वर्णनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वर्णनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मराठी निबंध  Marathi Nibandh


  1. शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध | Nirop Samarambha Essay Marathi (nibandh in marathi 12th) 


    शाळा आपल्‍या बालपणातील महत्‍वाचा भाग असतो. शालेय जिवनात केलेल्‍या गंमतीदार आठवणी असा हा काळ कोणीही विसरू शकत नाही.या निबंधात निरोप समारंभातील आधीचा काळ व निरोप समारंभातील घडलेल्‍या गोष्‍टीचे वर्णन केले आहे. पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.
  2. marathi nibandh
    marathi nibandh
    वसंत सर्व  ऋतुंचा राजा  मराठी  निबंध | vasant essay in marathiया निबंधामध्‍ये वसंत ऋतुचे गुणगाण केले आहे. वसंत ऋतुमध्‍ये पर्यावरणात होणारे बदल सांगीतले आहे. पशु पक्षी कश्‍याप्रकारे आनंदीत होतात हे दाखविले आहे.पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.

  1.  स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh
    या निबंधामध्‍ये स्वच्छतेचे महत्‍व सांगीतले गेले आहे. स्वच्छते अभावी होणारे नुकसानदेखील सांगीतले गेले आहे.भारत सरकार राबवित असलेल्‍या उपाययोजना व नागरीकांनी कोणती पावले उचलली पाहीजे याचे मार्गदर्शन केले आहे.  पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.

  2. एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | shetkari manogat in marathi essay
    शेतकरी विश्‍वाचा अन्‍नदाता आहे. पण या अन्नदात्याची कश्‍याप्रकारे पिळवणुक होते व  तो नैर्सगिक व सरकारी संकटा‍त कसा भरडला जातो याचे वर्णन केले आहे. या संकटावुन स्‍वताला काढण्‍यासाठी तो आपली व्‍यथा इतरासमोर मांडत आहे. पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.


  1. माझा आवडता छंद मराठी निबंध | My Favourite Hobby Essay In Marathi
    प्रत्‍येक व्‍यक्ती आपआपला छंदातुन आनंद प्राप्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करत असते. कुणी निसर्ग भ्रमंती करते. कुणी पोस्‍टाची तिकीटे जमा करते. कुणी पुस्‍तकांना आपला मित्र बनवते. या निबंधात अश्‍याच एका छंदाचे वर्णन केले आहे.  पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध | Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi
    बाबासाहेब, आता तुम्ही हवे होता ! बघा ना, तुमच्या मुलांनी काय काय मिळवले आहे. कुणी एखादया राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे, तर कुणी विदयापीठाचा कुलगुरू, कुणी देशाचा उपराष्ट्रपती, तर कुणी प्रत्यक्ष राष्ट्रपती. बाबासाहेब हेच तुम्हांला हवे होते ना !

    तुम्ही ज्यांच्यासाठी आयुष्यभर खपलात त्याच तुमच्या अनुयायांनी खूप प्रगती केली आहे. त्यांनी शिकावे. अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर पडावे, म्हणून तुम्ही धडपडलात, शाळा काढल्यात, महाविदयालये काढलीत. 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' ही संस्था काढली. त्याला आज सुमधुर फळे आली आहेत. बाबासाहेब, हे पाहायला तुम्ही हवे होता !

    बाबासाहेब, तुम्ही नेहमी आम्हांला सांगत होता की 'वाचाल तर वाचाल'. त्याचा पुरेपूर प्रत्यय आज आला आहे. तुमच्या सांगण्यानुसार जे वाचायला शिकले त्यांनी खूप वाचले आणि मग त्यांनी स्वतः लिहायला सुरुवात केली. समाजाकडून वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या ज्यांचे दमन झाले होते. त्यांनी धडपड करून आपली प्रगती साधली. त्यामागे तुमचीच प्रेरणा होती. मग या मंडळींनी आपल्या सुखदुःखाचे अनुभव शब्दांत मांडले.

    जीवनाची कठीण वाट तडवताना' बसलेल्या ठेचा त्यांनी आपल्या लेखनातून मांडल्या. अशा या आगळ्यावेगळ्या पण वास्तववादी साहित्याने आज मराठी सारस्वताचे भांडार समृद्ध झाले आहे. आज सर्व मराठी भाषिकांनी त्या साहित्याला गौरवले आहे. कित्येकांच्या पुस्तकांची इतर भाषांतही भाषांतरे झाली आहेत. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या ' आमचा बाप आणि आम्ही ' या पुस्तकाने तर  स्वदेशाच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत. जगातल्या अनेक भाषांत या पुस्तकांचे भाषांतर झाले आहे. बाबासाहेब, तुमच्या या लेकरांनी केलेली ही प्रगती पाहायला आज तुम्ही हवे होता !

    हे झाले दलित समाजाबददल. परंत बाबासाहेब तम्ही फक्त दलितांसाठीच कार्य केले. असे नाही. तुमच्या डोळ्यासमोर फक्त दलित समाज नव्हता; तर अखंड समर्थ भारत होता. या देशातील प्रत्येकाला उन्नत आयुष्य मिळावे, असा तुमचा ध्यास होता. त्यासाठी जगात कोणत्याही देशाला लाभली नाही, अशी अजोड घटना तुम्ही लिहिलीत. या देशाला तुम्ही मार्ग दाखवलात.

    त्याच मार्गाने जात असल्यामळे आज आपला देश देदीप्यमान अशी प्रगती करीत आहे; जगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. आपल्या अवतीभवतीचे पाकिस्तान, बांगलादेश व अन्य शेकडो देश दुःखदैन्याच्या कर्दमात रुतले आहेत. तुमच्यासारखी विशाल दृष्टी व अंतःकरण असलेला घटनाकार त्यांना लाभला नाही. आम्ही भारतमातेचे पुत्र किती भाग्यवान की, तुमच्यासारखा महामानव आम्हांला नेता म्हणून लाभला !

    खरे तर, तुम्ही फक्त दलितांचे, फक्त भारतीयांचेच नव्हे, तर अखिल मानवजातीचे उद्धारकर्ते आहात ! तुम्ही दाखवलेल्या मार्गाने जाऊन आम्ही भारतीय आज जगभर कशी पताका फडकवत आहोत, हे पाहायला तुम्ही हवे होता ! एक खरे की, भारतात अजूनही दीनदलित, शेतमजूर, कष्टकरी, भूमिहीन दारिद्र्यात होरपळत आहेत. आज आपला देश त्यांच्याही उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहे. परंतु तुम्ही असता, तर हे प्रयत्न अधिक वेगाने झाले असते. आपल्या समाजातील दुबळी अंगे अधिक वेगाने बलशाली करता आली असती.

    आम्ही या क्षणी तुम्हांला ग्वाही देतो की, तुमची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही दाखवलेल्या मार्गाने आम्ही निष्ठेने प्रयत्न करीत राह आणि या देशात मानवतेचे साम्राज्य निर्माण करू !   Dr Babasaheb Ambedkar निबंध २   पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा

मराठी निबंध marathi nibandh

मी पाहीलेला समुद्र किनारा निबंध मराठी | Essay On Samudra Kinara In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहीलेला समुद्र किनारा निबंध मराठी बघणार आहोत. मला संध्याकाळी एखाद्या नैसर्गिक ठिकाणी जायला आवडते. हिरवेगार मैदान, पर्वतीय प्रदेश, मंदिरे, नदीकाठ आणि समुद्रकिनारे यासारख्या बर्‍याच ठिकाणी मी जात असतो . अश्याच एका मनमोहक समुद्रकिनाऱ्याचे वर्णन पुढील निबंधात केले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

 

अथांग निळा सागर, त्याच्या उसळणाऱ्या लाटा, त्यांच्यावर दिसणारा पांढरा फेस अशा या विलोभनीय दृश्याचे मला विलक्षण आकर्षण वाटते. त्या फेसाळणाऱ्या लाटा पुढे पुढे येतात आणि सागराच्या किनाऱ्याला शिवून मागे फिरतात, तेव्हा एक लाट केव्हा संपली आणि दुसरी केव्हा सुरू झाली हे उमगतच नाही. लाटांचा हा पाठशिवणीचा खेळ मनसोक्तपणे पाहावा हा माझा छंद.


ओहोटीच्या वेळी पसरलेला तो अफाट मोठा वाळूचा किनारा आणि भरतीच्या वेळी त्याला गिळू पाहणारा तो सागर, हे परस्परांशी जणू गप्पाच मारीत आहेत असे मला वाटते. त्यांचा तो संवाद शब्दाविना असला तरी तो माझ्या मनाला उमगतो आणि मग अनेकदा मी समुद्राच्या सान्निध्यात जातो.



मला आवडतो तो मोकळा समुद्रकिनारा. अथांग सागर मग तेथे मला गवसते उदात्तता, भव्यता. मन कधीही बेचैन झाले की मी समुद्राच्या सान्निध्यात जातो. त्याची ती भव्यता माझ्या मनातील कस्पटतेची मला जाणीव करून देते. माझ्या मनातील क्षुद्र अहंकार त्या लाटांच्या फेसाबरोबर वाहून जातो. मन निर्मल होते. मनाचे पिंजरे तुटून पडतात आणि भव्यता, उदात्तता मनाला व्यापून टाकते. 

स्वतःच्या क्षुल्लक दु:खांचा विसर पडतो आणि मग मन भोवतालची सुखे, आनंद, संतोष टिपू लागते. हात भोवतालच्या वाळूशी नकळतपणे खेळ खेळू लागतात. मुठीत धरलेली वाळू पाहता पाहता गळून पडते. सूर्यकिरणांत तिच्यातील सप्तरंग उठून दिसतात. मग त्या वाळूतील रंगीबेरंगी शंखशिपले डोळयांना मोहवू लागतात. एक सापडली, दुसरी सापडली असे करता करता दोन्ही हात भरून जातात. त्या शंखशिंपल्यांच्या रंगांत विविधता असते. प्रत्येकाचा आकार आगळावेगळा असतो. विधात्याच्या या निर्मितीने मन वेडावून जाते.



mi pahilela samudra kinara marathi nibandh
mi pahilela samudra kinara marathi nibandh


पण-पण असा हा माझा सागर, असा हा माझा रत्नाकर आता मुंबईत कोठे राहिला आहे? ती विशालता, ती अथांगता आज हरवून गेली आहे. समुद्रकिनारी मनाची शांतता शोधायला जावे, तर ती देखील आता तेथे लाभत नाही.

समुद्राचा विशाल पुळणीकाठ माणसाने हिरावून घेतला आहे. माणसाने आपला दिमाख दाखविण्यासाठी तेथे उंच इमारती उठविल्या आहेत. कुठे पोहण्याचे तलाव उभे राहिले आहेत, तर कुठे पंचतारांकित मोठमोठी हॉटेल्स उभारण्यात आली आहेत. तर कुठे समुद्रातील ते सुखी जीव-ते मासे-त्यांना कोंडून ठेवण्यासाठी मत्स्यालय उभारले आहे. उरल्यासुरल्या सांगरकिनाऱ्यावर भेळपुरीच्या गाड्यांनी आक्रमण केलेले आहे.  माणसे तेथे जो केरकचरा टाकतात त्यामध्ये माझी सागरातील रंगीबेरंगी रसिकता हरवून जाते.

एवढा तो विशाल रत्नाकर, त्याची तरी माणसाने काय स्थिती केली आहे? एकेकाळी रावणाने सीताहरण केले म्हणून या पयोधीला सेतूचे बंधन पडले ; तेव्हा कविमंडळी हळहळली. पण आज मोठमोठ्या शहरांतून गढूळ, दूषित पाणी या सागरालाच अर्पण केले जाते. आता तर आपल्या विज्ञानाची घमेंड येऊन मानव सागराच्या अंतःकरणातील स्नेहच हिरावून घेऊ पाहत आहे. या साऱ्या कर्तृत्वात शांत, उदात्त सागरसहवास मात्र संपला आहे आणि उरला आहे केवळ कोलाहल!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते


  • mi pahilela samudra kinara marathi nibandh
  • essay on samudra in marathi
  • me pahilela samudra kinara in marathi
  • me pahilela samudra essay in marathi
  • mala avadla samudra kinara

मी पाहीलेला समुद्र किनारा निबंध मराठी | Essay On Samudra Kinara In Marathi

मी पाहिलेला चुरशीचा सामना निबंध | Me Pahilela Samna Marathi Nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला चुरशीचा सामना  मराठी निबंध बघणार आहोत.  T.V.  वर सामना पाहील्यापेक्षा प्रत्यक्ष पाहण्यात काही वेगळाच  आनंद असतो . या निबंधात अश्याच एका कबड्डी सामन्याचे वर्णन  सांगितले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

दूरचित्रवाणीवर (T.V.)  सामने आपण घरबसल्या पाहतो. हजारो मैल दूरवर खेळाडू खेळत असतात आणि अगदी अक्षरश: खेळ चालु  असताना आपण तो दूरचित्रवाणीवर पाहत असतो. घरबसल्या असा सामना पाहत असताना आपल्या आजूबाजूला क्वचित कोणीच नसते, क्वचित असतात आपले एक-दोन मित्र. पण प्रत्यक्षात मैदानात अगदी जवळून एखादा चुरशीचा सामना पाहण्यातील आनंद अवर्णनीय आहे.

मी पाहिलेला एक चुरशीचा सामना कधीच विसरू शकत नाही. हा चुरशीचा सामना म्हणजे माझ्या शालेय जीवनातील एक अविस्मरणीय प्रसंगच. राज्यपातळीवरचे कबड्डीचे सामने आमच्या शाळेच्या पटांगणावर सतत सात दिवस चालू होते. सबंध महाराष्ट्र राज्यातून विविध संघ आले होते. त्यामुळे अनेक चुरशीचे सामने खेळले जात होते. शाळा, क्लास आणि अभ्यास यांमुळे सर्वच सामने पाहणे काही शक्य नव्हते. खेळाची शौकीन असलेली मुले मात्र अगदी अभ्यास बुडवूनही सामने पाहत होती आणि यावेळी त्यांना ते गुन्हे माफ होते.

me pahilela samna marathi nibandh
me pahilela samna marathi nibandh

आमच्या शाळेचा कबड्डीचा संघ अगदी कसलेला संघ होता. गायकवाड सर आणि तांबे सर मूलांना भरपूर सराव करायला लावतात. त्याबरोबरच रोजच्या व्यायामात देखील कधी सवलत मिळत नसे. त्यामुळे मुले अगदी चपळ बनली होती. प्रतिपक्षाच्या पकडीतून कसे सटकायचे याचे तंत्र त्यांनी चांगलेच आत्मसात केले होते. संघासाठी आवश्यक असतील त्यापेक्षा तिप्पट मुले तयार होती. त्यामुळे एखादा खेळाडू आजारी पडला तरी अडचण होणार नव्हती. असा हा आमचा संघ अंतिम सामन्याला आला नाही, तरच नवल!

अंतिम सामना आमच्यात आणि विदर्भाच्या एका संघात होता. सामना चारला सुरू होणार होता, पण तीनपासूनच मैदान भरून गेले होते. प्रतिस्पर्धी संघ पाहणा आलेला असल्यामुळे त्यांच्या बाजूचे प्रेक्षक कमी होते. पण इतर संघांचे खेळाडू आम्हांला चिडविण्यासाठी विरुद्ध संघाचीच बाजू घेत होते.

दोन्ही संघ समोरासमोर उभे झाले आणि सामना सुरू झाला. विदर्भ संघातील खेळाडू आमच्या खेळाडूंच्या तुलनेने बरेच ताकदवान दिसत होते. आपल्या पोरांचा या मल्लांपुढे कसा निभाव लागणार? मनात शंकेची पाल चुकचुकली आणि पंचांनी शिट्टी फुकली. आमच्या कप्तानाने टॉस जिंकून खेळायला सुरुवात केली होती. पण शेवटी आमच्या मनातील भीतीच खरी ठरली. त्या संघातील एका बलदंडाने आमच्या कप्तानाला अगदी सहजगत्या उभ्याउभ्याच धरले होते.

सुरुवातीलाच अपशकून झाल्याने धीर खचला आणि आमचे खेळाडू पटापट बाद होऊ लागले. आमचे आवाज बंद झाले आणि बाहेरून आलेल्या प्रेक्षकांच्या शब्दांना धार आली. मैदानाबाहेरच संघर्षाचे सामने रंगू लागले. शेम, शेम, हिप हिप् हुर्योच्या आवाजांनी वातावरण भरून गेले. आता आमच्या बाजूला फक्त एकच खेळाडू उरला होता. 

पराभव नक्की दिसू लागला होता. पण तो एकांडा वीर डगमगला नव्हता. 'कबड्डी-कबड्डी' करीत तो प्रतिस्पर्धी संघाच्या गोटात शिरला, अगदी सरळ आत. तेव्हा प्रतिस्पर्धीयांनी त्याची पकड केली. पण त्याचा दम सूटला नव्हता. एक विलक्षण झटका देऊन तो आपल्या बाजूला परतला आणि खेळाचे चित्र पालटले. आमचे सर्व खेळाडू जिवंत झाले आणि विरुद्ध संघात एकच खेळाडू उरला.

आता सामन्यावर पकड आमची होती आणि ती शेवटपर्यंत सुटली नाही. सामना आम्ही जिंकला होता. विदयार्थ्यांनी फक्त मैदानच उचलायचे बाकी ठेवले होते! खेळाडूंची मिरवणूक निघाली, सत्कार झाले व राज्यपातळीवर आमचा संघ विजयी ठरला. एशियाडमध्ये खेळल्या जाणाऱ्या प्रदर्शनी सामन्यासाठी त्यातील काही जणांची निवड झाली. असा हा चुरशीचा सामना मी प्रत्यक्ष पाहिला होता. अनुभवला होता.
वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते
  • me pahilela samna marathi nibandh
  • mi pahilela samna in marathi
  • me pahilela samna nibandh
  • me pahilela samna essay marathi

मी पाहिलेला चुरशीचा सामना निबंध | Me Pahilela Samna Marathi Nibandh

मी रायगड बोलतोय | Mi Raigad Boltoy Nibandh Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी रायगड बोलतोय मराठी निबंध बघणार आहोत.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


किल्ले रायगडाच्या सहवासात आज कित्येक वर्षांनी माझी मनीषा पूर्ण होत आहे. शिवरायांच्या किल्ले रायगडाच्या सहवासात आज मी हिंडत आहे-अगदी स्वच्छंदपणे. बालपणापासून शिवरायांविषयी मला विलक्षण ओढ. महाराष्ट्रापासून दूर अशा विदर्भभूमीत मी मोठा झालो; पण मला बाळकडू मिळाले ते शिवरायांच्या कथांतून. वाचण्याची कला अवगत झाली आणि साऱ्या कथांतील शिवाजी वाचून टाकला. 


शालेय जीवनात शिवाजीमहाराजांशी माझी घनिष्ठ ओळख झाली ती अभ्यासक्रमातील पुस्तकांमुळे आणि त्याहीपेक्षा शिवचरित्रावर निर्माण झालेल्या ललित साहित्यातून. 'श्रीमान योगी'ने मला एक आगळा स्वामी दाखविला; तर 'रायगडाला जेव्हा जाग येते'मध्ये मला एक मुत्सद्दी राज्यकर्ता पण दुःखी पिता भेटला. या साऱ्या पुस्तकांनी एकच कामगिरी केली आणि ती म्हणजे शिवरायांविषयीची विलक्षण ओढ माझ्या मनात निर्माण झाली. 


पुण्याला जावे, लाल महाल पाहावा, सिंहगड चढावा, पन्हाळ्यावर चढाई करावी, रायगडाला कवटाळावे अशी मला तीव्र इच्छा होती. त्यामुळे अनुकूल संधी मिळताच मी रायगडावर धाव घेतली. माझ्याबरोबर माझा एक मित्र होता, त्यालाही रायगडाच्या प्रेमाने पछाडले होते.


raigad killa marathi nibandh
raigad killa marathi nibandh


रेल्वे  व एस. टी. चा प्रवास संपवून आम्ही रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आणि काय गंमत! तेथील प्रत्येक दगड, ती पायवाट सारे मला ओळखीचे वाटू लागले. उलट शासनाने बांधून काढलेल्या पायऱ्याच मला अनोळखी वाटू लागल्या. रात्री आम्ही रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडगावी मुक्काम केला. आपल्या वार्धक्यात जिजामाता येथेच मुक्काम करीत असल्याचे स्मरले. रायगडावरील राज्याभिषेकप्रसंगी राजांनी येथूनच मासाहेबांना गडावर नेले होते, याची आठवण होऊन मन भरून आले.


भल्या पहाटे आम्ही गड चढण्यास सुरुवात केली. मुद्दाम जुनी पायवाट निवडली. या पायवाटेने राजे कितीतरी वेळा गड चढले असावेत, या विचाराने मन भारावले. इतर वेळी राजे घोड्यावरून चढले असतील; पण आग्याहून सुटून गोसाव्याच्या वेषात ते जेव्हा गडावर आले तेव्हा ते हीच पायवाट चढून गेले असावेत. महाराष्ट्राच्या स्वराज्यनिर्मितीत या पायवाटेचेही स्थान महत्त्वाचे आहे. स्वराज्याचे अनेक मनसुबे तिच्या कानांवर पडले असतील.



रायगडाचे स्थान खरोखरीच इतके रमणीय आहे की, कुणीही त्याच्या प्रेमात पडावे. गडाची चढण संपली आणि आम्हांला तहान लागल्याची जाणीव झाली. थोडीशी चौकशी केल्यावर आम्ही गडावरील 'गंगासागर' तलावावर येऊन पोहोचलो आणि ते स्वच्छ निर्मळ पाणी पाहून आम्ही सुखावलो. पोटभर पाणी पिऊन आम्ही काही काळ तेथेच विसावलो. भुकेल्या नजरेने आम्ही त्या पवित्र वास्तूचे दर्शन घेण्यास निघालो. प्रत्येक जागा इतिहासाचे एकएक पान उलटवीत होती. 


याच ठिकाणी जिजाऊमातेने शिवरायाला आशीर्वाद दिला असेल या भावनेने भारावून जाऊन तेथील थोडी माती उचलून आम्ही अंगारा म्हणून कपाळाला लावली. नंतर आम्ही राजांच्या दरबारात प्रवेशलो. त्यावेळी तेथे कोणीही नव्हते. पण महाराजांच्या आगमनाप्रीत्यर्थ दिलेली 'खडी ताजीम' माझ्या कानांत घुमली. अभिषेकाच्या प्रसंगी गागाभट्टाने म्हटलेले संस्कृत मंत्र कानांत घुमू लागले आणि त्या दरबाराच्या अवशेषांनी सारा इतिहास मला ऐकविला. निसर्गाने या पवित्र वास्तूवर जेवढे प्रहार केले त्याहूनही अधिक फोडतोड माणसांनी केलेली पाहून मन कष्टी झाले.


महाराजांचा मोडकळीस आलेला महाल पाहताना त्या थोर राजाचे शेवटचे दिवस मला आठवले. तोफखान्याची जागा पाहून आम्ही पुढे सरकलो. टकमक टोक, हिरकणी बुरूज हयाएकएक जागा त्यागाच्या, धाडसाच्या कथा सांगत होत्या. आणि मग मला दिसली ती जागा, ज्या ठिकाणी ते थोर जीवन सपले; पण ते स्थानही एका इमानी, स्वामिनिष्ठ कुत्र्याचे स्तोत्र गात होते. आम्ही त्या श्रीमान योग्याच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि गड उतरू लागलो, पण आता पावले जड झाली होती.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 

mi raigad boltoy marathi nibandh no 2
मी रायगड बोलतोय मराठीनिबंध क्रमांक २


मित्राला लिहिलेले पत्र मी पुरे केले आणि पाकिटावर पत्ता लिहून पत्र बंदही केले. जवळच बसलेल्या बाबांनी सहजच पाकीट उचलले आणि म्हणाले, "अहो राजे, कोणत्या युगात आहात तुम्ही? आता कुलाबा जिल्हा राहिला नाही. आता त्याचे 'रायगड' असे नामकरण झाले आहे.” मी पटकन पाकिटावर दुरुस्ती केली. पण मनात आले की माझ्या आवडत्या 'रायगडाला' कसा विसरलो बरे?




खरं म्हणजे गडकिल्ले मला अत्यंत प्रिय आहेत. त्यांत रायगड म्हणजे मानाचा तुराच. या रायगडामुळेच या जिल्हयाला. 'रायगड' हे नाव मिळाले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रायगडाच्या पुनर्भेटीसाठी माझे मन अगदी आतूर झाले होते; आणि काय योगायोग पाहा! आमच्या वर्गाची सहल रायगडावर नेण्याचे निश्चित झाले.




आम्ही रायगडावर पोहोचलो मात्र; आणि माझ्या कानांवर ते धीरगंभीर शब्द आदळले. "अरे थांब, थांब. एवढया आतुरतेने मला भेटण्यासाठी आलास, तेव्हा मला तुझे स्वागत केलेच पाहिजे." रायगड प्रत्यक्ष माझ्याशी बोलत असल्याचे मला जाणवले. “अरे दोस्ता, तुझ्यासारखी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी फारच थोडी बरं. ही माणसे येतात ती सुद्धा अगदी सहलीच्या मूडमध्ये. येताना बरोबर ट्रान्झिस्टर, टेपरेकॉर्डर, पुस्तके, खेळांची साधने आणतात. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूत येऊनही त्यांचे माझ्याकडे लक्षच नसते. ते आपल्याच दंगामस्तीत गुंग असतात. मग सांग, कोणाजवळ मी आपले मनोगत व्यक्त करायचे बरे!


“अरे मित्रा, मी माझ्या या जीर्ण थकलेल्या मनात केवढ्या आठवणी साठवून ठेवल्या म्हणून सांगू! कधी कधी मला माझ्या अस्तित्वाची भीती वाटते. हा सह्याद्री जर का रागावला ना, तर माझे उरलेसुरले अवशेषही गळून जातील आणि मग माझ्या या स्मृतिकोषातील ही सोनेरी पानेही नष्ट होतील. तीनशे वर्षांपूर्वीचे ते दिवस आठवले की आजही माझे शरीर रोमांचित होते.




“ज्या पर्वतावर माझे अस्तित्व आहे, तो हा पर्वत म्हणजे 'स्वातंत्र्याचा रखवालदार' आहे. अनेक गड, किल्ले आजही तो सांभाळून आहे. या महाराष्ट्राचे रक्षण करायचे हेच हयाचे जीवनध्येय. अनेक आक्रमणांना त्याने आपल्या निधड्या छातीने थोपवून धरले. स्वातंत्र्यासाठी चाललेल्या संघर्षाचे क्षणन् क्षण मी अनुभवले, त्याने बेहोष झालो. वेड्यासारखे स्वराज्याकरिता दौडणाऱ्या त्या वीरांना माझ्या दगडधोंड्यांचा त्रास होऊ नये म्हणून मी धडपडत असे.


“स्वराज्य स्थापन झाल्यावर राजधानी म्हणून राजांनी जेव्हा माझी निवड केली तेव्हा मला माझ्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आता त्या शूरवीर राजाचा सहवास आपल्याला लाभणार या कल्पनेने मी खूष होतो. पण त्या महात्म्याला उसंतच मिळाली नाही. नाना कामांत तो गुंतलेला असायचा. घरची आणि दारची नाना खटली त्याच्यामागे सतत असत. कधी एखादया रात्री तो येथे आला तरी नाना चिंतांनी ग्रासलेला असायचा.




"महाराज गेले आणि सारी रयाच गेली माझी! लढाईच्या वेळच्या तोफांचे भय नव्हते मला; पण घरभेदी माणसांचे कट माझे मन विदीर्ण करीत. इंग्रजांनी केले नाही इतके नुकसान स्वकीयांनी माझे केले. असे हे स्वकीय, महाराज निवर्तल्यावर येथे येत आणि जागोजागी मला खणत. त्यांना वाटे येथे महाराजांच्या वेळचे धन मिळेल. त्या वेड्यांना हे कळले नाही की माझ्याजवळ त्याहून फार मोठे धन होते आणि ते म्हणजे स्वदेशभक्तीचे'.




"ते धन फार थोड्यांनाच उमगले. शिवरामपंत परांजपे यांनी ते शब्दांत पकडले. गो. नी. दांडेकर यांना ते भावले, ब. मो. पुरंदरे त्या धनसंपत्तीने तृप्त झाले. आपल्या बंगल्यांना वा राज्यांना माझे नाव देऊन काय होणार? त्यासाठी हवी त्या थोर राजासारखी राजनिष्ठा, त्याच्यासारखे उज्ज्वल चारित्र्य ! पण आजकाल त्याचाच अभाव आहे. हेच माझे दुःख." रायगडाचा धीरगंभीर आवाज बंद झाला; पण मी मात्र रायगडाची ही कथा ऐकत ऐकत गडाच्या वरच्या भागात महाराजांच्या समाधीसमोर कधी येऊन पोहोचलो ते समजले देखील नाही.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते

  • mi raigad boltoy marathi nibandh
  • raigad killa marathi nibandh
  • raigad killa essay marathi

मी रायगड बोलतोय | Mi Raigad Boltoy Nibandh Marathi

mi pahileli jatra essay in Marathi | मी पाहीलेली जत्रा मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहीलेली जत्रा  मराठी निबंध बघणार आहोत.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

गाव शहरापासून जवळच आहे. त्यामुळे दोन-चार दिवसांची सुट्टी मिळाली की मी गावाकडे धाव घेतो. गावात आमचे घर आहे. तेथे माझे काका राहतात. के उतरण्याची सोय आहे. गावात एक गावदेवीचे देऊळ आहे. या आमच्या ग्रामदेवतेची जत्रा चैत्र महिन्यात पौणिमेला भरते. ही ग्रामदेवता गावकऱ्यांचे रक्षण करते, अशी साऱ्या गावकऱ्यांची श्रदधा आहे. त्यामुळे अनेकांनी नोकरी-व्यवसायासाठी गाव सोडले तरी ग्रामदेवतेवरील त्यांचा विश्वास मात्र कमी झालेला नाही. हे सारे गावकरी देवीच्या उत्सवाला वेळात वेळ काढून उपस्थित राहतात. मीही त्याला अपवाद नाही.


aamchya gavachi jatra marathi nibandh

aamchya gavachi jatra marathi nibandh



दसरा, दिवाळी हे घराघरांतून साजरे केले जाणारे सण; पण सोनादेवीचा उत्सव म्हणजे गावचा सामुदायिक सण. सोनुली नदीच्या काठी हे देऊळ आहे म्हणून देवीचे नाव सोनाई. देवीमुळे नदीचे नाव ठरले की नदीमुळे देवीचे नाव निवडले गेले ते देवीला ठाऊक. पण सोनाई व सोनुली दोघीही गावकऱ्यांच्या खास आवडत्या. गावातील अनेक लोक शहरात मोठमोठ्या हुद्दयांवर आहेत. त्यांनी यथाशक्ती मदत करून गावदेवीचे देऊळ छान सजविले आहे. गाभारा, सभामंडप, पूढचे अंगण, आवार सारे कसे नेटके आहे. पण गावातच कायम राहणारी माणसे थोडी असल्यामुळे एरव्ही हा परिसर कसा सुनाना भासत असतो. 



कुठे नदीवर आलेला एखादा माणूस देवळात येतो, बाकी सारा वावर त्या पुजाऱ्याचा व त्याच्या घरातील माणसांचा. पण चैत्रातील पुनवेच्या पुढेमागे पाच-दहा दिवस मात्र तो सारा भाग नुसता गजबजून गेलेला असतो. नोकरीधंदयाच्या निमित्ताने गावाबाहेर गेलेली माणसे यात्रेसाठी येतात, त्यामुळे घरोघरीही माणसांची वर्दळ असते.


जत्रेच्या काळात नव्याने रंगरंगोटी करून नटूनथटून देवालय आपल्या भक्तजनांसाठी उभे असते. रात्रीच्या वेळी दीपमाळेतील झगमगत्या दिव्यांचा प्रकाश दूरवर पसरतो. गावातील उत्साही तरुण देवालय आणि त्याचा परिसर पताकांनी सुशोभित करतात. बघता बघता त्या आवारात दुकानांच्या राहुट्या पडतात. मानवी जीवनातील विविध अंगांचे दर्शन ही दुकानेच घडवीत असतात.



देवीच्या ओटीसाठी खण, नारळ, फूले, हळदकुंकू विकणारी दुकाने, प्रसादाचे विविध पदार्थ असणारी मिठाईवाल्यांची दुकाने यांचा वशिला मोठा, ती देवालयाला चिकटून असतात. त्यांच्या शेजारी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू, बांगड्या, शोभेच्या वस्तू, तयार कपडे, झटपट फोटो काढून देणारी अशी अनेक दुकाने रांगेत बसलेली असतात. 


जत्रेच्या दिवसांत रात्रंदिवस ती दुकाने माणसांनी फुललेली असतात. त्यात आकड्यावर बाण मारण्याचा जुगार शिकविणारी दुकानेही असतात. अलीकडे कुटुंबनियोजन, मलेरियानिर्मूलन यांची माहिती देणारी दालनेही यात्रेत दिसतात. आजच्या जीवनातील परिपूर्णता तेथे साधलेली असते.



देवालयाच्या डाव्या बाजूला गुरांचे प्रदर्शन, म्हणजे गुरांचा बाजार भरतो. यंदा तेथे गीर जातीच्या गायीची माहिती देणारा विभाग शासनाने उघडला होता. त्याला लागूनच शेतीची अवजारे, कांबळी, खते, कोंबड्या व त्यांचा आहार यांचीही काही दुकाने होती. देवीदर्शन घेऊन येणारे गावकरी या साऱ्या दुकानांत डोकावीत होते; खरेदी करीत होते. त्यांना ठकविण्यासाठीही काही लोक त्यांत येऊन ठाकले होते. त्यांत प्रामुख्याने दिसत होते हात पाहणारे कुडबुडे ज्योतिषी. आपले भविष्य जाणण्यासाठी गावकरी त्यांच्याकडे हात पसरीत, तेव्हा मनात येई अरे, तुमचे भविष्य ठरविणारी ती सोनाई हे पाहत आहे. तिच्यावर ओझे टाका व निर्धास्तपणे स्वकर्तव्य करीत राहा.


जत्रेच्या निमित्ताने पाळणे, गोल फिरणारी चक्रे व हॉटेलेही उघडतात, कुस्त्यांचे फड रंगतात.  देवीच्या साक्षीनेच गावकरी हा सारा रंग लुटतात व पुढच्या वर्षीही यात्रेला येण्याचा मनात सकल्प करून गाव सोडतात.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते
  • aamchya gavachi jatra marathi nibandh
  • mi pahileli yatra
  • jatra vishe mahiti bhashan
  • jatra information in marathi

mi pahileli jatra essay in Marathi | मी पाहीलेली जत्रा मराठी निबंध

आमची मुबंई मराठी निंबध | Aamachi Mumbai Marathi My City Essay Marathi

निंबध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमची मुबंई माझे शहर मराठी निबंध बघणार आहोत. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

अलीकडे असा एकही दिवस उगवत नाही की, वर्तमानपत्रांत काही ना काही निमित्ताने मुंबईच्या गर्दीचा उल्लेख नाही. हाशहुश्श करीत आणि माणसांच्या गर्दीला शिव्याशाप देत प्रत्येक मुंबईकर मुंबईतच राहत असतो. मुंबईच्या गर्दीबद्दलची चर्चा जेवढी गर्जत असते, तेवढेच मुंबईत येणारे माणसांचे लोंढेही सतत वाढत असतात आणि हे सारे पाहून 'आमची मुंबापुरी' मात्र गालातल्या गालात हसत असते.

नाहीतरी या मुंबापुरीचं सारंच आगळंवेगळं. अगदी चिचोळ्या आकाराची ही लहान सात बेटे. सभोवताली सारं खारं पाणी. माडाच्या आणि ताडाच्या वाड्यांनी भरलेली आणि ताज्या म्हावऱ्याच्या वासाने दरवळलेली ही बेटे कुणी राजाने आपल्या लेकीला आंदण दिली आणि जावयाने ती व्यापारी कंपनीला विकून टाकली. त्याचक्षणी या बेटांचे भाग्य उजळले. अशी हिची मजेशीर दंतकथा आहे.

ही बेटे एकमेकांना जोडली गेली आणि एक नगरी निर्माण झाली. त्या नगरी वाढतच आहे. समुद्राला समांतर ठेवून ती आपले हातपाय पसरतच राहिली आहे. आजचे तिचे स्वरूप पाहून लेखक अरविंद गोखले तिला ‘महामाया' म्हणतात.

aamachi-mumbai-marathi-my-city-essay-marathi


या नगरीला मुंबापूरी नाव मिळाले ते तेथील देवतेच्या-मुंबापुरीच्या अधिष्ठानाने. या घाईगर्दीच्या शहरात आजही अनेक देवदेवता मोठ्या वैभवाने आपले अधिराज्य गाजवीत आहेत. पिकेट रोडवरचा मारुती, सागरकिनारी उभी असलेली महालक्ष्मी, उंचावर बसलेला सर्वसाक्षी बाबुलनाथ, कोर्टकचेऱ्यात गाजलेला विश्वविख्यात सिद्धिविनायक या बड्यांबरोबर इतर छोटेमोठे भगवान जागोजागी भेटतात. पण म्हणुन काही ही मुंबापूरी काशीप्रयागसारखे धार्मिक क्षेत्रस्थान ठरत नाही. तर अनेक बुद्धिवंतांची ही कर्मभूमी आहे. नेहरू प्लॅनेटेरियम, भाभा अणुकेंद्र येथे अखंड ज्ञानसाधना चालू आहे. आज शेसव्वाशे वर्षे झाली तरी मुंबई विदयापीठ येथे आपला आब राखून आहे.

'देशातील महान औदयोगिक नगरी' हे सन्मानाचे मोरपीस तर मंबापुरीने आपल्या मस्तकी केव्हाच खोचले आहे. पण आज तेच तिच्या दुःखाचे कारण झाले आहे. प्रदूषित वातावरण हे मुंबईच्या कीर्तीला लागलेले गालबोट आहे. गगनाला भिडणाऱ्या सिमेंटच्या जंगलांनी मुंबईतील ताडामाडाच्या वाडया केव्हाच नष्ट केल्या आहेत. आता आमच्या या मुंबापुरीत दिसतात केवळ उंच इमारती, आणि झोपडपट्टया व त्यांच्या भोवतालचे उकिरडे.

खरं पाहता, या नगरीचे अंतःकरण मोठे उदार, सर्वसमावेशक आहे. म्हणून तर येथे सगळ्या जातींचे, सगळ्या पंथांचे, सगळया धर्माचे लोक आनंदाने नांदतात. जगाच्या कानाकोपऱ्यातून माणसे या महापुरीत येतात ती आपले नशीब आजमावयाला. कलावंतांच्या कलेचीही ही नगरी योग्य बूज राखते, विद्वानांच्या विदयेला वाव देते. आणि व्यापाऱ्यांच्या मालाला न्याय देते. तिची स्वतःची एक भाषा आहे, मग ती राज्यभाषा मराठी असो वा राष्ट्रभाषा हिंदी असो. तिच्यावर 'मुंबईचा' एक वेगळा ठसा आहे. स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाने नांदणारी ही मुंबापूरी आहे; मग कुणी तिला मुंबई म्हणो वा बॉम्बे म्हणो, ती आहे आमची आगळीवेगळी मुंबापुरी!


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता.   पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निंबध 2 

माझे आवडते शहर निबंध |  my city essay in marathi

मी महाराष्ट्र राज्यात राहतो. मुंबई हे आमचे राजधानीचे शहर आहे. तसेच संपूर्ण भारताची ती आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. कारण येथील व्यापारात आणि भांडवल बाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते, फार पूर्वी मुंबई म्हणजे सात बेटांचा छोटा समूह होता. या बेटाच महत्व ओळखून इंग्रजांनी त्याचा विकास केला.


 'मुंबादेवी'' ही मुंबईची ग्रामदेवता तिच्यावरूनच "मुंबई" हे नाव पडले. मुंबई हे बंदर असल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी फारच सोयीचे आहे. त्यामुळेच येथे अनेक उद्योगधंद्यांची फार झपाट्याने वाढ झाली. लहानात लहान उद्योगापासून मोठ्यात मोठ्या उद्योगापर्यंत सर्वप्रकारचे उद्योग याठिकाणी आहेत. तसेच हे राजधानीचे शहर असल्यामुळे सर्व विभागीय व मुख्य शासकीय कार्यालये याठिकाणी आहेत. 


भारतातील रोखे बाजाराचे प्रमुख केंद्र मुंबईत आहे. 'बॉम्बे हाय' येथून नैसर्गिक  तेल व वायू समुद्रातून काढला जातो. मुंबईच्या तारापूर येथे अणुशक्ती केंद्र आहे. महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय मुंबई येथे आहे.  मुंबई हे महाराष्ट्रातील शिक्षणाचे एक प्रमुख केंद्र आहे. येथे सर्वप्रकारच्या विद्याशाखांमध्ये शिक्षण दिले जाते. उदा. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कला इत्यादी. अनेक सामाजिक संस्था येथे कार्यरत आहेत. 



स्वातंत्र्यपूर्व काळातील स्वातंत्र्य चळवळीचे मुंबई हे एक प्रमुख केंद्र होते. पु ल देशपांडे, पु. भा. भावे, बाबूराव पेंटरसारख्या मोठ्या लोकांची देणगी महाराष्ट्राला मुंबईकडूनच मिळाली. सचिन तेंडुलकरसारखा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू मुंबईचाच. सिनेउद्योगासाठी मुंबई संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. येथे बनणारे चित्रपट जगभरातील रसिकांना भुरळ घालतात.



मुंबईची सर्व उपनगरे एकमेकांशी लोकलने जोडलेली आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस हे अत्यंत देखणे व भव्य रेल्वे स्टेशन मुंबईलाच आहे. 'सहारा' या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सर्व जगात विमाने ये-जा करतात.


काम शोधण्यासाठी मुंबईत गेलेला माणूस उपाशी कधीच राहत नाही. त्याला काम नक्कीच मिळते. परंतु त्यामुळे मुंबईची लोकसंख्या प्रमाणाबाहेर वाढली आहे. त्यामुळे  गुन्हेगारी वाढली. त्यासाठी जनता व सरकारने गुन्हेगारीचे उच्चाटन करण्याचा कसून प्रयत्न केला पाहिजे. समुद्राकाठी असल्याने येथील वातावरण दमट आहे.
काही असो माझे मात्र मुंबईवर फार प्रेम आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद


वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते
  • स्वच्छ शहर सुंदर शहर मराठी निबंध

आमची मुबंई मराठी निंबध | Aamachi Mumbai Marathi My City Essay Marathi

माझे आजोळचे गाव मराठी निंबध | My Village Essay Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे आजोळचे गाव मराठी निबंध बघणार आहोत.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

माझे सारे बालपण मुंबईत गेले आणि शिक्षणही मुंबईतच झाले. तरी मला खरी ओढ असते ती देवराष्ट्राची. कारण देवराष्ट्र ही माझी जन्मभूमी आहे. देवराष्ट्र हे माझ्या आजोळचे गाव. या गावाच्या नावात 'देव' आणि 'राष्ट' असे दोन महान शब्द असले, तरी हे गाव मात्र अगदी छोटेसे आहे. या गावाविषयीची माझ्या मनातील ओढ मात्र विलक्षण आहे, त्यामुळे सुट्टी पडते कधी आणि आपण आजोळच्या गावाकडे पळतो कधी याची मी आतुरतेने वाट पाहत असतो.



माझे हे आवडते गाव सातारा जिल्हयाच्या टोकावरील डोगराच्या कुशीत वसलेले आहे. आजोबांच्या छायेखाली वावरणारा छोटासा नातूच जणू अगदी बालवयातील निरागसता आजही तेथे ओसंडून वाहताना आढळते एस् टी तून उतरून गावाच्या दिशेने थोडेसे चालावे लागते. पण आपण पाच-दहा पावले जात नाही तोच कुणाची तरी बैलगाडी जवळ येऊन उभी राहतेच. “अरे पावण्या, कवा आलास? शिवरामपंतांचा नातू नाही का तू!" असे म्हणून ज्या गप्पा सुरू होतात त्या गाव येईपर्यंत चालूच राहतात.

my-village-essay-marathi


देवराष्ट्रात कुणी कुणाला परका नाही, कुणाचे काही गुपित नाही. सर्वांना सर्वांविषयी आपूलकी. लग्न होऊन सासरी गेलेल्या गावातील सर्व मूली गावाच्याच माहेरवाशिणी. 'समुद्रेश्वर' हे गावाचे दैवत. त्याचा उत्सव सर्व गावकरी दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नोकरीधंदयाच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले गावकरीही त्यासाठी मुद्दामहून गावात येतात. कारण समुद्रेश्वरच आपले रक्षण करतो अशी या गावकऱ्यांची श्रद्धा आहे.



शेती हाच येथील गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे. या शेतीतही सतत प्रगती करण्याची गावकऱ्यांची तयारी असते. गावकरी व्यसनांपासून दूर असल्यामुळे गावात नेहमी स्वास्थ्य, संपन्नता आढळते. गावावर जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा तेव्हा साऱ्या गावाने एकवटून तिच्याशी मुकाबला केला.

सुट्टीत जेव्हा जेव्हा मी गावी जातो, तेव्हा तेव्हा शहरात मनावर आलेली मरगळ तेथे पळून जाते आणि तेथील उत्साह, चैतन्य मनात भरून घेतो. निळे आकाश आपली विशालता मला तेथेच दाखविते, स्वच्छ वाहते पाणी किती निर्मळ असते याची प्रचीती मला तेथेच मिळते. नदीच्या पाण्यात मनसोक्त डुंबावे आणि नंतर पाण्याबाहेर येऊन उन्हात पोटभर खेळावे हा आनंद तेथेच लुटायला मिळतो. 


पक्ष्यांच्या जगातील विविधता मी तेथेच जाणली. आजीच्या हातच्या विविध पदार्थांचा पाहुणचार घेऊन मी जेव्हा निघतो तेव्हा आजी हातावर दही ठेवते. आपल्याकडे असे मानतात की, दूर निघालेल्या पाहुण्याला दही दिले तर तो लवकर परततो. मी तर मनात त्यावेळीच पूढच्या सुट्टीत गावात परत येण्याचा बेत योजीत असतो. आजीआजोबाच नव्हे, तर वाटेत भेटणारे गावकरी, जणू सारे गावच मला निरोप देत असते.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

माझे आजोळचे गाव मराठी निंबध | My Village Essay Marathi

एक रखरखीत दुपार मराठी निबंध| Mi Anubhavleli Dupar Marathi Nibandh



एक रखरखीत दुपार मराठी निबंध हा पुढील प्रमाणे लिहीता येईल. मे महिन्याने मध्य गाठला होता आणि आपले आगळे अस्तित्व तो जाणवून दयायला लागला होता-विशेषतः मध्यान्हीच्या वेळी. अशाच मे महिन्यातील एक रखरखीत दुपार होती ती. सुट्टीचा दिवस असल्यामुळे सुखवस्तू समाज त्या रखरखीतपणापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी चार भिंतींच्या आड लपला होता. 

डोक्यावर विजेचे पंखे भिरभिरत होते. कुठे थंड पाण्याच्या सहवासात फिरणारे ‘रूम कूलर' त्या रखरखीतपणावर मात करीत होते. बहुतेक दारे, खिडक्या वाळ्याच्या पडदयांनी सज्ज झाल्या होत्या. तरी आतील मानवी समाज कुरकुरत होता, 'काय उकडत आहे!

काळाकुळकुळीत डांबरी रस्ता उन्हाने तळपत होता. जणू संतप्त सहस्ररश्मींचा काही गुन्हाच त्याने केला होता. उन्हाने हवालदिल झालेल्या रस्त्याचे काळे अंतःकरण आता द्रवू लागले होते. त्या रस्त्याला काटकोनात छेदणारा बोळ सुद्धा उदास आणि एकाकी दिसत होता. नेहमी तेथे 'विटीदांडूचा खेळ' किंवा 'क्रिकेटचा गेम' रंगलेला असतो. पण आज चिटपाखरूही त्या गल्लीबोळात दिसत नव्हते. आता पाऊण एक महिना त्या गल्लीला दुपारचा असाच एकाकीपणा साहावा लागणार होता.

mi-anubhavleli-dupar-marathi-nibandh


अशा या रणरणत्या दुपारीही समोर काहीतरी नवीन बांधकाम चालले होते. येणाऱ्या दिवाळीपूर्वी ते काम पूर्ण करण्यासाठी अनेक मजूर तेथे खपत होते. डोक्याला बांधलेला रुमाल एवढाच काय तो त्यांच्याकडे उन्हाला आडोसा होता. झाडाच्या सावलीत बसलेले कुत्रेही अस्वस्थ होते. त्यांची जीभ तोंडाबाहेर लोंबत होती. 



त्या सून्न वातावरणाचा भंग करणारा आवाज झाला, "भांडीऽऽ, बाई, भांडी घ्या." त्या बाईच्या डोक्यावरील भल्यामोठ्या टोपलीत भांडी होती व त्यांवर जून्या कपड्यांचे बोचके ठेवलेले होते. उन्हाने थकलेली ती, पाण्याचा नळ शोधीत असावी. मी तिला हाक मारली आणि थंडगार पाण्याचा ग्लास पूढे केला. "अग, कशाला हिंडतेस या रणरणत्या दुपारी?" "बाई, दुपार नाही पाहिली तर संध्याकाळ कशी गवसायची!" तिच्या एकाच वाक्याने केवढे विदारक सत्य उघड केले. ही रखरखीत दुपार आपल्याला जीवनातील रखरखीतपणा सहन करण्याचे सामर्थ्य देत असते, असेच जणू ती सांगू पाहत होती.



एखादया शीघ्रकोपी दुर्वासाचा संताप शांत झाल्यावर त्याच्या चेहऱ्यावरील रेषा जशा सुरकुतत जातात, तसा या दुपारचा 'ऐनपणा' संपल्यावर ही सुद्धा सुरकुतू लागते. घड्याळाचे काटे पाचाकडे सरकले की ही चवताळलेली महामाया दोनप्रहरी शांत होऊ लागते आणि सुस्तावलेले वारेही ये-जा करू लागतात. सहस्ररश्मी आपले चाबूक आवरते घेतो. मग घरात लपलेली माणसे बाहेर येतात. तापलेल्या धरतीला थंड करण्यासाठी पाण्याचा मारा करतात. 

सुखद संध्याकाळ अवतरते तेव्हा तिचे स्वागत करण्यासाठी वेलींवर सुवासिक सायली, जाई, जुई हसू लागतात. दुपारनंतर येणारी ही सुसहय संध्याकाळ जणू मानवांना सांगत असते, “अरे, जीवनातही अशी चटके देणारी दुपार संपली ना, की रम्य, शांत संध्याकाळ निश्चित अवतरते!"


वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते
  • मी पाहिलेली दुपार निबंध
  • माझी मे महिन्यातील दुपार निबंध मराठी
  • mi anubhavleli dupar marathi nibandh 9th
  • mazi may mahinyatil dupar varnanatmak 
  • dupar essay in marathi


एक रखरखीत दुपार मराठी निबंध | Mi Anubhavleli Dupar Marathi Nibandh