण एकली. जादुच्या फुलांची इनं काचोळी गुंफली. अशा ओवीतून रचनेतून माळीणीचा एकटेपणा किती मृदू व तरल शब्दांत गुंफलाय हे मराठी माणूसच जाणे. भावना, विचार, कल्पना, अनुभव व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम म्हणजेच मायबोली. 


मातेनंतर जवळ घेतात ते मायबोलीतले शब्दच. सुखदु:खाच्या प्रसंगी आपले सखे नि सोबती. कसोटीच्या क्षणांना कातरवेळांना त्यांचाच तर मनाला आधार वाटतो. कवी केशव मेश्राम ह्या शब्दांकडे प्रांजळपणे कृतज्ञता व्यक्त करतात. जे शब्द त्यांच्या हाकेला ओ देतात, त्या शब्दांचे सामर्थ्य सांगताना तुकाराम महाराजही म्हणतात,
आम्हां घरी धन शब्दांचिच रत्ने शब्दांचीच शस्त्रे-यत्न करू!


मराठी भाषा अतिप्राचीन आहे. मराठी वाङ्मयाचे समृद्ध दालन उघडले संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी. मग ही परंपरा संत तुकाराम, एकनाथ, नामदेव, मुक्ताबाई... त्यानंतर कवी मुक्तेश्वर, नरहरी, चंद्रशेखर आदिंनी सुरू ठेवली. लो. टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, न्या. रानडे, स्वा. सावरकर ह्यांची लेखणी म्हणजे तळपणारे साक्षात खड्गच!


ललित वाङ्मय, कविता, ललित निबंध, कादंबऱ्या, कथांचा काळ म्हटलं म्हणजे ह. ना. आपटे, नाथमाधव, श्री. ना. पेंडसे, ना. सी. फडके, पु. ल. देशपांडे, गो. नी. दांडेकर हे मराठी साहित्यिक डोळ्यांपुढे उभे राहतात. वि. वा. शिरवाडकर, गडकरी, अत्रे, वसंत कानेटकर, ह्यांनी मराठी नाटकांचा नजराणा पेश केला तर बालकवी, आरती प्रभू, केशवसूत, बोरकर, शंकर वैद्य, विंदा करंदीकर, पाडगांवकर, वसंत बापट, ना. धों. महानोर ह्यांनी निसर्ग कवितांचे घडेच्या घडे वाचकांसमोर उपडे केले.


मराठी भाषा दर बारा मैलांवर बदलते म्हणतात. मराठीमध्ये प्रमाण भाषेव्यतिरिक्त अनेक बोलीभाषा आहेत. भाषेचे विविध रंग, ढंग वैशिष्ट्ये आहेत इतकेच. ती प्रदेशानुसार बदलते आणि काळानुसारही बदलते. तिची सारी रूपे मोहकच आहेत. 'लीळाचरित्र' हा तेराव्या शतकात लिहिला गेलेला पहिला पद्यग्रंथ मानला जातो. 


शिवकालीन पत्रांमधले मराठी थोडे सोपे होते. सोळाव्या शतकात ख्रिस्तपुराणातील मराठी म्हणजे, हे सर्व मराठीये भासेत लिहिले आहे असे होते. अठराव्या शतकात पेशवे उत्तम मराठी लिहीत. १८७५ मधील नाटक मंडळींची मराठी पत्रे मोठी मजेशीर वाटतात. 


सुमारे शंभर वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरीमधील नीतीकथांचे अर्थ उलगडून दाखवताना इतिहासकार राजवाडे वरिवरि पालवी खुडिजे । आणि मुळी उदक घालिजे।।' असे मराठी लिहितात... एरव्ही कानडीचा प्रभाव असलेली धारवाडी मराठी, कोकणातली कोकणी थाटाची मराठी, 'आईमाय' म्हणणारी व-हाडी मराठी, जळगावकडची खानदेशी मराठी, नगरी, पठारी... मराठी! तर... ही अशी मायबोली. पूर्वीची सनातनी,


नऊवारी पैठणीतली नाकात नथ, हातात पाटल्या, बांगड्या, तोडे, बाजूबंद, बिलवरांनी सजलेली वा आत्ताची सहावारी गोल साडीतली साधी असो माधुर्य व मोहकता कायम टिकवून धरणारी. पण... दुर्दैवाने... आज ह्या मायबोलीला आपण अडगळीची जागा दाखवली की काय असं वाटतंय. 


जणू सोन्यामोत्याचा भरगच्च दागिना माळ्यावर भिरकावून दिलाय. कारण आपली मातृभाषा सोडून आपण इंग्रजीला जवळ करू लागलोय. मराठी माध्यमातून शिक्षण घेणं मागासलेपणाचं मानू लागलोय. मराठी बोलायला, आपण चारचौघात लाजतोय. पिवळ्या, हिरव्या रंगाना यलो, ग्रीन म्हणणं हे पुढारलेपणाचं नि आईला मम्मी न म्हणता आई म्हणून हाक मारणं हे बुरसटलेपणाचं लक्षण मानतोय.


'मी वॉश घेऊन फ्रेश होऊन येतो' 'फॉर मी, हे फारच डिफिकल्ट आहे हं,' किंवा 'हाय फ्रेंड्स' 'बाय डॅडी,' म्हणत पाश्चिमात्य लोकांचं अंधानुकरण करतोय. पितृऋण, मातृऋण ह्या गोष्टी विस्मरणात टाकून 'मदर्स डे साजरा करतो. हे सारं पाहन मायबोली मराठीला किती यातना होत असतील, हे पाहायला आपणास वेळही नाही.
 


मला मान्य आहे विश्व जवळ येत चाललंय. इंग्रजी ही विश्वाची बोलीभाषा आहे. पण मराठीलाही एका हळव्या कोपऱ्यात आपण जपलं पाहिजे. अभ्यासाच्या संकल्पना मायभाषेतच सुस्पष्ट होतात. परदेशस्थ मराठी माणूसही जगाच्या पाठीवर मराठी माणसाला भेटला, तर किती आनंदित होतो. 


आपल्या मातृभाषेतून किती निकाय बोलू असे त्याला होऊन जाते. नि तो जेव्हा एकटा असतो... आपल्या मायभूला, मातृभाषेला सोडून दूर दूर... तेव्हा मायबोलीला उत्स्फूर्तपणे म्हणतो, जयकार असावा तुझा 'मराठी' नित्य या जगी उच्च रवाने येतो उर नयन हे भरूनी, तुझ्या शब्द उच्चाराने। तू सतत असावी जवळी माझ्या, आस मनीची आस असे, साद घालीता मी एकांती, कुशीत मजला धीर देतसे। व मायबोलीचा जयजयकार करतो. 
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi