वर्णनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वर्णनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे आजोबा मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. आजोबा या शब्‍दाबरोबर आठवण येतात, ते आपल्‍यावर प्रेम करणारे व आपले सर्व लाड व  हट्ट पुरवणारे आपले आजोबा. लहानपणीचे ते आनंदीदायी क्षण आजही आनंद देऊन जातात, अश्‍याच एका प्रसंगाचे वर्णन निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आज आमच्याकडे एक छोटासा घरगुती समारंभ झाला. माझे सर्व काका, आत्या, कुटुंबातील लहानथोर सर्व मंडळी एकत्र जमली होती. आम्ही आमच्या आजोबांचा ऐंशीवा वाढदिवस साजरा केला. गेले सात-आठ दिवस आमची अगदी गुप्त तयारी चालली होती. आम्हांला आजोबांना काही कळू दयायचे नव्हते.

maze-ajoba-marathi-nibandh
maze-ajoba-marathi-nibandh

 पण शेवटी आजोबांनीच आम्हांला धक्का दिला. जेवण झाल्यावर त्यांनी सर्वांसाठी उत्कृष्ट आंबा आइस्क्रीम मागवले होते आणि समारंभाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्यांनी एकेक भेटवस्तु दिली आणि ती भेटवस्तू देताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीचे वैशिष्ट्य, तिचे छंद, तिच्या आवडी लक्षात घेतल्या होत्या. त्यामुळे खूपच मजा आली.
 
माझे आजोबा सदा प्रसन्न आणि तृप्त असतात. आजोबांच्या या आनंदी, आशावादी वृत्तीमागे आहे त्यांची तंदुरुस्ती ! त्यांचे वागणे अतिशय नियमबद्ध  आहे. काहीही झाले तरी त्यांचे पहाटे फिरायला जाणे कधी चुकत नाही. त्यांनी एक 'पेन्शनरांचा क्लब' स्थापन केला आहे. ही वृद्ध मंडळी एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात, सहलीला जातात. अशा प्रसंगी आजोबा आपल्या दोस्तांसाठी आजीला कुरकुरीत चकल्या करायला सांगतात.

आजोबांना आमच्या आजीविषयी विशेष अभिमान आहे. आजोबा सरकारी कचेरीत मोठ्या हुद्द्यावर होते आणि तेथे अगदी उच्च पदावरून ते सन्मानाने निवृत्त झाले. त्याचे श्रेयही ते आमच्या आजीला देतात; कारण त्यांच्या मते, घराच्या आघाडीवर त्यांना कधीही लक्ष घालावे लागले नाही. आमच्या आजीमुळेच आपले घर 'आदर्श' राहिले, असे ते मानतात.  

आजही आजोबा घरात असूनही सर्वांपासून अलिप्त राहतात. कुणाच्याही कुठल्याही निर्णयात ते ढवळाढवळ करत नाहीत. पण आम्ही एखादी शंका विचारली, तर ते त्याचे खुलासेवार निरसन करतात. उत्तम आरोग्य, स्वच्छ विचारसरणी आणि सतत उदयोगात रमलेले आजोबा अगदी ऐंशीव्या वर्षीही तेज:पुंज वाटतात. आपल्या वार्धक्यातही त्यांनी आपल्या 'युवा' मनाला जपले आहे, म्हणून ते सदा आनंदी राहू शकतात. 'कर्ते व्हा. कार्यरत राहा' हा त्यांचा आम्हांला सदैव उपदेश असतो.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व  तुमच्‍या आजोंबासोबत असलेल्‍या गमतीदार आठवणी तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद.  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

महत्‍वाचे मुद्दे : 

(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. ) 

  • व्यक्तिमत्त्व वर्णन
  • वय, पोशाख, काही सवयी
  • स्वभाव- एखादा प्रसंग
  • घरात असून अलिप्त
  • परंतु घरातील एक 
  • वय मोठे; पण मन तरुण 
  • कर्तबगारी
  • कर्तव्यदक्ष 
  • शिकवण

टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • My (majhe) Grandfather Essay in Marathi language


 निबंध 2 

maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध


आज मी दोन दिवसांची रजा घेऊन आजोबांना भेटायला आलो आहे. बसमधून उतरल्याबरोबर माझी पावले फारच जलद पडू लागली आहेत. डोळे कौलारू घराचे छप्पर शोधताहेत. गेली पंधरा वर्षे असाच धावत धावत मी माझ्या आजोळी येत आहे.

कधी 'मे' महिन्याची सुटी लागते व कधी कोकणात जातो, असे मला व्हायचे. मुंबईहन कोकणात मला न्यायला पूर्वी आजोबाच यायचे. पुढे मोठी झाल्यावर आम्ही नातवंडे एकटी यायला लागलो. पण कोकणात आल्यावर बसमधून उतरताक्षणीच आजोबांचे शद्र कानावर पडायचे, आलात बाळांनो, या.' या वात्सल्यपूर्ण शब्दांनी आमचं स्वागत व्हायचं व प्रवासाचा सर्व शीण जायचा!


आमचं कोकणातील घर नारळी पोफळींच्या गर्द छायेत झाकून गेलं होतं. परंतु आजोबांचा सहवास जास्त शीतल वाटायचा. आजोबांना कधीच रागावलेलं मी पाहिलं नाही. एखादी मनाविरुद्ध गोष्ट झाल्यास ते फक्त 'गोविंद! गोविंद!' म्हणायचे.


नातवंडांशी बोलताना, गोठ्यातल्या जनावरांशी बोलताना किंवा शेतातील गड्यांशी बोलताना त्यांचा स्वर नेहमीच शांत व प्रेमळ असायचा. आजोबा कधीच रिकामे बसायचे नाहीत. त्यांचा निम्मा वेळ शेतात व गोठ्यातच जायचा. शेतात ते गड्यांच्या बरोबरीनं काम करायचे. 


गोठा तर इतका स्वच्छ ठेवत की, घरातच जनावरं बांधलीत की काय असे वाटावे! संध्याकाळी घरात आल्यावरही हातानं बारीक-सारीक काम चालूच. त्यांना कोठे एवढासाही केर पडलेला खपत नसे. वर्तमानपत्रं, पुस्तकं, औषधे कशी व्यवस्थित लावून ठेवलेली. त्यांच्या सर्व वस्तू जिथल्या तिथे; अंधारातही अचूक सापडणाऱ्या!


संध्याकाळी त्यांच्या मुखातून देवाची स्तोत्रं एकामागून एक बाहेर पडत असत. आम्हा नातवंडांनाही स्तोत्र शिकवणं हे त्यांचं आवडतं काम. ते आम्हाला गोष्टीही सांगायचे. पण अभ्यास शिकवणं, श्लोक शिकवणं त्यांना जास्त आवडायचं. 

आजही जुन्या कवितांचं, स्तोत्रांचं, श्लोकांचं धन माझ्याजवळ आहे ते आजोबांच्यामुळेच. आजीचे व त्यांचे नेहमी भांडण व्हायचे कारण त्यांच्या स्वभावातला दोष म्हणजे दातृत्वाचा अतिरेक. गड्यांना आंबे, सुपाऱ्या, नारळ न मागता मुक्तहस्ताने ते देत. 


आला गेला पै-पाहुणा पिशव्या भरभरून माल घेऊन जाई. एखादा मित्र बरोबर घेतल्याशिवाय ते कधी जेवलेच नाहीत. त्यामुळे ते सदैव समाधानी असत. जेवण तरी काय? साधा आमटी-भात असला तरी चालेल पण तो रुचकर असला पाहिजे. पाट-पाणी, वाढप सर्वच त्यांना व्यवस्थित लागायचं. 

पण परवा शेतातून परत येताना बांधावरून पाय घसरून ते पडले. पाय दुखावला. त्यांना वाटलं, आपली अखेरच जवळ आली. त्यामुळे कोणताही उपाय न करता त्यांनी शेवटचं भेटायला बोलावलं, म्हणून मी धावत-पळत आलो आहे. आजोबांना मुंबईला नेऊन मला बरं करायचं आहे. आजोबांचा प्रेमळ सहवास मला अजून हवा आहे; अजून हवा आहे ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध

Maza avadata rutu essay in marathi language | माझा आवडता ऋतू मराठी निबंध 


माझा आवडता ऋतु पावसाळा मराठी | maza avadata rutu pavsala essay in marathi

ग्रीष्म ऋतू म्हणजे सर्व निर्जीव-सजीव वस्तू आणि प्राणिमात्रांना होरपळून काढणारा ऋतू... न्हाळा म्हणजेच ग्रीष्म मानवाला नकोनकोसे करून सोडतो. सारी जीवनसृष्टी हवालदिल होऊन जाते. 'पुरे-पुरे आता तो उन्हाळा !' असा आक्रोश करू लागतात. आणि तेवढ्यात कोठे तरी एखादा काळा ढग दिसू लागतो.

चातकाप्रमाणे आतुर झालेला मानव त्याला न्याहाळू लागतो. एकाएकी एकमेकांवर ढग आपटू लागतात, त्या तालावर मोर नाचू लागतात, बेधुंदपणे वारा वाहू लागतो. आकाशातून टपोरे थेंब पृथ्वीवर पडू लागतात. धरित्री तर केव्हाची तहानलेली असते. भराभरा ते पाणी अधाश्याप्रमाणे पिऊन टाकते. तिची तहान भागते, ती वसुंंधरा आनंदाने पुलकित होऊन...


सगळीकडे आपल्या जवळचा सुगंध पसरवून टाकते. मग तर मोर बेहोष होऊन नाचू लागतात. गुरे, ढोरे शेपट्या उंचावून धावत सुटतात. बेडकांच्या तर 'डराँव डराँव'ने सारा आसमंत भरून जातो आणि 'वर्षा ऋतू'चे आगमन मोठ्या उत्साहात या पृथ्वीतलावर होते.


खरोखरीच या चराचरसृष्टीला मिळालेली अनमोल भेट म्हणजे हा 'वर्षा ऋतू' होय. 'नवचैतन्य' घेऊन येतो हा वर्षा ऋतू. कालपर्यंत उजाड-खडकाळ माळरान तापलेला, तो दोन-तीन दिवसात हिरवागार होऊन जातो. या हिरव्या रंगांच्या छटा तरी किती हो ! हिरवा कंच... काळपट हिरवा... पोपटी हिरवा... हिरवागार हिरवा... अशा विविध रंगात रोपटी वाढतात.


शेते बहरतात. झाडे फळे-फुले-पाने यांनी बहरून जातात. मानवाला आपले सारे वैभव देण्यास आनंदाने डुलू लागतात, नम्र होतात. मक्याची-ज्वारीची-गव्हाची ताटे, लोंब्या वाऱ्यावर डोलु लागतात. कळ्या उमलू लागतात, फुले हसू लागतात अन् हिरव्यागार शालूवर पाण्याचे मोती चमकू लागतात.

ग्रीष्मात आटून गेलेल्या नद्या-नाले-ओढे आता दुथडी भरून वाहू लागतात. त्यामधील दगड-धोंडे-गोटे-खडक एकदम स्वच्छ धुऊन जाऊन चमकायला लागतात. नद्यांची पात्रे अथांगपणे भरधाव वाहु लागतात. असा हा जीवनदायी 'पावसाळा'. मानवी जीवनाला समृद्ध करून टाकतो.

Maza-avadata-rutu-essay-marathi-language
Maza-avadata-rutu-essay-marathi-languageAdd caption

कोठेही नजर टाका, हिरवा मांगल्याचा, सूचक समृद्धीचा प्रतिक, डोळे अन् आत्मामन तृप्त करणारा हा वर्षा ऋतू म्हणूनच सर्वांना हवाहवासा वाटतो. ना ग्रीष्माचा दाह ना शिशिरातील थंडीचा कडाका.. सगळा कसा सात्त्विक... सौम्य स्वभावाचा आल्हाददायी हा ऋतू. आषाढातील वर्षाचे आगमन...


याच आषाढात... संपूर्ण वर्षा ऋतूचा आनंद घेण्यासाठी वारकऱ्यांची लाट येते... 'ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषात वारकरी चिंब भिजून जातात. पण उत्साहात नाचत राहतात.

शेतकरी या पावसाच्या धारामध्ये आपल्या घामाच्या...कष्टाच्या धाराही मिसळतो अन् मग काय ? आनंदच आनंद. धरित्री भरभरून पीक देते. शेतकरीच नव्हे तर सर्व प्राणिमात्र आनंदीत होतात.

तसा पाहिला तर 'वर्षा ऋतू', 'वसंत ऋतू'च्या पुढे उपेक्षिला जातो. परंतु त्या 'वसंत ऋतूच्या क्षणिक सुखापुढे या 'वर्षा'चा उदात्तपणा. उदारपणा केवढा महान असतो. खरोखरीच वर्षा ऋतू सृष्टीचे 'सौभाग्य' आहे. ती मानवी जीवनाची 'गंगोत्री' आहे. मानवाला मिळालेले 'महान वरदान' आहे.

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .


Maza avadata rutu marathi nibandh


निबंध 2



घरामध्ये महिलामंडळच भरलं होतं. सर्वांजवळ पोळपाट लाटणी होती, म्हटलं , “ मोर्चा आहे की काय ? " म्हणून आईला विचारलं तर, " अरे, पावसाळा आला ना तोंडावर ! वर्षाचे पापड, लोणची करून ठेवते - " उत्तर आलं...पावसाळा येणार त्याची अशी आगमनाची वार्ता घरोघरी होणाऱ्या पापड लोणच्यांनी येते. तशीच लगबग सर्वत्र दिसते.

छत्र्या दुरुस्तीला निघतात, गच्चीवर गळती थांबवण्याचे लेप दिले जातात, बाजारात छत्र्या रेनकोटची रेलचेल होते, विक्सच्या जाहिराती वाढतात, शेतकरी शेतं नांगरून आभाळाकडे नजर लावून बसतात...!
पावसाची नऊ नक्षत्रं कोरडी गेली तर ग्रीष्माची अनिर्बंध सत्ताच ! एरवी ग्रीष्माने भाजून काढलेल्या जमीन, झाडवेली, पशुपक्षी यांना दिलासा देते ती वर्षाराणीच...

मृगाच्या रथात बसून बिजलीचा चाबूक घेऊन, नभांच्या मेघगर्जनेच्या तुताऱ्या फुकत तिचं दिमाखदार आगमन होतं. साऱ्या आसमंतात मृद्गंधाचं अत्तर उधळलं जाऊन सारं वातावरण कसं सुगंधी होतं. मरगळलेले वृक्ष वेली अंग झटकुन चैतन्यानं फुलू लागतात, आनंदान डोलू लागतात.

कोरड पडलेल्या नद्या, ओढे, तळी, धरणे पाणी पिऊन आनंदीत होतात. अगोदरच तयार करून ठेवलेल्या घरट्यात पक्षी विसावतात. दाणागोटाही अगोदरच साठवलेला असतो म्हणून हळूच डोकावून वर्षाराणीचं वैभव निःशब्दपणे कौतुकाने बघतात.


मुंग्याही वारुळाचा आश्रय घेतात. हिरवा शालू नेसून काळ्या मेघांचं काजळकुंकू करून तर जास्तच गोड दिसते. घरांच्या छपरावर होणारी टप टप् कृषिराजाला मधुर स्वर वाटू लागतात.
शहरातून वाहतूक विस्कळीत होते. क्वचित वीज जाऊन अंधारात जग बुडून जाते. “ ये रे ये रे पावसा..." म्हणत मुलं नाचतात. कागदी नौदल प्रमुख होऊन आईचा मार खातात...कुणी रसिक गरम गरम चहाचे घुटके घेत उबदार पांघरूण घेऊन झक्कपैकी कादंबरी वाचत पडतो...

सारी सृष्टी बेहोष होते. बेभान, धुंद होते. तशीच बेहोषी भाविकांनाही येते. नामसंकीर्तनात दंग होऊन त्यांची "पाऊले चालती पंढरीची वाट ! " चंद्रभागेच्या तीरी जल्लोष होतो. टाळ मृदुंग आकाश दणाणून सोडतात.
...पण हीच वर्षाराणी रुसली तर तोंडचं पाणी पळवते. डोळ्यात पाणी आणते. देवाला गाभाऱ्यात कोंडलं जातं, एवढेच काय गाढवागाढवीचं लग्नही लावलं जातं. कृषिराजा भिकारी होतो. गायवासरे कसायांची धन होते.

पाणी...वेळच्या वेळी, हवा तेवढाच पाऊस पडला तर सर्व धरित्री सुजलां सुफलां होते. तीन महिन्यांत वर्षाची बेगमी होते म्हणूनच का तिला वर्षा 'राणी म्हणत असतील."

Maza avadata rutu essay in marathi language | माझा आवडता ऋतू मराठी निबंध

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध बघणार आहोत. क्रिकेटचे आणि भारताचे एक निराळेच नाते आहे.  हॉकी राष्‍ट्रीय खेळ असल्‍यावरही गल्‍ली बोळामधेही आपल्‍याला क्रिकेटचे सामने आपल्‍याला दिसुन येतील. क्रिकेटचे भारतात असलेले वेड  आणि खेळाडुंची क्रिकेटला जिव की प्राण म्हणुन खेळण्याची तळमळ आपल्याला खालील ४ निबंधामधुन दिसुन येईल चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.  


माझा अविस्मरणीय सामना : यंदा 'महाविद्यालयीन ट्रॉफी जिंकून आणायचीच. अशी प्रतिज्ञा आमच्या मुंबई कॉलेज संघाने केली होती. त्यासाठी गेले सहा महिने रात्रंदिवस सराव चालू होता. मागील  वेळेस  हातातोंडाशी आलेली ट्रॉफी शेवटच्या बॉलवर घालवावी लागली होती. आता कोणतीही कसर सोडायची नाही अन् कसूरही करायची नाही असा निश्चय केला होता सर्व खेळाडूंनी...

सामने सुरू झाले, अन् आमचा सामना अंतिम डावापर्यंत तरी कोणतीही अडचण न येता पोहोचला. आता खरा कसोटीचा क्षण होता. आमच्याबरोबर खेळणारा संघही काही कमी नव्हता. त्याची ही तयारी उत्तम होती. 'ट्रॉफी' जिंकण्यासाठी त्यांनीही जिद्दीने खेळ सुरू केला होता. तोडीस तोड - धावांबरोबर धावा - खेळ कसा अटीतटीचा चालला होता. (हे पण वाचा मी पाहिलेला चुरशीचा सामना निबंध)

दोनवेळा सामना अनिर्णित राहिला. अर्थात त्यामुळे विश्रांतीचा दिवसही रद्द करून सामना चालू ठेवायचा आणि त्यातून निर्णय घ्यायचा असे ठरले. वादावादी, गाजावाजाही वाढत होताच. आणि अखेरीस तो दिवस उजाडला. स्टेडियम माणसांनी कसे फुलून गेले होते. अशा सामन्यातून आंतरराष्ट्रीय संघांची निवड होणार असते. देशभरातून अनेक क्रिकेट शौकिनांनी आज भाऊगर्दी केली होती.

एखादा चौकार असो किंवा षटकार सारा स्टेडियम टाळ्यांच्या गजराने दुमदुमून निघत होता. एखादा झेल सुटला तरी सगळीकडे निराशेचा सुस्कारा ऐकू येत होता. इकडे विरुद्ध संघही बचावाचा खेळ खेळत होता. त्यामुळे खेळात तसा रंग चढत नव्हता. विकेट तर आमच्या गोलंदाजांनाच अनुकूल होती. परंतु नावाजलेल्या गोलंदाजांची गोलंदाजीही आज मूग गिळून बसली होती. 

मैदानाच्या दिशेने आता प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या, फळांच्या साली, कागदांचे बोळे यायला लागले. अखेरीस दिवस संपेपर्यंत विरुद्ध संघ कसाबसा संपूर्ण आटोपला तेव्हा त्याच्या २१० धावा झाल्या होत्या.

दुसरा दिवस उजाडला तो आमच्या संघाच्या धडाडीच्या खेळानेच. चौकारांच्या दणक्याने कांबळीने सर्वांना खूश करून सोडले. तर सरदेसाईची त्याला साथ आणि चोरट्या धावा यामुळे आमचा संघ धावसंख्या वाढवीत होता. अखेरीस ३०४ धावांवर आमचा संघ बाद झाला अन् ९४ धावांनी आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात विरुद्ध संघानेही धावांचा डोंगर रचायला सुरुवात केली.

पहिल्या आघाडीच्या पाच खेळाडूंनी जणू चंगच बांधला होता. एकही बॉल, बॅटला स्पर्श केल्याशिवाय जातच नव्हता. ९४ धावांची आघाडी पार करून त्यांनी पुढे जोराचा पवित्रा घेतला आणि अखेरचा गडी बाद होईपर्यंत आमच्यावर १९९ धावांची आघाडी मिळविली.

mi-pahilela-cricket-samna-essay-in-marathi
mi-pahilela-cricket-samna-essay-in-marathi


आमच्या संघाला वाटले, ही धावसंख्या आपण सहज पार करू. परंतु पहिले तीन खेळाडू जेमतेम ४०-४५ धावा करून तंबूत परतले. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. इकडे विरुद्ध पक्षाला 'चिअरअप' जोरात सुरू झाला आणि आमच्यावर दबाव वाढला.

नशिबाने साथ दिली. अन् पुढील दोन खेळाडूंनी दमदार खेळ सुरू करून धावसंख्या १५० पर्यंत नेली. पुन्हा एकापाठोपाठ पाच गडी बाद झाले. आता धावसंख्या पार करण्यासाठी ५० धावांची गरज होती. नववा गडी म्हणून मी तंबूतून बाहेर पडलो. खरा मी गोलंदाज, आता बॅट कशी साथ देते तेच पाहायचे होते. कॅप्टनने मला धीर दिला. माझी पाठ थोपटली. मी मैदानावर आलो. बॅटला बॉल लागला आणि समोरच्या खेळाडूच्या मदतीने धावा सुरू केल्या.

 दोघांनी मिळून ४३ धावा केल्या. तेवढ्यात समोरचा गडी बाद झाला. पुन्हा टेन्शन वाढले. पाहिजे होत्या फक्त ७ धावा. आता दहाव्या खेळाडूला धीर देण्याची वेळ माझी होती. तो दबकत दबकत खेळत होता. चोरटी एखाद्-दुसरी धाव काढत होता. एक चेंडू आला अन माझ्याकडून दणदणीत चौकार मारला गेला अन् स्टेडियम दणाणून गेले. कप्तानासह सर्व खेळाडुंनी मैदानाकडे धाव ठोकली. मला व माझ्या जोडीदार खेळाडूला उचलून घेतले.

गौरवाने तंबूत आणले, जणू काही मीच एकटा यशाचा मानकरी होतो. आमच्या संघाने ट्रॉफी जिंकली होती. ट्रॉफी घेतानाही आमचा सर्व संघ उपस्थित होता. ट्रॉफी डोक्यावर घेऊन नाचत होता. असा हा माझा क्रिकेटचा सामना माझ्या जीवनातील अविस्मरणीय सामना ठरला. (100 हुन अधिक निबंध वाचा तुमच्‍या मोबाईलवर  )

मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला  हे  तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .

निबंध 2

 एक रंगलेला क्रिकेटचा सामना


आमच्या वसाहतीच्या जवळच एक मोठे मैदान आहे. तेथे आम्ही नेहमी क्रिकेट खेळतो. एके दिवशी मोठ्या माणसांचा क्रिकेटचा सामना घ्यायचे ठरले. माझे बाबासुद्धा त्यात सामील झाले. 'संघ अ' आणि 'संघ ब' असे दोन संघ तयार करण्यात आले. आमच्या वसाहतीतील सर्व घरांत ही बातमी पसरली. सर्वांना उत्सुकता वाटत होती.

मग सामन्याचा दिवस उगवला. दोन्ही संघ मैदानात उतरले. वसाहतीत सर्व लोक सामना पाहण्यासाठी जमले होते. काहीजण खिडकीतून पाहत होते. सामना सुरू झाला. काहीजण खरोखरच छान खेळले. 'अ' संघातल्या चित्रेकाकांनी ५० धावा काढल्या, तर 'ब' संघातल्या मूर्तीकाकांनी सहा गडी बाद केले. बोंद्रेकाका खूप जाडे आहेत. त्यामुळे धावताना ते मजेशीर दिसत होते.

एकदा धावताना ते पडले. तेव्हा सगळे हसून हसून बेजार झाले. स्वत: बोंद्रेकाकासुद्धा हसत होते. अखेरीस ‘संघ अ' विजयी झाला. सगळ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. त्यानंतर सगळ्यांना खाऊ वाटण्यात आला. त्या दिवशी सर्वजण खेळातील आठवणी काढून गप्पा मारत होते. त्या दिवशी खूप मजा आली.

 महत्‍वाचे मुद्दे :

  • आम्ही मुले नेहमीच खेळतो 
  • एके दिवशी मोठ्या माणसांचा सामना 
  • काहीजण चांगले खेळले 
  • काही गमती 
  • आनंदाचे वातावरण.

निबंध  3

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना 


भारतीय संघ बांग्लादेशात खेळायला निघाला होता. कोण जाणार, कोण नाही याची चर्चा होऊन शेवटी संघ रवाना झाला. एकदिवसीय चार सामने आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार होते. सुरुवात तर चांगली झाली. एकदिवसीय चारही सामने भारतीय संघाने जिंकले.

पण यात विशेष आवडला तो दुसरा कसोटी सामना. कारण, या सामन्यामुळे विश्वचषक सामन्यात लागलेला कलंक पुसला गेला. बांगलादेशच्या याच संघाने आमच्या सर्व वीरांना चारी मुंड्या चित केले होते. त्याच संघावर  आमच्या क्रिकेट वीरांनी नेत्रदीपक विजय मिळवला.


असा हा सामना बांग्लादेशातील ढाका येथील शेरेबांगला स्टेडियमवर झाला. प्रथमच नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजी स्वीकारली. सुरुवातीलाच आपल्या खेळाडूंना सूर सापडला आणि भारतीय फलंदाजांनी बांग्लादेशच्या वेगवान व फिरकी गोलंदाजीचे पार खोबरे करून टाकले. एकापाठोपाठ एक अशा पाच फलंदाजांनी आपली शतके झळकावली.

सचिन व सौरभ यांनी आधीचा लागलेला डाग पुसून टीकाकारांची बोलती बंद केली. सहाशे दहा धावांचा डोंगर रचून भारतीय संघाने आपला डाव सोडला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला, बांग्लादेशला, खेळाची संधी दिली.
भारताच्या झहीर खानच्या तुफानी गोलंदाजीपुढे बांग्लादेशचा अर्धा संघ बाद झाला. उरल्यासुरल्या फलंदाजांना अनिल कुंबळेने तंबूत पाठवले.

चारशे धावांचे ओझे घेऊन फालोऑन स्वीकारून बांगलादेश दुसरा डाव खेळायला मैदानात उतरला. आता पाऊसच त्यांना वाचवू शकणार होता. पण त्या दिवशी तोही त्यांच्यावर फिदा नव्हता. या डावात बांगलादेशच्या खालेद मासूद, अश्रफूल आणि मोर्तझा यांनी अटीतटीची झुंज दिली. पण भारतीय खेळाडू आता पेटून उठले होते. अगदी सचिनने गोलंदाजीतही आपली करामत दाखवली आणि दोन गडी टिपले. भारताने बांग्लादेशचा १ डाव आणि २३९ धावांनी दणदणीत पराभव केला.

या यशाने भारताने जणू दाखवून दिले, 'हम भी कुछ कम नही !' आता आपल्या लाडक्या खेळाडूंवर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली, याचा मला विशेष आनंद झाला.

महत्‍वाचे मुद्दे :
  • विश्वचषक सामन्यात आलेले अपयश 
  • त्यामुळे निंदानालस्ती
  • मन दुखावले 
  • बांग्लादेशात सामने 
  • फलंदाजीतील पराक्रम 
  • गोलंदाजीतील विक्रम
  • मिळालेले यश
  • यशाचा परिणाम. 

निबंध 4


मी पाहिलेला चुरशीचा सामना 

इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने चालले होते. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या संघांत उपांत्य सामना होणार होता. हा मी पाहिलेला अत्यंत चुरशीचा सामना होता. सामन्याचा दिवस उजाडला. मी खादयपेये घेऊन स्टेडियमवर गेलो. ठीक वेळेवर दोन पंच आणि दोन्ही संघांचे कप्तान मैदानावर आले. नाणेफेक झाली.

त्यात दक्षिण आफ्रिकेच्या कप्तानाने हॅन्सी क्रॉनिएने बाजी मारली. मैदानाचा रागरंग पाहून त्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. थोड्याच वेळात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅडम गिलख्रिस्ट आणि मार्क वॉ फलंदाजीसाठी मैदानात उतरले, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. कप्तानाने चेंडू शॉन पोलॉक याच्या हातात दिला.

आता साऱ्या प्रेक्षकांनी आपले श्वास रोखून धरले होते. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या खेळाची सुरवात मोठ्या सावधपणे केली. खेळ थोडा धीमा वाटत होता. प्रेक्षक धावांच्या आतषबाजीसाठी आतुर होते; पण फलंदाज फारच जबाबदारीने खेळत होते.

नियोजित पन्नास षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर २१३ धावा झळकावल्या. चाळीस मिनिटांची विश्रांती सुरू झाली. क्रीडांगणावर खेळाडू नव्हते, प्रेक्षक जरा सैलावले होते. बरोबर आणलेल्या खादयवस्तूंचा समाचार घेणे सुरू झाले. पण कोठेही कागद फेकाफेकी नव्हती. विश्रांतीचा काळ संपला; पण कोठेही अस्वच्छतेचा अंशही नव्हता.

थोड्याच वेळात दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर मैदानावर फलंदाजीसाठी उतरले. ऑस्ट्रेलियाचा संघही क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. दक्षिण आफ्रिकेला सामना जिकण्यासाठी २१४ धावा करायच्या होत्या. सुरवात चांगली झाली. धावफलकावर दक्षिण आफ्रिकेच्या नावावर बिनबाद ४६ धावा लागल्या. जॉन्टी होडस व लान्स क्लसनर यांनी वेगाने फलंदाजी केली.

धावफलकावर ७ गडी बाद २०० धावा लागल्या. आता फक्त १४ धावा करायच्या होत्या. बहुतेक हेच दोन्ही खेळाडु सामना जिंकून देतील, असे वाटत असतानाच जॉन्टी बाद झाला. सारे प्रेक्षक हळहळले. जमलेली जोडी फुटली होती. नंतर आलेला शॉन पोलॉक शून्यावर बाद झाला. आता चुटपूट लागली, दक्षिण आफ्रिका सामना गमावणार की काय? पण अखेरच्या षटकात क्लुसनरने तीन चौकार मारले.

 आता फक्त दोनच धावा हव्या होत्या; पण शेवटचा फक्त एकच गडी बाकी होता. कशीबशी एक धाव मिळाली. आता एक धाव काढली की विजय दक्षिण आफ्रिकेचा होणार होता. सारे प्रेक्षक नि:स्तब्ध होते आणि दुर्दैव म्हणजे, डोनॉल्ड धावचीत झाला. दोन्ही संघांची धावसंख्या सारखीच झाली, २१३ ! मॅच 'टाय' झाली होती.
मग विजय कोणाचा? सारे वातावरण संभ्रमित होते. पंच निर्णय काय देणार?

 सर्व अधिकाऱ्यांच्या विचारविनिमयानंतर निर्णय जाहीर झाला. साखळी सामन्यांत पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर मात केलेली असल्यामुळे 'ऑस्ट्रेलिया'चा संघ विजयी ठरला. दक्षिण आफ्रिकेचा संघ या रोमहर्षक सामन्यात पराभूत झाला होता. 'क्रिकेट इज ए गेम ऑफ चान्स' म्हणतात ते यासाठीच! आजवर मी अनेक सामने पाहिले; पण अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता टिकवून धरणारा असा रंगतदार सामना मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.

महत्‍वाचे मुद्दे :
  • सामना कोठे व कोणत्या खेळाचा 
  • संघ 
  • सामन्याचे वर्णन 
  • सामना आवडल्याची कारणे 
  • अविस्मरणीय घटना 
  • सामना पाहून आल्यावर मनात आलेले विचार...

निबंध 5

मी पाहिलेला एक क्रिकेटचा सामना (क्रिकेट मॅच)


 एकदा मी एक विलक्षण अद्भुत आणि लोकविलक्षण असा क्रिकेटचा सामना पाहिला दोन संघ दंड थोपटून एकमेंकाविरुद्ध लढायला रणांगणात उतरले होते. संघात ११ खेळाडू लागतात हा नियम त्यांना ठाऊक नसावा किंवा मान्य नसावा. एका संघात ५ खेळाडू आणि दुसऱ्या संघात ६ खेळाडू असे ते संघ होते. चला ११ चा आकडा तर जुळला. त्यांच्याजवळ २ बॅटी होत्या. पण स्टंप तीनच होते.


१ स्टंप गोलंदाजाच्या बाजूला ठोकला आणि उरलेले दोन फलंदाजाच्या बाजूला ठोकले. दोन स्टंपांच्या मध्ये चांगले दोन वितीचं अंतर ठेवलं होतं. इथे "ठोकणं' हे क्रियापद चपखल बसतंय. कारण स्टंपच्या टोकाच्या पत्र्यांच्या टोप्या नाहीशा झाल्या होत्या. तेव्हा ते स्टंपस नीट बसत नव्हते. सारखे ठोकावे लागत होते. मला वाटतं सामन्याचा अर्धा वेळ स्टंपस् ठोकण्यातच जात होता. 


वास्तविक ते टेनिस - बॉलने खेळत होते, तरी सुध्दा फलंदाजांनी आणि यष्टिरक्षकाने पॅडस बांधले होते. त्यांच्या पॅडसचं गोलदांजाला वैषम्य वाटलं म्हणून त्याने पण आपल्या एका पायाला पॅड बांधला. गोलंदाज पायाला पॅड बांधत नाही हा नियम एकाने त्याच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्याने पॅड नाराजीने काढला.


अंपायर क्रिकेटच्या बाबतीत अगदी अनभिज्ञ होता. आपण इथे उभे राहून नेमकी कोणती कामगिरी पार पाडायची याची त्याला कल्पना नव्हती. सामना सुरू झाला. गोलंदाज चेंडू टाकायला लागला. सहा चेंडू झाले, सात झाले, आठ झाले, तरी अंपायर ओव्हर देईचना. 


तेव्हा गोलंदाजी करायला अगदी अधीर झालेला दुसरा खेळाडू ओरडला, "अरे, ओव्हर दे ना ! पंचानी शांतपणे विचारले, ओव्हर; म्हणजे काय असतं ते ?" अरे सहा चेंडू झाले की ओरडायचं "ओव्हर !" अच्छा! अंपायरने ते गणित समजावून घेतलं, दुसरं षटक बरोबर सहा चेंडूचं झालं. मगच तो खेळाडू दुसरं षटक टाकायला आला. 

त्याचे ४ चेंडू टाकून झाल्यावर अंपायर ओरडला "ओव्हर." "अरे, चारच चेंडू झाले. ओव्हर कशी देतोस," पण अंपायर गणितात कच्चा होता तो बोलला." मग आता तू आठ चेंडू नाही का टाकलेस ? या षटकात ते दोन जादा चेंडू वळते करून घेतले" थोडी बाचाबाची झाली आणि खेळ पुढे सुरू झाला.


एका गोलंदाजाने टीव्हीवर पाहिलं होतं की, गोलंदाज चेंडूला थुंकी  लावतो. या गोलंदाजाने चेंडूला एवढी थुंकी  लावली की चेंडू थुंकी  भिजला. या कारणाने चेंडू बदलावा लागला.  एक खेळाडू सरळ मध्ये येऊन खेळत होता.


त्याच्या पायाला बॉल लागल्यावर सारे क्षेत्ररक्षक ओरडले, "हाऊस टॅट !" अंपायर गोंधळला "आऊट कसा' ती दांडी कुठे पडलीय. "अरे, बॉल पायाला लागला की आऊट असतो. एल.बी.डब्लू. अंपायरने ते लक्षात ठेवलं. थोड्या वेळाने रन घेण्यासाठी म्हणून धावत असणाऱ्या खेळाडूच्या पायाला बॉल लागतो; 


अंपायर ओरडला "आऊट" एल.बी.डब्लू ! त्या बलदंडाने निकाल दिल्यानंतर त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. धावत असलेला खेळाडू मुकाट्याने तंबूत परतला.


खेळापेक्षा अंपायरचे एकेक निकालच प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन करीत होते. एक खेळाडू खप वेळ खेळत होता आणि चांगला खेळत होता. त्याने एक चौका मारला. अंपायर ओरडला, "आऊट!" अरे आऊट कसा ? "त्याचं काय आहे, हा एकटाच कितीतरी वेळ खेळतोय; दुसऱ्यांना खेळू दे ना आता." सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला.



गडी बाद झाले ते सर्व झेल बाद आणि पायचित; बोल्ड एकही नाही. कारण दोन स्टंप्स मध्ये एवढं अंतर होतं की चेंडू स्टंपच्या मधूनच जायचा नेहमी. स्टंपला कसला लागतो; आणि अंपायर आपल्या विचारावर ठाम होता. दांडी पडल्याशिवाय आऊट द्यायचं नाही. करता करता सारे बाद झाले. एका संघाची पाळी संपली. 


मग चौकशी सुरू झाली "स्कोअर किती झाला ?" स्कोअर किती झाला ? जो तो विचारू लागला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्कोअरर नेमायचा राहिला होता. मग माझे किती, तुझे किती ? असं करून काय तरी एक संख्या ठरविण्यात आली. स्कोअरचं प्रकरण एकदाचं संपलं. पण दुसरंच प्रकरण सुरू झालं. अंपायर विचार करायला लागला, 


"मी केव्हा खेळायचं," अरे अंपायर काय खेळत नाय; तो नुसता उभा असतो. "अंपायर महाशय भडकले, मला खेळायला मिळणार नाही हे आधी का नाही सांगितलंत? मी अंपायर झालोच नसतो." लाथ मारून त्याने स्टंप उडवून दिला आणि तोंडाने शिव्या पुटपुटत तो चालता झाला. पंच गेले - म्हणजे पंचाईत झाली. पंचापाठोपाठ मी पण जाणार होतो. कारण सामना बघण्याची माझीही सहनशक्ती संपुष्टात आली होती. पण म्हटलं, 



त्यांचे खेळाडू कसे खेळतात जरा बघू या. थोडा वेळ खेळ व्यवस्थित चालला. पण मग कशावरून तरी वादावादी सुरू झाली. पहिल्याने हातवारे, मग गुद्दे अखेर कोणी स्टंप उपटून दुसऱ्यांच्या अंगावर धावले, कोणी बॅटी उगारल्या. समर प्रसंगच निर्माण झाला. 


निकाल काय लागतो ते बघायाला थांबलो. पण सामन्याचा एकंदरीत निकालच लागला, त्याच्या नंतर मी खूप सामने पाहिले, त्याच्या पुढेही पाहीन; पण हा सामना कधीही विसरणार नाही. कारण या सामन्याची स्मृती माझ्या मनात स्टंपसारखी घट्ट ठोकली गेलीय.

निबंध 6

मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi


क्रिकेट मॅच) एकदा मी एक विलक्षण अदभुत आणि लोकविलक्षण असा क्रिकेटचा सामना पाहिला दोन संघ दंड थोपटून एकमेंकाविरुद्ध लढायला रणांगणात उतरले होते. संघात ११ खेळाडू लागतात हा नियम त्यांना ठाऊक नसावा किंवा मान्य नसावा. 

एका संघात ५ खेळाडू आणि दुसऱ्या संघात ६ खेळाडू असे ते संघ होते. चला ११ चा आकडा तर जुळला. त्यांच्याजवळ २ बॅटी होत्या. पण स्टंप तीनच होते. १ स्टंप गोलंदाजाच्या बाजूला ठोकला आणि उरलेले दोन फलंदाजाच्या बाजूला ठोकले. 


दोन स्टंपांच्या मध्ये चांगले दोन वितीचं अंतर ठेवलं होतं. इथे "ठोकणं" हे क्रियापद चपखल बसतंय. कारण स्टंपच्या टोकाच्या पत्र्यांच्या टोप्या नाहीशा झाल्या होत्या. तेव्हा ते स्टंपस नीट बसत नव्हते. सारखे ठोकावे लागत होते. मला वाटतं सामन्याचा अर्धा वेळ स्टंपस् ठोकण्यातच जात होता.


वास्तविक ते टेनिस बॉलने खेळत होते, तरी सुध्दा फलंदाजांनी आणि यष्टिरक्षकाने पॅडस् बांधले होते. त्यांच्या पॅडस्चं गोलदांजाला वैषम्य वाटलं म्हणून त्याने पण आपल्या एका पायाला पॅड बांधला. गोलंदाज पायाला पॅड बांधत नाही हा नियम एकाने त्याच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्याने पॅड नाराजीने काढला.


अंपायर क्रिकेटच्या बाबतीत अगदी अनभिज्ञ होता. आपण इथे उभे राहून नेमकी कोणती कामगिरी पार पाडायची याची त्याला कल्पना नव्हती. सामना सुरू झाला. गोलंदाज चेंडू टाकायला लागला. सहा चेंडू झाले, सात झाले, आठ झाले, तरी अंपायर ओव्हर देईचना. 


तेव्हा गोलंदाजी करायला अगदी अधीर झालेला दुसरा खेळाडू ओरडला, "अरे, ओव्हर दे ना ! पंचानी शांतपणे विचारले, ओव्हर; म्हणजे काय असतं ते ?" अरे सहा चेंडू झाले की ओरडायचं "ओव्हर !" अच्छा! अंपायरने ते गणित समजावून घेतलं, दुसरं षटक बरोबर सहा चेंडूचं झालं. 


मगच तो खेळाडू दुसरं षटक टाकायला आला. त्याचे ४ चेंडू टाकून झाल्यावर अंपायर ओरडला "ओव्हर." "अरे, चारच चेंडू झाले. ओव्हर कशी देतोस, पण अंपायर गणितात कच्चा होता तो बोलला." मग आता तू आठ चेंडू नाही का टाकलेस? या षटकात ते दोन जादा चेंडू वळते करून घेतले" थोडी बाचाबाची झाली आणि खेळ पुढे सुरू झाला.


एका गोलंदाजाने टीव्हीवर पाहिलं होतं की, गोलंदाज चेंडूला थुकी लावतो. या गोलंदाजाने चेंडूला एवढी थुकी लावली की चेंडू थुकीने भिजला. या कारणाने चेंडू बदलावा लागला.



एक खेळाडू सरळ मध्ये येऊन खेळत होता. त्याच्या पायाला बॉल लागल्यावर सारे क्षेत्ररक्षक ओरडले, "हाऊस टॅट!" अंपायर गोंधळला "आऊट कसा" ती दांडी कुठे पडलीय. "अरे, बॉल पायाला लागला की आऊट असतो. एल.बी.डब्लू. अंपायरने ते लक्षात ठेवलं. 


थोड्या वेळाने रन घेण्यासाठी म्हणून धावत असणाऱ्या खेळाडूच्या पायाला बॉल लागतो; अंपायर ओरडला "आऊट" एल.बी.डब्लू ! त्या बलदंडाने निकाल दिल्यानंतर त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. धावत असलेला खेळाडू मुकाट्याने तंबूत परतला.


खेळापेक्षा अंपायरचे एकेक निकालच प्रेक्षकांचं जास्त मनोरंजन करीत होते. एक खेळाडू खूप वेळ खेळत होता आणि चांगला खेळत होता. त्याने एक चौका मारला. अंपायर ओरडला, "आऊट!'' अरे आऊट कसा ? "त्याचं काय आहे, हा एकटाच कितीतरी वेळ खेळतोय; दुसऱ्यांना खेळू दे ना आता." सगळ्यांनी कपाळावर हात मारून घेतला.


गडी बाद झाले ते सर्व झेल बाद आणि पायचित; बोल्ड एकही नाही. कारण दोन स्टंप्स मध्ये एवढं अंतर होतं की चेंडू स्टंपच्या मधूनच जायचा नेहमी. स्टंपला कसला लागतो; आणि अंपायर आपल्या विचारावर ठाम होता. दांडी पडल्याशिवाय आऊट द्यायचं नाही. करता करता सारे बाद झाले. 


एका संघाची पाळी संपली. मग चौकशी सुरू झाली “स्कोअर किती झाला ?" स्कोअर किती झाला ? जो तो विचारू लागला. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की स्कोअरर नेमायचा राहिला होता. मग माझे किती, तुझे किती ? असं करून काय तरी एक संख्या ठरविण्यात आली. 


स्कोअरचं प्रकरण एकदाचं संपलं. पण दुसरंच प्रकरण सुरू झालं. अंपायर विचार करायला लागला, "मी केव्हा खेळायचं," अरे अंपायर काय खेळत नाय; तो नुसता उभा असतो.''अंपायर महाशय भडकले, मला खेळायला मिळणार नाही हे आधी का नाही सांगितलंत? मी अंपायर झालोच नसतो.


" लाथ मारून त्याने स्टंप उडवून दिला आणि तोंडाने शिव्या पुटपुटत तो चालता झाला. पंच गेले - म्हणजे पंचाईत झाली. पंचापाठोपाठ मी पण जाणार होतो. कारण सामना बघण्याची माझीही सहनशक्ती संपुष्टात आली होती. पण म्हटलं, त्यांचे खेळाडू कसे खेळतात जरा बघू या. थोडा वेळ खेळ व्यवस्थित चालला. 



पण मग कशावरून तरी वादावादी सुरू झाली. पहिल्याने हातवारे, मग गुद्दे अखेर कोणी स्टंप उपटून दुसऱ्यांच्या अंगावर धावले, कोणी बॅटी उगारल्या. समर प्रसंगच निर्माण झाला. निकाल काय लागतो ते बघायाला थांबलो. पण सामन्याचा एकंदरीत निकालच लागला, त्याच्या नंतर मी खूप सामने पाहिले, त्याच्या पुढेही पाहीन; पण हा सामना कधीही विसरणार नाही. कारण या सामन्याची स्मृती माझ्या मनात स्टंपसारखी घट्ट ठोकली गेलीय.


क्रिकेटची फारशी माहिती नसलेला एक नवखा गोलंदाज, पहिल्यानेच गोलंदाजी करायला आला. अंपायरने त्याला विचारलं, Are you bowling over the wicket or round the wicket ?' त्या नवख्या गोलंदाजाने उत्तर दिले. No, No! I am bowling at the wicket.


असाच एक नवखा खेळाडू खेळायला आला. जलदगती गोलंदाजाचा चेंडू त्याच्या पायावर एवढ्या जोरात लागला की तो विव्हळून खाली बसला. जरा पाय चेपलान, झटकलान् आणि पुन्हा खेळायला उभा राहिला. पंचांनी त्याला विचारलं; Can you walk ?' खेळाडू उद्गारला - Oh yes ! Just see, I can walk' म्हणून त्याने चालून दाखवले. तेव्हा पंच त्याला म्हणाला, you can walk , no ? Then walk to the pavilion, you are out !'



5 निबंध मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi



mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध



निबंंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध  बघणार आहोतया लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

मी पाहिलेला अपघात रोजच्याप्रमाणे सकाळी शाळेत जाण्यासाठी मी बाहेर पडलो होतो. माझ्याबरोबर माझा एक वर्गमित्र होता. रस्त्यावर नेहमीचीच वर्दळ होती. मित्राबरोबर मी गप्पा मारत चाललो असताना 'कर्रऽऽ' असा आवाज आमच्या कानी आला. बसचे ब्रेक लावल्याचा तो विलक्षण कर्कश आवाज होता. त्या राक्षसी आवाजाने माझ्या अंगाचा थरकाप उडाला.

mi-pahilela-apghat-essay-in-marathi
mi-pahilela-apghat-essay-in-marathi


मी चमकून समोर पाहिले तो एक दुमजली बस थडथडत उभी होती. रस्त्यावरचे लोक बसच्या दिशेने पळत होते. पाहता पाहता बघ्यांची अलोट गर्दी तेथे लोटली. बसमधील उतारू डोकावून बघत होते. मोठा अपघात झाला असणार अशी शंका माझ्या मनात आली. म्हणून मी त्या गर्दीत थोडे पुढे शिरण्याचा प्रयत्न केला.



लोकांच्या बोलण्यावरून मला समजले की, दोन छोट्या मुली बसखाली आल्या होत्या. मला आठवले की, दररोज या वेळी दोन छोट्या मुली आपल्या नर्सरी शाळेत जाण्यासाठी शाळेच्या बसची वाट पाहत उभ्या असत. त्यांचे ते हसरे, बोलके, निरागस चेहरे माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेले.

आज शाळेच्या बसच्या आधी आलेली ही बस त्यांचा घात करून बसली होती. गर्दी वाढत होती. त्या मुलींचे पालक ओक्साबोक्शी रडत होते. पोलीस गर्दी हटवण्याची पराकाष्ठा करत होते. शाळेला उशीर होईल म्हणून मी तेथून जड पावलांनी पुढे गेलो; पण ते दृश्य काही केल्या माझ्या डोळ्यांपुढून हलत नव्हते.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला  व अपघात कमी करण्‍यासाठी काय उपाय केले पाहीजे याविषयी  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंंध 2

मी पाहिलेला अपघात निबंध | Mi Pahilela Apghat Marathi Essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला अपघात मराठी निबंध बघणार आहोत. वाहतुकीसाठी भारतात रस्ते फार लोकप्रिय आहेत. कारण अगदी लहान खेड्यापासून मोठ्या शहरापर्यंत सगळीकडे रस्ते आहेत. रस्त्यामुळे संपूर्ण देश जोडला गेला आहे. 


रस्त्याने जाणे येणे जसे सोयिस्कर आहे तसेच स्वस्तही. परंतु भारतात रस्त्यांची स्थिती फार वाईट आहे. पावसाळ्यात तर ती अधिकच धोकादायक व दयनीय होऊन जाते. रस्त्यांची देखभाल आणि विकास यात भारत फारच मागासलेला आहे. रस्त्यांवरील वाहतूक खूप वाढली आहे. परंतु त्यानुसार रस्त्यांचा विकास झालेला नाही. 


परिणामी आपले रस्ते रक्तरंजित आहेत. रोज शेकडो अपघात रस्त्यांवर होतात. त्यात भरपूर प्राणहानी व वित्तहानी होते. दरवर्षी अंदाजे ६०,००० लोकांचा रस्त्यांवरील अपघातात मृत्यू होतो. त्यापेक्षा किती तरी पटीने जास्त लोक जखमी व अपंग होतात. 


अमेरिकेच्या तुलनेत भारतात रस्त्यांवरील अपघातांत मरणारांची संख्या २५ पट जास्त आहे. रस्त्यांवर वाहुतकीचा पडणारा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे. दरवर्षी अंदाजे ८.१० % रस्त्यांवरील वाहतुकीत वाढ होत आहे. 


१९५१ मध्ये भारतात ३ लाख मोटारी होत्या आता त्या ५४० लाख झाल्या आहेत. फक्त दिल्लीत ३ लाख वाहने असतील. वाहन-चालक वाहतुकीच्या नियमांचा भंग करतात. वाहन चांगल्या प्रकारे चालविता येत नसले तरी वाहन चालक परवाना दिला जातो. याच्याशी संबंधीत सर्व सरकारी कार्यालयांत सर्वात जास्त भ्रष्टाचार होतो.


एक अडचण ही पण आहे की येथील रस्त्यांवर अनेक प्रकारची वाहने चालतात. उदा. ट्रक, मोटारी, बस, ट्रॅक्टर, टेम्पो, स्कूटर, सायकली, बैलगाड्या, पादचारी, घोडे, गाढवे इ. यापैकी काही जलद काही मंद तर काही अगदी हळू गतीची आहेत. गावांत शहरांत बसमध्ये गर्दी असणे ही तर सामान्य गोष्ट आहे. 


खेड्यातील लोक बसच्या टपावर बसून प्रवास करतात. दोन चाकी वाहनांवर कधीकधी ४ जणांचे संपूर्ण कुटुंब प्रवास करते. परिणामी गंभीर स्वरूपाचे अपघात होतात आणि वाहतूक अधिकारी त्याकडे डोळे झाक करतात. वाहतुकीच्या नियमांचे नागरिकांकडून कडक पालन करवून घेत नाहीत. 


वास्तविक वाहतुकीच्या नियम पालनाचा समावेश शाळेच्या पाठ्यक्रमातच असला पाहिजे. म्हणजे बालपणापासूनच नियमपालनाची सवय लागते. रस्त्यावरून चालावे कसे? वाहने कशी चालवातीत? वाहतुकीचे नियम कोणते इत्यादींची माहिती होते.


रस्त्यांची स्थिती तर खराब आहेच पण त्याहीपेक्षा जास्त वाहनांची स्थिती वाईट आहे. ती जुनी व निरुपयोगी आहेत तरी त्यांचा वापर केला जातो. त्यांची वेळेवर दुरुस्ती केली जात नाही. योग्य निगा राखली जात नाही, ती खूप धूर सोडतात, ज्यामुळे प्रदूषण वाढते, व इतर वाहनाचालकांना रस्ता नीट दिसत नाही. 


एका सर्वेक्षणानुसार ५०% वाहने भारतीय रस्त्यांवर चालण्यास निरुपयोगी आहेत. अमर्याद बोजा लादल्यामुळे, प्रवाशांना चढविण्यामुळे रस्ते व वाहने लवकर खराब होतात. रेल्वेमार्गावर पुष्कळ ठिकाणी चौक असतात पण तिथे फाटकाची सोय नसते वा देखरेख करणारा रेल्वे कर्मचारी नसतो त्यामुळे असंख्य अपघात होतात.


या सर्व कारणांमुळे भारतातील रस्त्यांवरून प्रवास करणे खूपच धोकादायक झाले आहे. बस व ट्रक चालकांना सामान्यपणे दारूची, अमली पदार्थांची सवय असते. त्याचे सेवन करूनच ते वाहने चालवितात. शिवाय ते कमी शिकलेले व मागास जातीचे असतात. 


सतत १०/१२ तास वाहन चालवून थकून जातात. थकल्यावर नशा करणे त्यांची सवय होते. कच्च्या, खराब रस्त्यांवर त्यांचा वाहनावरील ताबा सुटतो आणि मग अपघात होतो. दुर्घटनेनंतर ते पळून जातात. कारण त्यांच्यात मानवता, दया, करुणा, सहकार्याची भावना नसते. शिवाय वाहनात प्रथमोपचाराची पेटी नसते. 


रस्त्याच्या जवळ दवाखाना, अॅम्ब्युलन्स, क्रेन आदींची सोय नसते. पोलिसांचा व्यवहारही असमाधानकारकच असतो. रस्त्यावरच कुठेही, कशीही वाहने उभी केली जातात. रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक जागेवर दुकाने, वर्कशॉप, घरे, खानावळी असतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे येऊन अपघात होतात. 


सांडपाण्याच्या नाल्या उघड्या असतात. मेनहोलमधून घाण बाहेर येते. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून वाहतुकीत अडथळे येतात. रस्त्यांवरील अपघातांना आळा बसावा म्हणून अल्पकालीन व दीर्घकालीन योजना बनवून त्या अमलात आणाव्यात. रस्त्यांची सुरक्षितता हा विषय शालेय अभ्यासक्रमात असावा. 


रस्त्यांमध्ये वाढ करावी, नवे रस्ते बांधावेत, जुने दुरुस्त करावेत, त्यांची वरचेवर देखभाल करावी. वाहन चालकांना योग्य ते प्रशिक्षण दिले जावे. वेळोवेळी वाहन चालकांच्या परीक्षा घ्याव्यान. मंदगती वाहनांसाठी वेगळे रस्ते असावेत. वाहनांची गती, निगा, उपयुक्तता यांची तपासणी व्हावी. 


रस्ते व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी. परंतु त्यासाठी संबंधित अधिकारी प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ असले पाहिजेत. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता.


निबंंध 3

mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध

मी ज्या बसस्टॉपवर उभा होतो, तो रस्ता खप गर्दीचा होता. संध्याकाळची वेळ होती. आजूबाजूच्या शाळा सुटल्या होत्या. मी देखील घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या फूटपाथवर बरेच विक्रेते आपला माल घेऊन बसले होते.


अचानक कर्कश आवाज आला व एक मारुती गाडी थांबली. त्या गाडीसमार एक विदयार्थी पडला होता. त्याचे दप्तर बाजूला पडले होते. त्याच्या डोक्याला खोक पडली होती आणि तो खूप घाबरलेला दिसत होता. क्षणात लोकांची गर्दी जमली होती; पण मदत करायला कोणी पुढे येत नव्हते.


सिग्नल पडला म्हणून हा विद्यार्थी रस्ता ओलांडायला पुढे आला आणि सिग्नल पडण्यापूर्वी आपण रस्ता ओलांडू, या विचाराने मारुती गाडीवाला पुढे आला अन् अपघात घडला. गाडीवाला त्या मुलाला डॉक्टरकडे न्यायला तयार होता. पण गर्दीतून कोणीही पुढे यायला तयार नव्हते. 


अशा वेळी मी त्याला म्हणालो, "चला, मी येतो तुमच्याबरोबर." अपघात झालेल्या त्या मुलाचे नाव होते सुदीप खरे. आम्ही सुदीपला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्याच्या जखमेवर औषधोपचार केले व त्याला कॉफी प्यायला दिली. आम्ही दोघांनी सुदीपला त्याच्या घरी पोहोचवले. 


त्या गाडीवाल्याने आपले कार्ड सुदीपच्या आईवडिलांना दिले व 'काही गरज वाटल्यास फोन करा' असे सांगन त्याने त्यांचा निरोप घेतला आणि मलाही माझ्या घरी सोडले. तेव्हा माझे आभार मानायला तो विसरला नाही.


अपघाताबद्दल माझ्या आईला सांगताना माझ्या मनात आले की, हा अपघात टाळता आला नसता का? याला जबाबदार कोण? मला असे वाटते की रहदारीसाठी सिग्नल असले. तरी लहान मुले आणि वृद्ध यांच्यासाठी, विशेषत: गर्दीच्या वेळी रहदारी नियंत्रक पोलीस हवाच.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : कर्कश आवाज- harsh sound. श भवा४. कठोर आवाज, तीव्र आवाज। रहदारी- traffic. सव२४१२. यातायात, आवागमन।]



mi pahilela apghat essay in marathi | मी पाहिलेला अपघात मराठी निबंंध

 शालेय जीवनात खेळाचे महत्त्व| Shaley jivanat khelache mahatva in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शालेय जीवनात खेळाचे महत्त्व मराठी निबंध  बघणार आहोतचला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

अरे किती खेळतोयस! अभ्यास करायचाय की नाही? चल आधी घरी." ही वाक्ये प्रत्येक आईबाबांच्या तोंडी असतात. सगळ्या मोठ्या माणसांना असेच वाटत असते की, खेळ म्हणजे केवळ गंमतजंमत. खेळ म्हणजे फक्त वेळ घालवणे, म्हणून निरर्थक. मला हे मात्र अजिबात मान्य नाही.


खेळात मुख्यत्वे मनोरंजन घडते. खूप मजा येते. मनसोक्त आनंद लुटता येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मोठी माणसे दम दयायला तिथे नसतात, आमचे आम्हीच राजे असतो. त्यामुळे मुक्तपणे खेळायला मिळते. याचा आनंद मिळतोच. पण त्यात वाईट काय?


Shaley jivanat khelache mahatva in marathi
Shaley jivanat khelache mahatva in marathi

खेळात फक्त मनोरंजन असते, हे मात्र मला अजिबात मान्य नाही. मैदानात आम्ही मनसोक्त धावतो, उड्या मारतो. यामुळे चपळता येत नाही का? त्यामुळे आपोआप व्यायाम घडतो त्याचे काय? खेळून घरी जातो तेव्हा किती भूक लागते ! हा फायदाही लक्षात घेतला पाहिजे. खेळाबद्दल मी शांतपणे विचार करू लागलो, तेव्हा मला त्याचे खूपच फायदे दिसू लागले. आपल्याला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर प्रयत्न करावे लागतात.


 मैदानात जिंकण्यासाठी आम्ही जीव तोडून प्रयत्न करतो. प्रत्येकजण जिंकण्यासाठी धडपडतो. जिंकायचे, अधिक पुढे जायचे, अधिक प्रगती करायची ही प्रेरणा किती चांगली आहे? याच प्रेरणेमुळे माणूस प्रगती करतो ना? खेळामुळे ही प्रेरणा रुजत नाही काय? आम्ही जिंकण्यासाठी धडपडतो; आटोकाट प्रयत्न करतो. पण जिंकणारा शेवटी एकच असतो. 


आपण जिंकू किंवा हरू. यांतले काहीही होऊ शकते. हे सर्व आम्हांला समजते. हरल्यावर वाईट वाटते, हे खरे. पण जिंकलेल्यांचे मन:पूर्वक अभिनंदनही करतोच ना? नंतर आम्ही हसतखेळत पुन्हा खेळायला तयार होतोच की नाही? जीवनात देखील हारजीत हसतखेळत स्वीकारली पाहिजे, ही शिकवण आपल्याला खेळाच्या मैदानावरच मिळते.

खेळाचा आणखी एक फायदा आहे. जेव्हा आम्ही संघातर्फे खेळतो, तेव्हा संघाचा विजय व्हावा म्हणून जिवापाड प्रयत्न करतो. आपल्याला पडायला होईल, मार लागेल, जखमी होऊ, अशी कसलीच भीती त्यावेळी मनात नसते. आपला संघ जिंकला पाहिजे, हीच एक इच्छा आपल्या मनात असते. सगळेच जण संघासाठी धडपडत असतात. त्यावेळी कोणाच्याच मनात व्यक्तिगत स्वार्थ नसतो. या वेळी प्रत्येकजण स्वतःच्या इच्छेला, भावनेला बाजूला ठेवतो. फक्त संघाचाच विचार करतो. किती महत्त्वाचा संस्कार आहे हा!

शिवाय, आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे. सगळेच काय वर्गात, अभ्यासात हुशार नसतात. अशांच्या मनात, आपले जीवन व्यर्थ आहे, असा न्यूनगंड निर्माण होतो. ते आत्मविश्वास गमावून बसतात. यांच्यापैकी कित्येकजण मैदानात विलक्षण कर्तबगारी दाखवतात. सचिन तेंडुलकर कुठे कॉलेजात अभ्यासात चमकला होता? म्हणजे आपली कर्तबगारी सिद्ध करायला मैदानात वाव मिळतो, हा केवढा मोठा फायदा आहे!
खेळाचे असे कितीतरी फायदे मला आठवू लागले आणि शालेय जीवनात खेळाला अभ्यासाइतकेच महत्त्वाचे स्थान आहे, हे अधिकाधिक पटू लागले.

मित्रांनो तुम्‍हाला शालेय जीवनात खेळाचे महत्त्व हा निबंध कसा वाटला  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद .

महत्‍वाचे मुद्दे : 
  • पुष्कळदा खेळाबद्दल मोठ्यांची सतत तक्रार 
  • खेळ निरर्थक, केवळ गंमतजंमत, वेळ फुकट घालवणे 
  • मनोरंजनाबरोबर शारीरिक चापल्य
  • व्यायाम, जिंकण्याची ईर्ष्या, प्रसन्न चित्तवृत्ती
  • हारजितीचा हसतखेळत स्वीकार
  • संघभावनेचा संस्कार 
  • अभ्यासाखेरीज अन्य क्षेत्रांतील कर्तबगारीला वाव
  • खेळ आवश्यकच.

शालेय जीवनात खेळाचे महत्त्व | Shaley jivanat khelache mahatva in marathi

मराठी निबंध  Marathi Nibandh


  1. शाळेचा निरोपसमारंभ मराठी निबंध | Nirop Samarambha Essay Marathi (nibandh in marathi 12th) 


    शाळा आपल्‍या बालपणातील महत्‍वाचा भाग असतो. शालेय जिवनात केलेल्‍या गंमतीदार आठवणी असा हा काळ कोणीही विसरू शकत नाही.या निबंधात निरोप समारंभातील आधीचा काळ व निरोप समारंभातील घडलेल्‍या गोष्‍टीचे वर्णन केले आहे. पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.
  2. marathi nibandh
    marathi nibandh
    वसंत सर्व  ऋतुंचा राजा  मराठी  निबंध | vasant essay in marathiया निबंधामध्‍ये वसंत ऋतुचे गुणगाण केले आहे. वसंत ऋतुमध्‍ये पर्यावरणात होणारे बदल सांगीतले आहे. पशु पक्षी कश्‍याप्रकारे आनंदीत होतात हे दाखविले आहे.पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.

  1.  स्वच्छतेचे महत्व निबंध मराठी | swachata che mahatva marathi nibandh
    या निबंधामध्‍ये स्वच्छतेचे महत्‍व सांगीतले गेले आहे. स्वच्छते अभावी होणारे नुकसानदेखील सांगीतले गेले आहे.भारत सरकार राबवित असलेल्‍या उपाययोजना व नागरीकांनी कोणती पावले उचलली पाहीजे याचे मार्गदर्शन केले आहे.  पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.

  2. एका गरीब शेतकऱ्याचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | shetkari manogat in marathi essay
    शेतकरी विश्‍वाचा अन्‍नदाता आहे. पण या अन्नदात्याची कश्‍याप्रकारे पिळवणुक होते व  तो नैर्सगिक व सरकारी संकटा‍त कसा भरडला जातो याचे वर्णन केले आहे. या संकटावुन स्‍वताला काढण्‍यासाठी तो आपली व्‍यथा इतरासमोर मांडत आहे. पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.


  1. माझा आवडता छंद मराठी निबंध | My Favourite Hobby Essay In Marathi
    प्रत्‍येक व्‍यक्ती आपआपला छंदातुन आनंद प्राप्‍त करण्‍याचा प्रयत्‍न करत असते. कुणी निसर्ग भ्रमंती करते. कुणी पोस्‍टाची तिकीटे जमा करते. कुणी पुस्‍तकांना आपला मित्र बनवते. या निबंधात अश्‍याच एका छंदाचे वर्णन केले आहे.  पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा.
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध | Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi
    बाबासाहेब, आता तुम्ही हवे होता ! बघा ना, तुमच्या मुलांनी काय काय मिळवले आहे. कुणी एखादया राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे, तर कुणी विदयापीठाचा कुलगुरू, कुणी देशाचा उपराष्ट्रपती, तर कुणी प्रत्यक्ष राष्ट्रपती. बाबासाहेब हेच तुम्हांला हवे होते ना !

    तुम्ही ज्यांच्यासाठी आयुष्यभर खपलात त्याच तुमच्या अनुयायांनी खूप प्रगती केली आहे. त्यांनी शिकावे. अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर पडावे, म्हणून तुम्ही धडपडलात, शाळा काढल्यात, महाविदयालये काढलीत. 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' ही संस्था काढली. त्याला आज सुमधुर फळे आली आहेत. बाबासाहेब, हे पाहायला तुम्ही हवे होता !

    बाबासाहेब, तुम्ही नेहमी आम्हांला सांगत होता की 'वाचाल तर वाचाल'. त्याचा पुरेपूर प्रत्यय आज आला आहे. तुमच्या सांगण्यानुसार जे वाचायला शिकले त्यांनी खूप वाचले आणि मग त्यांनी स्वतः लिहायला सुरुवात केली. समाजाकडून वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या ज्यांचे दमन झाले होते. त्यांनी धडपड करून आपली प्रगती साधली. त्यामागे तुमचीच प्रेरणा होती. मग या मंडळींनी आपल्या सुखदुःखाचे अनुभव शब्दांत मांडले.

    जीवनाची कठीण वाट तडवताना' बसलेल्या ठेचा त्यांनी आपल्या लेखनातून मांडल्या. अशा या आगळ्यावेगळ्या पण वास्तववादी साहित्याने आज मराठी सारस्वताचे भांडार समृद्ध झाले आहे. आज सर्व मराठी भाषिकांनी त्या साहित्याला गौरवले आहे. कित्येकांच्या पुस्तकांची इतर भाषांतही भाषांतरे झाली आहेत. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या ' आमचा बाप आणि आम्ही ' या पुस्तकाने तर  स्वदेशाच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत. जगातल्या अनेक भाषांत या पुस्तकांचे भाषांतर झाले आहे. बाबासाहेब, तुमच्या या लेकरांनी केलेली ही प्रगती पाहायला आज तुम्ही हवे होता !

    हे झाले दलित समाजाबददल. परंत बाबासाहेब तम्ही फक्त दलितांसाठीच कार्य केले. असे नाही. तुमच्या डोळ्यासमोर फक्त दलित समाज नव्हता; तर अखंड समर्थ भारत होता. या देशातील प्रत्येकाला उन्नत आयुष्य मिळावे, असा तुमचा ध्यास होता. त्यासाठी जगात कोणत्याही देशाला लाभली नाही, अशी अजोड घटना तुम्ही लिहिलीत. या देशाला तुम्ही मार्ग दाखवलात.

    त्याच मार्गाने जात असल्यामळे आज आपला देश देदीप्यमान अशी प्रगती करीत आहे; जगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. आपल्या अवतीभवतीचे पाकिस्तान, बांगलादेश व अन्य शेकडो देश दुःखदैन्याच्या कर्दमात रुतले आहेत. तुमच्यासारखी विशाल दृष्टी व अंतःकरण असलेला घटनाकार त्यांना लाभला नाही. आम्ही भारतमातेचे पुत्र किती भाग्यवान की, तुमच्यासारखा महामानव आम्हांला नेता म्हणून लाभला !

    खरे तर, तुम्ही फक्त दलितांचे, फक्त भारतीयांचेच नव्हे, तर अखिल मानवजातीचे उद्धारकर्ते आहात ! तुम्ही दाखवलेल्या मार्गाने जाऊन आम्ही भारतीय आज जगभर कशी पताका फडकवत आहोत, हे पाहायला तुम्ही हवे होता ! एक खरे की, भारतात अजूनही दीनदलित, शेतमजूर, कष्टकरी, भूमिहीन दारिद्र्यात होरपळत आहेत. आज आपला देश त्यांच्याही उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहे. परंतु तुम्ही असता, तर हे प्रयत्न अधिक वेगाने झाले असते. आपल्या समाजातील दुबळी अंगे अधिक वेगाने बलशाली करता आली असती.

    आम्ही या क्षणी तुम्हांला ग्वाही देतो की, तुमची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही दाखवलेल्या मार्गाने आम्ही निष्ठेने प्रयत्न करीत राह आणि या देशात मानवतेचे साम्राज्य निर्माण करू !   Dr Babasaheb Ambedkar निबंध २   पुर्ण निबंध वाचण्‍यासाठी येथे क्‍लीक करा

मराठी निबंध marathi nibandh

मी पाहीलेला समुद्र किनारा निबंध मराठी | Essay On Samudra Kinara In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहीलेला समुद्र किनारा निबंध मराठी बघणार आहोत. मला संध्याकाळी एखाद्या नैसर्गिक ठिकाणी जायला आवडते. हिरवेगार मैदान, पर्वतीय प्रदेश, मंदिरे, नदीकाठ आणि समुद्रकिनारे यासारख्या बर्‍याच ठिकाणी मी जात असतो . अश्याच एका मनमोहक समुद्रकिनाऱ्याचे वर्णन पुढील निबंधात केले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

 

अथांग निळा सागर, त्याच्या उसळणाऱ्या लाटा, त्यांच्यावर दिसणारा पांढरा फेस अशा या विलोभनीय दृश्याचे मला विलक्षण आकर्षण वाटते. त्या फेसाळणाऱ्या लाटा पुढे पुढे येतात आणि सागराच्या किनाऱ्याला शिवून मागे फिरतात, तेव्हा एक लाट केव्हा संपली आणि दुसरी केव्हा सुरू झाली हे उमगतच नाही. लाटांचा हा पाठशिवणीचा खेळ मनसोक्तपणे पाहावा हा माझा छंद.


ओहोटीच्या वेळी पसरलेला तो अफाट मोठा वाळूचा किनारा आणि भरतीच्या वेळी त्याला गिळू पाहणारा तो सागर, हे परस्परांशी जणू गप्पाच मारीत आहेत असे मला वाटते. त्यांचा तो संवाद शब्दाविना असला तरी तो माझ्या मनाला उमगतो आणि मग अनेकदा मी समुद्राच्या सान्निध्यात जातो.



मला आवडतो तो मोकळा समुद्रकिनारा. अथांग सागर मग तेथे मला गवसते उदात्तता, भव्यता. मन कधीही बेचैन झाले की मी समुद्राच्या सान्निध्यात जातो. त्याची ती भव्यता माझ्या मनातील कस्पटतेची मला जाणीव करून देते. माझ्या मनातील क्षुद्र अहंकार त्या लाटांच्या फेसाबरोबर वाहून जातो. मन निर्मल होते. मनाचे पिंजरे तुटून पडतात आणि भव्यता, उदात्तता मनाला व्यापून टाकते. 

स्वतःच्या क्षुल्लक दु:खांचा विसर पडतो आणि मग मन भोवतालची सुखे, आनंद, संतोष टिपू लागते. हात भोवतालच्या वाळूशी नकळतपणे खेळ खेळू लागतात. मुठीत धरलेली वाळू पाहता पाहता गळून पडते. सूर्यकिरणांत तिच्यातील सप्तरंग उठून दिसतात. मग त्या वाळूतील रंगीबेरंगी शंखशिपले डोळयांना मोहवू लागतात. एक सापडली, दुसरी सापडली असे करता करता दोन्ही हात भरून जातात. त्या शंखशिंपल्यांच्या रंगांत विविधता असते. प्रत्येकाचा आकार आगळावेगळा असतो. विधात्याच्या या निर्मितीने मन वेडावून जाते.



mi pahilela samudra kinara marathi nibandh
mi pahilela samudra kinara marathi nibandh


पण-पण असा हा माझा सागर, असा हा माझा रत्नाकर आता मुंबईत कोठे राहिला आहे? ती विशालता, ती अथांगता आज हरवून गेली आहे. समुद्रकिनारी मनाची शांतता शोधायला जावे, तर ती देखील आता तेथे लाभत नाही.

समुद्राचा विशाल पुळणीकाठ माणसाने हिरावून घेतला आहे. माणसाने आपला दिमाख दाखविण्यासाठी तेथे उंच इमारती उठविल्या आहेत. कुठे पोहण्याचे तलाव उभे राहिले आहेत, तर कुठे पंचतारांकित मोठमोठी हॉटेल्स उभारण्यात आली आहेत. तर कुठे समुद्रातील ते सुखी जीव-ते मासे-त्यांना कोंडून ठेवण्यासाठी मत्स्यालय उभारले आहे. उरल्यासुरल्या सांगरकिनाऱ्यावर भेळपुरीच्या गाड्यांनी आक्रमण केलेले आहे.  माणसे तेथे जो केरकचरा टाकतात त्यामध्ये माझी सागरातील रंगीबेरंगी रसिकता हरवून जाते.

एवढा तो विशाल रत्नाकर, त्याची तरी माणसाने काय स्थिती केली आहे? एकेकाळी रावणाने सीताहरण केले म्हणून या पयोधीला सेतूचे बंधन पडले ; तेव्हा कविमंडळी हळहळली. पण आज मोठमोठ्या शहरांतून गढूळ, दूषित पाणी या सागरालाच अर्पण केले जाते. आता तर आपल्या विज्ञानाची घमेंड येऊन मानव सागराच्या अंतःकरणातील स्नेहच हिरावून घेऊ पाहत आहे. या साऱ्या कर्तृत्वात शांत, उदात्त सागरसहवास मात्र संपला आहे आणि उरला आहे केवळ कोलाहल!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते


  • mi pahilela samudra kinara marathi nibandh
  • essay on samudra in marathi
  • me pahilela samudra kinara in marathi
  • me pahilela samudra essay in marathi
  • mala avadla samudra kinara

मी पाहीलेला समुद्र किनारा निबंध मराठी | Essay On Samudra Kinara In Marathi

मी पाहिलेला चुरशीचा सामना निबंध | Me Pahilela Samna Marathi Nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला चुरशीचा सामना  मराठी निबंध बघणार आहोत.  T.V.  वर सामना पाहील्यापेक्षा प्रत्यक्ष पाहण्यात काही वेगळाच  आनंद असतो . या निबंधात अश्याच एका कबड्डी सामन्याचे वर्णन  सांगितले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला

दूरचित्रवाणीवर (T.V.)  सामने आपण घरबसल्या पाहतो. हजारो मैल दूरवर खेळाडू खेळत असतात आणि अगदी अक्षरश: खेळ चालु  असताना आपण तो दूरचित्रवाणीवर पाहत असतो. घरबसल्या असा सामना पाहत असताना आपल्या आजूबाजूला क्वचित कोणीच नसते, क्वचित असतात आपले एक-दोन मित्र. पण प्रत्यक्षात मैदानात अगदी जवळून एखादा चुरशीचा सामना पाहण्यातील आनंद अवर्णनीय आहे.

मी पाहिलेला एक चुरशीचा सामना कधीच विसरू शकत नाही. हा चुरशीचा सामना म्हणजे माझ्या शालेय जीवनातील एक अविस्मरणीय प्रसंगच. राज्यपातळीवरचे कबड्डीचे सामने आमच्या शाळेच्या पटांगणावर सतत सात दिवस चालू होते. सबंध महाराष्ट्र राज्यातून विविध संघ आले होते. त्यामुळे अनेक चुरशीचे सामने खेळले जात होते. शाळा, क्लास आणि अभ्यास यांमुळे सर्वच सामने पाहणे काही शक्य नव्हते. खेळाची शौकीन असलेली मुले मात्र अगदी अभ्यास बुडवूनही सामने पाहत होती आणि यावेळी त्यांना ते गुन्हे माफ होते.

me pahilela samna marathi nibandh
me pahilela samna marathi nibandh

आमच्या शाळेचा कबड्डीचा संघ अगदी कसलेला संघ होता. गायकवाड सर आणि तांबे सर मूलांना भरपूर सराव करायला लावतात. त्याबरोबरच रोजच्या व्यायामात देखील कधी सवलत मिळत नसे. त्यामुळे मुले अगदी चपळ बनली होती. प्रतिपक्षाच्या पकडीतून कसे सटकायचे याचे तंत्र त्यांनी चांगलेच आत्मसात केले होते. संघासाठी आवश्यक असतील त्यापेक्षा तिप्पट मुले तयार होती. त्यामुळे एखादा खेळाडू आजारी पडला तरी अडचण होणार नव्हती. असा हा आमचा संघ अंतिम सामन्याला आला नाही, तरच नवल!

अंतिम सामना आमच्यात आणि विदर्भाच्या एका संघात होता. सामना चारला सुरू होणार होता, पण तीनपासूनच मैदान भरून गेले होते. प्रतिस्पर्धी संघ पाहणा आलेला असल्यामुळे त्यांच्या बाजूचे प्रेक्षक कमी होते. पण इतर संघांचे खेळाडू आम्हांला चिडविण्यासाठी विरुद्ध संघाचीच बाजू घेत होते.

दोन्ही संघ समोरासमोर उभे झाले आणि सामना सुरू झाला. विदर्भ संघातील खेळाडू आमच्या खेळाडूंच्या तुलनेने बरेच ताकदवान दिसत होते. आपल्या पोरांचा या मल्लांपुढे कसा निभाव लागणार? मनात शंकेची पाल चुकचुकली आणि पंचांनी शिट्टी फुकली. आमच्या कप्तानाने टॉस जिंकून खेळायला सुरुवात केली होती. पण शेवटी आमच्या मनातील भीतीच खरी ठरली. त्या संघातील एका बलदंडाने आमच्या कप्तानाला अगदी सहजगत्या उभ्याउभ्याच धरले होते.

सुरुवातीलाच अपशकून झाल्याने धीर खचला आणि आमचे खेळाडू पटापट बाद होऊ लागले. आमचे आवाज बंद झाले आणि बाहेरून आलेल्या प्रेक्षकांच्या शब्दांना धार आली. मैदानाबाहेरच संघर्षाचे सामने रंगू लागले. शेम, शेम, हिप हिप् हुर्योच्या आवाजांनी वातावरण भरून गेले. आता आमच्या बाजूला फक्त एकच खेळाडू उरला होता. 

पराभव नक्की दिसू लागला होता. पण तो एकांडा वीर डगमगला नव्हता. 'कबड्डी-कबड्डी' करीत तो प्रतिस्पर्धी संघाच्या गोटात शिरला, अगदी सरळ आत. तेव्हा प्रतिस्पर्धीयांनी त्याची पकड केली. पण त्याचा दम सूटला नव्हता. एक विलक्षण झटका देऊन तो आपल्या बाजूला परतला आणि खेळाचे चित्र पालटले. आमचे सर्व खेळाडू जिवंत झाले आणि विरुद्ध संघात एकच खेळाडू उरला.

आता सामन्यावर पकड आमची होती आणि ती शेवटपर्यंत सुटली नाही. सामना आम्ही जिंकला होता. विदयार्थ्यांनी फक्त मैदानच उचलायचे बाकी ठेवले होते! खेळाडूंची मिरवणूक निघाली, सत्कार झाले व राज्यपातळीवर आमचा संघ विजयी ठरला. एशियाडमध्ये खेळल्या जाणाऱ्या प्रदर्शनी सामन्यासाठी त्यातील काही जणांची निवड झाली. असा हा चुरशीचा सामना मी प्रत्यक्ष पाहिला होता. अनुभवला होता.
वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते
  • me pahilela samna marathi nibandh
  • mi pahilela samna in marathi
  • me pahilela samna nibandh
  • me pahilela samna essay marathi

मी पाहिलेला चुरशीचा सामना निबंध | Me Pahilela Samna Marathi Nibandh

मी रायगड बोलतोय | Mi Raigad Boltoy Nibandh Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी रायगड बोलतोय मराठी निबंध बघणार आहोत.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


किल्ले रायगडाच्या सहवासात आज कित्येक वर्षांनी माझी मनीषा पूर्ण होत आहे. शिवरायांच्या किल्ले रायगडाच्या सहवासात आज मी हिंडत आहे-अगदी स्वच्छंदपणे. बालपणापासून शिवरायांविषयी मला विलक्षण ओढ. महाराष्ट्रापासून दूर अशा विदर्भभूमीत मी मोठा झालो; पण मला बाळकडू मिळाले ते शिवरायांच्या कथांतून. वाचण्याची कला अवगत झाली आणि साऱ्या कथांतील शिवाजी वाचून टाकला. 


शालेय जीवनात शिवाजीमहाराजांशी माझी घनिष्ठ ओळख झाली ती अभ्यासक्रमातील पुस्तकांमुळे आणि त्याहीपेक्षा शिवचरित्रावर निर्माण झालेल्या ललित साहित्यातून. 'श्रीमान योगी'ने मला एक आगळा स्वामी दाखविला; तर 'रायगडाला जेव्हा जाग येते'मध्ये मला एक मुत्सद्दी राज्यकर्ता पण दुःखी पिता भेटला. या साऱ्या पुस्तकांनी एकच कामगिरी केली आणि ती म्हणजे शिवरायांविषयीची विलक्षण ओढ माझ्या मनात निर्माण झाली. 


पुण्याला जावे, लाल महाल पाहावा, सिंहगड चढावा, पन्हाळ्यावर चढाई करावी, रायगडाला कवटाळावे अशी मला तीव्र इच्छा होती. त्यामुळे अनुकूल संधी मिळताच मी रायगडावर धाव घेतली. माझ्याबरोबर माझा एक मित्र होता, त्यालाही रायगडाच्या प्रेमाने पछाडले होते.


raigad killa marathi nibandh
raigad killa marathi nibandh


रेल्वे  व एस. टी. चा प्रवास संपवून आम्ही रायगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आणि काय गंमत! तेथील प्रत्येक दगड, ती पायवाट सारे मला ओळखीचे वाटू लागले. उलट शासनाने बांधून काढलेल्या पायऱ्याच मला अनोळखी वाटू लागल्या. रात्री आम्ही रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडगावी मुक्काम केला. आपल्या वार्धक्यात जिजामाता येथेच मुक्काम करीत असल्याचे स्मरले. रायगडावरील राज्याभिषेकप्रसंगी राजांनी येथूनच मासाहेबांना गडावर नेले होते, याची आठवण होऊन मन भरून आले.


भल्या पहाटे आम्ही गड चढण्यास सुरुवात केली. मुद्दाम जुनी पायवाट निवडली. या पायवाटेने राजे कितीतरी वेळा गड चढले असावेत, या विचाराने मन भारावले. इतर वेळी राजे घोड्यावरून चढले असतील; पण आग्याहून सुटून गोसाव्याच्या वेषात ते जेव्हा गडावर आले तेव्हा ते हीच पायवाट चढून गेले असावेत. महाराष्ट्राच्या स्वराज्यनिर्मितीत या पायवाटेचेही स्थान महत्त्वाचे आहे. स्वराज्याचे अनेक मनसुबे तिच्या कानांवर पडले असतील.



रायगडाचे स्थान खरोखरीच इतके रमणीय आहे की, कुणीही त्याच्या प्रेमात पडावे. गडाची चढण संपली आणि आम्हांला तहान लागल्याची जाणीव झाली. थोडीशी चौकशी केल्यावर आम्ही गडावरील 'गंगासागर' तलावावर येऊन पोहोचलो आणि ते स्वच्छ निर्मळ पाणी पाहून आम्ही सुखावलो. पोटभर पाणी पिऊन आम्ही काही काळ तेथेच विसावलो. भुकेल्या नजरेने आम्ही त्या पवित्र वास्तूचे दर्शन घेण्यास निघालो. प्रत्येक जागा इतिहासाचे एकएक पान उलटवीत होती. 


याच ठिकाणी जिजाऊमातेने शिवरायाला आशीर्वाद दिला असेल या भावनेने भारावून जाऊन तेथील थोडी माती उचलून आम्ही अंगारा म्हणून कपाळाला लावली. नंतर आम्ही राजांच्या दरबारात प्रवेशलो. त्यावेळी तेथे कोणीही नव्हते. पण महाराजांच्या आगमनाप्रीत्यर्थ दिलेली 'खडी ताजीम' माझ्या कानांत घुमली. अभिषेकाच्या प्रसंगी गागाभट्टाने म्हटलेले संस्कृत मंत्र कानांत घुमू लागले आणि त्या दरबाराच्या अवशेषांनी सारा इतिहास मला ऐकविला. निसर्गाने या पवित्र वास्तूवर जेवढे प्रहार केले त्याहूनही अधिक फोडतोड माणसांनी केलेली पाहून मन कष्टी झाले.


महाराजांचा मोडकळीस आलेला महाल पाहताना त्या थोर राजाचे शेवटचे दिवस मला आठवले. तोफखान्याची जागा पाहून आम्ही पुढे सरकलो. टकमक टोक, हिरकणी बुरूज हयाएकएक जागा त्यागाच्या, धाडसाच्या कथा सांगत होत्या. आणि मग मला दिसली ती जागा, ज्या ठिकाणी ते थोर जीवन सपले; पण ते स्थानही एका इमानी, स्वामिनिष्ठ कुत्र्याचे स्तोत्र गात होते. आम्ही त्या श्रीमान योग्याच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि गड उतरू लागलो, पण आता पावले जड झाली होती.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 

mi raigad boltoy marathi nibandh no 2
मी रायगड बोलतोय मराठीनिबंध क्रमांक २


मित्राला लिहिलेले पत्र मी पुरे केले आणि पाकिटावर पत्ता लिहून पत्र बंदही केले. जवळच बसलेल्या बाबांनी सहजच पाकीट उचलले आणि म्हणाले, "अहो राजे, कोणत्या युगात आहात तुम्ही? आता कुलाबा जिल्हा राहिला नाही. आता त्याचे 'रायगड' असे नामकरण झाले आहे.” मी पटकन पाकिटावर दुरुस्ती केली. पण मनात आले की माझ्या आवडत्या 'रायगडाला' कसा विसरलो बरे?




खरं म्हणजे गडकिल्ले मला अत्यंत प्रिय आहेत. त्यांत रायगड म्हणजे मानाचा तुराच. या रायगडामुळेच या जिल्हयाला. 'रायगड' हे नाव मिळाले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रायगडाच्या पुनर्भेटीसाठी माझे मन अगदी आतूर झाले होते; आणि काय योगायोग पाहा! आमच्या वर्गाची सहल रायगडावर नेण्याचे निश्चित झाले.




आम्ही रायगडावर पोहोचलो मात्र; आणि माझ्या कानांवर ते धीरगंभीर शब्द आदळले. "अरे थांब, थांब. एवढया आतुरतेने मला भेटण्यासाठी आलास, तेव्हा मला तुझे स्वागत केलेच पाहिजे." रायगड प्रत्यक्ष माझ्याशी बोलत असल्याचे मला जाणवले. “अरे दोस्ता, तुझ्यासारखी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी फारच थोडी बरं. ही माणसे येतात ती सुद्धा अगदी सहलीच्या मूडमध्ये. येताना बरोबर ट्रान्झिस्टर, टेपरेकॉर्डर, पुस्तके, खेळांची साधने आणतात. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूत येऊनही त्यांचे माझ्याकडे लक्षच नसते. ते आपल्याच दंगामस्तीत गुंग असतात. मग सांग, कोणाजवळ मी आपले मनोगत व्यक्त करायचे बरे!


“अरे मित्रा, मी माझ्या या जीर्ण थकलेल्या मनात केवढ्या आठवणी साठवून ठेवल्या म्हणून सांगू! कधी कधी मला माझ्या अस्तित्वाची भीती वाटते. हा सह्याद्री जर का रागावला ना, तर माझे उरलेसुरले अवशेषही गळून जातील आणि मग माझ्या या स्मृतिकोषातील ही सोनेरी पानेही नष्ट होतील. तीनशे वर्षांपूर्वीचे ते दिवस आठवले की आजही माझे शरीर रोमांचित होते.




“ज्या पर्वतावर माझे अस्तित्व आहे, तो हा पर्वत म्हणजे 'स्वातंत्र्याचा रखवालदार' आहे. अनेक गड, किल्ले आजही तो सांभाळून आहे. या महाराष्ट्राचे रक्षण करायचे हेच हयाचे जीवनध्येय. अनेक आक्रमणांना त्याने आपल्या निधड्या छातीने थोपवून धरले. स्वातंत्र्यासाठी चाललेल्या संघर्षाचे क्षणन् क्षण मी अनुभवले, त्याने बेहोष झालो. वेड्यासारखे स्वराज्याकरिता दौडणाऱ्या त्या वीरांना माझ्या दगडधोंड्यांचा त्रास होऊ नये म्हणून मी धडपडत असे.


“स्वराज्य स्थापन झाल्यावर राजधानी म्हणून राजांनी जेव्हा माझी निवड केली तेव्हा मला माझ्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले. आता त्या शूरवीर राजाचा सहवास आपल्याला लाभणार या कल्पनेने मी खूष होतो. पण त्या महात्म्याला उसंतच मिळाली नाही. नाना कामांत तो गुंतलेला असायचा. घरची आणि दारची नाना खटली त्याच्यामागे सतत असत. कधी एखादया रात्री तो येथे आला तरी नाना चिंतांनी ग्रासलेला असायचा.




"महाराज गेले आणि सारी रयाच गेली माझी! लढाईच्या वेळच्या तोफांचे भय नव्हते मला; पण घरभेदी माणसांचे कट माझे मन विदीर्ण करीत. इंग्रजांनी केले नाही इतके नुकसान स्वकीयांनी माझे केले. असे हे स्वकीय, महाराज निवर्तल्यावर येथे येत आणि जागोजागी मला खणत. त्यांना वाटे येथे महाराजांच्या वेळचे धन मिळेल. त्या वेड्यांना हे कळले नाही की माझ्याजवळ त्याहून फार मोठे धन होते आणि ते म्हणजे स्वदेशभक्तीचे'.




"ते धन फार थोड्यांनाच उमगले. शिवरामपंत परांजपे यांनी ते शब्दांत पकडले. गो. नी. दांडेकर यांना ते भावले, ब. मो. पुरंदरे त्या धनसंपत्तीने तृप्त झाले. आपल्या बंगल्यांना वा राज्यांना माझे नाव देऊन काय होणार? त्यासाठी हवी त्या थोर राजासारखी राजनिष्ठा, त्याच्यासारखे उज्ज्वल चारित्र्य ! पण आजकाल त्याचाच अभाव आहे. हेच माझे दुःख." रायगडाचा धीरगंभीर आवाज बंद झाला; पण मी मात्र रायगडाची ही कथा ऐकत ऐकत गडाच्या वरच्या भागात महाराजांच्या समाधीसमोर कधी येऊन पोहोचलो ते समजले देखील नाही.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक असु शकते

  • mi raigad boltoy marathi nibandh
  • raigad killa marathi nibandh
  • raigad killa essay marathi

मी रायगड बोलतोय | Mi Raigad Boltoy Nibandh Marathi