Essay on rainy season in marathi | पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध

 निबंध 1

नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पावसाळ्यातील एक दिवस मराठी  निबंध, मानवाने विज्ञान आज भरपुर प्रगती केली असली तरी निर्सगावर त्‍याला मात करता आली नाही, खालील निबंधामध्‍ये निसर्ग मानवाची कश्‍याप्रकारे परीक्षा घेतो , व मानव त्‍यावर किती हतबल होतो याचे वर्णन केले आहे . चला तर मग सुरूवात करूया पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंधाला .
एकदा तोंड दाखवून तो लुच्चा पाऊस कुठे गडप झाला होता कोण जाणे? शेतकऱ्यांच्या डोळ्यांत तर पाणी तरळले होतेच; पण शहरवासीयांच्याही तोंडचे पाणी पळाले होते. पावसाचे आगमन व्हावे म्हणून त्याची विविध प्रकारे आळवणी चालली होती. होमहवन, जपजाप्य, मंत्रजागर सारे झाले; पण तो लबाड कुठे दडून बसला होता कोण जाणे! नेहमी सर्वज्ञतेचा टेंभा मिरविणाऱ्या माणसाला नाकदुऱ्या काढावयास लावताना त्याला खदखदून हसू येत असावे. त्याचा खेळ चालला होता, पण माणसे मात्र हवालदिल झाली होती. 

पुनः पुन्हा नक्षत्रांची गणना होत होती. पावसाची नक्षत्रे तर केव्हाच सुरू झाली होती; पण पावसाचा पत्ता नव्हता. 'येरे येरे पावसा' हे बालगीत बालकांबरोबर मोठेही मनातल्या मनात आळवीत होते. शेवटी त्या घनाला दया आली असावी! सकाळी माणसे जागी झाली ती नेहमीप्रमाणे पक्ष्यांच्या मधुर किलबिलाटाने नव्हे, भगवान सहस्ररश्मीच्या सूचक पदन्यासाने नव्हे; तर मुसळधार कोसळणाऱ्या धारांच्या आवाजाने. या मुसळधार धारा पाहिल्यावर मात्र माणसे सूखावली. कारण ज्याची ती चातकाप्रमाणे वाट पाहत होती, तोच मुळी त्यांच्या भेटीसाठी आला होता. Essay on rainy season in marathi
Essay on rainy season in marathi 

हव्या हव्या असलेल्या त्या पाहुण्याचे मोठ्या आनंदाने स्वागत होऊ लागले.
पण सगळ्यांना गंमत वाटत होती ती ही की, ज्या पाहण्याची आपण वाट पाहत होतो, तो पाहुणा अचानक केव्हा आला ते कळलेही नव्हते. दिवस वर येत होता, पण तो वर येत आहे हे कळत होते ते केवळ घड्याळाच्या काट्यांमुळे. कारण वरुणराजाच्या आगमनामुळे भगवान सूर्यदेवांनी रजा घेतली असावी; किंवा परमेश्वराच्या या लाडक्या बाळांना-मानवांना-आपण नाहक इतके दिवस पीडा दिली म्हणून हा सहस्ररश्मी संकोचला असावा. 

काही का कारण असेना, पण एकूण आजचा दिवस हा दिनमणीचा दिवस नव्हता, तर तो एक ओला दिवस होता. पाऊस कोसळत होता. दाही दिशा अगदी कुंद झाल्या होत्या. उन्हाने त्रासलेल्या जीवांना तो ओला दिवस सुखावीत होता.
घड्याळाचे काटे सरकत होते; पण पाऊस थांबावयाचे काही चिन्ह दिसत नव्हते. मोठ्यांना आता कामावर जायला हवे होते. शाळा-कॉलेजाची मुलांना आठवण झाली. पण कसे जाणार? सारे रस्ते जलमय झाले होते. वरुणराजा अजूनही कोसळत होता. आता त्या पावसातील नावीन्य संपले होते. आता जाणवत होती केवळ त्याच्यातील रुद्रता. आनंदाने स्वागत केलेल्या पाहुण्याविषयी आता भय वाटू लागले!

 लोकांचे सर्व व्यवहार ठप्प झाले. सारे रस्ते पाण्याने भरून वाहू लागले. गोरगरिबांच्या झोपड्या पाण्यात वाहून गेल्या. सगळी वाहने जेथल्या तेथे कळाहीन होऊन स्थिरावली होती. एवढी मोठी आगगाडी, पण तिचाही तोरा या जलधारांनी हिरावून घेतला.

विमाने सुद्धा आकाशात झेप घेऊ शकत नव्हती. कारण पाच-दहा फुटांपलीकडचेही दिसत नव्हते. सर्वत्र होते फक्त पाणीच पाणी. वर पाणी, खाली पाणी. घरे ओली, छपरे ओली, कपडे ओले. सारे कसे ओलेच ओले. दिवस संपत आला; पण पाऊस थांबला नव्हता वा कमी सुद्धा होत नव्हता. कालपर्यंत पाण्यासाठी आतुर झालेल्यांच्या तोंडचे पाणीच आता पळाले होते. चिंतातूर माणसे थकली. 

आडोशा-निवाऱ्याला जाऊन आडवी झाली आणि नकळत निद्राधीन झाली. रात्रीच्या अंधारात तो पाहुणा जसा अवचित आला होता, तसाच निघूनही गेला होता. हसत हसत बालरवी उदयाचलावर आला. जग जागे झाले, स्तिमित झाले; कारण तो ओला दिवस संपला होता; पण आपल्या अस्तित्वाच्या खुणा ठेऊन !

 मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद
 
निबंध 2

पावसाळ्यातील एक दिवस मराठी  निबंध 

पावसाळ्यातील एक दिवस भारतात वेगवेगळे ऋतू अनुभवायला मिळतात. उन्हाळा, हिवाळा व पावसाळा हे सर्वच ऋतू महत्त्वाचे आहेत. त्यापैकी पावसाळा हा माझा सर्वात आवडता ऋतू आहे. पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा सुगंध मला अतिशय प्रिय आहे. 

भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथे पावसाला फार महत्त्व आहे. नदी, कालवे, तलाव, विहिरी असून ही पावसाची सदा गरज असते.जून महिना होता. शाळा उघडल्या होत्या. कित्येक दिवसांपासून तापमान वाढलेले होते. रस्ते, घरे, चहू कडे आगीचा वर्षाव होता होता. शाळेत फार कठीण परिस्थिती होती.

पत्रे खुप तापले होते. पंख्याचे वारे पण उष्णच येत होते. तीन वाजण्याची वेळ असेल. अचानक जोरदार वारे वाहू लागले. आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली. खिडक्याची दारे आपटू लागली. चहूकडे अंधार पडला. खोलीत लाईट नव्हता, असे वाटले जणू रात्रच झाली.शिक्षकांनी शिकविणे नाइलाजाने बंद केले. वाऱ्याचा वेग वाढला आणि सुरुवातीला हळूहळू येणाऱ्या पावसाचा वेग काही वेळातच वाढला. विजा कडाडू लागल्या. पत्र्यावर पावसाचे थेंब वाजू लागले. थोड्याच वेळात मोडक्या खिडकीतून पाण्याचे तुषार आत येऊ लागले. पाहता पाहता आणखी ढग आले. असे वाटत होते की जणू आकाशाला कोणी काळी शाईच लावली आहे. 

शाळेच्या खोल्या ओल्या झाल्या, मैदानात पाणी जमू लागले. तितक्यात एका खोडकर मुलाने गोंधळ माजविला की पाण्यात वीज उतरली आहे. सगळे शिक्षक बाहेर आले. मुलांना शाळेतून बाहेर काढले. मुख्याध्यापकांनी सुट्टीची घंटा वाजविण्यास सांगितले.

पाऊस कमी झाला होता पण थांबला नव्हता. शाळेत येताना मी छत्री आणली नव्हती त्यामुळे घरी जाताना भिजलो. रस्त्याच्या उतारावर पाणी जमले होते. वाहतूक जवळपास बंद झाली होती. काही लोक छत्री घेऊन उभे होते. बरेचसे लोक भिजले होते. शाळेजवळच्या खड्यात पाणी जमले होते. सगळे रस्ते स्वच्छ धुतले गेले होते. पक्षी झाडांवर किलबिल करु लागले वातावरण थंड झाले. झाडेही पावसात न्हाऊन आनंदाने डोलत होती. आम्ही रस्त्याच्या कडेला साठलेल्या पाण्यात उडया मारायला व कागदांच्या बोटी सोडायला सुरुवात केली. घरी पोहोचलो तेव्हा मी चिखलाने पूर्ण मारवलो होतो, आईने मला हात-पाय धुउन कपडे बदलण्यास सांगितले. मग गरम दूध व नाश्ता दिला. अशा प्रकारे पावसाळयातीला हा पहिला दिवस मी मजेत घालवला.

मला आशा आहे की marathi essay on rainy season हा निबंध तुम्‍हाला नक्‍कीच आवडला असेल , तरी मी तुम्‍हाला विनंती करू इच्‍छीतो की आपल्‍या प्रतिक्रीया कमेंट करून नक्‍की कळवाव्‍या

वरील  निबंधाचे  खालील  प्रमाणे  शिर्षक  असु शकते 

  • marathi essay on rainy season for class 6
  • marathi essay on rainy day
  • marathi essay on one rainy day
  • marathi essay on first day of rainy season
  • marathi essay on first day of rain

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत