चिंतनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
चिंतनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Zade Lava Zade Jagva | झाडे लावा झाडे जगवा  

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण Zade Lava Zade Jagva  मराठी निबंध बघणार आहोत. या 8 निबंधामध्‍ये मानवाने आपल्‍या फायद्यासाठी कश्‍याप्रकारे निसर्गाचे नुकसान केेले आहे. व त्‍यावर कोणते उपाय योजले जाऊ शकता हे तुम्‍हाला वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. 'पृथ्वीला वाचवा, आपल्या पृथ्वीची काळजी वाहा' हा 'वसुंधरा दिना' चा संदेश आहे.  केवळ जंगलतोडीमुळेच पर्यावरणाचा तोल ढळतो असे नाही; महानगरे आणि कारखानेही या दुरवस्थेला हातभार लावत असतात. 

गावोगावच्या नद्यांमध्ये कचरा व सांडपाणी सोडले जात आहे. उसाच्या मळीमुळे शेते निकामी होत आहेत. पावसाअभावी वाळवंटे वाढू लागली आहेत. अशी अनेक संकटे आपल्यापुढे उभी आहेत.पर्यावरणाचा ढासळणारा तोल सावरण्याचा एक महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्षारोपण होय. 

Zade-Lava-Zade-Jagva
Zade-Lava-Zade-Jagvaअलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. 'सामाजिक वनीकरणा'ची कल्पना आता रूढ होत आहे. झाडे लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व त्यांचे जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. झाडे लावली आणि त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? 

निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात. कधी त्यांना पाणी मिळत नाही. कधी भुकेलेली जनावरे लावलेली रोपटी खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांतील फारच थोडी झाडे जगतात; मोठी होतात.यासाठी आता मोहीम सुरू केली पाहिजे  'एकतरी झाड जगवा.' लग्न, मुंजी, वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटीदाखल पुष्पगुच्छ देतो, त्याऐवजी एक-एक रोप भेट दयावे. 

नवीन बालक जन्माला आले की, त्या कुटुंबाने नवीन झाड लावावे व बाळाबरोबर त्यालाही बाळासारखे ममतेने वाढवावे. शाळेतील प्रत्येक मुलाने आपापल्या परिसरात एक तरी झाड लावावे व त्याचे नीट संगोपन करावे, प्रेमाने देखभाल करावी.

शहरातील राखीव भूखंडांवर टोलेजंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावावीत. सरकारी गृहनिर्माण संस्थांनी आपल्या वास्तूच्या परिसरात झाडे लावावीत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करावी. निसर्गचक्र खंडित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते आहे तसे अबाधित राखण्यातच मानवजातीचे हित आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून 'एकतरी झाड जगवा !' हा आजच्या युगाचा संदेश आहे. या संदेशाप्रमाणे आपण वागलो, तर ही वसुधा पुन्हा 'हरितश्यामल' बनेल.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व झाडे लावण्‍यासाठी आणखी काय उपाय योजना करायला पाहीजे व तुम्‍ही वृक्षप्रेमी असल्‍यास कोणत्‍या उपक्रमात सहभाग घेतला आहे हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
 • आजचा मानव निसर्गापासून दूर 
 • वृक्षतोड
 • प्रदूषण
 • दुष्काळ
 • पर्यावरणाचा समतोल ढळला 
 • निसर्गाकडे चला 
 • 'एक मूल, एक झाड ' ही नवी घोषणा 
 • इमारतीच्या जंगलांची वाढ थांबवावी 
 • वनोत्सव सुरू करावेत 
 • वृक्षमित्र पुरस्कार 
 • जंगल संपत्तीचे महत्त्व 
 • वृक्ष ही जीवनधारा 
 • वृक्षवल्ली आम्हा सोयरी

निबंध 2 

एका कार्यक्रमाचा समारोप चालू होता. वक्ता आमंत्रित पाहुण्यांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानत होता आणि आभार मानताना पुष्पगुच्छाऐवजी प्रत्येकाच्या हाती एकेक रोप देत होता. अतिशय आवडली मला ही कल्पना.

माणसाच्या हातून नकळत फार मोठा गुन्हा घडला आहे. माणसांनी विकासाच्या नावाखाली अमर्याद जंगलतोड केली, वनांचा विध्वंस केला. जंगलांवर कुणाचा हक्क? कुणाची मालकी? कुणाचीही नाही; म्हणजे सर्वांचीच. वाहनांची सोय करण्यासाठी मोठमोठे रस्ते आवश्यक झाले. मग वाटेत येणारी झाडे; झाडे कसली मोठमोठे वृक्ष तोडण्यात आले. 

घरे उभारण्यासाठी लाकूड, घरे सजवण्यासाठी लाकूड... पुस्तके, ग्रंथ, कचेयांतील कामांसाठी कागद; त्यासाठी पुन्हा लाकूड. वर्षानुवर्षे डोळ्यांवर पट्टी बांधून आपण झाडे तोडत राहिलो. खेडेगावातील गरजा वेगळ्या, पण त्यांना त्यांचे अन्न शिजवण्यासाठी सरपण हवेच. मग झाडे तोडली जातात.

शेवटी व्हायचे तेच झाले. या बेसुमार वृक्षतोडीमुळे सारा देश उजाड झाला. देशातील वनस्पती लयास गेली आणि मग या नाठाळ माणसाच्या लक्षात आले, की पर्यावरणाचा तोल बिघडला आहे ! झाडे कमी झाली, तसा पाऊस कमी झाला. माणसे वाढली, पाण्याचा उपसा अखंड चालू राहिला. त्यामुळे जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी खाली गेली. आता माणसाला पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळणे कठीण झाले आहे. सगळ्या जगापुढेच हा प्रश्न उभा राहिला आहे.

मग मात्र माणूस खडबडून जागा झाला. स्वतःला वाचवण्यासाठी झाडांना वाचवले पाहिजे, हे त्याच्या लक्षात आले. आता कुणी झाड तोडू लागला की चारजण धावून त्याचा हात धरतात, त्याला वृक्षतोड करू देत नाहीत.
प्रत्येक मंगलप्रसंगी वृक्षारोपणाची कल्पना आपण आता स्वीकारली पाहिजे. 

घरात बाळ झाले की  झाड लावा. बाळाबरोबर झाडाला वाढवा. पाहुणे आले; त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करा. इतकेच नाही तर घरातील प्रियजनांच्या वियोगप्रसंगी 'स्मृतिवना'त झाड लावून त्यांच्या स्मृती जतन केल्या पाहिजेत.जंगलतोडीच्या चुकीचे परिमार्जन झाडे लावूनच करायचे आहे. अगदी खेडोपाडी, समाजाच्या तळागाळापर्यंत हा विचार पोचवायचा आहे. त्यातच आपल्या देशाचा उत्कर्ष आहे.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

 • झाडांचे महत्त्व
 • नेहमी होत आलेली चूक
 • उजाड देश
 • पाऊस कमी
 • भूगर्भातील पाण्याची पातळी खाली
 • पर्यावरणाचा तोल हरवला
 • आपली चूक उमगली 
 • वृक्षतोड थांबवली  विविध कारणांनी झाडे लावायची. जोपासायची, वाढवायची
 • तरच देश सस्यश्यामल होईल.

निबंध  3 

पृथ्वीची अवस्था प्रदूषणामुळे दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पृथ्वीवरील वातावरणाचा तोल ढळत आहे. 'पृथ्वीला वाचवा, आपल्या पृथ्वीची काळजी वाहा' हा 'वसुंधरा दिना'चा संदेश आहे. परंतु प्रचंड प्रमाणात वाढलेली वृक्षतोड एक दिवस ही पृथ्वी रसातळाला नेईल.


केवळ जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा तोल ढळतो असे नाही; महानगरे आणि कारखानेही या दुरवस्थेला हातभार लावत असतात. गावोगावच्या नदयांमध्ये कचरा व सांडपाणी सोडले जात आहे. उसाच्या मळीमुळे शेते निकामी होत आहेत. पावसाअभावी वाळवंटे वाढू लागली आहेत. अशी अनेक संकटे आपल्यापुढे उभी आहेत.


या साऱ्या गोष्टींवर जे प्रतिबंधात्मक असे अनेक उपाय आहेत, त्यांपैकी एक म्हणजे वृक्षारोपण होय. अलीकडे वृक्षारोपणाचे कार्यक्रम होतात. 'सामाजिक वनीकरणा' ची कल्पना आता रूढ होत आहे. झाड लावणे जितके आवश्यक आहे, त्याहूनही ती वाढवणे व जतन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येकाने एकतरी झाड दत्तक घेतले पाहिजे. 

झाडे लावली आणि त्यांची काळजी घेतली नाही तर काय उपयोग? निष्काळजीपणामुळे अनेक झाडे मरतात. त्यांना पाणी मिळत नाही. कधी भुकेलेली जनावरे लावलेली रोपटी खाऊन टाकतात. त्यामुळे लावलेल्या झाडांतील फारच थोडी झाडे जगतात; मोठी होतात.

यासाठी आता मोहीम सुरू केली पाहिजे  'एकतरी झाड जगवा.' लग्न, मुंजी, वाढदिवस अशा निमित्ताने आपण भेटीदाखल पुष्पगुच्छ देतो, त्याऐवजी एक-एक रोप भेट दयावे. नवीन बालक जन्माला आले की, त्या कुटुंबाने नवीन झाड लावावे व बाळाबरोबर त्यालाही बाळासारखे ममतेने वाढवावे. शाळेतील प्रत्येक मुलाने शाळेच्या आवारात एक तरी झाड लावावे व त्याचे नीट संगोपन करावे, प्रेमाने देखभाल करावी.


शहरातील राखीव भूखंडांवर टोलेजंग इमारती उभारण्याऐवजी गर्द झाडे लावावीत. सरकारी गृहनिर्माण संस्थांनी आपल्या वास्तूच्या परिसरात झाडे लावावीत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करावी. निसर्गचक्र खंडित करण्याचा आपल्याला अधिकार नाही. ते आहे तसे अबाधित राखण्यातच मानवजातीचे हित आहे. पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हणून 'एकतरी झाड जगवा !' हा आजच्या युगाचा संदेश आहे. म्हणजे ही वसुधा पुन्हा हरितश्यामल' बनेल.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

 • आजचा मानव निसर्गापासून दूर 
 • वृक्षतोड 
 • प्रदूषण 
 • दुष्काळ
 • पर्यावरणाचा समतोल ढळला 
 • निसर्गाकडे चला 
 • 'एक मूल, एक झाड ' ही नवी घोषणा 
 • इमारतीच्या जंगलांची वाढ थांबवावी 
 • वनोत्सव सुरू करावेत
 • वृक्षमित्र पुरस्कार
 • जंगल संपत्तीचे महत्त्व
 • वृक्ष ही जीवनधारा
 • वृक्षवल्ली आम्हा सोयरी


निबंध  4 

jhade lava jhade jagva


पर्यावरण संतलनासाठी एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टके वनक्षेत्र असणे आवश्यक असते. परंतु आज भारतात २२ टक्के वनक्षेत्र आहे त्यातही दाट वनक्षेत्राचे प्रमाण ६ ते ७ टके आहे. काही राज्यात वने दाट प्रमाणात आढळतात. तर काही राज्यात वनाचे प्रमाण अतिशय विरळ असते. अशाप्रकारे आपल्याला वन वितरणाच्या बाबतीत विषमता आढळते.

वनांबाबतची ही भीषण परिस्थिती फक्त भारतातच नव्हे तर बहुतांशी देशात आढळते. आज अनेक  कारणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. त्यामध्ये घरांसाठी. उद्योगधंद्यासाठी, उद्यानांसाठी, क्रीडागणे, मैदाने, रस्ते, तलाव, धरणे यांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे वृक्षांची लाकडे बहुउपयोगी असल्यामुळे ती मिळवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होते.

वनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे मानवाला विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. वृक्ष CO2 घेतात आणि ऑक्सीजन बाहेर सोडतात. त्यामुळे माणसाला श्वसनासाठी ऑक्सीजन चा पुरवठा होतो, त्याचबरोबर वातावरणातील ऑक्सीजन, आणि CO2  चे प्रमाणही संतुलित राखले जाते.

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. वृक्ष हे मातीची धूप होण्यापासून रोखत असतात. पण आता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे जमिनीची धूप होते आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता कमी होते आहे. या गोष्टीचा खूप दूरगामी परिणाम मानवावर होऊ शकतो. भविष्यकाळात मानवाला अन्नधान्याची टंचाई भासू शकते.

दिवसेंदिवस पृथ्वीचे तापमान वाढत आहे आणि पर्जन्याच्या प्रमाणात देखील असमतोल निर्माण होत आहे. वृक्ष हे पर्जन्य पडण्यासाठी एक अत्यावश्यक गोष्ट आहे. मानव आपल्या दैनंदिन जीवनासाठी इतर सजीवांवर देखील अवलंबून असतो. या सर्व सजीवांची एक अन्नसाखळी असते. वृक्ष तोड झाल्यामुळे या अन्नसाखळीलाही मोठ्या प्रमाणात बाधा पोहचत आहे. 

कारण बरेच प्राणी, पशू, कीटक हे घनदाट वनात आढळतात. त्या वनांवरच त्यांचे आयुष्य अवलंबून असते. यात आपल्याला प्रामुख्याने वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे यांचा उल्लेख करावा लागेल. वनांचे प्रमाण कमी झाल्यामुळे या प्राण्यांचे प्रमाण देखील कमी होत आहे. त्यामुळे त्या प्राण्यांची संख्या वाढावी म्हणून सरकारला विशेष मोहीम हाती घ्यावी लागत आहे. त्यावर वृक्षारोपण हा एकच उपाय आहे.

वनांची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्यामुळे तो विविध गोष्टींपासून वंचित राहू लागला आहे. कारण मानवाचे जीवन हे मोठ्या प्रमाणावर वनांवर अवलंबून आहे. वनांपासून त्याला इंधनासाठी, घरासाठी, इतर वस्तू बनवण्यासाठी लाकूड मिळते. त्याचबरोबर वनांचे विविध औषधी उपयोगही आहेत. विविध जर्जर व्याधींच्या उपायासाठी आजही मोठ्या प्रमाणात वनौषधींचा वापर होत असतो. 

त्याचप्रमाणे वनांपासून आपल्याला डिंक, लाख, फळे, फुले इ. उपयोगी वस्तूदेखील मिळतात. त्याचप्रमाणे काही आदिवासी जमाती झाडांच्या पाला पाचोळ्यापासून आपली घरे बनवतात. अशाप्रकारे वृक्ष हे कल्पतरू प्रमाणे असतात. ते आपल्याला विश्रांतीसाठी सावली देतात. वृक्ष हे आपल्या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण होण्यासाठी मदत करतात.

वनांचे अशा प्रकारे विविध उपयोग माहिती असून देखील, त्यांचे प्रमाण कमी होत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी विविध उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. अमेरिकेसारख्या देशात एक झाड तोडायचे असल्यास त्याआधी दोन झाडे लावावी लागतात. आपल्या देशातही अशी परिस्थिती निर्माण करावयाची असल्यास त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. 

लोकांचे वृक्षसंवर्धनाचे फायदे समजून सांगितले पाहिजे. यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घ्यायला हवा. त्यांनी व्याख्याने आयोजित करून लोकांना वनांचे महत्त्व पटवून द्यायला हवे. वनसंपत्ती संवर्धनासाठी जोरदार प्रचार करायला हवा.

त्याचप्रमाणे शाळांतून देखील मुलांना वनसंवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितले पाहिजेत, कारण तेच भावी काळातील नागरिक आहेत. ते ही गोष्ट आपल्या घरच्यांनादेखील सांगू शकतील. त्यांना विविध गोष्टींद्वारे नैतिक मूल्याद्वारे हे पटवुन दिले पाहिजे. इतकेच नव्हे तर शालेय अभ्यासक्रमात देखील वनसंवर्धन विषयक प्रकरणांचा समावेश केला पाहिजे. शाळेच्या मार्फत १५ ऑगस्ट, २६ जानेवारी ''वृक्षदिंडी'' काढली पाहिजे. 

आज धार्मिक दिंड्यांऐवजी 'वृक्षदिंडी'' ची खरी गरज आहे. त्याचप्रमाणे शाळेत वृक्षसंवर्धन या विषयावर निबंध स्पर्धा, वकृत्त्व स्पर्धा आयोजित केल्या पाहिजे. शाळेवर, गावपातळीवर सामहिकपणे वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवला पाहिजे. सर्वात शेवटचा उपाय म्हणजे या विषयांबद्दल कडक कायदे केले पाहिजे. विनाकारण परवानगी न घेता झाड तोडल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. 

याआधी जनजागृती खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी सरकारने जनजागतीसाठी विविध वर्तमानपत्रे, दूरदर्शन यांचा उपयोग केला पाहिजे. अशाप्रकारे वृक्ष हे मानवी जीवनाचा, निसर्गाचा आधारस्तंभ आहे. त्यांचे संवर्धन केले पाहिजे आणि हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

निबंध 


पृथ्वीने सुजनतेला प्रथम जन्म दिला मनुष्यरूपात ! परमेश्वराला वाटलं की या वसुंधरेला फुलवणारं चैतन्य इथे उमलावे, देवांचे व दैत्यांचे समान अंकुर रुजून, एका नंदनवनाची निर्मिती व्हावी, या क्षमेला, प्रेम, दया, शांती या जीवनमूल्यांचे बाळकडू पाजावे. पृथ्वीवर नंदनवन निर्माण करावे, हिरव्यागार मखमली सदाहरित वनांचा प्रसार सर्वत्र व्हावा आणि यासाठीच तर मनुष्याने जन्म घेतला आहे.

कावळा करतो कावकाव म्हणतो; माणसा झाडे लाव, एक तरी झाड लाव, असे म्हणतच आपण मोठे झालो या बालगीतातील बोध मात्र तेथेच विसरून गेलो. पर्यावरण हा शब्द आपणासाठी नवीन नाही, अगदी साध्या शब्दांत पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभवतीच्या वातावरणाची गोळाबेरीज,पर्यावरणाचा समतोल टिकविण्याचे काम निसर्ग करतो. 

जेव्हा निसर्गाच्या कार्यात माणसाचा नको तेवढा हस्तक्षेप वाढतो. म्हणजे हवा, पाणी, जमिनीचा नको तेवढा व नको तसा वापर होऊ लागतो तेव्हा पर्यावरणाचा समतोल बिघडतो. मानवाचे स्वास्थ्य हे पर्यावरणाच्या स्वास्थ्यावर अवलंबून असते पर्यावरणाचे स्वास्थ्य बिघडले की आपले स्वास्थ्य बिघडते. आपल्या स्वास्थ्याची पर्यायाने पर्यावरणाची काळजी आपण स्वतःच घ्यायला हवी नाही का ?


पूर्वादीकालापासून संतांनी स्वतःच्या साहित्यातून व वर्तनातून हा आपल्या पर्यावरणाचा समतोल तर सांभाळला आहेच व मार्गदर्शनही केले आहे.तुकोबांनी वृक्ष-वेलींना आपले सगे-सोयरे संबोधले आहे. पण झाडे आपल्याला आरोग्यदायी जीवन देतात कारण 'काळी माती हिरवी सोने' प्राणवायूचे हे कारखाने आपण काटकसर करून सोने विकत घेऊ, प्रतिष्ठा वाढेल सर्व काही मिळेल केव्हा ? 'शिर सलामत तो पगडी पचास' आपण आरोग्याची मूर्ती असू तेव्हा त्या सोन्याचे तेज वाढले ना!

आज धूर ओकणारी वाहने व त्यातील कार्बन त्याबरोबर इतरही अपायकारक घटकद्रव्ये ही आरोग्याला मारक ठरत आहेत. श्वसनांच्या रोगाचे प्रमाण वाढत आहे. शहराच्या दगदगीच्या जीवनात शांती मिळते कुठे माणूस ती शोधायला निसर्गरम्य परिसराकडे वळतो. पण अशी वृंदावने, बागा आहेत तरी किती ? यांचे प्रमाण इतके कमी का ? याचा थोडा जरी विचार माणसाने केला तर आढळून येते की शहरवासीयांनी टुमदार इमारती, मोठमोठे कारखाने, बांधकामे यांकरिता वृक्षांचा नाश केला. 

वृक्षतोडीमुळे डोंगर बोडके झाले, रखरख वाढली, पाऊस अनियमित झाला व पर्यायाने पर्यावरणाचा निसर्गाचा समतोल बिघडला स्वच्छ हवेऐवजी प्रदूषित हवा. याशिवाय पर्याय राहिला नाही. याची जाण आता होऊ लागली आहे. ही एक रोगराई विरुद्धची लढाई आहे. धुरीकरणामुळे सातत्याने छळणारा खोकला हा आपण मित्र बनू न देता वेळीच वृक्ष तोड रोखली पाहिजे. आत्तापर्यंत झालेल्या गोष्टीबद्दल चिंता करीत बसण्यापेक्षा नव्याने वृक्ष लागवड करणे यातच शहाणपणा आहे. 

वेळीच जागा होणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे असा हा एककलमी कार्यक्रम अमलात आणणे गरजेचे आहे.
'दुर्दर राहे पाषाणात तया चारा कोण देतो' म्हणणाऱ्या संत सेना महाराजांनी आपणाला प्रश्न केला आहे की जर खडकाखाली राहणाऱ्या बेडकाला आपण चारा देत नाही तर आपल्याला त्याला नष्ट करण्याचा अधिकार काय ? पर्यावरण दूषित करणारे कृमी, कीटक खाऊन बेडूक पर्यावरणाला मदत करतो तो मानवाचा मित्र ठरतो.

 वृक्षतोड झाल्याने प्राणीजीवन विस्कळीत होऊन त्यांना निवाऱ्याची उणीव भासते व काहीवेळेस त्यांचा शिरकाव शहरांमध्ये झाल्यास त्यासारखे भयास्पद ते काय? पाणी, हवा, प्राणी, वृक्ष या सर्वांचा हितकारी संगम म्हणजेच पर्यावरणाचा समतोल.

वृक्ष मानवाचा खरा मित्र आहे तो त्याला लागवड करून सांभाळ करणाऱ्याला आणि त्याचे तोडून तुकडे करणाऱ्यालाही आपली थंड सावली, शुद्ध हवा, फळे, फुले देतो तो कुणाबरोबरही दुजाभाव करीत नाही. 
आपण स्वतःहून वृक्षलागवड करत नसू तर शासनाकडून किंवा सामुदायिकरीत्या रस्त्याच्या कडेला लावलेल्या झाडांचे संगोपन तरी आपण नक्कीच करू शकतो. वृक्षांचा गैरवापर केल्यास प्रदूषणासारख्या महाभयंकर संकटास तोंड देण्याची वेळ आपल्यावर येईल, हे आपण जाणून आहोतच. 

वृक्ष म्हणजे पृथ्वीने आशीर्वादासाठी उचललेले हात आहेत. ते आशीर्वाद नसतील तर मानवजीवन टिकणार नाही बालपणीच्या पाळण्यासाठी मृत्यूनंतरच्या सरणापर्यंत वृक्ष आपल्याला सोबत करतात.या भूतलावर आधी वनस्पती व नंतर प्राणिसृष्टी जन्माला आली आहे, वनस्पती नष्ट झाल्या तर त्या मागोमाग मानवी जीवनही नष्ट होईल.

शहरांतील सिमेंट-काँक्रीटच्या उंच जंगलापेक्षा आपणांस जीवन ताळ्यावर आणण्यासाठी उंच उंच वृक्षराजींच्या वेसणीची गरज आहे मानवाला आज तनशांतीपेक्षा मनःशांतीसाठी जास्त भटकावे लागत आहे. बाजारात पैसे टाकला की खाण्यापिण्यातून, हिंडण्याफिरण्यातून मनःशांती प्राप्त होत आहे. पण मनाच्या शांतीचा लळा बाजारात पुरविला जाऊ शकत नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेले मन बगीचा, उद्यान, अभयारण्य, वन, समुद्र, नदीकाठ, सरोवराच्या शोधात बाहेर पडते. 

निसर्गरम्य वातावरणासाठी खरी गरज आहे. वृक्षांची यासाठी का होईना आपण सामाजिक वनीकरण इ. माध्यमांतून केलेल्या वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. आपल्या स्वार्थी व नियोजनशून्य वृत्तीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे.आजपर्यंत असे केले असले तरी आज सर्वांना अशी शपथ घेण्याची गरज आहे. 'झाडे लावू आणि झाडे जगवू.' या क्षेत्रात घोषणांना महत्त्व नाही प्रत्यक्ष कृतीला महत्त्व आहे.


निबंध 6

झाडे लावा व पर्यावरण वाचवा'हिरव्या पानांना पर्याय नाही, संतुलन झाडांशिवाय नाही' अशा ओळी असलेला एक बिल्ला काही दिवसांपूर्वी सामाजिक वनीकरणातर्फे वाटला गेला. तसेच जळगाव जिल्ह्यात इच्छापूर, कुंडशिवार, खामखेडा पूल व टहाकळी या मुक्ताईनगर परिसरात काही सिंचन योजनांचे भूमिपूजन तापी पाटबंधारे विकास महामंडळाद्वारे संपन्न झाले. या आणि अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यातून जनमानसात पर्यावरणासंदर्भात जागृती होत आहे. 

प्रचंड जंगलतोड, चराऊ कुरणाचा हास व जमिनीची धूप या कारणांमुळे महाराष्ट्रावर वारंवार अवर्षणाचे संकट ओढवून टंचाईसदृश स्थिती निर्माण झाली आहे. म्हणून वनीकरण, मृद व जलसंधारण, चराऊ कुरणांचा विकास अशा उपाययोजना राबवल्या जात आहेत. 


ज्या प्रदेशात वृक्षांचे जमिनीवर वनस्पतिक आवरण असते, तेथील वातावरण पावसाला अनुकूल असते. कारण तेथल्या जमिनीतून व वनस्पतींच्या पानांतून जे बाष्पीभवन होते, त्यामुळे हवेत आर्द्रता निर्माण होते. ही आर्द्रता ढगातून पाऊस पाडण्यास कारणीभूत होते. म्हणून वनीकरण, फलोद्यान, गवते व चारा यांची लागवड करणे गरजेचे वाटते. वृक्षतोडीमुळे भूपृष्ठ, माळराने उजाड झालीत. पावसाचे पडणारे पाणी या हिरव्या झाडाझुडुपांमुळे अडून राहते. मूळांकडे जाते. म्हणजे भूगर्भात पाणी मुरवण्याचे काम निसर्ग करीत असतो. म्हणून वृक्षारोपण केले, तर पाण्यासाठी दाही दिशा अशी कठीण अवस्था होणार नाही.


मानवजातीकडून होणाऱ्या निसर्गावरील वाढत्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा समतोल ढळत चालला आहे.  मूलभूत गरजा भागवताना होणारी वनसंपत्तीची बेछूट लूट थांबणे व त्याचवेळी पुनर्निर्मिती अर्थात झाडे लावणे आवश्यक आहे. 'नैसर्गिक संपदेचा नाश हा अविचार' आणि 'वृक्षारोपण हा आजचा सुविचार' आहे. वृक्षारोपण केले, तरच भूगर्भातील पाणीपातळी सांभाळली जाईल.


श्री छत्रपती शिवाजीमहाराजांनी ३०० वर्षांपूर्वीच त्यांच्या आज्ञापत्रांत वनउत्पादनातल्या वापरासंबंधी काही तत्त्वे ठरवून दिली आहेत. ते म्हणतात, 'रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी बहुतकाळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडिविलयावरी त्यांचे दु:खास पारावार काय?' सम्राट अशोकाने २३०० वर्षांपूर्वी 'राजाज्ञेत प्राणिसंरक्षण आणि वृक्षसंवर्धन याविषयी नमूद केले होते. 


आज तंत्रज्ञानाचा पर्यावरणावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. प्रदूषण वाढत आहे. ही दखलपात्र घटना वरील पार्श्वभूमीवर विचारात घेण्यासारखी आहे. म्हणून या पर्यावरणाच्या जाणिवेची नितांत गरज आहे.
रस्त्याने चालताना डोक्यावर सावली धरणारी झाडे दिसत नाहीत. वृक्षामुळे आपणास अन्न, प्राणवायू, आर्द्रता मिळून मृद्संहार थांबतो. त्याशिवाय का तुकाराम महाराजांनी वृक्षवल्लींना आपले सोयरे मानले? म्हणजे झाडे जसे भूमिपुत्र, तसे आम्हीही याच मातीची लेकरे... म्हणून 'झाडे लावा आणि पर्यावरण अर्थात विश्व वाचवा' अशा घोषणा अस्तित्वात आल्या.


वृक्षदिंड्याही कौतुकाने निघतात. चांदोबा लपायलाही पूर्वीपासून निंबोणीचे 'झाड' च लागत आले आहे. परसदारी पवित्र ‘तुळसी' चे रोप लागते. मंगलप्रसंगी केळीचे खोड स्नेह्यागत उभे राहते, तर आंब्याची पाने शुभ पताका होऊन दारी मुंडावळ्यागत शोभिवंत होतात. अशी संगसोबत आयुष्यभर झाडे देतात. खऱ्या अर्थाने सोयरे छायादायी ठरतात. बालकवींच्या शब्दांत हरिततृणांच्या मखमालीचे हिरवेहिरवेगार गालिचे आपल्या रंग-सौंदर्याने डोळियांचे पारणेच फेडतात. 


झाडे-पाने, फुले, फळे, औषधी, इंधने, सुगंध, पाऊस, छाया, आधार, चारा, प्रदूषणशोषण, निवारा एवढेच नव्हे, तर पैसासुद्धा देतात. म्हणूनच 'चिपको आंदोलन, वृक्षमित्र मंडळे, जलसंवर्धन, सामाजिक वनीकरण, वनशेती, पर्यावरण बचाव... या साऱ्या गोष्टींना खूप महत्त्व येत आहे.  प्रत्येकाने वृक्षवल्ली वाचवण्याचा, वाढवण्याचा स्वयंनिर्धार करायला हवा.


पर्यावरणाचे आपण केवळ वारसदार नसून त्याचे रक्षण करून, त्याला समृद्ध करणारे विश्वस्तही राहू. काळाची गरज म्हणून पर्यावरणाचा समतोल कायम राखू आणि त्यासाठी झाडे लावू !" यानिमित्त 'वनराई' चळवळीचे जनक मोहन धारियांना सलाम ! 'सामाजिक वनीकरण-ग्रामीण फळबागा-परसबागा' ही ग्रामीण विकासाची त्रिसूत्री राबविणाऱ्या अवघ्यांना सलाम ! 'एक व्यक्ती-एक झाड' योजना जे प्रत्यक्ष आचरणात आणतील, त्या प्रत्येकाला सलाम ! ‘पाणी अडवा - पाणी जिरवा' मोहीम राबविणाऱ्या राळेगणसिद्धीच्या सिद्धपुरुषाला अर्थात अण्णा हजारेंनाही सलाम !


चला, पर्यावरण वाचवण्यास, झाडे लावण्यास कटिबद्ध होऊया 
 रक्षावया पर्यावरण, उपाय एकच... वृक्षारोपण

निबंध 7


 झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध 

निसर्ग ही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. डोंगर, दऱ्या, नद्या, पहाड, विविध प्रकारची झाडे, वेली, पशू, पक्षी, कीटक, सूक्ष्म जीव इत्यादी सर्व मानवाला मिळालेली नैसर्गिक संपत्ती आहे. ही पृथ्वी सुंदर दिसते ती झाडे वेलींमुळे. झाडे नसती तर ही पृथ्वी उजाड, भकास दिसली असती. केवळ नद्या, नाले, पहाडांनी ही वसुंधरा सुंदर दिसली नसती. म्हणून पृथ्वीच्या सौंदर्यात वृक्ष वेलींचा महत्त्वाचा वाटा आहे. पृथ्वीचा साज श्रृंगार म्हणजे झाडे वेली.तुकाराम महाराज केवळ वृक्ष वेलींनाच सोयरे मानतात असे नव्हे तर (वनचरे) वनातील प्राण्यांना सुद्धा ते आपले सोयरे मानतात. पक्षांचा मंजूळ स्वर त्यांना अतिशय आवडतो. मानवांच्या गोंगाटापासून जर दूर जायचे असेल तर भरपूर वृक्ष वेली असलेल्या वनात जावे लागेल. तेथे एकांत मिळतो. तुकाराम महाराज कधी-कधी एकांतात बसून मनन चिंतन करीत असत. एकांतात लोभ, मोह,माया, लालसा, द्वेष, मत्सर, या दुर्गुणांपासून मनूष्य दूर होतो. त्यामुळे एकांत सुखकर वाटतो. निसर्गाच्या सान्निध्यात मन प्रसन्न होते. पृथ्वीचं हे सुंदर रुप, विविध पशु पक्षी, त्यांचे विविध आवाज, खळखळ आवाज करुन वाहणारे ओढ्याचे पाणी, विविध रंगाची व विविध आकाराची फुले. त्यांचा वेगवेगळा सुगंध, वेगवेगळ्या रंगाची व आकाराची फळे, प्रत्येकाची वेगळी चव, वळणाच्या वाटा,चढ उताराचा रस्ता, ह्या सर्व गोष्टींचा आस्वाद घ्यायचा असेल तर  निसर्गाच्या सान्निध्यात जावे लागेल. परंतु अशी ठिकाणे दिवसेंदिवस झपाट्याने कमी होत आहेत. 


मनुष्य वृक्षांची कत्तल करतो आहे. जंगलेच्या जंगले नष्ट होत आहेत. जंगले नष्ट करणे म्हणजे मानवी जीवन धोक्यात घालणे होय. हे महत्त्व पटवून देण्यासाठी तुकाराम महाराज वृक्षांना व वनचरांना आपल्या सोयऱ्यांची उपमा देतात. त्यामुळे त्यांच्या ह्या अभंगाला शास्त्रीयदृष्ट्या महत्त्व आहे. त्यांचा हा अभंग मानवाला एक चेतावणी आहे की जंगले व त्यातील प्राणी नष्ट करु नका. नातलगा प्रमाणे त्यांना महत्त्व द्या. अन्यथा आपली हानी करुन बसाल. 


त्यांच्या चेतावनीची प्रचीती आज आपणास येत आहे. २००५ मध्ये कोंकणातील दासगाव, जुई इत्यादी गावे भूस्खलनामुळे गाडली गेली होती. तसेच २०१४ मध्ये पुणे जिल्ह्यातील माळीन हे गाव सुध्दा पूर्णपणे गाडले गेले. हा सर्व जंगल तोडीचा दुष्परिणाम आहे. मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाचा हा दुष्परिणाम आहे.
जर कराल नष्ट जंगले तर, धराशायी होतील बंगले वाचवा वृक्ष वल्ली, वनचरे ,तरच राहील भविष्य बरे

निबंध 8


वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ! संत तुकारामांनी ३०० वर्षांपूर्वी सांगून ठेवले आहे की, 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे!' वृक्ष, जंगले यांची उपयुक्तता लक्षात घेऊन त्यांना आपले सगेसोयरे म्हटले आहे. माणसाचे निसर्गाशी नाते अतूट असते. मानवी


जीवन वनस्पतींवर अवलंबून असते. वनस्पती नसतील तर मानवी जीवन अस्तित्वातच राहणार नाही. म्हणून वृक्षवल्ली हे आपले निसर्गधन आहे. फार पूर्वी मानव निसर्गाच्या सान्निध्यातच वनांमध्ये राहत होता. अन्न, निवारा, वस्त्र (वल्कल) त्याला वृक्षांपासूनच मिळत होते. आजारी पडल्यास औषधे वृक्षवेलींपासूनच मिळत होती. त्यामुळे औदुंबर, तुळस अशा वनस्पतींत दैवी अंश आहे असे मानत असत, आजही आपण या वृक्षांना पवित्र मानतो.


'हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमलीचे' अशी बालकवींनी वर्णिलेली मखमली हिरवळ आपणा सर्वांनाच आवडते. हिरव्यागार वनश्रीने नटलेले निसर्गाचे रूप आपल्या सान्निध्यात माणसाला आनंदाने बेहोष करून टाकते. त्याच्या मनातील उदासीनता नाहीशी करून त्याचे मन प्रसन्न करून टाकते. त्यामुळे हल्ली अनेक लोक पर्यटनाद्वारे निसर्गाच्या कुशीत जात असतात. वृक्ष केवळ मनालाच शांती देतात असे नाही, तर मानवाच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी करतात.

जंगले असल्यास पाऊस भरपूर पडतो, जमीनीची धूप होत नाही, आपल्याला फळे, फुले, छाया यांची लयलूट होते. इमारती बांधण्यासाठी लाकूड, फर्निचरसाठी लाकूड, कागद निर्मितीसाठी लाकूड वृक्षांपासूनच मिळते. वृक्ष हवाशुद्धीचेही काम करतात. कारखान्यातून निघालेला दूषित वायू, कर्बवायू शोषून प्राणवायू बाहेर सोडतात. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीनेही जंगलांचे महत्त्व खूपच आहे. आजकाल वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे जास्ती पाऊस, कमी पाऊस अशा दुर्घटना घडू लागल्या आहेत. मातीची धूप, दरडी कोसळणे अशा गोष्टी हल्ली जास्त प्रमाणात आढळून येतात. झाडे वातावरणातील उष्णता शोषून घेतात म्हणून झाडांभोवती गारवा असतो. हिरवी सृष्टी मनाला आल्हाददायक वाटते. आजकालच्या विज्ञानयुगात माणूस निसर्गापासून दूर चालला आहे. उंचउंच इमारतींच्या जंगलात खरी जंगले नामशेष व्हायला लागली आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढळत आहे. हा तोल साधण्यासाठी पुन: झाडे लावण्याची मोहीम चालू झाली आहे. 'झाडे लावा, देश वाचवा' अशी घोषणा करून सरकारने सामाजिक वनीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. 


बहुगुणांचे 'चिपको आंदोलन' यासाठीच आहे. सरकारप्रमाणेच सामान्य माणसाचाही हातभार लागणे आवश्यक आहे. तेव्हा एकमेकांना भेटीदाखल रोप द्यावे, कुटुंबात मूल जन्माला आले की एक झाड लावावे, त्याची देखभाल करावी. सहकारी सोसायट्यांनी आपल्या परिसरात झाडे लावावीत. म्युनिसिपालिटीने रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावावीत. तसेच जंगलतोड होऊ नये म्हणून कागद कारखाने स्वत:च बांबूची जंगले वाढवितात. काही देवराया असतात, असे मानले जाते. म्हणजे काही जंगले देवांची मानतात. त्या ठिकाणी कोणी झाडे तोडत नाहीत. त्यामुळे त्या वृक्षांचे जतन होते.


या साऱ्या गोष्टींना यश येऊन पुन: जिकडेतिकडे हिरवेगार वृक्ष दिसू लागतील, सुजलाम् सुफलाम् अशी भारतभूमी नंदनवन बनेल, अशी आशा करूया. यंत्रयुगाची यांत्रिकता, कागदपत्रांची उलाढाल हे काही काळ दूर सारून माणूस वनराईच्या संगतीत राहिला तर निसर्गाचा  रंग त्याच्या मनावर चढेल आणि निसर्गाशी असलेले नाते घट्ट विणीने विणले जाईल. मानव निसर्गाशी एकरूप होईल, निसर्गात मिसळून जाईल.

Zade Lava Zade Jagva | झाडे लावा झाडे जगवा

मोबाईल शाप की वरदान | Mobile Shap Ki Vardan

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध  बघणार आहोत. मानवाने तयार केलेल्‍या या क्रांतीकारी उपकरणाचे फायदे व आरोग्‍यावर होणारे तोटे सांगीतले आहे.मोबाईलमुळे मानवी जिवनात काय बदल झाले व त्‍याचा उपयोग कसा करून घेता येईल याविषयी सविस्तरपणे माहीती सांगीतली आहे चला तर मग सुरू करूया निबंधाला .

