आत्मकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आत्मकथनात्मक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या)  मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi

गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या)  मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi :  “मित्रांनो, या तुमच्या समारंभात आज मला भाषण करण्याची संधी हवी आहे. मला ओळखलेत ना तुम्ही ! अहो, तुमच्या या समारंभातील मी सम्राज्ञी आहे. आज दोन दिवस येथे हे प्रदर्शन चालू आहे. या गुलाबपुष्प प्रदर्शनातील सम्राज्ञी ठरलेली मी एक गुलाबकळी. या प्रदर्शनात मी पहिला क्रमांक मिळविला आहे. तो मान तुम्हीच मला दिलात. हजारो फूलांतुन माझी निवड  झाली आहे. त्या निमित्ताने माझ्या मालकिणीचाही गौरव झाला आहे.


“माझ्या मालकिणीचे श्रेय मी मान्य करतेच. कारण तिने घेतलेल्या निगराणीमुळेच मलो आजचे हे सौंदर्य प्राप्त झाले आहे. दिवसातील बराच वेळ ती आमच्यासाठी खर्च करते. त्यासाठी ती बरेच वाचन करते, संशोधन करते आणि त्यामुळेच अनेकदा माझ्या मालकिणीला गुलाबपुष्प प्रदर्शनात बक्षिसे मिळतात. तिचा छंद आज तिचा ध्यास झाला आहे.



Gulab Fulache Manogat Essay In Marathi
Gulab Fulache Manogat Essay In Marathi


“आज मी तुम्हांला माझे मनोगत सांगणार आहे. आम्हां गुलाबपुष्पांचा जन्म माणसाच्या जन्मापूर्वीच झालेला आहे. तसे संदर्भ आढळतात. पण आमची निश्चित जन्मभूमी कोणती हे मात्र कुणाला सांगता येत नाही, तरी प्राचीनकाळी रोम हे गुलाबांच्या बागांसाठी विख्यात होते. दहाव्या शतकात अरबांनी आम्हांला भारतात आणले. तुमच्या प्राचीन वाङ्मयात आम्हांला अनेक नावांनी संबोधिलेले आहे. त्यांतील एक नाव आहे 'तरुणीपुष्प.'


 किती यथार्थ नाव आहे हे! तरुणतरुणींत मी विशेष प्रिय आहे. एकमेकांच्या प्रेमाचे प्रतीकच ते मला मानतात. मोगल राजांच्या काळात आमची लोकप्रियता विशेष वाढली. जहांगीर बादशहा ब बेगम नूरजहान यांच्या विवाहप्रसंगी आमच्यापासून प्रथम अत्तर तयार करण्यात आले.

“आज आमच्या हजारो जाती तयार करण्यात आल्या आहेत. पण सर्वच जाती सुगंधी नाहीत. नाना आकार, नाना रंग. मित्रांनो, आजवर आम्हांला अनेक गौरव लाभले. पंडितजींच्या कोटावरील लाल गुलाब हा विश्वप्रेमाचा संदेश देत होता. आज गुलाबपुष्पांचा छंद विश्वव्यापी झाला आहे. त्यामुळेच जगभर ठिकठिकाणी आमची प्रदर्शने भरविली जातात.


“या सगळ्यात एक खंत आहे की हे माझे वैभव फक्त काही मूठभर लोकांचीच मिरासदारी झाली आहे. गुलाबाचा छंद जोपासणे म्हणजे चिक काम आहे. त्यामुळे गोरगरीब याकडे वळतही नाहीत. कालपासून मी पाहते, एवढी मंडळी माझे सौंदर्य पाहून गेली पण त्यांत एकही श्रमिक नव्हता, झोपडपट्टीतील एकही मूल नव्हते.


 मी मान्य करते की माझ्यासारखी फुले देणारी झाडे ते लावू शकणार नाहीत पण या प्रदर्शनातील हजारो फुलांचे अनुपम सौंदर्य ते आपल्या डोळ्यांनी लुटू शकणार नाहीत का? हा आगळा आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. दोन दिवस हे प्रदर्शन तिकिट लावून झाले. आता एखादा दिवस विनातिकिट हे प्रदर्शन ठेवले तर चालणार नाही का? भाकरीमागे धडपडणाऱ्या मंडळींना मुद्दाम येथे आणले तर ... तरच माझ्या या अल्पायुषी जीवनाचे खरे सार्थक होईल.”


टीप : वरील निबंध गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या)  मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते


  • fulache manogat nibandh marathi
  • fulanchi atmakatha nibandh in marathi
  • fulanchi atmakatha essay in marathi language
  • fulache atmavrutta essay in marathi language
  • fulache atmakatha essay in marathi

गुलाबफुलाचे मनोगत (गुलाबपुष्प प्रदर्शनात पहिला क्रमांक मिळालेल्या) मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Gulab Fulache Manogat Essay In Marathi

गावकुसाबाहेरील वस्ती'चे आत्मवृत्त आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध 



मी गावकुसाबाहेरची वस्ती आहे' “पाहुण्यांनो, क्षणभर थांबा. नाकावर रुमाल ठेवून तुम्ही येथून झपाझप जात आहात. पण थांबा. मला तुमच्याशीच बोलायचे आहे. इतका वेळ तुम्ही गावाची प्रशंसा करीत होता. पण आता मला पाहुन नाक मुरडता. किती कृतघ्न आहात तुम्ही! 'गाव तिथं महारवाडा असायचाच' असे तुम्ही उपेक्षेने म्हणता. पण खरं सांगू का, हा महारवाडा आहे म्हणूनच गाव एवढा स्वच्छ आहे. गावातला केरकचरा हा महार गोळा करून आणतो. मेलेले ढोर हा मांग ओढून आणतो. या वस्तीतील ही सारी मंडळी गावासाठी राबत असतात आणि त्याबद्दल या लोकांना काय मिळते? तर केवळ शिव्याशाप.


"निसर्गाने सर्वांसाठी भरभरून दिलेले पाणीही या लोकांना मिळत नाही. तहान भागायची मारामार, मग त्यांनी स्वच्छ तरी कसे राहायचे? यांची पोटे तर सदा रिकामीच. मग जे काही मिळेल ते खायचे. 'शिळेपाके, आंबलेले' या शब्दांशिवाय दुसरे शब्द त्यांना माहीतच नाहीत. कष्टांशिवाय ‘कचाकचा भांडायचे' एवढीच त्यांची दुसरी करमणूक. कोणत्याही रोग-साथीला ही वस्ती प्रिय, मग फटाफट मृत्यू. नव्या जन्माचा आनंद नाही. मृत्यूचा शोक नाही. आनंद-शोक करायला येथील माणसांजवळ वेळ आहे तरी कुठे?

gavakusabaheril vastiche atamrutta essay in marathi
gavakusabaheril vastiche atamrutta essay in marathi


“आता हे गावकुसाबाहेरील जगही जागे व्हावयास लागले आहे. येथील काही मुले शहरात जाऊन शिक्षण घेत आहेत. त्यांच्यातला माणूस जागा झाला आहे. ते आपल्या लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊ लागले आहेत. गावाने दिलेले फाटके कपडेच तराळाने घातले पाहिजेत, नवीन कोरे कपडे अंगावर चढवायचे नाहीत, ही वर्षानुवर्षे चालत आलेली समजूत ते पुसू पाहत आहेत.


 ग्रहणाच्या वेळी 'दे दान सुटे गिराण' म्हणून दान मागायचे नाही अशी शिकवण ते आपल्या लोकांना देत आहेत. त्यांच्यातील भटक्या लोकांच्या मुलांना स्थिर जीवन लाभावे म्हणून त्यांची खटपट चालू आहे. त्यासाठी आता येथे शाळा पण सुरू झाली. गावातील विहिरीवर ते आपला हक्क आता संगू लागले आहेत. गावकऱ्यांना हे कसे रूचणार? मग ते म्हणतात-'म्हारडा मातला आहे.' कधी कधी मला पेटवून दिले जाते. मारझोड तर नित्याचीच. पण लक्षात ठेवा, आता मी ऐकणार .... वर्षे तुम्ही मला गावाबाहेर ठेवलेत, पण आता येथेही नवे गाव वसणार आहे."




वरील निबंध गावकुसाबाहेरील वस्ती'चे आत्मवृत्त आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

गावकुसाबाहेरील वस्ती'चे आत्मवृत्त आत्‍मकथनात्‍मक मराठी निबंध | Gavakusabaheril Vastiche Atamrutta Essay In Marathi

मी चहा बोलतोय मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi

निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी चहा बोलतोय मराठी निबंध बघणार आहोत. या निबंधामध्ये चहाच्या उगमापासून ते आजपर्यंत चहा मानवी जीवनात कोणते चांगले वाईट बदल घडवून आणतो हे सांगितले आहे.  यात चहा स्वतः त्याची मनोगत सांगत असल्याने निबंध खूपच  मनोरंजक होतो.  चला तर मग सुरूवात करूया निबंधाला


प्रवास अगदी कंटाळवाणा झाला होता. केव्हा एखादे स्टेशन येते आणि आपण कपभर चहा घेतो असं मला झाले होते. वेळ होती मध्यरात्रीची. बाकीचे प्रवासी शांतपणे झोपले होते. गाडीचा वेग मंदावला, स्टेशन आले. पण माझी मनीषा काही पूर्ण झाली नाही, कारण चहावालाही शांत झोपला होता. अस्सा राग आला तेव्हा त्याचा.



गाडी पुढे निघाली आणि काय चमत्कार! एक वाफाळलेला चहाचा कप माझ्यापुढे आला, मी कप उचलणार तेवढ्यात आवाज आला, “मी चहा आहे. तू माझी आठवण काढलीस ना, म्हणून मुद्दाम आलो. अरे, मी तुझ्या देशातीलच आहे आणि आता सर्वांच्या इतक्या परिचयाचा झालो आहे की काही वेळेला ‘अतिपरिचयात् अवज्ञा' असाही अनुभव येतो.



माझे पूर्वज मूळचे चीनमधील. चीन या देशानेच साऱ्या जगाला माझी देणगी दिली आहे. खरं पाहता आपल्या भारतात आसाममध्येही माझे पूर्वज फार पूर्वीपासून अस्तित्वात होते. पण कोणाचे त्यांच्याकडे विशेष लक्ष नव्हते. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी भारतात माझा खरा विकास साधला. आज भारताला मी आणि माझे बांधव बरेच परकीय चलन मिळवून देतो."

Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi
Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi


"खरं सांगू का, मला माझा विशेष अभिमान वाटतो तो वेगळ्या गोष्टीसाठी. आज या भारतात एवढी विषमता आहे. गरीब-श्रीमंत हा केवढा भेदभाव आहे; पण माझ्याजवळ असा कोणताच फरक नाही. आलिशान बंगल्यात माझे जेवढे अगत्याने स्वागत होते तेवढीच एखादया झोपडपट्टीत केले जाते. एखादया विद्वान साहित्यिकाला, संशोधकाला माझी जेवढी गरज असते तेवढीच यंत्रावर काम करणाऱ्या कामगारालाही माझी आवश्यकता असते. सर्वांना स्फूर्ती देणारे, प्रेरणा देणारे असे उत्तेजक पेय माझ्यापासून तयार करता येते.



“मळ्यातल्या छोट्या छोट्या झुडपांवर माझा जन्म होतो. आसाममधील ब्रह्मपुत्रेचे खोरे हिमालयाच्या पायथ्यावर दुआर व तराई हा डोंगराळ भाग, दार्जिलिंग, रांची, डेहराडून खोरे, कांगा खोरे अशा भारतातील विविध भागांत मी व माझे भाईबंद जन्माला येतो. आमची खुडणी भारतात हातांनीच केली जाते. खुडणी करणाऱ्या स्त्रियांच्या पाठीवर पिशवी असते, त्यांत त्या आमची पाने टाकतात. तेथन आमची पाठवणी कारखान्यात होते, तेथे यंत्राच्या साहाय्याने वळविणे, वाळविणे वगैरे क्रिया होतात आणि मग खास प्लायवूडच्या पेट्यांतून आमची देशोदेशी रवानगी होते."



“मित्रा, साखर, दूध व पाणी यांच्या संयोगाने तुम्ही आमचा आस्वाद घेता. काही. देशात दुधाचा वापर न करता लिंबू, लोणी यांचा उपयोग करतात. काही लोक आमच्यावर टीका करताना 'टॅनिनचा' गाजावाजा करतात; पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. फार उकळविल्याने टॅनिन पेयात उतरते त्यात आमची काय चूक ? उलट चहा हे शरीराला हितकारक व उत्साहवर्धक पेय आहे
.

आवाज थांबला, पण माझा कंटाळा आणि आलेली मरगळ केव्हाच संपली होती. गाडी कुठल्यातरी स्टेशनात थांबली आणि एक चहावाला न बोलावताच माझ्यासमोर चहा घेऊन उभा ठाकला होता!


मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद

निबंध 2

chaha che atmavrutta in essay in  marathi



तुमची नि माझी खूप गट्टी आहे. कारण तुमच्या प्रत्येक दिवसाची सुरुवातच मुळी माझ्या, म्हणजे चहाच्या सेवनाने होते. चहाचा एक कप घेतल्याशिवाय तुमच्या कामाला सुरुवात होत नाही. कचेरीत काम करताना किंवा अभ्यास करताना कंटाळा आला की, तुम्ही माझी आठवण काढता.


एक कप गरमागरम चहा मिळाला की, पुन्हा कामाला, पुन्हा अभ्यासाला सुरुवात ! संध्याकाळी कामावरून दमून परत आल्यावर पुन्हा माझी आठवण होतेच.  तुमच्यासाठीच मी दूरवरून येतो. तुमची आणि माझी पहिली ओळख करून दिली ती चिनी प्रवाशांनी. आता भारतात माझी खूप लागवड होते. 


ज्यावेळी भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं, तेव्हा येथे आलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी माझी खूप लागवड केली. आसाममधील ब्रह्मपुत्रेचं खोरं, हिमालयाच्या पायथ्यावरील दुआर व तराईचा डोंगराळ भाग, दार्जिलिंग, रांची, डेहराडून खोरं येथे आमची खूप लागवड केली जाते. आज भारतात आमची एवढी विपुल निर्मिती होते की, परदेशात आमची निर्यात होते. भारताला आम्ही भरपूर परकीय चलन मिळवून देतो.


आसाममधील एका मळ्यातल्या छोट्या झुडपावर माझा जन्म झाला. स्थानिक स्त्रिया आमच्या खुडणीचं काम करतात. दोन्ही हातांनी पानं खुडून त्या पाठीवरच्या टोपलीत टाकतात. तेथून आमची पाठवणी कारखान्यात होते. पुढील सर्व कामं कारखान्यात चालतात. यंत्राच्या साहाय्याने पानं वळवणं, वाळवणं वगैरे सोपस्कार होतात आणि मग खास खोक्यांतून आम्हांला देशोदेशी पाठवलं जातं. तेव्हा तेथे आम्हांला विविध नावे मिळतात.


आज मला जगात सर्व ठिकाणांहून मागणी आहे. श्रीमंतांच्या महालापासून गरिबांच्या झोपडीपर्यंत सर्वत्र माझे कायमचे वास्तव्य असते. माझ्यापासून उत्तेजक पेय बनवण्याच्या विविध पद्धती आढळतात. बहुसंख्य लोक पाणी, दूध, साखर यांचा चहापेय बनवण्यासाठी उपयोग करतात. काही देशांत चहात लिंबू, लोणी टाकतात, तर काहीजण मीठ टाकून चहाला नमकीन बनवतात, कुणाला चहा फार कडक लागतो, तर कोणाला अतिशय सौम्य लागतो.


कोणी टीकाकार चहाला अपेय ' मानतात. त्यांतील टॅनिनचा ते बागुलबुवा करतात. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, त्याच न्यायाने 'चहाबाजपणा' तापदायक होतो. त्याचे  व्यसन जडते. तुमच्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण समारंभांची लज्जत वाढवण्यात तुम्हांला माझी मोलाची मदत होते. अशी आहे ही तुमच्या-माझ्यातील दोस्ती!

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद


महत्‍वाचे मुद्दे : 
(टीप : निबंध लिहीताना आपण खालील महत्‍वाचे मुद्दे  वापरू शकता. )

  • चहाचा जुना परिचय 
  • दिवसाची सुरुवात 
  • चहा चीनमधून आला 
  • लागवडीची पद्धत
  • अनुकूल वातावरण व जागा
  • कारखान्यात होणारे संस्कार 
  • सर्वत्र मागणी
  • श्रीमंत, गरीब
  • बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
  • सर्वांना उत्तेजन देतो
  • तरी टीका
  • जीवनात चहाला आगळे त्त्व.


टीप : वरील निबंध मी चहा बोलतोय मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते.
  • mi chaha boltoy nibandh in  marathi

मी चहा बोलतोय मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Mi Chaha Boltoy Nibandh In Marathi

एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक| Eka Putlyache Manogat Essay In Marathi

एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : 'पुण्याचे रूपांतर लवकरच पुतळ्यांच्या शहरात होईल' पुण्याच्या 'दैनिक सकाळ'मध्ये कुणीतरी वर्तविलेले हे भविष्य. त्यामागचा उपरोध बराच काळ मनात रेंगाळत राहिला. टीकाकाराने पुण्यातील एका रस्त्यावरच्या पुतळयाची मोजदाद केली होती आणि मग असे हे पुतळे जागोजागी असावेत की नसावेत याबद्दलची उलटसुलट मते वाचकांनी मांडली होती. मनात आले या वादविषयात त्या पुतळ्यांचे कोणी मत घेतले आहे का?


"किती वेडी आहेस ग! अग पुतळयांच मत कोण घेणार? पुतळयांना आपलं मत मांडता आलं असतं तर मग त्यांना पूतळे म्हणता आले असते का?" आता मात्र त्या पुतळ्याने आपले पुतळेपण काही काळ बाजूला ठेवले होते आणि तो स्वतःचे मन उघडे करीत होता

"अरे माणसा, आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच. कारण आम्हांला रस्त्यांवर उभे करणारे लोक, त्यातून आपला काही ना काही स्वार्थच साधत असतात; आणि गप्पा मात्र स्वार्थत्यागाच्या करतात. केवढी विसंगती आहे ही! पण तेही आम्ही निमूटपणे सहन करतो. एखादी थोर व्यक्ती विशिष्ट ध्येयासाठी जीवनभर अखंड झिजते. प्रसंगी त्या ध्येयासाठी प्राणही ठेवते आणि मग तिच्या मृत्यूनंतर तिच्या ध्येयतत्त्वांना हरताळ फासला जाऊन तिचा पुतळा उभारला जातो. भांडवलशाहीला विरोध करणाऱ्या नेत्याच्या पुतळ्यासाठी भांडवलदारांकडून चंदा गोळा केला जातो. केवढा हा दैवदुर्विलास!



“मग सांगा, आवश्यकता आहे का अशा पुतळयांची? पुतळे उभारले जातात ते उभारणाऱ्या व्यक्तींचा वा संस्थेचा दानशूरपणा, मोठेपणा सिद्ध व्हावा म्हणूनच. थोरांची ही थोर स्मारके इतरांना स्फूर्तिदायक होतात ही एक फसवी, लोणकढी थाप आहे. लोकांना आपल्या दैनंदिन व्यवहारात त्यांची आठवणही होत नाही.
Eka Putlyache Manogat Essay In Marathi
Eka Putlyache Manogat Essay In Marathi


"माझा जन्मही अशाच काही धनवंतांच्या गर्वातून झाला आहे. ज्या व्यक्तीचं प्रतिनिधित्व मी करीत आहे तिच्या पासंगालाही उभं राहण्याची या धनवंतांची योग्यता नाही. आपण विचारवतांना मानतो, याचे भव्य प्रदर्शन हा या पुतळानिमितीमागचा त्याचा हेतू आहे. त्या महान व्यक्तीचा गौरव करण्याच्या निमित्ताने त्यांनी स्वतःचीच नावे लिहून, स्वतःचाच गौरव करून घेतला आहे. खरं सांगू, माझ्या अनावरणाचा तो दिवस माझ्या जीवनातील सर्वांत आनंदाचा दिवस असावयास हवा होता, पण तोच माझ्या दुःखाचा दिवस ठरला. कारण तेव्हापासूनच माझी ही विटंबना सुरू झाली आहे.”

"उन्हापावसात मी येथे तटस्थपणे उभा आहे. माझ्याभोवती अनेक थोर व्यक्तीही माझ्यासारख्याच पुतळ्यांच्या रूपांत उभ्या आहेत. अंगावर कावळे, चिमण्या व इतर पाखरे घाण करीत आहेत. पण याहूनही मला उबग आला आहे तो काही लोकांच्या हीन वृत्तीचा. या लोकांच्या विघातक गोष्टींपूढे पक्ष्यांनी केलेल्या घाणीचे काहीच वाटत नाही. समाजकंटक लोकांची ही कुटिल कृत्ये पाहून मन बेचैन होते, पण मी काय करणार? बोलूनचालून मी एक पुतळा!" एवढं बोलून तो आवाज बंद झाला आणि तो बोलणारा पुतळा पुनश्च मूक पुतळा झाला.

वरील निबंध एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद



एका पुतळयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Eka Putlyache Manogat Essay In Marathi

दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Darveshache Manogat Essay In Marathi


दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : “मी आहे एक दरवेशी. दारोदार हिंडणारा. बरोबर आहे माझा सारा कुटुंबकबिला. त्यांत मुख्य आहे भालू-म्हणजे हे माझे काळे अस्वल. नंतर माझी पत्नी आणि माझी दोन चिल्लीपिल्ली. सध्या तरी हा भालूच आम्हां सर्वांचा पोशिंदा आहे.


"माझ्या वाडवडिलांकडून हा व्यवसाय माझ्याकडे आला. माझा बापही दरवेशीच होता. त्याच्याबरोबर मी लहानपणी गावोगाव हिंडत असे. मी केव्हा मोठा झालो आणि ही अस्वलाची दोरी माझ्या हातात कशी आली हे मला उमगलेच नाही. बाप थकला होता, तरीही आमच्याबरोबरच हिंडत होता. कारण आम्हांला कायमचं असं घरच नाही. अशाच भटकंतीत कुठेतरी बापाला मरण आलं. तिथेच त्याला अग्नी दिला.

“लोकहो, हेच माझे दुःख आहे. कसले हे जगणे! पाय दुखेस्तोवर आम्ही चालत राहतो. गाव लागला की खेळ करतो. कधी कुठे बरी मिळकत होते तेव्हा आम्ही भालूला प्रथम पोटभर खायला घालतो. भालूला सर्व भाजीपाला आवडतो. पण मांस खायला मिळाले की स्वारी खूष. भालूला सर्वांत प्रिय म्हणजे 'मध.' मी त्याला सणावारी भरपूर मध खायला घालतो. आमची चार माणसांची गूजराण बहधा होते ती वडापावांवर. जेव्हा एखादया गावात आमचा मुक्काम असतो तेव्हाच आम्ही तीन दगडांची चूल पेटवितो आणि त्याच वेळी पोरांना भाकरी मिळते.



darveshache manogat essay in marathi
darveshache manogat essay in marathi


“लोकहो, आता मला या भटक्या जीवनाचा कंटाळा आला आहे. पण मी दुसरे कोणतेच काम करू शकत नाही. मी पूर्णपणे अडाणी आहे. मला कधी शिकायला मिळाले नाही. या अस्वलाबरोबरच मी मोठा झालो. म्हणून त्याच्याबरोबर नाचणे, उड्या मारणे एवढेच मला जमते. आज त्याचीच शिक्षा मी भोगत आहे. वर्षातील एकही दिवस मला पोटभर जेवण मिळत नाही. लोक खेळ बघायला गर्दी करतात, 


अस्वलाचे काम पाहून टाळ्या पिटतात. पण पैशासाठी थाळी फिरविली की मात्र पळ काढतात. काही खेड़त लोक अस्वलाच्या केसांचा ताईत विकत घेऊन आपल्या लेकरांच्या गळ्यात घालतात. खरं सांगू का! माझा काही या ताईतांवर विश्वास नाही, तरी पण मी ताईत तयार करून विकतो. कारण त्यांतच मला मिळकत होते. चार आणे खर्च येणारा ताईत मी दोन रुपयांना विकतो.

“मायबाप लोकहो! माझं तुमच्याकडे एकच मागणे आहे. आता मी असं ऐकतो की भटक्या लोकांच्या  मुलांसाठी सरकार शाळा काढणार आहे. मला माझ्या या दोन्ही मुलांना शिकवायचे आहे. त्यांच्या तरी नशिबी हा दरवेशीपणा नको. निघाली आहे का अशी शाळा? तिथं माझी ही कोकरं राहतील! मग त्यांच्यासाठी कितीही कष्ट करायला लागले तरी मी व माझा भालू करू. अगदी शेवटपर्यंत मी आणि भालू एकमेकांना सोडणार नाही.

वरील निबंध दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

दरवेशाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Darveshache Manogat Essay In Marathi


भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध  आत्‍मकथनात्‍मक

Autobiography of An Old temple in Marathi essay

भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध  आत्‍मकथनात्‍मक : सुट्टी लागली म्हणून आम्ही काही मित्र आमच्या एका मित्राच्या गावी गेलो. शहरापासून दूर अशा त्या शांत गावात आम्हांला खूपच बरे वाटत होते. मोकळ्या वातावरणात दूरदूर फिरताना एक आगळा आनंद मिळत होता. अशाच भटकंतीत एका गर्द वनराईत एक देऊळ आढळले. कुतुहलाने देवळात शिरलो आणि मन विषण्ण झाले. कारण ते देऊळ भंगलेले होते. केवळ देवळाचीच पडझड झालेली नव्हती, तर आतील मूर्तीही भग्न झाली होती. हे कोणातरी मूर्तिभंजकाचे काम असावे, हे सहज लक्षात येत होते. माझ्याबरोबरचे सर्वच मित्र खिन्न झाले. हे कोणाचे कृत्य असावे बरे? सारेजण विचारात पडले. तेवढ्यात एक गंभीर आवाज निनादला.

Autobiography of An Old temple in Marathi essay
Autobiography of An Old temple in Marathi essay
"ऐका युवकांनो, तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी देते. मी कोण? तुमची श्रद्धा असलेला 'राम' हा देव आहे ना, त्याची मी प्रतिमा. खूप वर्षांपूर्वी एका भाविकाने माझी येथे प्रतिष्ठापना केली. मोठ्या भाविकतेने त्याने राजस्थानातून मला येथे आणले. दूरवरून कारागीर आणून हे सुंदर मंदिर उभारले. सभोवताली गर्द वनराजी लावली. गावातील लोक भक्तिभावाने माझी पूजा करीत. सर्व मंडळी गुण्यागोविंदाने नांदत होती तोवर मी वैभवात होते. धर्म, जात, पंथ येथे आड येत नव्हते. सर्व माणसे देवाला सारखीच, तसा सर्वांचा ईश्वरही एकच. केवढी थोर भावना.

“गावात कुणी बाहेरचे लोक येऊ लागले. त्यांच्याबरोबर अनेक नवे विचार गावात येत गेले, कुरबूरी सुरू झाल्या. भांडणे होऊ लागली, ती वाढली आणि विकोपाला गेली. माझा धर्म इतरांच्या धर्मापेक्षा श्रेष्ठ असे प्रत्येकाला वाटू लागले. मग कुणी वेड्यापीराने माझी अशी दुर्दशा केली. येथे रणकंदन माजले. अनेकांचे बळी पडले आणि या मंदिराचीही मोडतोड झाली. तेव्हापासून लोक येथे फिरकत नाहीत. तुम्ही येथे आलात म्हणून मी मन मोकळे केले.
वरील निबंध भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

भग्न देवालयाचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | Autobiography of An Old temple in Marathi essay

स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक


स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : “अरे अज्ञ मुलांनो, जरा इकडे लक्ष दया. मला बोलू दया. माझे डोळे तुमचे हे सहस्र अपराध पाहन आता थकले आहेत. ओळखलंत ना मला! मी आहे तुमची 'स्वातंत्र्यदेवता.' आपण स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत असे तुम्ही केवढे अभिमानाने सांगता. तेव्हा क्षणभर मी रोमांचित होते, पण दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या तुम्हांला पाहिले ना की, मी व्यथित होते.



 मला प्राप्त करण्यासाठी तुमच्या काही बांधवांनी प्राणांची बाजी लावली. आठवा त्यांचा त्याग! केवळ 'हुतात्मे' म्हणून वर्षातून एक दिवस त्यांचे स्मरण करून तुमचे त्यांच्याविषयीचे कर्तव्य संपत नाही. माझी प्राप्ती करून घेण्यासाठी ज्या माझ्या एका सपत्राने प्राण दिले त्याची दुर्दैवी पत्नी आज चार घरची भांडीधुणी करून आपले व आपल्या चार मुलांचे कसेबसे पोट भरीत आहे. तरी का तुम्हांला याची जाण? आयुष्यभर महात्माजी कष्टले, ते कशासाठी? आपल्या संसाराचा सारिपाट उधळून स्वातंत्र्यवीर झिजले ते कशासाठी? आपल्या साऱ्या वैभवाचा त्याग करून पंडितजींनी कारावासातील कष्टप्रद जीवन पत्करले, ते कशासाठी? माझ्यासाठीच ना?



swatantratechi kaifiyat essay in marathi
swatantratechi kaifiyat essay in marathi
आजचे माझे पुत्र-पुत्र कसले कुपूत्र. तुम्ही माझा-स्वतंत्रतेचा लिलाव करायलाच उदयुक्त झाला आहात का? प्रत्यक्ष आपल्या मातेची अशी विटंबना करणारे साऱ्या पृथ्वीवर कूणी नसतील. नाहीतर मूठभर पैशासाठी आपल्या देशाची रहस्ये विकायला माझेच हे सुज्ञ पुत्र कसे तयार झाले असते? कुणीतरी भडकविले म्हणून माझेच तुकडे करायला हे माझे दिवटे पुत्र कसे तयार झाले असते?


स्वातंत्र्य, समता, बंधुता या त्रयींचा सदैव जप करणारे तुम्ही दुसऱ्याला गुलामीत कसे ठेवता? घरातील स्त्रीला तुम्ही स्वातंत्र्य देत नाही. कुणाला तरी आपला ऋणको समजून त्याला पिढ्यान्पिढयाचा गुलाम करता, कूणाला तरी जन्माने दलित मानून त्याला बंधनात टाकता, स्वतःची हौस म्हणून स्वच्छंदी पक्ष्यांना, माशांना पिंजऱ्यांत टाकता. हे कसे? हीच माझी तुमच्याविरुद्ध कैफियत आहे.
वरील निबंध स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक हा निबंध तुम्‍हाला कसा वाटला ते कमेेंट करून अवश्‍य कळवावे. धन्‍यवाद

स्वतंत्रतेची कैफियत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक

सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक 


सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक : "माझ्या काठावर जमलेल्या मुशाफिरांनो, क्षणभर येथे थांबा आणि माझे मनोगत ऐकून घ्या. आजवर अनेकदा मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न केले पण ते यशस्वी झाले नाहीत. शेवटी मलाही मर्यादा आहेतच ना!


“मानवा, महासागर म्हणून तू माझे कौतुक करतोस. रत्नाकर' म्हणून मला संबोधून माझ्या वैभवाचा गौरव करतोस तरीपण हे मानवा, माझ्या उणिवा मी जाणतो. माझ्या काठी आलेल्या तुझी तहान मी भागवू शकत नाही. माझे पाणी खारट आहे म्हणून तुम्ही सर्वजण मला नावे ठेवता. पण हा खारटपणा माझ्यात का उतरला माहीत आहे तुम्हांला? 


साऱ्या जगाची सारी घाण, सारे क्षार मी सामावून घेतो. धर्म, जात, पंथ, वर्ण इत्यादी कारणांवरून तुम्ही झगडता; पण तसा भेदभाव माझ्याकडे नाही. तुमच्या श्रीगजाननांच्या मूर्तीना मी माझ्यात सामावून घेतो, त्याचप्रमाणे इस्लाम बांधवांचे ताबूतही माझ्यातच समर्पित होतात!


sagarache manogat marathi nibandh
sagarache manogat marathi nibandh


“मनुपुत्रांनो, तुम्ही मला कितीही नावे ठेवलीत ना, तरी तुम्ही माझे लाडके आहात! म्हणूनच तुमच्या साऱ्या लीला मी आजवर सहन केल्या. तुमच्यातल्या एका कवीने माझी निदानालस्ती करताना म्हटले आहे की, हा पयोधर पाणी साठवून ठेवतो म्हणून त्याचे स्थान खाली आहे आणि पयोद पाणी देतो म्हणून त्याचे स्थान उंचावर, आकाशात आहे. पण या मूर्ख कवीला हे माहीत नसावे की, पयोधर आहे म्हणूनच पयोद आहे. बरे असू दे ते. मला आज तुमच्याशी बोलायचे आहे ते वेगळेच. 


मानवा, आजवर तू समुद्रमंथनाची कथा केवळ कौतुकाने सांगत होतास. पण आज मात्र तु खरोखरच माझे मंथन चालविले आहेस. देवकथेतील चौदा रत्नांपेक्षाही अधिक अमूल्य, या औदयोगिक युगाला आवश्यक असे इंधन तुम्ही माझ्या अंतःकरणातून बाहेर काढले. तुमच्या बुद्धिवैभवाचे मला सदैव कौतुक वाटते. म्हणूनच यंत्रांकडून घुसळले जाण्याचे सर्व दुःख मी सहन करतो. तुमच्या साहसाने मी दिङ्मूढ होतो. तुमच्यातील काहीजण वर्षानुवर्षे माझ्या उदरात दडलेल्या अंटाक्टिकावरही पोहोचले आहेत.

"अभिमानास्पद वाटणाऱ्या या घटना घडतानाच पुढच्या काही अशुभ घटनांची मला चाहूल लागत आहे. अंटाक्टिका खंडावरील अधिवासाबाबतचे झगडे आताच सुरू होऊ लागले आहेत. हिंदी महासागरावरील तुमची ही सशस्त्र आरमारी जहाजे पाहून माझे अथांग मनही व्यथित होते. मानवांनो, हे थांबवा. आपापसांत भांडू नका. अरे या महासागराजवळ अमाप संपत्ती आहे, त्याचा उपभोग सर्वांनी घ्या."
टीप : वरील निबंध सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

  • सागराचे मनोगत निबंध मराठी
  • समुद्राचे मनोगत मराठी निबंध
  • सागराचे आत्मकथन मराठी
  • समुद्राचे आत्मवृत्त निबंध
  • sagarache manogat marathi nibandh
  • samudrache manogat marathi nibandh

सागराचे मनोगत मराठी निबंध आत्‍मकथनात्‍मक | sagarache manogat marathi nibandh