आत्मकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आत्मकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मी दूरचित्रवाणी बोलत आहे मराठी निबंध 

MI DURCHITRAVANI BOLTOY ESSAY MARATHI





मी दूरचित्रवाणी बोलत आहे मराठी निबंध MI DURCHITRAVANI BOLTOY ESSAY MARATHI: तशी दूरचित्रवाणी सकाळी साडेसातपासून बोलत असतेच; पण त्या दिवशी गंमतच झाली. रात्रीचे साडेदहा वाजले. दूरचित्रवाणीवरचे कार्यक्रम संपले. नेहमीच्या कृत्रिम पद्धतीने निवेदिकेने नमस्कारासाठी हात जोडले आणि दूरचित्रवाणी संच बंद करावा म्हणून मी उठले. पण मला धक्काच बसला; कारण दूरचित्रवाणीवर चित्र दिसत नव्हते. पण आवाज मात्र ऐकू येत होता. विलक्षण मधुर आवाज-नेहमीच्या रूक्ष, कोरड्या व क्वचित कर्कश वाटणाऱ्या आवाजांहून कितीतरी वेगळा. अगदी स्नेहपूर्ण आवाजात कोणी तरी बोलत होते

"थांबा जरा, थोडा वेळ थांबा. तुमचा दूरचित्रवाणी संच बंद करू नका. मला तुमच्याशी बोलायचे आहे." तो आवाज थोडा अस्पष्ट होता. दबलेला भासत होता. कोणाची तरी त्याला भीती वाटत असावी आणि मग क्षणभर तो आवाज थांबलाही. पण कुतूहल वाटल्यामुळे मी दूरचित्रवाणी संच बंद केला नाही. उलट तेथेच कोचावर मी टेकले.

mi durchitravani bolto ahe essay marathi
mi durchitravani bolto ahe essay marathi
“मी दूरचित्रवाणी आहे, तुमची आवडती दूरचित्रवाणी." पुन्हा तोच स्नेहपूर्ण आवाज ऐकू येऊ लागला आणि आता पडदयावर एका सुंदर स्त्रीची आकृतीही दिसू लागली. विशेष म्हणजे अनेक यांत्रिक आभूषणे तिने धारण केली होती. अगदी मोकळ्या आवाजात ती बोलू लागली, "रसिक प्रेक्षकांनो, खूप दिवसांपासून मला तुमच्याशी बोलायचे होते. पण ही येथील सरकारी मंडळी मला ती संधीच देत नव्हती. आता आपण बोललो नाही तर ते स्वतःच्याच घाताला कारण होईल म्हणून मी माझे मनोगत व्यक्त करीत आहे.

"मित्रांनो, तुमची व माझी ओळख होऊन आता बरीच वर्षे झाली, पण या जगात मला अवतरूनही खूप वर्षे झाली. भारताच्या राजधानीत आज बरीच वर्षे मी वास्तव्य करून आहे. पण जेव्हा मी मुंबापुरीत आले तेव्हापासून माझा तुमच्याशी खूप परिचय झाला. आता महाराष्ट्रातील लोकांच्या दैनंदिन जीवनात मला प्रेमाचे स्थान आहे. तुम्ही सर्वजण माझ्यावर मनापासून प्रेम करता, पण माझ्या हातून तुमची जशी सेवा घडावी तशी घडतच नाही, याचेच मला फार वाईट वाटते. सध्या तरी त्याबाबतीत मी पराधीन आहे, गुलाम आहे, शासनयंत्रणेतील लोकांनी माझ्या नाड्या आपल्या हाती ठेवल्या आहेत...

“या अरसिक अधिकाऱ्यांचा पहिला फटका तुम्हांला बसतो याची मला कल्पना आहे. तुम्हांला अगदी रटाळ कार्यक्रम पाहावे लागतात. कित्येकदा तेच तेच कार्यक्रम 'फिर वही' या गोंडस नावाखाली पूनः पुन्हा दाखविले जातात. रंगीत रूप देऊन त्यांनी बाहयतः मला सजविले; पण माझा आत्मा-कार्यक्रमाचा दर्जा-दिवसेदिवस खालावत आहे. तुम्ही माझ्यावर रागावता. पण दोस्तांनो, त्यात माझा काय दोष? ही सर्व या लाल फितीची करामत आहे. हे सरकारी लोक आपले मित्र, स्नेही, आप्त यांनाच पूनः पून्हा कामे देतात आणि बराचसा मलिदा आपल्याच खिशात घालतात. पत्रोत्तराच्या वेळी मी तुमची पत्रे ऐकते; पण तुम्ही जी उत्तरे ऐकता ती माझी नाहीत हे लक्षात ठेवा.