माणसाने लावलेल्या अनेक शोधांमध्ये स्‍मार्टफोन  म्हणजेच मोबाईलचा  शोध हा सर्वांत महान शोध म्हणावा लागेल. पुराणकथेतील वामनाने साडेतीन पावलांमध्ये सर्व विश्व पादाक्रांत केल्याचे सांगितले जाते. पण मोबाईलच्या इवल्याशा उपकरणाने एका पावलात अक्षरशः संपूर्ण जग पादाक्रांत केले आहे. आज श्रीमंतांपासून ते गरीबलोकांपर्यंत  अक्षरशः सर्वांच्या खिशात हा मोबाईल असतो. या मोबाईलशिवाय हल्ली कोणाचे पानही हलत नाही.

या मोबाईलने अल्पावधीतच आपले प्रताप दाखवायला सुरुवात केली आहे. सर्व लोक या मोबाईलच्या पूर्णपणे आहारी गेले आहेत. कोठेही जा, लोक मोबाईलवरून कोणाशी ना कोणाशी तरी सतत बोलत असतात. गाडीतून उतरल्यावर, रस्त्याने चालताना, गाडी चालवताना, इतकेच नव्हे, तर घरी आल्यावरही सतत कोणाशी तरी बोलत असतात. सतत बोलण्यात गुंतल्यामुळे बोलणाऱ्याचे भोवताली लक्षच नसते. यामुळे अनेकदा अपघात होतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बोलणाऱ्याचे भोवतालच्या माणसांकडे लक्ष नसते.

आपली मित्रमंडळी, नातेवाईक, घरातील माणसे यांच्याशी जिवाभावाच्या दोन गोष्टी बोलणे दुरापास्त झाले आहे. यामुळे माणूस भावनिकदृष्ट्या इतर व्यक्तींपासून दुरावत चालला आहे. एक प्रकारचा दुरावा निर्माण होत आहे. व्यक्तीला निवांतपणे स्वत:कडेही पाहायला वेळ राहिलेला नाही. आजकाल मोबाईलमध्‍ये गेम खेळने नेहमीची गोष्‍ट झाली आहे. त्‍यातच PUBG (Player Unknown's Battle grounds.) या गेमने  धुमाकुळ घातला आहे. मुले तहान भुक विसरून हा गेम खेळतात त्‍यामुळे त्‍यांंच्‍या अभ्‍यासाकडे व आरोग्‍याकडे दुर्लक्ष होते.   


Mobile Shap Ki Vardan
Mobile Shap Ki Vardan 


मोबाईलमुळे शारीरिक दुष्परिणामही होतात. हे उपकरण सतत कानाला लावून ठेवल्यामुळे विशिष्ट इलेक्ट्रॉनिक किरण मेंदूवर विपरीत परिणाम करतात. त्याचबरोबर माणसातील विकृतीला खूप वाव मिळू लागला आहे. इतरांना वाईटसाईट SMS, WhatsApp करणे , बदनामीकारक मजकूर पाठवणे हे सर्रास घडत आहे. परीक्षेतील गैरव्यवहारांसाठी या उपकरणाचा उपयोग विदयार्थी खूप चतुराईने करत आहेत.

 'गणपती दूध पितो' यांसारख्या अंधश्रद्धात्मक अफवा मोबाईलमुळेच जगभर पसरतात. भीषण बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठीही या उपकरणाचा उपयोग गुन्हेगारांनी केल्याचे उघड झालेले आहेच. हे सर्व पाहिले की, हा मोबाईल  शाप तर नाही ना, असे मनात आल्यावाचून राहत नाही.

मात्र मोबाईलला शाप म्हणणे खुपच एकांगी होईल. वास्तविक पाहता,मोबाईल  हे संपर्काचे उत्कृष्ट माध्यम आहे. आपण कोणाशीही, कधीही आणि अक्षरश: जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी कुठूनही संपर्क साधू शकतो. भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना, माझा देश कसा, तर “सारे जहाँ से अच्छा" असे या मोबाईलमुळेच सांगू शकला.

आपण कोणाशीही चटकन संपर्क साधू शकत असल्यामुळे आपली कामे भराभर होऊ शकतात. विदयार्थ्यांनाही लहानसहान शंकांचे निरसन करून घेण्यासाठी हे साधन खूप उपयुक्त ठरते. यामुळे अभ्यासाचा, कामांचा वेग वाढला आहे. वेळेचा अपव्यय कमी झाला आहे. आपल्याला हवी असलेली व्यक्ती कामात गुंतलेली असेल, तर आपण एस्एम्एस् पाठवू शकतो. आधुनिक काळातील गतिमान जीवनाशी हा मोबाईल  सुसंवादी आहे.

नोकरीवर जाणाऱ्या पतिपत्नींना घरात एकटे असलेल्या आपल्या मुलांशी विडीओ कॉल करून संपर्क साधता येतो. त्यांना काही हवे-नको असल्यास त्यांची काळजी घेता येते. वृद्ध एकाकी व्यक्तींना तर हा फार मोठा आधार बनला आहे. हल्ली मोबाईलवरून आपल्या विविध बिलांची माहिती मिळते. बातम्या, चित्रपट तर केव्हाच सुरू झाले आहेत. नाटक-सिनेमा, रेल्वे, विमाने यांची तिकिटे मोबाईलवरून खरेदी करता येऊ शकतात. 

दूरदर्शन आकाशवाणीवरील कार्यक्रमांमध्ये या मोबाईलमुळे लोकांचा सहभाग वाढला आहे. हल्ली कित्येक गुन्हयांचा उलगडा मोबाईलमुळे झाल्याचे दिसून येते. एके ठिकाणी पावसाळ्यात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या व्यक्तीचा मोबाईल वाजला आणि त्याचा जीव वाचवणे अग्निशमन दलाला शक्य झाले !

मोबाईलचे फायदे किती सांगावेत ! तोटे आहेतच, पण तो त्या उपकरणाचा दोष नव्हे. हे उपकरण वापरणाऱ्या माणसाचा तो दोष आहे. तेव्हा या दूरसंचाराला - मोबाईलला - शाप कसे म्हणणार?

मित्रांनो तुम्‍हाला brahman dhwani shap ki vardan marathi nibandh हा कसा वाटला हे कमेंट करून शांगु शकता , तुम्‍ही मोबाईलचा वापर कमी करण्‍यासाठी कोणते उपाय उपयोगात येतील हे सांगु शकता यामुळे आमच्‍या इतर वाचकांना तुमच्‍या सल्‍याचा उपयोग होऊ शकेल, धन्‍यवाद .
महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

 • भ्रमणध्वनीचा (स्‍मार्टफोन) शोध हा एक महान शोध 
 • खूप दुष्परिणाम
 • दूरध्वनीवर सतत
 • बोलत राहणे 
 • भोवतालापासून तुटलेपण 
 • SMS चे खूळ-वाईट उपयोग 
 • बदनामीसाठीही
 • अंधश्रद्धा पसरवण्यासाठी
 • परीक्षेतील गैरव्यवहार वाढण्यास मदत 
 •  बॉम्बस्फोट 
 • परंतु खूप उपयुक्त 
 • कोणाशीही, कुठेही, कधीही संपर्क
 • कामाचा वेग वाढला 
 • वेळेचा अपव्यय कमी
 • शाळकरी मुले व वृद्ध व्यक्तींसाठी उपयोगी 
 • अडचणींच्या वेळी तर देवदूतच 
 • गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठीही उपयोगी 
 • चांगले-वाईटपण वापर करणाऱ्यावर अवलंबून.

मोबाईल शाप की वरदान | Mobile Shap Ki Vardan

दूरचित्रवाणी शाप की वरदान? मराठी निबंध | Television A Bane Or Boon Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण दूरचित्रवाणी शाप की वरदान? मराठी निबंध बघणार  आहोत.  कोणत्यारही गोष्टीचा अतिरेक झाला की त्याचे वाईट परीणाम दिसण्यास सुरूवात होतात, दूरचित्रवाणी शाप ठरू शकेल अश्या प्रसंगाचे वर्णन या निबंधात केले आहे आणि दूरचित्रवाणी वरदान ठरण्यापसाठी काय केले पाहीजे  याबद्दल माहीती दिली आहे चला तर सुरूवात करूया निबंधाला. 


दूरचित्रवाणीचा प्रसार मुख्यतः शहरांतून मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. तरीही काहीजणांना दूरचित्रवाणी हा शाप वाटू लागला आहे. असे का बरे?

दूरचित्रवाणीच्या प्रलोभनातून काही धोके जरूर संभवतात. शहरात जागेची समस्या फारच बिकट असल्याने, विशेषत: चाळीतील व झोपडपट्टीतील लोक दूरदर्शनवरील कार्यक्रम अगदी जवळून पाहत असल्यामुळे, त्याचा त्यांच्या दृष्टीवर वाईट परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. कार्यक्रम पाहण्यासाठी लहान जागेत खूप माणसे तासन्तास बसतात, हेही आरोग्याच्या दृष्टीने विघातक आहे. टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या विविध वाहिन्यांवरील चित्रपटांमुळे मुले क्रीडांगणाला दुरावली, ग्रंथवाचनाला पारखी झाली. टीव्हीवर कार्यक्रम पाहताना कुणी पाहुणे आले, तर त्यांचे यथोचित स्वागत होत नाही.

दूरचित्रवाणीवरील बहुसंख्य कार्यक्रम हे चित्रपटांवर आधारित असतात. त्यामुळे युवावर्ग त्या आभासामागे धावतो व वास्तवाला पार विसरून जातो. विविध कार्यक्रमांतून जाहीर केलेली मोठमोठ्या किमतीची बक्षिसेही त्याला स्वप्ननगरीत नेतात आणि प्रामाणिक प्रयत्नांचे व कष्टांचे महत्त्व त्याला वाटेनासे होते.

वास्तविक पाहता दूरचित्रवाणी हे ज्ञानप्रसाराचे प्रभावी माध्यम आहे. खेड्यांतील शेतकऱ्याला, मजुराला त्यांच्या विविध उपयुक्त अशा व्यवसायांचे ज्ञान देता येईल, आज आपल्यापुढे प्रौढ शिक्षणाचा यक्षप्रश्न उभा आहे. हा प्रश्न सोडवण्यास दूरचित्रवाणीची मोलाची मदत होईल. ज्ञानप्राप्तीत केवळ ऐकण्‍यापेक्षा , पाहणे व ऐकणे अधिक परिणामकारक ठरते. 'दूरदर्शन'मध्ये तर पाहणे व ऐकणे दोहोंचाही समन्वय आहे. या साधनांच्या मदतीने साऱ्या जगाचा फेरफटका आपल्याला घरबसल्या करता येतो.


तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, परराष्ट्रीय नेत्यांच्या भेटीच्या घटना, जगात चाललेल्या विविध खेळांच्या स्पर्धा या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला दूरचित्रवाणीमुळे घरी आरामात बसून घेता येतो. हजारो वर्षांपूर्वी लिहिले गेलेले रामायण, महाभारत हे ग्रंथ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचले ते दूरचित्रवाणीमुळेच ना!

अशा या दूरचित्रवाणीला शाप समजून दूर लोटणे योग्य होणार नाही. मात्र दूरचित्रवाणीचे कोणते कार्यक्रम पाहायचे याबददल कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांनी तारतम्याने विचार करणे आवश्यक आहे. अभ्यासाला पूरक ठरणारे कार्यक्रम विदयार्थ्यांनी अवश्य पाहावेत.

'आधी अभ्यास, मग मनोरंजन' हे पथ्य मात्र दूरदर्शनवरील इतर कार्यक्रमांच्या बाबतीत अवश्य पाळावे. असे झाल्यास दूरदर्शन आपल्याला मोठे वरदानच ठरणार आहे, यात शंका नाही.

 Television A Bane Or Boon Essay In Marathi
Television A Bane Or Boon Essay In Marathi
मित्रांनो तुम्हाला दूरचित्रवाणी शाप की वरदान? मराठी निबंध | Television A Bane Or Boon Essay In Marathi कसा वाटला हे कमेंट करून कळवा.  भारताला प्रगतीशील समृध्द  राष्‍ट्र बनविण्यातसाठी व दूरचित्रवाणीच्या वापराबद्दल जनजागृती होण्याासाठी हा निबंध आपल्या मित्र परीवारा सोबत शेअर करा . धन्यवाद 

Nibandh 2 

"अग नीता, तू आहेस तरी कोठे?" नीताच्या आईच्या शब्दांत संताप अगदी ओथंबला होता. “अग, उदया तुझी परीक्षा आणि तू बसली आहेस टी. व्ही. वरचा चित्रपट पाहत." पहिली पाच मिनिटे नीताने लक्ष दिले नाही, पण आईचा सूर चढला, तेव्हा नीता त्या गर्दीतून उठली, मोठ्या नाखुषीनेच. कारण तिच्या आवडत्या नटनट्यांचा चित्रपट चालू होता. नीताच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून नीताच्या बाबांनी दूरचित्रवाणी  आणण्याचे टाळले; पण नीता शेजारीपाजारी जाऊन टी. व्ही. पाहतेच.

  आता हे दुसरा प्रसंग  पाहा. टी. व्ही. वर काहीतरी रंगतदार कार्यक्रम चालला आहे. आईबाबा त्यात रंगले आहेत; तरी घरातील बाबांच्या शिस्तीमुळे मोहन व मुग्धा आपल्या खोलीत अभ्यास करीत आहेत. सातव्या इयत्तेतील मोहनला नफ्यातोट्याचे गणित अडले. खूप प्रयत्न करूनही सुटेना तेव्हा तो वही-पुस्तक घेऊन आईकडे गेला आणि ते उदाहरण सोडवून देण्यासाठी विनवणी करू लागला. “थांब रे बाबा, आता मध्येच नको तुझी कटकट,” टी. व्ही. पाहणाऱ्या आईसाहेब कडाडल्या. मोहन हिरमुसल्या तोंडाने खोलीत परतला. पण त्याचे अभ्यासात लक्ष लागेना. या प्रसंगांतील नीताच्या आईला व छोट्या मोहनला दूरचित्रवाणी ही नक्कीच शाप वाटेल.

दूरचित्रवाणीची लोकप्रियता ही आपल्या देशात वाढतच  आहे,  पण आजही तिचा संचार  मोठमोठ्या शहरांतूनच आहे. अदयापिही ती खेडोपाडी पोहोचली नाही तोच काहीजणांना दूरचित्रवाणी हा शाप वाटू लागला आहे. तिचे तोटेच अधिक भासू लागले आहेत. दूरचित्रवाणीच्या आकर्षणातून काही धोके संभवतात. आजकाल त्याची चर्चा वृत्तपत्रांतून होत असते. मुंबईसारख्या ठिकाणी अनेक लहानसहान खोल्यात T.V. ठेवतात व कमी अंतरावरून  चित्र पाहिले जाते. त्याचा दृष्टीवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. हा परिणाम काही वर्षांनी लक्षात येईल. दुसरी गोष्ट अशी की, लहान जागेत खूप माणसे तासन् तास बसतात हेही आरोग्याच्या दृष्टीने विघातकच आहे.

शनिवारी, रविवारी टी. व्ही. वर दाखविल्या जाणाऱ्या चित्रपटांमुळे मुले क्रीडांगण विसरली. टी. व्ही. वर कार्यक्रम पाहताना कुणी पाहणे आले तर त्यांचे यथोचित स्वागत होत नाही. मित्रमंडळींशी मोकळ्या गप्पा मारण्याऐवजी बहुसंख्य लोक टी. व्ही. वर नजर लावून बसतात. ज्यांच्याकडे टी. व्ही. संच असतो त्यांना कार्यक्रम पाहावयास येणाऱ्यांकडून विविध त-हेचे त्रास होतात. दूरचित्रवाणी ही ज्ञान व मनोरंजन या दोन्ही उद्दिष्टांसाठी काम करीत असते; पण आज लक्षात घेतला जातो तो भाग केवळ मनोरंजनाचा. त्यामुळे आज अनेकांना दूरचित्रवाणी शाप वाटते. काहींच्या मते दूरचित्रवाणीमुळे समाजातील आर्थिक विषमतेची दरी फार मोठी झाली आहे.

ठराविक रंगाचा चष्मा लावून पाहणाऱ्यांना सर्व वस्तू त्याच रंगाच्या दिसणार. त्यामुळे दूरचित्रवाणीचे तोटे उगाळणाऱ्यांना तोटेच दिसणार. खरं पाहता दूरचित्रवाणी हे ज्ञानप्रसाराचे प्रभावी साधन आहे. त्यासाठी दूरचित्रवाणी अगदी खेडोपाडी जाऊन पोहोचली पाहिजे. किंबहुना तिची तेथेच अधिक गरज आहे. खेड्यातील शेतकऱ्याला, मजूराला ती विविध क्षेत्रांतील ज्ञान देईल आज आपल्यापुढे प्रौढ शिक्षणाचा फार मोठा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडविण्यास दूरचित्रवाणीची फार मोठी मदत होईल. 

ज्ञानप्राप्तीत ऐकण्‍यापेक्षा पाहण्‍याचा मोठा वाटा असतो. केवळ ऐकण्यापेक्षा जे आपण पाहतो ते आपल्या स्मरणात अधिक राहते; अनेक कलावंतांना आपण पूर्वी फक्त चित्रपटांतून पाहत होतो; त्यांना आता आपण प्रत्यक्ष मुलाखतीत पाहू शकतो. साऱ्या जगाचा फेरफटका आपल्याला घरबसल्या करता येतो. विदयार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, परराष्ट्रीय नेत्यांच्या भेटीच्या घटना, जगात चाललेल्या विविध त हेच्या खेळांतील स्पर्धा या सर्व गोष्टींचा लाभ आपल्याला दूरचित्रवाणीमुळे साधता येतो. पण त्यासाठी योग्य नियोजन मात्र हवे. 

उलट विदयार्थ्यांपुढे पालकांनी असा दंडकच ठेवावा की अभ्यास पूर्ण झाला तरच चित्रपट पाहावयास मिळेल. आपल्याबरोबर आपल्या घरातील चाकरमाणसे, शेजारची गरीब माणसे यांना दूरचित्रवाणी पाहावयास सहभागी केले तर आर्थिक विषमतेमुळे निर्माण होणारी दरी थोडी कमी होईल.


Nibandh 3

दूरदर्शन (टी. व्ही.): शाप की वरदान? 


अंध धृतराष्ट्राजवळ बसून युद्धभूमीवरील घडामोडी पाहण्याची 'दिव्यदृष्टी' एकट्या संजयला होती. परंतु स्थलकालाचे बुरूज फोडून जगातील कोणतीही गोष्ट, घडामोडी घरबसल्या दाखविण्याची जादू दूरदर्शनने केली आहे. जॉन लॉग बायर्डने दूरदर्शनचा शोध लावून सर्व जग आपल्या छोट्या खोलीत आणले. दूरदर्शनचा शोध अमेरिकेत १९२६ साली जरी लागला असला तरी प्रत्यक्ष भारतात यायला त्याला १९५८ साल उजाडले व रंगीत रूप धारण करायला १९८२ साल. सध्या एकंदरीत दूरदर्शनवर (T.V.) 200 पेक्षा जास्त चॅनल्स सुरू झाले आहेत. या 'इडियट बॉक्स'नं खरोखरच सर्वांना वेडं केलं आहे.मुक्त व्यापारी धोरणाचा परिणाम दूरदर्शनवर निखळ, शुद्ध मनोरंजनाचे, सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम दाखविण्याऐवजी हिंसा, विकृती यांचे दर्शन मोठ्या प्रमाणात घडविणारे कार्यक्रमच जास्त दिसू लागले आहेत. त्यामुळे तरुणांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये दूरदर्शनविषयी जबरदस्त आकर्षण निर्माण झालं आहे. त्यामुळे पालक, शिक्षक, समाजसेवक यांना दूरदर्शनच्या दूरगामी होणाऱ्या दुष्परिणामांची भीती वाटू लागली आहे. मुले अभ्यास करत नाहीत, बाहेर खेळायला जात नाहीत, खात नाहीत, त्यांचे डोळे बिघडले, इत्यादी तक्रारी तर ऐकायला मिळतातच, परंतु दूरदर्शनवरील कार्यक्रमातून पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण पाहिल्यावर भारतीय संस्कृती' नष्ट होईल की काय, या विचाराने सुशिक्षित लोक धास्तावले आहेत. त्यामुळे उत्तम शैक्षणिक मूल्यं असलेलं हे दृक्श्राव्य साधन ‘शाप' वाटू लागलं आहे.


दूरदर्शनवर ज्ञान व माहिती देणारे कार्यक्रम असतात.  दूरदर्शनवर बालांसाठी, प्रौढांसाठी तसेच युवकांसाठी, महिलांसाठी व ग्रामीण भागातील लोकांसाठी खास कार्यक्रम असतात. दिवसभर कष्ट करून आल्यावर 'दूरदर्शन' म्हणजे एक "दिलासा'च वाटतो.


 परंतु या दूरदर्शनचे नकळत वाईट परिणाम झाले. 'रामायण' टी. व्ही.वर लागायचं त्या काळात आजारी माणसाला 'रिक्षा' किंवा 'टॅक्सी'ही मिळायची नाही. किंवा टी. व्ही.वर चांगला कार्यक्रम लागला असला, की आलेल्या पाहुण्यांशी बोलायलाही लोक तयार नसतात. टी. व्ही.मुळे प्रौढांचे व मुलांचे वाचन कमी झाले. मुलांचा संध्याकाळचा खेळ व प्रौढांचे सायंकाळचे फिरणे बंद झाले. 


ध्वनिप्रदुषण वाढले. केबल टी. व्ही. तर पालकांना डोकेदुखी वाटू लागली. मुलांची मित्रमंडळी कमी झाली. बुद्धिबळासारखे खेळ खेळण्यास पार्टनर मिळू शकत नाही, अशा तक्रारी ऐकू येऊ लागल्या. डोळ्यांवर वाईट परिणाम झाले. एवढेच काय, एखादा दिवस टी. व्ही. बंद ठेवला तर घरात करमत नाही.वातावरण उदास होते. या झालेल्या सर्व दुष्परिणामांना स्वीकारूनही असं म्हणावं लागेल, की गेल्या तीस वर्षांत टी. व्ही.ने फार मोठी सामाजिक, शैक्षणिक कामगिरी बजावली आहे. टी. व्ही.मुळे अभ्यास होत नाही,' ही गोष्ट तितकीशी खरी नाही. कारण गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांनीही आम्ही टी. व्ही. बघत होतो,' असे मुलाखतीत स्पष्ट सांगितले आहे. 


टी. व्ही.मुळे अंधश्रद्धा कमी झाल्या. वैज्ञानिक दृष्टिकोण निर्माण झाला. कुटुंबनियोजनाचा सोपा उपाय जनतेला समजला. बालकांच्या आरोग्याचे रक्षण होऊ लागले. पॉझिटिव्ह हेल्थ शो' व 'योगा' या कार्यक्रमामुळे आरोग्यविषयक जाणीव निर्माण झाली. 


टी. व्ही.वरील बातम्या व इतर क्रीडा-विषयक सामने पाहून आंतरराष्ट्रीय खेळाडू लोक पाहू शकले. भौगोलिक ज्ञान व सामान्य ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. एवढी महान कामगिरी टी. व्ही.द्वारे होत असताना टी. व्ही.ला 'शाप' म्हणणे बरोबर होईल का?


टी. व्ही.चे वाईट परिणाम टाळायचे असतील तर पालकांनी, कुटुंबप्रमुखांनी कंबर कसली पाहिजे. टी. व्ही.वरील कार्यक्रमांची निवड केली पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवून दिले पाहिजे. त्यात टी. व्ही. पहाण्यासाठी वेळ ठेवला पाहिजे. 'बातम्या,  वर्ल्ड धिस वीक'सारखे कार्यक्रम मुलांसमवेत आपण पाहिले पाहिजेत. शैक्षणिक कार्यक्रमांबद्दल मुलांमध्ये आवड निर्माण केली पाहिजे.  एखाददुसरी चांगली सिरियलही आवर्जुन मुलांसह पाहावी. परंतु टी. व्ही.वरचे सर्व कार्यक्रम आपण पाहिलेच पाहिजेत, नाहीतर ते कार्यक्रम फुकट जातील असा गैरसमज करून घेऊ नये. 


काय पहावे? किती पहावे? केव्हा पहावे? यांचे भान ठेवल्यस टी. व्ही. देवदूत वाटेल. टी. व्ही.चा उपयोग फक्त मनोरंजनासाठी केल्यास जीवन विलासी बनते. दिवास्वप्न पहाणे, कल्पनाविश्वात रमणे, वास्तवतेला सामोरं जाण्याची असमर्थता निर्माण होणे हे दोष निर्माण होऊ शकतात. त्यामुळे टी. व्ही.वरील सर्वच कार्यक्रम पहाणे हिताचे नाही याची जाणीव पालकांना हवी व ती त्यांनी मुलांमध्ये निर्माण केली तर भावी पिढी प्रक्षोभक, हिंसाचारी, भोगवादी, विलासी न होता सदाचारी, ज्ञानी, देशाबद्दल व मानवतेबद्दल प्रेम बाळगणारी, राष्ट्रीय एकात्मता जपणारी, वैज्ञानिक दृष्टिकोण बाळगणारी एक सुजाण पिढी निर्माण होईल. मग दूरदर्शन एक वरदान किंवा देवदूत वाटेल!

दूरचित्रवाणी शाप की वरदान? मराठी निबंध | Television A Bane Or Boon Essay In Marathi


स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी बघणार  आहोत. या निबंधात  स्वच्छतेचे महत्‍व  व त्‍याचे फायचे ,   स्वच्छतेसाठी सरकार करत असलेल्‍या उपाययोजना, स्वच्छतेविषयी नागरीकांनी उचलण्‍याची पावले याबद्दल माहीती दिली आहे चला तर सुरूवात करूया निबंधाला. 
निबंध मराठी क्रमांक 1 (391 शब्‍दात)
माझी आजी नेहमी सांगत असे की, 'हात फिरे, तेथे लक्ष्मी वसे.' केवढा मोठा अर्थ आहे या शब्दांत! आपण स्वच्छता ठेवली की, वैभव आपोआपच चालत येते. पण आपण हे कधीच लक्षात घेत नाही. आपले वर्तन सुधारत नाही.

वैयक्तिक स्वच्छता ही आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असते. नीट आंघोळ केली नाही, तर त्वचारोग होतील. तोंडाची स्वच्छता ठेवली नाही, तर दात किडतील. केसांची स्वच्छता राखली नाही, तर केसांत उवा होतील.
व्यक्तिगत स्वच्छतेइतकीच घराची, गावाची, देशाचीही स्वच्छता आवश्यक आहे. प्रत्येक गावात शौचालये हवीत. तरच गावात स्वच्छता राहील. गावातील लोक नदी-तलावाचे पाणी खराब करतात. भांडी घासणे, कपडे धुणे, जनावरांची स्वच्छता ही सर्व कामे लोक नदीत करतात. त्यामुळे ते पाणी पिण्यास अयोग्य ठरते. त्या पाण्यामुळे रोगराई पसरते. म्‍हणुन ही नदी स्वच्छतेचे काम हाती घेतले पाहीजे. 

आपण सर्वांनी आपल्या घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेत तर असतोच पण आपण जेव्‍हा आपल्‍या परीसराची काळजी घेऊ तेव्हाच आपल्या देशात स्वच्छता होईल कारण प्रत्येक व्यक्ती परीसराच्‍या  स्वच्छता करत असेल तरच आपला देश स्वच्छ होईल . घरात स्‍वच्‍छता राखण्‍याचे फायदे पण भरपुर आहेत,घरात स्वच्छता ठेवल्‍याने  आपण आजारी पडणार नाही. मनही प्रसन्न राहील. 

जर आपण घरात अस्‍वच्‍छता ठेवली तर अनेक प्रकारचे किटक जसे झुरळ, डास आपल्‍या घरात शिरून रोगराई पसरविण्‍याचे काम करतात. व परीणामी आपण आजारी पडतो त्‍यात आपले पैसे व वेळ दोन्‍ही वाया जातात. घरात स्‍वच्‍छता असली व घरात एखादा पाहुणा आल्‍यास तो घरातील स्‍वच्‍छता पाहुन खुप खुष होतो. पण जर का घराता स्‍वच्‍छता नसेल तर ती अस्‍वच्‍छता  कोणालाच आवडणार नाही.  स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन आणि आपल्या परीसर स्वच्छ करणे. स्वच्छता हा मानवाचा आवश्यक गुण आहे. विविध प्रकारचे आजार रोखण्यासाठी हा एक सोपा उपाय आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत असा विश्वास आहे की जिथे स्वच्छता असते तेथे लक्ष्मी निवास करते.

swachata che mahatva marathi nibandh
 swachata che mahatva marathi nibandh 


काही लोकांचे मत असे असते की स्वच्छता  करणे हे सरकारचे काम आहे म्‍हणुन ते स्‍वत: काहीच करत नाहीत आणि सर्व जबाबदारी सरकार सोडुन मोकळे होतात. यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्‍य वाढुन रोगराई वाढण्‍यास मदत होते. प्रत्येक भारतीयांने आपआपल्या वैयक्तीेक पातळीवर स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला पाहीजे. तरच मोहीम सफल होण्यास मदत होईल. आजही ६० टक्‍याहुनही अधिक लोक बाहेर शौचास जाणे या सवयीमुळे विविध प्रकारच्‍या आजारास कारणीभुत ठरत आहेत. चांगल्या आरोग्यासाठी शरीराची स्वच्छता खूप महत्वाची असते. शरीरात घाण आणि रोग नेहमीच एकत्र राहतात त्‍यामुळे शरीर निरोगी आणि आजारांपासून दुर  ठेवण्यासाठी स्वच्छता खुप महत्‍वाची ठरते.
अनेक थोरामोठ्यांनी, गाडगेबाबांसारख्या संतांनी स्वच्छतेचा आग्रह धरला. आता शासनानेही सर्वत्र नरेंद्र मोदींजीचे स्वच्छ भारत अभियान राबवले आहे. त्यामुळे गावाचा, पर्यायाने देशाचा विकास होईल.


निबंध मराठी क्रमांक 2 (520 शब्‍दात)
प्रसिध्‍द म्‍हण आहे की स्‍वच्‍छता ईश्‍वरासमान आहे.  या ओळी आपल्‍याला खुप काही व्‍यक्‍त करून जातात ते म्‍हणजे स्‍वच्‍छता स्‍वस्‍थ जिवनाचा आवश्‍यक भाग आहे. स्वच्छता आणि आरोग्य एकमेकांशी संबधीत असतात. तुम्‍ही जेवढी स्वच्छता ठेवाल तेवढे निरोगी राहाल. स्वच्छतेचे महत्‍व समजुन घेऊन आपण स्वच्छतेबद्दल जनजागृती केली पाहीजे. ज्‍याप्रमाणे मानवी जिवनात अन्‍न , वस्‍त्र आणि निवारा गरजेचे आहे तितक्याच प्रमाणात स्वच्छतेला महत्‍व दिले गेले पाहीजे . कारण अस्वच्छता साथीच्‍या रोगांना आमंत्रण देते.

साथीच्‍या रोगांना प्रसार करण्‍यास व वाढ होण्‍यास अस्वच्छता मदत करते. जर प्रत्‍येकाने घर व घराजवळील परीसर स्वच्छ ठेवल्‍यास आपण संपुर्ण देश स्वच्छ करून घातक रोगांना दुर ठेवु शकतो. स्वच्छतेचे महत्‍व जाणुन घेतल्‍यामुळेच स्वच्छ भारत मोहीम सुरू करण्‍यात आली आहे. या मोहीमेमुळे देशात स्वच्छता राहुन नागरीकांचे आरोग्य सुधारूण आपल्‍या देशाची प्रगती होण्‍यास मदत होईल. स्वच्छ भारत मोहीमेमध्‍ये काही ठळक कामे करण्‍यात आली आहे. त्‍यातिल काही पुढील प्रमाणे सांगता येईल.

 • पुरेश्‍या प्रमाणात प्रमाणात शौचालय बांधण्‍यात येत आहेत.
 • ग्रामीण भागातील नागरीकांना स्वच्छतेचे महत्‍व पटविण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेण्‍यात येत आहेत.
 • शहरातील प्रदुषण नियंत्रित करण्‍यासाठी प्रदुषण कायद्यात आवश्‍यक ते बदल करण्‍यात येत आहेत .
 • स्वच्छता कशी ठेवावी त्‍याचे महत्व काय याचे ज्ञान सामान्‍य नागरीकांना साध्‍या सरळ सोप्‍या भाषेत देण्‍यात आले .
 • स्वच्छतेची जबाबदारी फक्त महानगरपालीकेच्‍या सफाई कारगाराचीच नसुन ती आपल्‍या सर्वाचीच आहे याबद्दल जनजागृती करण्‍यात आली .
 • स्वच्छतेतुन प्रगत व निरोगी राष्‍ट्र निर्मिती कशी होईल याचे मार्गदर्शन करण्‍यात आले.
 • पिण्यााचे शुध्द पाणी पोहचविले जात आहे. 

स्वच्छता ही एक अशी चांगली सवय आहे की ज्‍यामुळे आपण चांगले शारीरीक व मानसिक आरोग्य प्राप्‍त करू शकतो. सर्वच पालक आपल्‍या मुलांना लहानपणी चालणे शिकवतात, कारण ही गोष्‍ट त्‍यांना आयुष्‍यभर उपयोगी येत असते. लहान मुलांमध्‍ये कोणतीही गोष्‍ट लवकर शिकण्‍याची क्षमता असते म्‍हणुन लहान वयापासुनच त्‍यांना स्वच्छता आपल्‍यासाठी किती महत्‍वाची आहे यांची तार्किक चर्चा केली पाहीजे. व स्वच्छतेचे महत्‍व पटवुन दिले गेले पाहीजे. 

जर पालकांनी मुलांना प्रोत्‍साहीत केले तर ते स्वच्छतेची चांगली सवय सहजतेने लावु शकतील. जेवनाच्‍या आधी हात धुणे, रोज अंघोळ करणे यासारख्‍या सवयीचे फायदे समजावुन सांगीतले गेले पाहीजे.  स्वच्छता एक वेळा करून उरकुन टाकण्‍याचे काम नाही , स्वच्छतेला आपल्याला दैनदीन जिवनात उपयोगात आणायला पाहीजे. गांधीजींनी म्‍हटल्‍याप्रमाणे स्वच्छता हिच सेवा आहे . देशाला व आपल्‍याला आज स्वच्छतेची गरज आहे. कारण अस्वच्छतेमुळे अनेक नागरीक रोगांचे बळी ठरत आहेत . त्‍यामुळे स्वच्छतेकडे गंभिररित्‍या लक्ष देऊन आपला व आपल्‍या राष्ट्राचा विकास साधुन घेतला पाहीजे.  

देशात पर्यटन व्‍यवसाय वाढविण्‍यासाठी स्वच्छता हा एक चांगला मार्ग आहे . कारण भारतातील अस्वच्छता कोणत्‍याही पर्यटकाला आवडणार नाही. आपल्याला भारत देशांची प्र‍तिमा उंचावण्‍याची ही एक संधी आहे. येणारा प्रत्‍येक पर्यटक भारतातील सौदर्य व परीसरातील स्वच्छता पाहुन त्‍यांचे मन प्रसन्‍न राहील्‍या शिवाय राहणार नाही. आरोग्याची तुलना संपत्‍ती बरोबर केली जाते आणि आरोग्य प्राप्‍तीसाठी आपण आपल्‍या सभोवतालाच्‍या परीसरासोबतच आपले शरिर व मन पण स्वच्छ ठेवले पाहीजे , मन स्वच्छ ठेवण्‍यासाठी ध्‍यान धारण व योगासने करणे आवश्‍यक आहे . स्वच्छता हे फक्‍त सरकारचे काम नाही ती सर्व भारतीयांची जबाबदारी आहे. आणि ती आपण चांगल्‍या प्रकारे पार पाडुन भारताचे नाव संपुर्ण विश्‍वात उंच करू व भारताच्‍या प्रगतीत मोठी भर घालु  यात काडीमात्र शंका नाही. 

मित्रांनो तुम्‍हाला स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh कसा वाटला हे कमेंट करून कळवा.  भारताला प्रगतीशील समृध्‍द राष्‍ट्र बनविण्‍यासाठी व स्वच्छतेबद्दल जनजागृती होण्‍यासाठी हा निबंध तुम्‍हाच्‍या मित्र परीवारा सोबत शेअर करा . धन्‍यवाद 

स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध | Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज जलसंकट हे जगासमोर भेडसावणारी मोठी समस्‍या बनली आहे. “पाणी” निसर्गाने आपल्‍याला दिलेली अमुल्‍य भेट आहे. परंतु पाण्‍याचा जपुन वापर न केल्‍यामुळे मानवजाती पुढे जलसं‍कट उभे ठाकले आहे . याच्‍यासाठी समाजात,शाळा,महाविद्यालयामध्‍ये पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्‍पनेचे महत्‍व पटवुन जनजागृती केली गेली पाहीजे. चला तर मग  या निबंधाला सुरूवात करूया 

सर्व प्राणिमात्रांच्या जीवनात पाणी हे फार महत्त्वाचे आहे. पाणी म्हणजे जीवन. पण शहरातील लोकांना पाण्याची किंमत कळत नाही. ते लोक पाणी जपून वापरत नाहीत. खूप पाणी वाया घालवतात. खेड्यापाड्यांतील स्त्रियांना दूर अंतरावरून पाणी वाहून आणावे लागते. त्यांचे कष्ट लक्षात घेतले पाहिजेत. उन्हाळ्यात नदया, विहिरी आटतात. त्या वेळी लहानशा वाटीने खड्ड्यातील पाणी भरणारी मुले पाहिली की, जीव तडफडतो.

पाणी ही निसर्गाची देणगी आहे. त्यामुळेच माणसाला त्याची किंमत कळत नाही. पाण्याची टंचाई ही आता जगभर निर्माण झाली आहे. कारण जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी फार खाली गेली आहे. माणसाने जंगले नष्ट केली, बांधकाम केले. त्यामुळे जमिनीत जेवढे पाणी मुरायला हवे, तेवढे मुरत नाही. म्‍हणुन पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्‍पनेवर भर दिला गेला पाहीजे.

सुदैवाने आपल्या देशात विपुल पाऊस पडतो. पण हे पाणी समुद्रात वाहून जाते. आता हे पाणी आपण जमिनीत जिरवायला हवे, साठवायला हवे. त्यासाठी तळी, बंधारे किंवा धरणे बांधली पाहिजेत. म्हणजे जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल. विहिरींना व नदयांना बारमहा पाणी राहील. झाडे जगतील. जंगले वाढतील. शेती चांगली होईल, माणूस सुखाने जगेल.  


पाणी हे जीवनाचे मूलतत्त्व आहे. पाण्याशिवाय जीवन ही कल्पनाच शक्य नाही. पाण्यावरच सर्व सजीवसृष्टीचे जीवन सुख समृद्धी अवलंबून आहे.  सध्या पाणी प्रश्नाबाबत जागतिक स्तरावर प्रयत्न होत आहेत. त्याचाच परिपाक म्हणजे एप्रिल महिन्यात आयोजित केले जाणारे 'जल संपत्ती दिन' या निमित्त आपल्या देशात जे साक्षरता अभियान राबविले जात आहे. 'पाणी वाचवाल तर वाचाल' हा नव्या युगाचा महामंत्र आहे.

प्रयोगशाळेत पाणी बनविता येते परंतु सर्वांची गरज पुरवेल इतके नक्कीच नाही. आज जगात पाण्यावरून संघर्ष पेटलेले दिसतात.  क्योटो इथे झालेल्या  जागतिक जलपरिषदेतील अहवालात हा इशारा देण्यात आला आहे  की या पुढील युद्धे ही पाणी वाटपाबाबत किंवा पाण्याच्या तुटवड्यावरून होतील.  आपल्या सर्वांचा प्रमुख जलस्रोत म्हणजे 'पाऊस' ज्याचे अनिश्चित आगमन, उपलब्धी प्रमाण ही समस्या सतत भेडसावत  असते.

त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि व्यवस्थापन ही समस्या दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत चालली आहे. पाणी, लोकसंख्या आणि जमीन यांचा त्रिकोण जमविणे आवश्यक आहे.  युनिसेफने महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांच्या जलसर्वेक्षणाबाबत दिलेल्या अहवालात  या राज्यांना पिण्याच्या पाण्याची व उपलब्धतेची प्रमुख टंचाई भासण्याचा इशारा दिला आहे.

समस्यांचे मूळ कारण म्हणजे वाढते उद्योगीकरण, लोकसंख्येचा भस्मासुर, जंगलाची अवैध तोड यामुळे जलचक्राचे नियमन, पर्यावरणाचे संतुलन, वन्य प्राण्यांची कमी होणारी संख्‍या इ. समस्या ठळक रूपाने स्पष्ट होऊ लागल्या. पूर व दुष्काळ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

भारताचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान व प्रचंड जीवितहानी दरवर्षी होत असते. भू-गर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होत आहे. त्यामुळे ४०० फुटापर्यंतसुद्धा कूपनलिका कोरड्या ठणठणीत असतात. पुरोगामी महाराष्ट्रात ७५ तालुके अवर्षण प्रवणग्रस्त आहेत. दिवसेंदिवस हा आकडा फुगतच चालला आहे.

Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh
Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh


जलसंवर्धन व जलप्रदूषण या आणखी दोन प्रमुख समस्या भेडसावत आहेत. वाढते उद्योगिकरण त्यातून होणारे सांडपाणी, रासायनिक प्रदूषके, नागरी वस्तीचा सांडपाण्याचा लोट यामुळे पाण्यात प्रदूषणाचा उच्चांक झाला आहे.  याबाबत जंगलांचे संवर्धन करणे,त्यांचे संरक्षण करणे आणि पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्‍पना चांगल्‍या प्रकारे राबवायला पाहीजे.

ही काळाची गरज बनली आहे. 'वनश्री तेथे धनश्री' त्या प्रमाणेच वनश्री तेथे जलश्री याबाबत उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे. सर्व जलस्रोत, नद्या यांचा उगम बहुतांशी जंगलातच होतो. त्यामुळे वनांची बेसुमार व अवैधरीत्या तोड रोखणे गरजेचे आहे. तसेच डोंगर उतारावर वृक्षांची लागवड करून जमिनीची होणारी धूप रोखणे महत्त्वाचे आहे.

त्याचबरोबर, शेती करण्याचे आधुनिक पद्धतींचा वापर नगदी पिके उदा. ऊस यासारख्या पिकांवर संशोधन व कमी पाण्यात येणारी पिके यावर भर देणे, सध्या मोठ्या धरणांनी निर्माण केलेले प्रश्न हे फायद्यापेक्षा तोट्याचेच जास्त आहे. तेव्हा नद्यांवर छोटी-छोटी धरणे बांधून नदीचा प्रवाह जिवंत ठेवणे ज्यामुळे आजूबाजूचा परिसर हिरवागार राहील.

 भूजल पातळी टिकण्यास मदत होईल. ग्रामीण भागात विहीर पुनर्भरणासारखे कार्यक्रम राबवणे, पाणलोट क्षेत्र कार्यक्रम हाती घेणे. छोटे-छोटे नाले, बंधारे बांधणे 'गाव तेथे तळे' या संकल्पना साकारणे, ओढे, नाले यावर बांध घालणे इ. प्रमुख उपाययोजना या समस्यांवर सांगता येतील. जेणेकरून विविध प्रकारच्या जमिनीमध्ये पाणी जिरण्यास मदत होईल.

कारण पावसाचे पडणारे पाणी जमिनीत किती प्रमाणात मुरते व बाष्पीभवनाद्वारे किती पाणी वर बाष्पाच्या रूपात उडून जाते; याबाबत अजून कोणालाही अचूक सांगता आलेले नाही. त्यामुळे पाण्याचा एक एक थेंब या धरणीमातेच्या 'उदरात जिरवणे व भूजलपातळी सुधारणे' या गोष्टी आपल्या हातात आहे.


हवा, जल, प्राणी, वन, मानव ही पर्यावरणाची परस्परावलंबी साखळी अबाधित ठेवणे गरजेचे आहे. या साखळीतील प्रत्येक कडीचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे, तरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि या निसर्गाची जैव विविधता टिकून राहील. आज हजारो सपुष्प वनस्पती, शेकडो प्राणी, पक्ष्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत पाणी आणि निसर्गाच्या दरबारात चुकीला क्षमा नाही. याचे प्रत्यंतर 'ग्लोबल वॉर्मिंग, कॅटरीना, रीटा, त्सुनामी' या प्रलयांमधून आपण भोगत आहोत.

आज पाण्याला कितीतरी महत्त्व आले आहे. कारण पृथ्वीतलावर साधारण ७५% पाणीसाठा हा आकडा किती फसवा आहे? हे आपल्याला पुढील संदर्भावरून लक्षात येईल. त्यांपैकी फक्त २% पाणी गोड आणि त्यातील १-१.२५%  पाणी पिण्यासाठीशेतीसाठी योग्य आहे.

 तेव्हा पाण्याचा अवास्तव वापर करणे किती चुकीचे व मूर्खपणाचे आहे हे आपल्या लक्षात येते. पाणी संपत्ती असून तिचा पर्याप्त वापर केला गेला पाहिजे. आज महाराष्ट्रात हिरवे बाजार, राळेगण सिद्धी, दरेवाड, नायगाव, काळदरी ही गावे जल धोरणांचा योग्य पाठपुरावा करून ती कृतीत आणून विकास प्रक्रियेच्या दिशेने घोडदौड करीत आहेत आणि त्यात सातत्य राखत आहेत. जर या गावांना हे शक्य होत असेल तर ते आपल्याला का शक्य नाही?

 यासाठी आवश्यक आहे ती आत्मविश्वास, एकोपा व दृढनिश्चयाची. जलसमस्या ही शासनाची नसून माझी आहे. माझ्या गावाची आहे याची जाणीव होणे गरजेचे आहे. पुढील प्रत्येक विकास कार्यात जनतेला सहभागी करून घेणे क्रम प्राप्त ठरेल आणि जनतेचा पुढाकार व शासन त्यात सहभागी या धोरणाचा अवलंब केला पाहिजे.

समाजसेवक हजारे, डॉ. विलासराव साळुखे, राजस्थानचे जोहडवाले (पाणीवाले) डॉ. राजेंद्र सिंग यांनी आपल्यासमोर आदर्श उभे केले आहोत. जलसाक्षरता चळवळ वाडी वस्तीवर पोहोचवून पाण्याचे जतन म्हणजे पाण्याची निर्मिती या सूत्राचा प्रचार केला पाहिजे. जलसंवर्धन व जलसंरक्षणासाठी केलेले कायदे याबरोबर जनसहभाग वाढलाच पाहिजे. किंबहुना जनसहभाग हा जलसंवर्धनाचा मूलमंत्रच आहे.  असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्‍याच बरोबर पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना सवोच्‍च महत्‍व देऊन राबवली गेली पाहीजे तरच जलसंवर्धन होण्‍यास मदत होईल. 


वरील निबंधावरून आपल्‍याला समजुन येईल की जलसंकट किती भिषण समस्‍या आहे व त्‍यावर कोणत्‍या उपाययोजना केल्‍या पाहीजेत. तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे कमेंट करून सांगा तसेच जलसंवर्धन आणि पाणी अडवा पाणी जिरवा हे धोरण संपुर्णपणे यशस्‍वी करण्‍यासाठी व जनजागृती करण्‍यासाठी एक शेअर जरूर करा.  

पाणी अडवा पाणी जिरवा मराठी निबंध | Pani Adva Pani Jirva In Marathi Nibandh

हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi

निबंध 1

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi बघणार आहोत.  हुंडा पद्धती म्हणजे समाजातील लोभिष्ट् स्वभावाच्या  माणसाच्या  वाईट मनोवृत्तीचा आरसा  आहे. तसे तर हुंडाबळी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारा विषयीच्या बातम्या आपण वृत्तपत्र, टीव्ही व इंटरनेटच्या् माध्यमातून दररोज पाहतो. 


या निबंधामध्ये आपण याविषयी चर्चात्मक व चिंतनात्मक स्वरूपाने विश्लेषण करणार आहोत. हुंडा प्रथेबद्दल समाजाची असणारी मानसिकता व हुंडाबळी कायद्यात असलेल्या  कमतरता याविषयी सविस्तर वर्णन आपण करणार आहोत चला तर मग निबंध लेखनाला सुरुवात करुया. यामध्ये  एकूण दोन निबंध देण्यात आहे 

रस्त्यात एका घरासमोर बरीच गर्दी दिसली. आणि या गर्दीचे वैशिष्ट्य म्हणजे या गर्दीत सर्व स्त्रियाच होत्या. कुतूहलाने मी जवळ गेलो. एका प्रशस्त बंगल्यासमोर त्या निदर्शने करीत होत्या. कोणावर अन्याय घडला होता याची चौकशी करता कळले की, त्या घरातील गृहलक्ष्मीनवागत सून ही हुंडाबळी ठरली होती. त्यासाठी 'नारी समता मंचा'च्या त्या स्त्रिया त्या कुटुंबातील लोभी माणसांची छीःथू करीत होत्या. मनात विचार आला की, या आलिशान बंगल्यातील मंडळींना अधिक धनाची इतकी हाव का सूटावी? मोठया थाटामाटात विवाह करून सासरी आणलेल्या आपल्या सूनेचा बळी त्यांनी धनासाठी का घ्यावा?


आपल्या भारतात आर्थिक विषमता फार मोठ्या प्रमाणात आहे. एका बाजूला गडगंज संपत्ती असणारे भांडवलदार आहेत; तर दुसऱ्या बाजूला अन्नाची भ्रांत असणारे लक्षावधी गरीब आहेत. एका बाजूला उंच उंच आलिशान इमारती आहेत, तर दुसऱ्या बाजूला हीनदीन झोपडपट्ट्या आहेत. अशा या दोन परस्परविरोधी समाजांत एका बाबतीत मात्र साम्य आहे आणि ती बाब म्हणजे 'हुंडाबळी'.


श्रीमंतांकडे ज्याप्रमाणे हुंड्यासाठी बळी पडतात, त्याप्रमाणे गरिबांच्यातही हुंड्यामुळे खून केले जातात. हुंड्याचे हे जहर आज पिढ्यान्पिढ्या आपल्या समाजात भिनले आहे. त्यामुळे मुलगी झाली की आईवडिलांच्या काळजाचा ठोका चुकतो. मुलीला जन्म देणाऱ्या स्त्रीकडे उपेक्षेने पाहिले जाते. कित्येक गरीब घरांतून तर या हुंड्याच्या रूढीपायी कित्येक मुली अविवाहित राहतात.


Hunda Ek Samajik Samasya essay in marathi
Hunda Ek Samajik Samasya essay in marathi


आपल्याला असे वाटत होते की, जग जसे प्रगत होईल, शिक्षणाचा जसा प्रसार होईल तसा हा हुंड्याचा फास कमी होईल; पण आपली ही आशा फोल ठरलेली दिसत आहे. आज शहरांतून तरी शिक्षणाचा खूप प्रसार झाला आहे. मुली पदवीधर झाल्या आहेत. स्वतः नोकरी करून पैसे मिळवू लागल्या आहेत. तरी पण लोकांची हुंड्याची हाव काही सुटली नाही. उलट सध्या हुंडा वेगवेगळ्या स्वरूपांत समोर येतो. वरदक्षिणा, दागदागिने, मानपान, राहण्याची जागा, वाहन, टी व्ही., फ्रीज अशा विविध रूपांत हा हुंडारूपी भस्मासूर अवतरतो. जो ज्यांच्या अंगी संचारतो ते आपल्यातील माणूस हरवून बसतात आणि शेवटी त्यात नवपरिणित मुलीचा बळी घेतला जातो. 


या हुंडापद्धतीला आळा कसा घालायचा? वास्तविक १९६१ पासून आपल्याकडे हुंडाप्रतिबंधक कायदा लागू झाला आहे. पण हा कायदा अपुरा पडतो. त्यातून अनेक पळवाटा निघतात. हुंडा घेण्याचा गुन्हा करणाऱ्यांना त्या. फार सौम्य शासन आहे. म्हणून कायदयात सुधारणा करण्याचे खूप प्रयत्न चालू आहेत. पण येथे एक मोठा प्रश्न उभा राहतो की, या गोष्टी कायदयाने अमलात येतील का? 


खरे म्हणजे त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन आवश्यक आहे. समाजपरिवर्तन व्हायला हवे, पण हे कोण करणार? काही महिला संघटना आपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. पण या प्रश्नातले एक कटू सत्य असे की, बहुसंख्य हुंडाबळी प्रकरणांमध्ये सासू, नणंद अशा स्त्रियाच कारणीभूत ठरलेल्या दिसतात. मग सांगा आता काय करावे?


निबंध 2

महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

 • एखादया प्रसंगातून प्रस्तावना
 • या दुष्ट प्रथेची परंपरा
 • 'वरदक्षिणा' 
 • 'स्त्री'ला कमी लेखणे
 • आज स्त्रीने पुरुषाची बरोबरी केली. 
 • शिक्षण, अर्थार्जन सर्व बाबतींत स्त्री पुढे
 • हुंड्याचे दुष्परिणाम
 • विवाह म्हणजे मनोमीलन

आमच्या ताईचे लग्न जमले होते. खरे पाहता, ही किती आनंदाची गोष्ट; पण मला आईबाबांच्या चेहऱ्यावर काळजीच दिसत होती. असे का? मला पडलेला हा प्रश्न मी कोणाला विचारणार? हळूहळू मला अंदाज आला की, काहीतरी पैशांची अडचण असावी. ताईच्या सासरच्या लोकांची आमच्याकडून खूप मोठ्या रकमेची अपेक्षा होती आणि त्याचेच आईबाबांना ओझे झाले होते. या प्रसंगामुळेच प्रथम माझी 'हुंडा' या शब्दाशी ओळख झाली आणि मग वरचेवर तो भयसूचक शब्द माझ्या कानी पडू लागला, वाचनात येऊ लागला.


