Showing posts with label कथनात्मक. Show all posts
Showing posts with label कथनात्मक. Show all posts

मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध

 

मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध  : 'मोकळा तास' म्हणजे शालेय जीवनातील एक आनंदाची पर्वणीच! “मी उदया येणार नाही हं!" असे सूतोवाच कधी एखादे गुरुजी करतात; तर-“अरे, आज अत्रे सर येणार नाहीत. त्यांच्या मेहुणीचे लग्न आहे.” अशी बित्तंबातमी एखादा वर्गमित्र आणतो तेव्हा या 'मोकळ्या तासा'ची पूर्वसूचना मिळते. पण एखादे दिवशी अनपेक्षितपणे असा 'मोकळा तास' मिळतो आणि मग आश्चर्य, आनंद अशा संमिश्र भावनेने 'ऑफ पीरियड' असा वर्गात एकच जल्लोष उठतो. मोकळ्या तासाला वर्गावर येणारे शिक्षक खिलाडू वृत्तीचे असले तर ते हे स्वागत हसत स्वीकारतात; पण असा अनुभव क्वचितच येतो. बहुतेक शिक्षक काही ना काही अभ्यासच घेत असतात.

खरे पाहता, मोकळ्या तासाला अभ्यास म्हणजे आमच्या हक्कावर आक्रमणच नाही का? मोकळा तास म्हणजे गप्पांचा तास असे आमचे गणित असते. अशा गप्पांतून आमचे जनरल नॉलेज'-सामान्य ज्ञान कितीतरी वाढते. माझ्या वर्गातील 'राजीव जोगळेकर' याला अशा मोकळ्या तासाला फार भाव असतो. कारण राजीवचे वडील शिकारी आहेत; त्यामुळे राजीवजवळ शिकारकथा, साहसकथा यांचा भरपूर साठा आहे. वर्गात आलेले शिक्षकही राजीवला एखादी चित्तथरारक शिकारकथा सांगण्याचा आग्रह करतात. मग राजीव कथा सुरू करतो. 

off period in school essay in marathi
off period in school essay in marathi
कथानिवेदनाची उत्कृष्ट कला राजूला लाभली आहे. राजूची कथा रंगू लागते तशी मुले तास विसरतात, वर्ग विसरतात, शाळाही विसरतात. राजूची कथा सुरू झालेली असते आणि आता सर्वजण जंगलात जाऊन पोहोचलेले असतात. सर्वांच्या अंगावर रोमांच उभे असतात. श्वास रोखून धरलेले असतात. बिबट्या वाघ व शिकारी, परस्परांवर नेम धरून बसलेले असतात आणि तेवढ्यात घंटेचा टोला पडतो. गुरुजींसह सर्वांना तो तास संपू नये असे वाटत असते; पण नाइलाजाने राजूला कथा थांबवावी लागते. आणि मग कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी आम्हांला दुसऱ्या मोकळ्या तासाची वाट पाहावी लागते.

एखादा मोकळा तास म्हणजे विनोदाची मेजवानीच ठरते. आमच्या शाळेतील ‘भागवत सर' अशा मोकळ्या तासाला वर्गावर आले की ते स्वतःच काही विनोद सांगतात. मग एकापाठोपाठ एक विनोदांची, चुटक्यांची मुलांकडून मैफल झडते. प्रत्येक विनोद-श्रवणानंतर वर्गात हास्याचा कल्लोळ उठतो. काही काही विनोद तर इतके अफलातून असतात की हशाबरोबर बाकेही बडविली जातात. आपण शाळेत आहोत याचा विसर पडतो. अशा वेळी शेजारच्या वर्गातील शिक्षक आमच्या वर्गात डोकावतात; पण आम्हांला त्याची तमा नसते. असा हा मोकळा तास संपला की वाईट वाटते. पुन्हा मोकळा तास मिळावा आणि भागवत सरच वर्गावर यावेत अशी आम्ही मनोमन प्रार्थना करीत असतो.

एखादया मोकळ्या तासाला कोणीही सर वर्गावर येत नाहीत. मग काय विचारता, आमचेच राज्य चालू होते. वर्गप्रतिनिधी वर्गाची सूत्रे हाती घेतो तेव्हा वर वर वर्ग शांत दिसत असतो; पण आमच्या काही ना काही खोड्या चालूच असतात. बाकाखालची वया, पुस्तके, दप्तरे, खाण्याचा डबा, चपला इकडून तिकडे सरकविल्या जातात. कुणाच्या पाठीवर 'विकाऊ गाढवा'ची चिठ्ठी लावली जाते, तर कधी कुठूनतरी एखादा बाण येतो आणि मग कागदाच्या बाणांचा पाऊस पडतो. त्यातच कधीतरी नकलांचा कार्यक्रम सुरू होतो आणि मग सर्व शिक्षकांच्या नकला घडू लागतात. वर्ग अक्षरशः डोक्यावर घेतला जातो. कधी याचे पर्यवसान शिक्षेतही होते; पण त्याचेही आम्हांला काही वाटत नाही. कारण मोकळया तासाची मजा पोटभर उपभोगलेली असते. 'मोकळा तास' हा शालेय जीवनातील 'ओयासिस', रम्य हिरवळ आहे हे खरेच!

टीप : वरील निबंध मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध  या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
 • shaletil aathvani essay in marathi
 • shaletil gamti jamti essay in marathi
मोकळा तास (ऑफ पीरियड) मराठी निंबध


माझी आई मराठी निबंधरामायणात महर्षी वाल्मीकींनी रंगवलेले प्रभू रामचंद्र म्हणतात, 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.' खरोखर किती अचूक वर्णन आहे हे ! आईपुढे स्वर्गाचेही माहात्म्य थिटे पडते. आईच्या प्रेमाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. कवी मोरोपंत आईचे माहात्म्य सांगताना म्हणतात, "इतरांनी कितीही प्रेम केले, माया केली तरी त्यांचे 'प्रसादपट' हे थिटे ठरतात. तसे आईचे नसते. तिची माया कधी आटत नाही. अगदी आपल्या कुपुत्रालाही ती विटत नाही." माझी आईही अगदी अशीच आहे. आजचे माझे यश पूर्णपणे माझ्या आईमुळेच आहे. परवाच शाळेतील विविध स्पर्धांत मला बक्षिसे मिळाली. माझे हस्ताक्षर हे सर्व विदयार्थ्यांच्या हस्ताक्षरापेक्षा उत्कृष्ट ठरले, याचे संपूर्ण श्रेय माझ्या आईकडे जाते. लहानपणी अनेकदा मी लिहिलेला मजकूर पसंत पडला नाही की आई मला तो परत लिहायला लावी. परत परत लिहिल्यामुळे माझे अक्षर घोटीव व वळणदार झाले. 

majhi aai essay in marathi
majhi aai essay in marathi
या मला आठवतेय, मी चौथीत असताना माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळी परीक्षेला जाण्यापूर्वी मला अचानक उलट्या व्हायला लागल्या. मी परीक्षेला घाबरायचो. कशीबशी परीक्षा संपवून मी घरी आलो. आईने ओळखले, याला परीक्षेची भीती वाटते. मग पाचवीपासून तिने मला अनेक परीक्षांना बसवले आणि आता कोणत्याही परीक्षेचे मला अजिबात भय वाटत नाही. असे घडवले मला माझ्या आईने. म्हणूनच मनात येते, 'न ऋण जन्मदेचे फिटे.' माझ्या आईने माझ्यासाठी स्वत:च्या 'करीअर'चा कधीच विचार केला नाही. 

ती स्वतः एम्. एस्सी. असूनही मी लहान असताना तिने कधी नोकरीचा विचार केला नाही. मी आठवीत गेल्यावर तिने पीएच्. डी. केली, तीही शिष्यवृत्ती मिळवून. अभ्यास करतानाही ती घरातील सर्व कामे स्वतः करत होती. नाम माझ्या आईचे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीक लक्ष असते. मी काय वाचावे. कोणकोणत्या स्पर्धांत भाग घ्यावा याकडे तिचे कटाक्षाने लक्ष असते. तिच्या वाचनात काही चांगले आले की ती आवर्जून मला वाचायला सांगते; पण माझे निर्णय मीच घ्यावेत याबाबत ती आग्रही असते. खरोखरच आई आपल्या मुलासाठी किती करत असते. जिजाऊने शिवाजीला स्वराज्याची प्रेरणा दिली. महात्माजींच्या मनात सत्याचा आग्रह त्यांच्या मातेने ठसवला, तर भूदानाची कल्पना विनोबांना सुचली ती आईच्याच शिकवणुकीतून. विनोबांची आई म्हणे, ‘विन्या, आपल्याजवळ पाच घास असतील, तर त्यातील एक तरी दुसऱ्याला दयावा.'

आई हा थोर गुरू आहे. म्हणून तर बापूजी म्हणत, 'एक आई शंभर गुरूंहूनही श्रेष्ठ आहे.' आजच्या काळातला दहशतवाद, भ्रष्टाचार या गोष्टींविषयी बोलत असताना परवा आई म्हणाली, “प्रत्येकाने लक्षात ठेवावे की, प्रत्येकालाच असते आई." खरेच एवढा विचार केला तर हिंसकांचे हात हिंसा करताना थबकतील.आईने आपल्यासाठी केलेल्या या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते, ज्याला लहानपणापासून आईचा विरह झाला असेल त्याचे केवढे दुर्भाग्य ! म्हणून कवी यशवंत म्हणतात,
 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' MAJHI AAI MARATHI NIBANDH 420 शब्‍दात

कवी यशवंतांनी आईची थोरवी गाताना म्हटले आहे की, “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी।" खरं आहे ते! या मातेच्या प्रेमाला कशाची तुलना नाही. सत्ता, मत्ता, विद्वत्ता सारे हया जन्मदेपुढे कःपदार्थ आहेत. म्हणून तर जगज्जेत्या सिकंदरालाही मातेची ओढ लागली होती. स्वराज्यसंस्थापक शिवबाच्या जीवनातही मातेला सर्वश्रेष्ठ स्थान होते. मातेचा प्रेमभाव सर्वत्र सारखाच आढळतो. त्यात गरीब-श्रीमंत, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव करता येत नाही. मातेच्या प्रेमात दिक्कालाच्या अडचणीही नसतात. एखादी श्रीमंत माता आपल्या मूलाचे जेवढे लाड करील, त्याला जेवढ्या उंची किमती वस्तू आणून देईल तेवढया भारी वस्तू गरीब माता आपल्या लेकराला देऊ शकणार नाही. पण म्हणून काही तिच्या प्रेमाची प्रत कमी ठरणार नाही. मातृप्रेमाची अनेक उदाहरणे आपल्याला भोवताली नेहमी दिसत असतात. चार घरी हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण स्वतः उपाशी राहते; पण आपल्या लेकराला तो ओला-कोरडा तूकडा आधी भरविते. आपल्या लेकरासाठी माता केवढे साहस करू शकते याचा पुरावा म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरूज.

माता आपल्या लेकरासाठी काय करीत नाही? ती जन्म देते एवढेच नव्हे तर सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती सर्वतोपरी सांभाळते. ती त्याला खाऊपिऊ घालून त्याचे संगोपन करते व त्याबरोबरच त्याला नीतिकथा, चातुर्यकथा सांगून ती त्याचे मन फुलविते आणि मनाचा विकासही घडविते. मातेचा विशेष सहवास न लाभलेल्या बालकाला हया साऱ्या सौभाग्याला वंचित व्हावे लागते. शिवबा, विनोबा, बापूजी या साऱ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या मातेलाच दिले आहे. बापूजी तर आपल्या आत्मवृत्तात सांगतात, “एक नाना ही सहस्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे." अपंग, मंदबुद्धी कसेही बालक असले तरी माता आपली माया पातळ करीत नाही.

मातेच्या या श्रेष्ठत्वाची कसोटी लागते ती कुपुत्राच्या बाबतीत. कारण अशा दुर्गुणी मुलाचा वाली मातेशिवाय कोणी नसतो. घरीदारी सर्वत्र त्याला अपमान सोसावा लागतो. प्रत्यक्ष जन्मदाता पिताही त्याला घराबाहेर काढतो. अशा वेळी ती माता मात्र आपल्या कुपुत्रालाही जवळ करते. म्हणून तर कवी मोरोपंत म्हणतात
"प्रसाद पट झाकती परि परा गुरूंचे थिटे

म्हणून म्हणती भले न ऋण जन्मदेचे फिटे." आपल्या जीवनात अशी अनेक उपकारांची गाठोडी आपल्या मस्तकी असतात, त्यांचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. म्हातारपणी वृद्ध मातापित्यांची सेवा करणे ही काही अंशाने त्या ऋणांची फेड होईल. पण ती फारच थोडी. कारण तो आपल्या कर्तव्याचाच भाग असतो. काहीजण कृतघ्न होऊन ती फेड पैशाने करू पाहतात आणि वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवितात. 

म्हातारपणी मातापिता आपल्या मुलांच्या प्रेमासाठी आसुसलेली असतात. ते त्यांना मिळाल्यास, त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. अनेकदा ‘अतिपरिचयात् अवज्ञा' या उक्तीप्रमाणे आपल्याकडून मातेची महती ओळखली जात नाही. पण हे कृपाछत्र एव मोठे आहे. हे उपकार एवढे अगणित आहेत की सात वेळा काय, शंभर वेळा जन्मनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे की, कोणत्याही फळाची अपेक्षा न करता ते आपल्यावर कृपाप्रसादाची खैरात करीत असते. म्हणून तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटते. उगाचच नाही कवी म्हणत की, “आईसारखे दैवत साऱ्या जगतामधी नाही.

MAZI AAI ESSAY IN MARATHI 223 WORDS 


एकत्र कुटुंबात मी लहानाचा मोठा झालो. आमच्या घरात भरपूर माणसे आहेत आणि ती एकमेकांशी 'नात्याच्या रेशमी धाग्यांनी ' जोडलेली आहेत. माझी आई ही या घराची कर्णधार आहे असे म्हणायला हरकत नाही. चाळीशी ओलांडलेल्या माझ्या आईचा या घरात प्रेमळ वावर आहे. माझ्या आजीचा आणि माझ्या आईचा एकमेकींवर पूर्ण विश्वास आहे व परस्परांमध्ये दाट जिव्हाळा आहे. अशी ही माझी आई दिवसातून फारच थोडा वेळ माझ्या वाट्याला येत असली, तरी तिचे माझ्या अभ्यासाकडे, माझ्या आवडीनिवडीकडे पूर्ण लक्ष असते. केवळ माझ्याच नव्हे तर आमच्या घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना स्वावलंबनाचे वळण लावण्यामागे, माझ्या आईचाच मोठा सहभाग आहे.

सुट्टीच्या दिवसांत आई घरातील सर्व मुलांना उत्तम पुस्तके वाचून दाखवते. त्यातून स्वाभाविकच आमच्यात वाचनाची आवड निर्माण झाली आहे. आईचे हस्ताक्षर उत्तम आहे. सुलेखन कसे करावे हे मला माझ्या आईनेच शिकवले. घरातील प्रत्येकाची आवडनिवड आईने लक्षात ठेवलेली आहे, त्यामुळे प्रत्येकजण तिच्यावर खूश असतो. नीटनेटकेपणा हा तिचा खास गुण आहे. त्यामुळे घरातल्या कुणालाही काही हवे असले की, त्याला माझ्या आईची आठवण येते आणि माझी आई त्याची नड तत्परतेने भागवते.

माझी आई उत्तम गृहिणी आहे. आल्यागेल्यांचे हसतमुखाने आतिथ्य कसे करावे, ते माझ्या आईकडन शिकावे. स्वयंपाक करण्यात ती कशल आहे. माझे आजोबा व आजी आपल्या सूनबाईला 'अन्नपूर्णा' असे संबोधून सतत कौतुक करत असतात. शेजारच्या सर्व स्त्रिया अडीनडीला माझ्या आईकडे धावत येतात व आई त्यांना शक्य ती सर्व मदत करते. सदा हसतमुख असणारी ही माझी आई आमच्या घरची 'लक्ष्मी' आहे, असे सारेजण म्हणतात ते उगाच नाही!माझी आई निबंध मराठी 273 शब्‍दात


कवी यशवंतांनी आईची महत्‍व सांगताना म्हटले आहे, 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!' अगदी खरे आहे ते ! मातेचे प्रेम अतुलनीय आहे. सत्ता, मत्ता, विद्वत्ता सारे या जन्मदेपुढे क:पदार्थ आहेत. म्हणून तर कुणापुढेही न वाकलेला जगज्जेता सिकंदर आपल्या मातेसमोर नतमस्तक होत असे. महाराष्ट्राचे स्वराज्यसंस्थापक शिवाजी महाराज हेही श्रेष्ठ मातृभक्त होते.

मातेच्या वात्सल्याचे स्वरूप सर्वत्र सारखेच आढळते. मातेच्या वात्सल्याची अनेक उदाहरणे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. चार घरी हिंडून भाकर-तुकडा गोळा करून आणणारी भिकारीण स्वतः उपाशी राहते; पण आपल्या लेकराला तो ओला-कोरडा तुकडा आधी भरवते. प्रसंगी अपत्याच्या वात्सल्यापोटी माता आपल्या प्राणांचीही बाजी लावते. इतिहासातील याचे जिवंत स्मारक म्हणजे रायगडावरील हिरकणी बुरूज!

माता आपल्या लेकरासाठी काय करत नाही? ती त्याला जन्म देते. एवढेच नव्हे, तर सर्वस्वी परावलंबी असलेल्या आपल्या बाळाला ती नयनांचा दिवा व तळहातांचा पाळणा करून सर्वतोपरी सांभाळते. ती त्याचे संगोपन करते, त्याला नीतिकथा, चातुर्यकथा सांगन ती त्याचे कसमकोमल मन फुलवते. त्यावर सुसंस्कार घडवते. शिवबा, विनोबा, बापूजी यांसारख्या थोर व्यक्तींनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या मातेलाच दिले आहे. बापूजी तर आपल्या आत्मवृत्तात सांगतात, “एक माता ही सहस्र शिक्षकांपेक्षा श्रेष्ठ आहे."

 मातेचे हे उपकार आपण कधीही फेडू शकत नाही. आपल्या वृद्ध मातापित्यांची सेवा करणे, ही काही अंशाने त्या ऋणांची फेड म्हणता येईल. खरे तर तो आपल्या कर्तव्याचाच एक भाग असतो. काही कृतघ्न करंटे ही फेड पैशाने करू पाहतात आणि वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवतात. म्हातारपणी मातापिता आपल्या मुलांच्या प्रेमाच्या सावलीत विसावण्यासाठी आसुसलेले असतात. तसे झाल्यास ते त्यांना आपल्या जीवनाचे सार्थक वाटते.

मातेचे कृपाछत्र एवढे विशाल आहे, हे उपकार एवढे अमाप आहेत की शंभर वेळा जन्मूनही ते फिटणार नाहीत. जननी हे दैवत असे असामान्य आहे. ते आपल्यावर सदैव कृपाप्रसादाची खैरात करत असते. म्हणून तर प्रत्यक्ष भगवान रामचंद्रांना स्वर्गापेक्षाही माता श्रेष्ठ वाटते. म्हणूनच कवी म्हणतो, 'आईसारखे दैवत साऱ्या जगतामधि नाही.'

टीप : वरील निबंध माझी आई या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

 • majhi aai nibandh lekhan
 • majhi aai essay in marathi for 4th std
 • majhi aai maza adarsh nibandh marathi
 • beautiful marathi essay on motherमाझी आई मराठी निबंध | MAJHI AAI MARATHI NIBANDH

एस. टी. बसचे आत्मवृत्त |Bus Essay in marathi 


एस. टी. बसचे आत्मवृत्त |Bus Essay in marathi :"मला बोलू दया. माझा आवाज बंद करू नका. कारण मी आता शेवटचे क्षण मोजत आहे. आज सकाळचे ते भीषण क्षण मी विसरू शकत नाही. असा कोणता गुन्हा मी केला होता की मला हे एवढे शासन झाले! खरंच सांगते. अहो, मला अजन जगायचे होते. माझ्या सुपूत्रांची मला अजन सेवा करायची होती. पण या आडदांड जगाने मला ‘राम म्हणण्याची वेळ आणली हो! पुढे एस. टी. बस म्‍हणाली.

“तसे माझे वय काही फार झाले नव्हते. माझा जन्म होऊन पुरती पाच वर्षेही झाली नाहीत. हा जन्म, हे रूप घेण्यासाठीही मला अतोनात कष्ट साहावे लागले. लोखंडी घणाचे प्रहार व धगधगत्या अग्नीचे चटके; सारे मी सहन केले. कशासाठी? केवळ तुमच्यासाठी. माझ्या लालचुटूक रंगावर मी खूष होते. 'रस्ता तेथे एस्. टी.' हेच मुळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य. त्यामुळे या लहानशा आयुष्यातही मी महाराष्ट्राचा कानाकोपरा धुंडाळला. गुळगुळीत डांबरी रस्त्यावरून धावले. खडबडीत दगडी रस्ते पार केले, उंच सरळ चढण चढले आणि तेवढीच उतरलेही. अनेक घाटांतून अवघड वळणे घेत घेत आयुष्य काढले.

st-bus-essay-in-marathi
st-bus-essay-in-marathi
"हे सारे मी कोणासाठी करीत होते? तर माझ्या गरीब देशबांधवांसाठी. श्रीमंतांजवळ स्वतःची वाहने असतात. मनात आले की ते केव्हाही कोठेही जाऊ शकतात. पण खेडोपाडी राहणारे अनेक गरीब लोक असतात, त्यांच्या प्रवासाची चिंता कोणी करावी? या लक्षावधी माणसांची सेवा करावी हेच माझे जीवनध्येय होते. एकदा एक गरीब खेडूत दुसऱ्या एका प्रवाशाला म्हणत होता, 'अरे आपण कुठे गरीब आहोता ही दोन-अडीच लाखांची लाल एस्. टी. आपलीच नव्हे का!' तेव्हा मला अगदी धन्य धन्य वाटलं. मी आणि माझ्या इतर शेकडो भगिनी महाराष्ट्राच्या खेडोपाडी जाऊन पोहोचलो. त्यामुळे खेड्यांचा विकास होऊ लागला. ज्या खेड्यांचा बाहेरच्या जगाशी संबंधच येत नव्हता ती मागासलेली होती. तेथील मालाला बाजारपेठ दिसत नव्हती. हे सारे प्रश्न आमच्यामुळे सुटले. आपल्यामुळे माणसाचे जीवन सुसहय होत आहे हे पाहून कष्टाचे काही वाटत नव्हते.

"त्यावेळीही एक गोष्ट मनाला डाचत होती. हे प्रवासी इकडे तोंडाने 'आमची गाडी' म्हणायचे, पण गाडीची स्वच्छता ठेवायचा प्रयत्न करायचे नाहीत. एस्. टी. आपलीच म्हणून जेथे बसायचे तेथेच घाण करायचे. सकाळी छानपैकी न्हाऊन माखून आलेल्या माझे रात्रीपर्यंत रूप पाहण्यासारखे व्हायचे. शेंगांची टरफले, केळ्यांच्या साली अशी गलिच्छ आभूषणे मला नित्य बहाल केली जायची. माझा उपयोग करणारे लोक माझी खुशाल मोडतोड करायचे. कुठलाही संघर्ष, संप उभा राहिला की आमच्यावर दगडांचा मारा. कधी कधी जाळपोळही सहन करावी लागे. मला चालविणारे चालकही अनेक. काही काही इतक्या निर्दयपणे माझ्याशी वागणूक करीत की, त्यामुळे माझी गात्रेच खिळखिळी होत. देखभाल, तेलपाणी यांबाबत तर निराशाच होती. तरी 'सेवा हाच माझा धर्म' असल्याने वर्षातील तीनशे दिवस तरी मी रस्त्यावर धावत असे."

“आज हाच रस्ता माझी मृत्युभूमी ठरला. मी रोजच्याप्रमाणे धावत होते. चालकही चांगला होता. उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला बक्षीस मिळाले होते. पण एका बेजबाबदार ट्रकचालकाने आपला रस्ता सोडला आणि तो सरळ माझ्या अंगावरच चालून आला. माझे तुकडे तुकडे झाले दोन्ही गाड्यांचे चालक आणि कित्येक प्रवासी मृत्युमुखी पडले. कोणत्याही दुरुस्तीपलीकडे मी आता आहे. या क्षणी मला एकच प्रश्न ग्रासतो आहे, यात माझी चूक कोणती? माझ्या सेवाव्रताला हेच फळ का? कोण देईल माझ्या या प्रश्नांची उत्तरे?

टीप : वरील निबंध एस. टी. बसचे आत्मवृत्त या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते


 • Bus Essay in marathi


एस. टी. बसचे आत्मवृत्त |Bus Essay in marathi


माझी समाजसेवा मराठी निबंध 

samaj seva essay in marathi


माझी समाजसेवा मराठी निबंध लिहीताना आठवण येते माझ्या शाळेतील विषयाची इयत्ता आठवीत आल्यापासून 'समाजसेवा' हा माझा शालेय अभ्यासातील एक विषय झाला. या विषयाच्या पहिल्या तासिकेतच गुरुजींनी समाजसेवेची आवश्यकता, तिचे स्वरूप यांबद्दल माहिती सांगून अनेक समाजसेवकांची चरित्रे ऐकविली. तेव्हापासून माझ्या मनात एक स्फुल्लिग पडले की, आपणही समाजसेवा करावी. पण समाजसेवा कशी करावी या प्रश्नाने मी बेचैन झालो. मनात हेतू ठेवला की माणूस त्याच्या सिद्धीसाठी यत्न करतो. त्यानुसार रस्त्यात कुणी आंधळा माणस रस्ता ओलांडताना दिसला की मी धावत जाऊन त्याला रस्ता ओलांडण्यास मदत करतो. तसेच कुणी पल्ला हुडकत असला की मी त्याच्या सेवेस हजर होतो. यात्रेच्या गर्दीत कूणाची मुले हरवली तर त्यांच्यासाठी मी धावून जातो. इतकेच काय पण यंदा उन्हाळ्यात मी आमच्या अंगणात एक माठ ठेवला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्यांना माठातील थंडगार पाणी देताना मला कृतार्थता वाटते. पण एवढ्याने मला समाधान नव्हते.

याहूनही काही भरीव कामगिरी करण्याची माझी इच्छा होती. ती संधी मला आयतीच लाभली. यंदाचे वर्ष शासनाने 'प्रौढ शिक्षण योजनेचे वर्ष म्हणून जाहीर केले. देशात निरक्षरता फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि जोवर मतदार निरक्षर आहे. तोवर या लोकशाहीला काही अर्थ नाही. म्हणून शासनाने प्रौढ शिक्षण योजने'चा धडाडी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यातील काही कामगिरी आमच्या शाळेकडे आली आणि तेथून ती आमच्याकडे आली. विशेष लक्षणीय अशी समाजसेवा करावयास मिळणार म्हणून आम्ही विलक्षण आनंदित झालो होतो.

samaj seva essay in marathi
samaj seva essay in marathi
 या कार्यासाठी आमच्याकडे सोपविण्यात आलेली झोपडपट्टी गुरुजींनी आम्हांला दाखविली. मग आम्ही चौघेजण तेथे 'पूर्वमाहिती गोळा करण्यासाठी गेलो. दुपारच्या वेळी गेलो तर तेथे कोणी भेटणार नाही, हे लक्षात घेऊन आम्ही तेथे सायंकाळी गेलो. त्यावेळी कष्टाची कामे करून ते लोक परतले होते. २० ते ५० च्या वयोमर्यादेतील किती माणसे निरक्षर आहेत, याची माहिती आम्हांला हवी होती; पण अतिशय साशंक होऊन कोणतीही माहिती सांगण्यास त्यांनी नकार दिला. तेव्हा आम्ही नोकरीचे आमिष त्यांच्यापुढे ठेवले. मग ते थोडे थोडे बोलू लागले. अशा दोन-चार वेळा भेटी झाल्यावर त्यांना आमच्याविषयी थोडा विश्वास वाटू लागला. मग एका सणाच्या निमित्ताने आम्ही तेथील मारुतीच्या देवळात एक सास्कृतिक कार्यक्रम घडवून आणला. या कार्यक्रमातील लोकनाट्यात एका निरक्षराची सावकाराकडून झालेली पिळवणूक व त्यात त्याची झालेली वाताहत दाखविलेली होती. लोकनाट्यातील या निरक्षराच्या जीवनाचे ते विदारक चित्र त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले होते. त्यामुळे त्यांना ते खूपच आवडले.

पढे आम्ही नित्यनियमाने त्या वसाहतीत जाऊ लागलो. कधी गोष्टी सांग, कधी गाणी म्हणन दाखव, कधी कीर्तन करून दाखव अशा नित्य नवीन मार्गाने आम्ही त्यांना रंजवीत होतो. अलीकडे ते सारेजण कामावरून परतले की जेवणे उरकून सरळ देवळात येत. त्यांच्याबरोबर महिला देखील येत. मनोरंजनाबरोबर त्यांना शिक्षण देणे हा आमचा हेतू होता. कधी कधी आम्ही त्यांना विविध माहितीपर बोलपटही दाखवीत असू. ते जी श्रमाची, मोलमजुरीची कामे करीत, ती प्रगत देशात यंत्रावर कशी चालतात हे पाहिल्यावर त्यांना गमत वाटली; पण त्याच वेळी त्याच्यातील एकाने मला सवाल टाकला, “पण काय हो, ही कामे यंत्राने झाली तर आम्ही बेकार नाही का होणार?" अशा तहेने त्यांच्यात विचारमंथन होऊन, त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. त्यामुळे आमचा हेतू साध्य झाला होता. आता मोठी मोठी अक्षरे लावून ते वाचू लागले होते.

बरोबर दोन महिन्यांनी आम्ही त्यांच्या हातांत पाट्या दिल्या. आता ती राठ बोटे अक्षरे वळवु लागली. त्यासाठी आम्हांला व त्यांना देखील खूप कष्ट पडले; पण शिक्षण असाध्य राहिले नाही. आज आमची ही झोपडपट्टी शंभर टक्के साक्षर झाली आहे. त्यांनी बँकेत आपली खाती उघडून ते नियमितपणे पैसेही शिल्लक टाकतात. “या पोरांनी आम्हांला नवं जग दाखवलं," असे ते कौतुकाने म्हणतात व आपण साक्षर झाल्यावर दुसऱ्या एकाला तरी साक्षर करणार असा संकल्प सोडतात. याहून अधिक काय साधावयाचे असते समाजसेवेतून!

टीप : वरील निबंध माझी समाजसेवा मराठी निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

 • मी केलेली समाजसेवा मराठी निबंध
 • मी केलेली समाजसेवा निबंध
 • माझा समाजसेवेचा एक अनुभव मराठी निबंध

माझी समाजसेवा मराठी निबंध

दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध

dushkal ek bhishan samasya marathi nibandh


दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध लिहीताना आठवण येते ती त्‍या वर्षी पडलेल्या दुष्‍काळाची,  त्‍या वर्षी राज्यातील पंधरा जिल्हयांत दुष्काळ जाहीर केला गेला होता. सातत्याने दुष्काळ पडण्याचे हे चौथे वर्ष होते. रखरखीत उन्हामुळे आणि पाण्याचा अंशही कोठे न राहिल्याने जमिनीला सर्वत्र भेगाच भेगा पडल्या होत्या. सगळीकडे दुष्काळी कामे सुरू केली गेली होती. त्या दुष्काळी कामांवरचा मुख्य अधिकारी म्हणून माझ्या वडिलांची नेमणूक झाली होती. त्यामुळे बाबांचा सतत दौरा चालू असे.

सुट्टीचे दिवस म्हणून मीही रिकामटेकडा होतो. सतत महिनाभर सुट्टी असल्याने दिवस अगदी कंटाळवाणे झाले होते. शेवटी एक दिवस बाबांच्या जीपमध्येच जाऊन बसलो. मला पाहून बाबा म्हणाले. “अरे, त कशाला येतोस? तेथे काहीही पाहण्यासारखे नाही. दुष्काळामळे सारा प्रदेश उजाड, भगभगीत झालेला आहे." पण आज मी ठरविलेच होते की आपण बाबांबरोबर जायचेच.

dushkal ek bhishan samasya marathi nibandh
dushkal ek bhishan samasya marathi nibandh
बाबा वाटेत दुष्काळाच्या तीव्रतेचे वर्णन करीत होते आणि जागोजाग त्याचे दर्शन घडतच होते. तृषार्त वसुधा डोळे वटारलेल्या भगवान सहस्ररश्मीकडे काकुळतीने पाहत होती. वाटेत लागणाऱ्या वस्त्यांतील हवालदिल माणसे, त्यांच्या हातापायांच्या झालेल्या काड्या, खपाटीला गेलेली पोटे, रिकामे गोठे दुष्काळाच्या लीला मूकपणे दाखवीत होते. एका ठिकाणी मोठे मोठे पक्ष घिरट्या घालताना दिसत होते. बाबा म्हणाले, “जनावर मेलेलं दिसतंय!" थोडे पुढे गेलो तर पक्ष्यांनी खाऊन उरलेल्या एका जनावराचा मोठा सांगाडा पडला होता. मनात आले, या अवर्षणरूपी असुरापुढे भेदभाव नाही. माणसे, जनावरे, पक्षी सारेच याला सारखे. माणसाला आपल्या विद्वत्तेचा केवढा गर्व; पण निसर्ग पुनः पुन्हा त्याला जाणीव करून देतो, “अरे तुझ्या जीवनाच्या साऱ्या नाड्या माझ्या हातात आहेत बघ!"

दुष्काळी काम म्हणून एका ठिकाणी रस्ता बांधण्याचे काम चालू होते. हजारो माणसे कामात गुंतलेली होती. त्यांतील काही खडी फोडण्याचे काम करीत होती. जीप थांबली आणि बाबा खाली उतरले; तशी दहा-बीस माणसे त्यांच्या पाया पडू लागली, क्षणभर मला प्रश्न पडला की अशी कोणती आगळीक झाली आहे या लोकांकडून? मग लक्षात आले की, ते बाबांकडे कामाची मागणी करीत आहेत. “साहेब, काम दया, पोटाला दया,” असे केविलवाण्या शब्दांत ते विनवीत होते. माणसांची ही दयनीय स्थिती पाहून माझे मन सुन्न झाले.

बाबा दुष्काळी कामाची पाहणी करीत होते. तेथील मुकादमाला आणि इतर अधिकाऱ्यांना कामाच्या प्रगतीबाबत विचारणा करीत होते. इतक्यात दूरवर काहीतरी गडबड झाली म्हणून आम्ही तेथे गेलो तर काम करणारी एक स्त्री बेशुद्ध होऊन पडली होती. ती स्त्री गरोदर असावी. तात्पुरत्या उपायाने ती शुद्धीवर येईना, तेव्हा तिला जवळच्या गावातील सरकारी दवाखान्यात न्यायचे ठरले. दुसरे काही वाहन नसल्यामुळे आमच्या जीपमधून न्यायचे ठरले. "हिचे नात्याचे कुणी आहे का येथे?" बाबांनी पुनःपुन्हा विचारले, पण कोणीही पुढे आले नाही. तेव्हा तेथील एक सामाजिक कार्यकर्ता जीपमध्ये बसला.

गाडी पुढे निघाली तेव्हा त्या साऱ्या दृश्याने मी अगदी हबकूनच गेलो होतो. पण खरा धक्का मला पुढेच बसला. दवाखाना आला तेव्हा त्या बाईला डॉक्टरच्या स्वाधीन करून आम्ही तेथील डाकबंगल्यावर गेलो तेव्हा तो समाजसेवक बाबांना म्हणाला, “दादासाहेब, तुम्हांला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तुमच्या या कामावरचे मुकादम मजुरांना अत्यंत छळतात. त्यांना मिळणाऱ्या चार-पाच रुपये मजुरीतील प्रत्येकी एक-एक रुपया हे राक्षस कापून घेतात. मजुरांना देण्यात येणाऱ्या धान्यापैकी माप-माप काढून घेतात आणि हजारो रुपये कमावतात. पण हे गरीब लोक परिस्थितीने एवढे हवालदिल झाले आहेत की ते त्यांच्याविरुदध काही बोल शकत नाहीत. आता ही जी बाई बेशुद्ध पडली तिचा नवरा तेथे कामावर होता. पण रोज बुडेल म्हणून त्याने आपली ओळख दिली नाही वा तो बाईबरोबर आलाही नाही.”