"स्नेहयांनो, या जगात माझ्यासारखी दुःखी मीच आहे. कारण या कार्यक्रम नियोजन करणाऱ्यांनी माझा जीवनहेतूच हरवून टाकला आहे. खरे पाहता मी अवतरले ती ज्ञानदानासाठी. करमणूक करणे हा माझा दुय्यम हेतू ; पण आज मात्र दूरचित्रवाणी म्हणजे मनोरंजन एवढेच समीकरण झाले आहे, ते मला मान्य नाही. जेव्हा एखादया विशिष्ट पक्षाच्या प्रचारासाठी माझा उपयोग केला जातो, तेव्हा तर माझा जीवच गुदमरतो. बघू या, आता कल्पनेतील स्वायत्तता माझ्या वाटयाला केव्हा येते ती! ......"दूरचित्रवाणी बोलत होती आणि एकदम अंधार झाला कारण वीजच गेली होती. बहुधा ती वीज शासनाची आज्ञाधारक सेविका असावी! 
वरील निबंध मी दूरचित्रवाणी बोलत आहे मराठी निबंध या कसा वाटला ते कमेंट करून कळवावे , धन्‍यवाद

मी दूरचित्रवाणी बोलत आहे मराठी निबंध

राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त मराठी निबंध किंवा मी राष्ट्रध्वज बोलतोय निबंध मराठी


राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त मराठी निबंध किंवा मी राष्ट्रध्वज बोलतोय निबंध मराठी , Rastra Dhajache atamruta essay in marathi : भारताच्या राजधानीत माझा मुक्काम होता. एकएक वास्तू निरखीत मी नव्या दिल्लीच्या रस्त्यांवरून हिंडत होतो. राष्ट्रपतिभवनासमोर उभा असताना त्या भव्य वास्तूवरील राष्ट्रध्वजाने माझे मन आकर्जून घेतले. खरे पाहता, राष्ट्रध्वज आपल्या पूर्ण परिचयाचा, पण आज त्या भव्य वास्तूवर वाऱ्याबरोबर फडफडणारा आमचा राष्ट्रध्वज मला आगळावेगळाच भासत होता त्याच्याकडे पाहत असतानाच मला असं वाटू लागलं की, जणू काही ध्वज माझ्याशी बोलत आहे. त्या विचारातच मी बागेत बसलो. निळया आकाशाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा फडकत होता. मी एकटक त्याच्याकडे पाहत होतो. मला जणू तो सांगत होता

"तू माझ्याकडे एवढया आदराने पाहतोस. त्याचं कारण तुला माहीत आहे का?" राष्ट्रध्वज मला विचारत होता, “मी तुझ्या राष्ट्राचे प्रतीक आहे. मी म्हणजेच भारत. मला दिलेला सन्मान हा भारताचा सन्मान ठरतो. माझ्यामागे माझा उज्ज्वल इतिहास आहे. माझे आजचे हे रूप, आजचे हे स्थान मिळविण्यासाठी मला फार मोठ्या आपत्तीतून जावे लागले. माझ्या शूर सुपूत्रांची साथ मला सदैव लाभली. 

Rastra Dhajache atamruta essay in marathi
Rastra Dhajache atamruta essay in marathi
“१८५७ पासूनच भारतीयांनी आपल्या गुलामीचे जोखड फेकून देण्याचा प्रयत्न चालविला होता. परक्या इंग्रजांच्या बलाढय शक्तीला ते टकरा देत होते, तेव्हा मी त्यांना साथ देत होतो तेव्हा माझा रंग हिरवा होता आणि चारी बाजूंना बारीक सोनेरी पट्टी होती. पुढे प्रत्येक स्वातंत्र्यआंदोलनात माझी उपस्थिती होतीच. माझ्या वीरांना रक्त सांडण्याची स्फूर्ती मिळावी म्हणून मी माझ्या अंगावरील सोनेरी पट्टीचा रंग केशरी केला. माझ्या रूपात वेळोवेळी बदल होत गेला. हिरव्या व केशरी रंगांमध्ये पांढरी पट्टी आली. कधी माझ्यावर 'वंदे मातरम्' ही अक्षरे आली तर कधी सूर्य, चंद्र; कधी कमळे. १९२० नंतर मी तिरंगा बनलो व स्वदेशप्रेमाचे प्रतीक असा चरखा माझ्यावर आला. स्वातंत्र्योत्तर काळात मी 'राष्ट्रध्वज' बनलो तेव्हा माझ्या अंगावर अशोकाचे हे निळे चक्र आले.”

"माझा केशरी रंग देशभक्ती आणि त्याग यांचे प्रतीक आहे. माझा पांढरा रंग आमची शांतताप्रियता आणि मांगल्य सूचित करतो; आणि हिरवा रंग आमच्या धनधान्याच्या समृद्धीचा दर्शक आहे. माझ्यावरील निळे चक्र साऱ्या जगाला सूचित करते की, 'हे राज्य धर्म, नीती आणि प्रगती यांच्याच पथावर सदैव राहील.' हे युवका, समजला ना माझा संदेश? आता तुमच्या नव्या पिढीवर फार मोठी जबाबदारी आहे. कसली माहीत आहे! माझी शान टिकविण्याची.

"अरे मित्रा, आजवर माझ्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली. स्वातंत्र्यलढयात हातावर लाठ्या बसल्या, बंदूकीच्या गोळ्या बसल्या तरी त्यांनी मला कधी खाली पडू दिले नाही. हे स्वातंत्र्यसैनिक देशासाठी हसतहसत फासावर चढले तेही मला हातात घेऊन. काहीजणांनी सरकारी कचेरीवरील युनियन जॅक काढून तेथे मला फडकविण्यासाठी सहा-सहा महिन्यांची सजा भोगली. ते सारे रोमांचकारक क्षण आजही डोळ्यांसमोर आहेत. हे सुपुत्र जेव्हा माझ्या रक्षणासाठी बलिदान करतात, तेव्हा मी दुःखित अंतःकरणाने माझ्या उच्च स्थानावरून : खाली येतो.

“१९४७ साली १४ ऑगस्टच्या रात्री व पंधरा ऑगस्टच्या पहाटे मी जेव्हा ध्वजस्तंभावर चढत होतो तेव्हा कोट्यवधी डोळे माझ्याकडे लागले होते. तेव्हापासून माझ्या सुपुत्रांनी माझी शान राखली आहे. रणांगणावर जसा मी फडकलो, तसाच क्रीडांगणावरही विजयी वार्ता फडकवीत राहिलो. हिमालयाच्या शिखरावर शोभलो, त्याचप्रमाणे सागरसम्राटवरही राहिलो. परदेशांतही मला आता मानाचे स्थान आहे; कारण मी एका स्वतंत्र देशाचा राष्ट्रध्वज आहे.

“मुला, तू एवढया अभिमानाने माझ्याकडे पाहतोस म्हणूनच मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलतो आहे. नाहीतर आजचा यूवक आपल्या स्वतःतच एवढा गुरफटलेला असतो की त्याचे माझ्याकडे लक्षही जात नाही. पण लक्षात ठेवा; माझा सन्मान म्हणजे तुमच्या राष्ट्राचा सन्मान म्हणजे पर्यायाने तुमचाच सन्मान आहे."पाहता पाहता आवाज बंद झाला; मी मात्र राष्ट्रपतिभवनावरचा ध्वज डौलाने फडकत असलेला पाहून सुखावत होतो.
टीप : वरील निबंध राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त मराठी निबंध किंवा मी राष्ट्रध्वज बोलतोय निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • rashtradhwaj nibandh in Marathi
  • apla rashtradhwaj essay in marathi
  • aapla rashtradhwaj information in marathi
  • tiranga chi mahiti marathi
  • rashtradhwaj chi  atmakatha in Marathi
  • rastra dhwajache aatmvrutt essay in Marathi
  • Mi Rastra Dhwaj Boltoy Essay In marathi




राष्ट्रध्वजाचे आत्मवृत्त मराठी निबंध किंवा मी राष्ट्रध्वज बोलतोय निबंध मराठी


रस्त्याची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक

Mi rasta boltoy atmakathan essay in marathi


रस्त्याची कैफियत मराठी निबंध : “ऐका, ऐका माझी ही कैफियत. कैफियत कसली, तुमच्या दृष्टीने ही तर एक रडकथा आहे.” संध्याकाळच्या रहदारीच्या गर्दीच्या वेळी तो वाहता रस्ता बोलू लागला आणि काय चमत्कार, सारी रहदारी चित्रासारखी निश्चल झाली. सारे आवाज एकदम बंद झाले. रस्ता आपल्या दर्दभऱ्या आवाजात सांगू लागला, "आज कित्येक वर्षे मी तुमची सेवा करतो आहे. पण आहे का तुम्हांला काही याची कदर? केवळ आपल्या लाथांनी मला तुडवता. पण कधी माझ्या अंतःकरणाचा विचार केलात का?


"हे पांथस्थांनो, तुम्हांला वाटते मी पाषाणहृदयी आहे; पण बाबांनो, तसे नाही रे. मलाही हृदय आहे. क्षमाशीलतेचा आदर्श म्हणून तुम्ही या क्षमे'कडे पाहता, तिचाच वारस मी. तरीपण केव्हा ना केव्हा माझीही क्षमाशीलता संपते आणि आपणही बंड करून उठावे अशी ऊर्मी माझ्या अंतःकरणात उठते आणि मग कुठे कुठे माझे अंतरंग विदीर्ण होते. पण "त्याची शिक्षाही मला भोगावी लागते. 


टोचणारी खडी, उकळते डांबर आणि प्रचंड वजनाचा रोलर हे तर जन्मापासूनच माझ्या भाळी मारले गेले आहेत. ज्या ज्या वेळी माझ्या अंतःकरणाला तडे पडतात, तेव्हा पूनः पून्हा मला कुदळीचे घाव, खडीचा मारा, डांबराचे चटके, रुळाचा भार सहन करावा लागतो आणि एवढया कष्टाच्या चक्रातून गेल्यावरही मला काय मिळते? तुम्ही म्हणता, 'टाकीचे घाव सोसणाऱ्याला देवपण येते.' असे देवपण माझ्या वाटयाला कधीच येत नाही. माझ्या वाट्याला नेहमी येतात ते लत्ताप्रहार. निष्ठूर वाहनांच्या चाकांचा कठोरपणा!

Mi rasta boltoy atmakathan essay in marathi

Mi rasta boltoy atmakathan essay in marathi

“एवढे साहून माझ्या नशिबी काय येते? साधे नाव तरी पाहा-'सोनापूर मार्ग.' तेथेही आमच्या वाट्याला आली ती सोनापूरची वाट. असं म्हणतात की, पूर्वी येथे कोठेतरी जवळच सोनापूर म्हणजे स्मशान होते. आज ते सोनापूर अस्तित्वात नाही. पण मी मात्र कायमचा ‘सोनापूर मार्ग' झालो. नाहीतर इतर रस्त्यांना किती सुंदर नावे असतात. कुणावर लक्ष्मीचा वरदहस्त असतो, तर कुणी थोर नेत्यांच्या नावांनी पुनीत झालेले असतात. कुणी समाजसेवकांची स्मारके ठरतात, तर कूणी एखादया अमर घटनेला आपल्या ठायी चिरंजीव करतात. ते भाग्यही माझ्या भाळी आले नाही.

“हे मुसाफिरा, या अभाग्याच्या अंगावर कधी कुणा महात्म्याचे पाय पडले नाहीत. आजकाल ही बडी मंडळी सदैव मोटारीत बसून भुर्रकन निघून जातात. इतर रस्त्यांना मोठमोठ्या मोर्च्यांचे  तरी भाग्य लाभते, मला तेही लाभत नाही. गरिबांच्या वस्तीत वास्तव्य करणाऱ्या मला कधीतरी नव्या नवरानवरीच्या वरातीचा संग लाभतो, तर कधी एखादया देवाची पालखी भेटीला येते. जत्रेच्या दिवसांत मात्र मी अगदी नटूनथटून बसतो. तेवढेच काय ते समाधान माझ्या पदरी पडते. आता माझी एकच इच्छा आहे की, माझे सारे अंग तेजस्वी दिव्यांनी उजळून निघावे आणि स्वदेशासाठी झगडणाऱ्या स्वदेशभक्तांची पावले माझ्यावर पडावी.



"मित्रांनो, या कष्टमय जीवनातही मला काही सार्थकतेचे क्षण लाभतात. रात्रीच्या वेळी अनेक थकलेभागले जीव माझा आसरा घेतात. तेव्हा त्यांना माझा टणकपणा टोच नये, माझे थंडगार अंग दुःसह होऊ नये म्हणून मी मार्दवता धारण करतो, पोटातील ऊब शरीरावर आणतो आणि शांतपणे निद्राधीन झालेल्या त्या जीवांना पाहून जीवनाचे सार्थक मानतो.
टीप : वरील निबंध रस्त्याची कैफियत मराठी निबंध  या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
  • रस्ता बोलू लागला तर निबंध
  • रस्त्याचे आत्मकथन मराठी
  • रस्त्याची आत्मकथा
  • डांबरी रस्त्याचे मनोगत
  • Rastyache Manogat Essay in Marathi
  • rastyache manogat nibandh
  • rastyache aatmakathan

रस्त्याची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक