प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Essay On Republic Day In Marathi

 प्रजासत्ताक दिन वर मराठी निबंध Essay On Republic Day In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  प्रजासत्ताक दिन मराठी निबंध बघणार आहोत. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. भारताची स्वतंत्र राज्यघटना तयार करण्यात आली. या समितीने केलेल्या अभ्यासानुसार १९५० सालापासून आपला सार्वभौम लोकशाही राज्यकारभार सुरु झाला. लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी देशाचा कारभार सांभाळू लागले. 


या घटनेचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी २६ जानेवारीला आपला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. यादिवशी ठिकठिकाणी ध्वजवंदन केले जाते. सर्व शाळा, सरकारी कार्यालये, खाजगी व्यवसाय याठिकाणी ध्वजवंदन व विविध कार्यक्रम घेतले जातात. 


लोक एकत्र येतात, राष्ट्रगीत गातात व राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतात. सर्व राज्यांच्या राजधानीतून तसेच शहरांमधून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. भारताची राजधानी दिल्ली येथील कार्यक्रम विशेष महत्त्वाचा असतो. जगातील विशेष व्यक्तिस किंवा राजकीय नेत्यास प्रमुख पाहूणे म्हणून बोलावले जाते. 


राष्ट्रपती व पंतप्रधान जातीने उपस्थित असतात. सेनेची तिनही दलांचे प्रमुख, एन.सी.सी, पोलीस दल यांची मोठी परेड होते. सर्व राज्यातील कलापथके विविध कलागुण दर्शन करतात. यात त्या-त्या राज्याची लोकनृत्य लोकगीते सादर केली जातात व चित्ररथांवर मिरवणूका काढल्या जातात. 


आपल्या लष्करी ताकदीचे प्रदर्शन केले जाते. लष्करातील नवी साधने, उपकरणे लोकांसमोर मांडली जातात. विमानांच्या लक्षवेधी कवायती केल्या जातात. यातून आपल्या देशाचे वैभव व सामर्थ्य जगापुढे मांडले जाते. या दिवशी विविध क्षेत्रात कर्तुत्व गाजविणाऱ्या व्यक्तिंना विशेष सन्मान बहाल केले जातात.


पण आपण या दिवशी काय करतो? एक सुट्टीचा दिवस म्हणून आराम करतो, सिनेमा वा नाटकाला जातो किंवा कुठेतरी फिरायला जातो. हे योग्य नव्हे. हा दिवस खरे म्हणजे प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. तो आत्मपरिक्षणाचा दिवस आहे. 


मी माझ्या देशासाठी काय केले आहे व पुढे काय करायला हवे याचा विचार आपण या दिवशी केला पाहिजे. राष्ट्रहिताची लहानमोठी कृतीही देशाची प्रगती घडवून आणू शकते. तरच गणतंत्र दिवस साजरा करण्याला महत्त्व आहे.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद