आनंद कीर्तन मराठी निबंध | AANADH KITRAN ESSAY MARATHI

आनंद कीर्तन मराठी निबंध | AANADH KITRAN ESSAY MARATHI

 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आनंद कीर्तन मराठी निबंध बघणार आहोत. "आता यानंतर ऐका 'जगाच्या पाठीवर' चित्रपटातले गीत 'थकले रे नंदलाला' गायक कुमार आनंद कीर्तने, इयत्ता ६ वी क.” मी ध्वनिक्षेपकावरून निवेदन केले. 


सभागृहात जोरदार हशा पिकला व टाळ्यांचा कडकडाट झाला. कीर्तन एकदम बैठ्या ध्वनिक्षेपकापुढे जाऊन बसला आणि त्याने बसक्या आवाजात जोरजोरात गाणे म्हणायला सुरुवात केली "नाच नाचुनी अति मी दमले' काही वात्रट मुलांनी 'एऽऽऽ' असा आवाज काढला पुन्हा हशा पिकला. 


"तुम्ही हसलात तर मी गाणं म्हणणार नाही... आणि गाणं संपल्याशिवाय इथून उठणार नाही" पुन्हा हशा पिकत होता... पण मी मुलांना गप्प केले... 'स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक मुलाला संधी मिळायलाच हवी... शांतपणे ऐका' अशी सूचना दिली, मग गाणं सुरू झाले.


सभागृहात असो की वर्गात असो, कीर्तन जिथे असेल तिथे हशा व टाळ्यांचा सुकाळ व्हायचा पण कीर्तनेला त्याची पर्वा नसे. मुले आपल्याला हसतात याचे त्याला कधीच दुःख झाले नाही आणि हस्ताक्षर स्पर्धेपासून नाट्य स्पर्धेपर्यंत कीर्तन नाही असे कधी झालेच नाही. अगदी क्रीडास्पर्धेतसुद्धा हा असायचाच ! हे वाचून तुम्हांला वाटेल अगदी अष्टपैलू मुलगा दिसतो हा !


पण... काय सांगू व कसे सांगू ? प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे करणारा आनंद कीर्तने प्रत्येक बाबतीत मागे शेवटच्या रांगेपलीकडे होता. त्याचे अक्षर म्हणजे कोंबडीच्या पायांचा भांगडा नाच, त्याचा निबंध चार ओळीत संपे. पण तो कधीच कुणालाही वाचता आला नाही. 


चेहरा उभट व लांबोडा. डोळे बटबटीत. बोलायला लागला की त्या डोळ्यांची उघडमीट सारखी चालू. शब्दाशब्दाला ठेचाळायचा. शिवाय अनेक गोष्टीची उलथापालथ होई, ती निराळीच. गाणे किंवा खेळणे यापैकी कशातच त्याला गती नव्हती. आवाज म्हशीच्या आवाजासारखा होता, खेळातली हालचाल कोंबडीच्या पिलासारखी होती, धांदरट व बेशिस्त.


वर्गातल्या मुलांनी त्याचे नाव 'वेडा महंमद' ठेवले होते. 'सर कीर्तने कीर्तन छान करतो,' मुले म्हणायची. 'ऑफ पीरियड'ला कीर्तनेच्या वर्गात कीर्तनेचे कीर्तन चालायचे. त्यानंतरच्या वर्षी ६ वी क मध्ये इतिहास, भूगोल शिकवायला मी वर्गावर गेलो. कीर्तने त्याच वर्गात होता.


"काय रे तू या वर्गात कसा ?'' मी हसत विचारले. “पाच विषयात नापास झालो म्हणून मला वन्स मोअर मिळालाय सर.” कीर्तनेचा तो विनोद मला अगदी अनाठायी वाटला. मला वाटले या मुलाला काहीच कसे कळत नाही ?खरोखर परमेश्वराने कीर्तनेवर फार मोठा अन्याय केला आहे. नाही रूप, नाही रंग, बुद्धी नाही, शहाणपण नाही, ना सूर, ना नूर. देवाने त्याला काही म्हणजे काहीच दिले नाही. पोशाखही गबाळा, मळका, पँट शर्टची बटणं तुटलेली, कपड्यावर कसले तरी डाग अगदी विदूषक !


विदूषकासारखाच तो नेहमी हसरा व आनंदी असायचा. मी वर्गावर गेलो की तो स्वयंसिद्ध मॉनिटर व्हायचा, मुलांना गप्प करायचा. त्याला सुधारण्याचा आटोकाट प्रयत्न मी केला पण अखेर त्याही वर्षी कीर्तने नापास झाला होता आणि मे महिन्यात ह्याला बाल पक्षाघाताचा सौम्य झटका आला होता. दैवाला दोष देतच मी जूनमध्ये धवी क वर गेलो तेव्हा


"सर, बरे वाटत नाही तुम्हांला, ही व्हिक्सची गोळी घ्या सर. सर्दी कमी होऊन डोके दुखायचे थांबेल' वाकड्या बोटांनी व्हिक्सची गोळी धरून कीर्तन माझ्याकडे नेहमीच्याच नजरेने पाहात उभा होता. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद