हत्ती निबंध 10 ओळी | 10 Lines On Elephant in Marathi

 हत्ती निबंध 10 ओळी | 10 Lines On Elephant in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हत्ती मराठी निबंध बघणार आहोत.  हत्ती हा आकाराने सर्वात मोठा प्राणी आहे. हत्ती हा प्राणी जंगलात राहतो. माणसाने पाळला तर तो आपण सांगू तसे वागतो. 


तो शरीराने अवाढव्य असला तरी त्याचे डोळे खूप बारीक असतात. कान सूपासारखे असतात. त्याचे पाय खांबासारखे जाड असतात. त्याची सोंड लांब असते. 


सोंडेच्या बाजूला दोन मोठे सुळे असतात. हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. तो गवत, उस, झाडपाला खातो. त्याचे दात हस्तीदंत म्हणून प्रसिध्द आहेत. 


त्याच्या दातांचा उपयोग अनेक कलाकुसरीच्या वस्तुंकरिता होतो. तो खूप शक्तीमान असतो. त्यामुळे जंगलातीत लाकडाच्या ओंडक्याची ने आण तो सहजरित्या करतो. 


सर्कसमधे तो उत्तम काम करू शकतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद