cow essay in marathi | गाय मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण गाय मराठी निबंध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये भारतात गायीला विषेश महत्‍व का आहे व प्राचीन भारतापासुन आजपर्यत गाय मानवाला कश्‍याप्रकारे मदत करत आलेली आहे ते या निबंधात स्‍पष्‍ट केले आहे . चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.

cow-essay-in-marathi
cow-essay-in-marathi



भारतात गाय पूजनीय आहे. प्राचीन काळात साधू संत, ऋषिमुनी आपल्या आश्रमात गाई पाळत असत. महर्षी जाबालीने आपला शिष्य सत्यकामवर गोसेवेची जबाबदारी सोपविली होती. आणि त्यांना तोपर्यंत चारीत राहण्याचा आदेश दिला होता जो पर्यंत त्यांची संख्या दुप्पट होणार नाही. 


गाईला चार पाय, एक लांब शेपूट असते जिने ती तिच्या पाठीवर बसणारे, पक्षी, माशा, डांस उडविते. तिला दोन मोठे-मोठे सुंदर डोळे असतात. तिचा रंग पांढरा, काळा, लाल, मातकट असतो. खेळाच्या मैदानावर, रस्त्यावर, मोकळ्या जागी ती चरतांना दिसते. 


गाय पाळीव प्राणी आहे. तिचे दूध पौष्टिक व पचायला हलके असते. प्राचीन काळात घरे मातीची असत ती गाईच्या शेणाने सारवीत असत. इंधन म्हणून शेणाच्या गोवऱ्या जाळीत असत. आता गोबर गॅस वापरतात यातून धूर निघत नसल्यामुळे शरीरावर वाईट परिणाम होत नाहीत. गोबर गॅस हे अतिशय स्वस्त इंधन आहे. बैलांचा उपयोग शेतीच्या कामासाठी केला जातो. खेड्यातील स्त्रिया अजूनही शेणानेच चूल सारवितात . शेणाचा उपयोग खतासाठी केला जातो. गोमूत्राचा उपयोग औषधे तयार करण्यासाठी होतो. 


गाईची उपयुक्तता लक्षात घेऊन सरकारने गोशाळा स्थापन करून बेवारस गायींची सोय केली पाहिजे. गाईंची कत्तल थांबविली पाहिजे. ईश्वराकडून मिळालेले श्रेष्ठ बक्षीस 'गाय' आहे. भारतीय परंपरेतील पूज्य पशृंमध्ये गाईचे स्थान आहे. गाय बहुउपयोगी  असल्यामुळे तिला कामधेनू म्हणतात. अशा प्रकारे हा एक उपयुक्त पाळीव प्राणी आहे.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

cow essay in marathi | गाय मराठी निबंध

my pet cat essay in marathi  | माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध बघणार आहोत. माझ्या घरी मनीमाऊ नावाची छोटीशी गोंडस मांजर आहे या निबंधाच्‍या मदतीने आज  आपण तिच्‍याबद्दलच माहीती करून घेऊया  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


my-pet-cat-essay-in-marathi
my-pet-cat-essay-in-marathi



पशू-पक्षी, मनुष्याचे जीवन साथी आहेत. गाय, म्हैस, शेळी, मेंढीपासून आपणांस दूध मिळते. कुत्रे आपल्या शेताची आणि घराची राखण करतात. पोपट, कबुतर, ससे, मांजर, पाळल्याने आपल्याला आनंद मिळतो. आपल्या गरजेनुसार आणि आवडीनुसार लोक पशू पक्षी पाळतात. माझ्या बऱ्याच मित्रांजवळ कोणता ना कोणता पाळीव प्राणी आहे.


मी पण एक छोटीशी सुंदर मांजर पाळली आहे. आम्‍ही लाडाने तिला  मनीमाऊ म्‍हणतो तिचा रंग पांढरा व काळा आहे. तिचे डोळे चमकदार निळ्या रंगाचे आहेत. आम्ही सगळे तिला 'मनीमाऊ' म्हणतो. मनीमाऊ म्हणून हाक मारताच ती धावत माझ्याजवळ येऊन बसते. मी तीला रोज दूध, ब्रेड, बिस्किट खाऊ घालतो. साबण लावून तिला आंघोळ घालतो. 


माझी मनीमाऊ मांजर पूर्णपणे शाकाहारी आहे. ती आज्ञाधारक आहे. घरात अजिबात घाण करीत नाही. त्यासाठी मी तिला बाहेर घेऊन जातो. संध्याकाळी तिला घेऊन मी बागेत फिरावयास जातो. तिथे मी तिच्याबरोबर खेळतो, धावतो तेव्हा ती शेपटी फुगवून म्याऊँ-म्याऊँ करून आपला आनंद व्यक्त करते.


मनीमाऊ घरात मुक्तपणे फिरते. परंतु खाण्याचे पदार्थ खराब करीत नाही. दारावरची घंटी वाजली की तिचे कान उभे राहतात. मग लगेच ती दाराकडे धावत जाते. जणु  आमचे स्वागतच करते. कधी-कधी ती एखादा उंदीर पकडून बाहेर पळून जाते. कुत्रा मांजरीचा शत्रू असतो. पण तीच कुत्र्यावर धावून जाते. थंडीच्या दिवसांत ती  गच्चीवर जाऊन उन्हात बसते. उन्हाळ्यात सोफ्याखाली नाही तर पलंगाखाली जाऊन बसते. मनीमाऊ मला खूप आवडते. मी कुठे बाहेर गेलो तर मला तिची खूप आठवण येते.


मित्रांनो my favourite animal cat in marathi  तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व तुमच्‍या घरी कोणताही पाळीव प्राणी असल्‍यास त्‍याचे नाव  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

my pet cat essay in marathi | माझा आवडता प्राणी मांजर मराठी निबंध

 vij nasti tar marathi nibandh | वीज नसती तर मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वीज नसती तर मराठी निबंध  बघणार आहोत.  कोणत्‍याही वस्‍तुचे हे फायदे तोटे असतातच हेच तत्‍व विजेबाबत लागु पडते दैनदिन जिवनात आवश्‍यक असणारी विज नसती तर त्‍याचे काय परीणाम झाले असते हें या निबंधात दिले आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. 


vij-nasti-tar-marathi-nibandh
vij-nasti-tar-marathi-nibandh



परवाच एका झोपडपट्टीला मोठी आग लागली. सुमारे अडीच हजार झोपड्या जळून खाक झाल्या. गोरगरिबांच्या उभ्या संसाराची राख झाली. सुमारे दीडशे माणसे होरपळून मेली. त्यांत तीन-चार महिन्यांच्या बाळापासून ते सत्तर वर्षांच्या वृद्धापर्यंतची माणसे होती. होरपळेलेली, आपल्या वस्तू, आपले जिवलग यांचा जिवाच्या आकांताने शोध घेत सैरावैरा झालेली हजारो माणसे T.V.  पडद्यावर पाहताना काळीज पिळवटून निघत होते. T.V. वर  बघणेही नकोसा वाटणारा हा हृदयद्रावक प्रसंग निर्माण केला होता विजेने ! 


होय, विजेनेच ! शॉर्टसर्किट होऊन आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. या विजेनेच क्षणार्धात होत्याचे नव्हते करून टाकले होते ! ही वीज नसती ना, तर हा उत्पात घडलाच नसता ! कधी कधी मनात येते, माणसाने ही वीज निर्माण करून संकटाचा केवढा मोठा डोंगर उभा करून ठेवला आहे ! खरंच, माणसाने ही वीज निर्माण करायलाच नको होती. नसतीच ही वीज, तर किती बरे झाले असते !


खरोखर, ही वीज निर्माणच झाली नसती तर ? तर... रात्री झगमगीत वाटल्या नसत्या ! माणसाला निरांजनाची-समईची ज्योत, मेणबत्तीचा, कंदिलाचा उजेड यांचाच आश्रय घ्यावा लागला असता. आनंदाच्या प्रसंगी केली जाणारी रंगीबेरंगी नेत्रदीपक रोषणाई केवळ स्वप्नात वा कल्पनेतच राहिली असती.


जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विजेचे विलक्षण सामर्थ्य मानवासाठी उपयुक्त ठरले आहे. आज घरातील सर्व प्रकारच्या कामांत वीज ही गृहिणीची सखी झाली आहे. दळणे, कापणे, भाजणे, शिजवणे, केर काढणे, कपडे धुणे, स्वच्छता करणे अशा अनेक कामांत तिला विजेची मोलाची मदत मिळते.


आजच्या या यंत्रयुगात बरीचशी यंत्रे फिरतात, ती विजेच्या सामर्थ्यावर. वीज नसती तर इतकी यंत्रे फिरली नसती. औदयोगिक क्षेत्रात आज झालेली मानवाची प्रगती विजेविना शक्य झाली असती का? अगदी वैदयकीय क्षेत्रातही ही वीज मोठी कामगिरी करते. अशक्त बाळाला 'इनक्युबेटर'मध्ये ठेवले जाते, त्यासाठी वीज हवीच असते. शल्यविशारद शस्त्रक्रिया करतात, तेव्हा वीज आवश्यक असते.


आज विजेवर चालणाऱ्या T.V. मुळे तसेच इंटरनेटमुळे आपण घरात बसून जगाचा फेरफटका मारू शकतो. संगणकामुळे जग जवळ आले आहे. ज्ञानविज्ञानाची भांडारे खुली झाली आहेत. वीज नसती तर हे कसे शक्य झाले असते? अंतरिक्षातील ही शक्ती माणसाने आपल्या मुठीत बंद करून घेतली आहे. ती जर त्याने गमावली, तर तो दुबळा व असहाय होईल.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

vij nasti tar marathi nibandh | वीज नसती तर मराठी निबंध

 petrol sample tar marathi nibandh | पेट्रोल संपले तर मराठी निबंध 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पेट्रोल संपले तर मराठी निबंध बघणार आहोत.पेट्रोल व डिझल सारख्‍या खनिज तेलावर  मयार्देपेक्षा अवलंबुन राहील्‍यावर त्‍याचे काय परीणाम होत आहेत व ते संपल्‍यावर काय परीणाम होतील याबद्दल या निबंधात सविस्‍तर माहीती दिली आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


petrol-sample-tar-marathi-nibandh
petrol-sample-tar-marathi-nibandh




भौतिक सुखाचा दिवा पेट्रोलवर  तेवतो' हे आजच्या युगातील सुभाषितच म्हणावे लागेल. आज आलेली जीवनाची गती हे पेट्रोलने दिलेलं वरदान आहे. आज ऑस्ट्रेलियात सकाळचा चहा घेऊन भारतात जेवण करून दुपारचा चहा इंग्लंडमध्ये घेऊन रात्री जेवून झोपायला अमेरिकेत जाणे हे यामुळेच शक्य आहे. आजचे युग हे प्लॅस्टिकचे युग मानले जाते त या पेट्रोलमुळेच ! 


निसर्गान आपल्या जादुइ पोतडीतून मानवाला पेट्रोल दिल आणि माणूस हरकुन गेला. त्याची चालच बदलली. तो धावू लागला सुसाट वेगाने ! शाब्दिक आणि लाक्षणिक अर्थानेही !  पण माणूस मुळातच हावरट. 'अजून' अजून' चा जप तो सोडत नाही. हव्यास ही जशी प्रगतीची निशाणी तशी अधोगतीचीही ! कुठे थांबावे ? हेच माणसाला कळत नाही.


 खनिज तेल निसर्गाने पृथ्वीच्या पोटात साठवले, ते मानवाने उकरून काढले... वापरले, वापरत आहे...पण किती अमर्याद ? त्यात माणूस हा प्राणी नंबर एकचा अप्पलपोटा, स्वार्थी, लबाड आणि भांडकुदळ. ' तुझे ते माझे आणि माझे तेही माझेच' ही त्याची वृत्ती ! त्यातूनच उद्भवले हे आखाती युद्ध.साऱ्या जगाला, विशेषत: भारतासारख्या विकसनशील देशांना वेठीला धरणारे. सद्दाम हुसेनने तर उद्दाम होऊन मुद्दाम तेल विहिरी पेटवून दिल्या, समुद्रात तेल सोडून दिले. त्यावर अमेरिका अणुयुद्धाची' बेजबाबदार भाषा बोलते आहे. त्यामुळे साऱ्या तेलविहिरी नष्ट वा निरुपयोगी होतील. मग पुढे ?... तर काय, भौतिक सुखांचा दिवा फडफडू लागेल अन् काही काळाने 'राम' म्हणेल आणि मग माणसाचे डोळे खाडकन् उघडतील.


 आपणच मांडून ठेवलेल्या पसाऱ्याचा अडथळा होऊ लागेल. दळणवळण कोलमडेल. स्कूटर्स, मोटारी आपापल्या जागीच थांबून राहतील. जणू पुतळेच. प्रवास खडतर होईल. संथ होईल. घोडागाडी, बैलगाडी, सायकली आणि स्वतःचे पाय वापरावे लागतील. वेगात चाललेल्या वाहनाला ब्रेक लागून गतिरोध व्हावा तसे जीवन होईल. व्यापार धोक्यात येईल. जिथे जे पिकत नाही तिथे ते पोहचविणे अडचणिचे होईल. महागाई आभाळाला टेकेल तर नश्वर पदार्थांचे अवमूल्यन होईल. द्राक्ष, आंबे यांना विदेश दिसणार नाही. परकीय चलन बुडेल. देशाच्या तिजोरीवर ताण पडेल. एखाद्या वटवृक्षाने स्वतःच 'बोनसाय' बनावे तसे मानवी जीवन खुरटलेलं होईल.


पण यातून काही फायदेही होतील. माणूस निसर्गाच्या जवळ जाईल. प्रदूषणाच्या छायेतुन  बाहेर पडेल, कारण कारखाने पक्षाघात झाल्यासारखे होतील. हातपाय वापरल्याने कात टाकलेल्या सापाप्रमाणे त्याच्यातील चैतन्य पुन्हा सळसळू लागेल...अज्ञात साठे-तेलाचे तो हुडकून काढेल, आणि नाहीच मिळाले तर पर्यायी इंधन तो शोधल-माणूस तसा हिकमती आहे ! 


सौरऊर्जा, समुद्राच्या लाटांपासून तसेच, अणुऊर्जा असे काही ना काही तो शोधेलच. 'गरज ही शोधाची जननी आहे.' माणसाजवळ तेवढी क्षमता नक्कीच आहे. चंद्रावर पाऊल उमटवणाऱ्या मानवी मेंदूला अशक्य काहीच नाही. खनिज तेल संपल्याने जीवनमान दोन पावलं मागे येईल ते पुढची मोठी उडी घेण्यासाठीच !

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

petrol sample tar marathi nibandh | पेट्रोल संपले तर मराठी निबंध

 jangal tod ek samasya marathi nibandh | जंगलतोड  एक समस्या मराठी निंबध


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जंगलतोड  एक समस्या मराठी निंबध बघणार आहोत.  या निबंधामध्‍ये मानवाने स्‍वताची प्रगती करण्‍यासाठी कश्‍याप्रकारे जंगलतोड करून पर्यावरणाची हानी केली आहे व याचे कोणकोणते विपरीत परीणाम होत आहेत याबद्दल सविस्‍तर निबंध दिला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


jangal-tod-ek-samasya-marathi-nibandh
jangal-tod-ek-samasya-marathi-nibandh



निसर्गाचे चिकित्सक अभ्यासक सांगतात की, मुंगीपासून गरुडापर्यंत सर्व मानवेतर प्राणी धरतीची प्रकृती सांभाळून आपली जीवनयात्रा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात; पण माणसाची बुद्धिमत्ता आणि त्याची कार्यशक्ती निसर्गाला शाप ठरली आहे. जंगलात लागणारा वणवा ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. पण काही वेळेला माणसाच्या हलगर्जीपणामुळेही जंगलात आगी लागतात आणि अफाट जंगलसंपत्ती नष्ट होते.माणसाने जास्तीत जास्त जंगलसंपत्ती नष्ट केली आहे. जंगले तोडून माणसाने नगरे वसवली. त्या नगरांतील आपल्या घरांसाठी, घरे सजवण्यासाठी माणसाने वारेमाप झाडे तोडली.


आज भारतातील जंगलांचा झपाट्याने होणारा नाश ही चिंतेची बाब ठरली आहे. वनक्षेत्र कमी झाल्यामुळे मातीची धूप व पुराचे प्रमाण वाढले आहे. अधिकाधिक भूप्रदेश ओसाड बनले आहेत. पर्जन्याचे प्रमाण कमी झाले आहे. पर्यावरणाच्या संतुलनाची समस्या निर्माण झाली आहे.


लाकडाचा उपयोग कागदाचा लगदा तयार करण्यासाठी केला जातो. यासाठीही अनेक जंगले तोडली जातात. जंगलतोड झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. वन उत्पादनामध्ये लाख, राळ, डिंक, औषधी वनस्पती, मध, मोह, विविध प्रकारचे गवत, रेशीम, वेत, बांबू इत्यादी असंख्य वस्तूंचा समावेश होतो. वनातील वृक्षावरील एक प्रकारच्या किड्यापासून लाख मिळते. 


बाभळीची साल कातडी कमावण्यासाठी व औषधासाठी उपयोगी असते. शेतकऱ्यांची अवजारे, क्रीडासाहित्य, काडेपेटीतील काड्या यांसाठी ही जंगलतोड होते. जंगलनाशाबरोबर जंगलातील प्राणी-पक्षीही कमी होत आहेत. वाघ व मोर यांची हौसेखातर प्रचंड हत्या होते, हे थांबायला हवे आहे. वृक्ष-संरक्षण कायदा केला गेला आहे. पण सर्व गोष्टी केवळ कायदयाने होत नाहीत. त्यासाठी सर्वसामान्य जनतेचे त्याला हार्दिक व विधायक सहकार्य हवे. 


जंगले नष्ट झाली की तेथील आदिवासींचेही प्रश्न उभे राहतात. 'मेळघाट प्रकल्प'सारख्या अनेक संस्था निर्माण झाल्या पाहिजेत आणि वनाच्या रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाला आपली वाटली पाहिजे. नाहीतर पुढील काळात एखादया भल्यामोठ्या ओसाड जागेवर पाटी लावावी लागेल - 'येथे जंगल होते.' 


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला व जंगलतोड थांबवण्‍यासाठी कोणते उपाय केले पाहीजेत  हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


jangal tod ek samasya marathi nibandh | जंगलतोड एक समस्या मराठी निंबध

bhaji vikretyache manogat marathi nibandh | भाजी विक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध 

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भाजी विक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. धन्‍यवाद या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. या निबंधामध्‍ये  एक भाजीव्रिकेत्‍या मुलाने स्‍वताचे मनोगत सांगीतले आहे . त्‍याची घरची परीस्‍थीती, ग्राहकांसोबत होणारी वागणुक व त्‍याचे स्‍वताच्‍या भविष्‍याविषयीचे निर्णय याबदृदल मनोगत स्‍वरूपात निबंध दिलेला आहे चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.


bhaji-vikretyache-manogat-marathi-nibandh
bhaji-vikretyache-manogat-marathi-nibandh



रोज ठरावीक वेळी 'दादा, भाजी' अशी आरोळी कानावर येते. विनायक एक पंधरा-सोळा वर्षांचा मुलगा आमच्या वसाहतीत रोज भाजीची गाडी घेऊन येतो. विनायकचे वागणे आदबशीर व नम्र असते. त्यामुळे तो सर्वांचा आवडता झाला आहे. एकदा या विनायकला मी बोलते केले. मुद्दाम त्याला संध्याकाळी बोलावून घेतले आणि त्याची माहिती विचारली.


"दादा, मी आठवी नापास आहे,' विनायक सांगत होता. "आठवी नापास झालो आणि शाळा सोडली, तेव्हाच माझा बाबा वारला आणि घरासाठी काम करण्याची गरज निर्माण झाली. पूर्वी हीच गाडी माझा बाबा फिरवत असे, तेव्हा गमतीने मी त्याच्याबरोबर फिरत असे, म्हणून या कामाची मला माहिती होती.


“भाजी आणण्यासाठी मला भल्यापहाटे मोठ्या मंडईत, घाऊक बाजारात जावे लागते. भाजी खरेदी झाली की माझी गाडी लावतो. काही गिहाईकांनी काही खास भाज्या आणायला सांगितलेल्या असतात. त्या मी अगदी आठवणीने आणतो आणि मग आमचा शहराकडे प्रवास सुरू होतो. मोठी मंडई तशी गावापासून खूप दूर आहे. त्यामुळे चालायचे खूप श्रम होतात. त्याच वेळी मन साशंकही असते. 'एवढी भाजी आज विकली जाईल ना?' कारण भाजी हा नाशिवंत माल आहे. पण बहुधा सगळा माल संपतो.



"या व्यवसायात खूप पायपीट करावी लागते. पण अनेक ग्राहकांशी माझे एवढे प्रेमाचे नाते निर्माण झाले आहे की, त्या पायपिटीचे मला काही वाटत नाही. कित्येक आजींना मी त्यांच्या घरात भाजी पोचवतो. मग त्या प्रेमाने मला चहापाणी देतात. संक्रांतीला आठवणीने तिळगूळ देणाऱ्या अनेक ताई-माई आहेत. कुणाकडे काही कार्य असले की, ते भाजीची भलीमोठी यादी देतात.


"काही त्रासदायक, कटकटी ग्राहकही भेटतात. पण मी कोणाशी वाद घालत नाही. त्यामुळे खटके उडत नाहीत. संध्याकाळचा वेळ मला मोकळा असतो. त्यावेळी मी वाचन करतो. रोजची वृत्तपत्रे वाचतो. साने गुरुजींची पुस्तके मला खूप आवडतात. माझे घर व्यवस्थित चालेल एवढे पैसे सध्या मला मिळतात. पण मी यात समाधानी नाही.


"एक छोटासा गाळा घेणार आहे. त्यामुळे दुपारनंतर मी तेथे भाजी विकू शकेन. पण काही झाले तरी मी माझी सकाळची फेरी सोडणार नाही; कारण त्यामुळे मला खूप स्नेहीसोबती मिळतात.'' विनायकच्या विचारांनी मला मनोमन आनंद झाला. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



मराठी 2 

bhaji vikretyache manogat marathi nibandh | भाजी विक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध 


"खूप दिवस मनात इच्छा होती की कुणाशी तरी मन मोकळे करावे; पण तशी संधीच मिळत नव्हती. आज मिळाली आहे तर माझे मनोगत मी व्यक्त करतो. "मी एक भाजी विक्रेता आहे. आमचे वडील मळ्यात भाजीपाला पिकवीत आणि उरलेला वेळ विठ्ठलभक्तीत घालवीत. पुढे कुटुंब वाढले. 


थोड्याशा जमिनीवर कुटुंबाचे पोट भरेना. मग माझे आईवडील शहरात येऊन भाजी विकू लागले. मी आणि माझा भाऊ जवळच्याच शाळेत शिकायला जात असू. "दहावी पास झाल्यावर मी आईबाबांच्या कामातच लक्ष घातले. रस्त्याच्या बाजूला एक पत्र्याची शेड उभी केली. 


माझे दुकान सुरू झाले. पहाटे मी मोठ्या मार्केटमध्ये जाऊन ताजी भाजी खरेदी करीत असे. आता भाज्यांबरोबर मी ताजी फळेही दुकानात ठेवू लागलो. उत्तम माल, अचूक माप आणि उत्कृष्ट वागणूक म्हणून माझे 'आनंद भाजी-फूटस् मार्ट' सदैव गजबजलेले असे. 


अनेक ग्राहक महिलांनी विनंती केल्यामुळे आम्ही आता दुकानात भिजवलेली कडधान्येही ठेवू लागलो. हिरवीगार भाजी, ताजी फळे व चवदार कडधान्ये माझ्या दुकानात विक्रीला असतात.


"त्याच वेळी एक दुर्दैवी घटना घडली. रस्ता रुंदीकरण आले आणि आमचे दुकान उडाले. मग मी एक गाडी घेतली आणि फिरता भाजी-विक्रेता झालो. कष्ट वाढले तरीपण भाजीचा खप होत होता. तेवढ्यात आणखी एक नवे संकट कोसळले. नव्या शहरात नवे नवे 'मॉल' उभे राहिले आणि तेथे शेतावरची ताजी भाजी स्वस्तात मिळू लागली.


मॉलमध्ये जाऊन भाजी खरेदी करण्याची रीत आली आणि आमचा धंदा बसला. आता कोणाकडे तक्रार करायची? भविष्यात मी भाजी-विक्रेता राहणार का? याचीच मला चिंता लागून राहिली आहे." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद

[शब्दार्थ : चवदार - tasty. स्वादिष्ट. स्वादिष्ट। कडधान्ये - pulses. ठीण. दालें। खप - sale. वेया. खपत, बिक्री। रीत-custom. पद्धति, रीत. तरीका।]


bhaji vikretyache manogat marathi nibandh | भाजी विक्रेत्याचे मनोगत मराठी निबंध

 एकविसाव्या (21 )शतकातील आव्हाने मराठी निबंध | Ekvisavya Shatkatil Avhane Marathi Nibandh

निबंध 1


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एकविसाव्या (21 )शतकातील आव्हाने मराठी निबंध | Ekvisavya Shatkatil Avhane Marathi Nibandh बघणार आहोत. या निबंधामध्‍ये  मानवाने केलेली वैज्ञानिक व आर्थीक प्रगती व त्‍याबदल्‍यात त्‍याने पर्यावरणाला पोहचवलेली हानी , वाढलेली लोकसंख्‍या व इतर सामा‍जिक समस्‍या मानवापुढे कश्‍याप्रकारे समोर आल्‍या आहेत याबद्दल  स्‍पष्‍टीकरणात्‍मक दोन  निबंध दिलेले आहेत  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


Ekvisavya-Shatkatil-Avhane-Marathi-Nibandh
Ekvisavya-Shatkatil-Avhane-Marathi-Nibandh



एकविसावे शतक आज माणसांसमोर अनेक नवी आव्हाने घेऊन उभे ठाकले आहे. नुकत्याच सरलेल्या विसाव्या शतकाकडे दृष्टिक्षेप टाकला तर काय आढळते? चतुर मानवाने नेत्रदीपक प्रगती साधली आहे.एकविसाव्या शतकातील मानवाने आपल्या पूर्वजांपेक्षा मोठी वैचारिक प्रगती साधली आहे. आज आपण 'व्यक्तिस्वातंत्र्य' हा मूलभूत हक्क मानला आहे. कोणी कुणाचा गुलाम नाही. 


आपल्या देशातल्या कुठल्याही कोपऱ्यात राहणाऱ्या माणसाला स्वत:ची प्रगती साधण्याचा हक्क आहे. कुठल्याही विशिष्ट ज्ञानावर वा कामावर कुणाचीही मक्तेदारी राहिली नाही. जन्मावर 'कर्म' अवलंबून नाही, तर कर्मावर त्याचे समाजातील स्थान' अवलंबून आहे. म्हणून तर दलित समाजातील व्यक्तीही राष्ट्रपतिपद भुषवू शकते.


एकविसाव्या शतकातील सगळ्यात बिकट आव्हान आहे ते म्हणजे 'लोकसंख्येच्या विस्फोटाचे. भारताची लोकसंख्या अब्जांची मर्यादा ओलांडून पुढे गेली आहे. विश्वातील या सर्व मानवांना मूलभूत गरजा पुरवणे हेही एक आव्हानच आहे. माणसाने हे ओळखले आहे. पण त्याचबरोबर या लोकसंख्यावाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठीही कंबर कसावी लागणार आहे. पण अंधश्रद्धा व अज्ञान हे फार मोठे अडथळे मध्ये आहेत. ते दूर करणे हेही फार मोठे आव्हान आहे.


आपल्या भारतापुढे गरिबी व बेकारी हे एक मोठे आव्हान आहे. पण आम्ही ते स्वीकारले आहे. हरितक्रांती, श्वेतक्रांती यांनी प्रत्येकाला चारा उपलब्ध केला आहे. संगणकामुळे बेकारी वाढेल असे वाटत असतानाच संगणकाने अनेक नवे व्यवसायही निर्माण केले. नव्या उद्योगधंदयांबरोबरच आमच्या अनेक परंपरागत उदयोगांचेही पुनरुज्जीवन केले जात आहे.


एकविसाव्या शतकात आज माणसांपुढे उभा राहिलेला मोठा प्रश्न म्हणजे पर्यावरणाचा! माणसाने अविचाराने जंगलतोड केली, उभ्या केलेल्या प्रचंड कारखान्यांमुळे हवा बेसुमार दूषित झाली. माणसांना विविध आजारांना तोंड दयावे लागत आहे. त्यांत दुष्काळ, महापूर, भूकंप अशा नाना नैसर्गिक आपत्ती माणसांची कसोटी पाहायला येत आहेत. वैश्विक तापमान वाढत आहे, हे एक नवे संकट येत आहे. पण एकविसाव्या शतकातील माणूस आता याबाबतही जागृत झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात नित्य नवे शोध लावून तो या आजारांवर मात करत आहे. आता तर आमच्या संशोधकांनी माणसाच्या जनुकांचाही अभ्यास चालवला आहे. त्यातून तो माणसाला आपल्यातील त्रुटी दूर करण्यास मदत करील.



एकविसाव्या शतकात डाचणारी आणखी एक गोष्ट म्हणजे सामाजिक विषमता! जात, धर्म, पंथ, श्रीमंती, शिक्षण अशा अनेक पातळ्यांवर भीषण विषमता आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर कुठे ना कुठे संघर्ष पेटलेला असतो. या संघर्षाने तीव्र स्वरूप घेतले की, त्यांतून 'दहशतवाद' बोकाळतो आणि माणसाचे जगणे मोठे कठीण होते.



भारतात आणि इतर काही देशांत भ्रष्टाचाराचे एवढे साम्राज्य पसरले आहे की, आपल्या क्षुल्लक फायद्यासाठी भेसळ करणारा माणूस सहज दुसऱ्यांचे प्राण घेतो. याला कारण म्हणजे मानवी जीवनातील नैतिक मूल्यांची झालेली घसरण. हे सारे चित्र एकविसाव्या शतकातील माणसांचे जगणे असह्य, भयंकर करून टाकेल का? अशी भीती क्षणभर वाटते. पण क्षणभरच ! कारण अनेक आपत्तीत जगाच्या कानाकोपऱ्यांतून धावत आलेले मदतीचे हात आठवतात आणि ते आश्वासन देतात की, या साऱ्या साऱ्या आव्हानांना आम्ही पुरून उरू.


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता व दुसरा निबंध वाचण्‍यास विसरू नका  धन्‍यवाद


निबंध 2

 एकविसाव्या शतकाची आव्हाने 


कुठलेही राष्ट्र प्रगत आहे की अप्रगत, हे ठरवण्याचे काही निश्चित निकष सर्वमान्य झालेले आहेत. राष्ट्राची एकूण संपत्ती, त्या राष्ट्रात राहणाऱ्या जनतेचे उंचावत जाणारे राहणीमान, त्यांची होणारी प्रगती आणि जागतिक बाजारपेठेत त्या राष्ट्राची असलेली प्रतिष्ठा किंवा पत हे त्यांतले काही प्रमुख निकष आहेत. हे निकष साध्य करण्यासाठी भारताला एकविसाव्या शतकात वाटचाल करायची आहे.


भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारताचे भाग्य म्हणजे त्याला विविध प्रकारचे हवामान लाभले आहे. उन्हाळा, पावसाळा मुबलक. भारताने याचा जेवढा फायदा करून घ्यायला हवा तेवढा अजून करून घेतलेला नाही. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात हरितक्रांती झाली. भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. याच्या पुढचे पाऊल म्हणजे 'धान्याची निर्यात'. त्यासाठी भारतातील शेतकऱ्याने परंपरागत शेतीची पद्धत बदलली पाहिजे. पाश्चात्त्य देशाच्या तुलनेने अजून आपले एकरी उत्पन्न कमी पडते. धान्याची प्रत आणि प्रमाण वाढायला हवे. धान्याबरोबरच साखर, फळे, फुले यांचीही निर्यात साधायला हवी.


 एकविसाव्या शतकातील भारताला ग्रासणारा दुसरा प्रश्न म्हणजे येथील विषमता - यातील आर्थिक विषमता हा मोठा डाचणारा प्रश्न आहे. 'गरिबी हटाव'साठी अनेक योजना आखल्या गेल्या; पण गरिबी संपली नाही. एकविसाव्या शतकात या सामाजिक दोषालाच नेस्तनाबूत करायचे आहे. त्यासाठी निरक्षरतेवर मात करता आली पाहिजे. जर भारतातील जनता जास्तीत जास्त साक्षर झाली तर भारतीय लोकशाही अधिक प्रभावी बनेल.

एकविसाव्या शतकात भारतात तंत्रज्ञान क्षेत्रात खूप प्रगती व्हायला हवी. आज त्या दृष्टीने भारत पावले टाकत आहे. कारण प्रगत तंत्रज्ञान हेच आजच्या जगात कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीचे लक्षण असते. त्यासाठी भारताला आपले आंतरिक सामर्थ्य वाढवावेच लागेल. भारताला आपली अर्थव्यवस्था भक्कम करावी लागेल. एकविसाव्या शतकातील अनेक प्रकल्पांपैकी ती एक आहे. त्यासाठीच भारताने 'मुक्त अर्थव्यवस्था' स्वीकारली आहे. देशांतर्गत व्यापारामध्येही-विशेषतः कृषी, औदयोगिक आणि सेवा या क्षेत्रांत स्पर्धात्मक वातावरण ठेवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विशाल रस्ते तयार करून राज्ये जोडणे आणि नदया जोडणे हे प्रकल्प हाती घेतले आहेत.



जगामध्ये आपण लष्करी व आर्थिकदृष्ट्या वरचढ राहणे आवश्यक आहे. १९९० पर्यंत युद्ध हे शस्त्रांनीच लढले जाई. पण आता  आर्थिक युद्धाला सुरवात झाली आहे. लष्कर, संरक्षण या क्षेत्रातही प्रगत आणि स्वावलंबी होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर परकीय गुंतवणूक आपल्याकडे अधिकाधिक येईल याची काळजी घेतली पाहिजे.

जगामधील एक प्रगत आणि निडर राष्ट्र म्हणून भारताला स्थान मिळवून दयायचे असेल तर भारतातील प्रचंड युवाशक्ती एकदिलाने कामाला लागली पाहिजे. मग आपल्या सर्वांचे हे स्वप्न लवकर साकार होईल.


एकविसाव्या (21 )शतकातील आव्हाने मराठी निबंध | Ekvisavya Shatkatil Avhane Marathi Nibandh