सुशिक्षित बेरोजगारीवर मराठी निबंध | Essay on educated unemployment in marathi

 सुशिक्षित बेरोजगारीवर मराठी निबंध | Essay on educated unemployment in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सुशिक्षित बेरोजगारी मराठी निबंध बघणार आहोत. एक समस्या आज भारत २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आजच्या खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या युगात भारत आंतरराष्ट्रीय मंचावर साऱ्या जगाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. त्याच्या विकसनशील प्रगतीची धुरा उद्याच्या भावी सुशिक्षित, सुसंस्कृत नागरिकांवर  आजच्या युवकांवरच आहे. 


आजच्या या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगातही भेडसावणारी समस्या आहे ती म्हणजे सुशिक्षित बेरोजगार ! 'काम देता का कोणी काम ?' असा आक्रोश आजही अनेक बेकार करीत आहेत. नटसम्राट नाटकातील बेलवलकर एका घरासाठी जसे तडफडत, तळमळत होते तशीच अवस्था ही आजच्या तरुण वर्गाची झाली आहे. 


शिकून काय उपयोग? नोकऱ्याच मिळत नाहीत असे निराशावादी सूर नेहमी कानावर पडताना दिसतात. भारतात ४ कोटी लोक बेकार आहेत ही वस्तुस्थिती आहे. नोकऱ्या न मिळाल्याने हे संकट आल्याचा त्यांचा एकंदरीत सूर दिसतो. पदवीधर व उच्च शिक्षितांची संख्या भारतात कोटींच्या घरात आहे. 


या मंडळींनी डिग्रीवर डिग्री घेतल्या आहेत पण तरीही त्यांच्याजवळ नोकरी नाही ही खरोखरच खेदजनक बाब आहे. हे राष्ट्रापुढील प्रश्नचिन्ह आहे. या सुशिक्षितांची अनेक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात.नंतर त्यांची सततची पायपीट सुरूच राहते विविध कंपन्यांत अर्ज करणे, मुलाखतीला जाणे शासकीय वा बिगरशासकीय अशा विविध स्वरूपांच्या परीक्षा देणे यांतच त्यांचे आयुष्य सरत आहे पण हाती मात्र काही नाही ही खरोखरच भयास्पद बाब आहे.


सुशिक्षितांकडे शिक्षण आहे गुणवत्ता आहे मग तरीही ही बेरोजगारी का ? खरेच मोठे प्रश्नचिन्ह आहे. बेरोजगारांमधील विज्ञान पदवीधराचे प्रमाण ६३% आहे. दरवर्षी बाहेर पडणाऱ्या पदवीधरांची संख्या ६३% लाख आहे. 'मॅककिन्से' कंपनीने या संदर्भात व्यापक सर्वेक्षण केले असून त्यानुसार २०१५ पर्यंत भारतातील कारखान्यांना ७.३ कोटी कुशल कामगारांची गरज लागणार आहे. 



२०१५ पर्यंत इंडियन एअरलाईन्समध्ये ४५० ते ५०० नवी विमाने दाखल होणार असल्याने ती चालविण्यासाठी अतिरिक्त २००० वैमानिकांची भरती या क्षेत्रात करावी लागेल. फ्लाईट डिस्पॅचर्स व मेंटेनन्स इंजिनिअर्स या इतर पदांचा विचार करता आगामी ४ वर्षात एकूण १०,००० कर्मचाऱ्यांची भरती या क्षेत्रात करावी लागेल. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात कुशल कामगार उपलब्ध होण्याची शक्यता तरी दिसत नाही. 


यामुळेच या क्षेत्राच्या विकासाला मर्यादा पडण्याची दाट शक्यता आहे. तसेच टेलिकॉम इंडस्ट्रीजची वर्षाला ७० % अशा प्रचंड प्रमाणात वाढ होते आहे. टेलिकॉम इंजिनिअरिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जागा लागणार आहे. उपरोक्त एकंदरीत आकडेवारीनुसार जागांची कमतरता भासत नाही हे दिसून येते मग का ओरड सुरू आहे. सुशिक्षित बेरोजगारांची ?


यावरून असे निदर्शनास येते की या ४ कोटी बेरोजगारांनी डिग्यातर घेतल्या पण त्यांच्याकडे नोकऱ्यांसाठी आवश्यक असलेली बुद्धिमत्ता व गुणवत्ता नाही ही वस्तुस्थिती आहे. नेमकेपणाने सांगायचे झाले तर काँटीटी आहे पण क्वालिटी नाही. त्यामुळे उच्च नोकऱ्यांसाठी अर्ज केलेले ८०% उमेदवार नाकारले जातात. 


यासाठी या सुशिक्षितांना व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. त्यांनी नोकऱ्यांची कमतरता आहे आणि यापुढे राहणार ही भीती मनातून काढून तीव्र स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्यातील बुद्धिचातुर्याचा कर्तृत्वाने वापर केला पाहिजे मानसिकता प्रबळ केली पाहिजे.


या उक्तीचे सार्थक त्यांनी केले पाहिजे. तरुणांनी क्षणात मिळणाऱ्या प्रसिद्धीवर समाधान न मानता सतत संघर्ष केला पाहिजे. आंबेडकर सांगतात. 'शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा' याचे आचरण सुशिक्षितांनी केल्यास बेकारीचे लेबल घेऊन फिरावे लागणार नाही.


खेड्यातील अनेक पालक आपल्या पोटाला चिमटा देऊन मुलांना शिक्षण देतात. ते कशासाठी? तर आपल्या मुलांना आपल्यासारखे आयुष्य न जगता कष्टांचे चीज करावे यासाठी हीच सुशिक्षित मुले पुढे जाऊन कारखानदारांचे उंबरठे झिजवून नोकरीसाठी वणवण फिरत आहेत. 


मनातल्या मनात काय ? तांडेच्या तांडे बेकारांचे फिरत आहेत भटकून भटकून पाय सुजवत आहेत काही ठिकाणी तर पैशाच्या खणखणाटात सगळेच आवाज दबून जातात. आशाळभूत जेवढे म्हणून बेकार यांच्या गादीतक्क्याला हात लावतील तेवढे हे भाग्यवान आणि तरुणाईने निराशेने काळजीने सळसळणारे रक्त बर्फासारखे थंड करीत आहे.


"भास हे भ्रमाचे सारे फेडणार केव्हा ? कारण बेकारीचा राक्षस करतो आयुष्याची उजाड सुंदर स्वप्ने ?' काही ठिकाणी नशीब अजमावायला आलेल्यांना 'वशिल्याशिवाय काम नाही याचीही प्रचिती येते आहे. हे कुठेतरी स्वामी विवेकानंदाच्या वारसदारांनी अशा बेकारीला न डगमगता स्वत:तील शक्तीचा, दिव्यत्वाचा बोध घेऊन जागरण केले पाहिजे. 'Man making is my mission of life I never make plans, plans grow & work themselves'


या विवेकानंदाच्या उक्तीचा बोध सर्वसामान्यांनी आयुष्यात उतरविला पाहिजे तर मग राष्ट्रापुढील बेकारीची समस्या क्षणार्धात नाहीशी होण्यास विलंब लागणार नाही.सुक्षिशित बेरोजगारी हा समाजाला लागलेला शापाचे वरदान प्राप्त करून घेण्याचे कार्य केवळ सुशिक्षितच करू शकतील यात शंका नाही. त्यांनी परीक्षार्थी न होता व्यावहारिक व व्यावसायिक शिक्षण अंगीकृत केले पाहिजे. 


प्रत्यक्ष कामात तुम्ही किती कर्तृत्व गाजवता या निकषावर उमेदवारांचे मूल्यमापन होत असल्याने त्यांनी किती डिग्री घेतल्या, यापेक्षा त्यांनी उद्धारासाठी उत्कट इच्छा अथक परिश्रम, सातत्य व कामातील दर्जा सुधारणे आवश्यक आहे. स्वत:च्या मनगटातील


शक्ती ओळखून स्वस्थ न बसता पुढे मार्गक्रमण करत राहिले पाहिजे. 'चराति चरती भगः' वचनाप्रमाणे तो चालतो त्याच भग; म्हणजे भाग्य उजळते.. 'Life is a movement is life' हे वचन सुशिक्षितांनी ध्यानात ठेवून पावले टाकीत राहणे भाग आहे. आपल्या बुद्धिकौशल्याला वाट मोकळी करून देणे त्यांच्या हातात आहे. 


'थांबला तर पोहोचणार नाही, पोहोचल्याशिवाय थांबणार नाही.' असे म्हणत सुशिक्षितांनी कार्यरत राहून काळाचे भान ठेवून मिळेल ते काम धडाडीने, उत्साहाने केले पाहिजे तरच त्यांच्या माथी असलेले व राष्ट्रासमोरील बेकारीचे चित्र लुप्त होईल यात शंका नाही. थांबले पाहिजे याकरिता तरुणांनीच संघटितपणे आवाज उठवला पाहिजे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद