रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी | Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण रेल्वे स्थानकावरील एक तास मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्‍ये  रेल्‍वे प्लॅटफॉर्मवर सामान्‍यपणे घडणाऱ्या  गोष्‍टीचे वर्णन केले आहे.पण सामान्‍य असुनही जिवनाच्‍या विविध पैलुला स्‍पर्श करण्‍याचा प्रयत्‍न यातुन केला  आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

Railway-Station-Varil-Ek-Taas-Marathi-Nibandh
Railway-Station-Varil-Ek-Taas-Marathi-Nibandh



" दुपारी चार वाजता पोचत आहे " ताईने मोबाईलवर सांगीतले म्हणून स्टेशनवर गेलो. प्लॅटफॉर्म तिकीट घ्यायला दुसऱ्या  वर्गाच्या खिडकीवर ही गर्दी. पहिल्या वर्गावर मात्र २-३ च होते. समाजाच्या वर्गवारीचं सम्यक् दर्शन झालं. तिकीट घेऊन फलाटावर पाय ठेवला तो “ मुंबईसे आनेवाली १३७ डाऊन एक्सप्रेस एक घंटा देरीसे आयेगी..." ध्वनिवर्धकानं सांगितलं. झालं ! तासभर थांबणंच आलं. वेळ काढायला उगाच भटकत बसलो. 


प्लॅटफॉर्म माणसांनी नुसता फुलला होता. गरीब, मध्यम, श्रीमंत सर्व थरांतील लोक होते. त्यांचे कपडेच बोलत होते. रंगहीन, रंगीबेरंगी, मळकट, जीर्ण, लाजेपुरते तसे झकपक सूटबूट टायही होते. लंकेची पार्वती तशी सालंकृत रमाही ! सप्तरंगी तारुण्य सळसळत होतं तसं वार्धक्याच्या जाळ्यात सापडलेले चेहरेही. लहान निरागस बालकं तसे उगाच केसावरून कंगवा फिरवणारे सख्याहरिही ! माणसांचं म्युझियमच. एवढी माणसं...कशाला प्रवास करत असतील?...मामाच्या गावाला तर कुणी कामाला. नविन  सासुरवाशीण तर कुणी माहेरवाशीण, नोकरीच्या शोधात, कुणी औषधपाण्याला कुणी हवापाण्याला. एकाच्या डोळ्यात पाणी दुसऱ्याच्या ओठी गाणी . 


गर्दीतून चटपटीतपणे " चाय गरमऽ” “ए, वडा, वडा" म्हणत फिरणारे फेरीवाले. हातात, डोक्यावर, खांद्यावर सामान वाहणारे हमाल, 'रस्ता छोडो' म्हणत नसलेल्या जागेतून वाट काढणारे अन् पळत्या गाडीत चढून जागा धरणारे. पांढरी पैंट, निळा ब्लेझरचा कोट, टायवाले टी. सी. हे सारे सराईत आहेत हे न सांगता कळत होतं.


गाडीला अवकाश होता म्हणून काहीजण उपाहारगृहापाशी चहानाष्‍टा करत होते तर पेपर स्टॉलवर  वाचक रेंगाळत होते. कुणी उगीच भिंतीवरचं रेल्वेटाईमटेबल माना वाकडी करून वाचत होते. कुणी वजन काट्यावर 'वजन' करायचा प्रयत्न करीत होते- ' मशीन बंद आहे-' हे न वाचताच ! प्रतीक्षागृहात उच्चभ्रू लोक टाय सावरत India Today वाचत होते. खरं तर ते नुसते बाहेर आले असते तरी India Today ' दिसला असता.


कुठली तरी गाडी शिटी मारत धडाडत येत होती. एक इंजिन कर्कश्य शिटी मारत शंटिंग करत भाव खात होतं. भिंतींवर सिनेमाची भयानक पोस्टर्स होती.  ध्वनिवर्धक तीन भाषांतून गाड्यांची माहिती देत होते. पोर्टर उभ्या गाड्यांची चाकं तपासत होते. घड्याळ बंद होते. गाडीची बेल कधीमधी वाजत होती.  मनात विचार आला, अठरा पगड जातींना पोटात सामावणारी आगगाडी, ही राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीकच आहे. खरं तर जीवन हेही या प्लॅटफॉर्मसारखंच आहे. माणसं येतात कुठून, जातात कुठे काहीच माहीत नसतं. योग्य गाडी मिळेपर्यंत थांबतात ती या प्लॅटफॉर्मवर...आणि हा थांबण्याचा थोडा काळ म्हणजेच जीवन !


आपली वेळ झाली, गाडी मिळाली की झटकन् निघून जातो प्रत्येक जण !! “मुंबईसे आनेवाली १३७ डाऊन प्लॅटफॉर्म नंबर दो पर आ रही है" म्हणत असताच आरडत ओरडत, दिमाखात स्टेशनमध्ये घुसणाऱ्या गाडीकडे सारे धावले. त्यामध्येच नकळत सामावला जाऊन मी ताईला शोधू लागलो. 


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व रेल्वे स्थानकावर तुम्‍हाला आलेला अनुभव तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका 


निबंध 2 

 रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी | Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh


रेल्वे स्टेशन ही खूप व्यस्त आणि उत्तेजित करणारी जागा आहे. तिथे नेहमी गाड्या येत जात राहतात. तो एक छोटासा संसार असतो. ज्यात सर्व प्रकारचे स्त्री-पुरुष मुले सतत दिसत असतात. मला अनेकदा रेल्वे प्रवासाची संधी मिळाली आहे. परंतु जेव्हा मी माझ्या काकांना घेण्यास लखनौ स्टेशनवर गेलो तेव्हा मला रेल्वे प्लॅटफॉर्मचा खरा अनुभव आला. 


काका दिल्लीहून येत होते. मी गाडी येण्यापूर्वी २०-२५ मिनिटे आधीच गेलो. प्लॅटफॉर्म तिकिट घेतले आणि स्टेशनात गेलो. गाडी अर्धा तास उशिरा येणार होती. मला वाटले एक तास वाट पाहणे फारच कंटाळवाणे होईल. वेळ कसा जाईल मी काय करू?


पण एक तास १० मिनिटासारखा गेला. अजिबात कंटाळा आला नाही. प्रथमच मला असे वाटले की वेळेलाही पंख असतात. तिथे मी जे जे पाहिले, जो अनुभव आला ते सर्व माझ्यासाठी रोमांचक व अविस्मरणीय ठरेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. कधी मी बेंचवर बसत होतो तर कधी प्लॅटफॉर्मवर इकडे तिकडे फिरत होतो. गरम चहा पीत होतो.


प्लॅटफॉर्मवर प्रवासी, हमाल, फेरीवाले रेल्वेचे गार्ड तिकिट कलेक्टर, मेकॅनिक्स, भिकारी इत्यादी ची खूप गर्दी होती. हा एक अद्भुत मेळा होता. सगळेच जण घाईत होते. आपापाल्या कामात व्यस्त होते. पण मी मात्र मजेने या सर्वाचा आनंद लुटत होतो. 


प्रेक्षक म्हणून, प्लॅटफॉर्मवर तीळ ठेवायलाही जागा नव्हती. ठिकठिकाणी बॅगा, सुटकेस, बेडिंग, टोपले, पाकिटे, खेळणी, पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. काही लहान मुले आपली खेळणी व फुग्यांशी खेळत होती. एक मुलगा मिठाईसाठी हट्ट करीत होता तर दुसरा छोटा मुलगा कशासाठी तरी आपल्या आईच्या मांडीवर बसून रडत होता.


जेव्हा प्लॅटफॉर्मवर एखादी गाडी यायची तेव्हा लोकांची गर्दी तिच्यावर झडप घालायची. धक्का बुक्की करीत एकमेकांना ढकलीत सगळ्यात आधी घुसण्याचा प्रयत्न लोक करीत होते. हमाल चालत्या गाडीत चढून प्रवाशांना चढविण्यात गढले होते. बायका, म्हातारी माणसे आणि मुले यांना गाडीत चढणे मुश्किल झाले होते.


कुठे रेल्वेचा गार्ड हिरवा झेंडा दाखवून तर गाडीचा ड्रायव्हर शिट्टी वाजवून गाडी सुरू झाल्याचा इशारा प्रवाशांना करीत होता. एखादा टी.सी. तिकिट न घेतलेल्या प्रवाशांना पकडून नेत होता. फारच अजब आणि रोमांचक वातावरण होते. 


इंजिन आणि गाड्यांच्या येण्या जाण्याचा जोराने सारखा आवाज येत होता. फेरीवाले ओरडून आपल्या वस्तू विकत होते. कुणी हमाल जास्त हमाली मिळावी म्हणून भांडत होता. कुणी प्रवासी खराब चहा दिल्याबद्दल चहावाल्याशी भांडत होता. कुणी वर्तमानपत्रे, मासिके वाचत बसले होते, कुणी पान चघळत होते. कुणी तिथेच जमिनीवर पथारी पसरून आराम करीत होते. सफाई


कामगार घाण साफ करीत होते. नळावर पाण्यासाठी खूप गर्दी झाली होती. जणू काही दुधाचेच मोफत वाटप होत होते. निरनिराळे रंगीबेरंगी कपडे घातलेले वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक पाहून देशाच्या विशालतेची, विविधतेची, त्यातून प्रतित होणाऱ्या ऐक्याची सहजच ओळख होत होती.


मी प्रवाशांच्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहत होतो. त्यांचे मनोभाव समजून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यांच्या हावभावांचे निरीक्षण करीत होतो. हे सर्व करण्यात मला आनंद वाटत होता. वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे, त्यावरील हावभाव, अभिव्यक्ती सारे काही खरोखरच आकर्षक, मनोहर व ज्ञान वाढविणारे होते.


गाड्या जात येत होत्या. लोक एकमेकांशी हस्तांदोलन करून निरोप घेत होते. कुणी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करीत होते. कुणी माझ्याप्रमाणेच कुणाची तरी वाट पाहत उभे होते. तिथे एक लग्नाचे व हाड गाडीची वाट पाहत होते


नवरा मुलगा खेड्याचा होता आणि त्याने नवरदेवासाठी असलेला पारंपरिक पोषाख घातला होता. आणि त्यामुळे तो फार आकर्षक वाटत होता. पण पान खाऊन तो इकडे तिकडे धुंकत होता ते पाहून मला खूप किळस आली. इतक्यात एका पोलिसाने एका खिसेकापूला रंगेहात पकडले आणि तो त्याला मारू लागला. 


त्यांच्याभोवती गर्दी जमा झाली. चोराची पिटाई होत असलेली पाहून बरेच लोक खुश झाले आणि चोराबद्दल तहेत हेच्या गोष्टी करू लागले. शेवटी त्याला दोरीने बांधून तुरुंगात नेले.


त्याच वेळी मला समजले की माझ्या काकाची गाडी प्लॅटफॉर्मवर येत आहे. मी सावध झालो. गाडी धडधडत येऊन प्लॅटफॉर्मवर थांबली. काका वातानुकूलित कुपेने येत होते म्हणून मला त्यांना शोधावे लागले नाही. मी धावतच त्यांच्याजवळ गेलो व त्यांना नमस्कार केला. मला पाहून त्यांना खूप आनंद झाला. 


त्यांनी मला जवळ घेतले व आशीर्वाद दिला. सामान जास्त नव्हते. फक्त एक सुटकेस होती. काकांनी ती हमालाजवळ दिली आम्ही लगेच स्टेशनच्या बाहेर आलो. एक टॅक्सी केली आणि अर्ध्या तासात घरी पोहोचलो. त्यादिवशी प्लॅटफॉर्मवर घालविलेला एक तास माझ्यासाठी एक आठवण आणि अनुभव बनला. तो मी कधीही विसरू शकणार नाही. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . 


रेल्वे स्थानकावरील एक तास निबंध मराठी | Railway Station Varil Ek Taas Marathi Nibandh

padkya killyache atmavrutta marathi nibandh | पडक्या किल्ल्याचे आत्मवृत्त मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पडक्या किल्ल्याचे आत्मवृत्त / मनोगत मराठी निबंध बघणार आहोत.या निबंधामध्‍ये एके काळी शत्रुंशी झुंज देवुन विजयत्री खेचुन आणणारा तो गड त्‍यांची झालेली दुरावस्‍था तो मनोगत म्‍हणुन तेथे आलेल्‍या वाटेकरूंना सांगत आहे. याविषयी सवीस्‍तर लेखन बघणार आहोत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


बाळांनो, तुम्ही आज सहज सहल म्हणून इथे आलात तरी मला कित्ती आनंद झालाय म्हणून सांगू ! पण, काय देऊन मी तुमचं स्वागत करू ? काय दाखवू?



" अवघे झाले जीर्ण शीर्ण अन् सुन्न झाल्या दिशा खूप सोसले आता झाली मूक माझी भाषा......" हे माझे ढासळलेले बुरूज, ह्या पडक्या भिंती, जमीनदोस्त झालेले महाल आणि कोठया. हे पाहून तुम्हाला 'मी' समजणारच नाही रे !

३५० वर्षे तरी झाली असतील माझ्या वयाला ! मोगल साम्राज्य हिंदु राष्ट्रावर आक्रमण करायला शिवशिवत असतानाच तेजस्वी सूर्य श्रीशिवाजी महाराजांनी गणाजी बंडोला आज्ञा केली माझ्या उभारणीची ! साताऱ्याच्या पूर्वेकडून शत्रूच्या फौजा रोखण्यासाठी ह्या डोंगरावर माझी नेमणूक झाली. महाराजांचा शब्द ! तो झेलला गणाजी बंडो आणि बंदेअलीनं. जिवाचं रान करून चार महिन्यांत मला बाळसं आणलं.


बंदेअलीनं माझी अंतर्गत रचना केली. पूर्वेला नगारखाना, आत मध्यभागी खलबतखाना, बाजूला दरबार मंडपी, कोपऱ्यात मुदपाकखाना, उत्तर-दक्षिणेला टेहळणी बुरूज, जनानी, मर्दानी महाल, अश्वपागा, मावळ्यांसाठी छोटी घरं, पाण्याचं तळं अन् सहज न दिसणारं दारूगोळ्याचं कोठार ! उभारणीचा इतिवृत्तान्त सादर होताच महाराज प्रसन्न झाले. गणाजी बंडो आणि बंदेअलीला सोन्याची भेट महाराजांनी दिली...! आदिलशहा नित्य कुरापती काढतच होता.

padkya-killyache-atmavrutta-marathi-nibandh
padkya-killyache-atmavrutta-marathi-nibandh




म्हसवडवरून त्याच्या फौजांचा तळ उठला अन् सूर्यास्ताला गडाच्‍या क्षेत्रात आला. ५०० ची कुमक माझ्या पोटात होती. दत्ताजी सुभेदार, माझा किलेदार, यानं इशारा केला आणि माझ्या बुरुजावरून प्रथमच तोफांचे गोळे शत्रुसैन्यावर आग ओतू लागले. पहिल्यावहिल्या लढाईनं माझ्या अंगात थरार भरला... वीरश्रीचा ! या अचानक हल्यानं शत्रुची पळापळ झालेली मी नेत्रांनी पाहिली. पश्चिमेकडे निघालेले ते वाघ शेळी होऊन पूर्वेला पसार झाले. माझं काम मी चोख बजावलं !...आणि मग किती लढाया, किती संग्राम केले, गणतीच नाही.



ती वीरश्री, तो 'हर हर महादेव 'चा घोष... ' दीन दीन' करत झालेली शत्रची दीनवाणी अवस्था...कधी मलाही जखमा झाल्या, पण एका प्रसंगानं साऱ्या भरून निघाल्या...घडलं ते असं... कर्नाटक विजय मिळवून महाराज परतत होते. गोंदावल्यापाशी अंधारून आले. सैन्य थकलेले, महाराज माझ्यापाशी मुक्कामाला आले. त्यांचा पदस्पर्श झाला...आणि अंगावर रोमांच आला...मनाच्या गाभाऱ्यात शेकडो घंटा निनादल्या.



उभ्या आयुष्यात महाराज एकच रात्र माझ्यापाशी होते. पण कित्येक शतके पुरेल असं चैतन्य मला देऊन गेले. म्हणूनच आजवर मी आहे. जखमाही भरल्या. अल्प मुक्कामातही महाराजांनी मारुती मंदिर स्थापण्याची सूचना दत्ताजीला केली. मावळतीला ते आजही आहे. तो काळ गेला...महाराज गेले....मराठे, पेशवे बुडाले...जग पुढे धावले. माणसाने आकाश हाती घेतले...आणि...आणि माझी गरजच संपली. डोक्यावरून हल्ले झाले तिथे मी कसा लढणार ? मी दुर्लक्षिला गेलो. जवळची माणसे निघून गेली...सुसाट वारा, ऊन, पाऊस खात एकाकी मी ढासळू लागलो. मनानं तर मी महाराज गेले तेव्हाच खचलो, आता शरीरानेही...


आता कोणी तुमच्यासारखे येतात तेव्हा मनावरची धूळ उडते. तुम्हीही थोडे भूतकाळात जाता. 'अरेरे!... जतन केलं पाहिजे' म्हणता...निघून जाऊन कामात गुंतता. माझ्या आवारामध्ये मात्र सुसाट वारा घोंघावत राहतो आणि रातकिडे किरकिरत राहतात...

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व जिर्ण झालेल्‍या गडकिल्यांचे वैभव पुन्‍हा प्राप्‍त करण्‍यासाठी काय केले पाहीजे हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद.

padkya killyache atmavrutta marathi nibandh | पडक्या किल्ल्याचे आत्मवृत्त मराठी निबंध

Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi | वाचन एक उत्तम छंद

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  वाचन  एक उत्तम छंद मराठी निबंध बघणार आहोत.आज आपण वाचन एक उत्तम छंदशीर्षक असलेले दोन निबंध बघणार आहोत प्रत्‍येकाला कोणतातरी छंद असतोच आणि यांच छंदामुळे आपण उत्‍साहाने भरून जात असतो व त्‍याच बरोबर त्‍यामुळे आपण आनंद, मनोरंजन , ज्ञान पण मिळवु शकतो. आज आपण वाचन या छंदाविषयी माहीती या निबंधात बघणार आहोत चला  तर मग सुरूवात करूया निबंधाला.


मुद्दे :

  • उत्तम छंद 
  • भरपूर वाचन असलेला माणूस संकुचित विचार विसरतो
  • वाचनामुळे अन्य देशांची, अन्य लोकांची, इतर धर्मांची माहिती मिळते
  • आपल्यातील उणिवा कळतात
  • आनंद मिळतो 
  • इतिहासातील माहिती मिळते 
  • कुठेही वाचन करता येते 
  • वृद्ध, लहान मुले यांना तर खूपच मदत.


असा धरी छंद, जाई तुटोनिया भावबंध।


मोठमोठे लोक सांगतात की, असा छंद धरा की, ज्यामुळे संकुचित विचार झटकून टाकाल.वाचन या छंदामुळे बहुश्रुतपणा येतो. वाचनामुळे आपल्याला आपल्या देशाची व जगाची माहिती मिळते. अन्य देशांतील लोक कसे राहतात, त्यांचा पोशाख कोणता आहे, हे आपल्याला समजते. इतर धर्मांतील लोकांची माहिती मिळते. या सर्व माहितीमुळे आपल्याला आपल्या उणिवा कळतात. आपल्याला आपल्या जीवनात सुधारणा करता येते.




आपल्याला कथा-कादंबऱ्या वाचल्यावर आनंद मिळतो. अनेक लोकांचे अनुभव समजतात. काही पुस्तकांमध्ये पूर्वीच्या काळाची माहिती असते. त्यामुळे पूर्वीच्या काळी पृथ्वीवर काय काय घडले, याची माहिती मिळते. आतापर्यंत माणसाने किती प्रगती केली हे कळते.


आपण वाचन केव्हाही, कुठेही करू शकतो. रेल्वेच्या डब्यात खूप गर्दी असते, तेथे खूप गोंगाट असतो, तरी काही माणसे शांतपणे वाचत असतात. वृद्ध माणसांना वेळ कसा घालवावा, ही चिंता असते. त्यांना वाचनाची मदत होऊ शकते. लहान मुलांना गोष्टींच्या पुस्तकांतून खूप आनंद मिळतो. खरोखर, सर्वांना उपयोगी पडणारा वाचन हा छंद सर्वोत्कृष्ट छंद आहे.


मित्रांनो तुम्‍हाला वाचन एक उत्तम छंद हा निबंध कसा वाटला व तुमचा आवडता छंद कोणता आहे हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



Vachan-Ek-Uttam-Chand-Essay-Marathi
Vachan-Ek-Uttam-Chand-Essay-Marathi

निबंध 2

Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi | वाचन एक उत्तम छंद


 नुकतेच माझ्या वाचनात आले...डॉ. भीमराव आंबेडकर यांनी आपल्या एका भाषणात मागासलेल्या बांधवांना कळवळून सांगितले होते - “वाचाल तर वाचाल !" ऐकायला आणि वाचायलाही जरा विचित्र वाक्य वाटते हे, पण ते अर्थपूर्ण आहे हे विचारांती पटते.



'वाचाल' म्हणजे वाचन कराल, 'तर वाचाल' म्हणजेच टिकाल ! 'वाचाल तर वाचाल' याचा अर्थ वाचन कराल तर टिकून राहाल ! चांगले जीवन जगाल इंग्रजीत म्हण आहे - Survival of the Fittest. जे देशकाल परिस्थितीला अनुसरून अगदी योग्य असेल ते टिकते.



इतर प्राणिमात्र आणि माणूस यात मुख्य फरक हाच आहे की माणूस विचार करू शकतो. तो बोलतो, वाचतो, लिहितो. विचार करण्याची ही शक्ती वाचनातून अधिक विकसित होते. डॉ. आंबेडकरांनी हा विचार ज्या समाजासमोर मांडला त्यापैकी ९९% लोक निरक्षर होते. त्यांना लिहिता, वाचता येत नव्हते.



पुस्तके किंवा वर्तमानपत्रे सोडा साधे पत्रदेखील त्यांना दुसऱ्याकडून वाचून घ्यायला लागे आणि उत्तरसुद्धा दुसरा लिहिणार तेव्हा लिहिले जायचे ! वाचता येईना ! हिशेब समजेना ! काय विचारांवी त्यांची दैना ? सरकार व सावकार दोघेही त्यांना फसवत, लुबाडत असत. म्हणूनच त्यानी वाचायला शिकले पाहिजे (लिहायला व हिशेब करायला शिकले पाहिजे) असे डॉ. आंबेडकर म्हणत.



गेल्या चाळीस पन्नास वर्षात ह्या समाजात खूपच सुधारणा झाली आहे. बरेच लोक केवळ साक्षर नव्हे तर सुशिक्षित झाले आहेत. आपल्या व्यथा वेदना ते बोलून दाखविताहेत. दया पवार यांचे 'बलुतं', लक्ष्मण माने यांचे 'उपरा', शरणकुमार लिंबाळे यांचे 'अक्करमाशी' अशा कित्येक आत्मकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. मागासलेल्या समाजातून अशी आशेची प्रकाशकिरणे फाकत आहेत.



पण केवळ एका विशिष्ट समाजापुरताच हा संदेश आहे का ? तसेच वाचाल म्हणजे केवळ वाचायला शिकाल, साक्षर व्हाल तर वाचाल एवढेच का डॉक्टरांना सांगायचे असावे ? 'वाचाल' याचा अर्थ इतका मर्यादित असेल का ? तसे नक्कीच नाही. वाचाल म्हणजे काय वाचाल ? दुसरी चौथीची पुस्तके ? वर्तमानपत्रे ? दरमहा प्रसिद्ध होणारी मासिके ? रस्त्यावर दिसणाऱ्या लहान मोठ्या जाहिराती ?



निरक्षराने साक्षर होणे आणि साक्षराने सुशिक्षित बनणे, हे जसे क्रमप्राप्त ठरते, तसे वाचता येऊ लागल्यावर वर वाचनात सहजता, सफाई येणे आवश्यक आहे. मोठ्या आवाजात आवश्यक तेथे योग्य तो चढउतार करून वाचता येणे, आवाज न करता मनात वाचता येणे हे जमले पाहिजे.



त्याचप्रमाणे पुढे पुढे वाचनात निवड हवी. रोज कोणते तरी एक पुस्तक वाचून ज्ञान वाढत नाही व मन समृद्ध होत नाही. मनोरंजनासाठी कथाकादंबऱ्यासारखे हलके फुलके साहित्य वाचणे आवश्यक तसे विचार प्रवर्तक निबंध, माहितीपूर्ण लेखन, उत्तमोत्तम प्रवास वर्णन, थोरा मोठ्यांची चरित्रे किंवा आत्मचरित्रे यांचेही वेचक वाचन हवे.


नुसते भराभर व भाराभर वाचन करणारा माणूस म्हणजे टनावारी ओझी वाहणारा हमालच ! त्याच्या डोक्यावरून तो जे नेतो त्यातले त्याच्या डोक्यात काय उतरते? म्हणूनच वाचनाला शिस्त हवी, वळण हवे, वाचलेले नीट पचले पाहिजे, आकलन झाले पाहिजे. त्यातूनच बौद्धिक समंजसपणा येतो. It is not what you eat but what you digest, that makes you strong; it is not what you read but what you understand, that makes you learned.



त्याचप्रमाणे वाचन चौफेर हवे. आपल्या आवडत्या एकाच विषयाचे वाचन नको. विविध विषय विविध प्रकार वाचनात असावेत. जाता जाता अखेरची एक शंका मांडावीशी वाटते. सध्याचे जग इलेक्ट्रॉनिक्सचे व संगणकाचे आहे. टी. व्ही., व्हिडिओ, टेपरेकॉर्डर, कॅसेटस् यांच्या जमान्यात वाचनाचे महत्त्व पुढे राहील का ? काळच याचे खरे उत्तर देईल ! पण चित्रपट आले म्हणून नाटके संपली नाहीत.



टी. व्ही, व्हिडिओ आले म्हणून चित्रपटगृहे ओस पडली नाहीत. तसेच वाचनाचे ! वाचन कशासाठी ? ज्ञानासाठी ! ते एवढ्या पुरतेच नसते तर एका वेगळ्या प्रकारच्या आत्मिक समाधानासाठी असते. वाचनाचे वेड लागलेला माणूस पहा. वाचन त्याचे काम नसते. वाचन हा त्याचा स्वभाव बनतो. अनेक उत्तमोत्तम ग्रंथांशी त्याची जवळची दोस्ती बनते. त्याच्या सुखदुःखाच्या क्षणी हे ग्रंथच त्याला सोबत करतात. दिलासा देतात. प्रोत्साहन देतात. प्रेरणा मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद



Vachan Ek Uttam Chand Essay In Marathi | वाचन एक उत्तम छंद

maza avadta kavi marathi nibandh | माझा आवडता कवी मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता कवी मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 4 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्ये आपण कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती दिली आहे. त्या पुढील निबंधात तुकाराम महाराज यांच्याबद्दल निबंध सादर केला आहे  तर मग सुरूवात करूया निबंधाला


 मुद्दे : 


  • अनेक लेखक आवडीचे 
  • त्यांपैकी एक - वैशिष्ट्ये 
  • इतर समकालीन लेखकांची तुलना
  • त्यांनी लिहिलेले विविध साहित्य
  • विविध साहित्यांमधील काही वैशिष्ट्यपूर्ण वाक्ये किंवा पंक्ती
  • एखादे विशेष पुस्तक - का आवडते त्याचे कारण
  • व्यक्तिरेखा - व्यक्ती व साहित्यिक म्हणून त्यांच्याविषयी वाटणारा आदर


विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज हे कवी तर होतेच त्याचप्रमाणे नाटककार,  कथाकार व वृत्तपत्रलेखकही होते. पण त्यांच्या या सर्व साहित्यिक कलाकृतीतून लक्षात राहतो तो त्यांच्यातला कवीच! मग 'नटसम्राट' नाटकातील बेलवलकर असो, 'कौन्तेया'तील कर्ण असो वा 'स्वप्नांचा सौदागर' या लेखातील चंद्राची जगाशी ओळख करून देणारा ललितलेखक असो; या सर्वांतून कुसुमाग्रजांचा काव्यात्म पिंड कधीच लपून राहत नाही.

maza-avadta-kavi-marathi-nibandh
maza-avadta-kavi-marathi-nibandh



'जीवनलहरी' हा कुसुमाग्रजांचा पहिला लहानसा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आणि त्यानंतर 'विशाखा', 'किनारा', 'मराठी माती', 'स्वगत', 'हिमरेषा', 'वादळवेल', 'छंदोमयी' अशा आपल्या काव्यसंग्रहांतून या कविश्रेष्ठाने रसिकांना काव्यामृताचा आस्वाद सातत्याने दिला आहे.


कुसुमाग्रजांच्या कवितेची विशेष खासियत म्हणजे त्यांची कविता श्रेष्ठ टीकाकारांना जशी आवडली, तशी अगदी सामान्य रसिकांनाही आवडली आहे. आपल्या या कवितांना कुसुमाग्रज स्वतः समिधा' म्हणतात -



समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा 

कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा

जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा

तव आन्तर अग्नी क्षणभर तरी फुलवावा.


या काव्यपंक्तीतून कुसुमाग्रजांची विनम्रता प्रत्ययाला येते. त्याचप्रमाणे त्यांच्या काव्यरचनेमागील हेतूही स्पष्ट होतो. सामाजिक विषमतेतील संघर्ष या कवीला सतत अस्वस्थ करतो व तो संघर्ष वेगवेगळ्या प्रतीकांतून प्रभावीपणे व्यक्त होतो. कधी तो संघर्ष उद्दाम' आगगाडी आणि तिच्याखाली चिरडली जाणारी जमीन यांमधील असतो; तर कधी तो उफाळणारा सागर व त्याला आव्हान देणारा कोलंबस यांच्यातील असतो.



कुसुमाग्रजांच्या प्रतिभाशक्तीला अजोड अशा तरल कल्पकतेची जोड लाभली आहे. मग ती कधी 'पृथ्वीचे प्रेमगीत' गाऊ लागते; तर कधी 'अहि-नकुलाच्या' रूपकातून भिन्न प्रवृत्तींचा संघर्ष मांडते. कुसुमाग्रजांची काव्यवृत्ती भव्यतेला गवसणी घालू पाहणारी आहे. लोकमान्यांच्या पुतळ्याच्या सान्निध्यात त्यांचे मन म्हणते, "ते होते जीवित अन् हा जीवितभास.' कुसुमाग्रजांच्या मनाला दिव्यत्वाचा, उदात्ततेचा, मृत्युंजयाच्या शोधाचा ध्यास लागलेला होता.


असा हा 'ज्ञानपीठ पुरस्कार' विजेता माझा आवडता कवी अनंतात विलीन झाला. त्यांच्या काव्याचा दीपस्तंभ भविष्यातील हजारो मराठी कवींना प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून अनंतकाळ प्रकाश पुरवत राहील.

निबंध 2

majha avadta kavi essay in marathi 


भागवत धर्माचा प्रसार करणारे एकनाथ समाधिस्थ झाले व तुकारामांच्या रूपाने भक्तीचा अधिकच तेजस्वी तारा उदयास आला. तुकाराम महाराज साधे वाणी, अडाणी, मराठा कुलात जन्मले. त्यांच्या घरात विठ्ठलभक्तीची परंपरा होती. लहानपणीच त्यांच्यावर व्यवसायाची जबाबदारी येऊन पडली होती व ती ते यशस्वीपणे पार पाडत होते. लहान वयातच त्यांचे लग्नही झाले होते. परंतु अचानक पडलेल्या दुष्काळच्या तडाख्याने ते हवालदिल झाले. त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली.


संसाराच्या काट्याकुट्यांनी रक्तबंबाळ झाल्यावर त्यांच्या मनाला परमार्थाची ओढ लागली. मग मन परमार्थात रम लागले. मग असे वाटू लागले बरे झाले देवा निघाले दिवाळे। बरी या दुष्काळे पीडा केली। समाजापासून, संसारापासून दूर डोंगरावर जाऊन त्यांनी भक्तीचा साधना केली. बाबाजी चैतन्य या गुरूंपासून ‘रामकृष्ण हरी' या मंत्राचा त्यांना लाभ झाला.

शिवाजीमहाराज त्यांच्या कीर्तनाला गेले होते. त्यांनी तुकारामांना नजराणा पाठवला होता. तुकारामांनी तो नाकारला. या 'वैभवाच्या धन्याला' समाजकंटकांकडून खूप त्रास भोगावा लागला होता. परंतु त्यांनी या दांभिकांवर शब्दाचा आसूड मारला होता. संस्कृतमधील ज्ञान मराठीत आणलं म्हणून पंडितांचा राग. म्हणून रामेश्वरभटाने त्यांचे अभंग इंद्रायणीत बुडवले. पांडुरंगाने अभंग तारले.


सर्वसामान्य माणसांना तुकारामांविषयी जिव्हाळा वाटत असे. त्यांच्या कीर्तनाला त्याची खूप गर्दी होत असे. आपल्यासारखाच चुकणारा, विव्हळणारा जीव आता शांती-सुख-आनंदात डुंबत आहे, तुकाराम ज्या पायऱ्या चढून उंच मोकळ्या जागी, स्वच्छ मोकळ्या वातावरणात जाऊन बसले होते, तेथे आपण जावे असे त्यांना वाटे.


संत तुकारामांचे जीवन म्हणजे 'गरुडाचे उड्डाण.' त्यांच्या झेपेकडे पाहून माणूस अवाक् होतो. त्यांच्याबद्दल त्याला विस्मय वाटतो. परंतु साध्या, सोप्या, सरळ भाषेत त्यांनी पिटलेल्या भक्तीच्या डांगोयानं तो तुकारामांचा नकळत अनुयायी बनतो

खरोखर हे कवी तुकाराम ‘आकाशाएवढे' होते. भागवत धर्ममंदिराचा कळस होते. मराठी सारस्वताचे शिखर होते. त्यांच्या अभंगातील आर्तता, खंबीरपणा, निस्सीम भक्ती, मनातील संघर्ष, आध्यत्मिक उंची माझ्या मनाचा ठाव सोडत नाही.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3



माझा आवडता कवी - बालकवी

बालपणी शाळेत शिकत असताना मनावर मोहिनी घालणाऱ्या विविध कवींच्या ज्या कविता बालकांच्या जिभेवर नाचत असतात, त्यात बालकवींच्या दहा-बारा निसर्ग-कवितांचा अग्रक्रम लागतो. बालपणी मनावर मोहिनी पडते ती त्या ओळीत जाणवणाऱ्या नादमयतेची आणि तालाची १९९० हे वर्ष बालकवींचे जन्मशताब्दीचे वर्ष म्हणून साजरे झाले उत्कृष्ट आत्मनिष्ठ कविता लिहिणारे श्रेष्ठ कवी म्हणजे बालकवी.

 बालकवींनी निसर्ग कविता समृद्ध केली. त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९० या दिवशी खानदेशातील धरणगाव या गावी झाला. बालकवींवर शालेय जीवनातच घरी भक्ती,काव्य,रसिकता यांचे आई व आजीकडून संस्कार झाले परतुका गोडी त्यांना थोरली बहीण जिजी हिने लावली नाशिकच्या दूधभांडे शास्त्र्यांनी त्यांना कालिदास,भवभूती यांच्या काम परिचय करून दिला. 

तसेच रामायण, महाभारत, शांकरभाष्य यांचेही ज्ञान करून दिले. जुन्या काळी संस्कृतचा विषयाचा अभ्यास ज्या कवींनी केला होता, त्यांच्या मराठी काव्याला एक वेगळे, नवे, देखणे, काव्यात्मक, रंगतदार रूप कसे प्राप्त होते ते पहावयाचे असल्यास आपण बालकवींच्या कवितांचे पुर्नवालोकन करावयास हवे. 


बालकवींनी बागेचे वर्णन करणारी पहिली कविता १९०३ साली लिहिली आणि २८ वर्षांचे आयुष्य निसर्गकवी या बिरुदाने मिरवावे अशा दर्जाची नवी निसर्गकविता त्यांनी मराठी भाषेला दिली केशवसुत, गोविंदाग्रज विनायक आणि रे. टिळक यांच्या काळात बालकवी आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या कविता लिहीत होते त्यात प्रेमकविता, उदास व काव्यात्मक वृत्तीच्या कविता आहेत आणि समृद्ध निसर्गाचे मानवीरूप प्रत्ययाला आणून देणाऱ्या कविताही आहेत निसर्गाशी बालकवींचे बालपणीच नाते जडले. 


केशवसुतांनी जी एक असांकेतिक, बंधनरहीत, काव्यात्मक अशी नवी कविता लिहिली तिचा संस्कार बालकवींवर झाला एवढेच त्यांचे केशवसुतांच्या कवितेशी नाते सांगता येते रेव्ह. टिळकांच्या कवितांतील भक्तिपणाचाही थोडाफार संस्कार बालकवींच्या समृद्ध निसर्गकवितांत जाणवतो. पण त्यापेक्षा अधिक त्यांनी कोणाकडूनही काही संस्कार घेतले आहेत असे म्हणता येत नाही १९१० सालीच जळगाव येथील कविसंमेलनात त्यांचा उत्स्फूर्त सन्मान झाला होता -बालकवी म्हणून आधुनिक मराठीतील खरे स्वयंभू कवी असे बालकवींना म्हणायला काहीच हरकत नाही. 


कविता हे केवळ पद्यच नसते, काव्यात्म मनोवृत्तीची ती प्रतिमामय आविष्कृती असते हे आपल्याला बालकवींच्या कवितांवरूनच म्हणता येते. "भिंत खचली उलथून खांब गेला जुनी पडकी उध्वस्त धर्मशाळा तिच्या कोलारी बसुनि पारवा तो खिन्न निरस एकान्त गीत गातो" या ओळी वाचताना आपल्या डोळ्यासमोर पारवा तर उभा राहतोच त्याचबरोबर बालकवींची कविता गाणारी खिन्न मूर्तीही डोळ्यासमोर उभी राहते. "झाकाळुनी जल गोड कालिमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर' या ओळी वाचल्यावरही अवतीभवतीचे सुंदर निसर्गदृश्य पाहत औदुंबरच जलात उतरला आहे असे वाटते बालकवींचे व्यक्तित्व हे बालसुलभवृत्तीचे होते. 


सृष्टीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी बालसुलभ होती. फुलराणीच्या या ओळीतच पहा, "हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती" 'श्रावणमास' या कवितेत ते म्हणतात - "श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे" 'पाऊस' या कवितेतील पुढील ओळी 
- "थबथबली ओथंबून खाली आली जलदारी मज दिसली सायंकाळी" 
'अरुण' या कवितेतील - 

"पूर्वसमुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची कुणी उधळली मूठ नभी ही लाल गुलालाची"

 या ओळी पहा किती विविध दृश्य आहेत ही 
 "ते डोंगर सुंदर दूरदूरचे बाई, पाहीन गडे त्या हिरव्या हिरव्या राई त्या विमल जलासह वळणे वळणे घेत हिंडून झऱ्याच्या शीतल कुंजवनात"

 "फिकट निळीने रंगविलेला कापूस मेघांचा वरुनी कुणी गुलजारी फिरविला हात कुसुंब्याचा" 

अशा शेकडो निसर्गदृश्ये बालकवींच्या कवितांत विखुरली आहेत फुलराणी ,अरुण,संध्यारजनी,श्रावणास मेघांचा कापूस इ.सर्वच कवितेतील निसर्ग बालकवींनी आपल्या बालपणीच्या मुग्ध शैशवी डोळ्यांनी पाहिलेला वा पंचेंद्रियांनी अनुभवला होता त्यामुळे बालकवींची निसर्गकविता म्हणजे मानवी भावनांच्या आविष्काराचा सुंदर आरसा झाला आहे शब्द,स्पर्श,रूप,रस,गंध या पंचेंद्रियांच्या पाच अनुभूती व गती ही सहावी जाणीव त्यांच्या सर्व कवितात त्यांच्या कवितेतील "औदुंबर जलात पाय टाकून अवतीभवतीचे दृश्य शांतपणे न्याहाळतो आहे निसर्ग सर्वत्र क्रीडाच करतो आहे. 


त्या कवितेतील नाद,ताल वता चार अप्रातम मिश्रण जगातल्या कुठल्या दुसऱ्या भाषेत असू शकेल काय ? असा विचार मनात येतो व भाषत नसणारा एक नवाच शब्द फुलराणी हा मराठीत रुजला व फुलराणीचा विवाह ही घटनासुद्धा जगाच्या वाङ्मयात अमर झाली. "कुणी नाही ग कुणी नाही आम्हांला पाहत बाई शांती दाटली चोहीकडे या ग आता पुढेपुढे लाजत लाजत हळुच हासत खेळ गडे खेळू काही कोणीही पाहात नाही' या ओळीत कोणाचे वर्णन आहे? 


अंगणात खेळणाऱ्या लहान मुलींचे की आकाशात रात्री चमचमणाऱ्या चांदण्यांचे? बालकवींनी मराठी निसर्गकवितेला ही देणगी दिलेली आहे त्यांनी आपल्या तरल मनाच्या भावावस्था निसर्गातील विविध रूपांतून अनुभवत्या सौंदर्यग्रहणाची अतिशय कोमल व तरल शक्ती बालकवींच्या मनात होती तसा त्यांचा ध्यास होता. 

"
सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबनि घ्यावे चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे प्रीतिसारिका गीत तियेचे ऐकावे कानी बनवावे मग धुंद रंगुनी काव्यसुधा पानी" 

आणि हा ध्यास असणाऱ्या कवीच्या मनाला दुसरी पण बाजू होती त्यांच्या मनाचा पारवा कधीकधी कोलावर बसून खिन्न निरस एकांत गीत गातो एखाद्यावेळी तो म्हणतोच "कोठुनी येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतहृदयाला" "आनंदी आनंद गडे म्हणता म्हणता बालकवींच्या शून्य मनाच्या घुमटात कसले तरी घुमते गीत" अशाप्रकारे आनंदाच्या व दुःखाच्या अनेक परी वर्णन करून गाणारा बालविहग बालकवी अपघातात मृत्यू पावतो नि मराठी माणसाच्या मनात निसर्ग प्रेमाचे अमररूप घेतो.
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद  . पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 4

maza avadta kavi marathi nibandh | माझा आवडता कवी मराठी निबंध



तुलसीदास गोस्वामी तुलसीदास माझे आवडते कवी आहेत. त्यांच्या सर्व साहित्यकृती मला आवडतात. परंतु मला सर्वात जास्त त्यांचे 'रामचरित मानस' आवडते. त्यातील कित्येक दोहे आणि चौपदया मला तोंडपाठ आहेत. ते गाताना, गुणगुणताना मला आनंद होतो. ते मला मार्गदर्शन करतात. 


दु:ख संकटात निकटच्या मित्राप्रमाणे मला साथ देतात. त्यातील शिकवण आणि उपदेश यांच्याबरोबर जो संगीताचा वापर केलेला आहे तो वर्णन करणे शब्दापली- कडचे आहे. 'रामचरित मानस' रामकथा आणि रामचरित्रावर आधारित अतुलनीय एक महाकाव्य आहे. 


मागील कित्येक शतकांपासून याचा भारतीयांवर गाढ प्रभाव आहे. सुशिक्षित, अशिक्षित, स्त्री-पुरुष सर्व जातीधर्मांचे व वर्गाचे लोक यापासून प्रेरणा, सामाजिक मर्यादा व नैतिकतेचे धडे घेतात. त्यातील आदर्शाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतात. 


भारतातील धर्मप्रवण जनतेत हे महाकाव्य एका अद्वितीय दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणास्त्रोत्राच्या रूपात ओळखले जाते. त्याची लोकप्रियता आणि व्यापक प्रभावाची अनेक कारणे आहेत. हा ग्रंथ आज ही तितकाच महत्त्वपूर्ण व प्रासंगिक आहे जितका तो त्याच्या रचनेच्या वेळी होता.

तुलसीदास एक महान लोकनायक होते. त्यांनी लोकहितासाठी आणि जनकल्याणसाठी 'रामचरित मानस' ची रचना केली होती. त्यांच्या अन्य साहित्यकृतीतही लोकसंग्रहाचा भाग मुख्य आहे. खंडन-मंडनाच्या प्रवृत्तीपासून दूर राहून या महान कवीने लोकधर्म, सहजभक्ती समन्वय आणि आदर्शाचा एक अद्वितीय संगम प्रस्तुत केला आहे. 


या घोर कळीकाळात मनुष्य रामाची समर्पण भावाने भक्ती करून या भवसागराला सहज पार करू शकतो.
सगुण भक्ती, ज्ञान आणि समन्वययाच्या दृष्टीने 'रामचरितमानस' अतुलनीय आहे. त्याची तुलना दुसऱ्या कोणत्याच अशा प्रकारच्या ग्रंथाशी करता येत नाही. 


जीवनात ज्या आदर्शाची कल्पना तुम्ही करू शकता ती यात आहे. राम आदर्श पुत्र, पती, राजा, मित्र, धनी आहे. भरतामध्ये भावाच्या आदर्शाची पराकाष्ठा आहे. तर हनुमान सेवा, त्याग, तपश्चर्या आणि वीरतेची महान् मूर्ती आहे. सीता पत्नीचे अत्यंत सुंदर आणि श्रेष्ठ उदाहरण. आहे. 


भारतातील प्रत्येक स्त्रीची इच्छा सीतेप्रमाणे त्यागी, तपस्विनी, पतिव्रता, दृढव्रता, व्यवहार-कुशल, विनम्र आणि एकनिष्ठ होण्याची असते. लक्ष्मणाचा त्याग आणि तपश्चर्या अद्वितीय आहे. बंधू राम आणि मातृस्वरूप सीतेच्या सेवेसाठी त्याने सर्व राजविलासाचा त्याग केला, इतकेच नव्हे तर आपली नवविवाहित पत्नी ऊर्मिलेलाही त्याने अयोध्येलाच सोडले. 


सुग्रीव आणि केवट ही मित्रत्वाची अजोड उदाहरणे आहेत. तर दशरथ हे पुत्रप्रेमाचे. रामाचे राज्य एक आदर्श राज्य होते. गांधीजी भारतात याच रामराज्याच्या स्थापनेचे स्वप्न पाहत होते. कविश्रेष्ठ तुलसीदास म्हणतात जासुराज प्रिय प्रजा दुखारी सो नर प्रवसि नरक अधिकारी। 


आधुनिक राजकीय पुढारी, राजकारणी मुत्सद्यांनी यातून प्रेरणा, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन घेऊन त्यानुसार चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रामाने निर्वासित असूनही रावण, कुंभकर्ण, मेघनादासारख्या अतिबलवान, पराक्रमी आणि मायावी राक्षसांचा संहार करून जनतेला व ऋषिमुनींना भयमुक्त केले. राम हे, असीम. 



आत्मशक्ती, चारित्र्य आणि तपश्चर्येमुळेच प्राप्त झालेल्या सिद्धीचे साकार रूप होते. त्याच क्षमतांमुळे ते अंजिक्य ठरले आणि अनेक राक्षसांचा, दैत्यांचा, असुरांचा त्यांनी संहार केला. तरीही ते अत्यंत उदार विनम्र, सहिष्णु आणि मोठ्या मनाचे होते. 


स्वार्थ आणि अभिमान यांचा तर त्यांना स्पर्शही झाला नव्हता. वानर, निषाद, भिल्ल इत्यादी आदिवासी जमातींकडून मदत घेण्यात व त्यांच्याशी मैत्री करण्यात त्यांना यकिंचितही संकोच वाटला नाही. उलट रामाला त्यांचा अभिमान वाटला. जटायुसारख्या पक्ष्यालाही त्यांनी हृदयाशी धरले व आदरपूर्वक आपला मित्र बनविले. 


शबरीची बोरे खाऊन स्वत:ला धन्य मानले. शिळा झालेल्या अहिल्येचा त्यांनी उद्धार केला. सर्वाचेच हित त्यांनी केले. 'रामचरितमानस' समन्वयाचा एक विराट प्रयत्न आहे. यात सगुण-निर्गुण, शैव-विष्णु, भक्ती, ज्ञान, भक्ती-कर्म, गाहेस्थ-वैराग्य शासक आणि शासित इत्यादीचा समन्वय दिसून येतो. 


अवधी आणि ब्रज या भाषांमध्ये त्यांनी आपले लेखन केले. तुलसीदासाची कितीही स्तुती केली तरी ती कमीच आहे. माझ्याप्रमाणे अनेकांचा हा साहित्य भक्ती ग्रंथ आहे. संस्कृतीदर्शन, संगीत इत्यादी दृष्टिकोनातून रामचरितमानस एक अद्वितीय ग्रंथ आहे. ज्याचा सर्व भारतीयांना अभिमान वाटणे स्वाभाविकच आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


maza avadta kavi marathi nibandh | माझा आवडता कवी मराठी निबंध

 Mahavidyalaya cha nirop ghetana marathi nibandh | महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध बघणार आहोत. आपल्‍या आयुष्‍यातील आपल्‍याला परत हवेहवेसे वाटणारे क्षण असतात. सर्वात सोनेरी क्षण असतात महाविद्यालयातील आणि ,महाविद्यालय म्‍हटले की सर्वाना आठवण झाल्‍याशिवाय राहत नाही ते म्‍हणजे  तेथे झालेल्‍या गंमती जमती, शिक्षकांनी आपल्‍या केलेल्‍या तक्रारी, आपण केलेली मौजमजा , हा काळ कोणीही विसरू शकत नाही .  कितीही सोनेरी असले प्रत्‍येक क्षण हा निघुन जात असतो आणि हा महाविद्यालयातील शेवटचा  क्षण असतो महाविद्यालयाचा निरोप समारंभाचा दिवस त्‍याच अनुशंगाने आपण सविस्‍तर निंबध लेखन करणार आहोत चला तर मग निबंधाला सुरूवात करूया.


Mahavidyalaya-cha-nirop-ghetana-marathi-nibandh


नुकताच मी बँकेतुन संध्याकाळी घरी परतलो, तर घराच्या दारात एक माझा  महाविद्यालयातील मित्र माझी वाट पाहत उभा होता. तो पुण्याला एका नोकरीच्या संदर्भात इंटरव्ह्यु देण्यासाठी आला होता. त्‍यापुर्वी माझ्या आईने त्‍याचे  स्वागत, चहा-पाणी वगैरे केले होतेच. मीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिलो जवळजवळ ६ ते ७ वर्षांनी भेटत होतो आम्ही. आमच्या गप्पा रंगल्या आणि एकदम त्यांनी त्यांच्या बॅगमधुन एक फोटो काढला. 


तो फोटो पाहुन मी एकदम भारावून गेलो. तो फोटो होता महाविद्यालयाच्‍या निरोप समारंभाच्या दिवसाचा. त्यामध्ये माझा मित्र आणि मी आम्हा दोघांचा सत्कार त्यावेळचे मा. शिक्षणसंचालक यांच्या हस्ते झाला होता. आम्ही दोघेही जवळजवळ समान गुण घेऊन गुणवत्ता यादीत तेरा आणि चौदा क्रमांकांनी उत्तीर्ण झालो होतो. तो फोटो पाहिला आणि त्या दिवसामध्ये एकाएकी हरवून गेलो.

 

ज्या महाविद्यालयात  मी शिकत होतो, त्या महाविद्यालयाचा 'निरोप समारंभ' माझ्या डोळ्यासमोरून जाऊ लागला. गेली ५ वर्षे  ते महाविद्यालय माझे आराध्य दैवत होते. माझा मित्र अन मी नेहमी पहिल्या पाच क्रमांकात येत होतो. चांगली चढाओढ होती आमची. ती शेवटपर्यंत गाजवली. अर्थातच विद्यार्थी मंडळाचा अध्यक्ष - ग्रंथालयाचा प्रमुख – क्रीडा प्रमुख  - सहलप्रमुख ही सगळी पदे आम्ही भूषवली होती. त्यामुळे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी आम्हांला चांगले ओळखत. 


सर्वजण 'सिनियर्स' म्हणून मान देत. स्पर्धा झाल्या. परीक्षा झाल्या आणि बघता बघता शैक्षणिक वर्ष कधी संपले हैं समजलेच नाही... परीक्षांचा रिझल्ट आला, तोही आमच्या दोघांच्या नावांनी मोठे यश घेऊन. निरोप आणि सत्कार समारंभाची सूचना फळ्यावर लावली गेली. आणि गेलेले सर्व दिवस शांत बसू देईनात. महाविद्यालयाच्‍या सहलीतील झालेल्‍या गमती जमती  , त्या वक्तृत्व स्पर्धा, ग्रंथालयातील पुस्तके मिळविण्यासाठी धडपड, मित्रांशी झालेली भांडणे, त्या मारामाऱ्या. काही काही म्हणून डोळ्यासमोरून दूर होईना. मन भरून आले... नको, नको तो निरोप समारंभ असे वाटू लागले.


अखेरीस ती सकाळ उजाडली. ठीक १० वाजता महाविद्यालयाच्या हॉलमध्ये आम्ही सर्वजण जमलो. मी, माझा मित्र आणि काही विद्यार्थी स्टेजवर बसणार होतो. माननीय अध्यक्ष, मा. मुख्याध्यापक, इतर सर्व मा. अध्यापक मंडळी व्यासपीठावर आले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. व्यासपीठावर उजव्या बाजूस बसण्याची खास व्यवस्था आमची केली होती. संकोच वाटत होता... तसा हा समारंभ सत्काराचा-आनंदाचा होता. परंतु एकप्रकारची हुरहुर त्यात होती. कारण 'निरोप' ही घ्यायचा होता. 


नेहमीचे उपक्रम झाल्यावर मा. मुख्याध्यापक बोलण्यास उभे राहिले, तुम्ही हुशार, बुद्धिमान विद्यार्थी, देशाचे भावी नागरिक आणि देशाचे भवितव्य घडविणारे. उद्या तुम्ही वैभवाच्या शिखरावर असाल, उच्च शिक्षण घेऊन परदेशी जाल. खूप मोठे व्हाल. पण बाळांनो, आपल्या देशाला विसरू नका... आपल्या महाविद्यालयाचे स्मरण ठेवा. जिथे प्रथम तुम्हांला अंकुर फुटले, छोटी छोटी पाने, फुले आली त्या जमिनीला विसरू नका.


आपले, आपल्या महाविद्यालयाचे, देशाचे नाव, उज्ज्वल करा. जीवनात सर्वजण यशस्वी होतातच असे नाही, पण अपयशाने खचून जाऊ नका. प्रयत्नशील रहा. आमचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव आहेत. त्यानंतर आमचा खरोखरीच धीर सुटत चालला होता. आम्ही सुन्न होऊन बसलो होतो. त्यानंतर एक एक शिक्षकही उठले आणि त्यांनी आम्हांला भरभरून आशीर्वाद दिले. 'महाविद्यालय ही यशाची खरी पायरी आहे, असे सांगून तुमच्या पाठीशी महाविद्यालय सदैव राहील' असे विचार व्यक्त केले. 

मा. शिक्षणाधिकाऱ्यांनी ही आमचे कौतुक केले. सर्वांकडून आम्हांला फुलांचे हार, गुच्छ, ग्रंथ असे पुरस्कार मिळत होते. आणि अखेरीस सत्कारास उत्तर देण्याची वेळ आली आणि सर्वांनी माझ्याकडे बोट दाखविले. सर्वांच्या वतीने मी बोलणार होतो. घसा दाटून आला होता. अनेक प्रसंग आठवत होते आणि त्याप्रसंगी वेळोवेळी शिक्षक मित्र आणि मुख्याध्यापकांनी दिलेला आधार आठवत होता, 'क्षमाशील वृत्तीनेच आज आम्ही इथे पोहोचलो,


सर्वांच्या आधाराने आज आम्ही यशस्वी झालो. आम्ही आपले सदैव ऋणी आहोत.' असे म्हणून दाटलेल्या कंठानेच आम्ही सर्वजण पुढे येऊन नतमस्तक झालो. पुन्हा एकदा टाळ्यांचा गजर झाला आणि अश्रृंना वाट मिळाली. चहापान झाले पण कोणीच कोणाशी बोलत नव्हते... खिन्न मनाने आम्ही घरी परतलो. या प्रसंगाला किती वर्षे लोटली. आम्‍ही दोघे खूप खूप बोललो, हसलो आणि महाविद्यालयाच्या त्या हरवलेल्या क्षणांमध्‍ये परत जाण्याचा परत परत प्रयत्न करीत राहिलो.

मित्रांनो तुम्‍हाला college farewell essay in marathi हा निबंध कसा वाटला हे  व तुम्‍ही अनुभवलेला महाविद्यालयातील निरोप समारंभाचा दिवस कसा होता कमेंट करून सांगु शकता.  धन्‍यवाद

Mahavidyalaya cha nirop ghetana marathi nibandh | महाविद्यालयाचा निरोप घेताना मराठी निबंध

 अंधश्रद्धा मराठी निबंध | andhashraddha marathi nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अंधश्रद्धा मराठी निबंध बघणार आहोत. आज आपण विज्ञानयुगात राहुन सुध्‍दा मानवी समाजात अंधश्रद्धा दिसुन येते याची कारणे काय असु शकतात व यावर कशी मात करता येईल हे सांगीतले आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 

माणसे अपूर्ण असतात आणि मानवी मनातल्या श्रद्धा, प्रेम यांचीदेखील पूर्तता कधीच होत नाही. आईवडिलांचे जरी मुलावर उत्कट प्रेम असले तरी त्या प्रेमाला अज्ञानाच्या, अविचाराच्या मर्यादा पडलेल्या असतात. असेच आपल्या सर्वाचे आहे. एखादी वास्तव गोष्‍ट ! मानवी ज्ञानशक्ती पलीकडे असलेले असे सत्य भासते तेव्हा ती भासू लागते - अंधश्रद्धा .


andhashraddha-marathi-nibandh
andhashraddha-marathi-nibandh


मुळात अंधश्रद्धा निर्माण होण्याचं कारण, त्याच्या पराधीनपणात लपलेल आहे. यश संपूर्ण स्वत:च नसून त्याला काही कारण म्‍हणुन, तसंच अपयशाची कारणमीमांसा म्हणूनही अंधश्रद्धा निर्माण झाल्या.
आजच्या यंत्रयुगातसुद्धा अंधश्रद्धेचा मानवी मनावर जबरदस्त पगडा आहे. आपण म्हणतो की मांजर आडवे जाण्याने काम होत नाही!

 पण सगळ्यांना काही तोच अनुभव आजपर्यंत आला आहे का? खर तर कार्याचे स्वरूप, साधनांची उपलब्धता इ.वर यशापयश अवलंबून असते. त्यात बिचाऱ्या मांजराचा काहीही संबंध नसतो. 'तीन तिगडा काम बिघडा' व 'साप चावलेल्या मनुष्यास खांद्यावर बसवून मारूतीला प्रदक्षिणा मारणे' हाही त्यातलाच एक खुळा प्रकार ! पण ही झाली अंधश्रद्धेची प्रथम पायरी ! पण हीच अंधश्रद्धा पुढे फार भयानक वळण घेते.

कुठल्याही सुजाण माणसाच्या अंगावर शहारे आणेल असं मानवत' प्रकरण या विज्ञानयुगात घडू शकतंय ही गोष्ट काय दर्शविते ? अमावास्येच्या दिवशी स्त्रियांनी केस सोडून फिरू नये इथपासून ते भूतबाधा झालेल्यांचे भूत उतरविणे इथपर्यंत! दक्षिणेकडे पाय करून झोपू नये, तिकडे यमाचे राज्य असते, मृत्यू येतो, असे आपले पूर्वज प्राचीन वेदात सांगतात. परंतु यासारख्या अंधश्रद्धा या विज्ञानाच्या अढळ बुरूजावर उभ्या आहेत हा शोध आज नवीन लागला आहे. 

हवेतून हात फिरवून घड्याळे, कुंकू, मंगळसूत्रे काढणाऱ्यांवर, ३०-३० दिवस समाधीस्थ होणार अशी प्रतिज्ञा करण्यावर विश्वास ठेवला की या जगात बुवाबाजीचा सुळसुळाट झालाच म्हणून समजा. पण काही अंधश्रद्धांना दुसरा पर्यायच नाही. 'दृष्ट काढणे' ! पण खरंच अशी नजर लागते का ? दृष्ट काढल्यावर ती जाते का? पण आपल्याला दृष्ट काढल्यावर मोकळं, हलकं वाटू लागतं; मग हे कसं काय ? खरंच देव असं काही करतो का?... या प्रश्नांना उत्तर नाहीत. अंगात येणं' हा दुसरा प्रकार. पण याबाबतीत बहुतांशी असत्य अनुभवच येतात. मग खरंच परमेश्वर मानवी शरीरात अवतरतो का? या गोष्टींवर अविश्वास ठेवावाच लागतो.


पण आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर मानवाचे पाऊल पडणार आहे... छे! छे! तो ओलांडणारही आहे. मग या खुळ्या, अविचारी, पुरातन समजुतींवर आपण किती विश्वास ठेवायचा? कधी कधी तर हे अज्ञान निरपराधांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरतं- जसा गुप्तधनासाठी कुमारिकेचा बळी! म्हणूनच ‘लोकशिक्षण' व 'जनजागृती' या दोन विकासाच्या साधनांची कास धरूनच व विज्ञानाच्या कसोटीवर घासून घेतलेले, मनाला पटतील तेच विचार अनुसरले तर एकविसाव्या शतकाची रम्य, निरभ्र पहाट उगवू शकेल अन् मानवतेने पांघरलेला हा अंधश्रद्धांचा बुरखा आपोआप गळून पडेल !

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

अंधश्रद्धा मराठी निबंध | andhashraddha marathi nibandh

pradushan ek samasya in marathi essay | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण प्रदूषण एक समस्या मराठी निबंध बघणार आहोत.  या लेखामध्ये ऐकून 4 निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. आज जगातील सर्वात गंभीर समस्‍या असेल तर ती वाढते प्रदूषण आहे . आज भारत असो की इतर कोणताही देश त्‍या देशातील हवा, पाणी, माती,ध्‍वनी यांचे प्रदूषण दिवसेदिवस वाढतच आहे. या 3 निबंधात प्रदूषणाची कारणे व उपाय यावर सविस्‍तर माहीती दिलेली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला
 

२१ व्या शतकाकडे वाटचाल करत असलेल्या मानवाच्या प्रगतीचा वारू आज बेलगाम चौखूर उधळला आहे, ज्याची वेसण आज अडकली आहे- भ्रष्टाचाराच्या भस्मासुरामध्ये, लोकसंख्येच्या लकव्यामध्ये आणि प्रदूषणरूपी प्रलयामध्ये! जेव्हा भौतिक, रासायनिक आणि जीवशास्त्रीय बदल वातावरणात घडून येतात, जे मनुष्याच्या अस्तित्वालाच प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने ग्रहण लावतात, त्यालाच ‘प्रदूषण' असे म्हणतात. 

आज प्रदूषण कोठे नाही? हवा, पाणी, अन्न, जमीन, तापमान, आवाज या साऱ्यांनाच या प्रदूषणाने ग्रहण लावलंय! औद्योगिक क्रांतीपूर्वीच प्रदूषणाचा जन्म झाला. परंतु निसर्गाच्या कुंपणाने माणसाच्या जीवनाला धडका मारणारा हा उन्मत्त बैल थोपवून धरला होता. वातावरणात मिसळणारे वाहनांचे धूर व Lead Poisoning सारखं माणसानंच निर्माण केलेलं प्रदुषणाचं रूप, आज जग गिळंकृत करू पाहणाऱ्या वामनात कधी रूपांतरित झालं हे भौतिक सुखाच्या मृगजळामागे धावणाऱ्या मनुष्यप्राण्याला कधी कळलंच नाही. 

pradushan-ek-samasya-in-marathi-essay
pradushan-ek-samasya-in-marathi-essay


परंतु चेर्नेबिल अणुभट्टीच्या स्फोटासारखं प्रदूषण निसर्ग कसा थांबवणार? अशा स्फोटांमुळे तापमानात बदल होऊन त्यामुळे ऋतुचक्राची चाकेच खिळखिळी होऊ लागली आहेत. भोपाळच्या वायु दुर्घटनेची भीषणता आज कुणी विसरू शकेल? डॉ. दत्ता सामंतांच्या शरीरालाच संप पुकारावा लागला, तो मुंबईमध्ये झालेल्या क्लोरीन गळतीमुळे ! -Touch of Midas' गोष्टीतल्या मिडास राजासारखीच आज मानवाची अवस्था होऊ लागली आहे!


Soclean Society च्या अहवालानुसारं ३ हजार टन इतका गोबरगॅस एकट्या मुंबईमध्ये दर दिवशी गोळा होतो. सतराशे टन इतकी प्रदूषिते रोज हवेत सोडली जातात अन् २० लाख लिटरपेक्षा जास्त सांडपाणी जमा होते. प्रदूषण दूर करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा २४ तास वापरणेही आज माणसाला शक्य नाही.
लाऊडस्पीकरवर वाजवली जाणारी कर्णकर्कश्श गाणी, सिनेमागीते, डिस्को, वाढलेली रहदारी, वाहनांचे कर्णकटू आवाज या साऱ्यांनी ध्वनिप्रदूषण निर्माण केले आहे. २० ते ७० डेसिबल इतका आवाज ऐकू शकण्याची व सहन करण्याची क्षमता असणाऱ्या माणसाच्या कानांनी धोक्याची घंटा वाजवण्यास सुरुवात केली आहे. 



१०० च्या पेक्षा जास्त डेसिबलचा आवाज ऐकून विघ्नहर्त्याने गणेशोत्सवात कुणाकडे दाद मागावी? याहीपेक्षा भयानक आहे ते म्हणजे 'मानसिक प्रदूषण' वाढती गुन्हेगारी, बालिका-हत्या, भ्रष्टाचार, वशिलेबाजी, युवा पिढीची उदासीनता, जुन्या पिढीची निष्क्रियता, व्यसनाधीनता, अति सुखासीनता यामुळे मानवी मनच कलुषित झालं आहे, प्रदूषित झालं आहे. ही समस्या हा प्रत्येक राष्ट्राचा ज्वलंत प्रश्न आहे. ही एक राष्ट्रीय समस्या आहे. मग यावर उपाय तो कोणता? 'स्वच्छ पर्यावरण', चांगल्या विचारांचं मन हे कुठल्याही उदबत्तीच्या सुवासापेक्षाही सुवासिक आहे.  



१९७४ मधील Water Act व १९८१ मधील 'Clean air act' ची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे. कलम २७७, २७८, ८४ च्या नुसार गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे. ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून जसा साजरा केला जातो तसा प्रत्येक दिवस पर्यावरण दिन म्हणून मानला पाहिजे, पाळला पाहिजे. जमीन प्रदूषित करणारी रासायनिक खते व औषधी फवारे यांच्या अमर्याद वापरावर बंधन आणले पाहिजे. 'झाडे लावा, झाडे जगवा' ही मोहीम राबविणारे अण्णा हजारे घराघरातून निर्माण झाले पाहिजेत.



वाया गेलेल्यांतून नवीन गोष्टींचा जन्म झाला मळीपासून स्पिरीट,  शेणापासून गोबरगॅस, पेट्रोलियमपासून घरगुती गॅस निर्माण झाला तर ताजमहाल पुन्हा धवल बनेल, गंगा ' मैली' राहणार नाही! मनाची नि तनाची शुचिता व शुद्धता नष्ट करू पाहणाऱ्या या प्रदूषणरूपी प्रलयांतून मनुष्याच्या आशा-आकाक्षाचा मनू तरून जाणे सहज शक्य आहे फक्त गरज आहे ती कल्पकतेची, नियोजनाच्या होडीची!
मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

प्रदूषणाची समस्या मराठी निबंध

 मानवासहित सर्व सजीव प्राणी वनस्पतींना जगण्यासाठी संतुलित वातावरणाची आवश्यकता असते. संतुलित वातावरणात सर्व घटक एका निश्चित प्रमाणात असतात. परंतु जेव्हा वातावरणात या घटकांची उणीव निर्माण होते किंवा त्यात हानिकारक घटक मिसळतात तेव्हा वातावरण प्रदूषित होते व मानवासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नुकसानकारक ठरते. 



आज संपूर्ण जग प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रदूषणाने घर केले आहे आणि आपण पूर्णपणे त्याच्या मुठीत गेलो आहोत. प्राचीन काळात ही समस्या इतकी बिकट नव्हती. त्यावेळी प्रदूषणाचे नामोनिशाण नव्हते. निसर्गात एक प्रकारचे संतुलन होते. हवा, पाणी शुद्ध होते. पृथ्वीची उत्पादन शक्ती जास्त होती. हळूहळू लोकसंख्या वाढली. मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नित्य नवे कारखाने उघडू लागले. 



औद्योगिकीरणाच्या स्पर्धेत प्रत्येक राष्ट्र धावू लागले. ऐषआरामाच्या उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी भूगर्भातील बहुमूल्य संपत्ती खेचून बाहेर काढली जाऊ लागली. नैसर्गिक संपत्ती नष्ट होताच भूगर्भातील कोळसा, खनिजतेल, धातू यांचे वायुरूपात परिवर्तन होऊन संपूर्ण वातावरणाला व्यापून टाकेल आणि मग मानवाला जगणे मुश्किल होईल.



लोकसंख्येच्या वाढीमुळे निवासस्थानांचे संकट उत्पन्न झाले आहे. परिणामी लहान लहान भूखंडांवर लहान लहान घरे उभारली जात आहेत. दहा दहा मजली उंच इमारती तयार होत आहेत. या घरांमधे सूर्यप्रकाश व शुद्ध हवेचा अभाव असतो. जंगल कटाई करून राहण्यासाठी जागा उपलब्ध केली जात आहे. मानव स्वत:च या प्रदूषणाला कारणीभूत आहे. 



समुद्राला अमर्याद शक्तीचा स्वामी समजून सर्व कचरा समुद्रात टाकला जात आहे. नद्यापण आपले प्रदूषित पाणी समुद्रात मिसळतात. शास्त्रज्ञांनी सावधगिरीचा इशारा देऊनही औद्योगिक घटकांद्वारे केरकचरा समुद्रात टाकणे बंद न झाले तर लवकरच त्यातील मासे मरतील. सध्या हजारो जहाजे व पेट्रोलियम टॅकर्सची समुद्रातून वाहतूक होते. 


एकीकडे हे मानवाला प्रगतीकडे घेऊन जातात. तर दुसरीकडे लाखो टन पेट्रोलियमच्या गळतीमुळे किंवा अपघातामुळे समुद्राच्या पाण्यावर ते पसरते. समुद्राच्या पर्यावरणासाठी हा मोठा धोका आहे. या तेलात अनेक किमती धातू उदा. शिसे, निकेल, मँगेनीज इत्यादी असते. जे जीवजंतू किंवा वनस्पतीद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करून त्याचे नुकसान करते. नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे बिकट संकट विक्राळ रूप धारण करीत आहे.



ध्वनिप्रदूषणामुळे मानवाची श्रवणशक्ती क्षीण होते. त्यामुळे चिडचिडेपणा, थकवा, निद्रानाश, श्वासाचे रोग उत्पन्न होतात. शहरांची लोकसंख्या दिवसेदिवस वाढतच जात आहे. ग्रामीण जनतेचे शहरांकडे होणारे पलायन. शहरी जीवन कष्टमय बनवीत आहे. जो जो लोकसंख्येची घनता वाढते तो तो वाहुकीच्या साधनांत वाढ होते. इंधनावर चालणाऱ्या या वाहनांमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे वायुप्रदूषण होते. ज्यामुळे श्वासाचे अनेक रोग उद्भवतात उदा. फुप्फुसाचा कॅन्सर, दमा, खोकला, सर्दी इत्यादी वायुप्रदूषण मंदगतीने विषाचेच कार्य करते. 


परंतु भोपाळ वायू दुर्घटनेत निघालेला "मिथाईल आइसोसायनाईड" मुळे हजारो लोक तात्काळ मृत्यू पावले. जे लोक मेले ते मुक्त झाले पण जे वाचले ते कणाकणाने मरण्यासाठी आणि विकसनशील राष्ट्रांतील विज्ञानाचा शाप सहन करण्यास विवश झाले. औद्योगिकीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तिमुळे कारखान्यांतून निघणारे विषारी वायू हवा विषमय करतात. कारखान्याजवळ लावलेल्या झाडांवर काजळीची पुटे चढ़तात. मग तेथेच वास्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल काय? अल्ट्राव्हायोलेट (अतिनील) किरणांपासून पृथ्वीला वाचविणाऱ्या ओझोनलाही छिद्र पडले आहे.



निसर्गाशी मानवाचा अयोग्य व्यवहार या समस्येला आणखीनच गंभीर करतो. जंगल कटाई करणे, उद्याने उजाडणे आणि वातावरण शुद्ध ठेवणाऱ्या झाडांना नष्ट करणे हा मानवाचा स्वभावच बनला आहे. जर आता वृक्षारोपण मोहीम वेगाने चालविली नाही तर प्रदूषण हा एक असाध्य रोग बनेल. आज शेतीव्यवसायाचे यांत्रिकीकरण झाले आहे. त्यामुळेही पर्यावरणाचे प्रदूषण होते. 


अधिक उत्पादनासाठी शेतात लाखो टन रासायनिक खते टाकली जातात कीटकनाशके फवारली जातात. वाढत्या शेतीउत्पादनासाठी मानवाला खूप मोठी किंमत चुकवावी लागते. हीच रसायने हळूहळू अन्नाद्वारे आपल्या पोटात जातात व अनेक रोगांचे कारण बनतात. । आजकाल ग्राहकांना आकर्जून घेण्यासाठी फळे, धान्ये इत्यादींना  कृत्रिम रंग दिले जातात. हे रंग आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात.



संपूर्ण पृथ्वी प्रदूषित करून मानवाला चैन पडले नाही म्हणून त्याने खाद्य पदार्थही दूषित करण्यास सुखात केली. तापमानाचे प्रदूषण होणे पण मानवासाठी घातक आहे. वातावरणाचे तापमान वाढले की हिमखंड वितळू लागतात. जर बर्फाचे पर्वत वितळू लागले तर संपूर्ण पृथ्वी जलमय होईल. 




ही समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ विचार करीत आहेत. अनेक प्रत्यत्नानंतर थोडेसे यश मिळाले आहे. दाट लोकसंख्येपासून कारखाने दूर नेले जावेत. विषारी वायू जाण्यासाठी उंच चिमण्या बसविण्यात याव्यात. विषारी वायू बाहेर निघण्यापूर्वीच नष्ट करण्यात यावेत. 




केरकचऱ्याचा उपयोग जमिनीच्या भरावासाठी करण्यात यावा, पिकांवर जास्त प्रमाणात कीटकनाशके फवारू नयेत, नैसर्गिक रूपात धान्य ग्राहकाला मिळावे, गावांतून शहरांकडे जाणाऱ्या बुद्धिजीवींचे पलायन थांबविण्यासाठी गावातच रोजगार उत्पन्न करुन द्यावा. वृक्षतोड बंद करून वृक्षारोपण मोहीम राबवावी. कारखान्यांतील सांडपाण्याचे शुद्धीकरण करावे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करावे. बायोडिग्रेडेबल गॅसचा वापर करावा.



जगात सर्वात जास्त चर्चा प्रदूषणाची होते. शास्त्रज्ञ प्रदूषण थांबविण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. प्रत्येकाने या कामात मदत केली पाहिजे. जर असे केले नाही तर स्वर्गापेक्षाही प्रिय असणाऱ्या पृथ्वीची स्थिती कशी होईल ते आपण जाणतोच.

हा  निबंध तुमच्या मित्रमंडळी सोबत व  व्हाट्सअँप ग्रुपवर  शेयर करून लोकसंख्या जनजागृती निर्माण करण्यासाठी हातभार लावावा  हि नम्र  विनंती.  पुढील  निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 3


प्रदूषण एक समस्या:  भौतिक सुखाच्या मागे पळताना प्रदूषण आपला पाठलाग करीत आहे . याकडे आपले लक्ष नसते. आजच्या विज्ञानयुगात प्रगतीचे बोट धरून प्रदूषणाने थैमान घातले आहे. कधी काळी कारखाने , वीज केंद्रे यांपासून माणूस खूप दूर होता . मुक्त निसर्गात मोकळेपणे तो श्वास घेत होता. आता मात्र त्याचा श्वास घुसमटतो आहे. हवेतले ऑक्सीजन कमी झाले आहे कारण प्रदूषित हवा आपल्याला मिळत आहे. 


कारखान्याचे धूर, रसायनांचा गंध , दूषित पाण्याची विल्हेवाट , प्लास्टिक, खते यांचा अतिरेक , जंगलतोड, वाहनांची वाढती संख्या या सर्वांनी मिळून वायूप्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनिप्रदूषण याबरोबरच मानसिक प्रदूषणाची देणगी आपणास दिली आहे. आपले आरोग्य धोक्यात आणले आहे.



५ जून जागतिक पर्यावरणदिन' आणि '२२ एप्रिल-वसुंधरा दिन' म्हणून आपण साजरे करतो. पण खऱ्या अर्थाने प्रत्येकाने प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. हवा, अन्न, पाणी दूषित मिळाले तर आरोग्य चांगले कसे राहील? ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्या तर आपण करू शकतो ना? वृक्ष लावा-वृक्ष जगवा' हे तत्व आपण स्वीकारावे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा. कचरा इतरत्र न फेकता कचराकुंडीतच टाकावा. धूर होईल असे इंधन लाकडे वगैरे वापरू नये. 



घर व घराचा परिसरच नव्हे तर आपले गाव , आपला देश स्वच्छ सुंदर कसा राहील, यासाठी आपले प्रयत्न हवेत . So Clean Society चा अहवाल सांगतो. की फक्त एकट्या मुंबईत १७०० टन प्रदूषिते हवेत सोडली जातात. वीस लाख लिटरपेक्षा जास्त सांडपाणी जमा होते. तीन हजार टन गोबरगॅस गोळा होतो. चर्नेबील अणुभट्टीतला स्फोट, भोपाळची वायू दुर्घटना, कर्नाटकमधील दोनशे हत्तींची हत्या व चंदनतस्करी अशा घटना म्हणजे. स्वच्छ पर्यावरणावर गदा होय.


पृथ्वीदिन साजरा होतो. त्याच दिवशी कोलकत्ता येथे प्रचंड प्रमाणावर वृक्षतोड झाली. मध्य प्रदेशातील अभयारण्यात आगी लावण्यात आल्या निसर्ग व मानव यांच्यातले हे युध्द प्रदूषणाने झाकळून आपला विनाश करीत आहे. मास्कोच्या हवेत दरवर्षी दहा लाख टन प्रदूषिते सोडली जातात. 



दामोदर नदीत चुकीने लाखो टन तेल ओतले गेले हे सर्व काही का होते? बॉम्बस्फोट होतात. तापमानात बदल होतो. ऋतूचक्र उलटे फिरू लागते. एकूण भूपृष्ठाच्या ४०% जंगले हवीत पण भारतात हे प्रमाण ७ ते ८ % आहे. वाढती लोकसंख्या, वाढती वाहने, वाढती कारखानदारी, अपघात , कुजणारी शरीरे , खेड्यातील गटारे, शहरातील वाढती गर्दी या साऱ्या गोष्टींमुळे प्रदूषण वाढत चालले आहे.



'हरितश्यामल व निर्मल वसुधा' हवी असेल तर प्रदूषणाचे गंभीर धोके लक्षात घेऊन उपाययोजना झालीच पाहिजे. १९७४ मधील Water Act व १९८१ मधील Clean Air Act ची अंमलबजावणी झालीच पाहिजे . हवेत कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. ओझोन वायू कमी होत आहे. पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी ओझोन आवश्यक आहे. प्रदूषण कमी झालेच पाहिजे. उत्सवात होणारे ध्वनिप्रदूषण आपण टाळले पाहिजे. 


जमीन प्रदूषित करणारी रासायनिक खते, औषधे यांचा अतिरेक नको. प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावून जोपासले पाहिजे . तसेच माणुसकी जागी ठेवून मानसिक प्रदूषण होऊ न देण्यासाठी जागरूक राहिले पाहिजे तरच या पृथ्वीवर आपण सुखाने नांदू शकू.



नियोजनाला कृतीची जोड हवी प्रत्यक्ष कृतीने समस्या सुटते केवळ मनोरथांनी नाही. ही समस्या वैयक्तीक नाही. ती सर्वांची आहे. सर्वांनी मिळून ती सोडवायला हवी. वाढत्या प्रदूषणाने निसर्गाचा समतोल अधिक ढासळला तर भारतासारख्या कृषिप्रधान देशाचे भवितव्य काय? प्रगती व विकास स्वच्छ पर्यावरणानेच शक्य आहे. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी ते आवश्यक आहे.



परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थिती बदलणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी खूप प्रयत्न हवेत . प्रदूषणाची गगनचुंबी भिंत पाडून निसर्ग व विज्ञान यांच्या मिलनाने पृथ्वीवर स्वर्ग आणू या .....
प्रदूषण हटवू या.... प्रदूषण पळवू या....

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

निबंध 4

प्रदूषणाची समस्या मराठी निबंध


मानवासहित सर्व सजीव प्राणी वनस्पतींना जगण्यासाठी संतुलित वातावरणाची आवश्यकता असते. संतुलित वातावरणात सर्व घटक एका निश्चित प्रमाणात असतात. परंतु जेव्हा वातावरणात या घटकांची उणीव निर्माण होते किंवा त्यात हानिकारक घटक मिसळतात 


तेव्हा वातावरण प्रदूषित होते व मानवासाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात नुकसानकारक ठरते. आज संपूर्ण जग प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रदूषणाने घर केले आहे आणि आपण पूर्णपणे त्याच्या मुठीत गेलो आहोत. 



प्राचीन काळात ही समस्या इतकी बिकट नव्हती. त्यावेळी प्रदूषणाचे नामोनिशाण नव्हते. निसर्गात एक प्रकारचे संतुलन होते. हवा, पाणी शुद्ध होते. पृथ्वीची उत्पादन शक्ती जास्त होती. हळूहळू लोकसंख्या वाढली. मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नित्य नवे कारखाने उघडू लागले. 


औद्योगिकीरणाच्या स्पर्धेत प्रत्येक राष्ट्र धावू लागले. ऐषआरामाच्या उपभोग्य वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी भूगर्भातील बहुमूल्य संपत्ती खेचून बाहेर काढली जाऊ लागली. नैसर्गिक संपत्ती नष्ट होताच भूगर्भातील कोळसा, खनिजतेल, धातू यांचे वायुरूपात परिवर्तन होऊन संपूर्ण वातावरणाला व्यापून टाकेल आणि मग मानवाला जगणे मुश्किल होईल.


लोकसंख्येच्या वाढीमुळे निवासस्थानांचे
संकट उत्पन्न झाले आहे. परिणामी लहान लहान भूखंडांवर लहान लहान घरे उभारली जात आहेत. दहा दहा मजली उंच इमारती तयार होत आहेत. या घरांमधे सूर्यप्रकाश व शुद्ध हवेचा अभाव असतो. 


जंगल कटाई करून राहण्यासाठी जागा उपलब्ध केली जात आहे. मानव स्वत:च या प्रदूषणाला कारणीभूत आहे. समुद्राला अमर्याद शक्तीचा स्वामी समजून सर्व कचरा समुद्रात टाकला जात आहे. नद्यापण आपले प्रदूषित पाणी समुद्रात मिसळतात. 



शास्त्रज्ञांनी सावधगिरीचा इशारा देऊनही औद्योगिक घटकांद्वारे केरकचरा समुद्रात टाकणे बंद न झाले तर लवकरच त्यातील मासे मरतील. सध्या हजारो जहाजे व पेट्रोलियम टॅकर्सची समुद्रातून वाहतूक होते. एकीकडे हे मानवाला प्रगतीकडे घेऊन जातात. 


तर दुसरीकडे लाखो टन पेट्रोलियमच्या गळतीमुळे किंवा अपघातामुळे समुद्राच्या पाण्यावर ते पसरते. समुद्राच्या पर्यावरणासाठी हा मोठा धोका आहे. या तेलात अनेक किमती धातू उदा. शिसे, निकेल, मँगेनीज इत्यादी असते. जे जीवजंतू किंवा वनस्पतीद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करून त्याचे नुकसान करते. 



नद्यांच्या पाण्याचे प्रदूषण झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे बिकट संकट विक्राळ रूप धारण करीत आहे. ध्वनिप्रदूषणामुळे मानवाची श्रवणशक्ती क्षीण होते. त्यामुळे चिडचिडेपणा, थकवा, निद्रानाश, श्वासाचे रोग उत्पन्न होतात. शहरांची लोकसंख्या दिवसेदिवस वाढतच जात आहे. 


ग्रामीण जनतेचे शहरांकडे होणारे पलायन. शहरी जीवन कष्टमय बनवीत आहे. जो जो लोकसंख्येची घनता वाढते तो तो वाहुकीच्या साधनांत वाढ होते. इंधनावर चालणाऱ्या या वाहनांमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे वायुप्रदूषण होते. ज्यामुळे श्वासाचे अनेक रोग उद्भवतात उदा. फुप्फुसाचा कॅन्सर, दमा, खोकला, सर्दी इत्यादी वायुप्रदूषण मंदगतीने विषाचेच कार्य करते. 


परंतु भोपाळ वायू दुर्घटनेत निघालेला "मिथाईल आइसो सायनाईड" मुळे हजारो लोक तात्काळ मृत्यू पावले. जे लोक मेले ते मुक्त झाले पण जे वाचले ते कणाकणाने मरण्यासाठी आणि विकसनशील राष्ट्रांतील विज्ञानाचा शाप सहन करण्यास विवश झाले.


औद्योगिकीकरणाच्या वाढत्या प्रवृत्तिमुळे कारखान्यांतून निघणारे विषारी वायू हवा विषमय करतात. कारखान्याजवळ लावलेल्या झाडांवर काजळीची पुटे चढ़तात. मग तेथेच वास्तव्य करणाऱ्या लोकांबद्दल काय? अल्ट्राव्हायोलेट (अतिनील) किरणांपासून पृथ्वीला वाचविणाऱ्या ओझोनलाही छिद्र पडले आहे.


निसर्गाशी मानवाचा अयोग्य व्यवहार या समस्येला आणखीनच गंभीर करतो. जंगल कटाई करणे, उद्याने उजाडणे आणि वातावरण शुद्ध ठेवणाऱ्या झाडांना नष्ट करणे हा मानवाचा स्वभावच बनला आहे. जर आता वृक्षारोपण मोहीम वेगाने चालविली नाही तर प्रदूषण हा एक असाध्य रोग बनेल. आज शेतीव्यवसायाचे यांत्रिकीकरण झाले आहे.



त्यामुळेही पर्यावरणाचे प्रदूषण होते. अधिक उत्पादनासाठी शेतात लाखो टन रासायनिक खते टाकली जातात व कीटकनाशके फवारली जातात. वाढत्या शेतीउत्पादनासाठी मानवाला खूप मोठी किंमत चुकवावी लागते. हीच रसायने हळूहळू अन्नाद्वारे आपल्या पोटात जातात व अनेक रोगांचे कारण बनतात. 


आजकाल ग्राहकांना आकषून घेण्यासाठी फळे, धान्ये इत्यादींना ला कृत्रिम रंग दिले जातात. हे रंग आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. संपूर्ण पृथ्वी प्रदूषित करून मानवाला चैन पडले नाही म्हणून त्याने खाद्य पदार्थही दूषित करण्यास सुखात केली. तापमानाचे प्रदूषण होणे पण मानवासाठी घातक आहे. 



वातावरणाचे तापमान वाढले की हिमखंड वितळू लागतात. जर बर्फाचे पर्वत वितळू लागले तर संपूर्ण पृथ्वी जलमय होईल, ही समस्या सोडविण्यासाठी अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ विचार करीत आहेत. अनेक प्रत्यत्नानंतर थोडेसे यश मिळाले आहे. दाट लोकसंख्येपासून कारखाने दूर नेले जावेत. 


विषारी वायू जाण्यासाठी उंच चिमण्या बसविण्यात याव्यात. विषारी वायू बाहेर निघण्यापूर्वीच नष्ट करण्यात यावेत. केरकचऱ्याचा उपयोग जमिनीच्या भरावासाठी करण्यात यावा, पिकांवर जास्त प्रमाणात कीटकनाशके फवारू नयेत, नैसर्गिक रूपात धान्य ग्राहकाला मिळावे, गावांतून शहरांकडे जाणाऱ्या बुद्धिजीवींचे पलायन थांबविण्यासाठी गावातच रोजगार उत्पन्न करुन द्यावा. 



वृक्षतोड बंद करून वृक्षारोपण मोहीम राबवावी. कारखान्यांतील सांडपाण्याचे शुद्धीकरण करावे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करावे. बायोडिग्रेडेबल गॅसचा वापर करावा. जगात सर्वात जास्त चर्चा प्रदूषणाची होते. शास्त्रज्ञ प्रदूषण थांबविण्यासाठी नवनवे तंत्रज्ञान विकसित करीत आहेत. 


प्रत्येकाने या कामात मदत केली पाहिजे. जर असे केले नाही तर स्वर्गापेक्षाही प्रिय असणाऱ्या पृथ्वीची स्थिती कशी होईल ते आपण जाणतोच. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . 


pradushan ek samasya in marathi essay | प्रदूषण एक समस्या मराठी निबंध