aai sampavar geli tar essay in marathi | आई संपावर गेली तर निबंध
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण aai sampavar geli tar marathi nibandh बघणार आहोत. मानवाला कोणत्याही गोष्टीचे महत्व तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपल्या जवळ असणारी एखादी गोष्टं आपल्यापासुन दुर निघुन जात नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास आईचे देता येईल, आपली आई संपुर्ण कुटुंबासाठी दिवस रात्र राबत असते. सर्वांची काळजी करत असते. पण हीच आई जर संपावर गेली तर काय होईल. हेच या निबंधात वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर मग सुरूवात करूया निबंधाला.
'आई, माझं गणिताचे पुस्तक कोठे आहे?' 'आई, हा निबंध कसा लिहू ग? काही मुद्दे सांग ना.' 'आई, या रविवारी जिमखान्याची सहल आहे. काय देशील डबा?' 'आई, यंदा दिवाळीत फराळाचे पदार्थ भरपूर करायचे हं!' 'आई, मला बॅडमिंटनची रॅकेट हवी आहे. कधी घेशील सांग?' अशी आपली हर एक कामे आईशी निगडित असतात. पण समजा, आई संपावर गेली, तर ...
![]() |
aai sampavar geli tar essay in marathi |
आई संपावर गेल्यास घराचे घरपणच हरवेल. सकाळी उठायला हमखास उशीर होईल; कारण नेहमीप्रमाणे लवकर जागे करण्यास आई नसेल. न्याहारीला टेबलावर केवळ कोरडा पाव असेल. लोणी स्वतः लावून घ्यायचे म्हणजे केवढे कठीण! जवळजवळ उपासमारच! (हे पण वाचा माझी आई मराठी निबंध)
शाळेत जातानाही किती तरी गडबड झालेली असेल. कंपासपेटीच विसरल्यामुळे लिहायला पेन्सिल, पेन काहीच नसणार ! मग त्यासाठी शिक्षकांची बोलणी खावी लागणार. मधल्या सुट्टीसाठी डबाही नसणार, कारण न विसरता सुट्टीसाठी डबा देणारी आई संपावर गेलेली असणार.
शाळेतून दमून भागून घरी यावे, तर स्वयंपाकघरातील सारा पसारा आवरणार कोण? टेबलावर ब्रेड, लोणचे, चटणी ठेवलेली असणार आणि बरोबर एक चिठ्ठीही असणार. 'आई संपावर आहे.' या नुसत्या कल्पनेनेच माझे डोळे पाझरू लागले. आईच्या अपार वात्सल्याची ती जणू पावतीच होती!
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद .
निबंध 2
खरंच 'आई' म्हणजे आत्मा आणि ईश्वर आईची महती वर्णनासाठी घेतली तर शब्द अपुरे ठरतात. अशी सर्वांची लाडकी आई संपावर गेली तर?.... प्रत्यक्ष देवालाही आईच्या कुशीचा , तिच्या स्नेह - वात्सल्याचा मोह आवरता आला नाही, तिथे आम्हां माणसाचे काय? आई संपावर गेली तर सकाळी लवकर अभ्यासाला कोण उठविणार? अन् तेही न रागावता..... केसात हलकीशी बोटे फिरवून ‘पिंटू , ऊठ' असं कोण म्हणणार? दूध, न्याहारी कोण देणार? सारे प्रश्नच प्रश्न ..... या सर्वांचे उत्तर तर 'आईच'! पण तिने संप पुकारला तर ..... बापरे कल्पनेनेच मला घाबरून सोडले.
आई दिवसरात्र आपल्यासाठी, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी किती कष्ट करत असते याची जाणीव झाली. तिच्याविना घर चालणार तरी कसे? बाबांना ऑफिसात वेळेवर जाता येईल का? स्वयंपाक कोण करणार? बाहेरचं जेवण रोज आवडेल का? घरात बहीण-भावंडाची भांडणे कितीतरी वाढतील आई असली की घर कसं प्रसन्न अन् शांत असतं. ती नसेल तर शिस्तच राहणार नाही. घरात अव्यवस्थितपणा वाढेल . घरात बहिण भावंडाची भांडणे किती तरी वाढतील.
संस्काराची शिदोरी कोण पुरवेल मग? आईच्या प्रत्येक कृतीतून , प्रत्येक शब्दातून , प्रत्येक नजरेतून प्रेमाचा निरंतर झरा खळखळत असतो. त्यामुळेच तर कुटूंबसंस्था टिकून राहते. तीच संपावर गेली तर सारचं बिघडेल. कुणाचाही कुणाशी मेळ बसणार नाही.
आईच्या सहनशक्तीला तर तोड नाही. तिचं शांत गंभीर अंस्तितव, मौन राहून ही अनेक प्रश्नांचं उत्तर देऊन जातं. तिच्यामुळे घरातला कलह टळतो. महत्त्वाचे निर्णय घेताना तिच्या अमोल विचारांचा हातभार लागतो. घरातल्या सर्वांना काय - काय लागते? सर्वांचे वेगवेगळे स्वभाव कसे आहेत? सर्वांच्या वेळा कशा सांभाळायच्या? सर्वांना वेळेवर सर्व कसे उपलब्ध करून द्यावे? सर्वांच्या अडचणी कशा सोडवाव्यात हे सारं 'आई' च करू शकते. तिला पर्याय होऊच शकत नाही .
आदर्श माता एकटी पूर्ण मंत्रिमंडळ' सांभाळते. ते सारे एकटी घरात सांभाळत असते. कारण ज्या वेळी आई मुलाला सकाळी उठवून स्नान इत्यादी कामे करावयास लावते तेंव्हा ती आरोग्यमंत्री असते. दप्तर व्यवस्थित देऊन शाळेत पाठवते तेंव्हा ती शिक्षणमंत्री असते. घरी जेवण, न्याहरी देताना ती अन्नपुरवठामंत्री असते. घरकाम , इतर कामे , अभ्यास करावयास लावते तेंव्हा ती गृहमंत्री व औद्यागिकमंत्री असते. खेळ व व्यायाम यासाठी प्रवृत्त करते तेंव्हा ती क्रीडामंत्री असते. रात्री मच्छर . भीती यापासून जपते तेंव्हा ती संरक्षणमंत्री असते .,
आई संपावर गेली तर कुटुंबातील सर्वांचे आरोग्य धोक्यात सापडेल. पावसात भिजल्यास खराखरा डोके पुसून , तव्यावरच्या गरम कपड्याने कोण डोक्याला शेक देईल? हळूवार मायेच्या स्पर्शानेच अर्धे दुखणे नीट होते. मग तिच्यासारखी आमची काळजी कोण घेईल? कुटूंबातल्या सर्वांचा विकास ठप्प होईल. पर्यायाने समाजाचे व देशाचेही नुकसान होईल कारण, आईसारखा दुसरा कोणी गुरू नाही.
साने गुरुजी म्हणतात"खरी शिक्षणदात्री आईच होय, ती देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व
ज्ञान देणारी तीच" प्रत्येकाची काळजी घेणारी अशी आई. थोडा उशीर झाला तरी बाळाच्या वाटेकडे डोळे लावून दारात उभी राहणारी आई.... या माऊलीपुढे हे विश्व , स्वर्ग सारं काही फिक! आईची प्रेममय, त्यागमय मूर्ती ही जीवनाची स्फूर्ती आहे, जीवनाची खरीखुरी प्रेरणा आहे. तिच्याविना एकही क्षण मला करमत नाही. तिला माझी खूप खूप काळजी आहे. मी तिच्या हृदयाचा तुकडा आहे. '
विचारांची शृंखला या शेवटच्या वाक्यावर येऊन थांबली.... अरे, खरंच की! आई मुळी संपावर जाणारच नाही. इतकी कठोर ती माऊली होऊच शकत नाही. फुलासारखं कोमल तिचं हृदय असं वज्रासारखं कठीण होणारच नाही.....
'ए पिंटू , आज रविवार . सुट्टीचा दिवस जेवायलाही सुट्टी आहे होय? चल लवकर!''..... आईच्या हाकेनं मी भानावर आलो.
एक भयानक स्वप्न बघून डोळे उघडल्यानंतर 'ते स्वप्न होते' हे कळले अन् तेंव्हा जसं मन सुटकेचा श्वास घेतं तशी अवस्था माझी झाली होती.... तरीही मी उद्गारलो
“आई, तू कधीही संपावर जाऊ नकोस....तुझ्या तळहाताचा पाळणा तुझ्या नजरेची पखरण,तुझ्या स्नेहाची बरसात तुझ्या संस्काराची काय बात?अस्तित्व माझे तुझ्यात दुसरे काही नको या जगात...."
Very nice essay please asa essay ajun liha he aplyala lihdya sathi yeil
उत्तर द्याहटवाआम्ही लवकरच नवीन निबंध घेऊन येऊ,प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
हटवाVery nice essay.asach essay lihit raha.ha khup upyogi ahe������
उत्तर द्याहटवाधन्यवाद. तुमच्या अमूल्य प्रतिसादाकरीता आम्ही आभारी आहोत, तुमचा प्रत्येक प्रतिसाद आम्हाला उत्साह देऊन जातो.
हटवाThank you for giving a very interesting and easy essay...
उत्तर द्याहटवाthank you for your support
हटवाखूप छान निबंध आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद. तुमच्या अमूल्य प्रतिसादाकरीता आम्ही आभारी आहोत
हटवाHa essay nice ahe
उत्तर द्याहटवाकौतुका बद्दल आभारी आहोत,आमच्या वेबसाइटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
हटवाGood essays
उत्तर द्याहटवा