माझे आजोबा मराठी निबंध |10 Lines on My Grandfather Essay in Marathi.

 माझे आजोबा मराठी निबंध |10 Lines on My Grandfather Essay in Marathi. 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझे आजोबा मराठी निबंध बघणार आहोत. माझ्या आजोबांचे नांव काशीनाथ आहे. ते पांढरा सदरा व पांढरे धोतर घालतात. आमच्या घरात आजोबा कुटूंब प्रमुख आहेत. 


सर्व जण त्यांच्या सल्ल्यानुसार वागतात. आजोबांना सामाजिक कार्याची खूप आवड आहे. गोरगरिबांना ते नेहमी मदत करतात.


माझे आजोबा मला फिरायला नेतात. मी त्यांना शाळेतल्या गंमती जमती सांगतो. त्या ऐकतांना ते हसतात. कधी कधी तर एखादे गाणेही गुणगुणतात.


त्यांचे वय साठ वर्षाचे आहे. ते नियमित व्यायाम करीत असल्यामुळे त्यांची तब्येत उत्तम आहे. घरात ते एकमेकांना मदत करायला लावतात. स्वतःचे काम मात्र ते स्वतःच करतात. 


आमचे आजोबा मला खूप आवडतात. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद