मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध | mi pahilela cricket samna essay in marathi
निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी पाहिलेला क्रिकेटचा सामना मराठी निबंध बघणार आहोत. क्रिकेटचे आणि भारताचे एक निराळेच नाते आहे. हॉकी राष्ट्रीय खेळ असल्यावरही गल्ली बोळामधेही
आपल्याला क्रिकेटचे सामने आपल्याला दिसुन येतील. क्रिकेटचे भारतात असलेले वेड आणि खेळाडुंची क्रिकेटला जिव की प्राण म्हणुन खेळण्याची तळमळ आपल्याला खालील ४ निबंधामधुन दिसुन येईल चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
सामने सुरू झाले, अन् आमचा सामना अंतिम डावापर्यंत तरी कोणतीही अडचण न येता पोहोचला. आता खरा कसोटीचा क्षण होता. आमच्याबरोबर खेळणारा संघही काही कमी नव्हता. त्याची ही तयारी उत्तम होती. 'ट्रॉफी' जिंकण्यासाठी त्यांनीही जिद्दीने खेळ सुरू केला होता. तोडीस तोड - धावांबरोबर धावा - खेळ कसा अटीतटीचा चालला होता. (हे पण वाचा मी पाहिलेला चुरशीचा सामना निबंध)
दोनवेळा सामना अनिर्णित राहिला. अर्थात त्यामुळे विश्रांतीचा दिवसही रद्द करून सामना चालू ठेवायचा आणि त्यातून निर्णय घ्यायचा असे ठरले. वादावादी, गाजावाजाही वाढत होताच. आणि अखेरीस तो दिवस उजाडला. स्टेडियम माणसांनी कसे फुलून गेले होते. अशा सामन्यातून आंतरराष्ट्रीय संघांची निवड होणार असते. देशभरातून अनेक क्रिकेट शौकिनांनी आज भाऊगर्दी केली होती.
एखादा चौकार असो किंवा षटकार सारा स्टेडियम टाळ्यांच्या गजराने दुमदुमून निघत होता. एखादा झेल सुटला तरी सगळीकडे निराशेचा सुस्कारा ऐकू येत होता. इकडे विरुद्ध संघही बचावाचा खेळ खेळत होता. त्यामुळे खेळात तसा रंग चढत नव्हता. विकेट तर आमच्या गोलंदाजांनाच अनुकूल होती. परंतु नावाजलेल्या गोलंदाजांची गोलंदाजीही आज मूग गिळून बसली होती.
मैदानाच्या दिशेने आता प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्या, फळांच्या साली, कागदांचे बोळे यायला लागले. अखेरीस दिवस संपेपर्यंत विरुद्ध संघ कसाबसा संपूर्ण आटोपला तेव्हा त्याच्या २१० धावा झाल्या होत्या.

दुसरा दिवस उजाडला तो आमच्या संघाच्या धडाडीच्या खेळानेच. चौकारांच्या दणक्याने कांबळीने सर्वांना खूश करून सोडले. तर सरदेसाईची त्याला साथ आणि चोरट्या धावा यामुळे आमचा संघ धावसंख्या वाढवीत होता. अखेरीस ३०४ धावांवर आमचा संघ बाद झाला अन् ९४ धावांनी आघाडी मिळवली. दुसऱ्या डावात विरुद्ध संघानेही धावांचा डोंगर रचायला सुरुवात केली.
पहिल्या आघाडीच्या पाच खेळाडूंनी जणू चंगच बांधला होता. एकही बॉल, बॅटला स्पर्श केल्याशिवाय जातच नव्हता. ९४ धावांची आघाडी पार करून त्यांनी पुढे जोराचा पवित्रा घेतला आणि अखेरचा गडी बाद होईपर्यंत आमच्यावर १९९ धावांची आघाडी मिळविली.

![]() |
mi-pahilela-cricket-samna-essay-in-marathi |
आमच्या संघाला वाटले, ही धावसंख्या आपण सहज पार करू. परंतु पहिले तीन खेळाडू जेमतेम ४०-४५ धावा करून तंबूत परतले. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. इकडे विरुद्ध पक्षाला 'चिअरअप' जोरात सुरू झाला आणि आमच्यावर दबाव वाढला.
नशिबाने साथ दिली. अन् पुढील दोन खेळाडूंनी दमदार खेळ सुरू करून धावसंख्या १५० पर्यंत नेली. पुन्हा एकापाठोपाठ पाच गडी बाद झाले. आता धावसंख्या पार करण्यासाठी ५० धावांची गरज होती. नववा गडी म्हणून मी तंबूतून बाहेर पडलो. खरा मी गोलंदाज, आता बॅट कशी साथ देते तेच पाहायचे होते. कॅप्टनने मला धीर दिला. माझी पाठ थोपटली. मी मैदानावर आलो. बॅटला बॉल लागला आणि समोरच्या खेळाडूच्या मदतीने धावा सुरू केल्या.
दोघांनी मिळून ४३ धावा केल्या. तेवढ्यात समोरचा गडी बाद झाला. पुन्हा टेन्शन वाढले. पाहिजे होत्या फक्त ७ धावा. आता दहाव्या खेळाडूला धीर देण्याची वेळ माझी होती. तो दबकत दबकत खेळत होता. चोरटी एखाद्-दुसरी धाव काढत होता. एक चेंडू आला अन माझ्याकडून दणदणीत चौकार मारला गेला अन् स्टेडियम दणाणून गेले. कप्तानासह सर्व खेळाडुंनी मैदानाकडे धाव ठोकली. मला व माझ्या जोडीदार खेळाडूला उचलून घेतले.
गौरवाने तंबूत आणले, जणू काही मीच एकटा यशाचा मानकरी होतो. आमच्या संघाने ट्रॉफी जिंकली होती. ट्रॉफी घेतानाही आमचा सर्व संघ उपस्थित होता. ट्रॉफी डोक्यावर घेऊन नाचत होता. असा हा माझा क्रिकेटचा सामना माझ्या जीवनातील अविस्मरणीय सामना ठरला. (100 हुन अधिक निबंध वाचा तुमच्या मोबाईलवर )
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद .
निबंध 2
एक रंगलेला क्रिकेटचा सामना
आमच्या वसाहतीच्या जवळच एक मोठे मैदान आहे. तेथे आम्ही नेहमी क्रिकेट खेळतो. एके दिवशी मोठ्या माणसांचा क्रिकेटचा सामना घ्यायचे ठरले. माझे बाबासुद्धा त्यात सामील झाले. 'संघ अ' आणि 'संघ ब' असे दोन संघ तयार करण्यात आले. आमच्या वसाहतीतील सर्व घरांत ही बातमी पसरली. सर्वांना उत्सुकता वाटत होती.
मग सामन्याचा दिवस उगवला. दोन्ही संघ मैदानात उतरले. वसाहतीत सर्व लोक सामना पाहण्यासाठी जमले होते. काहीजण खिडकीतून पाहत होते. सामना सुरू झाला. काहीजण खरोखरच छान खेळले. 'अ' संघातल्या चित्रेकाकांनी ५० धावा काढल्या, तर 'ब' संघातल्या मूर्तीकाकांनी सहा गडी बाद केले. बोंद्रेकाका खूप जाडे आहेत. त्यामुळे धावताना ते मजेशीर दिसत होते.
एकदा धावताना ते पडले. तेव्हा सगळे हसून हसून बेजार झाले. स्वत: बोंद्रेकाकासुद्धा हसत होते. अखेरीस ‘संघ अ' विजयी झाला. सगळ्यांनी एकमेकांचे अभिनंदन केले. त्यानंतर सगळ्यांना खाऊ वाटण्यात आला. त्या दिवशी सर्वजण खेळातील आठवणी काढून गप्पा मारत होते. त्या दिवशी खूप मजा आली.

महत्वाचे मुद्दे :
- आम्ही मुले नेहमीच खेळतो
- एके दिवशी मोठ्या माणसांचा सामना
- काहीजण चांगले खेळले
- काही गमती
- आनंदाचे वातावरण.
निबंध 3
मी पाहिलेला क्रिकेटचा सामना
पण यात विशेष आवडला तो दुसरा कसोटी सामना. कारण, या सामन्यामुळे विश्वचषक सामन्यात लागलेला कलंक पुसला गेला. बांगलादेशच्या याच संघाने आमच्या सर्व वीरांना चारी मुंड्या चित केले होते. त्याच संघावर आमच्या क्रिकेट वीरांनी नेत्रदीपक विजय मिळवला.
असा हा सामना बांग्लादेशातील ढाका येथील शेरेबांगला स्टेडियमवर झाला. प्रथमच नाणेफेक जिंकून भारतीय संघाने फलंदाजी स्वीकारली. सुरुवातीलाच आपल्या खेळाडूंना सूर सापडला आणि भारतीय फलंदाजांनी बांग्लादेशच्या वेगवान व फिरकी गोलंदाजीचे पार खोबरे करून टाकले. एकापाठोपाठ एक अशा पाच फलंदाजांनी आपली शतके झळकावली.
सचिन व सौरभ यांनी आधीचा लागलेला डाग पुसून टीकाकारांची बोलती बंद केली. सहाशे दहा धावांचा डोंगर रचून भारतीय संघाने आपला डाव सोडला आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याला, बांग्लादेशला, खेळाची संधी दिली.
भारताच्या झहीर खानच्या तुफानी गोलंदाजीपुढे बांग्लादेशचा अर्धा संघ बाद झाला. उरल्यासुरल्या फलंदाजांना अनिल कुंबळेने तंबूत पाठवले.
चारशे धावांचे ओझे घेऊन फालोऑन स्वीकारून बांगलादेश दुसरा डाव खेळायला मैदानात उतरला. आता पाऊसच त्यांना वाचवू शकणार होता. पण त्या दिवशी तोही त्यांच्यावर फिदा नव्हता. या डावात बांगलादेशच्या खालेद मासूद, अश्रफूल आणि मोर्तझा यांनी अटीतटीची झुंज दिली. पण भारतीय खेळाडू आता पेटून उठले होते. अगदी सचिनने गोलंदाजीतही आपली करामत दाखवली आणि दोन गडी टिपले. भारताने बांग्लादेशचा १ डाव आणि २३९ धावांनी दणदणीत पराभव केला.
या यशाने भारताने जणू दाखवून दिले, 'हम भी कुछ कम नही !' आता आपल्या लाडक्या खेळाडूंवर टीका करणाऱ्यांची तोंडे बंद झाली, याचा मला विशेष आनंद झाला.
महत्वाचे मुद्दे :
- विश्वचषक सामन्यात आलेले अपयश
- त्यामुळे निंदानालस्ती
- मन दुखावले
- बांग्लादेशात सामने
- फलंदाजीतील पराक्रम
- गोलंदाजीतील विक्रम
- मिळालेले यश
- यशाचा परिणाम.
निबंध 4
मी पाहिलेला चुरशीचा सामना
इंग्लंडमध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने चालले होते. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या संघांत उपांत्य सामना होणार होता. हा मी पाहिलेला अत्यंत चुरशीचा सामना होता. सामन्याचा दिवस उजाडला. मी खादयपेये घेऊन स्टेडियमवर गेलो. ठीक वेळेवर दोन पंच आणि दोन्ही संघांचे कप्तान मैदानावर आले. नाणेफेक झाली.
त्यात दक्षिण आफ्रिकेच्या कप्तानाने हॅन्सी क्रॉनिएने बाजी मारली. मैदानाचा रागरंग पाहून त्याने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. थोड्याच वेळात ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर अॅडम गिलख्रिस्ट आणि मार्क वॉ फलंदाजीसाठी मैदानात उतरले, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. कप्तानाने चेंडू शॉन पोलॉक याच्या हातात दिला.
आता साऱ्या प्रेक्षकांनी आपले श्वास रोखून धरले होते. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने आपल्या खेळाची सुरवात मोठ्या सावधपणे केली. खेळ थोडा धीमा वाटत होता. प्रेक्षक धावांच्या आतषबाजीसाठी आतुर होते; पण फलंदाज फारच जबाबदारीने खेळत होते.

नियोजित पन्नास षटकांमध्ये ऑस्ट्रेलियाने आपल्या नावावर २१३ धावा झळकावल्या. चाळीस मिनिटांची विश्रांती सुरू झाली. क्रीडांगणावर खेळाडू नव्हते, प्रेक्षक जरा सैलावले होते. बरोबर आणलेल्या खादयवस्तूंचा समाचार घेणे सुरू झाले. पण कोठेही कागद फेकाफेकी नव्हती. विश्रांतीचा काळ संपला; पण कोठेही अस्वच्छतेचा अंशही नव्हता.
थोड्याच वेळात दक्षिण आफ्रिकेचे सलामीवीर मैदानावर फलंदाजीसाठी उतरले. ऑस्ट्रेलियाचा संघही क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. दक्षिण आफ्रिकेला सामना जिकण्यासाठी २१४ धावा करायच्या होत्या. सुरवात चांगली झाली. धावफलकावर दक्षिण आफ्रिकेच्या नावावर बिनबाद ४६ धावा लागल्या. जॉन्टी होडस व लान्स क्लसनर यांनी वेगाने फलंदाजी केली.
धावफलकावर ७ गडी बाद २०० धावा लागल्या. आता फक्त १४ धावा करायच्या होत्या. बहुतेक हेच दोन्ही खेळाडु सामना जिंकून देतील, असे वाटत असतानाच जॉन्टी बाद झाला. सारे प्रेक्षक हळहळले. जमलेली जोडी फुटली होती. नंतर आलेला शॉन पोलॉक शून्यावर बाद झाला. आता चुटपूट लागली, दक्षिण आफ्रिका सामना गमावणार की काय? पण अखेरच्या षटकात क्लुसनरने तीन चौकार मारले.
आता फक्त दोनच धावा हव्या होत्या; पण शेवटचा फक्त एकच गडी बाकी होता. कशीबशी एक धाव मिळाली. आता एक धाव काढली की विजय दक्षिण आफ्रिकेचा होणार होता. सारे प्रेक्षक नि:स्तब्ध होते आणि दुर्दैव म्हणजे, डोनॉल्ड धावचीत झाला. दोन्ही संघांची धावसंख्या सारखीच झाली, २१३ ! मॅच 'टाय' झाली होती.

मग विजय कोणाचा? सारे वातावरण संभ्रमित होते. पंच निर्णय काय देणार?
सर्व अधिकाऱ्यांच्या विचारविनिमयानंतर निर्णय जाहीर झाला. साखळी सामन्यांत पहिल्या फेरीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर मात केलेली असल्यामुळे 'ऑस्ट्रेलिया'चा संघ विजयी ठरला. दक्षिण आफ्रिकेचा संघ या रोमहर्षक सामन्यात पराभूत झाला होता. 'क्रिकेट इज ए गेम ऑफ चान्स' म्हणतात ते यासाठीच! आजवर मी अनेक सामने पाहिले; पण अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता टिकवून धरणारा असा रंगतदार सामना मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.

- सामना कोठे व कोणत्या खेळाचा
- संघ
- सामन्याचे वर्णन
- सामना आवडल्याची कारणे
- अविस्मरणीय घटना
- सामना पाहून आल्यावर मनात आलेले विचार...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत