maza avadta prani essay in marathi | माझा आवडता प्राणी मराठी निबंध

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण maza avadta prani essay in marathi निबंध बघणार आहोत. आपल्‍या अवतीभोवती आपल्‍याला गाय म्‍हैस, मांजर,कुत्रा यासारखे प्राणी दिसुन येतात, प्रत्‍येक लोकांना वेगवेगळे प्राणी आवडतात परंतु मला कुत्रा आवडतो. म्‍हणुन मी या विषयावर 2  सुंदर निबंध लिहीले आहेत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

माझ्या बाबांना कुत्रा हा प्राणी खूप प्रिय आहे. त्यामुळे आमच्या घरात नेहमी एक-दोन कुत्री पाळलेली असतात. त्यांपैकी एक म्हणजे आमची गोल्डी. मी दुसरीत असताना बाबांनी हे पिलू विकत आणले. त्यामुळे ते माझ्याबरोबरच मोठे झाले आणि माझी खास मैत्रीण बनले. ही कुत्री आहे आणि ती खास लॅब्रेडॉर जातीची आहे. तिला विकणाऱ्याने तिच्या घराण्याचा सर्व इतिहास व तिची माहिती दिली होती. आमच्या घरी आली, तेव्हा ती फक्त सहा आठवड्यांची होती. पांढरा, सोनेरी असा लोकरीचा गुबगुबीत गुंडा! आजीने तिच्या रंगावरून तिचे गोल्डी' नाव ठेवले.


maza-avadta-prani-essay-in-marathi
maza-avadta-prani-essay-in-marathi

पाहता पाहता गोल्डी मोठी झाली. आमच्याकडे येणारे लोक तिचा आकार पाहूनच घाबरतात. ती पूर्ण शाकाहारी आहे. टोमॅटो, काकडी, बटाटे तिला प्रिय. लपवलेली वस्तू शोधून काढण्याचा खेळ तिला आवडतो. ती सर्वांना 'शेक हॅन्ड' करते. गाडीत बसून फिरायला जाताना ती फार खूश असते. गोल्डी अतिशय स्वच्छताप्रिय आहे. ती अतिशय प्रेमळ आहे. त्यामुळे नंतर आमच्या घरी आणलेल्या इतर कुत्र्यांवरही ती प्रेम करते. आता ती वृद्ध झाली आहे, पण तिचा रुबाब तसाच टिकून आहे.

तर हा होता आमच्‍या लाडक्‍या गोल्‍डीचा निबंध हा तुम्‍हाला कसा वाटला ते तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . व खालील दुसरा निबंध वाचायला विसरू नका धन्‍यवाद .

निबंध 2

maza avadta prani marathi nibandh

माझा आवडता पाळीव प्राणी आम्ही आमच्या कुत्र्याला 'बॉबी' म्हणतो. कोणताही मानवी संरक्षक रक्षण करणार नाही, एवढे बॉबी आमच्या घराचे रक्षण करतो. हे घर आमचे नसून त्याचेच असावे अशा रुबाबात तो आपल्या गोंडेदार शेपटीसह साऱ्या बंगल्यात वावरत असतो. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा भाव जण सांगत असतो की, 'माझ्याच कृपेने तुम्ही या घरात वास्तव्य करत आहात हं!'

आठ वर्षांपूर्वी बॉबी आमच्या घरात आला तेव्हा तो इतका गुबगुबीत होता की, मऊ मऊ लोकरीचा एक गुंडाच भासत असे. छोटा बॉबी दुधाशिवाय दुसरे काहीही खात नसे आणि लुटूलुटू चालणाऱ्या त्याला धड जिनाही चढता येत नसे. तोच बॉबी आता अवाढव्य झाला आहे. त्याचा भव्य देह, काळेभोर पाणीदार डोळे आणि त्याचा प्रचंड आवाज यांमुळे कोणीही परका माणूस घरात शिरण्याचा चुकूनसुद्धा विचार करत नाही.

बॉबीचे नाक मोठे तिखट आहे. त्यामुळे घराच्या फाटकाशी आलेली व्यक्ती परिचित आहे की अपरिचित हे त्याला केवळ वासानेच कळते. बॉबीला बोलता येत नाही, पण आपण बोललेले सर्व त्याला कळते. त्याला काही हवे असल्यास तो विविध आवाज काढून तसे सुचवतो आणि जर का आपण दुर्लक्ष केले तर तो आपल्या अंगावर चढाई करतो. 'आंघोळ' असा शब्द नुसत्या बोलण्यातही आला. तरी तो लपतो. पण एकदा आंघोळीला सुरवात झाली की तो मनसोक्त आंघोळ करतो.

बॉबी खरा खेळकर आहे. चेंडू फेकाफेकीचा खेळ त्याला खूपच आवडतो. कुठेही दडलेला चेंडू तो बरोबर हुडकून काढतो. बॉबीची स्मरणशक्ती दांडगी आहे; म्हणून तर एकदा इंजेक्शन घेतलेला बॉबी आता सिरिंज पाहताच पळून जातो आणि पलंगाखाली दडून बसतो. असा बॉबी माझा अत्यंत लाडका व आवडता कुत्रा आहे.

maza avadta prani essay in marathi | माझा आवडता प्राणी मराठी निबंध

my best friend essay in Marathi | माझा आवडता मित्र मराठी निबंध

नमस्‍कार मित्रांनो आज आपण माझा आवडता मित्र मराठी निबंध बघणार आहोत,  मित्र हा शब्द बोलायला जेवढा सोपा आहे तेवढाच खरा मित्र मिळविणे कठीण काम आहे एक खरा मित्र तो आहे जो तुम्हाला संकटात मदत करतो आणि योग्य मार्गदर्शन करतो. आपल्‍या वागण्‍याबोलण्‍यातील उणीवा दाखवतो. 


इंग्रजीत एक म्हण आहे – “A friend in need is a friend indeed.” गरजेच्या, संकटाच्या वेळी जो कामी येतो तोच खरा मित्र. मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात तो एकटा राहू शकत नाही. त्याला समाजात सर्वांच्या बरोबर चालण्यासाठी, सुख दु:खात सहभागी होण्यासाठी, मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी एका विश्वसनीय मित्राची गरज असते. 


मैत्रीबाबत असे म्हटले जाते की, मैत्री केली जात नाही, मैत्री आपोआप होते. मने जुळल्यावर एकमेकांचे वागणे आवडल्यावर परिचयाचे रूपांतर गाढ मैत्रीत होते. भारतात कृष्ण-सुदामा, राम-सुग्रीव, कर्ण-दुर्योधन ही मैत्रीची उत्तम उदाहरणे दाखविता येतात.



माझा पण असाच एक खरा मित्र आहे. त्याचे नाव अशोक आहे व तो माझा वर्गमित्र आहे. आम्ही दोघे नेहमी बरोबर असतो. आमचे कुटुंबीय दहा वर्षांपूर्वी महिनाभराच्या अंतराने या गावी आले. तेव्हापासूनच आमची मैत्री जमली. अशोकचे वडील शिक्षक आहेत आणि माझे वडील बँकेत काम करतात. अशोकचे वडीलच शाळेत प्रवेश घेताना आमच्याबरोबर आले होते. तेव्हापासून आमची ओळख व मग मैत्री झाली.



अशोकची उंची ४.५" आहे. आम्ही ७ व्या वर्गात आहोत. अशोक खूप अभ्यास करतो. वर्गात शिकविणे चालू असताना तो एकाग्र होऊन शिक्षकांकडे लक्ष देतो. महत्त्वाचे मुद्दे वहीत लिहून घेतो. त्याचे अक्षर सुंदर आहे. त्याला नेहमीच चांगले गुण मिळतात. तो जसा चांगला विद्यार्थी आहे तितकाच चांगला खेळाडू आहे. तो फुटबॉल संघाचा कप्तान आहे. त्याचे वागणे नम्र आहे. 



शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये तो सारखाच लोकप्रिय आहे. तो नेहमी वेळेवर शाळेत येतो. त्याचे कपडे स्वच्छ असतात, बुटांना पॉलिश केलेले असते. त्यांचे दांत मोत्यांप्रमाणे चमकदार आहेत. नखे कापलेली असतात. आम्ही वर्गात एकाच बाकावर वसतो. गणित, विज्ञानाचे, प्रश्न आम्ही मिळून सोडवितो. मला इंग्रजी चांगले येते. अशा प्रकारे एकमेकांच्या सहकार्याने आम्ही चांगले गुण मिळविण्यात यशस्वी होतो.



शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांतही तो माझ्याबरोबर असतो. संध्याकाळी आम्ही एकत्रच खेळतो. कधी कधी एकमेकांच्या घरी जातो. एकदा माझे वडील आजारी असताना तो संध्याकाळी रोज-दवाखान्यात येत असे. त्याचे वडील पण तब्येतीची चौकशी करीत.

मला माझ्या मित्राचा अभिमान आहे. आमची मैत्री सदैव अशीच राहावी असे मला वाटते. मला खात्री व विश्वास आहे की आमची मैत्री कधीच तुटणार नाही.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 2 

मी फार नशीबवान आहे की मला समीरसारखा मित्र मिळाला.समीर हा माझा एक जिवलग मित्र आहे. तो नेहमी खेळांच्याच गप्पा मारत असतो. तो खरा खेळगडी आहे. समीरला कुठल्याही एका विशिष्ट खेळाची आवड आहे, असे नाही हं ! सर्वच खेळांत तो रस घेतो. विशेष म्हणजे प्रत्येक खेळाविषयी त्याला तंत्रशुद्ध माहिती आहे. नाहीतर सदासर्वकाळ क्रिकेटमध्ये रंगणाऱ्या आमच्यापैकी कितीजणांना क्रिकेटच्या मैदानाची लांबीरुंदी माहीत असते बरे? 

my-best-friend-essay-in-Marathi
my-best-friend-essay-in-Marathi


समीर खेळांविषयीची केवळ माहिती गोळा करत नाही, तर तो सर्व खेळ उत्तम खेळतो. सहज एखादा निरोप सांगायला म्हणून तो घरी येतो, आणि कॅरमचा एक डाव जिंकून जातो. तितक्याच सफाईने तो शाळेच्या क्रिकेट संघात आपली कामगिरी बजावतो. रात्रीच्या वेळी रस्त्यावर  खेळणाऱ्या कामगारांतही त्याला भाव आहे. 'समीरदादा' आले की आपला संघ जिंकणार, अशी त्यांना खात्री असते.

कोणत्याही खेळाच्या जागतिक स्पर्धा सुरू झाल्या की, त्याची सर्व माहिती, अगदी आकडेवारीसह समीरला तोंडपाठ ! किती राष्ट्रे या स्पर्धेत उतरली आहेत? सामने कोठे कोठे आहेत? प्रत्येक संघातील उत्तम खेळाडू कोण? त्या खेळाडूंच्या खेळाचे वैशिष्ट्य काय? यांबाबतची सगळी माहिती समीर देत असतो. त्याने बांधलेले अंतिम निकालाबद्दलचे अंदाज सहसा चुकत नाहीत; कारण याबाबतचा समीरचा अभ्यास चोख आहे.

 खेळांविषयीच्या पुस्तकांचा मोठा संग्रह त्याच्याजवळ आहे. प्रत्येक वृत्तपत्रात येणाऱ्या क्रीडाविषयक बातम्या तो बारकाईने वाचतो. आवश्यक ती कात्रणे काढून ठेवतो. त्याने जमवलेला खेळाडूंचा आल्बम तर पाहण्यासारखा आहे. कुठेही कोणी खेळाडू येणार आहे, असे कळले की समीर धावलाच तेथे त्याला भेटायला.

समीरच्या या छंदाला त्याचे आईवडील केव्हाही विरोध करत नाहीत. उलट दोघेही त्याचे कौतुक करतात. त्याचे बाबा क्रीडाविषयक मासिके त्याला आणून देतात. कारण समीर छंद सांभाळून आपला अभ्यासही उत्तम ठेवतो. त्यामुळे माझा हा दोस्त घरात, शाळेत आणि सर्व मित्रांत विशेष आवडता आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

my best friend essay in Marathi | माझा आवडता मित्र मराठी निबंध

Maza avadta sant essay in Marathi | माझा आवडता संत मराठी निबंध


नमस्‍कार मित्रांनो आज आपण माझा आवडता संत मराठी निबंध बघणार आहोत.  भारत ही संताची भुमी आहे. संतानी आपल्‍या शिकवणी व ज्ञानातुन समाजाची प्रगतीच करण्‍याचे काम केले आहे. भारताला खुप मोठी संतपंरपरा लाभलेली आहे. याच संतपंरपरेतील संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज , संत गाडगेबाबा यांच्‍या विषयी अनुक्रमे ३ निबंध बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

maza-avadta-sant-essay-in-marathi
maza-avadta-sant-essay-in-marathi

 majha avadta sant tukaram nibandh | संत तुकाराम महाराज

मुद्दे : 
  • महाराष्ट्राला संतांची परंपरा 
  • संत तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ संतकवी 
  • आई-वडील, जन्म इ. 
  • प्रतिष्ठित घराणे
  • घरात विठ्ठलभक्तीची परंपरा 
  • लहान वयातच आध्यात्मिक विदयेचे संस्कार
  • कालांतराने अध्यात्माची ओढ 
  •  गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत वगैरे थोर ग्रंथांचा व्यासंग 
  • विरक्ती- स्वप्नात गुरूपदेश 
  • कवित्वाची स्फूर्ती 
  • अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेली अमृतवाणी 
  • भोंदू लोकांवर कोरडे ओढले
  • सामान्यांपासून प्रतिष्ठितांपर्यंत सर्व थरांतील लोक आकर्षित 
  • मत्सरी लोकांकडून छळ 
  • धर्मरक्षण हेच जीवितकार्य 
  • जातिभेद नाकारले 
  • 'संत तुकारामांची गाथा' हे मराठी भाषेचे श्रेष्ठ असे भूषण.

महाराष्ट्राला थोर संतांची फार मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेतील संत तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ संतकवी होत. त्यांचा जन्म १६०८ साली देहू येथे झाला.  संत तुकारामांचे घराणे हे त्या काळातील एक प्रतिष्ठित घराणे होते. त्यांचे शिक्षण त्या काळातील प्रतिष्ठित घराण्यांतील व्यक्तींप्रमाणे झाले.

संत तुकाराम महाराजांच्या घरात पिढ्यान्पिढ्यांची विठ्ठलभक्तीची परंपरा होती. त्यांचे एक पूर्वज विश्वंभर यांना शेतात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती सापडली. त्यांनी नदीकाठावरील घरात त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. या घराला 'देऊळवाडा' असे म्हणत. या देऊळवाड्यात चालणारी भजने, कीर्तने, पुराणे ऐकून लहान वयातच तुकाराम महाराजांच्या मनावर आध्यात्मिक विदयेचे खोलवर संस्कार झाले.

त्या काळात महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला. असंख्य माणसे देशोधडीला लागली. कित्येक मृत्युमुखी पडली. तुकाराम महाराजांवर नातेवाइकांचेही  मृत्यू पाहण्याचे दुर्भाग्य ओढवले. त्या भीषण दुष्काळाने माणसांची केलेली दैना पाहून तुकाराम महाराजांच्या मनात विरक्ती दाटून आली. लहानपणापासून अध्यात्मविदयेचे संस्कार जागृत झाले. त्यांचे मन अध्यात्मचिंतनात गढू लागले. ते देहूजवळच्या भामनाथगडावर जाऊन अध्यात्मचिंतन करू लागले. 

गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेव गाथा वगैरे थोर ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. या दरम्यानच्या काळात संत तुकाराम महाराजांना स्वप्नात गुरूपदेश झाला. संत नामदेव पांडुरंगासमवेत त्यांच्या स्वप्नात आले. त्यांनी त्यांना कवित्व करायला सांगितले आणि अलौकिक प्रतिभेतून स्फुरलेली त्यांची अमृतवाणी सिद्ध झाली.

संत तुकाराम महाराजांच्या  काव्याकडे सामान्य माणसापासून ते त्या काळातील प्रतिष्ठित लोकांपर्यंत सर्व थरांतील लोक आकर्षित झाले. गावागावांत त्यांची कीर्ती पसरली. संत तुकाराम महाराजांची लोकप्रियता पाहून काहीजणांना त्यांचा मत्सर वाटू लागला. हे मत्सरी लोक त्यांचा नाना प्रकारे छळ करू लागले. त्यांच्या अभंगांच्या वह्या  त्या दुष्ट लोकांनी इंद्रायणी नदीत बुडवायला लावल्या. परंतु विठ्ठलकृपेने त्या वह्या  तरंगून वर आल्या, ही कथा सगळ्यांना ठाऊकच आहे. यामुळे लोकांच्या मनात तुकाराम महाराजांविषयी अपार भक्तिभावच निर्माण झाला.

संत तुकाराम महाराजांनी धर्मरक्षण हेच जीवितकार्य मानले होते. त्यांनी जातपात, उच्चनीच हे भेद नाकारले. संत तुकाराम महाराजांच्या कार्याच्या रूपाने भागवत संप्रदायाने कळसच गाठला. त्यांचे काव्य सुभाषितांसारख्या वचनांनी नटलेले आहे

जे का रंजले गांजले। त्यांसि म्हणे जो आपुले।
 तोचि साधु ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।

अशा हजारो प्रासादिक अभंगांतून आपले दिव्य तत्त्वज्ञान संत तुकाराम महाराजांनी जनतेसमोर मांडले आहे. जनसामान्यांच्या जिभेवर हे काव्य विराजमान झाले आहे. 'संत तुकारामांची गाथा' ही मराठी भाषेचे एक अलौकिक भूषण बनले आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला  हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता बाकीचे २ निबंध तुम्‍हाला खाली स्‍क्रोल केल्‍यावर दिसुन येतील. धन्‍यवाद   


maza avadta sant eknath marathi nibandh | संत एकनाथ मराठी निबंध


आजही जन्मावरून माणसांत उच्चनीचता मानली जाते. अशा वेळी मनात येते, स्वर्गातील एकनाथांच्या आत्म्याला काय वाटत असेल? चारशे वर्षांपूर्वी एकनाथांनी प्रत्यक्ष कृतीद्वारा समाजाला समानतेची व मानवतेची शिकवण दिली होती.

इ. स. १५३३ मध्ये सुविदय, भाविक अशा चक्रपाणींच्या घरात संत एकनाथांचा जन्म झाला. एकनाथांच्या घराण्यात विठ्ठलभक्ती फार पूर्वीपासून रुजलेली होती. त्यांच्या आजोबांनी म्हणजे संत भानुदासांनी कर्नाटकातून पांडुरंगाची मूर्ती पंढरीला आणली. एकनाथांना तर अगदी बालपणापासून परमेश्वरप्राप्तीचे वेड लागले होते. त्यासाठी त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षीच घराचा त्याग केला आणि ते देवगडला आपल्या गुरुगृही, जनार्दनस्वामींकडे आले. जनार्दनस्वामींनी एकनाथांची परीक्षा घेतली. ते त्या कसोटीला उत्तम प्रकारे उतरले. तेव्हा त्यांना गुरूंचा अनुग्रह मिळाला.

एकनाथ विद्वान होते, ज्ञानी होते; धर्म व रूढी यांतील फरक त्यांनी जाणला होता. सनातनीपणाचे पांघरूण पांघरणारे लोक माणुसकीपासून दूर जात आहेत, हे एकनाथांनी ओळखले. संस्कृत भाषेचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. तिची थोरवी ते जाणत होते; पण त्याचबरोबर मराठीची महत्ताही त्यांनी जाणली होती. त्यामुळे त्यांनी कर्मठ समाजाचा रोष पत्करूनही सामान्य जनांसाठी मराठीत प्रासादिक रचना केली.

त्यांनी अविश्रांत परिश्रम घेऊन ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिकेचे शुद्धीकरण केले व तिच्यातील पाठभेद काढून टाकून 'ज्ञानेश्वरी' सिद्ध केली. एकनाथांनी भागवताची रचना केली व भावार्थ रामायणातून रामकथा सांगितली. 'रुक्मिणी-स्वयंवर' हा त्यांच्या पंडिती काव्याचा उत्कृष्ट नमुना आहे. एकनाथांनी ही सर्व रचना मराठीत केली. एकनाथांच्या या मराठी रचनेला काशीच्या पंडितांनी प्रारंभी विरोध केला; पण ग्रंथ श्रवण केल्यावर त्याच पंडितांनी एकनाथांच्या ग्रंथाची काशीत मिरवणूक काढली.

एकनाथ संत होते, कवी होते, तसेच ते श्रेष्ठ समाजसुधारक होते. समाजातील चातुर्वर्ण्य पद्धत व त्यामुळे समाजातील विशिष्ट वर्गावर होणारा अन्याय त्यांना मान्य नव्हता. रणरणत्या वाळूत रडणाऱ्या हरिजन बालकाला त्यांनी उचलून घेतले व त्याला महारवाड्यात नेऊन पोचवले. एवढेच नव्हे, तर त्यांनी स्वत:च्या वडलांच्या श्राद्धाला महारांना आपल्या घरी पंक्तीला जेवायला बोलावले. काशीहून आणलेली गंगा तहानलेल्या गाढवाला पाजली. हे सारे एकनाथ करू शकले; कारण जनता हाच त्यांचा जनार्दन होता व जनसेवा हीच त्यांना ईश्वरपूजा वाटत होती.


sant gadge baba essay in marathi | संत गाडगेबाबा मराठी निबंध एक समाजसेवक संत

मुद्दे :
  • जन्म - बालपण
  • दारिद्र्याचे चटके
  • निरक्षरता, अंधश्रद्धा यांविरुद्ध प्रचार
  • 'गाडगेबाबा' हे नाव का पडले?
  • कष्ट करून भिक्षा घेणे
  • स्वच्छतेचा आग्रह
  • देणग्यांचा उपयोग जनतेसाठी
  • अनेक संस्था
  • निधन
संत गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यात झाला. त्यांचे मूळ नाव डेबूजी हे होते. वडिलांना दारूचे व्यसन असल्यामुळे घरात कायमचे दारिद्र्य होते. वडील अकाली वारले. त्यामुळे त्यांच्या मामाने त्यांचा सांभाळ केला.
संत गाडगेबाबांनी मामासोबत शेतात खूप कष्ट केले, पण सावकाराने मामाच्या शेतावर जप्ती आणली. मामाच्या अशिक्षितपणामुळे सावकाराने मामाला फसवले. या घटनेचा गाडगेबाबांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यामुळे 'व्यसन सोडा, शिक्षण घ्या. कर्ज घेऊ नका,' असा त्यांनी आयुष्यभर प्रचार केला.

सामाजिक प्रबोधनासाठी त्यांनी भजन, कीर्तन व प्रवचन हा मार्ग वापरला. ते नेहमी अंगावर फाटकी गोधडी घेत. त्यांच्या हातात नेहमी गाडगे असे. त्यामुळे त्यांना 'गाडगेबाबा' हे नाव पडले. गाडगेबाबा कधी एका जागी जास्त काळ राहत नसत. कष्ट करूनच भिक्षा घेत. त्यांच्या हातात नेहमी झाडू असे. ते स्वत: झाडण्याचे काम करत आणि लोकांना स्वच्छतेचा उपदेश करत.

लोकांकडून त्यांनी खूप देणग्या मिळवल्या. पण एकही पैसा स्वत:साठी खर्च केला नाही. त्यांनी धर्मशाळा बांधल्या, गोरक्षण संस्था उभारल्या. त्यांनी अनेक शाळा व महाविदयालये सुरू केली. आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांनी लोकजागृतीचे व लोकसेवेचे काम केले. १९५६ साली त्यांचे निधन झाले. ते एक महान सेवाभावी संत होते.

Maza avadta sant essay in Marathi | माझा आवडता संत मराठी निबंध


Maza avadta lekhak marathi nibandh | माझा आवडता लेखक मराठी निबंध

निबंध 1 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  माझा आवडता लेखक  मराठी निबंध बघणार आहोत. आपण भरपुर पुस्‍तके वाचत असतो पण त्‍यातील काही निवडकच लेखक आपले आवडते असतात. माझे आवडते लेखक आहेत पु. ल.  देशपांंडे कारण त्‍यांचे लिखाण इतके आनंददायी आहे की तुम्‍ही पुर्ण पुस्‍तक वाचल्‍याशिवाय राहणार नाही.  

मुद्दे :

  • पु. ल. देशपांडे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व
  • लहान मुलांसाठी लेखन
  • विनोदी लेखन
  • व्यक्तिचित्रे
  • अनेक नाटके
  • प्रवासवर्णने
  • अनेकांच्या पुस्तकांना प्रस्तावना
  • माणुसकी गौरवणारा,
  • माणुसकीचा गहिवर असलेला एक अलौकिक व्यक्तिमत्त्वाचा माणूस व अष्टपैलू लेखक


पु. ल. देशपांडे यांची अनेक पुस्तके माझ्या संग्रही आहेत. ही पुस्तके कितीही वेळा वाचली तरी त्यांची गोडी कमी होत नाही. कारण पु. ल. देशपांडे हे माझे आवडते लेखक आहेत. माझेच का? पु. ल. हे साऱ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आहे.

अगदी सुरुवातीला माझ्या वाचनात आले पु. लं.चे 'खोगीरभरती' आणि 'नस्ती उठाठेव' हे विनोदी लेखसंग्रह. हा काहीतरी वेगळाच लेखक आहे,या पुस्तकांबरोबर मोठे होत असतानाच मला कळलं की ज्या 'नाच रे मोरा' या गाण्यावर आपण नाचलो, त्या गाण्याची चाल पु. लं.नी दिलेली आहे.

maza-avadta-lekhak-nibandh
maza-avadta-lekhak-nibandh


 नंतर वाचनात आली पु. लं.ची 'व्यक्ती आणि वल्ली' आणि 'गणगोत' ही पुस्तके. तेव्हा लक्षात आले की, हा लेखक केवळ विनोदीच लिहीत नाही, तर हा उत्कृष्ट व्यक्तिचित्रेही रेखाटतो. कारुण्याची झालर असलेले विनोदही जागोजागी आढळतात. त्यांचा विनोद हसवता हसवता अंतर्मुख करून जातो.

पु. लं.ची 'तुझे आहे तुजपाशी', 'अंमलदार', 'ती फुलराणी...' ही नाटके पाहिली; पण 'बटाट्याची चाळ', 'वाऱ्यावरची वरात', 'असा मी असामी' हे एकपात्री प्रयोगपाहायची संधी मला मिळाली नाही. मग त्या पुस्तकांची पारायणे केली; ध्वनिफिती ऐकल्या. बटाट्याच्या चाळी 'ला जोडलेले 'एक चिंतन' हे पु. लं.च्या विनोदाचे खास उदाहरण म्हणून सांगता येईल. पु. लं.ची पुस्तके बाजूला ठेवली, तरी त्यांच्या चितळे मास्तरांच्या झिजलेल्या चपला वा त्यांच्या नारायणची नारायणगिरी' विसरता येत नाही.

पु. लं.नी खूप प्रवास केला आणि तो अत्यंत मिस्कील, खुसखुशीत भाषेत शब्दरूपांतही आणला. अपूर्वाई, पूर्वरंग, वंगदेश ही त्यांची पुस्तके म्हणजे मराठी साहित्यातील अजरामर प्रवासवर्णने आहेत. पु. लं.नी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्या छोट्याशा प्रस्तावनाही आपल्याला एखादा मौल्यवान विचार देऊन जातात. पु. ल. एके ठिकाणी लिहितात, "हास्य हे माणसा-माणसांच्या मनात निर्भयता निर्माण करणारे मोठे साधन आहे. हास्य आणि सहानुभूती या दोन गोष्टी देऊन निसर्गाने माणसाला माणूसपण दिले आहे. खळाळून हसणाऱ्या मोठ्या समुदायातून या माणुसकीचे सर्वांत प्रभावी दर्शन होते."

आज पु. ल. आपल्यात नाहीत; पण माणुसकी गौरवणारा हा महाराष्ट्राचा महान अष्टपैलू लेखक माझा आवडता लेखक आहे. 

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व पु. ल. देशपांडे यांची कोणती पुस्‍तके तुम्‍ही वाचली  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 2

माझा आवडता लेखक पु ल देशपांडे मराठी निबंध

माझे आवडते लेखक आहेत पु. ल. देशपांंडे कारण पु.ल. आनंदात जगले, विविध कलांच्या क्षेत्रांत ते लीलया वावरले. विशेष म्हणजे पु.लं.ना जो जो आनंद गवसला, जेथे जेथे आनंद मिळाला, तो त्यांनी सर्वांसाठी मुक्तपणे उधळला. आपल्या एका मुलाखतीत पु.ल. म्हणाले होते, 'मला जेव्हा जेव्हा काही चांगले दिसते, आवडते तेव्हा तेव्हा ते दुसऱ्याला सांगण्यासाठी मी उत्सुक असतो, आतुर असतो.' म्हणून पु.ल. हे केवळ शब्दार्थी आनंदयात्री नव्हते, तर ते खरोखरीचा आनंद उधळणारे 'आनंददात्री' होते. 

पु.लं.नी मराठी माणसाला काय दिले, असा प्रश्न विचारण्याऐवजी पु.लं.नी मराठी माणसाला काय दिले नाही? असेच विचारावे लागेल. अशा या अष्टपैलू कलावंताचा जन्म १९१९ साली झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व पुणे येथे एम्.ए.,एल्.एल्.बी. पर्यंत झाले. त्यांनी संस्कृत व बंगाली या भाषांचा परिश्रमपूर्वक अभ्यास केला. त्यांनी लिपिक, शिक्षक, प्राध्यापक अशा विविध स्तरांवर नोकऱ्या केल्या. आकाशवाणीवर नाट्यविभागप्रमुख म्हणून काम केले. दिल्ली दूरदर्शनवरील कार्यक्रमांचे ते पहिले निर्माते होते.

पु.लं.जवळ असामान्य निरीक्षणशक्ती होती. त्यांच्या लहानपणी घरी आलेल्या पाहुण्याचे अचूक निरीक्षण करून आपला हा बाळ काही जगावेगळे बोलणार नाही ना, अशी भीती त्यांच्या आईला वाटे. पण याच निरीक्षणशक्तीतून पु.लं.च्या 'व्यक्ती आणि वल्ली' साकार झाल्या. 'गणगोता 'तील आप्तजन चिरंजीव झाले. पु.लं.च्या लेखनाचे वैशिष्ट्य असे की, अनेकदा वाचून, पाहून वाचकांनाही ती सारी माणसे आपलीच, जवळचीच वाटू लागली. 'बटाट्याची चाळ' या पु.लं.च्या पुस्तकातील प्रत्येक माणूस आपल्यापरीने वेगळा आहे.

पु.लं.नी भरपूर प्रवास केला आणि 'अपूर्वाई' , 'पूर्वरंग' आणि 'वंगदेश' अशा पुस्तकांतून तो वाचकांपुढे मांडला. युरोपातील 'कापी' बेटावरील निळाईच्या सौंदर्याने पु.लं.चे अंत:करण भरून आले आणि त्यांना आठवला ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला 'कोटिचंद्रप्रकाश'.

पु.लं.चे चित्रपट, नाटके, एकपात्री प्रयोग सारेच लोकांनी डोक्यावर घेतले. त्यांतल्या संवादांनी, गाण्यांनी, अभिनयाने आणि दिग्दर्शनाने रसिकांना अमाप आनंद दिला. पु.लं.चा विनोद हा अभिजात होता. कुणालाही न दुखावणारा, कुणाच्याही व्यंगावर बोट न ठेवणारा. शब्दाशब्दांवर ते लीलया कोट्या करत. त्यांचे 'कोट्यधीश' हे पुस्तक वाचकाला कोणत्याही परिस्थितीत खुलवते.

पु.ल. स्वतः मूलतः कविमनाचे होते, संगीतकार होते. त्यांचे 'नाच रे मोरा' हे गाणे ऐकल्यावर प्रत्येक मराठी बालकाचे बालपण सुखावून जाते. पु.ल. आणि त्यांच्या पत्नी सुनीताबाई हे दोघेही काव्यवेडे. स्वानंदासाठी ते नेहमीच कविता वाचत, म्हणत. त्यांना शेकडोंनी कविता पाठ होत्या. पण त्यांच्या मनात आले, हा आनंद आपण इतरांपर्यंत पोहोचवला तर... आणि मग भाईंनी आणि सुनीताताईंनी कविवर्य बोरकर, मढेकर आणि आरती प्रभूच्या कवितांच्या वाचनाचे जाहीर कार्यक्रम केले. स्वत:ला मिळालेला आनंद हजारो श्रोत्यांवर उधळून दिला.

पु.लं.च्या बाबतीत म्हणावे लागते की, 'देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी आमुची झोळी'.कोठे कोणी चांगले काम करत आहे, पैशासाठी काम अडले आहे असे कळले की, पु.लं.चा मदतीचा हात तेथे पोहोचत असे. कुणा एका आडवळणाच्या गावी एक प्राचार्य आपल्या महाविदयालयासाठी धडपडत आहे, हे कळल्यावर पु.ल. फाऊंडेशन तेथे मदतीला गेले. 

रक्तपेढ्या, रुग्णालये, मुक्तांगण, शैक्षणिक संस्था... साऱ्यांना भरभरून मदत पोहोचली. कुणी तरुण तज्ज्ञ डॉक्टरीण, व्यसनाधीनांना व्यसनांपासून मुक्त करण्यासाठी धडपडत आहे, असे कळल्यावर हा थोर दाता तेथेही पोहोचला. मग सांगा, पु.ल. हे खरोखरच एक आगळेवेगळे आनंदयात्री नव्हते का?

 
निबंध 3


माझा आवडता साहित्यिक मराठी निबंध

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे महान विनोदाचार्य प्र.के. अत्रे म्हणत असत, 'लता मंगेशकर आणि पु.लं. देशपांडे हे महाराष्ट्रातले दोन चमत्कार आहेत. ही तेजाने तेजाची केलेली आरती आहे. खरोखर, 'चमत्कार' या शब्दाव्यतिरिक्त पु.लंचं वर्णन करताच येणार नाही.


 अवघं साहित्यविश्व त्यांचा 'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व' असा उल्लेख करतं. 'लाडकं' हे वात्सल्याच्या विश्वातलं विशेषण दुसऱ्या कोणाला लावता येईल असं वाटत नाही. ते हरहुन्नरी होते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक चमकदार पैलू होते. म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की 'याच्या आधी असं व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात झालं नाही आणि पुढे कधी होईल असं वाटत नाही.'



 अशी माणसं शतकात किंवा हजार वर्षात एखादवेळच जन्माला येतात. धन्य त्यांचे आई-वडील. त्यांच्या आई-वडिलांनी जेव्हा त्यांचं नाव 'पुरुषोत्तम' असं ठेवलं, तेव्हा त्यांना यत्किंचितही कल्पना आली नसेल की हे मूल जेव्हा 'पुरुष' होईल तेव्हा ते अनेक क्षेत्रात 'उत्तम' ठरेल. देव माणसाला केव्हा केव्हा चकवतो, तो असा.
पु.लं. ना काही येत नव्हतं असं नाहीच. ते उत्कृष्ट विनोदी (आणि गंभीरही) लेखक होते. नाटककार आणि नटही. गीतकार आणि संगीतकारही, गायक आणि वादकही, कथालेखक व कथाकथक, वक्तृत्वही, कर्तृत्वही.


एखाद्याला वाटेल त्यांना नृत्यकला अवगत नसावी. पण ज्यांनी त्यांचे 'गुळाचा गणपती' सारखे चित्रपट, 'वाऱ्यावरची वरात' यासारखं प्रहसन किंवा 'सुंदर मी होणार' यासारखं नाटक पाहिलं असेल, त्यांना कळून येईल की नृत्याच्या क्षेत्राचेही ते चांगले जाणकार होते. ते साहित्यातले सिकंदर होते, जिंकायला आता क्षेत्रच राहिलं नाही म्हणून खंतावणारे. ज्या क्षेत्रात ते गेले, त्या क्षेत्रातले ते सम्राट झाले. त्या क्षेत्रावर त्यांनी अधिराज्य गाजविले. 



साम्राज्य तर असं स्थापलं की त्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळला नाही आणि कधी मावळणारही नाही.
पद्य विडंबनावर आचार्य अत्रे यांनी आपली मोहोर उमटवली आहे, तर गद्य विडंबनावर पु. लं. नी आपला ठसा उमटवला आहे. त्याचे 'व्यवच्छेदक लक्षण' व 'सहानुभावांचे वाङ्मय' बटाट्याच्या चाळीतलं 'एक चिंतन' असे लेख मराठीत कधी लिहिलेच गेले नाहीत. यातलं विडंबन विशेष. 


त्याच्या अगोदर व्यंकटेश माडगूळकरांनी अप्रतिम व्यक्तिचित्रं रेखाटली. पण माडगूळकरांची व्यक्तिचित्रे आणि पु.लंची व्यक्तिचित्रे यात खूप फरक आहे. असं म्हणता येईल की माडगूळकरांच्या 'व्यक्ती' आहेत तर पु.लंच्या 'वल्ली' आहेत. पु.लंच्या लिखाणाचं वैशिष्ट्य असं की ते एखाद्याची टिंगल - टवाळी करतात. खट्याळपणे त्याच्यावर लिहून आपल्याला हसवतात. पण मग शेवटी अगदी गंभीर होतात. काळजाचा ठाव घेणारं असं काहीतरी लिहून जातात.


'तुझं आहे तुजपाशी' मधील आचार्य घ्या. सबंध नाटकभर आपण त्यांना हसत असतो. पण पु.लं. शेवटी त्यांच्या तोंडी असं एक भाषण घालतात की, आपल्याला आचार्यांची कीव यायला लागते. त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागते. वाटतं, अरेरे, आपण या स्फटिकासारख्या स्वच्छ आणि प्रामाणिक माणसाला उगाच हसलो.
त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल, त्यांनी इतकं विनोदी लेखन केलं, पण कुठेही

आचरटपणा नाही आजची व्यासपीठावरची आणि दूरदर्शनची विनोदी नाटके म्हणजे शुध्द आचरटपणा. हल्ली विनोद म्हणजे विदूषकी चाळे. विनोद म्हणजे आचरटपणा  असं समीकरण झालेलं आहे. म्हणूनच खुद्द पु.लंच दूरदर्शनला 'दुर्दशन' असं म्हणत असत. त्यांनी हयात व मृत व्यक्तीची कधी कुचाळकी केली नाही किवा
कुणाच्या वर्मी झोंबेल असं काही लिहिलं नाही. ते मांगल्याचे, सौंदर्याचे पुजारी होते. म्हणून । त्यांना सगळं काही सुंदर आणि मंगल वाटे. 


एकपात्री प्रयोग करावा, तर पु.लं.नीच. एकनाथांनी | लिहून ठेवलंय की ज्ञानेश्वरापाठी कोणीही महाटी ओवी करू नये. मला सुध्दा असंच वाटतं की | पु.लं. नंतर कोणीही एकपात्री प्रयोग करू नयेत. त्यांनी विनोदाची पातळी तर इतकी उंचावून | ठेवलीय की त्या पातळीपर्यंत फारच थोडे लोक येऊ शकतील.  पु.लं. गेले आणि त्यांच्याबरोबर | असं काही गेलंय की जे महाराष्ट्र परत कधीच पाहू शकणार नाही.

निबंध 4

 majha avadta lekhak in marathi essay


मला लहानपणापासून वाचनाची आवड. लहानपणी पंचतंत्र, इसापनीती, अद्भुत कथा आवडायच्या. हळूहळू वाचनकक्षा रुंदावत गेल्या. सानेगुरुजींची ‘गोड गोष्टी', 'श्यामची आई' पुस्तके वाचली आणि साने गुरुजी आवडू लागले. नंतर मात्र मी ललित साहित्य वाचू लागले. त्यात ना. सी. फडके, वि. स. खांडेकर, अनंत काणेकर, चिं. वि. जोशी, रणजीत देसाई, प्र. के. अत्रे यांची पुस्तके वाचू लागले. पण सर्वात प्रभाव पडला, तो पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचा.



 त्यामुळे पु. ल. देशपांडे माझे आवडते लेखक बनले. मग अर्थातच पुलंची पुस्तके वाचण्याचा मी सपाटा चालविला. पु. ल. देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा एक प्रदीर्घ कालखंडच! साहित्य, नाट्य, संगीत, चित्रपट, एकपात्री प्रयोग, संस्कृती अशा जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श करणारे. असे एकही क्षेत्र नाही, की जिथे पुलंचा परिसस्पर्श झालेला नाही. आयुष्य मी सुटी' समजून घालविली, असे म्हणणारे पु. ल. खरोखरीच आनंदयात्री होते. 




लेखकाचे अंतरंग त्यांच्या साहित्यात डोकावते. त्यांचे म्हणणे होते की, “जन्म आणि मृत्यू या दोन टोकांच्यामध्ये पकडून नियतीने चालविलेली आपणा साऱ्यांची फसवणूक एकदा लक्षात आली, की त्यातून सुटायला आपली आणि आपलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं? त्यामुळेच त्यांची भाषाशैली अत्यंत खेळकर होती. कोणतेही तत्त्वज्ञान हसत-खेळत सांगण्याची त्यांची शैली कोणाही वाचकाला भुरळ न पाडेल, तरच नवल!




संगीत आणि नाटक हे पुलंच्या संपन्न कलाजीवनाचे खास विशेष. तुझे आहे तुजपाशी, ती फुलराणी, सुंदर मी होणार, अंमलदार, एक झुंज वाऱ्याशी, बटाट्याची चाळ, पुढारी पाहिजे, वयम् मोठम् खोटम् इ. नाटकांद्वारे पुलंनी जो विषय हाताळला, किंबहुना ज्या विषयाला स्पर्श केला, त्याचे सोने झाल्याशिवाय राहिले नाही. संवादात सहजता, खेळकरपणा, सुबोधता, मोहकता असल्याने त्याची वाचकांवर, ती नाटके पाहणाऱ्या प्रेक्षकांवर जादू झालीच पाहिजे.



पु.लं च्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्यांच्या प्रत्येक पुस्तकातील प्रत्येक पानावर, प्रत्येक ओळीवर दिसून येतो. त्यांची पुस्तके म्हणजे मोठे मासे छोटे मासे, अपूर्वाई, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा, नसती उठाठेव. गोळाबेरीज, खिल्ली, आम्ही लटिके न बोलू, तीन पैशांचा तमाशा, गुण गाईन आवडी, व्यक्ति आणि वल्ली', एवढी ग्रंथसंपदा त्यांनी आपल्या मराठी रसिकांसाठी निर्माण केली. वाचकांना आपल्या विनोदी शैलीने सतत हसवत ठेवले. 



त्यामुळेच त्यांना कोट्याधीश पुल म्हणत. शाब्दिक कोट्या करणे वाटते तेवढे सोपे नाही. त्यासाठी हजरजबाबीपणा, शब्दांची समृद्धता हवी. ती पुलंच्याकडे विपुल प्रमाणात होती. एक उदाहरण सांगते. पं. भीमसेन जोशी सवाई गंधर्वांचे शिष्य. विमानातून प्रवास केल्याशिवाय त्यांचा एकही दिवस जात नसे. त्यावर पु.ल. म्हणाले, “सवाई गंधर्वांचा शिष्य हवाई गंधर्वच आहे." ही झाली समयसूचकता!




'व्यक्ति आणि वल्ली'मधील व्यक्तिरेखा वाचताना त्या प्रत्यक्ष डोळ्यांपुढे साकारतात. त्यातील व्यक्ती त्यांच्या खास वैशिष्ट्यांनिशी साकारतात; जिवंत होतात. त्यातील प्रत्येक पात्र समाजात कोठेतरी आढळते; पण अशा व्यक्तींचे यथार्थ चित्रण करणे प्रत्येकाला जमत नाही. अशा व्यक्तिरेखा साकारताना निरीक्षण हवे, त्यांच्या लकबी टिपल्या पाहिजेत. तसेच, त्यांची विशिष्ट भाषादेखील शब्दांत मांडता आली पाहिजे, तरच ती व्यक्तिरेखा जिवंत होते आणि ती आपल्या मनात घर करून राहते. 



नारायण, चितळे मास्तर, नाथा कामत, रावसाहेब, पानवाला, सखाराम गटणे सर्वच पात्रे लक्षात राहतात, ती लेखनशैलीमुळे आणि समर्पक शब्दांच्या योजनेमुळेच ना! अशा प्रकारे वाङ्मयीन प्रतिष्ठा लाभलेले दर्जेदार साहित्य, विविध वाङ्मय-प्रकार हाताळणारा हा लेखक सर्वांनाच आवडतो. मग मीच त्याला अपवाद कसा असेन ?


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

Maza avadta lekhak marathi nibandh | माझा आवडता लेखक मराठी निबंध

internet essay in marathi | इंटरनेट मराठी निबंध 


निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण internet essay in marathi निबंध बघणार आहोत. या  निबंधामध्‍ये मानवाने आपल्‍या फायद्यासाठी तयार केलेली इंटरनेट नावाची जादु कोणती कामे करू शकते व चुकीच्‍या रीतीने वापरल्‍यास कीती  नुकसान करू शकते याचे वर्णन केेले आहे. व त्‍यावर कोणते उपाय योजले जाऊ शकता हे तुम्‍हाला वाचण्‍यात येईल . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

सकाळची वेळ १०.३० ची अमेरिकेतल्या एका उत्तुंग इमारतीत महत्त्वाची मिटींग बोलावली होती. विषय खूप गंभीर होता. या मिटींगसाठी त्याविषयातील जाणकार तज्ञ आली होती. एक गंभीर परिस्थिती उद्भवली होती. त्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी ही मिटींग बोलावली होती. नुकतेच एका हॅकरनी इंटरनेटवरील एका प्रोग्रामद्वारे 'आय लव्ह यु' नावाचा व्हायरस सोडला होता. या व्हायरसद्वारे इंटरनेटवरील अतिमहत्त्वाची माहिती पुसली जाणार होती किंवा त्या माहितीत बदल होण्याचा संभव होता. यावर उपाय योजण्यासाठी ही बैठक बोलावली होती.

internet essay in marathi
internet essay in marathi 


या बैठकीत तज्ज्ञांनी विचार मांडून त्यावर तोडगा शोधला. एका अँटीव्हायरस विकसित केला. या अँटीव्हायरस प्रोग्रामद्वारे तात्पुरता या परिस्थितीवर उपाय योजला गेला. जोपर्यंत पुढे गंभीर परिस्थिती उद्भवत नाही तोपर्यंत हे शास्त्रज्ञ निर्धास्त झाले.

 तर या इंटरनेटची सुरुवात ७० व्या दशकात झाली. इंटरनेट असे जे जाळे जे एकमेकांना जोडले आहे. अमेरिकेमध्ये सुरुवातीला संरक्षण दलातील माहिती आदान-प्रदान करण्याकरिता हे तंत्रज्ञान विकसित केले गेले. त्यालाच व्यापक असे जागतिक रूप देऊन इंटरनेटची सुरुवात केली गेली या इंटरनेट 'वर्ल्ड वाईड बेब' असेही म्हणाले जाते. असे जे जाळे जे जागतिक पातळीवर पसरले आहे.

 इंटरनेट असण्यासाठी पहिली गरज संगणक असावे लागते नंतर दुसरे महत्त्वाचे उपकरण मोडेम लागते. भारतात या इंटरनेटची सुरुवात १९९४ साली पासून सुरू झाली. आज आपण मोबाईलवर सहजरीत्‍या इंटरनेट वापरू शकतो.

वर उल्लेख केल्यामुळे या इंटरनेटचे काही धोकेही आहेत. सध्या 'आय लव्ह यू', 'बग' या नावाने अनेक व्हायरस सध्या धुमाकूळ घालत आहेत. हे एका प्रकारच्या प्रणाली (प्रोग्राम)मध्ये बनविलेले असतात, जे चुकून इंटरनेटवरती काम करतेवेळी आपल्या हातून उघडले गेले तर आपल्या संगणकातील नव्हेच तर आपल्या संगणकाला 'लॅन'मार्फत (लोकल एरिया नेटवर्क) जोडल्या गेलेल्या सर्व संगणकातील महत्त्वाची नोंद यामुळे पुसली जाते. किंवा त्यामध्ये फेरफार होतात तर हे इंटरनेट हॅकर हे खरेतर याबाबतीत तज्ज्ञ असतात ते इंटरनेटमार्फत देशाची जी गुप्त माहिती आहे, ती पळवून इतर देशांना विकतात.

 इंटरनेटच्या आहारी गेलेली इतकी माणसे आहेत की दिवस-दिवस ते इंटरनेट पुढे बसून असतात. त्यामुळे त्यांना भूक लागत नाही पण खूप वेळ बसल्याने त्यांना पाठीचा त्रास होत राहतो. हा खरंच खूप गंभीर प्रश्न आहे.
या तोट्याबरोबरच इंटरनेटद्वारे आपल्याला खूप मोठे वरदान लाभले आहे. या इंटरनेटमार्फत आपल्यापुढे खूप मोठा माहितीचा विस्फोट उभा आहे. 

याद्वारे आपल्याला जगातील कोणतीही, कसलीही, कशाहीप्रकारची माहिती मिळवु शकतो. जर आपल्याला ती माहिती कोणत्या संकेतस्थळावर आहे हे शोधण्यासाठी याहू, गुगलसारखे संकेतस्थळे शोधुन देणारे माध्यमेही आहेत. या इंटरनेटचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे 'ई-मेल' ज्याला 'इलेक्ट्रॉनिक मेल' ही म्हणतात. याद्वारे आपण आपल्या मित्राला नातेवाइकाच्या सेकंदाच्या काही भागामध्ये पत्र पाठवू शकतो. यामार्फत आपल्याला बाहेर कोठेही न जाता घरातल्या घरात संगणकाद्वारे कोणतीही वस्तू विकत घेऊ शकतो. यालाच इ. कॉमर्स म्हणतात
.
भविष्यात इंटरनेटची खूप मोठी भरारी होणार आहे. सध्या जे रोबोट आहेत त्याला जर इंटरनेटचे तंत्रज्ञान विकसित केले तर त्याला प्रश्न विचारण्याचा अवकाश, तात्काळ तो तुमच्यासमोर त्याचे उत्तर सादर करेल.
या इंटरनेटमार्फत जे धोके संभवतात त्यासाठी चांगले असे सायबर लॉ योजले पाहिजेत.त्याचबरोबर आपण त्या इंटरनेटचे गुलाम होण्यापेक्षा त्याला आपणच गुलाम ठेवले पाहिजे. इंटरनेट आपला वेळ वाचविण्यासाठी विकसित  कले आहे . त्याला तेथेच मर्यादित ठेवले पाहिजे.

या इंटरनेटच्या महापुराला आपले जीवन सुखकर करण्यासाठी उपयोगात आणावे. तो तुमचा दक्ष सेवक आहे. जे तुम्ही त्याच्याकडून मागाल ते तुम्हांला चांगल्या प्रकारे देऊ शकेल. इंटरनेटचा योग्य वापर करावा.
 
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व इंटरनेट वापरताना तुम्‍ही काय उपाय योजना करता व इंटरनेटव्‍दारे तुम्‍ही कोणती कामे सहजरीत्‍या करीत असता हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद 

निबंध 2

इंटरनेट मराठी निबंध 

माहिती तंत्रज्ञानाचा एक सुंदर आविष्कार म्हणजे इंटरनेट. आज जिकडे पाहावे तिकडे सगळीकडेच इंटरनेटच हा शब्द आपल्या कानावर पडत असतो. इंटरनेटची उपयुक्तता जवळजवळ सर्वच क्षेत्रांत आपल्याला जाणवत आहे. पण काय आहे हो हे इंटरनेट? ते कसे तयार होते ? त्याचा विस्तार नक्की कुठून कसा झाला? यांसारखे अनेक प्रश्न नेहमीच सर्वसामान्य मनात घोळत असतात. तर हे इंटरनेट म्हणजे असंख्य कॉम्प्युटर किंवा संगणकांचे जगभर पसरलेले जाळे होय किंवा अनेक नेटवर्क यांचे हे एक नेटवर्क आहे. 


या इंटरनेटशी आज संपूर्ण जगातील असंख्य लोक एकमेकांशी जोडले गेले आहेत. अमेरिकेतल्या पेंटॉगॉन या त्यांच्या सुरक्षाव्यवस्था असलेल्या ठिकाणी सर्वप्रथम अशाप्रकारच्या नेटवर्कची गरज भासू लागली. कारण युद्धपरिस्थिती दरम्यान या अधिकाऱ्यांमधील अपुऱ्या सुसंवादाचे परिणाम तेथील सुरक्षाव्यवस्थेला जाणवत होता. म्हणून सर्वप्रथम पेंटॉगॉनमधील संगणक हे जोडण्याची कल्पना यातून निघाली. त्यातूनच सर्वप्रथम 'अपनिट' तयार झाले व पुढे 'अर्पानेट'चाच विस्तार होत होत त्यातून इंटरनेटचा जन्म झाला आणि हळूहळू जगभरातील संगणक एकमेकांना जोडले जाऊन इंटरनेटचे हे महाकाय जाळे विणले गेले.


पुढे इ.स. १९९१ मध्ये टिम बर्नर ली या गणितज्ञाने स्वीत्झर्लंडमधील जिनिव्हा येथे सर्वप्रथम 'वर्ल्ड वाइब वेब' (www) सुरू केले. कदाचित तेव्हा त्या बिचाऱ्याच्या हे ध्यानीही नसेल की पुढे यामध्ये एवढे क्रांतिकारक बदल होतील म्हणून. भारतामध्ये इंटरनेटचा व पर्यायाने 'वर्ल्ड वाइब वेब'चा प्रसार होण्यास १९९५ सालापासून सुरुवात झाली आणि हा प्रसार अजूनही असाच चालू आहे.


 आज जवळजवळ असे कोणतेच क्षेत्र उरलेले नाही की जेथे इंटरनेटचे अस्तित्व किंवा उपयुक्तता नाही. मग ते शिक्षण क्षेत्र असो वा क्रीडा, आरोग्य, बँक. राजकारण असे कोणतेही क्षेत्र असो, त्यांना इंटरनेट नवीन नाही सर्वांनाच इंटरनेट हे आपल्याला माहिती-तंत्रज्ञानामुळे लाभलेले वरदान वाटू लागले आहे.


आज इंटरनेटमुळे घरबसल्या आपण जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातील माहिती किंवा ज्ञान मिळवू शकतो. अगदी घरबसल्या आपण बँकेचे व्यवहारही करू शकतो. जगातल्या सर्वोत्कृष्ट गोष्टीची माहिती आपल्याला इंटरनेटवरून मिळते आणि शिक्षणक्षेत्रात तर इंटरनेटचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना हव्या त्या विषयाची अद्ययावत माहिती इंटरनेटवरील वेगवेगळ्या वेबसाइटवरून मिळते. अगदी एखादा आजारी माणूसही त्याच्या आजाराविषयीची माहिती, इलाज अगदी चांगला तज्ज्ञ डॉक्टर यांची निवड इंटरनेटच्या माध्यमातून करू शकतो.



एवढेच नाही तर दररोजच्या बातम्या, वर्तमानपत्रे, हे सर्वच्या सर्व इंटरनेटवर आपल्याला पाहायला मिळते. अगदी अमेरिका किंवा इंग्लंडमधील एखादा भारतीय माणूस किंवा कोणीही व्यक्ती आज भारतात काय चालू आहे याची माहिती तेथे बसून इंटरनेट वरून मिळवू शकतो. खरेच किती मोठी विज्ञानाने केलेली क्रांती आहे ही !
तसेच आपण चक्क इंटरनेटवर खरेदीही करू शकतो.


 इंटरनेटवर वेगवेगळ्या कंपन्या आपले प्रॉडक्ट व त्याची माहिती देणाऱ्या वेबसाइट्स बनवीत असतात. आपण चक्क या वेगवेगळ्या जाहिराती पाहून इंटरनेट वरून ऑनलाइन शॉपिंगही करू शकतो. अशाचप्रकारचा व्यवहार हा अनेक कंपन्यांमध्येही चालतो. त्यालाच 'बिझीनेट ट्रेडिंग' असे म्हटले जाते असे इंटरनेटचे एक नाही तर असंख्य फायदे आहेत. आपण इंटरनेटवरून हवाई तिकीट बुक करू शकतो. 


रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण करू शकतो. इंटरनेट टेलिफोनद्वारा जगात कुणाशीही चक्क लोकल फोनच्या दरात संभाषण करू शकतो. खरोखरच इंटरनेटमुळे जग हे जवळ आल्यासारखे वाटते म्हणूनच इंटरनेट हे मानवाला लाभलेले एक वरदानच आहे. पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात. 


तसेच या बाबतीतही आहे. या इंटरनेटचा वाईट मार्गाने उपयोग करणारी माणसे असतात. ते इंटरनेटवर असलेली महत्त्वाची माहिती काढून टाकणे व तिथे नको ते लिहिणे, दुसऱ्याचा पासवर्ड मिळवून त्याच्या व्यक्तिगत माहितीत डोकावणे किंवा इंटरनेटवरून व्हायरस (विषाणू) सोडून जगभराचे व्यवहार ठप्प करणे यांसारखे गुन्हे करतात. त्यांना इंटरनेटच्या भाषेत 'सायबर गुन्हे' असे म्हणतात व त्यासाठी त्यांना शिक्षाही होऊ शकते आणि असे अनेक गुन्हे सायबर विश्वात घडले आहेत.


काहीजण इंटरनेटच्या ई-मेल (E-mail) या माध्यमातून एखाद्याला धमकावतात तर काही जण चक्क इंटरनेटवरून मुलींची छेड काढतात. त्यांना अश्लील छायाचित्रे पाठवतात. अश्लील ई-मेल (E-mail) करतात. खरंच या तर माणुसकीलाही काळिमा फासणाऱ्या घटना आहेत की एवढ्या उपयोगी माध्यमाचा काहीजण अशा अनैतिक मार्गाने वापर करतात व स्वतःहून


या गोष्टीला शापाचे स्वरूप देतात. काहीजण इंटरनेटमधून मुलींना फसवण्याच्याही घटना अलीकडच्या काळात उप येत आहेत. पण खरोखरच मी तर म्हणेन अशी काही विघ्नसंतोषी माणसे सोडली तर इंटरनेट हे मानवाला मिळालेले बहु वरदानच आहे. कारण कोणतीही गोष्ट ही चांगली किंवा वाईट नसते. आपणच तिला चांगल्या किंवा वाईटचा दजा दत असतो. हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे की आपण इंटरनेटचा वापर आपल्या देशाच्या प्रगतीसाठी करायचा का अधोगतीसाठी करायचा म्हणूनच मी एकदा नाही तर त्रिवार म्हणेन की इंटरनेट हे मानवाला लाभलेले वरदानच आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

internet essay in marathi | इंटरनेट मराठी निबंध

maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे आजोबा मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. आजोबा या शब्‍दाबरोबर आठवण येतात, ते आपल्‍यावर प्रेम करणारे व आपले सर्व लाड व  हट्ट पुरवणारे आपले आजोबा. लहानपणीचे ते आनंदीदायी क्षण आजही आनंद देऊन जातात, अश्‍याच एका प्रसंगाचे वर्णन निबंधात केले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

आज आमच्याकडे एक छोटासा घरगुती समारंभ झाला. माझे सर्व काका, आत्या, कुटुंबातील लहानथोर सर्व मंडळी एकत्र जमली होती. आम्ही आमच्या आजोबांचा ऐंशीवा वाढदिवस साजरा केला. गेले सात-आठ दिवस आमची अगदी गुप्त तयारी चालली होती. आम्हांला आजोबांना काही कळू दयायचे नव्हते.

maze-ajoba-marathi-nibandh
maze-ajoba-marathi-nibandh

 पण शेवटी आजोबांनीच आम्हांला धक्का दिला. जेवण झाल्यावर त्यांनी सर्वांसाठी उत्कृष्ट आंबा आइस्क्रीम मागवले होते आणि समारंभाला उपस्थित असलेल्या प्रत्येकाला त्यांनी एकेक भेटवस्तु दिली आणि ती भेटवस्तू देताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीचे वैशिष्ट्य, तिचे छंद, तिच्या आवडी लक्षात घेतल्या होत्या. त्यामुळे खूपच मजा आली.
 
माझे आजोबा सदा प्रसन्न आणि तृप्त असतात. आजोबांच्या या आनंदी, आशावादी वृत्तीमागे आहे त्यांची तंदुरुस्ती ! त्यांचे वागणे अतिशय नियमबद्ध  आहे. काहीही झाले तरी त्यांचे पहाटे फिरायला जाणे कधी चुकत नाही. त्यांनी एक 'पेन्शनरांचा क्लब' स्थापन केला आहे. ही वृद्ध मंडळी एकमेकांचे वाढदिवस साजरे करतात, सहलीला जातात. अशा प्रसंगी आजोबा आपल्या दोस्तांसाठी आजीला कुरकुरीत चकल्या करायला सांगतात.

आजोबांना आमच्या आजीविषयी विशेष अभिमान आहे. आजोबा सरकारी कचेरीत मोठ्या हुद्द्यावर होते आणि तेथे अगदी उच्च पदावरून ते सन्मानाने निवृत्त झाले. त्याचे श्रेयही ते आमच्या आजीला देतात; कारण त्यांच्या मते, घराच्या आघाडीवर त्यांना कधीही लक्ष घालावे लागले नाही. आमच्या आजीमुळेच आपले घर 'आदर्श' राहिले, असे ते मानतात.  

आजही आजोबा घरात असूनही सर्वांपासून अलिप्त राहतात. कुणाच्याही कुठल्याही निर्णयात ते ढवळाढवळ करत नाहीत. पण आम्ही एखादी शंका विचारली, तर ते त्याचे खुलासेवार निरसन करतात. उत्तम आरोग्य, स्वच्छ विचारसरणी आणि सतत उदयोगात रमलेले आजोबा अगदी ऐंशीव्या वर्षीही तेज:पुंज वाटतात. आपल्या वार्धक्यातही त्यांनी आपल्या 'युवा' मनाला जपले आहे, म्हणून ते सदा आनंदी राहू शकतात. 'कर्ते व्हा. कार्यरत राहा' हा त्यांचा आम्हांला सदैव उपदेश असतो.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व  तुमच्‍या आजोंबासोबत असलेल्‍या गमतीदार आठवणी तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद.  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

महत्‍वाचे मुद्दे : 

(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. ) 

  • व्यक्तिमत्त्व वर्णन
  • वय, पोशाख, काही सवयी
  • स्वभाव- एखादा प्रसंग
  • घरात असून अलिप्त
  • परंतु घरातील एक 
  • वय मोठे; पण मन तरुण 
  • कर्तबगारी
  • कर्तव्यदक्ष 
  • शिकवण

टीप : वरील निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • My (majhe) Grandfather Essay in Marathi language


 निबंध 2 

maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध


आज मी दोन दिवसांची रजा घेऊन आजोबांना भेटायला आलो आहे. बसमधून उतरल्याबरोबर माझी पावले फारच जलद पडू लागली आहेत. डोळे कौलारू घराचे छप्पर शोधताहेत. गेली पंधरा वर्षे असाच धावत धावत मी माझ्या आजोळी येत आहे.

कधी 'मे' महिन्याची सुटी लागते व कधी कोकणात जातो, असे मला व्हायचे. मुंबईहन कोकणात मला न्यायला पूर्वी आजोबाच यायचे. पुढे मोठी झाल्यावर आम्ही नातवंडे एकटी यायला लागलो. पण कोकणात आल्यावर बसमधून उतरताक्षणीच आजोबांचे शद्र कानावर पडायचे, आलात बाळांनो, या.' या वात्सल्यपूर्ण शब्दांनी आमचं स्वागत व्हायचं व प्रवासाचा सर्व शीण जायचा!


आमचं कोकणातील घर नारळी पोफळींच्या गर्द छायेत झाकून गेलं होतं. परंतु आजोबांचा सहवास जास्त शीतल वाटायचा. आजोबांना कधीच रागावलेलं मी पाहिलं नाही. एखादी मनाविरुद्ध गोष्ट झाल्यास ते फक्त 'गोविंद! गोविंद!' म्हणायचे.


नातवंडांशी बोलताना, गोठ्यातल्या जनावरांशी बोलताना किंवा शेतातील गड्यांशी बोलताना त्यांचा स्वर नेहमीच शांत व प्रेमळ असायचा. आजोबा कधीच रिकामे बसायचे नाहीत. त्यांचा निम्मा वेळ शेतात व गोठ्यातच जायचा. शेतात ते गड्यांच्या बरोबरीनं काम करायचे. 


गोठा तर इतका स्वच्छ ठेवत की, घरातच जनावरं बांधलीत की काय असे वाटावे! संध्याकाळी घरात आल्यावरही हातानं बारीक-सारीक काम चालूच. त्यांना कोठे एवढासाही केर पडलेला खपत नसे. वर्तमानपत्रं, पुस्तकं, औषधे कशी व्यवस्थित लावून ठेवलेली. त्यांच्या सर्व वस्तू जिथल्या तिथे; अंधारातही अचूक सापडणाऱ्या!


संध्याकाळी त्यांच्या मुखातून देवाची स्तोत्रं एकामागून एक बाहेर पडत असत. आम्हा नातवंडांनाही स्तोत्र शिकवणं हे त्यांचं आवडतं काम. ते आम्हाला गोष्टीही सांगायचे. पण अभ्यास शिकवणं, श्लोक शिकवणं त्यांना जास्त आवडायचं. 

आजही जुन्या कवितांचं, स्तोत्रांचं, श्लोकांचं धन माझ्याजवळ आहे ते आजोबांच्यामुळेच. आजीचे व त्यांचे नेहमी भांडण व्हायचे कारण त्यांच्या स्वभावातला दोष म्हणजे दातृत्वाचा अतिरेक. गड्यांना आंबे, सुपाऱ्या, नारळ न मागता मुक्तहस्ताने ते देत. 


आला गेला पै-पाहुणा पिशव्या भरभरून माल घेऊन जाई. एखादा मित्र बरोबर घेतल्याशिवाय ते कधी जेवलेच नाहीत. त्यामुळे ते सदैव समाधानी असत. जेवण तरी काय? साधा आमटी-भात असला तरी चालेल पण तो रुचकर असला पाहिजे. पाट-पाणी, वाढप सर्वच त्यांना व्यवस्थित लागायचं. 

पण परवा शेतातून परत येताना बांधावरून पाय घसरून ते पडले. पाय दुखावला. त्यांना वाटलं, आपली अखेरच जवळ आली. त्यामुळे कोणताही उपाय न करता त्यांनी शेवटचं भेटायला बोलावलं, म्हणून मी धावत-पळत आलो आहे. आजोबांना मुंबईला नेऊन मला बरं करायचं आहे. आजोबांचा प्रेमळ सहवास मला अजून हवा आहे; अजून हवा आहे ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद



maze ajoba marathi nibandh | माझे आजोबा मराठी निबंध

मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | mi chandravar gelo tar essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध  बघणार आहोत. या निबंधामध्ये चंद्रावर गेल्यावर काय करता येईल व मानव चंद्रावर जाऊन कोणती स्वप्न पूर्ण करू इच्छितो याचे वर्णन केले आहे  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

चंद्राचे मानवी मनाला विलक्षण आकर्षण आहे. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीही 'चंद्र हवा' म्हणून कौसल्यामातेकडे हट्ट धरला आणि मग आरशातून चंद्राचे प्रतिबिंब दिसताच तो छोटा राजकुमार हर्षभरित झाला, अशी कथा आहे. चंद्राविषयीच्या मानवाच्या या आकर्षणाची परिणती म्हणजे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांतून मानवाने चंद्रावर केलेले पदार्पण होय.
mi-chandravar-gelo-tar-essay-in-marathi
mi-chandravar-gelo-tar-essay-in-marathi


नील आर्मस्ट्राँग या अमेरिकन अवकाशयात्रीने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. मानवाचे चंद्रावरील चिमुकले पाऊल म्हणजे त्याची विज्ञानाच्या आधारे अवकाशातील प्रचंड झेप होती. या यशस्वी चांद्रमोहिमेनंतर चंद्रावर जाण्याची, तेथे सहली काढण्याची, तेथे कायमची वस्ती करण्याची स्वप्ने माणूस पाहू लागला. माझ्या मनात आले - अशाच एका मोहिमेतून मला चंद्रावर जायला मिळाले तर ! 

...तसे झाले तर ! फार दिवसांचे उराशी बाळगलेले माझे स्वप्न साकार होईल. चंद्रावर चालताना टुणटुण उड्या मारत जाण्याचा आनंद मला लुटता येईल. पृथ्वीवरून चंद्राच्या पृष्ठभागावर दिसणारा 'ससा' धुंडाळण्याचा मी प्रयत्न करीन. चंद्रावरून माझी पृथ्वीमाता कशी दिसते. ते मी पाहीन.

चंद्रावरून पृथ्वीवरील माणसांशी संपर्क साधणारी संदेशवाहिनी असणारच ! त्या वाहिनीवरून मी चंद्रावरील सृष्टीचे, सभोवारच्या अथांग विश्वाचे, तेथून दिसणाऱ्या माझ्या पृथ्वीमातेचे धावते समालोचन माझ्या घरच्या माणसांना ऐकवीन. तेथेच कायमचे वास्तव्य करणे जमले तर तेथे एक भारतीय उपाहारगृह सुरू करीन. त्या उपाहारगृहात अस्सल मराठी पदार्थ मिळू शकतील. मोदक, थालीपीठ यांसारखे पदार्थ तसेच सोलकढी, मधुकोकम यांसारखी पेये मिळू शकतील. 

चंद्रावरील तरुण जोडपी कदाचित 'मधुचंद्रा'ऐवजी 'मधुवसुंधरा 'साठी पृथ्वीवर येण्यास आतुर होतील. अशा वेळी शक्य झाले  तर त्यांना पृथ्वीवरील प्रवासाची सोयही मी करीन. पण हे सारे केव्हा?- जर मला चंद्रावर जायला मिळाले तर !!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व  चंद्रावर जाण्यास तुम्हाला संधी मिळाल्यास तुम्ही काय करू इच्छिता ते  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद.

महत्‍वाचे मुद्दे : 
(तळटीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )
  • चंद्राचे आकर्षण
  • प्रभू रामाला चंद्र हवा
  • वैज्ञानिकांचे अथक प्रयत्न
  • चंद्रमोहिमेत सहभागी व्हावे
  • चंद्रावरचा ससा
  • चंद्रावरून पृथ्वी कशी दिसेल
  • संदेशवाहिनी
  • उपाहारगृह 
  • पृथ्वी, चंद्र ये-जा उत्सुकता.

मी चंद्रावर गेलो तर मराठी निबंध | mi chandravar gelo tar essay in marathi