स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence

 स्वातंत्र्यदिन निबंध मराठी 10 ओळी | 10 Lines on Independence 


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण स्वातंत्र्यदिन मराठी निबंध बघणार आहोत.  आपला देश पूर्वी इंग्रजांच्या ताब्यात होता. अनेक थोर मंडळींनी आपले प्राण पणाला लावून आपला देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र केला. 


तेव्हा पासून हा दिवस “स्वातंत्र्यदिन" म्हणून साजरा केला जातो. १५ ऑगस्ट हा आपला राष्ट्रीय सण आहे. ह्या दिवशी सर्व सरकारी कार्यालयांवर ध्वज फडकविला जातो. सर्व शाळांमधून ध्वजवंदनाचे कार्यक्रम होतात.


शाळेमधे अध्यक्षांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करतात. वंदेमातरम् झाल्यावर अध्यक्षांचे भाषण व काही राष्ट्रपर गीते म्हटली जातात. विद्यार्थी मनोरंजनाचे कार्यक्रम करतात.


 शेवटी, राष्ट्रगीत होऊन कार्यक्रम संपतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद