ऑलिंपिक खेळ मराठी निबंध | OLYMPIC KHEL MARATHI NIBANDH

ऑलिंपिक खेळ मराठी निबंध | OLYMPIC KHEL MARATHI NIBANDH

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ऑलिंपिक खेळ मराठी निबंध बघणार आहोत. इ. स. १८७६ पासून आधुनिक ऑलिंपिक खेळांची कथा सुरू होते. याच वर्षी फ्रान्सचे एक शिक्षणतज्ज्ञ कार्बटिनने याचे पुनरुज्जीवन करून पहिली स्पर्धा ग्रीसमधील अथेन्स नगरात आयोजित केली. 


तेव्हापासून हे खेळ दर चार वर्षांनी आयोजित केले जातात. यात जगातील ६००० पेक्षा जास्त खेळाडू आणि १०० पेक्षा जास्त राष्ट्रे भाग घेतात. ऑलिंपिक २००० ऑस्ट्रेलियातील सिडने येथे आयोजित करण्यात आले होते. हा खेळांचा महोत्सव जगातील सर्वात मोठा अनोखा कार्यक्रम होता. 


इ. स. १९२४ पासून शीत ऑलिंपिक स्पर्धा दर चार वर्षांनी वेगळ्या आयोजित केल्या जातात.ऑलिंपिक खेळ जगातील विविध प्रमुख शहरांमध्ये आयोजित केले जातात. १९९६ चे ऑलिंपिक खेळ अमेरिकेतील अटलांटा शहरात घेण्यात आले होते. यात जगातील १९७ राष्ट्रांनी भाग घेतला होता. 


आतापर्यंत या खेळांच्या स्पर्धा अथेन्स, पॅरिस, लंडन, अॅमस्टरडॅम, लॉसएंजेलिस, बर्लिन, हेलसिंकी, मेलबोर्न, रोम, टोकियो, मेक्सिको, म्युनिच, मॉस्को, सेऊल, बार्सिलोना अटलांटा, सिडने या शहरांत झाल्या. इ. स. १९१६, १९४०, १९४४ मध्ये जागतिक युद्धामुळे या स्पर्धा झाल्या नाहीत. 


या खेळांमध्ये अनेक स्पर्धा असतात. खेळांची सुरवात फारच मोठ्या प्रमाणावर वा शानदार केली जाते. प्रथम ऑलिंपिक मशाल पेटवितात नंतर आकर्षक मनोरंजक कार्यक्रम होतात. यात प्रत्येक देशाचे खेळाडू आपल्या देशाच्या ध्वजासह परेडमध्ये भाग घेतात. प्रेक्षकांची अफाट गर्दी असते. 


या खेळांच्या स्पर्धा दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालतात. १९२८ पासून भारत यात सहभागी होत आहे पण आतापर्यंत चांगले सादरीकरण झाले नाही. आता चांगले सादरीकरण करून काही सुवर्णपदके मिळविण्याची आशा करू. 


या खेळांचा मुख्य उद्देश, बंधुभाव, समता, सहिष्णुता आणि वीरत्वाचे गुण निर्माण करणे व विविध देशांना परस्परांच्या निकट आणणे हा आहे. या खेळांचे ऑलिंपिक हे नाव ग्रीसमधील 'ऑलेपिस' या पर्वतावरून पडले. प्राचीन ग्रीसमधे दर चौथ्या वर्षी या पर्वताच्या पायथ्याशी या स्पर्धा घेतल्या जात. 


त्यात सर्व खेळाडू भाग घेत आणि स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करीत. या स्थळालाच ऑलिंपिक म्हणत. त्या काळी ग्रीस एक संपन्न देश होता. तेथील लोक कला व खेळांचे प्रेमी होते. सुरवातीला फक्त धावण्याची स्पर्धा होत असे परंतु हळूहळू दुसऱ्या स्पर्धा हाऊ लागल्या.


हा समारंभ ग्रीसमधील एक मोठा उत्सव होता. त्यात भाग घेऊन बक्षिसे जिंकणाऱ्याला देशाचा महान वीर समजले जाई. साऱ्या देशाला त्याचा अभिमान वाटे. अशा वीरांना देवाप्रमाणे समजले जाई. ठिकठिकाणी त्यांचे पुतळे उभे केले जातात. कालांतराने ग्रीस रोमच्या ताब्यात गेले. 


इ. स. ३९३ मध्ये एका रोमन राजाने यावर बंधन टाकले. रोमचे राजे ख्रिश्चन होते व या स्पर्धांना अधार्मिक मानत. परंतु ग्रीसमध्ये हे खेळ एक धार्मिक अनुष्ठानाचाच भाग होते. त्याची सुरवात धार्मिक पूजेने होत असे. हा समारंभ ५ दिवस चालत असे. 


पहिल्या दिवशी पूजेनंतर पशूचे बळी देत व देवतांना आवाहन करीत. शेवटच्या दिवशी बक्षिसे दिली जात आणि कबुतरे सोडत. जे विजयी वीरांची नावे देशातील विविध शहरांमध्ये पोहोचावीत. हे खेळ पुन्हा सुरू होण्यासाठी १५०० वर्षे लागली. आज हे संपूर्ण जगात मानवता, बंधुता, एकता, सहकार्याचे प्रतीक बनले आहे. 


या खेळांची सर्व जण वाट पाहतात. सुरवातीपासून मोठ्या प्रमाणावर त्याची तयारी केली जाते. ऑलिंपिकची मशाल प्राचीन ग्रीस आणि आधुनिक ऑलिंपिक खेळांना जोडणारा एक दुवा आहे. या खेळांचा स्वतंत्र ध्वज आहे घोषणा आहे. हे आयोजित करण्यासाठी विविध देशांमध्ये स्पर्धा असते. 


ज्या देशावर हे खेळ आयोजित करण्याची जबाबदारी टाकली जाते तो देश स्वत:ला भाग्यशाली समजतो. तेव्हापासूनच तिथे आनंद उल्हास, उत्साह असतो. मोठ्या प्रमाणावर खर्चिक तयारी सुरू होते. म्हणून फक्त विकसित श्रीमंत देशच ही जबाबदारी घेतात. परंतु यापासून त्या देशाला उत्पन्नही खूप मिळते. 


हजारो प्रेक्षक, पर्यटक येतात त्यामुळे यजमान राष्ट्राला परकीय चलन मिळते. या खेळांचे आयोजन ही गौरवाची, सन्मानाची बाब आहे. शक्य आहे कधी भारतालाही हा मान मिळेल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद