निवृत्त सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध | nivrut sainikache atmavrutta marathi nibandh

 निवृत्त सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध | nivrut sainikache atmavrutta marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण निवृत्त सैनिकाचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत. तात्याराव हे निवृत्त सैनिक आमच्या गावाचे वैभव आहेत. रणांगणात कर्तबगारी गाजवून ते निवृत्त झाले आहेत. संध्याकाळी गावाच्या चावडीवर गावकरी जमल्यावर ते गप्पा मारत होते. 


तात्याराव म्हणजे सेवानिवृत्त सेकंड लेफ्टनंट प्रतापराव भोसले. ते म्हणाले, “सैन्यात जाणे हे काही आमच्या घरात नवलाईचे नव्हते. वयात आलेला प्रत्येक पोरगा सैन्यातच जायचा. माझा एक चुलता डॉक्टर झाला होता, पण तोही सैन्यातच दाखल झाला होता. 


जगायचे ते देशासाठी आणि मरायचे तेही देशासाठी! "शिक्षण पुरे करून मी सैन्यात गेलो आणि लगेच मला सीमेवर जावे लागले. तेथे रात्रंदिन युद्धाचा प्रसंग असे. डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवावे लागे. शत्रू फार कपटी होता. इकडे सामोपचाराची बोलणी करायची आणि दुसरीकडे छुपे हल्ले करायचे. 


एकदा तोफांचा मारा सुरू झाला की, तीन-तीन दिवस चालू राहायचा. कितीजण जखमी व्हायचे ! कित्येकजण मरण पावायचे ! पण त्यांच्याकडे बघायलाही फुरसत नसायची. "यानंतरच्या सेवेत असे युद्धाचे-निकराचे प्रसंग अनेक आले. दरवेळेला मन अधिकच घट्ट होत होते. 


आपल्यामागे आपला देश आहे, ही भावना सुखावत असे. रणधुमाळी चालू असली की, घराची आठवणही येत नसे. सणांना देशवासीयांकडून भेटी येत. दिवाळीला मिठाई, थंडीला स्वेटर, संक्रांतीला तिळगूळ ! या भेटी लढण्याची नवी उमेद देत.


"एका संग्रामात माझ्या पायात गोळ्या घुसल्या, तेव्हा जखमी होऊन मी रुग्णालयात पडलो. बरा होऊन पुन्हा लढावयास केव्हा जातो, असे मला झाले होते! लढण्यासाठीच जीव आपला ! म्हणून तर आता या रिकाम्या आयुष्यात नव्या नव्या पोरांना सैनिकी शिक्षण दयावे, एवढीच इच्छा आहे." मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


[शब्दार्थ : चावडी-a place in a village, where people gather in leisure time. योतो. चौपाल। नवलाईचे नव्हते- it was not unusual. नवाई नहोती. नई बात नहीं थी। डोळ्यांत तेल घालून - being vigilant. सावधानीपूर्व. सतर्कतापूर्वक। कपटी- cunning. ७५टी. धोखेबाज। सामोपचाराची बोलणी- negotiations for peace. ildandl, सुनील. शांति-वार्ता। रणधुमाळी - confused and fierce fighting. भीष युध्द. घमासान युद्ध। ।