हे सारे ऐकून माझे मन अगदी सुन्न झाले. वाटले, दुष्काळाने माणसाला केवढे हे निष्ठूर बनविले आहे!

टीप : वरील निबंध दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
 • दुष्काळ एक समस्या निबंध
 • दुष्काळ एक आपत्ती निबंध मराठी
 • दुष्काळ एक भीषण समस्या निबंध मराठी
 • पाण्याचा दुष्काळ निबंध मराठी
 • dushkal padla tar marathi nibandh
 • dushkal che parinam marathi nibandh
दुष्काळी कामावरील एक प्रसंग मराठी निबंध

माझे आवडते पुस्तक निबंध मराठी

maze avadte pustak nibandh in marathi

माझे आवडते पुस्तक निबंध मराठी लिहीताना आठवण येते ती उन्‍हाळ्याच्‍या  सुट्टीची, दरवर्षी वर्षी सुट्टी लागली की मी माझ्या आवडत्या छंदाचे लाड पुरवून घेतो. म्हणजे मी 'ग्रंथालयाचा सभासद' होतो आणि मनसोक्तपणे पुस्तके वाचून काढतो. सुट्टीतील माझ्या या अवांतर वाचनावर कुणाचा आक्षेप नसतो. उलट आई कौतुकाने सांगते, “आमच्या बाळ्याचा सुट्टीत काही त्रास नसतो. तो आणि त्याची पुस्तके." खरोखर पुस्तके असली की वेळ कसा जातो ते कळतही नाही. या वर्षी मी अनेक पुस्तके वाचली. या सर्व पुस्तकांत एका पुस्तकाने माझ्या मनात कायमचे स्थान मिळविले आहे. ते पुस्तक आहे गोदावरी परुळेकर यांचे 'जेव्हा माणूस जागा होतो ..." या पुस्तकाला शासनाचा पुरस्कार मिळाला होता, म्हणून ते वाचावयाचे असे मी ठरविले होते पण ग्रंथालयात मला त्या पुस्तकासाठी क्रमांक लावून काही दिवस थांबावे लागले. जेव्हा ते पुस्तक घेऊन मी घरी आलो आणि वाचावयास सुरुवात केली तेव्हा त्या पुस्तकाचे शेवटचे पान वाचल्यानंतरच मी ते खाली ठेवले. नंतरही दोन वेळा मी ते पुस्तक वाचले.

'जेव्हा माणूस जागा होतो...' ही काही एखादी कादंबरी नाही, किंवा काव्यसंग्रहही नाही. तरी देखील ते पुस्तक आपल्या मनाला भिडते. कारण ती एक सत्यकथा आहे. एका वसाहतीची ती हृदयस्पर्शी कहाणी आहे. या पुस्तकाची लेखिका प्रस्तावनेतच सागून टाकते की, ती काही स्वतः नाणावलेली लेखिका नाही. तरी पण हे पुस्तक उत्कृष्ट उतरले आहे. कारण त्या कादंबरीतील क्षणन् क्षण लेखिका स्वतः जगली आहे.
maze avadte pustak nibandh in marathi
maze avadte pustak nibandh in marathi

लेखिका गोदावरी परुळेकर यांचे बालपण व शिक्षण पुण्यात पार पडले. पण कॉ. परुळेकरांबरोबर राजकीय-सामाजिक कार्य करताना त्यांना या डोंगरकपारीतील आदिवासींची व्यथा जाणवली; त्यांची गुलामावस्था पाहिली म्हणून त्यांनी त्यांच्यातील माणूस जागा केला. या आपल्या साऱ्या कामगिरीचा वृत्तान्त त्यांनी या पुस्तकात सांगितला आहे-अगदी साध्या, सोप्या, रसाळ भाषेत.

आदिवासींचे जीवन किती कष्टप्रद आहे, हे सांगताना त्यांनी कोंड्याची भाकर व अंबाडीच्या भाजीचे केलेले वर्णन आपल्याला खूप काही सांगून जाते. चहा कसा करतात हेही त्या वारल्यांना माहीत नव्हते. 'लग्नगडी' व 'वेठीच्या आसा'चा फेरा या परंपरागत रूढी म्हणजे जमीनदारांच्या निपुणतेचा पुरावाच आहे. लेखिकेला पहिले काम करायचे होते ते आदिवासींच्या मनातील दुबळेपणा काढून टाकायचे. वर्षानुवर्षांचा जुलमी छळ अंगवळणी पडल्यामुळे ते दुबळे झाले होते; त्यांचा आत्मविश्वास हरवला होता. लेखिकेने त्यासाठी त्यांना संघटित केले. त्यांच्यातील आत्मविश्वास फुलविला. पुस्तकाच्या अखेरीस हाच आदिवासी ‘खऱ्या अर्थाने माणूस' होऊन जमीनदारांच्या विरुद्ध बंड करावयास उभा ठाकलेला आपल्याला दिसतो.

या पुस्तकाची विशेषता मला जाणवली ती अशी की, समाजातील हा प्रश्न इतका महत्त्वाचा असूनही समाजातील बहुसंख्यांना त्याची काही माहितीही नव्हती. आदिवासींची पिळवणूक चालते असे आम्ही ऐकतो, बोलतो; पण ही पिळवणूक किती अमानुष रीतीने चालते, कशी चालते याची खरीखरी कल्पना हे पुस्तक आपल्याला आणून देते. आदिवासी हा अशिक्षित आहे. अंधश्रद्धेत गुरफटलेला आहे असे आपण मानतो; पण त्याच्या मनातील माणूसही मोठा आहे हेही आपल्याला येथे दिसते. पकडवॉरन्ट असलेली गोदामाई त्यांच्या घरी आली तेव्हा तिला पोहोचविण्यासाठी या आदिवासींनी आपल्या प्राणांची बाजी लावली. कधी त्यांनी तिला आपली 'म्हातारी माय' मानली; तर कधी तिला आपली 'माहेरवाशीण' बनविली

'जेव्हा माणूस जागा होतो...' या पुस्तकाला बक्षीस देऊन सरकारने एका परीने लेखिकेचाच यथोचित गौरव केला आहे. प्रत्येकाने संग्रही ठेवावे असेच हे पुस्तक आहे. आणि म्हणूनच ते माझे विशेष आवडते आहे.

टीप : वरील निबंधमाझे आवडते पुस्तक निबंध मराठी या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

 • my favorite book essay in marathi
 • mi vachalele pustak marathi nibandh
 • me vachelle pustak essay in marathi
 • mla aavdlele pustk
 • mala award lele pustak nibandh

माझे आवडते पुस्तक निबंध मराठी

शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध 


शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध निबंध सुरू करताना सर्वप्रथम आठवण येते ते म्‍हणजे माझे बालपण, माझे बालपण अगदी खेडेगावात गेल्यामुळे बालोदयान, शिशुविहार, के. जी. वगैरे शिक्षणक्षेत्रातील पांढरपेशी प्रकार माझ्या वाट्याला कधी आलेच नाहीत. चांगली पाच वर्षे पूर्ण होऊन सहावे लागल्यावर मला शाळेत घालण्यात आले. मे महिन्यात माझा जन्मदिवस असल्याने जूनच्या पहिल्या दिवशी शाळेचे नवीन वर्ष सुरू होताना मी शाळेत जाऊ शकलो. आज मी पंधरा वर्षांचा आहे. त्या घटनेला दहा वर्षे होऊन गेली तरी ती घटना, तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर जसाचा तसा उभा आहे.

माझा शालेय प्रवेशाचा दिवस पंचांग पाहून ठरविण्यात आला होता. भल्या सकाळीच आमचे गुरुजी आले. थोड्या प्रमाणात होमहवन करण्यात आले आणि मग मी आईवडिलांच्या दृष्टीने शाळेत जाण्यास पात्र ठरलो. तोपर्यंत शाळा म्हणजे काय याची मला काहीच कल्पना नसल्यामुळे मी मोठ्या खुषीत होतो. घरात चालणाऱ्या विविध समारंभांपैकी हाही एक काहीतरी समारंभ असावा, असे मला वाटत होते. वरणापुरणाचे जेवण झाले. मला नवीन कपडे घालण्यात आले. माझ्या पायांतील चप्पलही नवी कोरी होती. नवे दप्तर, नवी कोरी पाटी, नवी पेन्सिल या नवेपणाच्या धुंदीत बाबांचे बोट धरून मी शाळेच्या दारात केव्हा येऊन पोहोचलो ते मलाच कळले नाही.

SHALETIL MAZA PAHILA DIVAS
SHALETIL MAZA PAHILA DIVAS
एका जुन्या वाड्यात आमची शाळा होती. एका मोठ्या दालनात दोन-दोन वर्ग भरले होते. दोन दालनांत मिळून चार वर्ग होते; आणि दोन गुरुजी शाळा सांभाळत होते. बाबांनी मला गुरुजींच्या स्वाधीन केले आणि बाबा परत फिरले तेव्हा खरोखर मला ब्रहमांड आठवले. बाबांशी बोलताना जो गुरुजींचा आवाज मधाळ वाटत होता, तो बाबांची पाठ फिरल्यावर एकदम कठोर झाला आणि कोपऱ्यात ठेवलेली वेताची छडी गुरुजींनी हातात घेतली. ते पाहून मला कापरेच भरले. गुरुजी शरीरयष्टीने धिप्पाड होते. डोक्यावरच्या टोपीतून त्यांची शेंडी बाहेर डोकावत होती. खरे पाहता, त्यांची ती शेंडी पाहून मला हसूच येत होते; पण हसण्याचे धाडस नव्हते. उकडत असूनही गुरुजींनी कोट घातला होता. तेव्हापासून माझी पक्की समजत झाली होती की, गुरुजी म्हटले म्हणजे त्यांच्या अंगावर कोट हवाच! मुंबईला प्रशालेत आल्यावर मात्र ही समजूत पुसली गेली.

आमचे हे गुरुजी एकाच वेळी दोन वर्ग सांभाळत होते. एरवी वानराप्रमाणे उड्या मारणारे आम्ही पंचवीसजण गुरुजी वर्गावर आले की शेळीसारखे बसत होतो. गुरुजी सतत फेऱ्या मारीत चौथीच्या वर्गाला गणित घालत होते, तर पहिलीच्या मुलांना शब्द घालत होते. एकाही अक्षराची अदयापि मला ओळख नाही हे समजल्यावर त्यांनी माझ्या बावन्न पिढयांचा उद्धार केला असावा.

तीन-चार तास एका जागी बसण्याची मला सवय नव्हती. अपरिचित जागा, अनोळखी माणसे! भीतीने माझ्या डोळ्यांतून गंगा-यमुना वाह लागल्या; तसे मास्तर कडाडले, "रडायला काय झालंय?" आता फक्त छडीच मारायची उरली होती. डोळयांतले पाणी मी पुसून टाकले आणि मोठ्या निग्रहाने अक्षरे गिरवू लागलो.
या घटनेला आज दहा वर्षे होऊन गेली, तरी तो शाळेतील पहिला दिवस मी विसरू शकत नाही. त्याच छडीच्या धाकाखाली शाळेतील चार वर्षे पार पडली आणि पाचवीसाठी मी शहरात आलो.

टीप : वरील निबंध शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते

 • shalecha pahila divas in marathi eassy
 • shalecha pahila divas marathi nibandh
 • mazya shalecha pahila divas in marathi
 • marathi nibandh shalecha pahila divas in marathi
 • shalecha pahila divas nibandh marathi madhe
 • majha shalecha pahila diwas nibandh
 • sayesha pahila divas marathi nibandh


शाळेतील माझा पहिला दिवस मराठी निबंध

माझे बालपण मराठी निंबध

majhe balpan marathi nibandhमाझे बालपण मराठी निंबध सुरूवात करताच बालपणातील खुपश्‍या गमतीदार ताज्‍या होतात. शालांत परीक्षेचा शेवटचा पेपर देऊन घरी आलो आणि मला हलके हलके वाटू लागले. गेले दोन-चार महिने मी अभ्यासाने अगदी झपाटून गेलो होतो. आता मी संपूर्ण मोकळा झालो होतो. सुट्टीतील वेळ घालविण्यासाठी बाबांनी अनेक पर्याय माझ्यापुढे ठेवले होते; पण ते सारे मला नकोसे वाटत होते. त्यांना प्रतिष्ठेची पुटे होती, आपलेपणाचा ओलावा कोठेच नव्हता आणि एकदम मला आठवला तो आमचा वाडा-बालपण जिथे घालविले तो वाडा.

तो वाडा आमचा होता, म्हणजे माझ्या आजोबांचा होता. बाबांना कधीच त्याच्याविषयी आपलेपणा वाटला नाही. म्हणून तर आजी-आजोबांच्या पश्चात बाबांनी तो वाडा विकला आणि हा प्रशस्त बंगला बांधला; पण त्या वाड्यातील मजा हया बंगल्यात कधीच अनुभवता आली नाही. वाड्याचे आम्ही मालक होतो आणि शिवाय इतर दहा बिहाडकरू होते; पण बंगल्यात येईपर्यंत मला हे कधी माहीतच नव्हते. कारण वाड्यात दहा चुली पेटत होत्या, तरी सर्व माणसे एकाच कुटुंबातील असल्याप्रमाणे वागत होती. त्यामुळे बालपणी वाड्यात हुंदडताना कधी कोठे हा आपला, तो परका असे जाणवलेच नाही.

त्यावेळी या वाड्यात माझे दहा-बारा सवंगडी होते. सकाळी सूर्य वर आला की आमच्या खेळाला सुरुवात होत असे. आम्ही खेळात इतके रमून जात असू की, कशाचे म्हणून आम्हांला भान राहत नसे. मग आठ वाजता गोखले गुरुजींची हाक आली की पुढच्या ओटीवर 'शिकवणी' सुरू व्हायची; पण या खाजगी वर्गालाही वाड्यातील सगळी मुले येत असत. गोखले गुरुजी अगदीतन्मयतेने शिकवीत असत. त्यामुळे दोन तास अभ्यास झाला तरी कंटाळा येत नसे. जेवणे उरकली की वाड्यातील सगळेजण मिळून शाळेला जात असू. संध्याकाळी खेळानंतर परवचा व कवितागायनाने वाडा नुसता दुमदुमून जायचा.

majhe balpan marathi nibandh
majhe balpan marathi nibandh
सुट्टीच्या दिवसांत तर वाड्यातील त्या बालपणाला आगळा रंग यायचा. सकाळच्या वेळी विहिरीवर पोहणे, दुपारी अंगण खेळांनी दुमदुमवून टाकणे, संध्याकाळचे फिरायला जाणे आणि रात्री भुताखेतांच्या गप्पा मारणे हा कार्यक्रम ठरलेलाच. सुट्टीमध्ये पाहुणेमुलांची भर असे. मग उन्हाळा म्हणून अंगणात अंथरुणे पडत. भेळ, रस, आंब्याची डाळ, आइस्क्रीम असे बेत आखले जात. दरवर्षी वाड्यातील कोणाकडे तरी कार्य निघेच. मग ते कार्य त्या घरापरतेच मर्यादित न राहता संपूर्ण वाड्याचेच होत असे. सगळी बालसेना त्या कार्यात एकजुटीने रंगलेली असे.

अशा त्या आगळ्यावेगळ्या आनंदात मी केव्हा मोठा झालो हे मला कळलेच नाही. आज मात्र जाणवते की
'अहा ते सुंदर दिन हरपले
मधुभावांचे वेड जयांनी जीवाला लाविले.' बालपणातील त्या दिवसांचे वर्णन करावयास कवयित्री शांता शेळके यांच्या या पंक्तींचा आधार घ्यावा लागेल
'अवनी गमली अद्भुत अभिनव जिये सुखाविण दुजा न संभव घरी वा दारी वात्सल्याचे मळे नित्य बहरले॥'
टीप : वरील निबंध माझे बालपण या निबंधाचे खालील प्रमाणे शिर्षक  असु शकते
 • majhe balpan nibandh lekhan
 • ramya te balpan marathi nibandh
 • my childhood essay in marathi
 • ramya balpan marathi nibandh
 • majhe balpan ya vishayavar nibandh
 • ramya te balpan composition in marathi
 • majhe balpan prasang lekhan marathi

माझे बालपण मराठी निंबध

माझा आवडता छंद मराठी निबंधकुणाला छंद असतो शिकारीचा, तर कुणाला छंद असतो गडकिल्ले हिंडण्याचा. कुणाला छंद असतो पोस्टाची तिकिटे, नाणी किंवा विविध जुन्या वस्तू गोळा करण्याचा. कुणी मित्र गोळा करून पत्ते कुटत बसतात. तर कुणी एकटेच सतार छेडत बसतात. कुणी पुस्तकांना आपले मित्र करतात; तर कुणी कागदावर कुंचल्यांनी चित्रे खेचतात. माझा छंद तसा जगावेगळा आहे. मला लहानपणापासून आवड आहे ती माणसे जोडण्याची आणि जसजसा मी मोठा होत गेलो तसतशी माझी ही आवडही वाढत गेली.

तसे पाहता आमचे कुटुंब फार छोटे आहे. आई, बाबा आणि मी. पण अगदी लहानपणापासून मला आपल्या घरी खूप माणसे यावीत, गर्दी व्हावी, गडबड उडावी असे वाटे. आई सांगते की, मी लहानपणी आपल्याकडे 'हळदीकुंकू' कर, 'सत्यनारायणाची पूजा' कर असा नेहमी हट्ट करीत असे. कारण त्यामुळे घरात खूप माणसे येत. सुट्टीचा वार रविवार वा सुट्टीचा 'मे' महिना मला फार प्रिय आहे. कारण सुट्टीमुळे खूप पाहणे घरी येतात. सुट्टी येण्यापूर्वीच मी माझ्या आप्तांना, मित्रांना आमंत्रणे पाठवितो. त्यांना वाटते की किती विनम्र, लाघवी मुलगा आहे. पण माझे माणसवेड त्यांना 'अनभिज्ञ' असते.

मला आवडतात ती माणसे फक्त नात्यागोत्याचीच अथवा आपल्या योग्यतेची असतात असे नाही हं! मला कोणतीही माणसे आवडतात. आम्ही राहतो त्या कॉलनीत आमचा बंगला पहिला बांधला गेला. इतर सतरा बंगले नंतर आमच्या देखत बांधले गेले. तेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो; भरपूर मोकळा वेळ असे. त्यावेळी बांधकाम करणाऱ्या माणसांशीही मी दोस्ती करीत असे. बांधकामावर खूप स्त्रिया असत. त्यांच्याबरोबर त्यांची लहान मुले असत. या मुलांबरोबर मी खूप खेळत असे. त्यांच्याकडूनच मी विटीदांडूचा खेळ शिकलो. ही मुले लहान वयातही आपल्या आईवडिलांना केवढी मदत करीत. आज ती मुले वयाने मोठी होऊन पुरुष झाले आहेत, त्यांच्यातील कित्येकजण स्वतंत्र कामे करू लागले आहेत.

maza avadta chand marathi nibandh
maza avadta chand marathi nibandh
मी मोठ्या शाळेत जाऊ लागलो, तसा माझा हा छंद वाढतच गेला. वर्गातील दोस्तच काय, पण शाळेतील सगळी मुले माझे मित्र बनले. तसा माझा स्वभाव बडबड्या आहे. मला बोलायला खूप आवडते, पण तितकेच मला इतरांचे विचारही ऐकायला आवडतात. त्यामुळे दूरचा प्रवासही मला कधी कंटाळवाणा होत नाही. प्रवासात अनेक ओळखी होतात, अनेक अनुभव ऐकावयास मिळतात, अनेक दोस्त मिळतात, गाडीत माल विकणाऱ्या फेरीवाल्यांबरोबरही मला गप्पा मारायला आवडतात. माझे वडील म्हणतात, "अरे, यांच्याशी तू कसल्या गप्पा मारतोस?" मी फक्त हसतो. पण मला आठवते ते काणेकरांनी सांगितलेले, 'सामान्याचे असामान्यत्व.' काणेकर त्यांचा अनुभव सांगतात की, ज्या माणसाजवळ डोके कमी त्याच्याजवळ माणुसकी मोठी असते. मलाही हा अनुभव आलेला आहे. 'बोलघेवड्या मित्रांपेक्षा साधेभोळे, कष्टकरी मित्रच आपल्या जास्त उपयोगी पडतात.'

माझा हा माणसे जोडण्याचा छंद आहे ना, त्याचेही मी एक शास्त्र तयार केले आहे. मला जेव्हा नवीन मित्र भेटतात तेव्हा मी त्या मैत्रीची नोंद ठेवतो. त्या मित्रांचे पत्ते लिहून ठेवतो. वेळोवेळी त्यांना पत्रे लिहितो. त्यांची पत्रे मला येत असतात. त्यामुळे जीवघेणा कंटाळा मला कधीही ग्रासू शकत नाही. मी कधीही एकटा नसतो. मी जोडलेली असंख्य माणसे, मित्र सदैव माझ्याभोवती असतात-कधी प्रत्यक्ष, तर कधी पत्ररूपाने किंवा फोटोरूपाने.

तुम्ही विचाराल या छंदात मला कधी नुकसान सोसावे लागले नसेल का? नाही असे नाही, पण फारच अल्प. काही लोकांनी माझ्याशी दोस्ती केली पण ती खरी दोस्ती नव्हती, ते केवळ दोस्तीचे नाटक होते. काहींनी तेवढया ओळखीवर माझ्या काही मौल्यवान गोष्टी हडप केल्या; पण असे अनुभव फार विरळा. माझ्या या माणसांसाठी मला तनमनाने झिजावे लागते. अगदी परीक्षेच्या दिवसांतही एखादयासाठी वेळ खर्चावा लागतो. पण त्यात मला आगळा आनंद मिळतो. माझे सारे सुखच या छंदात सामावलेले आहे.


वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते

 • maza avadta chand marathi nibandh
 • My Hobby Essay in Marathi 
माझा आवडता छंद मराठी निबंधमी रांग लावतो किंवा रांगेतील काही अनुभव निबंध मराठी

Rang lavto Marathi Nibandh


आपले सारे बालपण रांग लावण्यात हरवले असल्याचे आमची आई नेहमी सांगत असते. दुसऱ्या महायुद्धाचे दिवस होते ते! त्या दिवसांत साऱ्या गोष्टींचे दुर्भिक्ष्य होते. दूध, पाणी, रॉकेल, धान्य साऱ्या दैनंदिन आवश्यक गोष्टींसाठी रांग अनिवार्य झाली होती. 'रांग' हाच मुळी जीवनाचा अविभाज्य घटक झाला होता. त्यावेळी रांगेत लग्ने जमत. रांगेवर कथा, कविता लिहिल्या जात आणि रांगेचे वर्णन करणारे ‘आम्ही रांगवाले, रांगवाले' हे भावगीत तर म्हणे विशेष लोकप्रिय झाले होते. आज स्वातंत्र्योत्तर काळातही रांग आमचा पिच्छा पुरवीत आहेच. कुठे बसने जायचे असेल तर थांबा रांगेत. चांगला सिनेमा, नाटक पाहावयाचे असेल तर पकडा रांग. इतकेच काय, पण नावाजलेल्या शाळेत प्रवेश हवा असेल तर धरा पहाटेपासून रांग. अशी ही रांग अक्षरशः आमच्या पाचवीलाच पुजलेली आहे. अशाच एका रांगेत उभे राहण्याची वेळ माझ्यावर आली. त्याची ही कथा.


सुटीत मामाच्या गावी जायचे म्हणजे मला ती आनंदाची पर्वणीच असते; पण बाबांनी यंदा जाहीर केले, "तुला जायचे असेल तर खशाल जा; पण तझे गाडीचे तिकीट तच काढन आणले पाहिजेस." हे ऐकून माझ्या पोटात भीतीचा गोळा उठला. कारण सुटीच्या मोसमात तिकीट काढायचे म्हणजे भल्यामोठ्या रांगेला तोंड देणे भाग आहे. पण ते आता अटळ हाते.

mi rang lavto essay marathi
mi rang lavto essay marathi
तिकीट काढून आणण्यासाठी आईने मला भल्या पहाटे उठविले आणि सायकलवर टांग मारून मी स्टेशनवर आलो. नुकतेच उजाडत होते. मला वाटत होते, बहुतेक माझाच पहिला क्रमांक असेल. पण तेथील रांग पाहन मी चाटच पडलो. पहिली पाच-दहा मिनिटे रांगेचे टोक शोधण्यात गेली. नंतर रांगेच्या टोकाशी उभा राहून मी त्या रांगेचे मूळ शोधत होतो; पण मला ते काही दृष्टीस पडेना. पण आता मला हलताही येईना; कारण माझ्या पाठीमागेही ही रांग दूरवर पसरली होती, क्षणाक्षणाला मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच होती.


खिशातील पैसे सांभाळत मी रांगेत उभा होतो. लोक गप्पा मारू लागले होते. गप्पांचा विषय होता-'तिकिटांचा काळा बाजार.' उभे राहून राहून दमल्यामुळे काही लोक चक्क खाली बसले होते. तेथे भेदभाव नव्हता. सर्वजण एकाच ध्येयाने आलेले. सर्वांची तपस्या एकच. गप्पा ऐकता ऐकता वेळ कसा गेला ते कळलेच नाही. पावणेनऊच्या सुमारास रांगांचे रक्षण करण्यासाठी रेल्वे पोलिस अवतरले आणि नऊ वाजता खिडकी उघडली गेली. त्या क्षणी ढकलाढकल सुरू झाली. काही लोकांनी मध्ये घुसण्याचा यत्न केला; तेव्हा भांडणेही सुरू झाली. जेवढे बाहेरचे वातावरण तप्त, तेवढेच आतले तिकीटबाबू शांत होते. मुंगीच्या गतीने रांग सरकत होती. कुणी मध्ये घुसण्याचा यत्न केला की लोक चिडत. तेवढ्यात कुणाचा तरी खिसा कापला गेल्यामुळे लोकांचा गलबलाट वाढला.


 घड्याळाचे काटे फिरत होते, पोटात भकेचा डोंब उसळला होता; पण अदयापि माझा क्रमांक येत नव्हता. मध्ये मध्ये तिकीटबाबू येऊन कुठल्या गाडीची तिकिटे संपली ते फळ्यावर लिहीत होता. क्षणाक्षणाला माझी अधीरता वाढत होती. शेवटी ११ वाजता मला तिकीट मिळाले. आता शरीरातले त्राण संपले होते. मी तिकीट घेऊन मागे वळलो, तर तेथे बाबा उभे होतेच. माझी दयनीय अवस्था पाहून त्यांनी मला उपाहारगृहात नेले हे सांगायला नकोच!

मी रांग लावतो किंवा रांगेतील काही अनुभव निबंध मराठी


शालेय जीवनातील गमतीजमती मराठी निबंध

shaletil aathvani in essay marathiशालेय जीवनातील विनोद शाळेतील स्नेहसंमेलन चालू होते. राम-रावणाच्या जीवनातील पौराणिक नाटक विदयार्थी सादर करीत होते. नाटक फार रंगात आले होते. तीन हजार विदयार्थी श्वास रोखून रावण व मारुती यांच्यातील प्रवेश पाहत होते आणि अचानक काय झाले कोणास ठाऊक! रावण झालेल्या पात्राला लावलेल्या नऊ खोट्या तोंडांपैकी एकएक तोंड गळून पडू लागले. प्रथम प्रेक्षकांना काही समजेना. हा काहीतरी 'ट्रिक सीन' असावा असे त्यांना वाटले; पण सिंहासनावर आरूढ झालेला देशमुख मात्र त्यामुळे गोंधळन गेला. त्याला आपली वाक्ये आठवेनात. तेव्हा विदयार्थ्यांच्या लक्षात आले की, रावणाला लावलेल्या या कृत्रिम मुखवट्यांना सांधणारी दोरी तुटली आहे. मग काय हशाचा नुसता कल्लोळ उडाला!


राम-रावण युद्ध होण्यापूर्वीच दशानन रावणाचा पराभव झाला होता आणि सगळ्या नाटकाचा बट्ट्याबोळ झाला होता. असे हे स्नेहसंमेलन होऊन कितीतरी दिवस लोटले, तरी ही विनोदी घटना आम्ही विदयार्थी विसरू शकलो नाहीत. जय शाळेच्या जीवनातील असे हे विनोदी प्रसंग म्हणजे वाळवंटातील 'ओयासिसच' जणु! आम्ही विदयार्थी विनोदासाठी नेहमीच आसुसलेले असतो. त्यासाठी आमचे काही ना काही उपद्व्याप चालूच असतात. शिक्षकांचे लक्ष नाही हे पाहून एखादया दोस्ताच्या शर्टाला 'हे विकाऊ गाढव आहे'-अशी चिठ्ठी लावली जाते. मग ओठ दाबून हसण्याची खसखस पिकते. तरीपणचाणाक्ष गुरुजी ओळखतात की, वर्गात काहीतरी गडबड आहे. मग आमच्या या विनोद बुद्धीची गणना 'वाहयातपणा'त होते.
shaletil aathvani in essay marathi

shaletil aathvani in essay marathi

'टवाळा आवडे विनोद' हे समर्थांचे मत गुरुजी आम्हांला नेहमीच सुनावीत असतात. पण 'जीवनातील तारुण्याचे खरे रहस्य विनोदात दडले आहे,' हा विनोदाच्या भाष्यकाराचा-आचार्य अत्रे यांचा संदेश हे आमचे 'आचार्य' मात्र सोयिस्करपणे विसरलेले असतात. वर्गातील विनोदाला खरा बहर येतो तो मोकळ्या तासाच्या वेळी. मग वर्गातील अनेक विदुषकांच्या कल्पनाशक्तीला बहर येतो. उत्तम विनोद निर्माण करण्यासाठी तल्लख बुद्धीची आणि बहुश्रुततेची नितांत आवश्यकता असते, याची प्रचीती तेव्हा येते. अशा मोकळ्या तासाच्या वेळी एखादा 'पुस्तकी किडा'रूपी स्कॉलर वर्गाच्या एखादया कोपऱ्यात हमखास अभ्यास करीत बसलेला आढळतो. असा हा वर्गमित्र वर्गाला विनोदासाठी उत्तम विषय ठरतो. मग सारा वर्ग त्याच्यामागे हात धुऊन लागतो. कित्येकदा हा स्कॉलरही आपली गंभीरपणाची कात टाकून खेळकरपणा स्वीकारतो व मग तोही शालेय जीवनातील विनोदाचा आस्वाद घेऊ लागतो.


शालेय जीवनात असे अनेक प्रकारचे विनोद घडत असतात. कधी कधी पाठ्यपुस्तकातील लेखकांच्या वा प्रसिद्ध व्यक्तींच्या छायाचित्रांना दाढीमिश्या लावून त्यांना विविध रूपे दिली जातात आणि मग एखादा सात्त्विक वृत्तीचा लेखक पक्का दरोडेखोर झालेला दिसतो. स्नेहसंमेलन, सहली अशा प्रसंगी तर विनोदाला बहर येतो. एकदा आमच्या वर्गात एक खुप लठ्ठ मूलगी होती आणि तिचे नाव होते 'शशी', सहलीत 'फिश पाँड'च्या कार्यक्रमात तिला 'फिश पाँड' मिळाला शशी वाढतो कलेकलेने। शशी वाढते किलोकिलोने॥
शालेय जीवन संपले, तरी शालेय जीवनातील या गमतीजमती, हे विनोद विसरले जात नाहीत. ते सदैव आपल्या स्मरणात राहून आपले जीवन फुलवीत असतात.

वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते
 • माझ्या आठवणीतील शाळा निबंध
 • शाळेत घडलेला विनोदी प्रसंग निबंध
 • शालेय जीवनातील आठवणी निबंध

शालेय जीवनातील गमतीजमती मराठी निबंध

माझे पहिले भाषण मराठी  निबंध

maze pahile bhashan nibandh in marathi

आज एवढ्या मोठ्या समारंभात हजारो प्रेक्षकांसमोर एका नामांकित साहित्यिकाकडून माझा गौरव करण्यात आला. मला पारितोषिकासोबत मिळालेले ते संदर प्रशस्तिपत्रक आताही माझ्या समोर आहे. त्या समारंभात मिळालेल्या पुष्पगुच्छातील फुलांच्या परिमलाने माझी अभ्यासिका अजूनही दरवळते आहे. साऱ्या महाराष्ट्रात विख्यात असलेल्या 'रानडे वक्तृत्वस्पर्धे'त मी पहिला क्रमांक मिळवून पाचशे रुपयांचे बक्षीस मिळविले होते. त्यासाठी हा सत्कारसमारंभ झाला होता. त्यामुळे आता माझ्या डोळ्यांसमोर प्रसंग उभा होता तो 'माझ्या आयुष्यातील पहिल्या भाषणाचा'. या पहिल्या भाषणाच्या वेळी मी मनात जो संकल्प सोडला होता, तोच आज पूर्ण झाला होता. आजवर विविध वक्तृत्वस्पर्धांत मी अनेक बक्षिसे मिळविली होती. पण हे बक्षीस पटकावून मी एका त-हेने उच्चांक गाठला आहे. याचसाठी मी अट्टाहास केला होता. माझे पहिले भाषणही मी केले होते, ते असेच आव्हान पत्करूनच. 
मला आठवते की, त्यावेळी मी नुकताच हायस्कूलात जाऊ लागलो होतो. घरातील शेंडेफळ म्हणून मी जरा अधिकच लाडात वाढलो होतो. त्यामुळे पाचवीत पोहोचलो तरी बोबडे बोल माझ्या तोंडून काही सुटले नव्हते. इतकेच नव्हे तर कित्येकदा बोलताना मी अडखळतही असे. माझ्यातील या वैगुण्यामुळे माझे वर्गमित्र माझी नेहमीच चेष्टा करीत असत. त्यामुळे वक्तृत्वस्पर्धेत भाग, घेण्याबाबत गुरुजींनी विचारले असता मी जेव्हा माझे नाव देण्यासाठी उभा राहिलो, तेव्हा संपूर्ण वर्गात हशा पिकला. 

maze pahile bhashan nibandh in marathi
maze pahile bhashan nibandh in marathi
गुरुजींनीही माझी चेष्टा करून मला स्पर्धेत भाग घेण्यापासून वंचित केले. त्या दिवशी मी रडत रडतच घरी आलो. मी फार दुखावलो होतो; पण माझे मन जाणले ते माझ्या आईने! ती गुरुजींना भेटली आणि आपण तयारी करून घेत असल्याचे त्यांना आश्वासन दिले. बस्स! त्या दिवसापासून माझ्या पहिल्या भाषणाच्या तयारीला निश्चयाने सुरुवात झाली. मला आठवते, माझे ते भाषण महाकवी रवींद्रनाथ टागोरांविषयी होते. त्या स्पर्धेच्या वेळी तिघे नामांकित वक्ते परीक्षक म्हणून समोर बसले होते. संपूर्ण हॉल विदयार्थ्यांनी गच्च भरला होता. एकापाठोपाठ एक विदयार्थी व्यासपीठावर येऊन भाषण करून जात होते. आणि माझ्या डोळ्यांसमोर गेल्या महिन्यातील सारी धडपड उभी राहिली होती.

या भाषणासाठी माझी सारी तयारी आईने करवून घेतली होती. भाषणही तिनेच लिहिले होते. रोज सकाळी ती मला लवकर उठवत असे. भाषणातील प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारला जावा यावर तिचा कटाक्ष होता. भाषणाची अखेर टागोरांच्या 'गीतांजली'तील पंक्तीनेच केली होती. मी या विचारात गुरफटलो असतानाच माझे नाव पुकारले गेले आणि मी भाषण करण्यासाठी व्यासपीठावर जाऊन उभा राहिलो. श्रोत्यांनी भरलेला हॉल प्रथमच पाहिला आणि क्षणभर माझे डोळे दिपले. भाषणातील काही आठवेना. इतक्यात आईचे शब्द आठवले, “हे बघ, आपल्याला हसणाऱ्यांचे हसे करावयाचे आहे बरं का!" आणि मी आवेशाने भाषणाला सुरुवात केली. टाळ्यांचा कडकडाट झाला तेव्हा मला कळले की, आपले भाषण संपले. व्यासपीठावरून उतरताना अनेकांनी जवळ बोलावून माझी पाठ थोपटली तेव्हाच स्पर्धेचा निकाल जणू जाहीर झाला होता.
हसणाऱ्यांचे हसे झाले होते. त्यांची तोंडे बंद झाली होती आणि तेव्हापासून वक्तृत्वस्पर्धा म्हटली म्हणजे सर्वांच्या डोळ्यांसमोर मीच उभा राहतो.

माझे पहिले भाषण मराठी निबंध