 'हुंडा' ही आपल्या समाजातील खरोखर एक दुष्ट प्रथा आहे. या प्रथेची मुळे पुरातन काळापासून आढळतात. बहुधा हुंडा हा वरपक्ष वधूपक्षाकडून हक्क म्हणून वसूल करतो. फारच थोड्या जातींत मुलाकडून मुलीला हुंडा दिला जातो. पूर्वी या हुंड्याला 'वरदक्षिणा' या गोंडस नावाने गौरवले जात असे. आपल्या पुरुषप्रधान समाजात स्त्रीला कमी लेखले जात असे आणि या कमीपणाची भरपाई हुंड्याने केली जात असे.


आज स्त्रीने हे सिद्ध केले आहे की, ती कोणत्याही बाबतीत पुरुषापेक्षा कमी नाही. आज मुली भरपूर शिकतात. कुठलाही सुविदय पुरुष सुशिक्षित स्त्रीचीच पत्नी म्हणून निवड करतो. म्हणजे शिक्षणाचा खर्च दोघांनीही केलेला असतो.


आज बहुतेक स्त्रिया अर्थार्जन करत असतात. म्हणजे आपल्या संसाराची आर्थिक जबाबदारीही त्या उचलत असतात. त्याशिवाय घर, कुटुंब आणि अपत्ये यांसाठीही घरातील स्त्री सतत कष्ट उपसत असते. अशा परिस्थितीत तिच्या जन्मदात्यांकडून धनाची वा इतर भेटींची अपेक्षा करणे हे फार दुष्टपणाचे लक्षण आहे.
आज 'हुंडा' या दुष्ट प्रथेचे अनेक दुष्परिणाम आपल्याला अधूनमधून दिसून येतात. मुलीच्या सासरच्या लोकांकडून वारंवार अनेक मागण्या झाल्यामुळे कित्येक विवाहित मुली आत्महत्या करतात. कित्येकदा हुंड्याच्या हव्यासासाठी सुनेला जाळण्यापर्यंत सासरच्या माणसांची मजल जाते.

वरपक्षाकडून होणाऱ्या हुंड्याच्या मागणीमुळे कित्येक गरीब घरातील मुलींचे विवाहच होत नाहीत. त्यामुळे मुलीचा जन्म हा मातापित्याला संकटच वाटू लागतो. काही समाजात मुलींना जन्मतःच मारले जाते, तर काही ठिकाणी मुलीचा जन्मच नाकारला जातो. हे खरोखरच दुःखदायक आहे. खरे तर स्त्री व पुरुष हे समाजाचे दोन आधारस्तंभ आहेत, दोन पाय आहेत. एक पाय आपण कमकुवत ठेवला, तर लुळापांगळा समाज प्रगती करू शकेल काय?

खरे पाहता, हुंड्याला कायदयाने बंदी आहे, पण आपल्या समाजात कायदा गुंडाळून ठेवून अनेक पळवाटा काढल्या जातात. तेव्हा ही दुष्ट प्रथा कायदयाने बंद होणार नाही. त्यासाठी समाजप्रबोधन व्हायला हवे. प्रत्येक मुलाने व प्रत्येक मुलीने 'मी हुंडा घेणार नाही' किंवा 'मी हुंडा देणार नाही' अशी प्रतिज्ञा केली पाहिजे आणि त्यानुसार आचरणही केले पाहिजे. तरच या अनिष्ट प्रथेला कायमचा पायबंद बसेल. तो सोन्याचा दिवस लवकर येवो.

मित्र-मैत्रिणींनो तुमच्याा मते समाजाची मानसिकता बदलण्यासाठी काय उपाययोजना केली पाहीजे व हुंडा बळी कायद्यात काय आवश्यक बदल केले गेले पाहीजेत ते तुम्ही कमेंट करून सांगु शकता. तुम्हाला  हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi हा निबंध कसा वाटला याबद्दल तुम्ही तुमचा प्रतिसाद देऊ शकता. धन्यवाद

हुंडा एक सामाजिक समस्या मराठी निबंध । Hunda Ek Samajik Samasya Essay In Marathi

विदयार्थी जीवन मराठी निबंध | Student Life Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आमच्‍या ब्लॉगवर तुमचे स्‍वागत आहे, आज आपण विदयार्थी जीवन मराठी निबंध | Student Life Essay In Marathi या विषयावर निबंध बघणार आहोत.आजच्‍या स्‍पधेच्‍या युगात विद्यार्थी जिवन फारच कठीण झाले आहे . आई वडीलांचे अपेक्षा पुर्ण करता करता तो किती भरडल्‍या जातो हे त्‍यालाच ठाऊक, आजची शिक्षण पध्‍दती विद्यार्थी बनविते की परीक्षार्थी, त्‍याच्‍या समोर येणाऱ्या समस्‍यांचे वर्णन या निबंधा मध्‍ये केले आहे. चला तर मग सुरू करूया निबंधाला. “आई, आता फक्त एवढ्याच प्रश्नाचे उत्तर सांग. अगदी शेवटचाच प्रश्न आहे बघ!" मिनू अगदी केविलवाण्या शब्दांत आईला सांगत होती. जवळजवळ दोन तास ती आईच्या मदतीने आपले प्रश्न सोडवीत होती. मिनूच्या उद्गाराने मी ही भानावर आलो. मी देखील खूप वेळ गणिते सोडवीत होतो, आणि अजून मला कितीतरी विषयांचे प्रश्न सोडवावयाचे होते. केव्हा संपायचे बरे हे प्रश्न? छे, आमची सारी विदयार्थिदशा या प्रश्नांच्या भेंडोळयातच अडकली आहे. या साऱ्या प्रश्नांची रूपे तरी किती आगळीवेगळी! त्यांच्या स्वरूपांप्रमाणे विदयार्थ्यांना त्यांना सामोरे जावे लागते. नाहीतर वस्तुनिष्ठ प्रश्नाला दीर्घ उत्तर दिले की बसलाच शून्याचा फटकारा.


student-life-essay-in-marathi
student-life-essay-in-marathi

आजचे विदयार्थिजीवन म्हणजे नानाविध प्रश्नांची सर्कसच! या सर्कशीतील तंत्र आणि मंत्र जो साध्य करतो तोच यशाचे शिखर गाठतो. पण एक गोष्ट मात्र नक्की की, असा विदयार्थी खरा ज्ञानार्थी न होता केवळ परीक्षार्थी बनतो. याचे एक कारण हेही आहे की, आजच्या विदयार्थ्यांवर विविध विषयांचा फार मोठा बोजा आहे. मर्यादित वेळेत अभ्यास कसा संपवायचा हे विदयार्थ्यांपुढील मोठे प्रश्नचिन्ह आहे.


तेवढ्याने काय संपते! विदयार्थी हा सर्वगुणसंपन्न असावा अशी सर्व पालकांची व शिक्षकांची अपेक्षा. आपण विदयार्थिदशेत जे करू शकलो नाही ते सारे आजच्या विदयार्थ्यांनी करावे असे त्यांना वाटते. अशा प्रसंगी विदयार्थ्यांचा मात्र कोंडमारा होतो. एखादया विदयार्थ्याला सुनील गावसकर व्हावेसे वाटते; तेवढयात जयंत नारळीकरांसारख्या थोर शास्त्रज्ञाचा आदर्श त्याच्यासमोर ठेवला जातो. मुलाने आपली प्रकृती उत्तम ठेवावी असे सांगणारे पालक, त्याच मुलाने व्यायामशाळेत जरा जास्त वेळ घालविला की, लगेच म्हणतात,


काय आखाड्यात उतरायचे काय!" त्यामुळे आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचे आहे, हयाबद्दल विदयार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो.अभ्यासात यश मिळवून तरी आजच्या विदयार्थ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे मिळाली आहेत का? उच्च शिक्षणासाठी त्याला हव्या त्या शिक्षणशाखेत प्रवेश घेता येतो का? तेथेही अनेक अडसर! जागा कमी, मागणी अधिक! या व्यस्त प्रमाणामुळे सर्वत्र झिम्मड. मग भ्रष्टाचार, वशिलेबाजी आलीच. 


विदयार्थ्याला आवडत असलेली शिक्षणशाखा तो निवड शकत नाही; मग तो अगतिक होतो वा भरकटतो.
अशा या विदयार्थिजीवनात अनेक मोह विदयार्थ्याला ग्रासावयास उभे असतात. कधी चुकून, तर कधी वैफल्याने तो त्यांकडे वळतो. अशा सर्व समस्यांवर मात करून विदयार्थ्याने उत्तम यश संपादन केले तरी त्याचे प्रश्न संपत नाहीत. शिक्षणानंतर नोकरीचा प्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकतो. बेकारीचा भस्मासूर त्याला वाकुल्या दाखवितो. स्वतःचा व्यवसाय हा बेकारीवरचा उपाय त्याला दाखविला जातो. पण तेथेही जीवघेणी स्पर्धा व गैरव्यवहार त्याला रोखतात.

प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न! विचारवंतांच्या मते, माणूस हा आयुष्यभर विदयार्थीच असतो. मग प्रश्न पडतो की हे प्रश्न सुटणार तरी केव्हा? आणि हे प्रश्नही त्याला सतत साथ देत असतात.


मित्र-मैत्रिणींनो तुम्‍हाला विदयार्थी जीवन मराठी निबंध | Student Life Essay In Marathi हा निबंध कसा वाटला व विद्याथ्‍यांच्‍या या प्रश्‍नांवर तुम्‍हाला तुमचे मत प्रकट करावयाचे असेल तर तुम्ही कमेंट करून कळवु शकता, धन्‍यवाद 

विदयार्थी जीवन मराठी निबंध | Student Life Essay In Marathi

मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi


मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi मराठी असे आमुची मायबोली "मराठी असे आमुची मायबोली, जरी भिन्नधर्मानुयायी असू।हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू, वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी॥" अशा त-हेने आपल्या मायबोलीची गोडवी गाणारे आम्ही आज खरोखर तिचे पांग फेडीत आहोत का? प्रतिष्ठेच्या पोकळ व आकर्षक कल्पनांत गुरफटलेल्या आमच्या मनाला अजूनही इंग्रजीचे आकर्षण आहे. मराठी भाषिक चार सुशिक्षित माणसे एकत्र आली तर ती गप्पा मारण्यासाठी इंग्रजीला जवळ करतात. 
दीडशे वर्षांची राजकीय गुलामगिरी संपली तरी इंग्रजीची मानसिक गुलामगिरी सोडायला आम्ही तयार होत नाही.

 

कारण आमच्या मायबोलीची थोरवी आजही आम्हांला उमगली नाही; तिचे सामर्थ्य आजही आम्हांला कळले नाही असेच म्हणावे लागेल.


मराठी मायबोलीविषयी लिहिताना साने गुरुजी म्हणतात, “आमच्या मराठीचे भाग्य असे आहे की, तिचा पहिलाच कवी हिमालयाएवढा मोठा महाकवी होऊन गेला. त्याच्या काव्यशक्तीला स्पर्श करणारे सामर्थ्य अजून मराठीत निर्माण झालेले नाही.' अशी ही ज्ञानदेवांची मराठी अमृतालाही पैजेने जिंकणारी, हिची थोरवी वर्णिताना योगवासिष्ठ म्हणते
“परिमलांमध्ये कस्तुरी। का अंबरामध्ये शंबरारी।
तैसी महाटी सुंदरी। भाषांमध्ये।" 
marathi aamachi mayboli essay in marathi
marathi aamachi mayboli essay in marathi


मराठी अशी भाग्यवान की तिला सदैव अनेक सुपुत्रांची सोबत लाभली. नामदेव, एकनाथ, तुकाराम अशा संतांच्या सहवासातून ती पंडितकवींच्या वाग्विलासात रमली आणि नंतर शाहिरांच्या शब्दांतून डफ-तुणतुण्याबरोबर नाचू लागली. आधुनिक काळात तर तिच्या वैभवाला आगळाच बहर आला. नव्या नव्या वाङ्मयप्रकारांनी ती सजू लागली आणि रसिकांना रमवू लागली.


या माझ्या मायबोलीवर अनेकदा अनेक आक्रमणे झाली, पण ती अशी ‘चिवट' की तिने ती सारी परतवून लावली. अग्निदिव्य केल्यावर सीतामाई जशी अधिक उजळून निघाली, त्याप्रमाणे यावनी आणि इंग्रजी भाषांच्या आक्रमणानंतर मराठी भाषा अधिक तेजस्विनी झाली. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देताना तर तिने आपला नाजूकपणा झटकून देऊन शूर, करारी भवानी देवतेचे रूप धारण केले आणि आपली अस्मिता साऱ्या भारताला दाखवून दिली. या माझ्या मायबोलीच्या सामर्थ्याविषयी आता कोणालाही संभ्रम नाही. भारत देशाच्या सीमा ओलांडून परदेशांतही तिने आपले सामर्थ्य दाखविले आहे. शरदाच्या चांदण्याप्रमाणे सौख्य देणारी ती नाठाळांच्या माथ्यावर काठी हाणण्यास डरणार नाही; म्हणूनच कवी कुसुमाग्रज आत्मविश्वासाने म्हणतात.
"माझ्या मराठी मातीचा। लावा ललाटास टिळा। हिच्या संगे जागतील। मायदेशातील शिळा॥" मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

मराठी आमची मायबोली मराठी निबंध | marathi aamachi mayboli essay in marathi