आमची सहल मराठी निबंध 10 ओळी | 10 Lines Aamchi Sahal Nibandh Marathi

 आमची सहल मराठी निबंध 10 ओळी | 10 Lines  Aamchi Sahal Nibandh Marathi 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमची सहल मराठी निबंध बघणार आहोत. आमची सहल पेंच प्रकल्पाला जाणार होती. आदल्या दिवशीच शिक्षकांनी आम्हाला सूचना व तेथील नियम समजावून दिले होते.


सकाळी ७ वाजता आम्ही शाळेत जमलो. तेथून बसने • निघालो. आमचे शिक्षकही बरोबर होते. बसमधे आम्ही गाणी म्हटली आणि बऱ्याच गंमती जंमती केल्या.


पेंचला पोचल्यावर आम्ही तेथील प्रकल्प पाहिला. पाण्याचा प्रवाह जणू दुधासारखा पांढरा शुभ दिसत होता. शिक्षक आम्हाला प्रकल्पाबद्दल माहिती देत होते.


नंतर आम्ही तेथील पिंपळाच्या पानाच्या आकाराच्या बगीच्यात आलो . झाडाखाली बसून डबे खाल्ले. थोडी विश्रांती घेतली. नंतर गाणी, विनोद, नकला असे काही छोटे कार्यक्रम झाले. 


सायंकाळी आम्ही बसने परत आलो. आमची सहल खूपच छान झाली. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद