आळसे कार्यभाग नासतो मराठी निबंध | Narathinibandh Aalse Karybhag Nasto Marathi Essay

 आळसे कार्यभाग नासतो मराठी निबंध | Narathinibandh Aalse Karybhag Nasto Marathi Essay

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आळसे कार्यभाग नासतो मराठी निबंध बघणार आहोत. लहानपणी ‘ससा आणि कासवा' ची गोष्ट वाचली पण रुचली नाही. चाहूल लागताच धूम ठोकणाऱ्या सशाला मुंगीच्या पावलांनी चालणाऱ्या कासवाने हरवले असेल हे माझ्या बालमनाला मुळीच पटलं नव्हतं. 


बालपण सरलं आणि त्या गोष्टीतलं मर्म उमगलं. 'केवळ आळसानेच सशाचा घात केला होता.' हे कटू असलं तरी सत्य होतं. 'आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महारिपुः' आळस हा माणसाचा ‘जानी दुष्मन' आहे. गनिमी काव्याने हल्ला करून तो आपल्याला केव्हा नामोहरम करेल, सांगता येत नाही. पण तो अजिंक्य मात्र नाही हं! 


अखंड प्रयत्नांची तळपती तलवार ज्याच्या हातात आहे, तो सहजपणे त्याच्यावर मात करू शकतो. सुभाषितकार सांगतात, “ आळशी माणसाला विद्या, धन, मित्र व पर्यायाने सुखही मिळू शकणार नाही." आळसात घालवलेलं जीवन हे जीवनच नाही. मग ते दीर्घ का असेना. उलट 'क्षणमेकं सुयत्नेन यो जीवति स जीवति !' इतकं या जीवनात प्रयत्नांचं महत्त्व आहे.


"मुंगी हळूहळू चालत राहिली तर ती खात्रीने एक हजार योजनेदेखील चालून जाईल, पण गरुड पक्षी जागचा हललाच नाही तर तो एक पाऊलही पुढे जाणार नाही,' हे निर्विवाद. प्रथितयश साहित्यिक, कलावंत, शास्त्रज्ञ, खेळाडू यांच्या स्पृहणीय यशाची गुरुकिल्ली जर कोणती असेल तर ती त्यांची निरलस वृत्ती. 


'दारिद्यदोषो गुणराशिनाशी' असं म्हणतात पण 'आलस्यं गुणराशिनाशी' म्हटल्यास ते अतिशयोक्तीचं ठरू नये. 'अशक्य हा शब्द माझ्या शब्दकोषात नाही', असं म्हणणारा नेपोलियन अहंकारी होता का? मुळीच नाही. निरलस, उद्योगी माणसाला या जगात अप्राप्य काहीच नाही, हेच या उद्गारातून सूचित होते. 


'असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास, तुका म्हणे ।" या अभंगातून असाध्य गोष्ट साध्य करण्याचा मंत्रच तुकोबांनी आम्हाला सांगितला आहे. सभोवताली असलेल्या निसर्गाकडे नजर टाका. अविरत वाहणारी नदी, नियमाने उगवणारा सूर्यदव, कणाकणाने धनसंचय करणारी मुंगी, मध गोळा करणारी मधमाशी आम्हाला निरलस वृत्तीचा धडाच देत नाही का? 


पण नित्याच्या अवलोकनाने आम्ही आंधळे बनतो. निसर्गाचा ज्ञानकोष वाचत नाही आणि पशुवत जीवन जगतो. आज आमच्या देशाला भ्रष्टाचाराच्या कर्करोगाने पोखरले आहे पण त्याहीपेक्षा भयानक अशा आळशीपणाच्या एड्सने ग्रासले आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.


लहानपणी ‘ससा आणि कासवा' ची गोष्ट वाचली पण रुचली नाही. चाहूल लागताच धूम ठोकणाऱ्या सशाला मुंगीच्या पावलांनी चालणाऱ्या कासवाने हरवले असेल हे माझ्या बालमनाला मुळीच पटलं नव्हतं. बालपण सरलं आणि त्या गोष्टीतलं मर्म उमगलं. 'केवळ आळसानेच सशाचा घात केला होता.' हे कटू असलं तरी सत्य होतं.


'आलस्यं हि मनुष्याणां शरीरस्थो महारिपुः' आळस हा माणसाचा ‘जानी दुष्मन' आहे. गनिमी काव्याने हल्ला करून तो आपल्याला केव्हा नामोहरम करेल, सांगता येत नाही. पण तो अजिंक्य मात्र नाही हं! अखंड प्रयत्नांची तळपती तलवार ज्याच्या हातात आहे, तो सहजपणे त्याच्यावर मात करू शकतो.


सुभाषितकार सांगतात, “ आळशी माणसाला विद्या, धन, मित्र व पर्यायाने सुखही मिळू शकणार नाही." आळसात घालवलेलं जीवन हे जीवनच नाही. मग ते दीर्घ का असेना. उलट 'क्षणमेकं सुयत्नेन यो जीवति स जीवति !' इतकं या जीवनात प्रयत्नांचं महत्त्व आहे.


"मुंगी हळूहळू चालत राहिली तर ती खात्रीने एक हजार योजनेदेखील चालून जाईल, पण गरुड पक्षी जागचा हललाच नाही तर तो एक पाऊलही पुढे जाणार नाही,' हे निर्विवाद.


प्रथितयश साहित्यिक, कलावंत, शास्त्रज्ञ, खेळाडू यांच्या स्पृहणीय यशाची गुरुकिल्ली जर कोणती असेल तर ती त्यांची निरलस वृत्ती. 'दारिद्यदोषो गुणराशिनाशी' असं म्हणतात पण 'आलस्यं गुणराशिनाशी' म्हटल्यास ते अतिशयोक्तीचं ठरू नये.


'अशक्य हा शब्द माझ्या शब्दकोषात नाही', असं म्हणणारा नेपोलियन अहंकारी होता का? मुळीच नाही. निरलस, उद्योगी माणसाला या जगात अप्राप्य काहीच नाही, हेच या उद्गारातून सूचित होते. 'असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास, तुका म्हणे ।" या अभंगातून असाध्य गोष्ट साध्य करण्याचा मंत्रच तुकोबांनी आम्हाला सांगितला आहे.


सभोवताली असलेल्या निसर्गाकडे नजर टाका. अविरत वाहणारी नदी, नियमाने उगवणारा सूर्यदव, कणाकणाने धनसंचय करणारी मुंगी, मध गोळा करणारी मधमाशी आम्हाला निरलस वृत्तीचा धडाच देत नाही का? पण नित्याच्या अवलोकनाने आम्ही आंधळे बनतो.


निसर्गाचा ज्ञानकोष वाचत नाही आणि पशुवत जीवन जगतो. आज आमच्या देशाला भ्रष्टाचाराच्या कर्करोगाने पोखरले आहे पण त्याहीपेक्षा भयानक अशा आळशीपणाच्या एड्सने ग्रासले आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद