जागतिक खेळांमध्ये भारताचे स्थान मराठी निबंध | JAGATIK KHELANMADHYE BHARATACHE STHAN ESSAY MARATHI

 जागतिक खेळांमध्ये भारताचे स्थान मराठी निबंध | JAGATIK KHELANMADHYE BHARATACHE STHAN ESSAY MARATHI

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  जागतिक खेळांमध्ये भारताचे स्थान मराठी निबंध बघणार आहोत. जागतिक पातळीवर खेळाडूच्या अनेक स्पर्धा होतात. त्यात ऑलिंपिक स्पर्धा' मुख्य आहेत. खेळांच्या दृष्टीने जगात आपण कुठे आहोत ते समजून घेण्यासाठी ऑलिंपिक खेळ हेच साधन होय. 


आशियात राहणाऱ्यांसाठी आशियातील आपली स्थितीचे परीक्षण करण्याची संधी आशियाड स्पर्धा प्रदान करतात. चार चार चार वर्षांच्या अंतराने खेळल्या जाणाऱ्या या जागतिक स्पर्धा म्हणजे एखाद्या राष्ट्राच्या खेळांतील प्रगतीचा आरसाच आहे.


ऑलिंपिक व आशियाडमध्ये केवळ निवडक स्पर्धाच होतात. क्रिकेट, बुद्धिबळ बिलियर्डस, स्नूकर इत्यादी खेळ ज्यांना या स्पर्धांमध्ये स्थान मिळाले नाही. त्यांच्यासाठी अनेक जागतिक स्पर्धा असतात. ज्या खूप लोकप्रिय आहेत.


हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, लॉन टेनिस इत्यादी खेळ वरील स्पर्धामध्ये पण असतात. जागतिक स्पर्धा वेळोवेळी होत राहतात. या स्पर्धा पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळते. या खेळांचे दूरदर्शनवरून जगभर प्रसारण केले जाते खेळांच्या स्पर्धेत जिंकणाऱ्या व्यक्तीचा व राष्ट्राचाही गौरव होतो. पैसाही खूप मिळतो. जिंकणारे स्पर्धक 'स्टार्स' बनतात व जाहिरातीच्या जगात प्रवेश करून आपले भविष्य उज्ज्वल करून घेतात. 


जागतिक खेळांमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करणारे सुनील गावस्कर, कपिल देव, पी. टी. उषा, गीत सेठी, मायकेल फरेरा, विश्वनाथन आनंद, प्रकाश पदुकोण, मेजर ध्यानचंद, सचिन तेंडुलकर, विजय अमृतराज हे खेळाडू आहेत. यांच्या वैयक्तिक प्रयत्नांमुळेच भारताचे जागतिक खेळांमध्ये चांगले नाव झाले आहे. या सर्वांनी अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केले.


जर आपण काही खेळाडूंच्या वैयक्तिक प्रयत्नांकडे दुर्लक्ष करून भारताची जागतिक खेळांमध्ये कशी स्थिती आहे याचा अंदाज घेतला तर ती फार दयनीय दिसते. आपला महान भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. याची लोकसंख्या एक अब्जाच्यावर आहे पण जागतिक खेळांत तो कमी पडतो. 


भारतीय खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, अधिकारी भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर करतात. पराजित होऊन परत येतात. भारतीय करदात्यांची घामाची कमाई उडवून येतात आणि आपल्या पराजयाचे सर्वांसमक्ष समर्थन करतात. भविष्यात असे होणार नसल्याची ग्वाही देतात. 


आजची हार ही हार नसून न विसरता येण्याजोगा अनुभव आहे जो भविष्यात विजयात परिवर्तीत होणार आहे. त्यावेळी पदके, कप मिळतील परंतु अशी सुवर्णसंधी आलीच नाही येईल असेही वाटत नाही. ऑलिंपिक खेळांच्या पदकांमध्ये भारतासमोर शून्यच असते. 


आशियाई खेळांत स्थिती बरी आहे. तिथे आपणांस सुवर्णपदकाची आशा असते. क्रिकेट, हॉकी, स्नूकर, बिलियर्ड, बद्धिबळ इ. खेळांत हार जीत चालू असते. भारताच्या कुस्ती या प्राचीन खेळातही आपले पहिलवान खूप चांगले प्रदर्शन करू शकले नाहीत.


जागतिक खेळांत भारतीयांच्या लज्जास्पद पराजयासाठी प्रामुख्याने येथील राजकारण जबाबदार आहे. अधिकाऱ्यांची आपसांतील भांडणे व जागातिक खेळ समित्यांमध्ये निवडून येण्याच्या चिंतेने खेळांनाच मागे सारले आहे. 


अधिकारी मंडळी हिंडणे, फिरणे, विदेशी वस्तूंची खरेदी करणे, भेटवस्तू इतरांकडून मिळविणे यातच मग्न असतात. खेळ ते क्वचितच खेळले असतील. असे अधिकारी चांगल्या खेळाडूंची निवड करू शकत नाहीत. भारतातील प्रतिभा संपन्न खेळाडू राष्ट्रीय पातळीवरच मार खातात. 


एकमेकांचे पाय मागे ओढण्याची वृत्ती ही भारतीय खेळाडूंमध्ये आहे. खेळाडूंवर अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसते. त्यामुळे सगळा बेशिस्तीचा कारभार असतो.योग्य प्रशिक्षण आणि पैशांचा अभाव यामुळे आपले खेळाडू चांगल्या खेळाचे प्रदर्शन करू शकत नाहीत. 


याशिवाय आपल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळांचा अनुभव नसतो. त्याचा परिणाम त्यांच्या खेळावर होतो. त्यांची मानसिक पातळीही खालच्या दर्जाची असल्यामुळे कमी गुण असतानाही आरक्षणामुळे त्यांना चांगल्या कॉलेजात प्रवेश व नंतर नोकरी मिळते. 


मानसिक बळाचा अभाव असणाऱ्या खेळाडूंकडून जागतिक स्पर्धेत पदके मिळवितील अशी आशाच करणे व्यर्थ आहे. वयाने जास्त असल्यामुळे त्यांची शारीरिक शक्ती कमी पडते. म्हणून विदेशी खेळाडूंच्या समोर ते टिकू शकत नाहीत. उत्साह आणि मारक क्षमताही कमी आहे. स्पर्धेच्या दृष्टीने ते खेळत नाहीत.


भारतातील खेळांची स्थिती सुधारण्यासाठी भारताच्या खेळ राजकारणातील स्वार्थ नष्ट झाला पाहिजे. माजी खेळाडूंकडे प्रशिक्षकाची, खेळाडूंच्या निवडीची जबाबदारी सोपविली पाहिजे. विदेशी प्रशिक्षकांकडून ही प्रशिक्षण दिले जावे. 


अनुभवासाठी विदेशांत पाठविले जावे. चांगल्या खेळाडूंना पैसा कमी पडू नये. क्रीडा मंत्रालयाने नि:पक्षपातीपणे काम करावे. चांगल्या खेळाडूना पुरस्कार द्यावेत. जर कमी वयात चांगले प्रशिक्षण खेळाडूंना मिळाले तर चांगला खेळ ते खेळू शकतील.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद